Skip to main content

हिंडेनबर्ग,अदानी आणि आपण

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी सोमवार, 30/01/2023 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्च ह्यांचे अदानी समूहावरील संशोधन प्रसिद्ध झाले आणि देशात खळबळ उडाली. https://hindenburgresearch.com/adani/ Adani Group: How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History तब्बल दोन वर्षे संशोधन केल्यावर त्यांनी काढलेले निष्कर्ष/आरोप काही धक्कादायक आहेत. भारतोय लहान मोठ्या उद्योजकांची परदेशात खाती असतात हे जगजाहीर आहे. अनेकांच्या पोकळ(शेल) कंपन्या असतात व तेथुन money laundering केले जाते. पण अदानी समुहाकडुन अशा प्रकारचे व्यवहार अपेक्षित नव्हते. विशेष करुन केंद्र सरकारच्या 'खास' अशा उद्योगपतींकडुन ही अपेक्षा नव्हती. The Adani Group has previously been the focus of 4 major government fraud investigations which have alleged money laundering, theft of taxpayer funds and corruption, totaling an estimated U.S. $17 billion. Adani family members allegedly cooperated to create offshore shell entities in tax-haven jurisdictions like Mauritius, the UAE, and Caribbean Islands, generating forged import/export documentation in an apparent effort to generate fake or illegitimate turnover and to siphon money from the listed companies. एवढे मोठे आरोप होऊनही भारतीय टी.व्ही चॅनेल्स मात्र 'काही घडलेच नाही' असा आव आणत आहेत. मराठी चॅनेलस तर त्याहुन हास्यास्पद. ए बी पी माझावर ह्या आरोपांवर बोलण्यापेक्षा 'हिंडेन्बर्ग' नाव कसे पडले, त्याच्या प्रवर्तकाची पार्श्वभूमी सांगत बसले होते. मराठी लोकांना 'अर्थ विश्वात शहाणे' करुन सोडण्याचा वसा घेणारे अनेक अर्थतज्ञ्/पत्रकार अजुनतरी गप्प आहेत. म्हणजे अहवालाचा अभ्यास करत असावेत असे समजुन चालुया. निदान मिपावर तरी ह्यावर चर्चा व्हावी ही अपेक्षा.!!

वाचने 65319
प्रतिक्रिया 273

प्रतिक्रिया

In reply to by तर्कवादी

त्या क्रेडीट सुसे आणि सिटी बँक फार काही आदर्श नाहीत. Credit Suisse agreed to pay a 238 million settlement to end a French probe surrounding an alleged tax evasion scheme between 2005 and 2012 https://complyadvantage.com/insights/credit-suisse-settles-e238m-money-… अमेरिकन आणि युरोपियन बॅंकांचे हात्,पाय डोके.. सगळेच चिखलात बरबटलेले असते. हे लोक नियमानुसार वागले असते तर अनेक युद्धे टाळता आली असती.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

त्या क्रेडीट सुसे आणि सिटी बँक फार काही आदर्श नाहीत.
शक्य आहे.. हर्षद मेहतावरील वेब मालिकेत सिटी बँकेवरही दोष दाखवण्यात आला होता. असो.. मला तर त्या अडाणितही फारसं स्वारस्य नाही. मी कधी अडाणी समूहाच्या कोणत्याही कंपनीचे समभाग घेतले नाहीत. त्यामुळे अडाणी वाचला वा डुबला तरी मला काही फरक नाही. बाकी अडाणीचा विजय मल्ल्या होईल वगैरे मला वाटत नाही. निदान २०२४ पर्यंत तरी नक्कीच नाही होणार.

हिंडेनबर्ग मधले ४-५ लोक काहीही बोलले आणी एवढा मोठा उद्योग गळपटला असे होते का ? हिंडेनबर्ग च्या अहवालात त्रुटी दाखवल्या आहेत त्यामुळे एवढा शेयर पडला आहे त्रुटी बद्दल चर्चा कुठेच नाहीये

In reply to by कपिलमुनी

उद्यापासून हा विषयही बाजूला टाकला जाईल. अदानी आणि पार्टीने चांगलाच धडा घेतलाय ह्या प्रकरणाचा. कदाचीत पुढील महिन्यात त्याच्या कंपन्या वर्षभर F&O मधून बाहेर काढल्या जातील.

केस दाखल करा. -- इझ्रायलमध्ये किंवा इतर कुठे अदानीच्या कंपन्यांना कामं मिळाल्याने पोटदुखी नाही ना?

जो काम भारत जोड़ो यात्रा नहीं कर सकी, अडानी संकट ने कर दिया... बातमीचा मजकूर जाऊद्या पण शीर्षक आवडल बुवा आपल्याला :)

यांचा संबंध जोडायचे बाकी आहे. उद्योगांनी गैरकायदा कंपनी चालवली असा आरोप असला तर ते बघणाऱ्या संस्था, न्यायालये पर्याय आहे. पूर्वी २जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळा उघडकीस आला तेव्हा सरकार पडलं होतं का?

In reply to by कंजूस

अडाणी आणि सरकार यांचा संबंध आहे म्हणूनच आदनींनी एव्हढी प्रगती केलेली आहे. आणि म्हणूनच सेबी, ED या सारख्या संस्थाकडून निपक्ष चौकशीची अपेक्षा नाही.

अडाणी शेअर ची धुमश्चक्री चालवलेली आहे धाग्यावर... एकाही सदस्याने पि ई रेशो , व्हॅल्युअशन च्या दृष्टीने मुद्दा मांडला नाही... ७००/ ८०० पि ई रेशो असलेली कंपनीचे सध्याचे अर्निंग, सध्याचा पि ई रेशो जस्टिफाय करायला, भविष्यात ७०, ८० " पट" वाढायला हवे... त्यानंतर ते रिजनेबल होतील... आता पोर्ट सिमेंट असे कॅपिटल इंतेन्सिव बिझनेस... ७०, ८० पटीने वाढायला फुल्ल स्पीड जरी लावला तरी २५, ३० वर्षे लागतील.. हिंडेनबर्ग म्हणते त्याप्रमाणे हा शेअर ८०, ९० टक्के कोसळला तरी हे शेअर महागच म्हणावे लागतील... आताच्या एफ पि ओ मध्ये रिटेल गुंतवणूकदार हिस्सा ०.५ टक्के सुद्धा नाही भरला, संस्थागत हिस्सा १००% भरला होता... तरी तो एफ पि ओ रद्द केला.. म्हणजे यांना कुणाच्या माथी महाग भावात शेअर मारायचे होते ??? कळलं ना ? चीज चा तुकडा गळाला लावलेला पण किरकोळ उंदरे आलीच नाहीत... इकडे सरकार अश्यारितीने इन्शुरन्स वैगरे टॅक्स बेनेफित कमी करत आहे, पिपी एफ वर कमी व्याज दर ठेवले, उद्या घर कर्जावरील व्याज रुपी खर्च ची वाजाव ट सुद्धा टॅक्स बेणेफि ट मधून काढून टाकतील थोड थांबा... जनरली एफ डी चे दर हे इन्फ्लेशन ला मात देत नाही म्हणजे मध्यमवर्गा कमी कमी फायदे करत राहून, त्यांना रिस्की शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायला मजबूर करायचं... (तरुण वर्ग नाही , अती प्रौढ व वृद्ध हा मध्यम वर्गाचा मोठा भाग आहे ) तर त्यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायला मजबूर करायचं... इकडे साहेबांचे मित्र आहेतच त्याचे महाग शेअर गळ्यात मारायला... तुम्ही एल आय स्या काढा तरी तुमचे पैसे अडानीत.. तुम्ही एस बी आय पॉलिसी एफ ड्या करा तरी तुमचे पैसे अडानित... तुम्ही शेअर मध्ये गुंतवणूक करायला गेला तर राष्ट्रप्रेमी लोक व्हॉटस् अॅप फेसबुक टिव्ही वरून कोणाचा धोशा लावणार, कोणाची तळी भरायला लावणार ?? डोळे उघडा.. एफ पि ओ मध्ये रिटेल गुंतवणूकदार हिस्सा ०.५ टक्के सुद्धा नाही भरला, संस्थागत हिस्सा १००% भरला होता... तरी तो एफ पि ओ रद्द केला.. म्हणजे यांना कुणाच्या माथी महाग भावात शेअर मारायचे होते ??? कळलं ना ? हे शेअर्स २० च्या पि ई जवळ आल्यावर विचार करा... १५ लाख रुपये चा जुमाला प्रमाणे, अडाणी शेअर बद्दल च्या डायरेक्ट इंडायरेक्त बाजार गप्पा पासून दूर रहा...

In reply to by आंद्रे वडापाव

इकडे सरकार अश्यारितीने इन्शुरन्स वैगरे टॅक्स बेनेफित कमी करत आहे, पिपी एफ वर कमी व्याज दर ठेवले, उद्या घर कर्जावरील व्याज रुपी खर्च ची वाजाव ट सुद्धा टॅक्स बेणेफि ट मधून काढून टाकतील थोड थांबा
नव्या पद्धतीत हे सुरु केलं आहे. -दिलीप बिरुटे

अध्यक्ष महोदय, चोवीस जानेवारीला हिंदेनबर्गचा रिपोर्ट आला आणि देशभर गोंधळाला सुरुवात झाली. अदानींचे शेअरबाजार मूल्य गडगडले, कितीतरी कोटींचे नुकसान झाले. एलायसी एसबीआय यांच्या अदानी समुहात असलेल्या गुंतवणूका, त्या कोणाच्या सांगण्यावरुन केल्या गेल्या ? सर्वसाधारण गुंतवणूकदार यांचे झालेले नुकसान वगैरे हे एकीकडे सुरु होतं तर दुसरीकडे सरकारच्या वतीने अतिशय सावध पावलं उचलली गेली. शेअरबाजारातल्या गैरव्यवहाराशी सरकारचा काही संबंध नाही, अशी मांडामांड सुरु झालेली दिसते. त्याचा परिणाम आता अदानी समुहाच्या समभागांवर होतांना दिसते आहे. काल मिपाकर, आग्या १९९० यांनी 'हिंडेनबर्गला धोबीपछाड करणारी बातमी येईल' असा अंदाज व्यक्त केला होता, मला वाटतं, ही प्यार की झप्पी म्हणजे अर्थमंत्री, वित्तसचिव यांचे स्टेटमेंट आले आणि अदानी समुहाचे काही समभागांची तब्येत सुधारायला लागली असे वाटते. ''अदानी समुहावर झालेले आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमितता याचे आरोप आणि शेअरबाजारात निर्माण झालेली अस्थिरता याचा अर्थशास्त्रीय स्तरावर विचार केल्यास हे तर चहाच्या पेल्यातील वादळ आहे इति वित्त सचिव टी. व्ही. सोमनाथन. तर, सध्याचा वाद अनाठायी आणि अदानींसारख्या उद्योजकांविषयी असे काही विवाद निर्माण होतील अशी अपेक्षा आपण कधी व्यक्त केली नव्हती इति केंद्रीय अर्थमंत्री नीर्मला सितारमण'' (छापील मटा) लोकसभा आणि राज्यसभेत शुक्रवारीही गोंधळ झाला. अदानी समूहासंबंधी मुद्यांवर चर्चा करावी आणि संयुक्त संसदीय समितीद्वारी या प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले. बाकी मिडीयात कुठेही सीबीआय, इडी, आयटी सध्या दिसत नाही. एकूणच सरकारची भूमिका सध्या या सर्व प्रकरणाकडे बघायचंच नाही, ही भूमिका सरकारला किती काळ गप्प बसवते हे पाहणे रोचक ठरणार आहे. -दिलीप बिरुटे

इकडे सरकार अश्यारितीने इन्शुरन्स वैगरे टॅक्स बेनेफित कमी करत आहे, पिपी एफ वर कमी व्याज दर ठेवले, उद्या घर कर्जावरील व्याज रुपी खर्च ची वाजाव ट सुद्धा टॅक्स बेणेफि ट मधून काढून टाकतील थोड थांबा... हे तर पूर्वीच व्हायला हवे होते. ह्या सरकारने निदान सुरुवात तरी केली आहे. उत्पन्न मर्यादा काढून टाकून सर्व उत्पन्न गटांना आयकर कक्षेत आणले पाहिजे, शेती उत्पन्नालाही. देशाच्या प्रत्येक नागरिकाने आयकर भरला पाहिजे आणि कुठल्याही बचतीच्या, आरोग्याच्या किंवा गुंतवणुकीच्या नावाखाली परत मागू नये.

In reply to by आग्या१९९०

अरे दादा... वृद्ध व अती प्रौढ, निवृत्त झालेले असा लोकसंख्येचा मोठा हिस्सा आहे रे... त्यांना स्टॉक मार्केट मध्ये आपल्या धनाचा मोठा हिस्सा ठेवायला मजबूर करणे.. चांगले नाही.. असं मला म्हणायचं आहे... हा आता, परदेशात असतं तसे, सर्व नागरिकांसाठी चांगला वैद्यकीय वेलफेअर व्यवस्था असती आणि एक इन्फ्लेशन प्रु एफ एखादी निवृत्ती योजना असती ( फक्त सरकारी नोकर किंवा संघठीत क्षेत्रातील लोकांसाठी नाही) तर मग, मार्केट मध्ये कितीही इन्फ्लेशन येवो, आपल्याला दर्जेदार वैद्यकीय सुविधा व माफक अन्न वस्त्र निवारा गरजा भागणार असतील... अशी शास्वती असेल... तर भारतीय व्यक्ती उत्साहाने जास्तीचे धन भारतीय मार्केट मध्ये गुंतवेल.. मजबुरी मधे नाही.... असो

In reply to by आंद्रे वडापाव

थोडे फेरफार करून इन्कम टॅक्स सी संकल्पनाच भारतातून बंद केली जाऊ शकते. लुटन्स बंगलो झोन ची किमंत २० लाख कोटी आहे. हि जमीन विकून संपूर्ण भारतीयांना ३ वर्षे आयकर मुक्ती दिली जाऊ शकतेच पण ह्या जागेवर जे उद्योग धंधे निर्माण होतील त्यातून येणारा कर वेगळा असेल. भारतीय डिफेन्स कडे साधारण २४ लाख कोटी ची जमीन विनावापर पडून आहे. हि जमीन ब्रिटिश लोकांनी हस्तगत केली होती. ती विकून आणखीन ३ वर्षे भारतीयांना कर मुक्ती दिली जाऊ शकते. महाराष्ट्र डेअरी कडे ८ लाख कोटींची जमीन पडून आहे. ती सुद्धा विकून आणखीन एक वर्ष करमुक्ती दिली जाऊ शकते. विनावापर पडून असलेली जमीन वापरांत आल्याने त्यातून अर्थव्यवस्था वाढते आणि आणखीन कर उत्पन्न येते ह्यामुळे साधारण १० वर्षांत एकूण वार्षिक कर आयकरा पेक्षा वाढवला जाऊ शकतो. आयकर नसल्याने विविध कागदी घोडे नाचविण्यात वेळ आणि पैसा वाया जातो तो वाचतो तो वेगळा !

In reply to by साहना

लुटन्स बंगलो झोन ची किमंत २० लाख कोटी आहे. हि जमीन विकून संपूर्ण भारतीयांना ३ वर्षे आयकर मुक्ती दिली जाऊ शकतेच
त्या जमिनीची किंमत किती हे मला माहित नाही- समजा २० लाख कोटी आहे असे गृहित धरू. तरीही काहीशी डाव्या/समाजवादी लोकांच्या तोंडात असणारी भाषा (म्हणजे अंबानीचे घर विका आणि गरीबांची पोटं भरा) तुमच्या तोंडात कशी याचे आश्चर्य वाटत आहे. परवा निर्मलाकाकूंनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाप्रमाणे भारत सरकारचे पुढील वर्षी करांमधून उत्पन्न (२३ लाख ३० हजार ६३१ कोटी) असेल असा अंदाज बांधला आहे. हा आकडा राज्यांना त्यांच्या कराचा वाटा दिल्यानंतरचा आहे. जर भारत सरकारचे उत्पन्न २३ लाख कोटी असेल तर भारत सरकारलाही २० लाख कोटींची जमीन विकत घेणे परवडणार नाही. तसे असेल तर मग ती सगळी जमिन विकत घेणे कोणाला परवडणार आहे? त्याच्या अगदी १% क्षेत्रफळाची जमिन विकत घेतली तरी त्याची किंमत २० हजार कोटी होईल. ती किती कंपन्यांना परवडेल? तुमच्याआमच्यासारख्यांची बातच सोडून द्या. जमिन लाख विकायची असेल पण ती विकत घेणारा- म्हणजे त्या जमिनीची योग्य किंमत द्यायची क्षमता आणि इच्छा असलेला खरेदी करणाराही मिळायला हवा ना? तो कुठून आणायचा?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कदाचित मी जास्त स्पष्ट पणे लिहायला पाहिजे होते. ल्युटेन्स बंगलो झोन मधील सरकारी (आणि म्हणूनच भारतीय जनतेच्या मालकीची) अतिरिक्त जमीन २० लक्ष कोटी रुपयांची आहे. सध्या ह्या जमिनीतून भारत सरकार किंवा जनतेला काहीही फायदा होत नाही. हि इतरांच्या मालकीची जमीन नाही. त्याच प्रमाणे हि जमीन इतक्या रकमेस विकणे कदाचित एका झटक्यांत शक्य नाही त्यामुळे ल्युटेन्स बंगलो, डिफेन्स लँड , महाराष्ट्र दूध महामंडळ, विविध राज्यांच्या विविध खात्यांकडे असलेली अतिरिक्त जमीन विकून भरपूर संपत्ती निर्माण केली जाऊ शकते. जमीन सोडल्यास खाणकामाच्या लीज वगैरे पासून सुद्धा संपत्ती निर्माण करता येते. हे फक्त माझे मत नसून धनवापसी ह्या प्रोजेक्ट खाली काही लिबरटेरिअन भारतीयांनी ह्यावर काम केले आहे, आपण जास्त माहिती इथे वाचू शकता : https://wiki.dhanvapasi.com/index.php/Public_Wealth_Wiki

त्यांना स्टॉक मार्केट मध्ये आपल्या धनाचा मोठा हिस्सा ठेवायला मजबूर करणे.. चांगले नाही.. असं मला म्हणायचं आहे.. असे मी म्हणतच नाही. करसवलती काढून घ्याव्या प्रत्येक भारतीय नागरिकाच्या. मुंबईसारख्या शहरात सरकारी आणि महागरपलिकेच्या आरोग्यसेवा चांगल्या असूनही मध्यमवर्गीय आणि श्रीमंत त्याचा लाभ घेत नाही, उलट आरोग्य विमा काढून सरकारकडून करसवलत घेतात, infrastructure चांगले हवे असे म्हणायचे आणि घराच्या कर्जाच्या हप्त्यांच्या व्याजावर करसवलत मागायची. एकदा का कर सरकारच्या तिजोरीत गेला की पुन्हा तो कुठल्याही मार्गाने परत देता कामा नये. त्याचा योग्य विनियोग सरकारने करावा. जेव्हा प्रत्येक नागरिक कर भरेल तेव्हाच तो सरकारवर दबाव आणू शकेल चांगल्या सुविधांचा.

In reply to by आग्या१९९०

प्रत्येक भारतीय नागरिकाच्या. मुंबईसारख्या शहरात सरकारी आणि महागरपलिकेच्या आरोग्यसेवा चांगल्या असूनही मध्यमवर्गीय आणि श्रीमंत त्याचा लाभ घेत नाही,
_/\_ असो... मी आपली रजा घेतो...

In reply to by आंद्रे वडापाव

मुंबईसारख्या शहरात सरकारी आणि महागरपलिकेच्या आरोग्यसेवा चांगल्या असूनही मध्यमवर्गीय आणि श्रीमंत त्याचा लाभ घेत नाही. आपल्याला वस्तुस्थितीची अजिबात जाणीव नाही असे दिसते. महापालिकेच्या रुग्णालयात तपासण्या करायला प्रतीक्षा यादी किती मोठी आहे याची वस्तुस्थिती जाणून घेतली तर अशी सवंग विधाने आपण करणार नाही. तेथील मिळणाऱ्या सेवा, जर असलेल्या पायाभूत सुविधा आणि लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिल्या तर उत्तम आहेत. पण जर सोनोग्राफी एम आर आय साठी दोन दोन महिने प्रतीक्षा यादी असेल तर कोण मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत माणूस तेथे जाईल? तेथे खेपा मारण्यासाठी जेवढा वेळ खर्च करावा लागतो मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत माणसाच्या त्या वेळाची किंमत कितीतरी जास्त आहे म्हणून हि माणसे खाजगी सेवा पसंत करतात एवढी मूलभूत माहिती आपल्याला नसावी याचे आश्चर्य वाटते. माझ्या आईच्या कर्करोगाच्या वेळेस मी टाटा रुग्णालयाची सेवा फार जवळून पाहिली आहे आणि ज्याच्या कडे पैसे आहेत अशा माणसाने टाटा मध्ये अजिबात जाऊ नये असाच मी कळकळीचा सल्ला देईन. (याची अनेक कारणे आहेत. पण तो विषय वेगळा आहे) आपल्या कडे पैसे नसतील तर आपल्याला निवडीचा अधिकार राहत नाही ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. मग ते रुग्णालय असेल कि रेल्वे किंवा एसटी बस. लाल बसच्या सेवेचा किंवा रेल्वेच्या अनारक्षित डब्याच्या सेवा चांगल्या असूनही मध्यमवर्गीय आणि श्रीमंत त्याचा लाभ घेत नाही असेच आपले विधान म्हणते. आणि म्हणूनच वस्तुस्थितीपासून ते किती दूर आहे हे स्पष्ट आहे

In reply to by सुबोध खरे

आपल्याला वस्तुस्थितीची अजिबात जाणीव नाही असे दिसते. ज्याचा त्याचा अनुभव आणि दृष्टिकोन. माझा अनुभव आणि निरीक्षण, माझ्या वडिलांचे मोतिबिंदूचे ऑपरेशन जे.जे. रुग्णालयात केले. डोळे तपासणी, रक्तलघवी आणि इतर चाचण्या, प्रत्यक्ष ऑपरेशन, ऑपरेशन नंतर दोन दिवस रुग्णालय मुक्काम असे एकूण पाच दिवस लागले. सर्व तपासण्या जे. जे. मध्ये झाल्या. अगदी डोळ्याचा नंबरही तिथेच काढला.बाजारात उपलब्ध ब्रँडेड , unbranded कंपनीच्या लेन्सेस कमी किमतीत तेथेच उपलब्ध होत्या. निवड आपण करायची. दोन दिवस admit असताना रुग्णाला चहा, पाव मोफत होता. सगळे शिस्तबद्ध होते. सगळीकडे रांगेत बसायची सोय होती. कुठेच वशिल्याने काम चालत नव्हते. अधिकांश रुग्ण हे गरीब होते, ज्यांना सर्वच मोफत होते. हाताच्या बोटावर मोजण्याइतके मध्यमवर्गीय रुग्ण होते. ह्याउलट, वडिलांचे पहिले मोतीबिंदूचे ऑपरेशन ठाण्यात खाजगी डॉक्टरकडे केले तेव्हा अनुभव फार चांगला आला नाही. डोळ्याची तपासणी एका डॉक्टरकडे, रक्त लघवी तपासणी बाहेरील लॅबमध्ये, x-ray, ECG आणि फिटनेस सर्टिफिकेटसाठी वेगवेगळे डॉक्टरकडे जावे लागले. हे सर्व घेऊन पुन्हा डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन ऑपरेशनचा दिवस ठरवला गेल्यावर डोळ्याचा लेन्ससाठी नंबर काढायला घाटकोपरला जावे लागले कारण तेव्हा ठाण्यात ही सोय नव्हती. त्यानंतर ऑपरेशन झाले. ह्यात आठवडा गेला. खर्च आणि वेळही जे.जे. पेक्षा जास्त झाला. बाकी एस्टी आणि रेल्वेबद्दल असहमत. ह्या धाग्यावर माझ्याकडून जास्त विषयांतर होईल म्हणून जास्त लिहीत नाही.

In reply to by आग्या१९९०

माझा अनुभव आणि निरीक्षण, हे बरोबर आहे. मी काल रेल्वे लाईन पार केली कुठे काय झालं? म्हणजेच रेल्वे लाईन पार करणे सुरक्षित आहे. सांगितलं ना माझा अनुभव आणि निरीक्षण, बाकी सगळेच्या सगळे मध्यम वर्गीय आणि श्रीमंत लोक मूर्ख च आहेत

अथवा मोदींशी संबंधित लिहिले गेलेले स्तुतीपर धागे आणि प्रतिसाद हे मूलतःच अभ्यासू आणि निरलस वृत्तीने लिहिलेले असतात बरं का. तिथे “याचा काही दुवा आहे का कि उगाच घे कळ फलक आणि बडव” असं अजिबात म्हणायचं नाही. मोदी विरोधी गोष्टींसाठी लगेच संपादक मंडळाला साकडं? हि बघा मोदी स्तुतीपर धागा आणि प्रतिसाद यांची दोन उदाहरणे:

In reply to by सर टोबी

हायला हिंडेन बर्ग धाग्यात हे तुम्ही मोदी द्वेषाचे तुणतुणे कुठे आणलं अदानी आणि हिंडेंनबर्गच्या बेकरीत पाव भाजायच्या ऐवजी हे मोदी द्वेषाचे धुणं कशाला धुवायला आणलं?

अदानी समूहाने वीसहजार कोटी रुपयांचा एफपीओ मागे घेतल्याने देशाच्या आर्थिक प्रतिमेवर कोणताही परिणाम होणार नाही. -अर्थमंत्री निर्मला सितारामन. सरकारच्या स्पष्टीकरणामुळे अदानी समूहाच्या व्यवहारावर सावरण्यास मदत होईल का ते येत्या काळात लक्षात येईल दुसरीकडे हिंदेनबर्ग ने आता चीनचा मुद्दा काढला आहे, गुदामी इंटरनॅशनल कंपनीच्या संचालकाबाबत आरोप केले आहेत. (मटा) कोळसा, वीज प्रकल्पाबाबत डमी फ़र्म नोंदवल्याचे म्हटले आहे, दरमान्य अदानी समूहाने या ताज्या आरोपांबाबत त्यात काही तथ्य नाही असा दावा केला आहे. दुसरीकडे अदानी समूहाने हिंडेनबर्गला दिलेल्या उत्तरादाखल हिंदेनबर्गने जे प्रश्न विचारले त्याची उत्तरे दिले नाहीत असा आरोप केला आहे. (हिंडेनबर्ग) दुसरीकडे चुकीच्या गोष्टीचा संबंध राष्ट्रवादाशी लावल्या जात आहे, ते चूकीचे आहे. जे काय सत्य असेल ते समोर यावे. -दिलीप बिरुटे

हींडेनबर्ग ने आज वर ज्यांच्या बद्दल रिपोर्ट दिले त्यातील 80% कंपन्या मध्ये मोठे स्कॅम सापडून कित्येक लोकांना जेल मध्ये जावे लागले आहे त्यामुळे हींडेनबर्ग ला लोक गंभीरपणे घेतात.

In reply to by कपिलमुनी

हिंडनबर्गला लोक गंभीरपणे घेतात. आज जवळ जवळ एक महिना झाला ... हिंडनबर्गच्या प्रेडिक्शन प्रमाणेच ८५% फुगवटा निघून गेला भावातला ... काय तो रिसर्च .. काय ते टायमिंग ... काय तो स्ट्राईक ... एक्दम ओक्के ...

असे ऐकले आहे की या कंपनीला न्यूयोर्क स्टॉक एक्सचेंजने ताकीद दिली आहे. या कंपनीचे फक्त स्वत:चा फायदा कसा होईल याकडे लक्ष असते त्यामुळे अदानी कंपनी व्यवहार प्रामाणीकपणे करते अथवा नाही यात त्यांना स्वारस्य नाही. या कंपनीला कोणी तरी पैसे देऊन 2024च्या निवडणुकीच्या अगोदर हा रिपोर्ट लिहायला सांगितले आहे असा माझा अंदाज आहे. एक लक्षात ठेवणे जरूर आहे की अदानीना इतर देशातील बँकांनी पण कर्ज दिले आहे. कंपनीकडे चांगले असेट आहेत. स्वत: अदानी भारत सोडून पळालेले नाहीत.

In reply to by दिगोचि

> या कंपनीला कोणी तरी पैसे देऊन 2024च्या निवडणुकीच्या अगोदर हा रिपोर्ट लिहायला सांगितले आहे असा माझा अंदाज आहे. हिडेनबर्ग म्हणजे काही रवीश कुमार किंवा सुमार टेकतर नाहीत कि पैसे फेकले आणि काही बाही लिहिले. त्याशिवाय अमेरिकन कंपनी असल्याने काहीही खोटे नाटे लिहिल्यास नेसूचे सुद्धा जाण्याची शक्यता आहे कारण अमेरिकन कोर्ट व्यवस्था चालते. त्याशिवाय हिडेनबर्ग चा ट्रॅक रिकॉर्ड उत्तम आहे. त्या शिवाय कंपनी ज्या पैश्यांत खेळते त्या पैश्यांच्या एखादी भारतीय पार्टीचं विकत घेता येते. त्यामुळे ह्यांना पैसे देऊन अदानी ह्यांना टार्गेट करायचे आणि त्याचा परिणाम मोदी ह्यांच्यावर होईल आणि निवडणुकांत फायदा होईल वगैरे गोष्टी ह्या बादरायण संबंधाच्या वाटतात. भ्रष्ट काँग्रेस आणि विविधउद्योगपती जसे बजाज ह्यांचे जे सिम्बायोटिक संबंध होते त्या प्रकारचे संबंध मोदी आणि अदानी ह्यांचे आहेत ह्याची शक्यता कमीच आहे. मोदी ह्यांना अदानी च्या पैश्यांत रस नाही. अदानी ह्यांना वापरून भाजपायी आपले बँक अकाऊंट भरत आहेत ह्याची शक्यता सुद्धा कमी आहे. अदानी मोदी ह्यांचे पाठीराखे आहेत म्हणून अदानी ह्यांचे जीवन सुकर होत गेले असेच किमान मला तरी वाटते. रिलायन्स ऐवजी मोदी ह्यांनी विविध कंत्राटे अदानी ह्यांना दिली. ह्यांत कदाचित कायद्याचीए पायमल्ली झाली असली तरी अदानी ह्यांनी काम व्यवस्थित केले कि नाही हे महत्वाचे आहे. किमान पोर्ट धंद्याच्या बाबतीत तरी अदानी ह्यांनी अव्वल दर्जाचे काम केले आहे असे दिसून येते. अदानी बुडाले म्हणून मोदी ह्यांच्यावर काही परिणाम होण्याची शक्यता शून्य आहे.

हायला अदानी चा मुद्दा भक्तांना फारच झोंबलेला दिसतोय.. काही आयडी वनवांसातून भक्ती प्रकट करायला सरसावले आहेत . वरतून दट्ट्या मिळालेला दिसतोय.

In reply to by कपिलमुनी

मोदी रुग्ण तर फारच चेकाळले आहेत. तरी म्हटलं अजूनहि युगपुरुषांचे गुलाम कसे अवतरले नाहीत अडाणी हिंडेनबर्ग च्या धाग्यावर मोदीद्वेषाचं गळू परत फुटलंय . पावाच्या बेकरीत पाव भाजायचा ऐवजी आपलं धुणं धुवायला आणलय

राष्ट्रवाद, यात राष्ट्रीय भावना असते. वंश, भाषा, परंपरा इतिहास, संस्कृती, धर्म भौगोलिक वसतीस्थान, यात ते दडलेले असते. पण, आता हा राष्ट्रवाद लोक सोयीसाठी वापरतांना दिसतात. अदानी समूहाने हिंडेनबर्गच्या प्रश्नांना ४१३ पानांचं उत्तर लिहिलंय त्यात तिस-या पानावर हा फक्त कंपनीवर हल्ला नसून ''but calculated attack on india'' असे म्हटले आहे. Adani-Response पहिल्याच दुव्यावर पीडीएफ फाईल उघडते. कंपनीवरील आरोप हा भारतावरील हल्ला कसा होऊ शकतो ? श्रीमंताच्या दुस-या तिस-या क्रमांकावरुन घसरले ती व्यक्ती, देश नव्हे. हिंडेनबर्गने जे उत्तर लिहिलंय, त्यात ते म्हणतात. ''We disagree. To be clear, we believe India is a vibrant democracy and an emerging superpower with an exciting future. We also believe India’s future is being held back by the Adani Group, which has draped itself in the Indian flag while systematically looting the nation. We also believe that fraud is fraud, even when it’s perpetrated by one of the wealthiest individuals in the world.'' (हिंडेनबर्गचं उत्तर) भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो, तेव्हा जे काय आरोप असतील आणि जे काय सत्य असेल, त्यापाठीमागे कोण आहे त्याचं ते सत्य बाहेर यायला पाहिजे, ही अपेक्षा तर या निमित्ताने केलीच पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

अदानी ग्रुपने इस्राइलचे हैफा बंदर १.१५ अब्ज डॉलरला विकत घेतले आहे. जर या ग्रुपवर घोटाळे केल्याचे आरोप असतील तर इस्राइल त्यांना आपले बंदर विकेल काय? माझ्यावर भक्त असल्याचा आरोप येथे केला गेला आहे. मला मोदी देशासाठी जे करत आहेत ते आवडते आणि ते तसे करत राहोत ही इच्छा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो, तेव्हा जे काय आरोप असतील आणि जे काय सत्य असेल, त्यापाठीमागे कोण आहे त्याचं ते सत्य बाहेर यायला पाहिजे, ही अपेक्षा तर या निमित्ताने केलीच पाहिजे. करेल ना सेबी/ आम्रिकेतील एसइसी तुम्ही का डोक्याला शॉट लावताय

बाकी... अत्यंत अभ्यासू, नियोजनबद्ध, व यशस्वी, असा अजून एक "सर्जिकल स्ट्राईक" ... हिंडनबर्ग च्या निमित्ताने पाहायला मिळाला ... म्हणजे एखाद्या 'नॉन स्टेट ऍक्टरने' धुमाकूळ घालावा.. आणि स्टेट ने , ''आपल्याला तर काय चाललंय, माहीतच नाही बॉ" अशी शहाजोगी भूमिका घ्यावी ... तर खुल्या मार्केटच्या खुल्या मैदानात झालेला हा अजून एक "सर्जिकल स्ट्राईक" मानावा लागेल ...

हिंडनबर्ग विरुद्ध अदानी हा फक्त आर्थिक मामला आहे. हिंडनबर्ग ने बाँड मार्केट मध्ये पैसे कमावले. हिंडनबर्गचे रेप्युटेशन उत्तम आहे म्हणून लोकांनी शॉर्ट केले. आता यात भारतावरचा हल्ला वगैरे राष्ट्रवाद घुसवणारे यझ आहेत तसेच यात मोदी फॅक्टर बघणारे पण त्याचू आहेत. हा फक्त बिझनेस गेम होता. सध्या हिंडनबर्ग +१ आहे. सरकारने यात कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर न करून शहाणपणा केला आहे. मात्र हिंडनबर्ग रिपोर्टनंतर निकोला कंपनीच्या गैरव्यवहाराची चौकशि होउन अटक झाली तशी चौकशि करायला हरकत नसावी.

In reply to by कपिलमुनी

बँकांनी केलेला पतपुरवठा भ्रष्टाचार ठरत होता ती फुटपट्टीच मोदींसाठी लागू करायची नसल्यावर तो भ्रष्टाचार कसा ठरेल? भक्तांचं एकवेळ समजू शकतो. गेल्या दहावर्षापासून ते गुंगीतच आहेत. सामान्य माणसाने ती ’प्रख्यात’ अफूची गोळी घेतली आहे. पण बाकीच्यांचं काय? त्यांना तर हा भ्रष्टाचारच आहे हे तरी समजायला काय जड जातंय?

In reply to by सर टोबी

त्यांना तर हा भ्रष्टाचारच आहे हे तरी समजायला काय जड जातंय?
नमस्कार श्री सर टोबी. इतरांना समजायला अवघड जाते आहे कारण जे समजावण्याची प्रयत्न करत आहेत त्यांना व्यवस्थित मुद्देसुद मांडणी करता येत नाही. मी तुम्हाला एक सल्ला देतो, (तसाच सल्ला श्री वडापाव यांना दिला होता.) - मुद्देसुद संदर्भासहीत लिहा. - अगदी जमले तर तुमच्या बरोबर सहमत असलेल्या लोकांना बरोबर घेऊन तो हिंडेनबर्ग अहवाल मराठीत मिपावर भाषांतरीत करा.

In reply to by सर टोबी

"सामान्य माणसाने ती ’प्रख्यात’ अफूची गोळी घेतली आहे." एकतर कोट्यवधी लोकांच्या बुद्धीचा तुम्ही अपमान करताय.... बर ते जाऊदे ... जर जनता एवढी निर्बुद्ध असेल तर गेली ६० + वर्षे ज्यांनी काँग्रेस ची अफूची गोळी घेत राहिले आणि "गुलाम"गिरी करीत राहिले त्यांना १० वर्षातील या गोळी बद्दल तक्रार करण्याचं काय नैतिक अधिकार आहे ? असो २०२४ दूर नाही आपण परत जुन्या अफूचं गोळीचे सेवन सुरु करावे .. दम मारो दम कि जुनी अफूची गोळी नसून फक्त चाचा नेहरू नि दिलेल्या गुलाबाच्या फुलातील सुगंध.. बर तसे व्हा त्याच्यावर "हाय"

"आरोपांनंतरही अदानीपुत्राची राज्य आर्थिक परिषदेवर वर्णी"
एक लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्याकरिता सल्ला देण्यासाठी नेमलेल्या राज्य आर्थिक सल्लागार परिषदेवर महाराष्ट्र सरकारने उद्योगपती गौतम अदानी यांचे पुत्र करण अदानी (मुख्य कार्यकारी अधिकारी, अदानी पोर्ट) यांची नियुक्ती केली आहे. हिंडेनबर्गच्या अहवालाला केराची टोपली दाखवत करण अदानी यांची नियुक्ती करुन भारतीय उद्योगजगताला सकारात्मक संदेश देणर्‍या राज्य सरकारचे अभिनंदन!

In reply to by टर्मीनेटर

"आमच्या देशात आणि राज्यात आम्हाला योग्य वाटतील ते निर्णय आम्ही घेऊ" अशी धमक दाखवून हिंडेनबर्ग ला, आणि अदानी वर आरोप झालेत म्हणजे केंद्र सरकार विसर्जित करायला हवं अशा बोंबा मारणार्‍या त्याचूंना (शब्दश्रेयः कपिलमुनी) फाट्यावर मारल्याबद्द्ल राज्य सरकारचे अभिनंदन!

वादात असलेल्या अडाणी कुटुंबातील, काही व्यक्तींची, सार्वभौम सरकारे, राज्य आर्थिक परिषदेवर नियुक्त्या करत असेल... तर त्याला 'उद्योगांची पाठराखण केली' अस म्हटलं जातंय ... पण आपल्या देशातल्या उद्योगांकडे भविष्यात कोणी तिरकस नजर वर करून बघण्याची हिंमत करू नये म्हणून ... हिंडनबर्ग ने जर चुकीचे आरोप केलेत, तर त्यांना कोर्टात का खेचत नाही ?

In reply to by आंद्रे वडापाव

हिंडनबर्ग ने जर चुकीचे आरोप केलेत, तर त्यांना कोर्टात का खेचत नाही ?
अदानींनी ह्या प्रकरणी (अमेरिकन) कोर्टात जावे हाच मुळात त्यांच्यासाठी लावलेला सापळा आहे आणि त्यांनी लवकरात लवकर स्वतःहून ह्या सापळ्यात येऊन अडकावे हीच तर हिंडेनबर्ग आणि (अदानी हे दोषी आहेत हे आधीच मान्य करून बसलेल्या) लोकांची व त्यांचा (कुठल्याही कारणाने का असेना पण) द्वेष करणाऱ्या मंडळींची अपेक्षा आहे. आता ह्या परिस्थितीतून मार्ग काढताना गौतम अदानी हे धीरूभाई अंबानीं इतके चलाख/धूर्त उद्योगपती आहेत किंवा नाही हे येत्या काळात सिद्ध होईलच, पण त्यांच्यासाठी हा कसोटीचा काळ आहे हे निश्चित! "अफूच्या तस्करीतून बापजाद्यांनी मिळवलेल्यात पैशाच्या जीवावर, आणि नेहरू गांधी घराण्याशी असलेल्या जवळिकीतून बडे उद्योजक बनलेल्या भारतातील उद्योगपतींपेक्षा अक्षरशः प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून आपले उद्योगसम्राज्य निर्माण करणाऱ्या धुरूभाई अंबानी आणि गौतम अदानींविषयी खूप जास्त आदर असल्याने ह्या अडचणीच्या परिस्थितीतुन लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा!!!"

In reply to by टर्मीनेटर

ता.क. अदानी इंटरप्रायजेसला अप्पर सर्किट लागले आहे 😀

In reply to by टर्मीनेटर

अदानींनी ह्या प्रकरणी (अमेरिकन) कोर्टात जावे हाच मुळात त्यांच्यासाठी लावलेला सापळा आहे आणि त्यांनी लवकरात लवकर स्वतःहून ह्या सापळ्यात येऊन अडकावे हीच तर हिंडेनबर्ग आणि (अदानी हे दोषी आहेत हे आधीच मान्य करून बसलेल्या) लोकांची व त्यांचा (कुठल्याही कारणाने का असेना पण) द्वेष करणाऱ्या मंडळींची अपेक्षा आहे.
काय सापळा आहे म्हणे तो ? कृपया समजावून सांगावे हि विनंती .. असो , 'अमेरिकन कोर्ट आहेत सापळा' असं आपण मान्य करू एकवेळ .. चला .. पण 'सचोटीने चालणाऱ्या एखाद्या उद्योगाबद्दल', 'प्रवर्तकांबद्दल', त्यांच्या नातेवाइकांबद्दल ... हि जाहीर बदनामी आरोप चालल्यामुळे ... त्यांच्यावर भारतीय कोर्टात खटला दाखल का करू नये ? अब्जवधीची नुकसान भरपाई मागावी भारतीय कोर्टात ..

In reply to by आंद्रे वडापाव

काय सापळा आहे म्हणे तो ? कृपया समजावून सांगावे हि विनंती ..
अरे देवा! त्यासाठी प्रतिसाद नाही एखादा दिर्घ लेख लिहावा लागेल! तेवढा वेळ मिळाल्यास आपल्या विनंतीचा नक्किच मान राख्ण्यात येइल 🙏
'सचोटीने चालणाऱ्या एखाद्या उद्योगाबद्दल', 'प्रवर्तकांबद्दल', त्यांच्या नातेवाइकांबद्दल ... हि जाहीर बदनामी आरोप चालल्यामुळे ... त्यांच्यावर भारतीय कोर्टात खटला दाखल का करू नये ? अब्जवधीची नुकसान भरपाई मागावी भारतीय कोर्टात ..
डॅमेज कंट्रोलचे काम झाल्यावर अदानी समुहाकडुन तसे पाउल उचलले जाउ शकते, किंवा एकीकडे त्याची तयारी सुरुही असेल! अदानींसाठी ही कसोटीचा कसोटीची घडी असल्याने त्यांच्याकडुन काय पावित्रा घेतला जातो हे समजण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल.

In reply to by टर्मीनेटर

डॅमेज कंट्रोलचे काम झाल्यावर अदानी समुहाकडुन तसे पाउल उचलले जाउ शकते, किंवा एकीकडे त्याची तयारी सुरुही असेल! अदानींसाठी ही कसोटीचा कसोटीची घडी असल्याने त्यांच्याकडुन काय पावित्रा घेतला जातो हे समजण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल.
"डॅमेज कंट्रोलचे काम" म्हणजे काय राव ?? रिपोर्ट येण्यापूर्वी च्या, शेअर च्या भावात ९०% घट झाली की झालं. आणि ते येतीलच त्या पातळीवर... हिंडन बर्ग तेच तर सांगत होत ना.. भाव अव्वाच्यासव्वा फुगवून आहेत... काय चुकीचं सांगितलं... भाव ९० % कमी झाल्यावर आमच्या सारखे डिलीव्हरी बेस्ड गुंतवणूकदार, अडाणी शेअर्स घेवू आमच्या ऐपती नुसार....

In reply to by आंद्रे वडापाव

"डॅमेज कंट्रोलचे काम" म्हणजे काय राव ??
हिंडेनबर्गला दिलेल्या आपल्या उत्तरात "देशावर हल्ला" वगैरे (सर्वसाधारण जनतेच्या भावनांना हात घालणारे) विधान, गुंतवणूकदारांच्या हिताला प्रथम प्राधान्य देत एफपीओ मागे घेत असल्याची घोषणा, ९००+ कोटींची मुदतपूर्व कर्जफेड अशा उपायांचे फलित म्हणजे,

अदानी इंटरप्रायजेसला आज पण अप्पर सर्किट लागले आहे 😀

थोडी अजून वाट बघा... तुमच्या सर्व प्रशनांची उत्तरे आपोआप मिळत जातील.
भाव ९० % कमी झाल्यावर आमच्या सारखे डिलीव्हरी बेस्ड गुंतवणूकदार, अडाणी शेअर्स घेवू आमच्या ऐपती नुसार...

+१

मी परवाच घेतलेल्या २० शेअर्सचे मुल्य आज सकाळपर्यंत ६०००+ नी वाढले आहे, माझी त्यात भावनीक गुंतवणुक शुन्य असल्याने पहिलेछुट प्रॉफीट बुक करुन बाहेर पडणार आहे 😀

In reply to by टर्मीनेटर

तुम्हाला फायदा झालाय त्याबद्दल तुमचे अभिनंदन ! पण पण पण किरोकोळ डिलिव्हरी बेस्ड गुंतवणूकदारांनी (माझ्यासारख्या) सध्या अदानी शेअर्स पासून लांब राहिले पाहिजे (माझे वैयक्तीक मत ..) रिपोर्ट येण्यापूर्वीच भाव X ०.२ या गुणाकारानंतर येणारा भावाजवळ आल्यावरच, स्टॅंगर्ड पद्धतीने त्यात फंडामेंटल बघत बघत अक्युम्युलेट केले पाहिजे (माझे वैयक्तीक मत ..) कारण बऱ्याच मोठ्या संस्था एल आय सी सारख्या त्यांचे एक्स्पोजर कमी करण्यासाठी ... बातम्या सोडतील मार्केट मध्ये एकदा दोनदा अप्पर सर्किट लावतील कमी वोल्युम वर ... एकदा का गुडी गुडी वातावरण झालं कि अप्पर लेव्हल ला ते विकतील (एक्स्पोजर कमी करण्यासाठी .. ) कारण बऱ्याच मोठ्या संस्था एल आय सी सारख्या त्यांचे एक्स्पोजर कमी करण्यासाठी ... बातम्या सोडतील मार्केट मध्ये एकदा दोनदा अप्पर सर्किट लावतील कमी वोल्युम वर ... एकदा का गुडी गुडी वातावरण झालं कि अप्पर लेव्हल ला ते विकतील (एक्स्पोजर कमी करण्यासाठी .. ) अश्या मोठ्या मोठ्या भाव बदलाच्या लाटा येत राहतील ... (एक्स्पोजर कमी करण्यासाठी .. ) कितीही आकर्षक भाव , माहोल मौसम वाटला तरी किरकोळ गुंतवणूकदारानी सध्या तरी दूर राहावे अदानी स्टोकस पासून असे मनापासून कळकळीने वाटते ... याउप्पर लोकांची इच्छा ...

अदानी समूहासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करावे, या मागणीसाठी सलग तिस-या दिवशी विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज रोखून धरले. दोन्ही सभागृहाबरोबर काँग्रेस पक्षाने देशभरातनिदर्शने केली. हिंदेनबर्ग रिसर्च संस्थेने अदानी उद्योगसमूहावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यानंतर विरोधी पक्षांनी अदानी समूहामधे एलायसी, स्टेट बँकेसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून सामान्यांचा पैसा या कंपन्यामधे गुंतवला गेला आहे, समभागांच्या घसरणीतून सामान्यांच्या पैशाचा मोठा गैरव्यवहार आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे, आणि त्यासाठी दोन्ही सभागृहात संसदीय समिती किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखालील समितीकडून चौकशी करावी ही विरोधकांची मागणी आहे. 'परंपरेप्रमाणे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करावी अशी विनंती, केंद्र सरकारने विरोधकांना केली आहे. अभिभाषणावरील प्रस्तावावर गोंधळामुळे चर्चा होत नाही आणि अदानी प्रकरणात विरोधी पक्षांनी स्थगन प्रस्तावाची नोटीसा दिल्या गेल्या मात्र त्या स्वीकारल्या जात नाही, त्यामुळे संसदेची दोन्ही सभागृहे अशीच तहकूब होत राहीली तर सरकारला चर्चा न करण्याची पळवाट मिळेले आणि त्याचं खापर विरोधकांवर फोडल्या जाईल म्हणून आज दोन्ही सभागृहात चर्चा करण्याचा विरोधकांचा मनसुबा आहे. पण विरोधी पक्षातील काही पक्षांनी यास नकार दिला आहे. (लोकसत्ता) हिंडेनबर्गच्या अहवालामुळे घसरलेले शेयर, विरोधकांचे आरोप आणि आता सरकार पुढे काय भूमिका घेते ते पुढे होईलच. कालही अदानी समूहाचे समभाग गडगडलेलेच राहील. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पादऱ्याला पावट्याचं निमित्त काही विरोधी पक्षांना संसदेचं कामकाज चालूच द्यायचा नाहीये त्यामुळे पंतप्रधानांनी निवेदन करावं हीच मागणी धरून ते अडूनच बसलेले आहेत. जोवर सेबी सारख्या शासकीय संस्थांच्या चौकशीचे अहवाल येत नाहीत तोवर पंतप्रधान नक्की काय निवेदन करणे अपेक्षित आहे हा साधा विचार आपल्या मनात येत नाही का? बिरुटे सर कोणत्यातरी वृत्तपत्रात आलेलं काही तरी इकडे ढकलून श्री मोदी द्वेषाचा गरळ टाकणे बंद करा. साधा सरळ सामान्य माणूस विचार करू शकतो तो आपल्याला नाही का करता येत?

In reply to by सुबोध खरे

जोवर सेबी सारख्या शासकीय संस्थांच्या चौकशीचे अहवाल येत नाहीत तोवर पंतप्रधान नक्की काय निवेदन करणे अपेक्षित आहे हा साधा विचार आपल्या मनात येत नाही का? केवळ द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार ? बिरुटे सर कोणत्यातरी वृत्तपत्रात आलेलं काही तरी इकडे ढकलून श्री मोदी द्वेषाचा गरळ टाकणे बंद करा. हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे! सुन्यास अधिक सांगणे ना लगे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्या तथाकथित विरोधकांची विश्वासार्हता मोदी ह्यांच्या लोकप्रियतेच्या ५ टक्के सुद्धा नसल्याने ह्यांनी किती गोंधळ घातला तरी कुणालाही फरक पडत नाही. पण पार्लमेंट बंद पडली आहे हे देशाच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्त्युत्तम गोष्ट आहे. जो पर्यंत पार्लमेंट सुरु असते तो पर्यंत देशातील सर्व नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यांत असते - मार्क ट्वेन ! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विश्वनेते महामानव अचानक भीम किंवा मिम मंडळींच्या मतावर डोळा ठेवून काहीतरी मोठे विधेयक आणणार अशी वंदता होती. ह्या निमित्ताने ती संधी त्यांना मिळाली नाही तर देशाचे भलेच होईल.

In reply to by आग्या१९९०

अदानींच्या समभागांची खरेदी विक्री कधी सुरु होईल. कधी एकदा त्यांची खरेदी करु आणि एकदा की ते जमलं अदानींच मार्केट बघता भविष्यात निव्वळ नफाच नफा म्हणून स्वप्नाच्या वाटेवर कितीतरी लोक उभे असतील. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वप्नाच्या वाटेवर कितीतरी लोक उभे असतील. :)
मार्केटच्या शब्दकोषात ह्याला व्यवहार म्हणतात, आणि हे व्यवहार रुक्ष/भावनाशुन्य असतात! भावनेच्या आहारी जाउन तुम्ही म्हणता तशी स्वप्ने कोणी बघितल्यास त्याचे दिवाळे निघेल 😀 😀

In reply to by टर्मीनेटर

>>>व्यवहार रुक्ष/भावनाशुन्य असतात! अगदी खरंय...! >>> भावनेच्या आहारी जाउन तुम्ही म्हणता तशी स्वप्ने कोणी बघितल्यास त्याचे दिवाळे निघेल हा हा हा हेही खरंय. -दिलीप बिरुटे (स्वप्नाळू) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वप्नाच्या वाटेवर कितीतरी लोक उभे असतील. :) याला बाजारातील चढ उतरत भाग घेणे / जोखीम पत्करणे म्हणतात कि जे तुम्ही सुद्धा सिप / रेगुलर सेविंग प्लॅन वैगरे मधून करीत असता आणि अशी लालसा ज्यांना असेल त्यानं अडानि काय किंवा दुसरे कोणी काय फरक काहीच नसतो पण आपण अडानि अंबानी - मोदी द्वेषांच्या रहाटगाडग्यात अडकले असलयामुळे तुम्हाला इतर काही दिसत नाहीये

मिपा वर सध्या जास्त येता येत नाही, मध्ये मध्ये वाचन मात्र असतो पण कमीच.. अडानी चा विषय रोचक आहे.. म्हणुन आपण? या शीर्षकातील गोष्टीमुळे बोलतो... ---- माझ्या मागील एका धाग्यात लिहिल्या प्रमाणे शेअरमार्केट ची बाराखडी... भाग १ : Fundamental Analysis या वरील धाग्यात म्हणल्या प्रमाणे, मी यात सांगितलेल्या खालील गोष्टी मध्ये कधीच अदानी आणि त्यांच्या कंपन्या बसल्या नाहित.. १. कंपनीचे balance sheet - थोडक्यात कंपणीचे Assets किती आहे आणि Liabilities (खर्च,देणे) कीती आहे याचा ताळेबंद. २. कंपनीचे Profit & Loss Account ३. Ratios (हे पुढे आपण पाहणार आहोतच त्यामुळे अनेक मित्र या कंपनीतून पैसे कमवत असले तरी मी लांब राहिलो.. मला वाटते याचा अभ्यास केल्यास सरळ जाणवते कि काहीतरी गोम आहे, कर्ज, liability आणि cashflow, valuations अश्या कितीतरी बाबतीत ह्या कंपन्या नक्कीच योग्य वाटत नव्हत्या.. ज्यांनी आरोप केले आहेत, त्यांचा ह्या कंपन्या बद्दल नक्कीच हाच अभ्यास असणार.., त्याच बरोबर India Deserves Better - ६. हसदेव अरण्य, कोळसा खाण, पर्यावरणाचा ह्रास आणि अदानी. यात मेन्शन केल्या प्रमाणे नैतिकते मुळे ह्यांच्या कडे जाण्याचे किंवा गुंतवणूक करण्याचा प्रश्न नव्हता.. त्यामुळे अदानी.. आणि आपण यात आपण आपल्या मूल्यांना, आपल्या तत्वाना न सोडणे महत्वाचं आहे. जर अदानी कोर्टात गेले तर त्यांना नक्कीच अनेक प्रश्नाची उत्तरे लेखी द्यावी लागतील, असे अनेक प्रश्न आपल्या देशातील कोणीही न विचारणे आणि सेबी ने हि बऱ्याच गोष्टीत वेळीच पावले न उचलणे हे नक्कीच योग्य नाही.. असो थांबतो..

आपण तर बावा फॅन झालो हिंडनबर्गचा .. काय अभ्यास... काय टायमिंग .. काय हल्ल्याची वेळ ... हिंडनबर्ग मुळे अदानी चा ब्लफ (व्हॅल्युएशन बाबत चा ) उघड झाला ... आणि आमच्यासारख्या सामान्य गुंतवणूक दारांना अडाणीचे लायकीपेक्षा महाग झालेले शेअर्स , आता मात्र लायकीच्या जवळपासच्या भावात खरेदी करण्याची संधी निर्माण होतेय ... हुर्रेय ... येय .. आता अडाणी पुढची १-२ वर्षयी तरी असा ब्लफ गेम (व्हॅल्युएशन बाबत चा ) खेळण्याची हिम्मत दाखवणार नाही ... खरं तर असा अभ्यास रवीशकुमार कडून अपेक्षित होता .. पण रडगाणं गाण्याखेरीज जास्त काय मला दिसलं नाही मागील काही वर्ष्यात ... बाकीचे तर पत्रकार असल्याची ऍक्टिंग करतात त्यांना तर सोडूनच द्या ..

अदानीच्या बाँड ची अवस्था बघा. मुख्य धक्का तिथे बसलाय. हिंदेंनबर्ग ने शॉर्ट मधून पैसा कमावला.. आता अदानी ला अप्पर लागो नाहीतर काहीही होऊ दे .. त्यांचा गेम यशस्वी झाला आहे . आणि अदानी चा बडा घर पोकळ वासा होता हेही कळलं.. उगा प्रत्येक गोष्टीत राष्ट्रवाद आणि अस्मिता घुसवू नये हे लोकांना कळेल तो सुदिन