Skip to main content

हा उन्हाचा गाव आहे.

लेखक Deepak Pawar यांनी रविवार, 22/01/2023 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
हा उन्हाचा गाव आहे, रापलेली माणसे का अशी ही श्रावणाने शापलेली माणसे? पाहतो तो हर घडीला चेहरा वाटे नवा चेहऱ्याला रंग फसवे फासलेली माणसे. शेत कसवी तोच येथे, का उपाशी राहतो? का इथे ही भाकरीने ग्रासलेली माणसे? जात धर्माच्या इथेही पेटता या दंगली पाहिली मी माणसाने छाटलेली माणसे. लाच घेऊनी अता विकती इमान आपुले जी कधी मज सभ्य तेव्हा वाटलेली माणसे. हो भले अथवा बुरे, ना काळजी येथे कुणा का मनाने येथली ही गोठलेली माणसे?
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4716
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

आवडली.

खुप दिवसांनी छंदाला धरुन लिहिलेली कविता वाचायला मिळाली. फक्त एक सुचवु का? "लाच घेऊनी अता विकती इमान आपुले" ही ओळ "लाच घेऊनी अता विकती इमाने आपुली" अशी पाहीजे, म्हणजे नीट जुळेल.

राजेंद्र मेहेंदळे सर आपले मनःपूर्वक आभार. मिपावर बहुतेक एडिट चा पर्याय नाही किंवा मला तरी माहीत नाही, परंतु आपण सांगितल्या प्रमाणे इतर ठिकाणी पोस्ट करताना बदल करतो. धन्यवाद.

रापली ही माणसे, हा उन्हाचा गाव आहे! आणि मेघांनी नभाचा सोडला की ठाव आहे! धावती ही माणसे, सावलीच्या वेगे मिषे, पालवीचा तरुंवर येथल्या अभाव आहे. नद्याही आटल्या अन आटली सरोवरे, आवंढाही घशातच, सुकविण्याचा डाव आहे! उष्माघात म्हणूनि नेले मला इस्पितळी, अन सलाईनचा बाटलीतल्या थांबलेला स्त्राव आहे.

सुरेख. आवडली.

आवडली गझल.लिहिते राहा. -दिलीप बिरुटे