हा उन्हाचा गाव आहे, रापलेली माणसे
का अशी ही श्रावणाने शापलेली माणसे?
पाहतो तो हर घडीला चेहरा वाटे नवा
चेहऱ्याला रंग फसवे फासलेली माणसे.
शेत कसवी तोच येथे, का उपाशी राहतो?
का इथे ही भाकरीने ग्रासलेली माणसे?
जात धर्माच्या इथेही पेटता या दंगली
पाहिली मी माणसाने छाटलेली माणसे.
लाच घेऊनी अता विकती इमान आपुले
जी कधी मज सभ्य तेव्हा वाटलेली माणसे.
हो भले अथवा बुरे, ना काळजी येथे कुणा
का मनाने येथली ही गोठलेली माणसे?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4716
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख
अतिशय समर्थपणे मांडलेली वस्तुस्थिती.
मनःपूर्वक धन्यवाद.
गझल आवडली.
मनःपूर्वक आभार.
मस्त
मनःपूर्वक धन्यवाद.
जबरदस्त गझल!!
मनःपूर्वक आभार.
छान. आवडली.
वाह! ब-याच दिवसांनंतर इथे आले
मनःपूर्वक धन्यवाद.
क्या बात है.. क्लास!
माझा एक प्रयत्न
आण्णा..
In reply to माझा एक प्रयत्न by हणमंतअण्णा शंक…
वाह !
In reply to माझा एक प्रयत्न by हणमंतअण्णा शंक…
मनःपूर्वक धन्यवाद.
सुरेख
मनःपूर्वक आभार.
सुंदर.
मनःपूर्वक धन्यवाद.