मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे.
हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? गोर्यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का?
अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?
बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का?
पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात?
मला परदेशाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. केवळ , वाचन , ऐकीव , इंटरनेट , टिव्ही यातून समजलं तितकंच. त्यामुळे या देशांमधे दीर्घकाळ राहणार्या , कामानिमित्त काही काळ राहिलेल्या लोकांकडून प्रतिसादाच्या अपेक्षेत. _/\_
वर्गीकरण
वाचने
50164
प्रतिक्रिया
204
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो. आई अमेरिकेत का होती,
In reply to अवांतर: by वामन देशमुख
हे लोक परदेशात जात आहेत
अमेरिका किंवा तत्सम देशांमधे
In reply to हे लोक परदेशात जात आहेत by चौकस२१२
सौजन्य रानरेडा
In reply to अमेरिका किंवा तत्सम देशांमधे by Trump
रोज ५०० भारतीय नागरिकत्व
धाग्याच्या मुख्य विषयाच्या अनुषंगाने
प्रकार २
In reply to धाग्याच्या मुख्य विषयाच्या अनुषंगाने by तर्कवादी
खरे कारण आणि खरे बायस
In reply to प्रकार २ by तर्कवादी
हणमंतअण्णाजी
In reply to खरे कारण आणि खरे बायस by हणमंतअण्णा शंक…
भारतीय परदेशस्थ त्यांच्या
In reply to हणमंतअण्णाजी by तर्कवादी
मुलांच्या लग्नापर्यंत भारतीय पालक जबाबदारी घेतात
लकीर के फकीर
In reply to मुलांच्या लग्नापर्यंत भारतीय पालक जबाबदारी घेतात by चित्रगुप्त
MAANG
In reply to मुलांच्या लग्नापर्यंत भारतीय पालक जबाबदारी घेतात by चित्रगुप्त
जुगाड हे एक "स्किल"
In reply to MAANG by उपयोजक
अमेरिका वगैरे पाश्चात्य देशात
In reply to मुलांच्या लग्नापर्यंत भारतीय पालक जबाबदारी घेतात by चित्रगुप्त
२००७ सालचा प्रसंग आणि भविष्यकथन वगैरे.
चित्रगुप्तजी धन्यवाद
In reply to २००७ सालचा प्रसंग आणि भविष्यकथन वगैरे. by चित्रगुप्त
अजुन काही गोष्टी
अमेरिका
महत्वाचा उपविषय
In reply to अमेरिका by उपयोजक
ही मे महिन्यातली
'अमेरिकन स्कूल' मधील आगळे वेगळे अनुभव.
खरेतर खूप महत्वाची
In reply to 'अमेरिकन स्कूल' मधील आगळे वेगळे अनुभव. by चित्रगुप्त
धन्य ती अमेरीकन शिक्षण पद्धती
In reply to खरेतर खूप महत्वाची by साहना
@श्वेता २४ 'धन्य ती अमेरिकन शिक्षण पद्धती' बद्दल स्पष्टीकरण
In reply to धन्य ती अमेरीकन शिक्षण पद्धती by श्वेता२४
काका तुमचे सर्वच प्रतिसाद
In reply to @श्वेता २४ 'धन्य ती अमेरिकन शिक्षण पद्धती' बद्दल स्पष्टीकरण by चित्रगुप्त
धन्यवाद चित्रगुप्तजी
In reply to @श्वेता २४ 'धन्य ती अमेरिकन शिक्षण पद्धती' बद्दल स्पष्टीकरण by चित्रगुप्त
खुद्द अमेरिकेतील (आणि फ्रान्स मधील) शाळांमधे काय परिस्थिती असते, या विषयी माहिती माझ्या मुलांना विचारून मी सांगू शकतो. ज्यांना याबद्दल कुतूहल असेल, त्यांनी आपापले प्रश्न इथे विचारावेत, म्हणजे त्यांची व्यवस्थित उत्तरे देता येतील.हो मला उत्सुकता आहे याबद्दल. भारतात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या व अमेरीकेत काम मिळवणे (जॉब) जास्त संघर्षाचे आहे? की अमेरीकेतील/परदेशी भारतीयांच्या मुलांना तीथेच शिक्षण घेऊन जास्त चांगल्या प्रतीचा जॉब मिळतो/संधी जास्त आहेत का? अमेरीकेतील/परदेशातील शिक्षण घेत असताना किंवा एकंदरीतच समाजव्यवस्थेत मिळणारी अतीमोकळीक तेथील विद्याथ्यांमध्ये अधीक ात्मविश्वास निर्माण करते का? हे चांगले आहे की वाईट? माझ्या मावसबहिणीला तीच्या २ मुलांसह काही काळ अमेरीकेत राहावे लागले. मुले थोडी मोठी (३-4थीची)झाल्यावर तीने भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला कारण तीचेे म्हणणे होते अमेरीकेतील शिक्षण भारताच्या तुलनेत सोपे आहे. इथल्या पहिलीच्या मुलाला जेवढे येते तीथे तीसरी्च्या मुलालाही येत नाही . तेथील अभ्यासक्रम सोपा आहे. विशेषत: गणित विषयाबाबत ती जास्त चिंतेत होती. तीच्या मुलांना इथे काही वर्ष जड गेले कारण तीकडे त्यांचे शिक्षण कमी झाले होते असे तीचे म्हणणे. याबद्दलही समजले तर बरे होईल. धन्यवादभारतात पदवी किंवा पदव्युत्तर
In reply to धन्यवाद चित्रगुप्तजी by श्वेता२४
भारतात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या व अमेरीकेत काम मिळवणे (जॉब) जास्त संघर्षाचे आहे? की अमेरीकेतील/परदेशी भारतीयांच्या मुलांना तीथेच शिक्षण घेऊन जास्त चांगल्या प्रतीचा जॉब मिळतो/संधी जास्त आहेत का?अमेरिकेतील मुलांना तेथेच शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळविणे जास्त सोपे आहे.अमेरीकेतील/परदेशातील शिक्षण घेत असताना किंवा एकंदरीतच समाजव्यवस्थेत मिळणारी अतीमोकळीक तेथील विद्याथ्यांमध्ये अधीक ात्मविश्वास निर्माण करते का?होय.तीचेे म्हणणे होते अमेरीकेतील शिक्षण भारताच्या तुलनेत सोपे आहे. इथल्या पहिलीच्या मुलाला जेवढे येते तीथे तीसरी्च्या मुलालाही येत नाही . तेथील अभ्यासक्रम सोपा आहे. विशेषत: गणित विषयाबाबत ती जास्त चिंतेत होती.निदान गणिताच्या बाबतीत तरी हे खरे नाही. माझे काही विद्यार्थी भारतातून ९ वीत असतानाच ते अमेरिकेत गेले. अमेरिकेत ९ वी च्या अभ्यासक्रमातच Trigonometry, Calculus असे विषय होते जे भारतात ११ वी/१२ वीत असतात. साहजिकच आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, ब्राझीलची माहिती असले, नायजेरियातील पिके असले निरूपयोगी विषय त्यांच्या अभ्यासक्रमात फारसे नसतात. त्यामुळे फालतू सनावळ्या, ब्रिटन व फ्रान्समधील सप्तवार्षिक युद्ध (हा प्रकार भारतीय विद्यार्थ्यांनी का शिकायचा हे मला आजतागायत समजले नाही), पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीवर लादलेल्या तहाच्या अटी (हे सुद्धा भारतीय मुलांना का शिकवितात हे समजत नाही), नायजेरियातील पिके, तीन-चार भाषा असला निरर्थक, निरूपयोगी प्रकार शिकण्यात मुलांचा बहुमूल्य वेळ वाया जात नाही. अमेरिकेन मुले तोंडी गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी इ. प्रकारात दुर्बल आहेत हे नक्की. परंतु भारतातील सध्याची पिढी सुद्धा या प्रकारात दुर्बल आहे हे मी स्वानुभवातून सांगतो.उपयुक्त माहिती
In reply to भारतात पदवी किंवा पदव्युत्तर by श्रीगुरुजी
गणित
In reply to भारतात पदवी किंवा पदव्युत्तर by श्रीगुरुजी
खरं गणित म्हणजे आकडेमोड नाहीच
In reply to गणित by चंद्रसूर्यकुमार
उत्तर
In reply to खरं गणित म्हणजे आकडेमोड नाहीच by वामन देशमुख
ही पण एक नवी बाजू कळली
In reply to गणित by चंद्रसूर्यकुमार
त्याप्रमाणेच कॅल्क्युलेटर
In reply to गणित by चंद्रसूर्यकुमार
त्याप्रमाणेच कॅल्क्युलेटर वापरून (किंवा गेलाबाजार हाताने गुणाकार-भागाकार करून) काही सेकंदात उत्तर काढता येत असेल तर मग तोंडी या गोष्टी करता येणे हे मोठे कौशल्याचे काही आहे का? मलाही शाळेत असताना अशी आकडेमोड तोंडी भराभर करता यायची- बर्याच अंशी अजूनही येते. पण त्यातून झाले असे की आपण गणितात खूप मोठे डॉन आहोत असे मला वाटायला लागले होते. खरं गणित म्हणजे आकडेमोड नाहीच तर कॅल्क्युलस हे खरं गणित आहे हे खूप उशीरा कळले.जलद आकडेमोड कोणत्याही अभ्यासक्रमात, विशेषतः स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे कौशल्य आहे. मला गुणाकार, भागाकार, बेंरजा, वजाबाक्या (अर्थात फार मोठे आकडे नसले तर) बऱ्यापैकी जलद तोंडी करता येतात व अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये याचा खूप फायदा झाला आहे. विशेषतः वेगवेगळ्या आकड्यांमधील परस्परसंबंध, वर्ग, घन अश्या प्रकारातील नातेसंबंध यामुळे समजतात.आकडेमोड
In reply to त्याप्रमाणेच कॅल्क्युलेटर by श्रीगुरुजी
> अमेरीकेतील शिक्षण भारताच्या
In reply to धन्यवाद चित्रगुप्तजी by श्वेता२४
येथेही शिस्त आहे हो ती काय एकटी भारतात आहे असे नाही
In reply to @श्वेता २४ 'धन्य ती अमेरिकन शिक्षण पद्धती' बद्दल स्पष्टीकरण by चित्रगुप्त
गेल्या महिन्यात भारतात गेलो
तुमचा भारतातील अनुभव सार्वत्रिक आहे.
In reply to गेल्या महिन्यात भारतात गेलो by नचिकेत जवखेडकर
नचिकेतजी,
In reply to गेल्या महिन्यात भारतात गेलो by नचिकेत जवखेडकर
एका नामांकित बदनाम बँकेचा
In reply to गेल्या महिन्यात भारतात गेलो by नचिकेत जवखेडकर
धन्य ती न्यायव्यवस्था
हा काही ग्रामीण भागांतील नाला
हे ही पहा
प्रश्न संसाधनांचा नसुन, मनोवृत्तीचा आहे.
In reply to हे ही पहा by श्वेता२४
हा तसले व्हिडीओ मी भरपूर
In reply to हे ही पहा by श्वेता२४
पुन्हा तेच
त्याशिवाय मुद्दा लोक भारत का सोडतात हा आहे.केवळ हेच टुमणं लावून धरलंय.......पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते जे तुम्ही आता करत आहात. पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का?हा पण धाग्याचा विषय आहे....... त्याबद्दल पण प्रामाणिक मते येणं गरजेचं आहे.> केवळ हेच टुमणं लावून धरलंय.
In reply to पुन्हा तेच by श्वेता२४
छान प्रतिसाद
In reply to पुन्हा तेच by श्वेता२४
भारताच्या तुलनेत,............
जर तुम्ही भारताबाहेर रहात
In reply to भारताच्या तुलनेत,............ by डँबिस००७
तुलुगू चित्रपट दाखविताना
मलाही असाच अनुभव आला आहे.
In reply to तुलुगू चित्रपट दाखविताना by साहना
भारतात वीज जाते, अमेरिकेतही
+१
In reply to भारतात वीज जाते, अमेरिकेतही by श्रीगुरुजी
आता चर्चेला जोर चढु लागला आहे.
स्वस्तात / फुकट उपचार
स्वस्तात / फुकट उपचार
एनायारांना फुकट उपचार ? शक्यच नाही.
In reply to स्वस्तात / फुकट उपचार by ताजे प्रेत
हे मी पहिल्यांदाच ऐकत आहे.
In reply to स्वस्तात / फुकट उपचार by ताजे प्रेत
साहना
In reply to हे मी पहिल्यांदाच ऐकत आहे. by साहना
हि अजब माहिती
In reply to स्वस्तात / फुकट उपचार by ताजे प्रेत
अमेरीकेतील शिक्षण भारताच्या
श्री नारायण मूर्ती यांनी भारतीय वृत्तीवर केलेले भाष्य