Skip to main content

भारताच्या तुलनेत

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 29/12/2022 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्‍या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे. हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? गोर्‍यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्‍या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का? अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का? बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का? पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात? मला परदेशाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. केवळ , वाचन , ऐकीव , इंटरनेट , टिव्ही यातून समजलं तितकंच. त्यामुळे या देशांमधे दीर्घकाळ राहणार्‍या , कामानिमित्त काही काळ राहिलेल्या लोकांकडून प्रतिसादाच्या अपेक्षेत. _/\_

वाचने 50164
प्रतिक्रिया 204

प्रतिक्रिया

In reply to by वामन देशमुख

हो. आई अमेरिकेत का होती, कायद्याने अली होती कि नाही इत्यादी गोष्टींचा फरक पडत नाही. म्हणूनच तर चिनी आणि रशियन लोकांनी बर्थ टुरिझम हा प्रकार आणला.

हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? सध्याचे माहित नाही पूर्वीची काही करणे = १) तेवढ्याच श्रमात जास्त भौतिक सुखे २) जिन्यासा/ क्षेत्रातील पुढील शिक्षण ३) बचत ( ती होतेच असे नाही कारण खर्च हि त्ववढेच असतात + शिवाय आयकर ) साधय यातील काही करणे बाद असतील परंतु साधय सुद्धा बाहेर कायमचे का लोकांना जावे वटतटे हे स्थानिक भारतीय जास्त चांगले सांगू शकतील हि करणे असू शकतात १) स्पर्धा २) तेवढ्याच श्रमात जास्त भौतिक सुखे या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? काहींना तसे वाटत असेल पण म्हणून ते लगेच देशद्रोही वगैरे ठरत नाहीत... एवढेच नमूद करू इच्छितो भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? म्हणजे स्पर्धा या दृष्टीने हो असावे किंवा अजूनही भारतातील वेगवेगळ्या ष्ट्रातील अर्थाजनाची तफावत या शिवाय महागाई हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? भारतात भरपूर हुशार लोक आहेत त्यामुळे हि चिंता नसावी गोर्‍यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? पदोपदी भ्रष्टचार फारसा नाहीये... करणे काहीही असोत पण जगभरचे तत्व हे कि "पोट भरलेले असले" कि मग भ्रष्टचाराची गरज पडत नाही पाश्चिमात्य देशात हे त्यांनी बऱयापैकी जुळवले आहे म्हणून केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्‍या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का? कमी लोकसंख्येचं उपयोग होतो नक्की ,, अर्थवयवस्थेवरील ताण कमी होतो अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का? हे फार थोड्यानं जमते ... कारण तो पर्यंत नातवंडे तिकडे आणि आपण इकडे असे होते... पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. हो मान्य देशादेशाप्रमाणे होऊ शकते ( वेगळे लिहीन वेळ मिळाला कि ) साधारण कानडा / ऑस्ट्रेलिया / न्यू झीलंड हे एका समूहात अमेरिका जरा वेगळी असावी पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? बर्यापैकी .. कारण परत तेच खाऊन पिऊन सुखी मग बाकी गोष्टींकडे वेळ देत येतो अर्थात " सुखी " हा वेगळा विषय आहे ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? एकतर स्वतः बचत करून मग किंवा सरकारी मदत ( प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ) यात आयकर भरणे हे गृहीत आहे अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात? कोणते कर्ज ? भारतप्रमाने " पत " शिक्षण थोडेफार ,इत्यादी फार फरक नसावा

In reply to by चौकस२१२

अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात? कोणते कर्ज ? भारतप्रमाने " पत " शिक्षण थोडेफार ,इत्यादी फार फरक नसावा
कर्ज परत देण्याची क्षमता, शिक्षण, इतरांना ज्याप्रकारे कर्ज मिळते त्याच प्रकारे सगळ्यांना मिळते. -- भारतामध्ये बरेचदा आज या, उद्या या करत करत जी मेटाकुटीला आणतात. जर कोणत्या अ वर्गाच्या भारतीय नागरीकाकडुन फोन आला (सरकारी नोकर, मोठे अधिकारी, राजकारणी) तर कामे लगेच होतात. मागासवर्गीय, अल्पसंख्याक असेल मग मज्जाच मजा.

In reply to by Trump

एक म्हणजे तिकडे व्यवस्थित पैसा मिळतो हे महत्वाचे आणि अनेक लोकावर जबाबदारी नसते , आई वडील पासून वेगळे झालेले असतात ,लग्न करायचे नसते किंवा खूप खूप उशिरा करतात - घटस्फोट ही काही फार मोठी गोष्ट नाही तुम्हाला पार्टनर तुलनेने सहज मिळतो , तो समलिंगी असेल , त्या बरोबर लग्न केले नसेल तरी बाकीच्या समाजात काही प्रतिक्रिया येत नाही अनेक अमेरिकन / विदेशी लोकांचा बचत ( saving ) , कर्ज , assets building / holding या बद्दल फार वेगळा विचार असतो बेसुमार कर्ज मिळते आणि घेण्याकडे प्रवृत्ती असते बरे मागील economic crisis वेळी एक चमत्कारिक गोष्ट कळली - जरी लायकी नसेल तरी कर्ज दिले जाते - अगदी घराचे पण ! ( भारतात घर / गाडी घेणाऱ्या ना माहीत असेल की क्रेडिट लायकी ( worthiness) साठी किती scrutiny केली जाते ) हे जर अशक्य वाटले तर मी Ninja loans बद्दल लिंक टाकतोय ती पाहा ( A NINJA Loan (No Income, No Job, and No Assets Loan) आणि त्या crisis वेळी / बहुदा आता पण अनेक लोकांनी घरे / गाड्या surrender केली / जप्त केली गेली - लोक मजेत अजून थोडी खालची लाईफस्टाईल जगत राहिले भारतात हप्ते न भरल्या मुळे घर जप्त होत असेल तर ते फार वाईट मानले जाते , लोक आटा पिटा करतात , काहींना depression / attack आले आहे. https://corporatefinanceinstitute.com/resources/knowledge/credit/ninja-…

हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का?
भारतातील परिस्थिती चांगली, की वाईट यावर वाद करण्यापेक्षा या मुख्य प्रश्नाच्या अनुषंगाने प्रत्येक सदस्याने स्वतःच्या बाबतीत किंवा स्वतःच्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत (ज्याचे जीवन तुम्ही जवळून पाहिले आहे वा त्याचे अनुभव वा विचार त्याने तुम्हाला तपशीलाने सांगितले आहेत) उत्तर द्यावे असे मला वाटते सर्व सदस्यांनी या प्रकारे उत्तर दिल्यास चर्चा आपसूकच पुर्ण होईल. उगाच कुणातरी "क्ष" व्यक्तीची अर्धवट माहित असलेली जीवन गाथा लिहून त्या अनुषंगाने काहितरी निष्कर्ष काढण्यात फारसा अर्थ नाही असे मला वाटते. म्हणजे तुम्ही यापैकी कोणत्या वर्गात मोडता ते नमूद करुन तुमचे विचार विस्ताराने लिहा असे मी सुचवेन १) मी भारताबाहेर अमूक देशात स्थायिक झालो आहे- आणि मला दीर्घकाळ (अगदी निवृत्तीनंतरही) भारताबाहेरच रहावेसे वाटते अ) या निर्णयामागचे माझे कारण असे आहे - ब) तसेच भारतातल्या "या" गोष्टींना मी मुकत आहे किंवा त्या इथे मिळाव्यात असे मला आवर्जुन वाटते २) मी भारताबाहेर अमूक देशात स्थायिक झालो आहे (किंवा झालो होतो)- पण मला काही काळाने - (खास करुन निवृत्तीनंतर) भारतात परत जायचे आहे (किंवा परत आलेलो आहे) - अ) भारत सोडण्यामागचे माझे कारण ब) भारतात परत जाण्यामागचे कारण ? क) परदेशातील या गोष्टींना मी मुकत आहे किंवा त्या भारतात मिळाव्यात असे मला आवर्जुन वाटते ३) मी भारताबाहेर अमूक देशात स्थायिक झालो आहे (किंवा झालो होतो)- आणि भारतात परत जायचे की नाही याबाबत मी अजून ठरवू शकलेलो नाहीये ४) मी कधीच भारताबाहेर स्थायिक झालो नाही आणि तशी फारशी इच्छाही नाही- याकरिता माझी कारणे भारतातही रहायला मला आवडतेच त्याची ही कारणे पण भारतातील या गोष्टी आवर्जुन बदलल्या जाव्यात असे मला वाटते. तसेच भारताबाहेर न जाण्याने माझे हे नुकसान झाले याचीही मला जाणिव आहे ५) मी कधीच भारताबाहेर स्थायिक झालो नाही पण "या अमुक" काही देशांत मला जायला आवडेल पण तशी संधी न मिळाल्यासही मला खंत नाही. भारतातही रहायला मला आवडतेच त्याची ही कारणे पण भारतातील या गोष्टी आवर्जुन बदलल्या जाव्यात असे मला वाटते.तसेच भारताबाहेर न जाण्याने माझे हे नुकसान झाले याचीही मला जाणिव आहे - आता माझ्या पुरतं मी ४ वा ५ या प्रकारात मोडतो. म्हणजे मी कधीच भारताबाहेर गेलो नाही. यापुर्वी भारताबाहेर जावे असे प्रकर्षाने वाटले नाही. फार प्रतिभावान नसलो तरी अगदीच मठठ प्रकारतला मी नक्कीच नाही त्यामुळे संधी मिळाल्याही असत्या पण मी अशा संधींच्या शोधात फारसा नव्हतोच. आता वाटते न्युझीलंड या देशात जायला आवडेल - पण माझ्या क्षेत्रात तिकडे संधी फारशा नाहीत त्यामुळे संधी नाही मिळाली तरी खंत नाही. परदेशात न जाण्यामागची कारणे - दुसर्‍या देशात जावून तिथल्या चालिरीती, तिथले कायदे, नियम समजून घेणे त्याप्रमाणे जगायला शिकणे, तिथल्या हवामानाशी जुळवून घेणे ई ई मला बरेच आव्हानात्मक आहे असे मला नेहमीच वाटले. झालेच तर परदेशात अनेक कामे स्वतःच करावी लागतात घरगुती कामांना नोकर मिळत नाही किंवा तिथल्या पगारात ते परवडत नाहीत. त्याउलट भारतात दरमहा लाखभर पगार असणारी व्यक्ती देखील नोकरांंच्या पगारावर फारतर दहा ते पंधरा हजार रुपये खर्च करुन जवळपास अजिबात घरकाम न करता आरामात जगू शकते. दुसरे असे की मला भारतात - ते ही पुण्यात म्हणजे ज्या शहरात मी मोठा झालो त्याच ठिकाणी चांगल्या नोकरीच्या संधी मिळत गेल्या मग मला बाहेर जायची गरज पडली नाही. मला वाटते की परदेशी जाण्याचे कारण म्हणजे तिथल्या चलनात मिळणार्‍या पगारातुन चांगल्यापैकी बचत कमी कालावधीत होते पण मला तशी गरज वाटली नाही. तिशीच्या आत मी स्वतःचा फ्लॅट घेतला, चाळीशी ओलांडताना पुर्ण कर्जही फेडले. माझ्या भारतातील आवर्जुन बदलल्या जाव्यात या गोष्टी - वाहतुक कोंडी, खराब रस्ते (खासकरुन शहरातले - महामार्ग आता सुधारलेत बहुधा), बेशिस्त वाहतुक , भटके कुत्रे , रस्ते अडवून होणारे उत्सव, मिरवणूका, कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी (अचानक रात्री १२ वाजता फटाके वाजू लागले की डोकं फिरतं) , ध्वनी प्रदूषण ई भारताबाहेर न जाण्याने झालेले नुकसान - आय टी क्षेत्रात करिअरमध्ये ऑनसाईट जाण्याने पुढेही अधिल चांगल्या संधी मिळतात. अर्थात मी फार जास्त महत्वाकांक्षी नाही, आहे त्या करिअर मध्ये समाधानी आहे.

In reply to by तर्कवादी

आता माझ्या एका जवळच्या मित्राबद्दल लिहितो. बी ई मेकॅनिकल असलेला हा माझा पुण्यातला मित्र - २००१ पासून आमची मैत्री आहे. २००४ ला तो "रोबोटीक्स , ऑटोमेशन" या विषयातले एम एस करण्यासाठी जर्मनीला गेला. शिक्षण पुर्ण झाल्यावर तिथे त्याला नोकरी मिळाली. काही वर्षानंतर पुण्यातीलच एका मुलीशी त्याने लग्न केले व पत्नीलाही जर्मनीला घेवून गेला. पुढे त्याच्या पत्नीनेही कधी पुर्ण वेळ तर कधी अर्धवेळ व्वगैरे नोकर्या केल्यात. एक मुलगा व एक मुलगी अशी त्यांना दोन अपत्ये झालीत. या काळात तो दरवर्षी एकदा तरी पुण्याला येत असे. पण आता साधारण वर्ष-दीडवर्षापुर्वी तो पुण्यात कायमचा स्थायिक झाला.. अलीकडे माझी त्याच्याशी भेट होवू शकली नाही परंतु फोनवर बोलणे झाले तेव्हा मी त्याला भारतात परतण्याचा निर्णय घेण्यामागचे कारण विचारले तेव्हा त्याने जी कारणे सांगितले ती साधारण अशी १) त्याला भारतातले कौटुंबिक आयुष्य आणि अनुषंगाने मुलांवर होणारे कौटुंबिक संस्कार हवेसे वाटत आहेत. पुण्यात आता त्याच्या कुटुंबात त्याचे आईवडीलही आहेत. त्याच्या पत्नीचे माहेरही पुण्यातच आहे २) जर्मनीतील तरुण पिढीतील मुले फारशी महत्वाकांक्षी नाहीत. माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार त्याच्या ज्येष्ठ -जर्मन सहकार्‍यांची अशी खंत आहे की मुले फार काही चांगलं शिक्षण /उच्च शिक्षण घेण्यात रस दाखवत नाही. साधारण शिक्षण घेवून कोणतीही नोकरी केली तरी चांगल्यापैकी पगार मिळत असल्याने इंजिनिअरिंग वा तत्सम व्यावसायिक शिक्षण मेहनतीने घ्यावे अशी इच्छाशक्ती मुलांमध्ये कमी होत आहे. त्यामुळे माझ्या मित्राला त्याच्या मुलांच्याबाबतीत असा धोका पत्करायचा नाहीये.

In reply to by तर्कवादी

माझ्या मित्राचेही असेच आहे. अनेक वर्षे जर्मनीला राहून तो परत आला. तथापि, मुलांच्या शिक्षणासाठी तो पुन्हा जर्मनी गाठायचा विचार करतोय. हा वेगळाच प्रकार आहे. त्याचे प्रमुख कारण अर्थातच कुटुंब हे होते. जर्मनीत किंवा युरोपियन देशांत गेलेल्या पहिल्या पिढीचा सर्वात मोठा पुल हा पालकांचाच असतो.. कारण शक्यतो ही पिढी मध्यमवर्गीय सधन लहान कुटुंबांतून आलेली असते आणि आई-वडिलांशी खूप गुंतलेली असते. परदेशात गेलेल्या पिढीला त्यामुळे एकटेपणा खायला उठतो. त्यांच्या पुढच्या पिढीला कुटुंबात रमवण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. काही मंडळी पुन्हा मायदेशी परततात. आता या परतीच्या वेळेस मात्र पूर्वीचे मध्यमवर्गीय उच्चमध्यमवर्गीय झालेले असते. काही पैसा गाठीशी असतो.. इतर भारतीय समाजापासून त्यांची मुले मात्र पूर्णपणे तुटलेली असतात. श्रीमंत शाळांमध्ये शिकतात. ती मातृभाषा क्रियापदापुरती वापरतात. त्यांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून आय आय एम चे क्लासेस घेतले जातात.. ते इयत्ता बालवाडीलाच फ्रेंच, जर्मन नाहीतर जपानी शिकू लागतात कारण त्या मुलांची मुख्य भाषा भारतीय इंग्रजी झालेली असते. मिंग्लीशसारखी क्रियोल भाषा ते घरी वापरतात आणि ती जगण्यासाठी अगदीच निरुपयोगी आहे हे त्यांना न सांगताच उमजेले असते. हे लोक गेटेड कम्युनिटिज मध्ये राहतात. त्यांच्याकडे ल्यूसी, जॉन किंवा तत्सम नावांची अर्धवट परदेशी कुत्री असतात. त्यांचे म्हातारे आई आजोबा सुद्धा जमेल त्या इंग्रजीत त्यांच्याशी संवाद साधतात. गणपतीला वगैरे उकडीचे मोदक खाऊन, कधीतरी कृषिपर्यटन करून संस्कृती जपतात. बरं त्यांचे वर्तन वैज्ञानिक असते का तर तेही नाही. त्याची सुरवात तर ते अगदी सुवर्णप्राशन वगैरे असल्या गोष्टींपासूनच होते. तुम्ही दिलेले दुसरे कारण अगदी इथेच आकाराला येते. पहिली पिढी एसबीआय बँकेतून क्लार्क म्हणून निवृत्त झाली. दुसरी पिढी समजा डॉएच्च बँकेत आयटी मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे. तर या दुसर्‍या पिढीला आपल्या मुलांनी किमान दोन स्टार्टप काढाव्यात असे वाटू लागते. काही लोकांच्या यशाच्या आणि कौटुंबिक आनंदाच्या व्याख्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात. त्यांना बेस्ट ऑफ बोथ हवे वाटू लागते. जर्मनीसारखे देश शिक्षणामध्ये रॅट रेसला प्राधान्य देत नाहीत. सगळ्या राहणार्‍या व्यक्तींना हेल्थ इन्शुरन्स हा अनिवार्य असतो. जवळ्पास ८५ टक्के हेल्थ इन्शुरन्स हा पब्लिक कंपन्यांचा असतो ज्या ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवलेल्या असतात. आर्थिक उत्त्पन्न जितके जास्त तितका प्रिमियम जास्त. कमी उत्पन्न असेल तर प्रिमियमही कमी असतो आणि उपचार मात्र त्याच दर्जाचे मिळणार ही हमी असते. हा थोडक्यात समाजवादी प्रकार आहे. सर्वच लोक ठराविक रक्कम भरून सर्व लोकांना त्याच दर्जाची आरोग्यव्यवस्था मिळेल अशी तजवीज करतात. जर्मनीतल्या प्रत्येक मुलाला वयाच्या अठरा वर्षांपर्यंत/काहींना पंचवीस वर्षांपर्यंत एक रक्कम मिळते. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्चशिक्षण पूर्णपणे फुकट आहे. वरखर्च उचलावा लागतो पण त्या वरखर्चातली अर्धी रक्कम तर सरकारच देते. खाण्यापिण्यात कन्सेशन असते. विद्यार्थ्यांना संपूर्ण राज्यभर सार्वजनिक वाहतूक फु़कट वापरता येते. त्यामुळे सगळीकडे सारख्याच दर्जाचे शिक्षण मिळते. शिक्षणाचा दर्जा समान राखण्यात या समाजवादी बाबी कारणीभूत आहेत. संधींची त्यातल्या त्यात समानता, रोजगाराला असलेले सरकारी कवच, व्यवस्थेमध्ये रुजलेला प्रामाणिकपणा आणि शिस्त या सगळ्या बाबींमुळे व्यक्ती ही आनंदी राहण्यासाठी धडपड करते, दोन वेळच्या अन्नाची चिंता तितकीशी करत नाही. जिथे सुबत्तेने या बाबी सोडवेल्या आहेत. आपल्या ध्यानीमनीही नसणारे विषय त्यांच्या ऐरणीवर असतात. स्पर्धा असते पण बर्‍याचदा ती स्वतःशी असते. म्हणजे बॉडी बिल्डिंग करणे, सर्फिंग, वेकबोर्डिंग, पॅराग्लाईडींगसारखे धाडसी खेळ खेळून त्यांच्यात प्रावीण्य मिळवणे, इत्यादी इत्यादी..कुठल्याही अडचणीला जवळचे पोलिस स्टेशन गाठायला त्यांची भारतीयांसारखी प्रचंड फाटत नाही. काही जर्मन म्हातार्‍या पोलिसांना दरडावताना मी पाहिल्या आहेत. कधीकधी प्रत्येक गोष्ट झगडून आणि नाका तोंडावर आपटून मिळवलेल्या पहिल्या दुसर्‍या पिढीला हे कळले तरी पचनी पडत नाही असे वाटते. खूप भारतीय परदेशस्थ त्यांच्या मुलांना अतिशय स्पर्धात्मक करायचा (नाहक) प्रयत्न करतात असे माझे निरिक्षण आहे. कदाचित काही दशकांची सामाजिक सुरक्षितता जशी परदेशस्थांना आंदण म्हणून मिळाली आहे तशी भारतीयांना मिळाली नाही आणि दुसर्‍या पिढीने प्रचंड स्पर्धात्मक राहून, भारतात बोर्डाबिर्डात येऊन झगडून मिळव्ली आहे ती सामुहिक असुरक्षिता सतत कुठेतरी पार्श्वभागाला असावी असे वाटते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

हणमंतअण्णाजी विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तुमचा मुद्दा समजला.
भारतीय परदेशस्थ त्यांच्या मुलांना अतिशय स्पर्धात्मक करायचा (नाहक) प्रयत्न करतात असे माझे निरिक्षण आहे
शक्य आहे. कारण त्यांची आताची सुस्थिती त्यांनी भरपूर परिश्रम करुन , अतिशय महत्वाकांक्षेने मिळवली आहे. ती महत्वाकांक्षा आपल्या मुलांत नसली तर ही कल्पनाही त्यांना करवत नाही. झालेच तर ते स्वतः उच्चपदांवर काम करत असल्याने श्रमप्रतिष्ठाही मनात रुजलेली नाही. माझा रोबोटीक्स -ऑटोमेशन क्षेत्रात काम करणारा मित्र आपला मुलगा मॅक डोनाल्ड वा तत्सम ठिकाणि वेटर म्हणून काम करेल अशी कल्पनाही कदाचित सहन करु शकणार नाही. पण मी वर म्हंटले तसे - माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार त्याच्या ज्येष्ठ -जर्मन सहकार्‍यांची अशी खंत आहे की मुले फार काही चांगलं शिक्षण /उच्च शिक्षण घेण्यात रस दाखवत नाही .. फार काय तर , माझ्या मित्राच्या म्हणण्यानुसार या ज्येष्ठ जर्मन लोकांची तक्रार अगदी टिपीकल भारतीय पालकांसारखीच आहे म्हणजे "आम्ही आमच्या आई-वडीलांच ऐकलं, चांगलं शिक्षण घेतलं, मेहनत घेतली आणि करिअर घडवलं.. पण पुढच्या पिढीतली मुलं आमचं ऐकत नाहीत, मिळालेल्या स्वातंत्र्याचा नाहक फायदा घेतात.. वगैरे"

In reply to by तर्कवादी

भारतीय परदेशस्थ त्यांच्या मुलांना अतिशय स्पर्धात्मक करायचा (नाहक) प्रयत्न करतात असे माझे निरिक्षण आहे ".....ती महत्वाकांक्षा आपल्या मुलांत नसली तर ही कल्पनाही त्यांना करवत नाही. " तर्कवादी, आपल्या या उप प्रतिसादाशी सहमत विशेष करून पहिल्या पिढीचे स्थलांतरित असे का वागतात या बद्दल २ पैसे माझे पण ..... पहिली पिढी हि बहुतेक फक्त शिक्षण बळावर येथे आलेली असते त्यामुळे आपण म्हणता तसे " आपला मुलगा मॅक डोनाल्ड वा तत्सम ठिकाणि वेटर म्हणून काम करेल अशी कल्पनाही कदाचित सहन करु शकणार नाही." असे घडते जरी येथे आल्यावर पाश्चिमात्य देशात "सर्व कामांना प्रतिष्ठां असते " हे माहिती असून सुद्धा आणि असे भांडी घासण्याची श्रम स्वतः विद्यार्थी दशेत केलेले असले तरी २-३ ऱ्या पिढीत मग बदल होत जातो .. साहजिक आहे .. तेव्हा हे "नाहक" असते असे मी पण १००% म्हणणार नाही ...

अमेरिका वगैरे पाश्चात्य देशात शालेय शिक्षण फुकट असले, तरी विश्वविद्यालयीन शिक्षण महाग असते. आपण भारतीय मंडळी मुलांचे संपूर्ण शिक्षणच काय, त्यांची लग्ने लावून देणे, मुली-सुनांची बाळंतपणे, नातवंडांना सांभाळणे-शिकवणे हे सगळे ( आपली जबाबदारी समजून) करत असतो. याउलट बहुतांश अमेरिकन वगैरे मुले अठराव्या वर्षी पालकांपासून फारकत घेतात. शालेय शिक्षण संपल्यावर फार कमी मुले पुढील उच्चशिक्षण घेतात. माझ्या माहिती/अंदाजाप्रमाणे भारतीय सुशिक्षित तरुणांना परदेशात ज्या संधी मिळत आहेत, त्यामागे हे एक महत्वाचे कारण असावे. अमेरिकन लोक 'लकीर के फकीर', तर आपण भारतीय लोक 'जुगाडबाज' असतो, असे नेहमी अनुभवास येते. याबद्दल माझा एक अनुभव सांगतो. काही वर्षांपूर्वी माझ्या चित्रांच्या प्रदर्शनानिमित्त मला अमेरिकेत एक महिना वास्तव्य करायचे होते. मी प्रवासखर्च करेन, पण माझ्याकडे हॉटेलसाठी पैसे नाहीत हे मी स्पष्ट केल्यावर आयोजकांनी एका अमेरिकन कुटुंबात माझी वास्तव्याची सोय केली. हे कुटुंब म्हणजे मॅनी(नवरा) आणि जो(बायको) नामक सत्तरीतले एक जोडपे होते. भारतातून त्यांच्या घरी रात्री नऊला पोचल्यावर माझी (नंबराने उघडणारी) बॅग उघडेनाशी झाली. ते दोघे खूपच काळजीत पडले. यलो पेजेस मधून नंबर हुडकून मॅनीने 'लॉकस्मिथ' ची सकाळी नऊची अपॉइंटमेंट घेतली. ऑफिसात दोन तास उशीरा पोचण्याबद्दल कारवाई केली, आणि मला सकाळी साडे आठाला बॅग घेऊन जाऊया असे सांगितले. 'लॉकस्मिथची अपॉइंटमेंट' वगैरे ऐकून मला हसूच आले. त्यातून तो वीस का तीस डॉलर घेणार होता. मग बॅगचे जरा सूक्ष्म निरिक्षण करून मी त्यांना एकादा खिळा वगैरे काही आहे का विचारले. त्यांना याचे आश्चर्यच वाटले. खिळ्याने हा काय करणार बुवा ? असे भाव त्यांच्या चर्येवर दिसत होते. खिळा मिळाल्यावर जिथे बॅगचे कुलूप अडत होते, तो भाग खिळ्याने जरासा दाबताच कुलुप उघडले. हा सगळा प्रकार बघून ते दोघे स्तंभितच झाले. "आम्ही असा कधी विचारच करत नाही. कुलूप उघडत नसले तर 'लॉकस्मिथची अपॉइंटमेंट' हेच आम्हाला ठाऊक असते. तुला असे सुचले तरी कसे ??? मी मनात म्हटले, 'लकीर के फकीर' आणि 'जुगाडबाज' यात हाच तर फरक असतो. माझ्या मुलाला अमेरिकेत फिजिओथेरॅपिस्टाची नोकरी लागल्यावर त्याने आपल्या कामाखेरीज कंपनीचे एकंदरित काम कसे चालते, कंपनीला नफा मुख्यतः कशातून होतो, विविध बाबतीत कंपनीची पॉलिसी काय असते, पेशंटांना दिली जाणारी सेवा, ती सेवा देणारांच्या कामाच्या वेळेचे नियोजन आणि त्यातून कंपनीला होणारी मिळकत - यांचे नेमके काय गणित आहे वगैरे सगळे हळूहळू जाणून घेतले. त्याच्या बरोबरीचे थेरापिस्ट फक्त आपले दिलेले काम आटोपून पाचच्या ठोक्याला घरी जायचे. पुढे मुलाला वरच्या जागा मिळत जाऊन आता तो त्या सगळ्या अमेरिकन थेरापिस्टांचा बॉस झालेला आहे. 'लकीर के फकीर' असणे, आणि 'जुगाडबाज' असणे यातला हा फरक. असो.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्तजी बॅगेचा किस्सा आवडला. पण मला वाटते की कदाचित ते सत्तरीतले जोडपे असल्याने त्यांची तशी मानसिकता असेल. एखाद्या तरुणाने गुगल केले असते , युट्युब व्हिडिओ पाहिले असते असे मला वाटते. मी असे म्हणतो कारण अमेरिकेत वास्तव्यास असणारा माझा एक मराठी मित्र काही प्रमाणात सुतारकाम शिकला व तो ते करतो. मध्यंतरी त्याने कारचा एक पार्ट बदलला , तो ही बहुधा ब्रेकचा ( .. आता नक्की आठवत नाही मला) पण ब्रेकचा पार्ट बदलणे म्हणजे तशी जोखीमच की.. भारतात असताना त्याने असे काही केले नसते , तो कार सर्विस सेंटरला घेवून गेला असता. किंबहूना DIY ची संकल्पना बहुधा अमेरिकनच किंवा पाश्चात्यच असावी. बाकी व्यक्ती तितक्या प्रकृती आणि एखादे काम स्वतः करावे किंवा कसे हे ठरवताना एकीकडे त्यातली जोखीम (बिघडले तर काय) , त्याबद्दल वाटणारा आत्मविश्वास , स्वतः ते करण्याची इच्छाशक्ती (करायला मजा येईल अशी मानसिकता) तर दुसरीकडे व्यावसायिक मदतीची उपलब्धता (सहज आणि चटकन कुणी येत असेल तर कशाला आपण उगाच मेहनत घ्या... आणि तेच दहा फोन करावे लागणार अस्तील तर त्यापेक्षा मीच काय ते प्रयत्न करुन बघतो असा विचार करेन) या सर्वांचा सारासार विचार. तुमच्या मुलाच्या यशाबाबतही मी हेच म्हणेन की व्यक्ती तितक्या प्रकृती.. त्याने जसे व्यवसायाच्या अतिरिक्त बाबी जाणून घेतल्यात तसे प्रत्येक भारतीय सुद्धा करेलच असे नाही.

In reply to by उपयोजक

उपयोजक आपले हि बरोबर आहे भारतात जुगाड हे एक "स्किल" असले तर पाश्चिमात्यांच्य्यात " शोध " आणि आंत्रप्रुनर हे स्किल आहे ... निकडी वर उपाय शोधणे आणि त्याचे रूपांतर व्यवसायात करणे हे पाश्चिमात्यानं चांगले जमते हे अनेक शोधातून कळेल .

In reply to by चित्रगुप्त

अमेरिका वगैरे पाश्चात्य देशात शालेय शिक्षण फुकट असले, तरी विश्वविद्यालयीन शिक्षण महाग असते. हे अममेरिकेत खरे असावे पण सर्व पाश्चिमात्य देशात असेच आहे असे नाही , येथे तर पूर्वी सर्व पदवी शिक्षण पण फुकट होते त्यानंतर त्याला शुल्क लावले गेले पण ते शुल्क हे सरकार तुम्हाला कर्ज म्हणून देते आणि जमेल तसे परत द्यायचे असते , आयकरात वाढवले जाते ....त्यामुळे लगेच पालकांना पैसे उभे करावे लागत नाहीत बाकी आपण जे जुगाडबाज हे मांडले आहे ते तंतोतंत नुकताच भारतात , इस्त्री / कपडे, ब्याग , मिक्सर ... सगळे दुरुस्त करून घेतले ते सुधाच एकाच उपनगरात सर्व दुरुस्तीवाले सापडले

@तर्कवादी: तो प्रसंग २००७ सालचा आहे. त्यावेळी गूगल, यूट्यूब वगैरे असतील पण मला तरी माहिती नव्हते. इंटरनेट सहज सुलभ, स्वस्त नसणार. माझ्या चित्रप्रदर्शनात एकाने विडियो शूटिंग केले आणि ते यूट्यूबवर टाकेन असे सांगितले, पण मला मुळात यूट्यूब म्हणजे काय हेच ठाऊक नव्हते. (आता येवढ्या वर्षांनंतर तो विडियो खरोखर आहे का हे बघितले पाहिजे) बाकी DIY हा शब्दही कदाचित अस्तित्वात नसेल त्याकाळी, पन्नासच्या दशकात आमचे वडील सुतारकाम आणि इतर नाना खटपटी करत असायचे. माझ्या जन्मापूर्वी त्यांनी स्वतः गवंडीकाम करून घर बांधले होते, आणि मी लहान असताना घरात बिस्किटे वगैरे बनवण्यासाठी बेकरीत असते तशी भट्टी बनवली होती. जंगलात हिंडून ते विविध वनस्पती आणून त्यापासून औषधे बनवायचे (आमचे औषधांचे दुकान होते) एकदा तर त्यांनी जंगलात पडलेले प्राण्याचे हाड घरी आणून त्याची भुकटी (बहुतेक कॅल्शियम साठी) बनवली होती. माझे आजोबा (ते माझे वडील लहान असतानाच निवर्तले होते) ब्रिटिश काळात सर्जन होते पण त्यांना 'किमयेचा' नाद होता. पार्‍यापासून सोने बनवण्याचा प्रयत्न ते विविध प्रयोगातून करायचे, आणि काचेच्या एका विशिष्ट प्रकारच्या गोलकात बघून भूत-भविष्य दिसते असा त्यांचा विश्वास होता. मात्र तसे ते अगदी लहान मुलांनाच दिसते, म्हणून आमचे वडील आणि काका वगैरेंना ते बघायला लावायचे आणि काय दिसतेय ते सांग, असा लकडा लावायचे. आताच गुगलून बघता याबद्दल हे सापडले: Crystal-gazing (also known as crystal-seeing, crystallism, crystallomancy, and spheromancy) is a method for seeing visions achieved through trance induction by means of gazing at a crystal. Traditionally, it has been seen as a form of divination or scrying, with visions of the future, something divine etc. . "THE CRYSTAL BALL" (1902) BY JOHN WILLIAM WATERHOUSE. IMAGE VIA WIKIPEDIA COMMONS मी स्वतः पूर्वी जादूचे खेळ, लंबकाद्वारे भविष्यकथन वगैरे केलेले आहे. त्याविषयी २०११ साली 'एक वजनदार धागा' असा लेखही मिपावर लिहिला होता. अमेरिकेत उत्तम लाकूड आणि अवजारे मिळत असल्याने तिथे मी सुतारकाम, चित्रांच्या चवकटी बनवणे वगैरे करत असतो. एकंदरित हे विक्षिप्तपण आणि जुगाडबाजी आमच्या घराण्यातच आहे म्हणायची.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्तजी धन्यवाद तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. २००७ साली गूगल, यूट्यूब प्रचलित नसल्याने सत्तरीतल्या तो जोडप्याने बॅग आपण स्वतःही दुरुस्त करु शकतो असा विचार केलाच नाही. पण त्याच वेळी कदाचित चाळीशीतल्या अमेरिकन व्यक्तीनेही प्रयत्न केला असता. तुमच्या आजोबांच्या प्रयोगशीलतेबद्दल ऐकून मजा वाटली. माझे वडील थोडंफार प्लंबिंग, इलेक्ट्रिकलचे काम , पंखे दुरुस्त करणे आणि इतर काही कामे स्वतः करायचे, अजूनही करतात. आमच्या घरचे वायरिंग आम्हीच केले होते (माझा भाऊ, वडील व मी) त्यावेळी मी सुद्धा ड्रिल मशिन चालवले. एखादे बोर्ड चुकून किंचित तिरपे लागले तरी आम्ही फारसा विचार केला नाही.. "काम चालायला हवं" ही मानसिकता होती. दिसण्याचं तितकंसं महत्व नव्हतं. आठ वर्षापुर्वी मी माझ्या नव्याने रंगवलेल्या फ्लॅटमध्ये रहायला आलो आणि इथे मात्र ड्रिल चालवायची मी हिंमत केली नाही. चुकून छिद्र नीट पडलं नाही तर भिंत खराब होईल किंवा छिद्रे सरळ रेषेत न पडल्यास जी वस्तू बसवायची ती तिरपी बसेल म्हणून कधी ड्रिल मशिन हातात घेतलं नाही. इथे आपलं घर अगदी व्यवस्थितच दिसायला हवं , कुठेही काही बेढब असून चालणार नाही असा अप्रत्यक्ष दबाव असतो. तसेच इथे एक फोन केला की सोसायटीचा ईलेक्ट्रिशियन थोड्या वेळात हजर होतो आणि काम करुन देतो--सोसायटी पगार देत असल्याने या कामाचा मोबदला अव्वाच्या सव्वा मागत नाही (व्यक्तिगत कामांच्या दरांबाबतही कमिटीचे काहीसे नियंत्रण असते त्यामुळे) मग कोण कष्ट घेणार आणि प्रयोग करणार ना ?
त्याविषयी २०११ साली 'एक वजनदार धागा' असा लेखही मिपावर लिहिला होता.
दुवा दिलात त्याबद्दल आभार- लेख नक्की वाचेन.
एकंदरित हे विक्षिप्तपण आणि जुगाडबाजी आमच्या घराण्यातच आहे म्हणायची.
एकत्र कुटूंबामु़ळेही हे गुण पुढे संक्रमित होण्यास हातभार लागतो. अशी कामे व अशी प्रयोगशीलता ही खासकरुन पुरुषी स्वभावाची वैशिष्ट्य आहेत. मग वडील, काका, सख्खे चुलत भाऊ, त्यांचे ये-जा करणारे मित्र यापैकी कुणी प्रयोगशील असतील तर तो गुण हळूहळू पसरतो.शिवाय पुर्वी टीव्ही सारखी साधने नव्हती त्यामुळे वेळ व उर्जा खर्च करण्यासाठी अशा प्रयोगशीलतेची साथ असावी.

अजुन काही गोष्टी १. खाद्यपदार्थातील शरीरावर वाईट परीणाम करणार्या घटकमात्रांबद्दल (उदा. किटकनाशक) खात्रीलायक न सांगता येणे. सार्वजनिक खाद्यगृहात स्वच्छतेची वानवा, शरीराला घातक असणार्या रसायनांचा फळे पिकवण्यास वापर २. डॉक्टराकडुन प्रतिजैविके (अ‍ॅंटीबायोटिक्स), स्टेरॉईडस (मराठी प्रतिशब्द?) यांचा अतिवापर. घाणेरड्या अक्षरात औषधाच्या चिठ्या लिहुन देणे. ३. माणसाच्या कौशल्यापेक्षा आई-बापाची माहिती मुलाखतीच विचारणे. ४. व्यक्तीपुजा - क्रिकेटमध्ये शतक केले की सीमाशुल्कात माफी मागणे, मंदीरे बांधणॅ

विज्ञानात इतकी प्रगत असूनही हे प्रकार अमेरिकेत अनेक वर्षांपासून वारंवार का घडत आहेत? बालमानसशास्त्र , पालकनिती हे विषय अमेरिकेत इतके मागासलेले आहेत का? विद्यार्थ्याने केला शाळेत गोळीबार हे वाक्य वर्तमानपत्रात वाचलं की ८०% वेळा घटनेचा देश अमेरिकाच का असतो? https://www.cbsnews.com/live-updates/richneck-elementary-school-shootin…

In reply to by उपयोजक

अमेरिकेत होणारे गोळीबार हा महत्वाचा विषय अजून धाग्यात आला नव्हता.. आता बघू सदासर्वदा अमेरिकेचे गोडवे गाणारे या मुद्द्यावर काय म्हणतात ते.

साधारणतः इ.स. २००० च्या आसपास मी दिल्लीतील 'अमेरिकन स्कूल' मधे काही काळ कलाशिक्षकाचे काम केले होते. या शाळेत मुख्यतः अमेरिकन एम्बसीतल्या अमेरिकन डिप्लोम्याटांची मुले शिकत. (यात काही अमेरिकन सिटिझन झालेले भारतीय, ज्यांची भारतात डिप्लोम्याट म्हणून वॉशिंगटनातून नेमणूक झालेली होती, असे पण होते. त्याखेरीज अन्य एम्बस्यांमधे कार्यरत परदेशी लोकांची मुले पण प्रवेश घेऊ शकत होती. मात्र कोणत्याही भारतीय विद्यार्थांना त्यात प्रवेश नव्हता) त्यावेळची काही निरिक्षणे: १. भारतातील कोणत्याही शाळेत अपेक्षित असणारी 'शिस्त' नावाची गोष्ट इथे अजिबात नव्हती. वर्ग सुरु असताना मुले या वर्गातून त्या वर्गात जात, बूट घालून टेबलांवरून चालत जाणे, बॅगांमधून काढून लांबच लांब गोडाच्या लिबलिबित दांड्या (त्यांना काय म्हणतात ते मला माहीत नाही) हातात उंच लटकवत चाटत- खात बसणे, या वर्गातल्या मुलीजवळ दुसर्‍या वर्गातील मुलगा येऊन तिला खेटून बसणे वा भारतीय विद्यार्थी कल्पनाही करणार नाहीत असे वर्तन करणे, वर्गात मोठ्याने रेडियो वाजवणे वगैरे खुशाल करायची. २. शिक्षकांना टॉम, डिक, सूझी वगैरे नावाने संबोधणे. शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त होईल अशा कोणत्याही वर्तनाचा अभाव. शाळेच्या डायरक्टराने लेखी फतवा काढला होता की विद्यार्थ्यांनी शिक्षकांना मिस्टर अँडरसन, मिस सूझी वगैरे संबोधिले पाहिजे, त्याचाही फारसा परिणाम झालेला नव्हता. ३. त्यांना हवे तेच आणि तसेच ते करणार. शिक्षकाने काहीही बोलायचे नाही. याचे उदाहरण म्हणजे पेंटिंगसाठी असलेले विविध प्रकारचे ब्रश दाखवून मी त्याबद्दल माहिती सांगितली, जसे चपटा आणि गोल ब्रश, मऊ वा कडक केसांचे ब्रश इत्यादि कसे वापरावेत वगैरे. त्यानंतर एक 'गोरा' मुलगा विचित्र प्रकारे ब्रश वापरत असलेला बघून मी त्याला हा चपटा ब्रश अश्या रितीनी चालवावा असे सांगितल्यावर त्याने "No. I want it this way" असे म्हणून माझ्या सूचनेकडे साफ दुर्लक्ष केले. (भारतीय शाळेत शिकवण्याचा माझा अनुभव याच्या अगदी याउलट असल्याने मी चाटच पडलो). ४. वर्गातल्या कुणा मुलाचा वाढदिवस असल्याने बरेच पिझे मागवून मुले खात होती परंतु त्यातल्या एकानेही मला खाण्याबद्दल विचारलेही नाही. ५. शाळेतील विविध इयत्तांसाठी चित्रकलेचा अभ्यासक्रम खूपच विचारपूर्वक आखलेला होता, आणि त्यात पायरी पायरीने कसे शिकवायचे हे स्पष्ट केलेले होते. याची छापील प्रत मला देण्यात आलेली होती आणि कोणत्या वारी काय शिकवायचे वगैरे सगळे अगदी व्यवस्थित ठरवलेले होते. ही बाब मला खूपच महत्वाची वाटली. (भारतीय शाळेत असले काहीही नव्हते---- अमूक एका कला-शिक्षकाची नेमणूक एकदा केली, की तो काय शिकवतो वा शिकवले पाहिजे याचे कुणाला देणेघेणे नव्हते... आणि हे फरिदाबादमधील सर्वोत्कृष्ट शाळेविषयी आहे) ६. आठवड्यातील काही तास जगातील श्रेष्ठ चित्रकारांची मोठमोठी छापील चित्रे मुलांना दाखवायची, त्यांचे मर्म उलगडून सांगायचे, मग चित्रांच्या मागे छापलेले प्रश्न त्यांना विचारायचे, त्यांची उत्तरे त्यांनी लिहायची, तसेच समोर ते चित्र ठेऊन त्याची नक्कल मुलांनी वर्गात बसून करायची. हा प्रकार मला फारच आवडला. (भारतीय शाळेत असले काहीही नव्हते) ७. एक दिवस 'सेल्फ पोर्ट्रेट' साठी असायचा. प्रत्येक विद्यार्थ्याला एकेक आरसा देऊन त्यात बघत त्यांनी आपापले चित्र काढायचे असे. यात बहुतांश चित्रे ओबडधोबड, वेडीवाकडी असली तरी त्यात त्या त्या मुलाचे काहीतरी वैशिष्ट्य दिसून यायचे, ही माझ्यासाठी खूपच आश्चर्याची गोष्ट होती. (भारतीय शाळेत असे काहीही नव्हते) ८. त्या वर्षाचे शेवटल्या दिवशी बक्षिस समारंभ होता. त्यात अभ्यासात आणि इतर सर्व बाबतीत (उदा. खेळ, चित्रकला, वक्तृत्व, संगीत इत्यादि) अश्वेत - म्हणजे कोरियन, जपानी, भारतीय (अर्थातच डिप्लोम्याटांची मुले) विद्यार्थ्यांना एकूण एक पारितोषिके मिळाली, आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून खास पारितोषिक मिळवणारी सातवी की आठवीतली विद्यार्थिनी वैद्यनाथन का सुब्रमण्यम कोणीतरी यंडूगुंडू होती. यात 'गोर्‍या' मुलाला एकही बक्षिस मिळाले नाही याचे मला खूपच आश्चर्य वाटले होते. (वरती लिहीलेले क्र. १ ते ४ मुद्दे 'गोर्‍या' आणि 'काळ्या' अमेरिकन विद्यार्थ्यांना लागू पडत होते) ९. माझ्या वर्गात मल्होत्रा की अरोरा कोणीतरी एक पंजाबी मुलगा होता. शेवटल्या दिवशी त्याने मला लिफाफ्यात घालून एक चिठ्ठी दिली. त्यात त्याने लिहीले होते की मी जो काही काळ शिकवत होतो, त्या आधीच्या काळात त्याला चित्रकलेविषयी कधीही प्रेम वाटले नव्हते, पण माझ्यामुळे त्याला आता चित्रकलेची गोडी लागलेली होती आणि भविष्यात त्याने चित्रकलेची साधना करण्याचे ठरवले होते. माझ्याविषयी त्याच्या मनात खूप आदर निर्माण झालेला असून त्याने त्याबद्दल माझे आभार मानले होते. हे सगळे वाचून मला खूप समाधान वाटले आणि तिथल्या एकंदरित वातावरणामुळे मनाला आलेले औदासिन्य दूर झाले. असो. हा सगळा अनुभव या धाग्याच्या विषयाशी कितपत संबंधित आहे हे ठाऊक नाही, तरी मला आज अचानक हे सगळे आठवले म्हणून लिहीले असे.

In reply to by चित्रगुप्त

खरेतर खूप महत्वाची प्रतिक्रिया आहे. ह्यातून खरेतर भारतीय समाज आणि अमेरिकन समाज ह्यांची घडी वेगळी का आहे आणि कशी आहे हे साफ दिसून येते. भारतीय शिक्षण व्यवस्था (आणि इतर सर्व व्यवस्था) ह्यांत व्यक्ती स्वातंत्र्याला शेवटचे स्थान आहे. त्यामुळे शाळेंत सर्व मुलांनी एकसारखे दिसावे, वागावे, शिकावे अशी अपेक्षा असते. शिस्तीच्या नावाखाली प्रसंगी शिक्षा देऊन मग मुलांना एकाच साच्यांत घातले जाते. ह्यांत चुकीचे काहीच नाही अनेक ठिकाणी मुले इतक्या निकृष्ट वातावरणातून येतात कि शाळेला त्यांना माणसांत आणावे लागते. अमेरिकेत (काही ठिकाणी) कृष्णवर्णीय विद्यार्थाना कपडे कसे घालावेत ह्याचे सुद्धा भान नसते. ढुंगणाच्या खाली पॅन्ट हा प्रकार काहींच्या मध्ये लोक प्रिय आहे. एखादा कृष्णवर्णीय मुलगा मग व्यवस्थित कपडे घालायला लागला तर मग इतर काळे त्याची थट्टा करतात त्याला नारळ म्हणतात (बाहेरून काळा पण आतून गोरा ह्या अर्थी). मग अनेक मुले ह्या वातावरणात इतर खराब काळ्या मुलांप्रमाणे वागायला लागतात, मग शिक्षण काहीही असेल तरी ह्यांना नोकरी मिळायला अवघड जाते कारण कपडे कसे घालावेत हे सुद्धा त्यांना समजत नाही. नोकरी मागण्यासाठी लाल स्पोर्ट्स शूज खाली उतरत असलेली ढगळ पॅन्ट आणि भडक रंगाची स्पोर्ट्स जर्सी घालून गेलात तर नोकरी कोण देईल ? त्यामुळे काही शाळांनी युनिफॉर्म वगैरे संकल्पना आणून ह्यांना माणसांत आणले. हीच पद्धती भारतांत शालेय सिस्टम मध्ये आहे. विविध भागातील मुले हि फारच मागासलेल्या परिवारातून येतात, अनेक ठिकाणी आईवडील अशिक्षित त्यामुळे चार चौघांत वागावे कसे ह्याचे सुद्धा योग्य संस्कार होत नाहीत त्यामुळे हि जबाबदारी शिक्षकावर येऊन पडते. एके काळी शिक्षक सुद्धा चांगले असायचे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांचे एक आपसूक नाते निर्माण होत असे. ह्यामुळे असंख्य भारतीय विद्यार्थ्यांचा फायदाच झाला आणि एके काळी अमेरिकन समाजांत सुद्धा हीच पद्धती असल्याने अनेक लोकांचा फायदा झाला. आता सुद्धा कॅथॉलिक शाळेंत आणि काही परंपरा प्रेमी शाळांत प्रचंड शिस्त आहे. सेंट ऑफ वूमन मधील हा सिन पहा : https://www.youtube.com/watch?v=Jd10x8LiuBc पण समाजांतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक शिक्षकांपेक्षा जास्त श्रीमंत आणि अनेक दृष्टीने जास्त सुसंस्कृत होतात तेंव्हा हीच तथाकथित शिस्त विद्यार्थ्यांसाठी घातक ठरते. हल्लीच आमच्या कुटुंबातील एक लहान मुलगी सांगत होती कि तिच्या शिक्षिकेने तिला "ज्योतिबा फुले हि एक थोर महिला होती" असे सांगितले. विद्यार्थिनीने तिला ते चुकीचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला असता विनाकारण आऊट ऑफ टर्न बोलते म्हणून शिक्षा केली. विद्यार्थिनीच्या आईने मिटिंग घेतली तेंव्हा ज्योतिबा हे पुरुष होते हे ऐकून शिक्षिकेला आश्चर्य वाटले. तिने "स्त्री सुधाकर" ह्याचा अर्थ सुधारक जी स्त्री आहे असा घेतला होता. त्याशिवाय "बा" म्हणजे "कस्तुरबा", 'हिरबा' प्रमाणे लिंग वाचक "बा" आहे असा घेतला होता. अश्या शिक्षिकेला आदर देऊन मुलांचे हित साध्य होण्याची शक्यता कमीच आहे. अमेरिकेतील शिक्षण व्यवस्थेतील व्यक्तिगत स्वातंत्र्य जास्त वाटले आणि अनेक ठिकाणी त्याचा विपर्यस्त होत आहे असे वाटले तरी त्यातून ज्यांना आवड आहे त्याच व्यक्ती पुढे शिकायला जातात. ज्यांना आवड आहेत ती मंडळी इतर सर्व काही विसरून त्या एकाच विषयाच्या मागे लागू शकतात आणि विनाकारण शिस्त आणि "everyone should be equally mediocre" न्यायाने त्यांना मागे ओढून धरले जात नाही. अनेकदा संपूर्ण क्लास मधील एकच विद्यार्थी असा असतो जो शिक्षकाचे शिकवणे सार्थक करतो. तो विद्यार्थी मग कदाचित मोठा बिसिनेस सुरु करेल आणि इतर बेशिस्त विद्यार्थी इथे खर्डेघाशी करतील. अमेरिकेतील डावी मंडळी आता इथे सुद्धा घाण करत आहेत. काळ्या मुलांना समजत नाही म्हणून शाळेतून गणित हाच विषय काढून टाकावा असा त्यांचा प्लॅन आहे. म्हणजे गोरी आणि आशियाई मुलांचे जाणून बुजून नुकसान करायचे. त्याच प्रमाणे शाळेंत ड्रेस कोड म्हणजे सुद्धा "racism" म्हणून वाट्टेल ते कपडे घालून यायचे नियम सुद्धा येथील दावे लोक आणायचा प्रयत्न करत आहेत.

In reply to by साहना

व तेथील शिक्षकांचा व्यासंग!अमेरीकन शैक्षणिक व्यवस्था व वर्गातील वातावरण यांची झलक कळली. खरंच तेथील भारतीय पालकांना पालकत्व निभावणे किती आव्हानात्मक आहे याचा अंदाज येत आहे.

In reply to by श्वेता२४

... व तेथील शिक्षकांचा व्यासंग!अमेरीकन शैक्षणिक व्यवस्था व वर्गातील वातावरण यांची झलक कळली. खरंच तेथील भारतीय पालकांना पालकत्व निभावणे किती आव्हानात्मक आहे याचा अंदाज येत आहे.
अमेरिकन शाळेविषयी माझा जो अनुभव इथे लिहीला आहे, त्याविषयी दोन मुद्दे लक्षात घेतले पाहिजेतः १. ही शाळा फक्त डिप्लोमॅट लोकांच्या मुलांसाठी असल्यामुळे त्या मुलांना खात्री असणार की आपले कोणी काहीही बिघडवू शकत नाही. (अर्थात गोर्‍या आणि काळ्या 'अमेरिकन' मुलांच्या अभ्यास आणि अन्य विषयातील कामगिरीबद्दल लिहीलेच आहे) २. दुसरे म्हणजे तिथली मूळची अमेरिकन कला-शिक्षिका दीर्घ सुट्टीवर अमेरिकेत गेली होती, तेवढा काळच मी तिथे काम केले होते. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या (गोर्‍या आणि काळ्या 'अमेरिकन') मुलांनी मुद्दाम माझी फजिती करावी म्हणून विविध प्रयत्न केले असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे युरो-अमेरिकन शिक्षणक्रम्/व्यवस्था उत्तम असावी, परंतु विद्यार्थ्यांची उदासीनता, चुकीच्या सवयी, जन्मापासून मिळणारे अतिस्वातंत्र्य (कारण जन्मापासूनच मुले सर्व सुखसोयी, खेळणी, टीव्ही वगैरे असलेल्या त्यांच्या वेगळ्या स्वतंत्र खोलीत रहातात, जिथे आई-वडील सुद्धा 'नॉक' करून आत जातात वगैरे) तिकडल्या मुलांना हल्ली आजोबा-आजींचा सहवास तर सोडाच, बरेच जणांचे आई-बाप सुद्धा विभक्त झालेले असल्याने त्यांचाही धड सहवास मिळत नसतो. त्याचाही मुलांवर प्रतिकूल परिणाम झालेला असतो. फुकट असलेल्या शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षण फार कमी मुले घेतात (विशेषतः अमेरिकेत) याचे माझ्यामते मुख्य कारण म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण महाग असते, आणि बहुतांश पालक (मुळात दोघे अद्याप एकत्र रहात असले तर) तो खर्च करायला तयार नसतात. मुलेही वेगळी राहू लागलेली असल्याने काहीतरी काम करून स्वतंत्र मिळकत करत शिक्षण घेणे सगळ्यांनाच जमत नसते. ... याउलट भारतीय पालक मुलांची शिक्षणे, त्यांची लग्ने लावून देणे, मुली-सुनांची बाळंतपणे, नातवंडांना सांभळणे, गरजेच्या वेळी मुलांना आर्थिक सहाय्य करणे, परदेशात शिक्षणासाठी मुलांना पाठवताना आपले घर गहाण ठेऊन मोठे कर्ज डोक्यावर घेणे, वगैरे सगळे (इथे विविध प्रतिसादात प्रतिपादिलेल्या भयंकर, घाणेरड्या परिस्थितीत राहूनही) करत असल्याने मधे खंड न पडता निश्चिंततेने मुलांचे सगळे शिक्षण पार पडत असते. ( वर लिहीलेले सगळे आम्ही स्वतः केलेले आहे, आणि बहुसंख्य भारतीय करतच असतात, त्यात विशेष वेगळे असे काही नाही) असो. खुद्द अमेरिकेतील (आणि फ्रान्स मधील) शाळांमधे काय परिस्थिती असते, या विषयी माहिती माझ्या मुलांना विचारून मी सांगू शकतो. ज्यांना याबद्दल कुतूहल असेल, त्यांनी आपापले प्रश्न इथे विचारावेत, म्हणजे त्यांची व्यवस्थित उत्तरे देता येतील.

In reply to by चित्रगुप्त

काका तुमचे सर्वच प्रतिसाद आवडले. कृपया फ्रान्समधील शाळांबद्दल सुद्धा अशीच माहिती वाचायला आवडेल. अमेरिकेत बरेच नातेवाईक, मित्रमंडळी असल्यामुळे ही माहिती बर्‍यापैकी होती पण फ्रान्सबद्दल मात्र कुतुहल आहे.

In reply to by चित्रगुप्त

तुमच्या विस्तृृत प्रतिसादामुळे बरीच माहिती कळली. खुद्द अमेरिकेतील (आणि फ्रान्स मधील) शाळांमधे काय परिस्थिती असते, या विषयी माहिती माझ्या मुलांना विचारून मी सांगू शकतो. ज्यांना याबद्दल कुतूहल असेल, त्यांनी आपापले प्रश्न इथे विचारावेत, म्हणजे त्यांची व्यवस्थित उत्तरे देता येतील. हो मला उत्सुकता आहे याबद्दल. भारतात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या व अमेरीकेत काम मिळवणे (जॉब) जास्त संघर्षाचे आहे? की अमेरीकेतील/परदेशी भारतीयांच्या मुलांना तीथेच शिक्षण घेऊन जास्त चांगल्या प्रतीचा जॉब मिळतो/संधी जास्त आहेत का? अमेरीकेतील/परदेशातील शिक्षण घेत असताना किंवा एकंदरीतच समाजव्यवस्थेत मिळणारी अतीमोकळीक तेथील विद्याथ्यांमध्ये अधीक ात्मविश्वास निर्माण करते का? हे चांगले आहे की वाईट? माझ्या मावसबहिणीला तीच्या २ मुलांसह काही काळ अमेरीकेत राहावे लागले. मुले थोडी मोठी (३-4थीची)झाल्यावर तीने भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला कारण तीचेे म्हणणे होते अमेरीकेतील शिक्षण भारताच्या तुलनेत सोपे आहे. इथल्या पहिलीच्या मुलाला जेवढे येते तीथे तीसरी्च्या मुलालाही येत नाही . तेथील अभ्यासक्रम सोपा आहे. विशेषत: गणित विषयाबाबत ती जास्त चिंतेत होती. तीच्या मुलांना इथे काही वर्ष जड गेले कारण तीकडे त्यांचे शिक्षण कमी झाले होते असे तीचे म्हणणे. याबद्दलही समजले तर बरे होईल. धन्यवाद

In reply to by श्वेता२४

भारतात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या व अमेरीकेत काम मिळवणे (जॉब) जास्त संघर्षाचे आहे? की अमेरीकेतील/परदेशी भारतीयांच्या मुलांना तीथेच शिक्षण घेऊन जास्त चांगल्या प्रतीचा जॉब मिळतो/संधी जास्त आहेत का? अमेरिकेतील मुलांना तेथेच शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळविणे जास्त सोपे आहे. अमेरीकेतील/परदेशातील शिक्षण घेत असताना किंवा एकंदरीतच समाजव्यवस्थेत मिळणारी अतीमोकळीक तेथील विद्याथ्यांमध्ये अधीक ात्मविश्वास निर्माण करते का? होय. तीचेे म्हणणे होते अमेरीकेतील शिक्षण भारताच्या तुलनेत सोपे आहे. इथल्या पहिलीच्या मुलाला जेवढे येते तीथे तीसरी्च्या मुलालाही येत नाही . तेथील अभ्यासक्रम सोपा आहे. विशेषत: गणित विषयाबाबत ती जास्त चिंतेत होती. निदान गणिताच्या बाबतीत तरी हे खरे नाही. माझे काही विद्यार्थी भारतातून ९ वीत असतानाच ते अमेरिकेत गेले. अमेरिकेत ९ वी च्या अभ्यासक्रमातच Trigonometry, Calculus असे विषय होते जे भारतात ११ वी/१२ वीत असतात. साहजिकच आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, ब्राझीलची माहिती असले, नायजेरियातील पिके असले निरूपयोगी विषय त्यांच्या अभ्यासक्रमात फारसे नसतात. त्यामुळे फालतू सनावळ्या, ब्रिटन व फ्रान्समधील सप्तवार्षिक युद्ध (हा प्रकार भारतीय विद्यार्थ्यांनी का शिकायचा हे मला आजतागायत समजले नाही), पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीवर लादलेल्या तहाच्या अटी (हे सुद्धा भारतीय मुलांना का शिकवितात हे समजत नाही), नायजेरियातील पिके, तीन-चार भाषा असला निरर्थक, निरूपयोगी प्रकार शिकण्यात मुलांचा बहुमूल्य वेळ वाया जात नाही. अमेरिकेन मुले तोंडी गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी इ. प्रकारात दुर्बल आहेत हे नक्की. परंतु भारतातील सध्याची पिढी सुद्धा या प्रकारात दुर्बल आहे हे मी स्वानुभवातून सांगतो.

In reply to by श्रीगुरुजी

टिपीकल भारतीय कुटुंबांमध्ये असलेली गप्प बसा संस्कृती आणि केवळ वयाने कोणी मोठा आहे या कारणावरून त्या व्यक्तीला मान द्यायचा, त्याच्यापुढे बोलायचे नाही असले प्रकार पाश्चिमात्य देशात नसतात हे त्या समाजासाठी नक्कीच चांगले आहे. अशाप्रकारचे स्वातंत्र्य आपल्याकडेही यावे असे फार वाटते.
अमेरिकेन मुले तोंडी गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी इ. प्रकारात दुर्बल आहेत हे नक्की.
यावरून नेहमी रामकृष्ण परमहंसांची (की त्यांच्या नावाने खपवली गेलेली) गोष्ट आठवते. एक योगी त्यांना भेटायला गेला आणि त्याने पाण्यावरून चालून दाखवलं. त्याचे रामकृष्ण कौतुक करतील अशी त्या योग्याची अपेक्षा होती पण ते त्याविषयी काहीच बोलले नाहीत. तेव्हा शेवटी त्या योग्याने विचारले- मी आयुष्यातील ३० वर्षे खर्च करून एवढी कठीण साधना करून ही विद्या मिळवली आहे त्याचे तुम्हाला काहीच वाटत नाही का? त्यावर रामकृष्ण परमहंस म्हणाले- तू तुझ्या आयुष्यातील ३० वर्षे विनाकारण व्यर्थ दवडली आहेस. इतकी वर्षे घालवून काय मिळवलेस? तर पाण्यावरून चालायचे कौशल्य. नौकेत बसलास तरी तू या तीरावरून त्या तीरावर जाऊ शकशीलच. मग तू इतकी वर्षे खर्च करून वेगळे काय मिळवलेस? त्याप्रमाणेच कॅल्क्युलेटर वापरून (किंवा गेलाबाजार हाताने गुणाकार-भागाकार करून) काही सेकंदात उत्तर काढता येत असेल तर मग तोंडी या गोष्टी करता येणे हे मोठे कौशल्याचे काही आहे का? मलाही शाळेत असताना अशी आकडेमोड तोंडी भराभर करता यायची- बर्‍याच अंशी अजूनही येते. पण त्यातून झाले असे की आपण गणितात खूप मोठे डॉन आहोत असे मला वाटायला लागले होते. खरं गणित म्हणजे आकडेमोड नाहीच तर कॅल्क्युलस हे खरं गणित आहे हे खूप उशीरा कळले. डीवाय बाय डीएक्स ऑफ एक्स^२ = २ एक्स अशाप्रकारे घोकंपट्टी करणे हे गणित समजल्याचे लक्षण नक्कीच नाही. लिमिट, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन वगैरेंमध्ये नक्की काय चालू असते याचा पत्ता कोणाला नसतो. मॅक्सिमा काढताना पहिले डेरिव्हेटिव्ह शून्य आणि दुसरे शून्यापेक्षा कमी हे कशावरून येते हे समजावून सांगणारे शिक्षक कमीच असतात. नुसते घ्या फॉर्म्युले आणि काढा उत्तरे यावर आपल्या शिक्षणपध्दतीचा भर असतो. आपल्या लोकांनी शिक्षणपध्दतीत अगदी सावळागोंधळ घातला आहे हे नक्कीच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

खरं गणित म्हणजे आकडेमोड नाहीच तर कॅल्क्युलस हे खरं गणित आहे
(सदर धाग्यावर अप्रस्तुत न वाटल्यास) अधिक जाणून घ्यायला नक्की आवडेल. - (ढ, मठ्ठ, गाढव विद्यार्थी) वामन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

त्याप्रमाणेच कॅल्क्युलेटर वापरून (किंवा गेलाबाजार हाताने गुणाकार-भागाकार करून) काही सेकंदात उत्तर काढता येत असेल तर मग तोंडी या गोष्टी करता येणे हे मोठे कौशल्याचे काही आहे का? मलाही शाळेत असताना अशी आकडेमोड तोंडी भराभर करता यायची- बर्‍याच अंशी अजूनही येते. पण त्यातून झाले असे की आपण गणितात खूप मोठे डॉन आहोत असे मला वाटायला लागले होते. खरं गणित म्हणजे आकडेमोड नाहीच तर कॅल्क्युलस हे खरं गणित आहे हे खूप उशीरा कळले. जलद आकडेमोड कोणत्याही अभ्यासक्रमात, विशेषतः स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे कौशल्य आहे. मला गुणाकार, भागाकार, बेंरजा, वजाबाक्या (अर्थात फार मोठे आकडे नसले तर) बऱ्यापैकी जलद तोंडी करता येतात व अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये याचा खूप फायदा झाला आहे. विशेषतः वेगवेगळ्या आकड्यांमधील परस्परसंबंध, वर्ग, घन अश्या प्रकारातील नातेसंबंध यामुळे समजतात.

In reply to by श्रीगुरुजी

जलद आकडेमोड कोणत्याही अभ्यासक्रमात, विशेषतः स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे कौशल्य आहे.
याचे कारण स्पर्धा परीक्षांमध्ये त्यावरील प्रश्न विचारतात. आकडेमोड हे गणितच असले तरी गणितात त्यापेक्षा कितीतरी जास्त महत्वाच्या आणि अधिक उपयुक्त संकल्पना आहेत. इंजिनिअरींगच्या बर्‍याच शाखांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सेकंड ऑर्डर डिफरन्शिअल इक्वेशन्स हा पाया आहे त्यावर इतर सगळे अवलंबून आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगमध्ये लाप्लास ट्रान्स्फॉर्म मोठ्या प्रमाणावर लागतात. पुढची प्रगती झाली आहे ती सगळी कॅल्क्युलसवर आधारीत आहे. आकडेमोड हा त्यामानाने बराच सिंप्लिस्टिक प्रकार आहे. अमेरिकन विद्यापीठांमध्ये मास्टर्स पातळीवर कॅल्क्युलसवर खूप भर देतात. मला तिथे असताना तो विषय इतका महत्वाचा आहे हे कळले. कॅलक्युलसमधील डायव्हरजेन्स, ग्रेडिएंट आणि कर्ल या संकल्पना खूप महत्वाच्या आहेत. त्याच संकल्पना मी इंजिनिअरींगला असताना ऑप्शनला टाकल्या होत्या :) अमेरिकन विद्यापीठांमध्ये एखादी अशी महत्वाची संकल्पना ऑप्शनला टाकली तर विषय निघणारच नाही असा पेपर काढतात. आपल्याकडे तसे व्हायला हवे. बाकी स्पर्धा परीक्षांमध्येही नुसत्या आकडेमोडीवर आधारीत प्रश्न कमी झाले आहेत. २०००-२००१ सालापर्यंत कॅट परीक्षेत २ तासात २०० प्रश्न सोडवायचे असत आणि ती परीक्षा त्यावेळी वेगावर आधारीत होती. डेटा इंटरप्रिटेशनमध्ये वेगवेगळ्या आलेखांमधून मोठ्यामोठ्या आकडेमोडींवर आधारीत प्रश्न विचारत असत. पण आता डेटा इंटरप्रिटेशनमध्येही प्रश्न आकडेमोडीवर नाही तर अधिक 'लॉजिकल' असतात.

In reply to by श्वेता२४

> अमेरीकेतील शिक्षण भारताच्या तुलनेत सोपे आहे ह्यांत तथ्य नाही. शाळा विविध प्रकारच्या असतात आणि प्रत्येक शाळेचा अभ्यासक्रम वेगळा. लेखन आणि वाचन हे आपले असे एक विषय आहेत जे इथे शिकवले जातात. भारतीय शाळांत लेखन आणि वाचन ह्यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित केले जात नाही. टेक्सस आणि कॅलिफोर्निया च्या शाळेच्या अभ्यासक्रमाशी माझी चांगली ओळख आहे. गणिताच्या बाबतीत अमेरिकन दहावीत कॅल्क्युलस, प्रोबॅबिलिटी इत्यादी विषय शिकवले जातात. खाजगी शाळांत तर जास्त खोलांत जाऊन शिकवले जातात. प्राथमिक शाळांत जास्त शिकविण्यापेक्षा मुलाच्या बेसीक्स वर जास्त भर दिला जातो.

In reply to by चित्रगुप्त

आपला मुद्दा १ आणि २ हे बरोबर असावेत अमेरिकेबाहेरील दूतावासासाठी चालविलेली अमेरिकेबाहेरील शाळा आणि नेटिव्ह अमेरिकेतील शाळा याची कशी काय तुलना होऊ शकते चित्रगुप्तजी ? कोणी आपला हा लेख वाचला तर त्यानं हे असेच सगळ्या पाश्चिमात्य शाळेत चालते असे वाटेल .. जर एवढी बेशिस्त शाळा पाश्चिमात्य देशात असेल तर पुढे जाऊन हा पाश्चिमात्य समाज बऱ्यापकी यासास्वी कसा काय होतो? येथील शाळेतील एक वाचलेली मुख्याध्यापकाचे पत्र शाळा सरकारी खाजगी नव्हे येथेही शिस्त आहे हो ती काय एकटी भारतात आहे असे नाही Other information Now is the time to fix hair, piercings, eye lash extension, jewellery etc so that when you return to school you meet school uniform requirements e.g. look natural, neat, tidy and conservative in presentation. Requirements include: · Make up and eye lash extensions are not allowed Nails – clear polish only, safe length & no artificial nails Piercings – lower ear lobes only Earrings – one pair of small, fine, plain round silver or gold sleepers or studs Tattoos – not allowed Watches – functional rather than decorative (a reminder any cellular device e.g. smart watch that functions as a mobile phone will be treated as per phones) Other jewellery – not allowed Hairstyles – natural colour, no dramatic differences in colour - Tied up if it touches the collar using a plain band & school ribbon, at the base of the neck so that the hat can be worn correctly - Off the face - Minimum number two blade, no tracks, undercuts or dramatic differences in length between top and sides of the hair - Shaving – students must always be clean shaven - Sideburns are to be no longer than half-way down the ear. Exemptions from above may be granted on medical, religious or cultural grounds but must be supported by appropriate documentation on application to your year level Deputy. The theme for this year is ‘Together we grow’ and I am looking forward to seeing you all next week, ready to continue your learning and to make the most of the amazing experiences you will have access to at Mansfield this year.

गेल्या महिन्यात भारतात गेलो होतो तेव्हा एका नामांकित बदनाम बँकेचा अतिशय वाईट अनुभव आला. माझ्या पत्नीचे NRE अकाउंट आहे तिकडे. ३ वर्षे भारतात जाऊ न शकल्यामुळे बरीच कामं करायची होती बँकेची. १ल्यांदा गेल्यावर काउंटरवरच्या बाईंनी सांगितलं काय काय आणा ते. दुसऱ्या दिवशी घेऊन गेलो आणि जी काय कामं करायची होती त्या सगळ्याचे अर्ज दिले. ती जे काय मागेल ती सगळी कागदपत्रं आम्ही आणली होती. त्यावरूनच ती बाई वैतागली की आता झक मारत काम करावं लागेल. आमच्या पुढच्या माणसांची परिस्थिती आम्ही बघत होतो. प्रत्येकाला अमुक नाहीये घेऊन या असा म्हणून त्या माणसांनी जे काही कागदपत्रं असेल ते आणलं की, मी हे नव्हतं सांगितलं, तमुक घेऊन या असले प्रकार चालले होते. माणशी १ तास या रेट नी ती बाई काम करत होती. आमचे सगळे अर्ज देऊन झाल्यावर २ आठवड्यांनी आम्ही परत स्टेटस चेक करायला गेलो तर तोंड वर करून म्हणतीये की तुम्ही दिलेले अर्ज हरवलेत. परत द्या. तेव्हा मी आणि पत्नीने पण आवाज चढवला पण परिणाम शून्य. काही जणांना असा वाटूच शकेल की तुलना चालू झालीये, पण इकडे जपानमधल्या बँकेत किंवा सरकारी कार्यालयात कधीही असा अनुभव आला नाहीये. ट्रॅफिकतर विचारूच नका. सिंहगड रोड ला संतोष च्या चौकात संध्याकाळच्या वेळेला चारचाकी चालवून २-३ दिवस कंबर पूर्ण गेली होती. सिग्नल तर अक्षरशः कोणीही पळत नव्हतं. अत्यंत खेदाने नमूद करावंसं वाटतं की ३ वर्षात खूप वाईट परिस्थिती आलीये. मी सिग्नल ला थांबलो तर २-३ दा रिक्षावाल्यांनी आणि अगदी सुशिक्षित दिसणाऱ्या लोकांनी पण मागून येऊन सांगितलं की, अहो कुठे थांबलाय सिग्नलला, चला पुढे! माझ्या एका कलीगनी मागे एकदा निर्णय घेतला की, जपान सोडून भारतात स्थायिक व्हावं. तिकडे गेल्यावर त्याची मुलं तक्रार करायला लागली की, रोज बाजूची मुलं पेन्सिल, पेन, पट्टी चोरतात म्हणून. सगळं फुकट हवं हा अट्टाहास किंवा हव्यास कधी सुटणार? जपानमध्ये १ येन जरी येणं बाकी असेल दुकानदाराकडून तरी तो मिळतो म्हणजे मिळतोच. १ येन ला खरं तर जपानमध्येसुद्धा काहीही किंमत नाहीये. आपल्याइकडे ऍमेझॉन किंवा ऑनलाईन शॉप्पिंगवाले डिलिव्हरी बॉईज ५-१० रुपये पण परत करत नाहीत. असे का बरं? हे प्रश्न नक्कीच पडल्यावाचून राहत नाहीत. परंतु जपानी आयुष्य जवळून बघितल्यामुळे दुसरी बाजू पण खूप जवळून अनुभवता आली. एक तर जपानी माणसं इतकी कोशात राहतात की अडीअडचणीला कोणी बाकीचे पटकन मदत करतील ही गोष्ट जवळपास नाहीच. आणि सतत कुठल्यातरी दडपणाखाली वावरल्यामुळे छान हसून खेळून संवाद फार कमी वेळा साधला जातो. बऱ्याच जणांनी म्हटल्याप्रमाणे डोमेस्टिक हेल्प जवळपास शून्य. सगळीच कामं स्वतःलाच करावी लागतात. कधी कधी खूप कंटाळा येतो पण इलाज नाही. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेतच. म्हणून भारत वाईटच आणि परदेशच चांगला किंवा उलट असं नाहीये.

In reply to by नचिकेत जवखेडकर

तुमचा भारतातील अनुभव सार्वत्रिक आहे. भारतीय समाज किती नालायक आहे याचे उत्तम उदाहरण आहे. जेव्हा परदेशामध्ये भारतीय समाजाबद्दल / प्रवासाबद्दल चर्चा होते तेव्हा असली माहीती दिली जाते. त्यावेळी आपलीच मान शरमेने खाली जाते.

In reply to by नचिकेत जवखेडकर

नचिकेतजी, तुमचा बँकेतला अनुभव फारच वाईट असला तरी तो तितकासा सार्वत्रिक नक्कीच नाही. मुख्य म्हणजे कागदपत्रांची , अर्जाची पोचपावती दिल्यानंतर कागदपत्रे हरवलित हे सांगणे सोपे नाही. खासगी बँकेतला असेल असे वाटत नाही. तुम्ही बँकेचे नाव नमूद करु शकता...

In reply to by नचिकेत जवखेडकर

एका नामांकित बदनाम बँकेचा अतिशय वाईट अनुभव आला या वरून आठवले .. सध्या सोनी लिव्ह वर "पोस्ट ऑफिस उघडे आहे " हि मालिका सुरु आहे ... छान पात्र रचना आणि लिखाण आहे असो हे झाले सरकारी .. खाजगी क्षेत्रात पैसे भरपूर असून सुद्धा "वृत्ती" अजून विचित्र ह्याचे हे उदाहरण आहे ...

भारतातल्या सर्वात जुन्या खटल्याचा अखेर ७२ वर्षांनी लागला निकाल https://www.loksatta.com/desh-videsh/kolkata-high-court-72-year-old-cas…
मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात बँकेच्या लिक्विडेशनला आव्हान देणाऱ्या याचिकांवर दोन वेळा सुनावणी घेण्यात आली होती. मात्र त्यावेळी या तारखांना कोणीही हजर राहिले नव्हते. मात्र आता हा खटला निकाली निघाला आहे.
शेवटी कोणीच हजर न झाल्याने खटला संपला.

re हा काही ग्रामीण भागांतील नाला नाही. दिल्ली मधील नाला आहे. ह्यांत शरमेची बाब नाला साफ नाही केला एवढीच नसून लोकांनी निर्लज्ज पणे त्यांत इतका कचरा फेकला आहे हि आहे.

अमेरीकेतील गरीबी या यूट्यूबमधील विडीओमध्ये अमेरीकेतही काही भागात कशी अस्वच्छता आहे. लोक कसे रस्त्यावर झोपलेले असतात. उंच उंच इमारतींच्या बाजूच्या भागात कशी झोपडपट्टी आहे, आणि हे अमेरीकेतले लोक कधीही इतरांपुढे आणत नाही याचे चित्रण आहे. या विडीओच्या खालील प्रतिसादातूनही याला पुष्टी मिळते. त्यामुळे अमेरीकेतल्या/परदेशातल्या नकारात्मक बाजूंवर प्रामाणिकपणे बाेललात तरच भारतावरच्या टीकेला काही अर्थ आहे.

In reply to by श्वेता२४

भारत कसा सुधारेल हे पाहणे जास्त महत्वाचे नाही का? जर तुलनाच करायची तर अगदीच गरीब आणि नालायक देशांच्या बरोबर ही करता येईल. १. परदेशातील किती टक्के जमिनीवर कचरा असतो आणि भारतातील किती टक्के जमिनीवर कचरा असतो ? २. तुम्ही किती भारतीयांना रस्त्यात / सार्वजनिक जागेवर कचरा टाकताना हटकु शकता ? बहुतेक लोकांना आपण काही चुकीचे करतो आहोत याची जाणिव नसते. असली तर अगदी निर्लज्ज समर्थन करण्यात त्यांना काहीही अडचण नसते, उदा. आम्ही कर भरतो, आमचा हात घाण करणार नाही, तुम्ही कोण सांगणारे ?, ईतरांनी कचरा टाकला मग आम्ही का टाकु नये? सफाई कामगार आहे कचरा साफ करायला. इ. इ. ३. कचरापेट्यांची सुध्दा भारतात चोरी होती. प्रश्न संसाधनांचा नसुन, मनोवृत्तीचा आहे.

In reply to by श्वेता२४

हा तसले व्हिडीओ मी भरपूर पहिले आहेत. कुठलातरी एक भाग निवडून काढायचा आणि जणू काही अमेरिका भारताप्रमाणेच घाण आहे अशी अर्ग्युमेण्ट करायची पण प्रत्यक्षांत अमेरिकेतील ते घाणेरडे भाग सुद्धा बहुतेक करून एखाद्या सर्वसाधारण भारतीय रस्त्यापेक्षा जास्त साफ असतात. अमेरिकेचे सोडून द्या, युक्रेन सध्या युद्धग्रस्त आहे पण तिथली शहरे सुद्धा जास्त टुमदार आणि छान वाटतात. > त्यामुळे अमेरीकेतल्या/परदेशातल्या नकारात्मक बाजूंवर प्रामाणिकपणे बाेललात तरच भारतावरच्या टीकेला काही अर्थ आहे. अमेरिका भारताची तुलनाच शक्य नाही कारण प्रत्येक बाबतीत दोन्ही देशांतील तफावत फारच प्रचंड आहे. त्याशिवाय मुद्दा लोक भारत का सोडतात हा आहे. पण इतर देशांचे सोडून द्या. आम्ही आमच्याच देशाचे पाहू. देशांत सर्वत्र कचरा आणि घाण पसरली आहे हे निर्विवाद सत्य नाही का ? फक्त गरीब प्रदेशांत नाही तर उचभ्रु ठिकाणी सुद्धा लिफ्ट मध्ये पानाची पिंक किंवा आलिशान गाडीतून कचरा बाहेर रस्त्यावर फेकणे इत्यादी गोष्टी अतिशय सर्रास होत आहेत कि नाहीत ? आणि हे नक्की कश्याचे फेल्युअर आहे ? माझ्या मते संस्कृतीचे फेल्यूर आहे. लोकच मुळी असुसंस्कृत आहेत त्याची हि परिणीती प्रत्येक सार्वजनिक ठिकाण उकिरडा बनण्यात होते. हीच दळभद्री मानसिकता फक्त उकिरडे निर्माण करत नाही तर प्रत्येक ठिकाणी समस्या निर्माण करते. स्त्रियांची छेडछाड, बँकेत फसवणूक, गुंडगिरी, मूर्खपणाची व्यक्तिपूजा, इत्यादी गोष्टी शेवटी, ह्याच मागासलेल्या मानसिकतेने होते. उकिरडे फक्त त्याची सिम्टम आहे.

त्याशिवाय मुद्दा लोक भारत का सोडतात हा आहे. केवळ हेच टुमणं लावून धरलंय....... पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते जे तुम्ही आता करत आहात. पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का? हा पण धाग्याचा विषय आहे....... त्याबद्दल पण प्रामाणिक मते येणं गरजेचं आहे.

In reply to by श्वेता२४

> केवळ हेच टुमणं लावून धरलंय....... जी गोष्ट टॅंक मध्ये आहे तीच नळांत येणार तुम्ही कितीहि मागणी केली म्हणून दुसरे द्रव्य येऊ शकत नाही. धाग्याचा मूळ प्रश्न अगदी साफ आहे आणि त्यालाच धरून मी लिहीत आले आहे, तुम्हाला दुसरा विषय चघळायचा असेल तर जरूर दुसरा धागा उघडा आणि तिथे आपण ती चर्चा करू शकतो.

In reply to by श्वेता२४

हा पण धाग्याचा विषय आहे....... त्याबद्दल पण प्रामाणिक मते येणं गरजेचं आहे.
श्वेताजी प्रतिसाद आवडला. तिकडे दुसर्‍या एका प्रतिसादात कुणीतरी अमेरिकेतील गोळीबाराचा विषय काढला त्यावरही मग अमेरिकाप्रेमींचे मौन !!

भारताच्या तुलनेत,................ जर तुम्ही भारताबाहेर रहात असाल तर भारतात परतणे हा सर्वात शेवटचा पर्याय असेल. भारताला रहाण्या योग्य करायचे असेल तर म्हणजे भारतात रहाणार्या लोकांच्यां सवयीत, वागण्यात अमुलग्र बदल घडवावे लागतील. ते नुसत्या तोंडी सांगुन येणार नाहीत. त्यासाठी शालेय शिक्षणापासुनच त्याचा पाया मजबुत करावा लागेल. पण योग्य बदलासाठी योग्य पर्याय जनतेला द्यावे लागतील. ज्या देशात पॅसेंजर ट्रेन मधल्या टॉयलेट मधुन स्टीलचे टमरेलच चोरी होत असेल तिथे तुम्ही काय पर्याय देणार तिथे कडक शिक्षा व्हावी. कडक शिक्षा ही फक्त टमरेल चोरालाच नसुन त्याच्या कडुन चोरीची वस्तु विकत घेणार्याला कत्येक पटीने जास्त कड्क शिक्षा व्हावी. अमेरीकेत भारतातील आंबे, ईंग्लंड मध्ये भाजीपाला निर्यात होत नाही, कारण भारतातल्या भाजीपाल्यात व आंब्यात केमिक्ल्स आढळतात. अशी केमिकल्स जिवाला हानीकारक असतात. पण हाच भाजीपाला भारतीय खातात कारण त्यांना दुसरा पर्याय नाही. काही शेतकरी स्वःतासाठी वेगळा भाजीपाला पिकवतात ( केमिकल्स नसलेला) आणि बाजारासाठी वेगळा भाजीपाला पिकवतात ( किटनाशक वापरलेला) असे एकले होते, अशी ही उदाहरणे बघीतली आहेत, पण आज परिस्थिती बदलताना दिसत आहे. भारतात अनेक ठिकाणी आता लोकली सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली फळे भाज्या उपलब्ध होताना दिसत आहेत. केरळात असा बाजार काही तासात रिकामा होतो. मुंबईतही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली फळे भाज्या आता उपलब्ध होताना दिसतात आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल, कारण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली फळे भाज्या हातोहात विकल्या जातात, जाहिरात करण्याची ग रज पडत नाही. सेंद्रिय पद्धतीने फळे भाज्या पिकवणे तितके सोप्पे मात्र नाही कारण जे केमिकल्स वनस्पतीच्या आत येतात ते जमिनीतुनच येतात. वनस्पतीवरुन केलेला किटनाशकांचा फवार्यामुळे वनस्पती वर केमिकल्सचा थर होतो पण तो वनस्पती धुतल्याने बराच कमी होतो. भारतातील शेतीत अनेक वर्षांच्या किटनाशकाच्या मार्यातुन जमिनीत केमिकल्सचे प्रमाण अतोनात वाढलेले आहेत. अश्या जमिनीला केमिकल्स विरहीत करण्यासाठी जमिनीत पुन्हा सुक्ष्म जीवजंतु तयार होणे आवश्यक असते, असे जीव जंतुच केमिकल्सचा निचरा करतात. गांडूळ, शेणापासुन तयार झालेल्या जीवामृताने सुद्धा असे घडु शकते. भारतीयांना उघड्यावर शौच करायची सवय असते कारण त्यांना पर्याय नसतो. कारण संडास बांधायला लागणार्या पैश्यातुन अजुन अनेक महत्वाची निकडीची कामे होऊ शकतात त्यामुळे संडासाला प्राथमीकता मिळतच नाही. संडास नसलेल्या घरातील स्त्रीयांच्या परिस्थितीची कल्पनाही करवत नाही. पण आता घरातील स्त्रीयांनीच संडासाची मागणी लावुन धरल्याने व सरकारने त्यावर योजना आणल्याने परिस्थितीत वेगाने बदल होत आहे. उघड्यावर शौच केल्याने नगर पालिका वेगवेगळ्या प्रभावी जंतुनाशकांचा वापर करत असते आणी अशी जंतुनाशके पाण्यातुन जमिनीत जातात, आणि तिथुन वनस्पतीत आणि शेवटी आपल्या जेवणात शिरतात. काही दशकापुर्वी महाराष्ट्रातच एका केमिकल्स बनवणार्या एका कंपनीने त्या कंपनीत निर्माण होणार्या प्रदुषित पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याएवजी प्रदुषित पाणी खोल जमिनीत पंप केल्याप्रकरणी अटक झालेली होती. खोल जमिनीत प्रदुषित पाणी पंप करुन आपण असंख्य लोकांच्या जिवना शी खेळत आहोत ह्याचे भान अश्या कंपनीला का नसावे ? आपण काय करतो त्याचे दुरागामी व निकटच्या भविष्यात काय काय परिणाम होतील ह्याचा विचार होताना दिसत नाही. प्रदुषित पाणी प्रक्रिया करुन शुद्धीकरण करुन वापरण योग्य असल तरीही ते परवडण्यासारख असेलच अस नाही, उलट ते खुपच महाग असत. केमिकल्स झोन मध्ये सरकार द्वारे असे STP प्रकल्प चालवले जातात, पण केमिकल्स तयार करणार्या कंपन्यांना अश्या STP प्रकल्पा चा वापर करणे परवडणारे असावे. भारतात तसेच बाहेर च्या देशात भारतीय मनोवृत्तीचे अनेक अनुभव आलेले आहेत. एकदा भारतात फिरायला गेलेलो असताना, शोधुनही डस्टबीन न मिळाल्याने चिप्सच्या रिकाम्या पॅकेट हातात घेऊन फिरवत असताना अचानक बायकोच्या वडीलांनी हातातले चिप्सचे रिकामे झालेले पॅकेट जमिनीवर भिरकावले , मी फक्त बघत राहीलो , काहीही बोलु शकलो नाही. अजुन एकदा दुबईच्या विमान तळावर प्रवास करतानाचा अनुभव, एका सहप्रवाश्याला हातातल्या सामानात जड व मोठी बॅग असल्याने कारणाने विमानात नेऊ दिले नाही. त्या प्रवाश्याच्या समोरच विमान सेवेच्या कर्मचार्याने एका मोठ्या प्लास्टीकच्या बॅगेत त्याची बॅग भरली व केबल टायने बंद केली व घेऊन गेला. मुंबईत उतरल्यावर सामानाच्या सरकत्या पट्यावरुन त्या सह प्रवाश्याने आपली बॅग उचलली जी प्लॅस्टिकच्या बॅगेच्या आत होती. त्या सह प्रवाश्याने ती प्लॅस्टिकच्या बॅग तिथेच फाडली, आपली बॅग बाहेर काढली, ती प्लॅस्टिकच्या बॅग तिथेच टाकली व आपली बॅग घेऊन तिथुन निघुन गेला. हेच प्रकरण जर दुबईत घडत असत तर हाच सहप्रवासी ती फाडलेली प्लॅस्टिकच्या बॅग तिथेल्या तिथे टाकुन देण्याएवजी डस्टबिन शोधुन त्यामध्ये काळजी पुर्वक ती प्लॅस्टिक बॅग घालुन मगच तिथुन गेला असता.

In reply to by डँबिस००७

जर तुम्ही भारताबाहेर रहात असाल तर भारतात परतणे हा सर्वात शेवटचा पर्याय असेल.
पण अनेक लोक २ ते ५ वर्षे परदेशी राहून भारतात परततात. काही लोक तर याहुन अधिक काळ राहूनही भारतात कायमचे परततात. असे एक उदाहरण मी वर एका प्रतिसादात लिहिले आहे. तुम्ही भारतात आहात की परदेशात ? परदेशात असल्यास भारत सोडण्याचा निर्णय घेतलात तेव्हा तुमच्या प्रेरणा काय होत्या ? धाग्याच्या विषयाला अनुसरुन स्वत: भारत कायमचा सोडण्याचा वा भारतात परतण्याचा वा भारत न सोडण्याचा असा कुठलाही निर्णय नेमका का घेतला याबद्दल प्रतिसादकर्त्यांनी लिहिल्यास चर्चा नेमकेपणाने होवू शकेल. थोडक्यात प्रतिसादकर्त्यांनी स्वतःबद्दल आधी सांगावे हे मी सुचवेन

In reply to by साहना

मलाही असाच अनुभव आला आहे. काही परदेशी भारतीय, भारतातील चित्रपट चित्रपटगृहात लावत असत. त्यावेळी तिथे घाण करणे, खुर्च्या मोडणे, लहान मुलांनी खाऊन उलटी करणे, गोंधळ करणे असले प्रकार झाले. शेवटी त्या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकाने भारतीय लोकांचे चित्रपट लावणे बंद केले. आता तेच भारतीय वंशदेव्षाच्या नावाने रडगाणे गात असतात.

भारतात वीज जाते, अमेरिकेतही वीज जाते. अमेरिकेत वर्षात फार तर कधीतरी १ तास वगैरे वीज नसते. भारतात बहुसंख्य रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत.. अमेरिकेत क्वचितच इतका वाईट रस्ता दिसतो. भारतात अगदी खालच्या थरापासून लाचखोरी सुरू होते, प्रत्येक पावलावर लाच द्यावी लागते. अमेरिकेत खालच्या थरावर शून्य लाचखोरी आहे. बलात्कार, खून वगैरे प्रकार भारतात आहेत व अमेरिकेतही आहेत. परंतु अमेरिकेत आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही व खटले खूप कमी कालावधीत संपून गुन्हेगारांना शिक्षा होते. भारतात बरोबर उलटी परिस्थिती आहे. भारतात पुढाऱ्यांनी, उच्चपदस्थांनी केलेल्या गुन्ह्यांना संरक्षण असते. भारतात नेते विरोधकांना पकडून घरात आणून बेदम मारतात आणि तरीही मोकळे असतात. अमेरिकेत बरोबर उलट परिस्थिती आहे. अश्या अनेक गोष्टी आहेत..

In reply to by श्रीगुरुजी

+१ भारतातील व्यवस्था कायदा पाळणार्यापेक्षा तोडणार्‍यांना जास्त पुरक आहे. वरती जे भारतीय व्यवस्थेबद्दल गौरवोद्गार काढत आहे त्यांनी कधी व्यवहारात अनुभव घेतले आहेत की नाही त्याची शंका येते.

आता चर्चेला जोर चढु लागला आहे. बर्‍याच लोकांची समाज, सामाजिक मुल्ये आणि कायदा व्यवस्था यांच्यात गल्लत केली आहे. त्या गोष्टी एकमेकांशी संबधित असल्यातरी एकच नसतात. आणि अमेरीका म्हणजेच परदेश नाही. मी अगदी मलेशियात लोक जाताना बघितले आहे.

अजून एक म्हणजे हे विदेशातून येणारे विदेशी NRI / नागरिक याना भारतीय डॉक्टर बिल कमी लावतात ना ? काही वेळा तर खाजगी रुग्णालयात पण त्यांच्यावर फुकट उपचार करावे लागतात ना ? मी ऐकले कि कोणीही विदेशी आला कि त्याला शोधणे आणि स्वस्तात / फुकट उपचार करणे हि हॉस्पिटल / डॉक्टर ची जबाबदारी असते असा नुकसानीत बिझनेस का करावा ? का करतात ?

अजून एक म्हणजे हे विदेशातून येणारे विदेशी NRI / नागरिक याना भारतीय डॉक्टर बिल कमी लावतात ना ? काही वेळा तर खाजगी रुग्णालयात पण त्यांच्यावर फुकट उपचार करावे लागतात ना ? मी ऐकले कि कोणीही विदेशी आला कि त्याला शोधणे आणि स्वस्तात / फुकट उपचार करणे हि हॉस्पिटल / डॉक्टर ची जबाबदारी असते असा नुकसानीत बिझनेस का करावा ? का करतात ?

In reply to by ताजे प्रेत

भारतात विदेशाहून - म्हणजे अगदी अफगाणीस्तान मोरोक्को वगैरे मधून सुद्धा - उपचारासाठी आलेल्या तिकडल्या नागरिकंचा (अर्थातच वशिल्याच्या, उच्च श्रेणीतील लोकांचा) वैद्यकीय खर्च तिकडले सरकार/विमा कंपन्या करत असतात, त्यामुळे त्यांना वैयक्तिक रीत्या इथे अगदी कमी वा शून्य पैसे भरावे लागतात. (ही माहिती माझा मुलगा पूर्वी दिल्लीत अपोलो हॉस्पिटलात काम करायचा, त्याने सांगितलेली आहे) अशा मोठ्या महागड्या इस्पितळांजवळ ज्यांची घरे, फ्लॅट वगैरे असतात, त्यांना काही दिवसांसाठी आलेल्या या रुग्णांच्या कुटुंबियांना खोल्या भाड्याने देऊन भरपूर रक्कम उकळता येते वगैरे.

In reply to by ताजे प्रेत

हे मी पहिल्यांदाच ऐकत आहे. कृपया जास्त माहिती द्या. लोकांचा फुकट उपचार भारतीय खाजगी इस्पितळें का करतील ?

In reply to by ताजे प्रेत

हे विदेशातून येणारे विदेशी NRI / नागरिक याना भारतीय डॉक्टर बिल कमी लावतात ना ? हि अजब माहिती तुमहाला कोणी दिली? शक्यच नाही! आधी एक लक्षात घाई कि दोन प्रकारचे एन आर आई असतात १) भारतीय नागरिक जे परदेशात कायम वास्तव्यास आहेत आणि दुहेरी नागरिक नाहीत २) परदेशी नागरिक जे "ओ सी आय" या प्रकारचे भारतीय नागरिक ( ज्यांना कायमचे भारतात राहता येते / काम करता येते पण मताधिकार नसतो आणि अर्थात निवडणुकीला उभे राहत येत नाही ) उलट असे आहे कि जे २) प्रकारचे "ओ सी आय" आहेत त्यानं भारतात पदवी साठी ५ पट शुल्क आकारले जाते .

अमेरीकेतील शिक्षण भारताच्या तुलनेत सोपे आहे ऑस्ट्रेलियातील उत्तर चालेल का ? सुरवातीचं काळात ६,७ वि पर्यंत तसे आपण म्हणून शकतो , हि वर्षे घोकंपट्टी वर भर कमी असतो आणि अभ्यासक्रम जरी ठरलेला असतो तरी "पाठपुस्तकाप्रमाणे आज हा धडा " असे कमी व शिक्षकाला स्वतःच्या पद्धती प्रमाणे शिकवयाला मुभा असते त्यामुळे भारतीय समजला ते थोडे विस्कळीत वाटते ८ वि पासून मात्र १२ वि पर्यंत गणितावर भर असतोच ...तसा नसता तर येथील पदवी कमी किमतीची ठरली असती ( अभियांत्रिकी ) पण तसे नाहीये अर्थात हे सर्व आता खूप बदलेले असावे कारण भारतात शिक्षणात सुद्धा बदल झालेला दिसतोय मूळ फरक असा कि स्वतःहून शोधून काढून शिकणे यावर भर ( नक्की शब्दात हे वर्णन करत येत नाहीये ) एकूण काय भारतात पदवी पर्यंत शिक्षण उत्तम असल्यामुळे आपण जर इतिहासा बघितलात तर साधारण पने पदवी घ्यायला बाहेर फारसे कोणी जात नाहीत तर पद्वियोत्तर ला जास्त जाण्याकडे लोकांचा कल दिसतो

श्री नारायण मूर्ती यांनी भारतीय वृत्तीवर केलेले भाष्य
https://www.loksatta.com/desh-videsh/infosys-founder-narayana-murthy-sa… त्यानंतर भारत आणि चीन यांच्यामध्ये तुलना करत ते म्हणाले, “१९४० मध्ये चीनचा आकार भारताएवढा होता. पण चीनने वर्क कल्चरच्या जोरावर भारतापेक्षा सहापट प्रगती केली. त्यांच्या कामामध्ये प्रामाणिकपणा पाहायला मिळतो.” पुढे नारायण मूर्ती यांनी ‘भारतामध्ये चीनप्रमाणे प्रामाणिकपणाची वृत्ती असायला हवी’ असे विधान केले. भाषण देताना ते म्हणाले, “भारतामध्ये पक्षपात नसलेली संस्कृती असणे आवश्यक आहे. देशाला जलद निर्णय घेत त्यांवर अंमलबजावणी करण्याची आणि त्रासरहित व्यवहार करण्याची गरज आहे. भारतामध्ये कठोर मेहनत करणारे, प्रामाणिक आणि नीतिमत्ता असणारे फार कमी लोक आहे. प्रगती करण्यासाठी यांचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. परदेशातील व्यावसायिकांनी आपल्याकडे गुंतवणूक करावी असे आपल्याला वाटत असेल, तर आपल्याला निर्णय प्रणालीमध्ये त्वरीत बदल करायला हवे आहेत.”
त्यांनी केलेले भाष्य आणि येथील चर्चा बर्याच अंशी समान आहेत.