आजच्या काळात विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्व

राहुल's picture
राहुल in जनातलं, मनातलं
26 Sep 2022 - 8:46 am

वाढत्या घटस्फोटाच्या कारणांमध्ये जोडीदार निवडताना केलेली चूक, स्त्री-पुरुषांमध्ये असलेल्या काही लैंगिक समस्या, कामजीवनविषयक अभ्यासाचा अभाव यांचा समावेश होतो. या सगळ्यावर विवाहपूर्व समुपदेशन हा उपाय ठरतो. जोडीदार निवडताना काय काळजी घ्यावी हे यातून समजते. तसेच सेक्स मधील विविधता, वेगवेगळ्या सेक्स पोजिशन्स यांचीही माहिती मिळते.

विवाहाची तयारी करताना जशी कपडे, दागिने, हॉल याची काळजी घेतली जाते तशी काळजी सेक्स लाईफ चांगले होण्यासाठी घेतली जात नाही हे खेदजनक आहे. विवाहपूर्व मार्गदर्शनामधे स्त्री-पुरुष लैंगिक अवयव व त्याची कार्ये, रचना, आजार, त्याविषयी समज-गैरसमज, HIV, संतती नियमनाची साधने, मानसिक आजार आणि फसवणूक, पहिला सेक्स व त्याविषयीची भीती, भोंदू डॉक्टर, pornography मागील सत्य असत्य काय.? त्यातून काय शिकण्यासारखे आहे?काय नाही? या विषयांवर स्पष्ट माहिती दिली जाते. यामुळे दोघांच्या मनात भीती राहत नाही व पहिला सेक्स देखील यशस्वी करता येतो.
लग्नानंतर देखील परंतु पहिल्या सेक्स आधी ही सर्व माहिती देता येते. मार्गदर्शन हे १००% फायदेशीर ठरते. *पहिल्या रात्री नवविवाहित संभोग मध्ये चुकतातच* हे विधान तितके खरे नाही. सेक्स ची डिटेल माहिती तज्ञां कडून समजुन घेतले की अडचण येत नाही, चुकत नाही.

"पहिल्या रात्री जोश दाखवा" अशा खोट्या जाहिरातीला बळी पडू नका.

- डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)

आरोग्यविचारलेखसल्लामाहिती

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

26 Sep 2022 - 9:03 am | मुक्त विहारि

निरामय कामजीवन ...

डॉक्टर आवरा, शीघ्रपतन होतंय.

प्रसाद गोडबोले's picture

26 Sep 2022 - 11:15 am | प्रसाद गोडबोले

+१

अगदी हेच लिहिणार होतो.
लेखात काहीही विशेष माहीती नाही, नेहमीचे तेच तेच दळण. शिवाय त्या ** मुळे सरळ सरळ व्हऑट्सॅप वरुन कॉपीपेस्ट करुन टाकलेला लेख आहे हेही कळुन येते.
तुम्हाला खरेच काहीतरी लिहायचे असल्यास आधी डॉक्टर कुमार किंव्वा डॉक्टर खरे ह्यांचे लेख वाचा , त्यांच्या लेखनातील माहीतीपुर्ण कंटेंट , लेखनाची शैली वगैरे पहा आणि तसे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा.
तुम्हाला निव्वळ जाहिरातबाजी करायची असल्यास मिपाचा काहीही उपयोग नाही. इथे सर्व विषयातील प्रकांडपंडीत बसलेले आहेत.
मिपावर तुमच्यासाठी पहिली रात्र आहे, त्यांच्यासाठी नाही ;)
=))))

-
पोपशास्त्री
मार्कस ऑरेलियस

कानडाऊ योगेशु's picture

26 Sep 2022 - 7:44 pm | कानडाऊ योगेशु

मिपावर तुमच्यासाठी पहिली रात्र आहे, त्यांच्यासाठी नाही ;)
अगागा. फुटलो.. पार बाजार उठवला तुम्ही तर सर!

अनिकेत वैद्य's picture

26 Sep 2022 - 9:46 am | अनिकेत वैद्य

केवळ समुपदेशनाचे महत्व न सांगता थोडेफार सामुपदेशन केले असते तर बरे वाटले असते.
हा लेख म्हणजे केवळ जाहिरात वाटत असून समस्त मजकूर हा केवळ कॉपी पेस्ट आहे.
किमान व्हॉट्सऍप्प मेसेज मधले स्टार (*) काढून तरी मेसेज टाकत चला.

अनिकेत वैद्य's picture

26 Sep 2022 - 9:50 am | अनिकेत वैद्य

आपण डॉ. असून एका विषयातील तज्ञ आहात हे लेखातील शेवटच्या ओळीवरून कळतंय.
आपली मूलभूत डिग्री आणि तज्ञ विषयातील डिग्री कोणती? आपण त्याचा उल्लेख का करत नाही?
माझ्या माहितीत बहुतेक सर्व डॉ. हे नावापुढे डिग्री लिहितातच.

प्रकाश घाटपांडे's picture

26 Sep 2022 - 11:43 am | प्रकाश घाटपांडे

सहमत आहे.

एका क्रिस्चन सहकार्याचं लग्नं ठरलं तेव्हा त्यास चर्चतर्फे एका सेमिनारला बोलावलं होतं. त्यात लग्न ठरलेली जोडपी आलेली होती.
व्यवस्थितपणे लैंगिक,मानसिक विषयांची माहिती देण्यात आली. मूल होऊ नये यासाठीचे उपाय, सेफ पिरिअड, गर्भधारणा, पाळी येणे/ चुकणे याची सर्व माहिती देण्यात आली. प्रश्नोत्तरे होती.

कार्यक्रम स्तुत्य वाटला.

कपिलमुनी's picture

26 Sep 2022 - 2:21 pm | कपिलमुनी

संग्रही नाहीत . उत्खनन करून शोधण्यात आलेत

NiluMP's picture

26 Sep 2022 - 3:25 pm | NiluMP

The problem with indian parent is they dont want their kids should know anything about sex before marriage but want to give their best performance after marriage.

दिलेली कारणे परदेशात तरी प्रस्तुत नसावीत. तिकडे 'अहं' मुळे घटस्फोट होतात.
आणि भारतातले मुख्य कारण मुलीने माहेरहून 'अपेक्षित'पैसे आणले नाहीत.

कपिलमुनी's picture

26 Sep 2022 - 4:59 pm | कपिलमुनी

दोन फोटो एवढे ही टॅबू नव्हते की उडावेत ..
मिपा अगदीच बाळबोध नाहीये.. फोटोत उत्तेजनार्थ काहीही नव्हते ..
चर्चा चालते पण फोटो नकोत ?? बहुधा मराठी वाचायला न येणारी जर काही जनता असेल तर फोटो बघून चाळवेलं ? अशी शंका संपादक मंडळास आली असावी

काहीही हं श्री !

प्रसाद गोडबोले's picture

26 Sep 2022 - 5:16 pm | प्रसाद गोडबोले

अ‍ॅक्च्युअली फोटो खरेच चांगले होते , तो पैंजणांचा फोटो खरेच सुंदर होता .

अभिजीत अवलिया's picture

26 Sep 2022 - 6:19 pm | अभिजीत अवलिया

+१.
फोटो चांगलेच होते.

@डाॅक्टर,
कृपया विषयावर डिटेलवार लिवा नाहीतर एक लेखमालाच करा म्हणजे सर्व धागे एकत्र सापडतील. चर्चा करायला मिपाकर तयार असतातच.