Skip to main content

ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ४)

लेखक मदनबाण यांनी रविवार, 21/08/2022 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या धाग्याचे २००+ प्रतिसाद झाल्याने हा धागा उघडला आहे. कॉपीवुड ची लोकांनी व्यवस्थित ठासणे सुरु केले आहे, चड्डी सिंग सुपर डुपर फ्लॉप झाल्याचा मला विशेष आनंद झाला आहे. :) जे जे माज करतात त्यांची ठासणे हे सध्या पाहण्यात येत आहे.एक महाफ्लॉप व्यक्तीने [ त्याला अभिनेता म्हणणे इतपत देखील त्याची पत नाही ] लोकांना चक्क धमकावायचा प्रयत्न केला. याच बरोबर दोबारा ला पहिल्या बारीतच घरी पाठवले. या पुढे बॉयकॉट कसे होईल ? तसे करण्यास यश मिळेल का ? याची उत्तरे येत्या काळातच मिळेलच. जाता जाता :- मैने कहा था न, एक दिन मैं हसूंगा तुम रोओगे. :- इति चतुर रामलिंगम :)))

मदनबाण.....


वाचने 34430
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

In reply to by धर्मराजमुटके

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- Anurodh

चायनीज स्पाय शीप Yuan Wang 5 श्रीलंकेत नांगर टाकुन होते, ते शेपटी घालुन पळाले ! या जाहजाच्या श्रीलंकेत येण्याच्या आधी पासुन ते जाण्या पर्यंत ते आपल्याच नव्हे तर जागतिक मिडियाच्या चर्चेत राहिले. या स्पायशिप विषयावर ज्या बातम्या आणि व्हिडियो पाहण्यात आले ते इथे देऊन ठेवतो. India's unique named military satellites acts as shield against Chinese spy ships India's challenge to China: India creates Signal Shield against Chinese Spy Ship Yuan Wang 5 docked at Hambantota port in Sri Lanka याच घटनाक्रमा बरोबर एका विशेष टेस्ट्ची बातमी :- India successfully test-fires VL-SRSAM

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- Anurodh

झारखंडमधील धुमका येथे शाहरुख हुसैन नावाच्या शेजाऱ्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याने झारखंडमधील अंकिता कुमारीचा रविवारी रुग्णालयात मृत्यू झाला. १२वीत शिकणाऱ्या अंकिता कुमारीला एकतर्फी प्रेमामुळे शाहरुख हुसैनने अंकितावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले आहे. अंकिताने गंभीर अवस्थेत पोलिसांना सांगितले होते की, तिचा शेजारी शाहरुख तिला रोज त्रास देत असे. अंकिता कुमारीला यात रस नव्हता. तसे तिने स्पष्ट सांगितले होते. मंगळवारी सकाळी शाहरुख अंकिताच्या घरी गेला, अंकितावर झोपेत असताना खिडकीतून पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

In reply to by वामन देशमुख

यावर इथे एक प्रतिसाद वरील २न्ही प्रतिसांपूर्वी दिला होता, पण त्याला पंख लागले ! आपल्या देशातील महामाचो मिडिया :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tim Tim Timbali - Ravindra Sathe & Anupama Deshpande (Paravtichya Bala)

नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले महाकाय ट्विन टॉवर्स अवघ्या १० सेकंदांमध्ये जमीनदोस्त करण्यात आले आहेत. ९ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे ‘सुपरटेक’ कंपनीच्या मालकीचे महाकाय टॉवर्स पाडण्यात आले आहेत. ‘एपेक्स’ ही इमारत ३२ मजली तर ‘सेयान’ २९ मजल्यांची इमारत होती. https://twitter.com/ani_digital/status/1563815405059055616

शिवसेनेबद्दल(उद्धवसेना) माझे काही मत .. हे मी काही दिवसांपुर्वी लिहिले होते. आता उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडशी युती केली. माझ्या मते ठाकरेंची ही मोठी चूक आहे. ठाकरेंनी काँग्रेस हा एकमेव साथीदार घेवून महाराष्ट्रात पुन्हा शक्ती वाढवली पाहिजे. फक्त जमल्यास भाजप व राष्ट्रवादीतील काही (जे तितकेसे जातियवादी नाहीत) असे नेते फोडण्याचा प्रयत्न करावा. सुमारे दीड महिन्यांपुर्वी केलेले लेखन खाली जसेच्या तसे पेस्ट करत आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- शिवसेना हे नाव वा धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडून पळवले जाईल याची भीती बाळगून त्याबद्दल हळवे होण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी स्वतःहूनच पक्षाचे नाव व चिन्ह शिंदे गटाला देवू करावे. यामुळे शिंदेगट हा शिवसेना म्हणून ओळखला जाईल व भाजपत विलीन होणार नाही. यामुळे सत्तेत असूनही शिंदेगटाचे म्हणजेच नव्या शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहिल्याने युती असूनही भाजपवर नव्या शिवसेनेचा दबाव राहील. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे किंवा अन्य कुणीही या नव्या शिवसेनेचे पक्षाध्यक्ष म्हणून काम पाहतील तेव्हा त्यांना पक्षाध्यक्ष म्हणून पक्षातील नेते व कार्यकर्ते यांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांच्या समस्या, भाजपसोबत जुळवून घेताना नेत्यांना येणार्‍या अडचणी , पुन्हा कधी पक्ष फुटण्याची भीती या व अशाप्रकारच्या पक्षांतर्गत आव्हानांना तोंड द्यावे लागेल. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी नवे नाव , नवे निवडणूक चिन्ह व नवे ब्रीदवाक्य घेवून पक्षाची नव्याने उभारणी करावी. तसेही उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरेंचे व्यक्तिमत्व हे शिवसेनेच्या जुन्या राडा , तोडफोड वा आक्रमक प्रतिमेशी फारसे जुळणारे कधीच नव्हते. त्यामुळे या पितापुत्रांनी संकुचित अर्थाचे विद्वेषावर आधारित हिंदुत्व सोडून नव्या पक्ष उभारणीत अधिक व्यापक , जाती-धर्माच्या बाबतीत सर्वसमावेशक भूमिका घ्यावी पण त्याच वेळी मराठी हिताचा मुद्दा कायम ठेवून त्या मुद्द्यावर शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा नेहमीच दोन पावले पुढे रहावे. तसेच पक्षवृद्धी करताना भाजपतले पंकजा मुंडे , विनोद तावडे या नेत्यांना आपलेसे करावे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेलेत हा उद्धव ठाकरेंचा बेसावधपणा म्हणावा लागेल. पण वेळ पाहून झालेली चुक सुधारावी आणि एकनाथ खडसें बरोबरच रक्षा खडसेंनाही आपल्या नवीन पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. पुढे सत्तेचे राजकारण करताना काँग्रेस या सर्वसमावेशक पक्षाची साथ घ्यावी. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस कितीही शक्तिहीन झालेली असली तरी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आजही पृथ्वीराज चव्हाण , अशोक चव्हाण , प्रणिती शिंदे , अमित देशमुख यांसारखे जनाधार असलेले नेते आहेत. काँग्रेसला योग्य प्रमाणात बळकटी देवून भाजपला राज्याच्या व देशाच्या राजकारणातही काही प्रमाणात शह देता येईल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा एककलमी कार्यक्रम असलेला पक्ष आहे ,त्यासोबत जाणे टाळावे. तसेच काँग्रेसशी युती करुन जरी भविष्यात सत्ता मिळाली तरी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद टाळावे व आदित्य ठाकरेंनीही या पदासाठी कोणतीही घाई करु नये.

In reply to by तर्कवादी

राज असो किंवा उद्धव .. ठाकरे बंधूंना कष्ट करायची सवय अजिबात नाहीये.. त्यातून उठा ची तब्येत तोळा मासा... त्याला हे झेपणार सुधा नाही.. नवीन पक्ष काढायचे सोपे नाही, गावोगाव , प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा फिरावे लागते..आंदोलने करावी लागतात. अजेंडा लागतो .. दुसरी फळी. तिसरी फळी निर्माण करावी लागते.. एवढे मागच्या १४-१५ वर्षात राज ठाकरे ला सहानुभूती , करिश्मा असून जमले नाही... उठा साठी अशक्यप्राय आहे..

In reply to by तर्कवादी

देव करो व तर्कवादी यांचे म्हणणे उठा यांनी ऐकावे अशी प्रार्थना करून मी खाली बसतो. _/\_ (भाजपा व शिंदे यांना "न मागता देव देतो दोन डोळे" असं काहीसं वाटेल.) :)

अंदाज १) शिवसेना पूर्ण अशी नेस्तनाबूत होणार नाही कारण काहीतरी जनाधार आहे आणि ठाकरे ( उद्धव ) असे सहजा सहजी पक्ष देऊन टाकणार नाहीत असा "कुटुंबाची मालकि असलेला पक्ष कोणी देऊन टाकलेला आत्तापर्यंत घडलाय का ? २) २.५ वर्षाने शिंदे गटाला वेगळा पक्ष तरी काढावा लागेल किंवा भाजपात शिरावे लागेल त्या निवडणुकीत वेगळा पक्ष काढला तर संमिश्र यश मिळेल सर्व ४० निवडून येणे कठीण वाटत्ते म्हणजे सेनेचे २ भाग होतील पण उद्धव ( मूळ सेने ) जास्त जग मिळतील भाजपात शिरले तर ४० तिकिटे मिळतील का? काही गळतील ३) राज ठाकरे यांनीही खरे तर शिंदे गटाला सामावून घ्यायला पाहिजे होते आणि बाळासाहेबांसाऱखे रिमोट ने चालवले असते ... तर ! पण खमक्या फडणवीस आणि त्यापमागचे पक्ष बळ/ यंत्र असल्यामुळे राज ची डाळ शिजली नसावी किंवा जेवहा शिंदेंना गरज होती तेव्हा राज् फारसे काही करू शकले नसावेत ( ते स्वतःपण तेवहा आजारी होते बहुतेक?) ४) याचा फायदा जास्त करून पवारांनांच होणार हे दिसतंय ( दुर्दैवाने )

४) याचा फायदा जास्त करून पवारांनांच होणार हे दिसतंय ( दुर्दैवाने )
असहमत. १) मला वाटते २०१४ सालानंतर भाजपा हा ३५% मतदान टक्केवारी ओलांडण्याचा प्रयत्न करतोय. इतर पक्षांतून नेत फोडणे एवढेच त्यावेळेस भाजपा करू शकत होता व ते भाजपाने जेवढे जमेल तेवढे केलेलेही आहे. त्याबद्दल भरपूर शिव्याही खाऊन झाल्या आहेत. पण आहे ते टिकवणे व जमल्यास मोठे होणे यासाठी भाजपा तेवढेच करू शकत होता. पाच पक्षातील राठा यांनी हिदूत्वविरोधी लोकांकडे जाऊन स्वतःला संपवून घेतले होते. उरलेल्या चार पक्षातील एक पक्ष संपवून मोठे होणे हा एक पर्याय होता. त्यासाठी २०१९ साली राष्ट्रवादीची माणसे फोडून राष्ट्रवादी संपविण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. पण शिवसेनाच राष्ट्रवादीबरोबर साटेलोटे करत असल्याने तो प्रयत्न फसला. २) मतदान टक्केवारीनुसार, हिंदूत्वाच्या चढता आलेखाकडे लक्ष न देता, शिवसेनेने केलेली आत्महत्या ही भाजपाला ३५% मतदानाच्या पुढे नेऊन बसवणार आहे. चार पैकी एक पक्ष संपवायचे भाजपाचे मनसुबे आयते सफल झालेले आहेत. प्रथम राष्ट्रवादी की शिवसेना संपवायची हे निश्चीत करता येत नसल्यामुळे, भाजपा हा नेहमी शिवसेना व राष्ट्रवादी यांचेशी फारसे वाकड्यात शिरत नसे. वेळेस पड घेत असे. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. ३) शिवसेनेशी साम व दाम हे दोन प्रयोग करून झाले होते. "साम" हा प्रयोग बाळासाहेब असे पर्यंत यशस्वी होत होता. पण नंतर शिवसेनेची वाढती भूक शमविण्यासाठी "दाम" याचा उपयोग केला. त्यासाठी ८२ नगरसेवक असूनही मुंबई महानगरपालिका शिवसेनेला आंदण दिली गेली. मात्र मविआ स्थापने नंतर नाईलाजाने इडी मार्फत "दंड" व शिंदेगटामार्फत "भेद" यांचा उपयोग सुरू झाला. ३) शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे फडणवीस यांचेकडे सत्ता राहील, पण ते मुख्यमंत्री नसल्याने त्यांना ब्राह्मण असल्याचा त्रास होणार नाही. तसेच अंतर्गत विरोधाचा त्रास होणार नाही. मराठा लॉबी सुध्दा थेट हल्ला करू शकणार नाही. मनातले मुख्यमंत्री मनातली नाराजी व्यक्त कशी करायची याच्या विवंचनेत असतील. त्यामुळे या अडीच वर्षात फडणवीस त्यांच्या कार्यक्षमतेची कमाल मर्यादा गाठू शकतील असे वाटते. ४) राष्टवादीवर आता फारसे अवलंबून रहावयाची गरज नसल्याने यापुढच्या अडीच वर्षात राष्ट्रवादी संपविण्याच्या दृष्टीने मोदी शहांनी जोरकस प्रयत्न केले तर आश्चर्य वाटू नये. आत्तापर्यंत राष्ट्रवादीवर टीका करूनही प्रत्यक्ष त्यांचेवर कोणतीच कारवाई केली गेलेली नाही. तसेच त्यांची लोकं भाजपात आणण्यामुळे पक्षाची प्रतीमा मलीनच झालेली आहे असे अनेक भाजपा प्रेमींना वाटते. मला वाटते २०१४ ते २०१९ पर्यंत हे जे काही केले गेले. त्यावर पडदा टाकण्यासाठी किंवा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादीने केलेला भ्रष्टाचार खणून काढणे एवढेच भाजपाच्या हातात आहे. असे केल्यास भाजपापासून दुरावलेली मते परत भाजपाकडे येऊ शकतील. यासाठी आवश्यक तो अभ्यास शहा यांनी सहकार मंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षात केलेला असावा. तसेच पुढे मागे पीडीपीशी केलेले सख्य व राष्ट्रवादीशी केलेले सख्य हे कसे एकाच साच्यातील आहे हे ही सांगता येऊ शकेल. ५) फक्त यासाठी अनुकूल काळ आला आहे की नाही याची निश्चीती करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या निवडणूकांपर्यंत भाजपा थांबेल असे वाटते. त्या निवडणुकांत यश मिळाल्यास, शिल्लक शिवसेना अस्तंगत होत जाणार याची खात्री पटून, राष्ट्रवादीच्या मागे सहकाराच्या माध्यमातून ससेमीरा सुरू होईल. राष्ट्रवादी संपवून जनाधार आणखी वाढवत नेणे हा यापुढचा टप्पा आखलेला असणार. शेवटी हे सगळे एका सामान्य माणसाचे अंदाज आहेत.

🤣

फडणवीस हा शब्द आलेला असल्याने एक तरी प्रतिसाद नक्कीच येणार. पण आता ती संख्या दोन झालेली असावी.

🤣🤣


In reply to by शाम भागवत

फडणवीस हा शब्द आलेला असल्याने एक तरी प्रतिसाद नक्कीच येणार. पण आता ती संख्या दोन झालेली असावी.
.. मान्य :) :) खासकरून 'श्रीगुरुजी' .. मला तर कधीतरी वाटत.. 'श्रीगुरुजी' म्हणजे भाजपातले फडणवीस विरोधक असावेत , एकही सन्धी सोडत नाहित त्यान्च्या विरुद्ध लिहिण्याची :)

In reply to by शाम भागवत

शेवटी हे सगळे एका सामान्य माणसाचे अंदाज आहेत.
अंहं.. हे सगळे एका सामान्य कोथरुडी पेन्शनराचे बाल्कनीतल्या बाल्कनीत केलेले स्वप्नरंजन आहे. बघा जरा तीन चार एफड्या मॅच्यर झाल्या असतील. सोसायटीतला गणपती आणण्ण्याची घाई असेल. संस्कृतीरक्षणाची संघी...सॉरी, संधी सोडू नका.

In reply to by सुरिया

😀

बघा जरा तीन चार एफड्या मॅच्यर झाल्या असतील. नाही हो. माझी एकही एफडी नाही. सोसायटीतला गणपती आणण्ण्याची घाई असेल. नाही हो. गेली कित्येक दशके सोसायटीतल्या गणपतीचे दर्शन घेतलेले नाही. संस्कृतीरक्षणाची संघी... हे काय असते? जरा तपशीलात लिहा ना.

😀


In reply to by शाम भागवत

नाही हो. गेली कित्येक दशके सोसायटीतल्या गणपतीचे दर्शन घेतलेले नाही.
वर्गणी देता का? वर्गणी देत असाल तर दर्शन घ्यावेच असे नाही. वर्गणी देणे जास्त महत्वाचे आहे?

In reply to by Trump

मागायला कोणी आलं तर देतो? संपादक मंडळ, ही प्रश्नोत्तरे वैयक्तिक होत असतील तर त्यांचे संपादन केल्यास माझी हरकत नाही. प्रश्न शुध्द हेतूने विचारले आहेत असे गृहित धरून मी उत्तरे देत आहे. असो. :)

In reply to by शाम भागवत

काका गोड बोलतात काका गोड वागतात काका गोड चुकांचे तपशील पण सॉरी लिहिलेले न वाचता गोडपणे मागतात. . . देऊ हं संधींचे तपशील. हे मंडळाचे ऑडीट संपले की. ;)

In reply to by शाम भागवत

नाही झाला पवारांना फायदा तर चांगलेच आहे पण मनात भीतीची पाल चुकचुकते ती अशी म्हणून म्हणले जातीयवादी पक्षाचे आणि घराणेशाही चा ऱ्हास व्हायला उपयोग होईल असो सध्या पण काँग्रेस मधील लुटुपुटुची "अध्यक्ष्य कोण होणार" या खेळाकडे कान आणि डोळे लावून बसलो आहे

संपादक मंडळ, माझी एफडी, आमच्या सोसायटीतील गणपती, माझे संस्कृतीरक्षण वगैरे गोष्टी या वैयक्तिक होत असतील व धाग्याशी अजिबात संबंधीत नसतील, तर दोन्ही प्रतिसाद उडवल्यास माझी हरकत नाही. मी मात्र मला केलेली सुचवणी शुध्द हेतूने केलेली आहे असे समजून, प्रामाणिकपणे व खराखुरा प्रतिसाद दिलेला आहे हे नमूद करत आहे. असो. :)

In reply to by सतिश गावडे

अशामुळेच कुट्ठं कुठ्ठं म्हणून न्यायच्या लायकीचे नाहीत असे रामदासकाकांना की काका कुणालातरी , कोणतरी म्हणतं म्हणे ब्वा. अशाच गोष्टीमुळे उगी बाल्कनीचा अंदाज हो... बाकी काही नाही.

शरद पवारांपश्चात राष्ट्रवादीचे भवितव्य काय असेल ? महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय असेल ? या विषयावर श्रीगुरुजी आणि इतर अभ्यासू मिपाकरांचे मत /भाकित वाचायला आवडेल.. या विषयावर पुर्वी कधी चर्चा झाली आहे का ?

In reply to by तर्कवादी

राष्ट्रवादीचे भवितव्य महाराष्ट्रापुरते तरी चांगले असेल असे वाटते. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे नेते स्थानिक पातळीवर खूपच बलदंड आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना, खासकरून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण मंडळींनी काँग्रेस सोडायची असे भविष्यात ठरवले तर त्यांच्यासाठी राष्ट्रवादी हा चांगला पर्याय आहे.

In reply to by सर टोबी

राष्ट्रवादीचे भवितव्य महाराष्ट्रापुरते तरी चांगले असेल असे वाटते. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे नेते स्थानिक पातळीवर खूपच बलदंड आहेत.
राष्ट्रवादीकडे बलदंड नेते आहेत हे मान्य आणि राष्ट्रवादीतून सहस कुणी बंडही केले नसावे. पण शरद पवारांपश्चात पक्षाची दिशा काय असावी, कुणाशी युती करावी ई प्रश्नावर गटतट पडू शकतात. शरद पवारांचा उत्तराधिकारी नेमका कोण - अजित पवार की सुप्रिया सुळे ? पक्षाचे सर्व निर्णय कोण घेणार ?

In reply to by तर्कवादी

आगामी काळात कॉंग्रेस व शिवसेना यांना स्वबळावर शून्य भवितव्य आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष राष्ट्रवादीला धरून ठेवणार. पवार असेपर्यंत राष्ट्रवादी या दोनपैकी एकाशी ( बहुतेक कॉंग्रेसशीच) युती करेल. पवारांच्या पश्चात अजित पवार व सुळे असे दोन गट पडतील. यापैकी अजित पवार गटात कॉंग्रेसचे बरेच नेते जातील. सुळेंबरोबर आव्हाडसारखे काही एकनिष्ठ राहतील. अनेकवेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत व पवारांच्या हयातीत आपण मुख्यमंत्री होणार नाही हे त्यांना माहिती आहे. एकंदरीत परिस्थिती ओळखून राज ठाकरे भाजपबरोबर जाण्यास अत्यंत उत्सुक आहेत आहेत. परंतु मनसेबरोबर युती करण्याचा अश्वप्रमाद भाजपने केल्यास भाजप पुन्हा जोरात तोंडावर आपटेल. सदाभाऊ खोतांची शेतकरी संघटना, रासप, रिपब्लिकन आठवले गट, कै. विनायक मेटेंचा छोटा पक्ष यांच्याबरोबर भाजपची युती आहे. यातील कोणत्याही पक्षाचा मताधार १ टक्यापेक्षा कमी आहे व भाजप त्यांना एकत्रित १८ जागा देतो. मनसेचाही मताधार १ टक्क्यापेक्षा कमी आहे. परंतु राज ठाकरे ५०-६० पेक्षा कमी जागांवर ऐकणार नाहीत. मनसेला जास्तीत जास्त ७-८ जागा द्याव्या. शिंदे गटाला ६०पेक्षा जास्त जागा देऊ नये. इतर पक्षांना जास्तीत जास्त १८ जागा द्याव्या. उर्वरीत २०० जागा भाजपने लढाव्या. अन्यथा पुन्हा एकदा वाढपी ताटापाशी आल्यावर ताटातील पुरणपोळ्या व भांड्यातील साजूक तूप संपलेले आढळेल. .

In reply to by श्रीगुरुजी

धन्यवाद श्रीगुरुजी
अनेकवेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत व पवारांच्या हयातीत आपण मुख्यमंत्री होणार नाही हे त्यांना माहिती आहे
खरंच हे मला कळत नाही.. शरद पवारांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे का वाटत नसावे. बरं राष्ट्रवादीचाच दुसर्‍या कोणत्या नेत्याचं नाव ते मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करतात असंही नाही. मग राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदच नको असं शरद पवारांना का वाटत असावं ? एक शक्यता शरद पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी फुटून एक गट शिवसेनेसोबत तर एक गट भाजपसोबत असेही होवू शकेल कदाचित अवांतर :
अश्वप्रमाद
हा हा ..मिपाला नवीन शब्द मिळाला.. छान !!

In reply to by तर्कवादी

असं वाटत नाही. एकूणच काँगेसची संस्कृती हा मिपावर हेटाळणीचा विषय असल्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. परंतु जर अजित पवारांना वैयक्तिक महत्वाकांक्षा असती आणि त्यांनी ठरवलं असतं तर २०२० मध्येच आत्तासारखा कठीण कायदेशीर पेचप्रसंग ते निर्माण करू शकले असते. केवळ सरकार स्थापण्याची प्रक्रिया गतिमान करा हा संदेश त्यांना द्यायचा होता आणि तो त्यांनी बरोबर पोहोचविला.

In reply to by तर्कवादी

त्या त्या पक्षांनी आपापला पाठबळ गट जोपासलेला आहे तो अचानक नाहीसा होत/होणार नाही. पण गुहेमध्ये सिंहांची भरती करून काय होणार?