पुणेरी पाट्या... नकोश्या
गेल्या काही दिवसांपासून टेनिस एल्बोच्या दुखण्यानं डोकं वर काढलंय त्यामुळे फारसं आवडत नसतानाही, सकाळी पायी फिरायला जाण्यावाचून व्यायामाचा दुसरा पर्याय नव्हता. पायी फिरायला लागलो आणि एरवी पटकन निसटून जाणारे आजूबाजूचे देखावे आता हळूहळू सरकू लागले अन् आधी कानाडोळा केलेले, जागोजागी लावलेले विद्रूप फलक डोळ्यात चांगलेच खुपायला लागले. यावर अनेकांनी आजवर आक्षेप घेतलाय, वरपर्यंत तक्रारी केल्यात, आंदोलनं केलीत आणि त्यावर मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी पोकळ आश्वासनंही दिलीत आणि तरीही विद्रुपीकरण चालूच आहे.
मिसळपाव