ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ४)
मदनबाण.....
४) याचा फायदा जास्त करून पवारांनांच होणार हे दिसतंय ( दुर्दैवाने )असहमत. १) मला वाटते २०१४ सालानंतर भाजपा हा ३५% मतदान टक्केवारी ओलांडण्याचा प्रयत्न करतोय. इतर पक्षांतून नेत फोडणे एवढेच त्यावेळेस भाजपा करू शकत होता व ते भाजपाने जेवढे जमेल तेवढे केलेलेही आहे. त्याबद्दल भरपूर शिव्याही खाऊन झाल्या आहेत. पण आहे ते टिकवणे व जमल्यास मोठे होणे यासाठी भाजपा तेवढेच करू शकत होता. पाच पक्षातील राठा यांनी हिदूत्वविरोधी लोकांकडे जाऊन स्वतःला संपवून घेतले होते. उरलेल्या चार पक्षातील एक पक्ष संपवून मोठे होणे हा एक पर्याय होता. त्यासाठी २०१९ साली राष्ट्रवादीची माणसे फोडून राष्ट्रवादी संपविण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. पण शिवसेनाच राष्ट्रवादीबरोबर साटेलोटे करत असल्याने तो प्रयत्न फसला. २) मतदान टक्केवारीनुसार, हिंदूत्वाच्या चढता आलेखाकडे लक्ष न देता, शिवसेनेने केलेली आत्महत्या ही भाजपाला ३५% मतदानाच्या पुढे नेऊन बसवणार आहे. चार पैकी एक पक्ष संपवायचे भाजपाचे मनसुबे आयते सफल झालेले आहेत. प्रथम राष्ट्रवादी की शिवसेना संपवायची हे निश्चीत करता येत नसल्यामुळे, भाजपा हा नेहमी शिवसेना व राष्ट्रवादी यांचेशी फारसे वाकड्यात शिरत नसे. वेळेस पड घेत असे. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. ३) शिवसेनेशी साम व दाम हे दोन प्रयोग करून झाले होते. "साम" हा प्रयोग बाळासाहेब असे पर्यंत यशस्वी होत होता. पण नंतर शिवसेनेची वाढती भूक शमविण्यासाठी "दाम" याचा उपयोग केला. त्यासाठी ८२ नगरसेवक असूनही मुंबई महानगरपालिका शिवसेनेला आंदण दिली गेली. मात्र मविआ स्थापने नंतर नाईलाजाने इडी मार्फत "दंड" व शिंदेगटामार्फत "भेद" यांचा उपयोग सुरू झाला. ३) शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे फडणवीस यांचेकडे सत्ता राहील, पण ते मुख्यमंत्री नसल्याने त्यांना ब्राह्मण असल्याचा त्रास होणार नाही. तसेच अंतर्गत विरोधाचा त्रास होणार नाही. मराठा लॉबी सुध्दा थेट हल्ला करू शकणार नाही. मनातले मुख्यमंत्री मनातली नाराजी व्यक्त कशी करायची याच्या विवंचनेत असतील. त्यामुळे या अडीच वर्षात फडणवीस त्यांच्या कार्यक्षमतेची कमाल मर्यादा गाठू शकतील असे वाटते. ४) राष्टवादीवर आता फारसे अवलंबून रहावयाची गरज नसल्याने यापुढच्या अडीच वर्षात राष्ट्रवादी संपविण्याच्या दृष्टीने मोदी शहांनी जोरकस प्रयत्न केले तर आश्चर्य वाटू नये. आत्तापर्यंत राष्ट्रवादीवर टीका करूनही प्रत्यक्ष त्यांचेवर कोणतीच कारवाई केली गेलेली नाही. तसेच त्यांची लोकं भाजपात आणण्यामुळे पक्षाची प्रतीमा मलीनच झालेली आहे असे अनेक भाजपा प्रेमींना वाटते. मला वाटते २०१४ ते २०१९ पर्यंत हे जे काही केले गेले. त्यावर पडदा टाकण्यासाठी किंवा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादीने केलेला भ्रष्टाचार खणून काढणे एवढेच भाजपाच्या हातात आहे. असे केल्यास भाजपापासून दुरावलेली मते परत भाजपाकडे येऊ शकतील. यासाठी आवश्यक तो अभ्यास शहा यांनी सहकार मंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षात केलेला असावा. तसेच पुढे मागे पीडीपीशी केलेले सख्य व राष्ट्रवादीशी केलेले सख्य हे कसे एकाच साच्यातील आहे हे ही सांगता येऊ शकेल. ५) फक्त यासाठी अनुकूल काळ आला आहे की नाही याची निश्चीती करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या निवडणूकांपर्यंत भाजपा थांबेल असे वाटते. त्या निवडणुकांत यश मिळाल्यास, शिल्लक शिवसेना अस्तंगत होत जाणार याची खात्री पटून, राष्ट्रवादीच्या मागे सहकाराच्या माध्यमातून ससेमीरा सुरू होईल. राष्ट्रवादी संपवून जनाधार आणखी वाढवत नेणे हा यापुढचा टप्पा आखलेला असणार. शेवटी हे सगळे एका सामान्य माणसाचे अंदाज आहेत.
🤣
फडणवीस हा शब्द आलेला असल्याने एक तरी प्रतिसाद नक्कीच येणार. पण आता ती संख्या दोन झालेली असावी.🤣🤣
In reply to ४) याचा फायदा जास्त करून by शाम भागवत
फडणवीस हा शब्द आलेला असल्याने एक तरी प्रतिसाद नक्कीच येणार. पण आता ती संख्या दोन झालेली असावी... मान्य :) :) खासकरून 'श्रीगुरुजी' .. मला तर कधीतरी वाटत.. 'श्रीगुरुजी' म्हणजे भाजपातले फडणवीस विरोधक असावेत , एकही सन्धी सोडत नाहित त्यान्च्या विरुद्ध लिहिण्याची :)
In reply to ४) याचा फायदा जास्त करून by शाम भागवत
शेवटी हे सगळे एका सामान्य माणसाचे अंदाज आहेत.अंहं.. हे सगळे एका सामान्य कोथरुडी पेन्शनराचे बाल्कनीतल्या बाल्कनीत केलेले स्वप्नरंजन आहे. बघा जरा तीन चार एफड्या मॅच्यर झाल्या असतील. सोसायटीतला गणपती आणण्ण्याची घाई असेल. संस्कृतीरक्षणाची संघी...सॉरी, संधी सोडू नका.
In reply to ह्याह्याह्या by सुरिया
😀
बघा जरा तीन चार एफड्या मॅच्यर झाल्या असतील. नाही हो. माझी एकही एफडी नाही. सोसायटीतला गणपती आणण्ण्याची घाई असेल. नाही हो. गेली कित्येक दशके सोसायटीतल्या गणपतीचे दर्शन घेतलेले नाही. संस्कृतीरक्षणाची संघी... हे काय असते? जरा तपशीलात लिहा ना.😀
In reply to . by शाम भागवत
नाही हो. गेली कित्येक दशके सोसायटीतल्या गणपतीचे दर्शन घेतलेले नाही.वर्गणी देता का? वर्गणी देत असाल तर दर्शन घ्यावेच असे नाही. वर्गणी देणे जास्त महत्वाचे आहे?
In reply to नाही हो. गेली कित्येक दशके by Trump
In reply to . by शाम भागवत
In reply to कीत्त्ती गोड by सुरिया
In reply to ४) याचा फायदा जास्त करून by शाम भागवत
भोळसट स्वप्नरंजन !In reply to सविस्तर लिहिता येईल. परंतु by श्रीगुरुजी
In reply to ४) याचा फायदा जास्त करून by शाम भागवत
In reply to संपादक मंडळ, by शाम भागवत
In reply to ज्येष्ठांसाठी मुदत ठेव व्याज दर... by सतिश गावडे
In reply to हो क्का? by सुरिया
In reply to शरद पवारांपश्चात राष्ट्रवादीचे भवितव्य by तर्कवादी
In reply to राष्ट्रवादीचे भवितव्य by सर टोबी
राष्ट्रवादीचे भवितव्य महाराष्ट्रापुरते तरी चांगले असेल असे वाटते. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे नेते स्थानिक पातळीवर खूपच बलदंड आहेत.राष्ट्रवादीकडे बलदंड नेते आहेत हे मान्य आणि राष्ट्रवादीतून सहस कुणी बंडही केले नसावे. पण शरद पवारांपश्चात पक्षाची दिशा काय असावी, कुणाशी युती करावी ई प्रश्नावर गटतट पडू शकतात. शरद पवारांचा उत्तराधिकारी नेमका कोण - अजित पवार की सुप्रिया सुळे ? पक्षाचे सर्व निर्णय कोण घेणार ?
In reply to राष्ट्रवादीचे भवितव्य by तर्कवादी
In reply to आगामी काळात कॉंग्रेस व by श्रीगुरुजी
अनेकवेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत व पवारांच्या हयातीत आपण मुख्यमंत्री होणार नाही हे त्यांना माहिती आहेखरंच हे मला कळत नाही.. शरद पवारांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे का वाटत नसावे. बरं राष्ट्रवादीचाच दुसर्या कोणत्या नेत्याचं नाव ते मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करतात असंही नाही. मग राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदच नको असं शरद पवारांना का वाटत असावं ? एक शक्यता शरद पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी फुटून एक गट शिवसेनेसोबत तर एक गट भाजपसोबत असेही होवू शकेल कदाचित अवांतर :
अश्वप्रमादहा हा ..मिपाला नवीन शब्द मिळाला.. छान !!
In reply to धन्यवाद by तर्कवादी
In reply to शरद पवारांपश्चात राष्ट्रवादीचे भवितव्य by तर्कवादी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tim Tim Timbali - Ravindra Sathe & Anupama Deshpande (Paravtichya Bala)
अंदाज