Skip to main content

माझी ट्रेन माझी प्रेयसी (२)

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 19/08/2022 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ इथे. नमस्कार रूळगाडी मित्रांनो ! आज ट्रेनधाग्याच्या पहिल्या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा नवा धागा काढत आहे. 2017 मध्ये माझे मिपावर आगमन झाले. त्यानंतर महिनाभरात हा ट्रेनचा धागा काढला. त्यावर ‘प्राडॉ.दिबि’ यांचा एकमेव उत्साहवर्धक प्रतिसाद आला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष धागा अडगळीत पडला होता. 2019 मध्ये धाग्याला ऊर्जितावस्था आली. मग आपल्यातील अनेकांनी या विषयावरील आपापले अनुभव आणि मते उत्साहाने लिहीली. त्यानंतर आजपर्यंत ट्रेनचा हा धागा एक्सप्रेस गतीने; कधीकधी तर राजधानी-गतीने धावत आहे. इथल्या चर्चेत सहभागी होणारे सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व धागाप्रवाशांचे आभार ! या नवीन भागाचेही नवे आणि जुने वाचक स्वागत करतील अशी आशा आहे. तर येउद्यात ट्रेनसंबंधी......... काय वाट्टेल ते ........... ! ok
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 72346
प्रतिक्रिया 266

प्रतिक्रिया

In reply to by मदनबाण

अप्रतिम ! तंत्रज्ञांचे अभिनन्दन

In reply to by मदनबाण

चिनाब नदीच्या काठावर रामबन हे गाव कधी पंधरा वीस घरांची वस्ती , मिलिट्रीच्या परागमन शिबीरात राहीलो होतो.. अमरनाथ यात्रेच्या भटकंतीत चिनाब खोरे व नदीचा फोटो टाकलाय.

जपानमध्ये जर का ट्रेन उशिरा धावत असेल तर प्रत्येक स्टेशनवर स्टाफ एक स्लिप देतो ज्यात लिहिलेलं असतं की, आम्ही सर्टिफाय(मराठी शब्द निर्वाळा?) करतो की अमुक एक लाईन उशिरा धावत आहे(अर्थातच ती लाईन त्या स्टेशनवरून जात असेल तर) याचं कारण असं की, कचेरीत जायला उशीर झाला हा ती ट्रेन उशिरा धावत असल्यामुळे झाला. कर्मचाऱ्यांची चूक नाही. किंवा काही व्यवसाय निविदा सादर करायच्या असतील, तर आपण ती स्लिप दाखवली तर किमान एक संधी मिळते सादर करण्याची.

जवळपास साठहजार कि मी प्रवास केला. सर्व प्रकारचे अनुभव घेतले.

In reply to by हेमंतकुमार

वरील गाडीला स्वतंत्र इंजिन नसून ती EMU तंत्रावर धावते

भारताच्या तिसऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने ट्रायल रनमध्ये ताशी रिकॉर्डतोड १८० किमीचा वेग पकडला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर ही माहिती देताना सांगितले की, वंदे भारत-२ ची स्पीड ट्रायल कोटा-नागदा सेक्शन दरम्यान १२०/१३०/१५० आणि १८० किमी प्रतितास वेगाने सुरु झाली. रेल्वेमंत्र्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हायस्पीड ट्रेनमध्ये काच लावलेली दिसत असून, अतिशय वेगानंतरही ग्लासमधून पाण्याचा एक थेंबही सांडला नाही, हे नक्कीच आश्चर्यकारक आहे. ही बातमी

नागालँडला शंभर वर्षानंतर दुसरे रेल्वेस्थानक मिळालेले आहे. बातमी

third rail असा एक शब्दप्रयोग वाचनात आला. ok काही देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ट्रेन्सना विद्युत पुरवठा करणारी एक अन्य ट्रेन असते. ती अर्थातच उच्च विद्युत दाबाने भारित असते. यावरून राजकारणामध्ये third rail हे लाक्षणिक अर्थाने वापरले जाते. एखादा सामाजिक विषय अतिशय वादग्रस्त आणि स्फोटक असतो; जो कोणी त्याला हात लावायला जाईल त्याला जोरदार झटका बसतो !

In reply to by हेमंतकुमार

काही देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ट्रेन्सना विद्युत पुरवठा करणारी एक अन्य ट्रेन असते.
ऐकावे ते नवलच! ओव्हरहेड पॉवर सप्लाय माहित होता; हे प्रकरण माहित नव्हते. --- काही देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ट्रेन्सना विद्युत पुरवठा करणारी एक अन्य ट्रेन असते. करणारा एक अन्य रूळ असतो. असं म्हणायचं आहे का?

In reply to by वामन देशमुख

बरोबर. माझा गैरसमज झाला. ती रुळावर लावलेली यंत्रणा आहे.

In reply to by हेमंतकुमार

माझा गैरसमज झाला. ती रुळावर लावलेली यंत्रणा आहे.
तुम्ही रेलचे भाषांतर ट्रेन असे केल्याने तसे झाले.

In reply to by हेमंतकुमार

आपल्या पुण्यात थर्ड रेल येत आहे. मेट्रोच्या तीसर्‍या लाईनवर (शिवाजीनगर- हिंजवडी) थर्ड रेल ७५० व्हो. डीसी प्रणाली वापरली जाईल. पहिल्या व दुसर्या लाईनवर २५ केव्ही एसी ओवरहेड असेल.

In reply to by बोका

थर्ड रेल बद्दल काही प्राथमिक तांत्रिक माहिती इथे वाचली. ok या यंत्रणेत दोन महत्त्वाचे धोके दिसतात : १. इलेक्ट्रिक शॉकचा धोका २. रेल्वेमार्गात चुकूनही माणूस पडणे परवडणार नाही. ३. आपल्याकडे रेल्वे रूळ ओलांडणारी भरपूर जनता आहे. या सगळ्यांचा विचार व्हावा असे वाटते .. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी

In reply to by हेमंतकुमार

शॉकचा धोका कमी असतो. ही प्रणाली शक्यतो अशा ठिकाणी वापरतात जिथे माणसांना मर्यादित प्रवेश असतो, जसे की मेट्रो मार्ग. मेट्रो मार्गावर रेल्वे रूळ ओलांडणारी जनता नसते. फलाटावर आजकाल platform screen doors असतात , त्यामुळे प्रवासी रूळ ओलंडू शकत नाहीत. दुरुस्ती कर्मचारी सुद्धा वीजप्रवाह बंद केल्यावर प्रवेश करु शकतात. तसेच तीसर्या रुळावर वीजरोधक आवरण असते. वीजप्रवाह खालील किंवा बाजूकडून घेतला जातो. thirdrai खालील चित्रात पिवळ्या रंगात वीजरोधक आवरण दिसत आहे. rai

In reply to by बोका

चित्रात पिवळ्या रंगात वीजरोधक आवरण दिसत आहे.
ओह, मग चांगले आहे. आभार !

मुंबई-चेन्नई मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण पूर्ण

आपल्या राजधानीचे रेल्वेस्थानक अत्याधुनिक करायचे ठरले आहे. त्याचे प्रारूप रेल्वे मंत्रालयाने जालावर जाहीर केले आहे. ok त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत

In reply to by हेमंतकुमार

असे 3डी, फोटोशॉप, कोरल ड्रॉ प्लॅन कायमच दिसतात, ग्राउंड वर काही होत नसतं. ते नई दिल्ली रेल्वे स्टेशन बघितल्यावर खात्री पटते त्याची. हे सगळे चकाचक करण्यास हरकत नाही किंवा उगाच टीका म्हणून टीका नाही पण हे इमले उभे करण्या अगोदर १. सगळी रेल्वे स्टेशन access controlled करा, स्टेशनवर entry / exit ठरवलेले असतील तितकेच, उगाच "रुळा शेजारून डायरेक्ट नाका" वाटा थेट बंद २. प्लॅटफॉर्म वगैरे सोबत ड्रेनेज, पावसाळी पाणी निचरा (मुंबई स्पेशल दिवास्वप्न) ह्याची चोख व्यवस्था ३. पाण्याचे / मुताऱ्यांचे गळके नळ अन् अमोनियाच्या वासाने भारलेले ते वातावरण हलके करायला हवे पहिले. ४. नाशिवंत माल ब्रेक व्हॅन मधून नेण्या आणण्यासाठी, लॉजिस्टिक्स पुन्हा work करायला हवेत, मासळीने भरलेले क्रेट्स इत्यादी गळत लळत प्लॅटफॉर्म वर पडलेले असतात ते rectify करा, गाडी पिट लाईन, वॉशिंग लाईन वरून आली की अमुक इतक्या वेळात ते नाशिवंत माल घेऊन यायचा, फ्रोजन ब्रेक व्हॅन मध्ये लोड करण्याची प्रोसीजर व्यवस्थित फॉलो व्हायला हवी.

In reply to by जेम्स वांड

अगदी बरोबर मूलभूत सुविधांकडे आधी लक्ष दिले पाहिजे.

रेल्वेचे प्रमुख उत्पादन युनिट या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत डबे, चाके, लोकोमोटिव्ह आणि इतर रोलिंग स्टॉकचे उत्पादन उद्दिष्ट पूर्ण करण्यात अनेक कारणांमुळे अयशस्वी ठरले. ७३० डबे तयर करण्याचे लक्ष्य असतांना फक्त ५८ डबे तयार केले गेले. या आर्थिक वर्षाच्या उर्वरित महिन्यांत यात सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि उर्वरित महिन्यांत, उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

In reply to by निनाद

लक्ष्य - ७३० डबे उत्पादन - ५८ डबे मग या आर्थिक वर्षाच्या उर्वरित महिन्यांत यात सुधारणा होण्याची शक्यता आहे ह्या शक्यतेला बेसिस काय म्हणता ?

In reply to by जेम्स वांड

आशादायी असावे. :) आता या ५८ पेक्षा ही कमी उत्पादन होईल असे तरी कसे म्हणता येईल? असो, आधी पुरवठ्याचे अनेक प्रश्न होते. ते प्रश्न सोडवत आणले असावेत म्हणून...

भारतीय रेल्वेतून पाळीव प्राणी( कुत्रा व मांजर) नेण्यास परवानगी - फक्त १ एसी या वर्गातून आणि तेसुद्धा संपूर्ण 4 सीट्स आरक्षित करून. आरक्षण प्रवासाच्या आधी काउंटरवर जाऊन करावे लागणार. प्राण्याच्या वजनानुसार पैसे आकारणार.

आधुनिक सिग्नल आणि संपर्क व्यवस्था असतानाही रेल्वेची एक जुनीपुराणी पद्धत अजून चालू असल्याचे वाचून अचंबा वाटला. जेव्हा एखादी ट्रेन स्टेशनमध्ये घेण्यास जागा नसते तेव्हा ती मागे काही अंतरावर (होम सिग्नल) उभी करून ठेवतात. जर का असा थांबवून ठेवण्याचा कालावधी 15 मिनिटांपेक्षा जास्त असल्यास गार्डने आपल्या ट्रेनच्या मागे सुमारे 1.2 किलोमीटरपर्यंत जाऊन रुळांवर स्फोटके ठेवायची असतात. जर का मागून एखादी ट्रेन येत असेल तर तिला पहिल्या ट्रेनला पुढे अडथळा आहे हे समजावे म्हणून. ही दुसरी ट्रेन त्या स्फोटकांवरून गेल्यावर ती फुटतात. आता या जुन्यापुराण्या पद्धतीवर रेल्वे पुनर्विचार करत आहे हे चांगले.

जगातील सर्वात उंचीवरील रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलाचे नवे फोटो रेल्वेने प्रसिद्ध केले आहेत.

भारताची हायड्रोजन इंधनावर चालणारी पहिली ट्रेन 2024 मध्ये येणे अपेक्षित आहे. त्यासाठी विविध उद्योगांमध्ये पूर्वतयारी सुरू झालेली आहे ok

दक्षिण आफ्रिकेतील पहिली सौरऊर्जेवर चालणारी ट्रेन तिथल्या 20 पौगंडावस्थेतील मुलांनी मिळून तयार केली आहे. आता तिच्यावर पुढील प्रयोग होतील

माननीय पंतप्रधान ह्यांच्या हस्ते ह्या नव्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखून उदघाटन करण्यात आले. ह्यावेळी पंतप्रधानांनी गांधीनगर ते अहमदाबाद असा रेल्वे प्रवासही केला.

In reply to by अनिकेत वैद्य

ह्यापूर्वी दिल्ली ते वाराणसी आणि दिल्ली ते कटरा ह्या दोन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु असून हि तिसरी वंदे भारत एक्सप्रेस आहे.

In reply to by अनिकेत वैद्य

तिसरी वंदे भारत एक्सप्रेस >>छान ! ....... आता थोडी करमणूक : हे पहा... झोपेतून उठवणार उचलून नेणार ?? https://www.maharashtranama.com/business-tourism/irctc-railway-ticket-b… "या सुविधेचा फायदा कोणी घेऊ शकतो. यामध्ये रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी वीस मिनिटे आधी तुम्हाला उचलून नेण्यात येणार आहे. यासाठी फक्त तीन रुपये मोजावे लागतील" (ते फोन करून वीस मिनिट आधी आपल्याला झोपेतून उठवणार आहेत !) :)))))))

.रेल्वे सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर. तीव्र इंधन तुटवडा संपूर्ण देशात फक्त दोन प्रवासी गाड्या धावत आहेत

स्वित्झर्लंड मधील रेल्वेला 175 वर्षे पूर्ण होत असल्याने ते आता एक विक्रम करीत आहेत. जगातील सर्वात लांब असलेली प्रवासी ट्रेन (1,910m) त्यांच्याकडे धावणार आहे.

भारतीय रेल्वेच्या एकूण ब्रॉडगेज मार्गांपैकी 82 टक्के भागाचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. छान

भारतीय रेल्वेच्या एकूण ब्रॉडगेज मार्गांपैकी 82 टक्के भागाचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. छान

हा घाट चढताना घ्यावा लागतो मागे एंजिनं जोडण्यासाठी. पण तो अधिकृत स्टॉप असेलच असे नाही.(इथून तिकिट मिळणार नाही.) डेक्कन एक्सप्रेस ११००७ चार हा स्टॉप काढला आहे. नेरळचा स्टॉप आहे.

काही महत्त्वाच्या स्थानकांचे नूतनीकरण होणार आहे. तिथल्या रेल्वे मार्गा ंमध्ये पारंपरिक दगडांचा वापर न करता काँक्रीट पद्धतीचे मार्ग बनवले जाणार आहेत.

In reply to by हेमंतकुमार

पण आता बायो टॉइलेट्समुळे गाड्या जिथे बराच वेळ थांबतात त्या स्टेशनांतील रुळांवर जमा होणारी घाण जवळपास नष्ट झाली आहे. उदाहरणार्थ कल्याण,पुणे.

In reply to by कंजूस

बरोबर एकेकाळी सकाळच्या वेळी या स्थानकांवर गेले असता दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावूनच हिंडावे लागत असे.

भारतात सर्वात जास्त अंतर कापणार्‍या श्रीमाता वेष्णोदेवी कटरा ते कन्याकुमारी, हिमसागर एक्सप्रेसने मी जम्मु ते कन्याकुमारी १४ नोहेंबरला प्रवास करणार आहे. ही ट्रेन ४ दिवसात तीन हजार सातशे नव्वद कि.मी अतंर कापून कन्याकुमारीला पोहचते.

In reply to by प्रसाद_१९८२

https://www.india.com/travel/articles/5-longest-train-journeys-in-india… 5. Vivek Express – Dibrugarh to Kanyakumari Vivek Express from Dibrugarh (Assam) to Kanyakumari (Tamil Nadu) is the longest route of the Indian Railways network both in terms of distance and time. This weekly train is currently the longest train route in the Indian Subcontinent. It covers a total distance of 4,286 kilometres with a running time of 80 hours and 15 minutes.

In reply to by सुबोध खरे

Kashmir Himsagar Express – Kanyakumari and Shri Mata Vaishno Devi Katra Kashmir Himsagar Express is a weekly express train running between Kanyakumari (Tamil Nadu) and Shri Mata Vaishno Devi Katra (Jammu and Kashmir). It is currently the second longest running train in terms of distance and time. The train covers a distance of 3,787 kilometres in 72hours passing through 12 states.

UTS ॲप वापरून जनरल तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना आता स्थानकापासून २० किलोमीटरपर्यंत दूर असताना देखील असे तिकीट काढता येणार आहे. पूर्वी ही मर्यादा दोन किलोमीटर होती.

Airoli and Rabale रेल्वे स्थानकांच्या नावांमधील घोळामुळे तिकीट आरक्षण करताना प्रवाशांना त्रास

जीपीएस आणि इंटरनेट लागतं. ते भरोशाचं नाही. *********** करोनामधून मुंबईकर सुटले पण रेल्वेच्या मेगा ब्लॉकमध्ये अडकले. रात्री नऊ ते सकाळी नऊ दूर जाणाऱ्या गाड्या पनवेल/पुणे वरून सोडतात/पर्यंतच चालवतात.

In reply to by कंजूस

रात्री नऊ ते सकाळी नऊ दूर जाणाऱ्या गाड्या पनवेल/पुणे वरून सोडतात/पर्यंतच चालवतात. >> नक्की कोणत्या गाड्या? १९, २० नोवेंबर रोजी मेगाब्लॉक असल्याने बर्याच गाड्या पनवेल, पुणे, दादर पर्यन्तच होत्या. कायमस्वरुपी पनवेल, पुणे पर्यन्त थंबणार्‍या/निघणाय्रा गाड्या कोणत्या?

Train shedule पाहू नका. कुर्ला टर्मिनस आणि छ.शिवाजी मी.टर्मिनसच्या बऱ्याच गाड्या पनवेल/पुणे ला कापल्या आहेत. पण 12201 कुर्ला - कोशुवेली त्रिवेंद्रम आज कुर्ला येथूनच आहे. दादरच्या गाड्या पूर्ण चालत आहेत. अगदी 16345/46 नेत्रावती रात्री ९ ते सकाळी नऊ मध्ये नाही तरी पनवेलला कापली आहे. तुमच्या गाडीचे आरक्षण मिळते का पाहा. ते नसणार आणि ठळक सूचना येते. उदाहरणार्थ नेत्रावती गाडीचे ठाणेपासून आरक्षण मिळत नाही,पनवेल विचारल्यावर येते. प्रवासी दुरून येणार आणि पनवेलला उतरवणार म्हणजे कठीणच. एकूण मुंबईतील गर्दी पनवेलला ढकलण्याची खटपट वाटते आहे. उप्रकडे जाणाऱ्या गाड्या आगामी काळात ठाकुर्ली टर्मिनस/कल्याण वरून सोडण्याचा रेल्वेचा विचार आहे. टॅक्सीवाल्यांना बरे दिवस येणार. पनवेल ते मुंबई. कारण लोकल ट्रेनने जाणे शक्य नाही. दीड तासाच्या रेल्वे प्रवासाला ट्राफिकमधून पाच तास लागतील.

In reply to by कंजूस

बातमी मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनसवर वर्षभरात दोन नवीन फलाट; मेल-एक्स्प्रेस सोडण्याची क्षमता वाढणार सदर बातमीत उल्लेख केल्याप्रमाणे, "एलटीटीत नवीन फलाट बांधण्याचे काम सुरू असल्याने नेत्रावती, मत्स्यगंधा, कामख्या एक्स्प्रेस सध्या पनवेलमधून सोडण्यात येत आहेत. १२ डिसेंबरनंतर या गाड्या पुन्हा एलटीटीमधून सोडण्यात येणार आहेत." हे कारण असावे.

In reply to by विजय_आंग्रे

भारतीय रेल्वेही माहिती देत नाहीत. माथेरान रेल्वे सुरुवातीला खासगीत होती. पण नंतर ती मध्य रेल्वेने घेतली. पण त्याचा उल्लेख करायचं रेल्वे टाळणे.