Skip to main content

ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ४)

लेखक मदनबाण यांनी रविवार, 21/08/2022 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या धाग्याचे २००+ प्रतिसाद झाल्याने हा धागा उघडला आहे. कॉपीवुड ची लोकांनी व्यवस्थित ठासणे सुरु केले आहे, चड्डी सिंग सुपर डुपर फ्लॉप झाल्याचा मला विशेष आनंद झाला आहे. :) जे जे माज करतात त्यांची ठासणे हे सध्या पाहण्यात येत आहे.एक महाफ्लॉप व्यक्तीने [ त्याला अभिनेता म्हणणे इतपत देखील त्याची पत नाही ] लोकांना चक्क धमकावायचा प्रयत्न केला. याच बरोबर दोबारा ला पहिल्या बारीतच घरी पाठवले. या पुढे बॉयकॉट कसे होईल ? तसे करण्यास यश मिळेल का ? याची उत्तरे येत्या काळातच मिळेलच. जाता जाता :- मैने कहा था न, एक दिन मैं हसूंगा तुम रोओगे. :- इति चतुर रामलिंगम :)))

मदनबाण.....


वाचने 34430
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

In reply to by आनन्दा

प्रश्न दुसरा आहे, असे जर भाजपने केले तरी त्याला राजकीय अधिष्ठान असल्याचे मानले जाऊ शकते, पण संघ ? एक म्हणजे संघ ही राजकीय संघटना नाही हे संघ कायम सांगत असतो, संघाची ताकद ही संघाचे कॅडर बेस्ड structure आहे, गडकरी स्वतः ह्या कॅडर मधून विद्यार्थी परिषद, युवा मोर्चा वगैरे इत्यादी करत वर चढले आहेत. गडकरी नवखे भाजप कॅडर नसून ओरिजिनल संघाचं कॅडर आहे. हेच करायचं तर काँग्रेस अन् भाजप (दुर्दैवाने आता संघ) फरक काय, त्यांनी जे काही पी व्ही नरसिंह राव ते हल्ली नटवर सिंह सोबत केले तेच जर इकडे रिपीट होणार असेल तर काय अर्थ आहे ? बॉटम लाईन - ह्यामुळे विरोधक भाजपवरील जे पक्षांतर्गत विचार वैविध्याला थारा न देण्याचा आरोप करतात तो संस्थात्मक पातळीवर जातो इतकेच म्हणणे आहे.

In reply to by जेम्स वांड

तुम्ही चुकीच्या दिशेला चालला आहात. गडकरी जाऊ नयेत अशी इच्छा आहे, गेलेत असे म्हटलेले नाही. बाकी इतर माध्यमे जे करतायत तेच तुम्ही पण केलेत शेवटी. पंकजा मुंडे - जनतेच्या मनातील मीच मुख्यमंत्री

In reply to by आनन्दा

गडकरी जाऊ नयेत अशी इच्छा आहे, गेलेत असे म्हटलेले नाही.
गडकरी गेलेत असे कुठे म्हणले आहे ? पण एकंदरीत गडकरी साईड लाईन झालेत हे नाकारण्यात काही पॉइंट नाही. . वरील फोटो पासून, संसदीय कार्य समिती बाहेर फेकला गेलेला माणूस होय गडकरी.. मला वाटतं एक चित्र १००० शब्दांपेक्षा जास्त बोलके असते, म्हणून इथेच थांबतो.

In reply to by आनन्दा

गडकरींना हटविण्याची तयारी सुरू, गडकरींचे पंख कापले इ. फक्त बिनडोक वाचाळ मूर्ख माध्यमांचे जावईशोध आहेत. मागील वर्षी विनोद तावडेंना राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नेमण्यात आले, पंकजा मुंडेंना कोणत्या तरी केंद्रीय समितीत घेतले तेव्हा याच मूर्ख माध्यमांनी गवगवा केला होता की या दोघांचे पुनर्वसन झाले. परंतु हे दोघे राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरील राजकारणात क्वचितच दिसतात. परंतु ते राजकारणातून जवळपास अदृश्य झाले आहेत. खरं त्यांना योजनाबद्ध पद्धतीने संपविण्यात आले आहे. परंतु मूर्ख माध्यमांना हे कळतच नाही. गडकरींच्या संदर्भात माध्यमांचा तोच मूर्खपणा सुरू आहे.

In reply to by श्रीगुरुजी

https://www.loksatta.com/desh-videsh/bjp-nitin-gadkari-delhi-srivinas-m… ही बातमी पहा, शीर्षक काय आणि बातमी काय याचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याला अजेंडा पत्रकारिता नाहीतर काय म्हणायचे? आणि अश्या गोष्टींच्या आधारावर गडकरी नाराज वगैरे ओरड चालू आहे..

In reply to by शाम भागवत

१. कितीही स्मायली टाकल्या तरीही तुमचा सात्विक संताप लपत नाहीये. २. फडणवीस वाईट्ट आहेतच असा तुमचा आग्रह असेल तर मान्य बुआ , तुमचा मान राखायचा म्हणून.

काँग्रेस नेते आणि हल्लीच काँग्रेस ग्रुप ऑफ २३ ह्या नाराज काँग्रेस नेत्यांच्या गटातील महत्वाचे नेते गुलाम नबी आझाद ह्यांचा काँग्रेस सभासदत्व आणि सर्व पार्टी पदावरून राजीनामा

In reply to by जेम्स वांड

कॉंग्रेसला अखेरची घरघर लागली आहे आणि हे ओळखूनच ३-४ दिवसांपूर्वीच सोनिया, राहुल व प्रियांका भारतातून कोठेतरी बाहेरच्या देशात गेले आहेत. ते अमेरिकेला रवाना झाले आहेत असे कॉंग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे. सोनिया गांधीची नियमित तपासणी हे सांगण्याचे कारण ( भारतात तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिक नसल्याने अत्यंत नाईलाजाने त्यांना अमेरिकेत जाऊन तपासणी करावी लागते). प्रत्यक्षात ते नक्की कशासाठी व कोणत्या देशात गेले आहेत परमेश्वर जाणे.

https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-uddhav-thackeray-sambhaji… चंद्रकांत पाटलांची निराशा. संभाजी ब्रिगेडने भाजपऐवजी सेनेच्या गळ्यात वरमाला घातली. काही महिन्यांपूर्वी पुरूषोत्तम खेडेकरने भाजपशी युती करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर चंद्रकांत पाटलांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्यावर, अश्या अत्यंत जातीयवादी संघटनेशी आम्ही अजिबात युती करणार नाही, असे थेट सांगण्याएवजी, आधी त्यांचा अधिकृत प्रस्ताव येऊ दे, मग विचार करू असे सांगून अश्या जातीयवादी संघटनेशी युती करण्यास आम्ही तयार आहोत असे प्रतिध्वनित केले होते. परंतु आता ब्रिगेडने सेनेची निवड केल्याने चंद्रकांत पाटील नक्की निराश झाले असणार. मुस्लिम लीग, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस अश्या तद्दन कट्टर जातीयवादी पक्षांशी युती केल्यानंतर आता ब्रिगेडशी युती करून शिवसेनेने आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. जातपात न पाळणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे अश्या भ्रमात असणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला असेल. ज्यांचे १८ पैकी १४ खासदार एकाच जातीचे आहेत, तो पक्ष जातीनिरपेक्ष असूच शकत नाही. ब्रिगेडशी युती करून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले इतकंच.

In reply to by श्रीगुरुजी

असंगाशी संग अन् प्राणाशी गाठ आणि विनाशकाले विपरीत बुद्धी ह्या दोन म्हणी प्रकर्षाने जाणवल्या.

In reply to by श्रीगुरुजी

शेकाप = कट्टर जातीयवादी? काय? त्यांचे नेते एक शरद जोशी म्हणून होते ना ? असो ब्रिगेड ला ठाकरे कसे चालतात? ठाकरे म्हणजे पाठारे प्रभू म्हणजे ब्रिगेड च्या दृष्टीने "शोषण करणारे सवर्ण" त्यात जखमेवर मीठ म्हणजे ठाकरेंची होम मिनिस्टर "पाटणकर"

In reply to by चौकस२१२

शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हा कट्टर जातीयवादी पक्ष होता. यांचे एक जुने नेते जेधे जाहीर सभेत एका विशिष्ट जातीला लक्ष्य करायचे. मुळात या पक्षाची स्थापनाच एका विशिष्ट जातीच्या द्वेषातून झाली होती. शरद जोशींचा व शेकापचा कणभरही संबंध नाही. शरद जोशी हे शेतकरी नेता. त्यांनी एक शेतकरी संघटना स्थापन करून सुरूवातीला कांद्याला भाव मिळण्यासाठी रस्ता रोको हे अभिनव आंदोलन सुरू केले होते ज्याची व्याप्ती नंतर खूप वाढली. ते उजव्या विचारांचे होते. शेतकऱ्यांवर, शेतमाल उत्पादनावर कोणतीही सरकारी बंधने नसावीत, सरकारने शेती या विषयात अजिबात लक्ष घालू नये, सरकारने किमान भाव वगैरे ठरवू नये, शेतकऱ्यांना स्वतःच भाव ठरविण्याचे स्वातंत्र्य असावे, डंकेल आणि गॅट हे करार शेतकऱ्यांना उपयुक्त आहेत असे त्यांचे मत होते. मोदींनी आणलेल्या कृषी कायद्यांचे त्यांनी स्वागत केले असते.

In reply to by श्रीगुरुजी

शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक शंकरराव मोरे यांनी शेकापची स्थापना का केली ते एकदा जालावर वाचून यायला पाहिजे. उगाच आपल्या शेठसारखी फेकाफेकी थापाथापी करु नये असे वाटते. कामगार वर्गाला, शेतक-याला, श्रमजीवी जो जो असेल त्या माणसाला समजेल उमजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन करुन सरळ अश्या सोप्या भाषेत मार्गदर्शन करुन खेड्यापाड्यात कॉंग्रेसच्या भांडवलदारी पुढारपणाला खाली खेचून श्रमजीवी वर्गला मार्क्सवादी विचारांच्या छावणीत आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आपल्या सिध्दहस्त लेखणीने व जुगलबंद वक्तृत्वाने शंकरराव मोरे यांनी पार पाडले. आजही मार्क्सवाद व लालबावटा खेड्या-पाड्यात दिसून येतो त्याचे कारण ते 'शेकाप' काम आहे. पहिल्याचे निवडणुकीत अठ्ठावीस आमदार निवडून आले. शंकरराव मोरे लोकसभेवर निवडून गेले. पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी नेमकी या पक्षात फ़ाटाफ़ूट झाली. सर्वाधिक विरोधी पक्षनेतेपद यांच्याकडेच राहीले तो रेकॉर्ड आजही अबाधित असावा. कॉंग्रेसच्या ध्येय धोरणाला विरोध केला म्हणून जातीयवादीपक्ष म्हणुन काँग्रेसने त्यावेळी टिका केलेली दिसते, तसा तो नव्हता ते स्पष्ट करण्याची गरज नाही. दुसरे नेते, केशवराव जेधे हे ब्राम्हणेतर चळवळीचे नेते होते, त्यामुळे 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर' या त्या काळाच्या वादात जेथे-जवळकरांच्या वकृत्वाने जे चटके दिले ते त्या काळच्या परिप्रेक्ष्यातून आज त्याची चर्चा करुन वाद वाढविण्यात अर्थ नाही. म्हणून थांबतो. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by श्रीगुरुजी

सतत असत्य लिहुन लिहुन, कोणतेही सत्य हे असत्यच असते. असे समजून लिहिलेला आपला अपेक्षित प्रतिसाद. चालु द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by श्रीगुरुजी

शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हा कट्टर जातीयवादी पक्ष होता. यांचे एक जुने नेते जेधे जाहीर सभेत एका विशिष्ट जातीला लक्ष्य करायचे. मुळात या पक्षाची स्थापनाच एका विशिष्ट जातीच्या द्वेषातून झाली होती.
शेकाप हा जातीयवादी पक्ष असल्याचे मी प्रथमच वाचतो आहे. एक नेता जातीयवादी वक्तव्य करायचा म्हणुन पुर्ण पक्ष जातीयवादी असे असेल तर किती पक्ष चांगले म्हणुन शिल्लक राहतील.

In reply to by Trump

शेकापच्या एका दुसऱ्या आमदाराने "शंबुकाचा खुनी राम व त्याची वानरसेना" या शीर्षकाचे पुस्तक लिहिले होते. या पक्षाची विचारसरणी आणि तामिळनाडूतील रामस्वामी नायकरच्या द्रविड कळघम या पक्षाच्या विचारसरणीत बरेच साम्य आहे. हिंदूविरोध, एका विशिष्ट जातीचा द्वेष हा समान पाया. द्रविड कळघमने तामिळ अस्मिता, द्रविड संस्कृती, आर्य अनार्य या अतिरिक्त गोष्टी वापरल्या. हे वाचा. शेकाप विचारसरणी संभाजी ब्रिगेडचा नेता प्रवीण गायकवाड काही वर्षांपूर्वी समविचारी शेकाप मध्ये गेला होता हे पुरेसे सूचक आहे.

Photos : आदित्य ठाकरेंनंतर शरद पवारांची नात आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार देशाचं प्रतिनिधित्व; जाणून घ्या देवयानी पवार आहेत तरी कोण? https://www.loksatta.com/photos/trending-gallery/3093715/ncp-sharad-paw…
शिवसेनेप्रमाणे आता राकॉचीपण आता राजकुमारी रिंगणात. इतरांच्या पोरांनी उचला सतरंज्या.

ताजी घडामोड : गुलाम नबी आझाद ह्यांचे सोनिया गांधींना लिहिलेले ०५ पानांचे स्फोटक राजीनामा पत्र

. (पान क्र. १) . (पान क्र. २) . (पान क्र. ३) . (पान क्र. ४) . (पान क्र. ५)

In reply to by जेम्स वांड

पत्र लिहिण्याएवढे स्वातंत्र्य आहे हे बघून बरे वाटले, नैतर गडकरी सारखे व्हायचे , आपलीच मोरी आणि मुतायची चोरी

In reply to by कपिलमुनी

विरोध ठीक आहे, पण आझाद गडकरींच्या पलीकडे गेलाय हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यानं स्वातंत्र्य आहे म्हणून नाही तर ते असो/ नसो फरक पडत नाही ह्या फ्रस्ट्रेशन मधून ते पत्र लिहिले आहे. गडकरी अजून तिथवर पोचलेले नाहीत अन् कदाचित मानसिकतेचा व्यावहारिक पिंड असल्यामुळे पोचणार सुद्धा नाहीत असे वाटते.

बातम्यातली ठळक बातमी NDTV ला अडानीने विकत घेतल. NDTV चे २९% शेअर अडानीने विकत घेतलेले आहेत. त्याच्या पुढे अजुन २६% शेअर हस्तांतरीत करुन NDTV ला पुर्ण आपल्या कब्ज्यात करायचा मानस आहे. अश्या प्रकारे पुरोगामी लिबरल लोकांचे मुखपत्र हरवले आहे. ह्या अपसेटींग घडामोडीची काहीच कल्पना NDTV च्या मालकांना म्हणजे प्रणय रॉय , राधिका रॉय ह्यांना नव्हती असा दावा उभयतांनी केलेला आहे. अडानी NDTV च शेअर खरेदी करणार ह्याची चर्चा गेले वर्षभर मिडीयातुन होत होती. ह्या बातमीच्या निमित्याने मिडीयात आलेल्या लिबरल पुरोगामी लोकांचे व्यक्तव्य !! रविश कुमार : "NDTV मधुन मी ( रविश कुमार ) राजिनामा देणार" ही बातमी "रविश कुमार कडुन घेतल्या जाणार्या मुलाखतीला मोदीजी तयार झाले आहेत" ह्या बातमी ईतकीच खरी आहे. https://youtu.be/Fqx4txHP4xQ ईशकरण सिंग

In reply to by डँबिस००७

आदनींनी थेट समभाग विकत घेतले नाहीत. ज्या कंपनीने ndtv ला समभागावर कर्ज दिले होते ती कंपनी विकत आहे. पूर्वी तीच कंपनी अंबाणी कडे होती. म्हणजेच ndtv चे समभाग आंबनिकडून अडणीकडे आलेत.

टिपू सुलतान म्हणजे ‘मुस्लीम गुंड’, भाजपा आमदाराचं विधान, जीभ कापून टाकण्याची धमकी https://www.loksatta.com/desh-videsh/karnataka-bjp-ks-eshwarappa-tipu-s… ईश्वरप्पा यांनी आपण सर्व मुस्लीम गुंड असल्याचं म्हटलेलं नसून, आपण कोणत्याही धमकीला घाबरत नसल्याचं सांगितलं आहे.

In reply to by आनन्दा

अबाना मिपावर कोणीतरी जाम सणकवलेलं दिसतय. ते सध्या माबोवर असुन मिपावर आणी माबोवर कॉमन असणार्‍या काही लोकांवर वड्याचं तेल काढत आहेत.

In reply to by जेम्स वांड

बरोबर, कारण तुम्ही दोन्हीकडे एकाच आयडीने वावरता म्हणुन पटकन उठुन दिसता. अबाना सोपं गेल तुमच्यावर शरसंधान करणं. असो. काही मुद्दे योग्य असायचे पण जिथे तिथे चिडीला येण सगळीकडेच चालत नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आंजावर एक से एक धुरंधर आहेत. त्यात आपली मेणबत्ती आपण नीट सांभाळली नाही तर विझते वर मेणाचा चटका आपल्यालाच.

In reply to by श्रीगुरुजी

मे बी अमेरिकेतील भारतीय आणी वर्णद्वेष या धाग्यावर पण आता त्यांचा प्रतिसाद दिसत नाहीये.

In reply to by इरसाल

श्री राजेश उर्फ श्री सुनिल कचुरे पण आहेत तिथे. तिथे ठरविक आयडी लिहायला लागले की बाकीचे कोणी लिहित नाही. असो येथे मी त्याविषयी जास्त लिहीत नाही, उगाचच हा धागा भलतीकडे जायचा.

In reply to by ॲबसेंट माइंडेड…

विनाशकाले विपरीत बुद्धी कि बारामतीच्य्या काकांची करामत ! असो ब्रिगेड काहीतरी "कनश्रक्टिव्ह " शिकवेल उद्धवसेनेला .. मोडेन पण वाकणार नाही ( मोडेनच ) असे ऐकिवात होते कि भाजप मित्रपक्षांना संपवावयाला बसलेली असते पण हाय्ला इथे तर काका पण हाच उद्योग करीत आहेत

In reply to by चौकस२१२

ही युती होण्यामागे काकांचा हात दिसत नाही. आपल्या पक्षाला अखेरची घरघर लागली आहे हे ठाकरेंनी ओळखले आहे (खरं तर २०१७ मध्येच अखेरची घरघर लागली होती व २०१९ मध्ये कारभार आटोपला असता.). त्यामुळे अखेरची धडपड सुरू आहे.

In reply to by जेम्स वांड

ह्या बिग्रेड व शिवसेना युतीवरुन कोला वॉर आठवले. पेप्सी व कोक तेव्हा भारताची बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न करत होते. पेप्सी कंपनी आधी आली होती व कोकाकोला नंतर आले. तर पेप्सीने कोकाकोलाच्या कोकलाच थेट टारगेट केले. आम्ची पेप्सी विरूद्ध त्यांचा कोला असा डायरेक्ट सामना असल्याचे भासविले त्यावर कोकाकोला ने स्प्राईट हे शीतपेय लॉन्च केले. आणि स्प्राईटच्या सगळ्या जाहीरातीत पेप्सीला टारगेट केले गेले म्हणजे पेप्सीची स्पर्धा आमच्या मुख्य कोलाशी नसुन नुकत्याच आलेल्या लिंबुटिंबु स्प्राईटशी आहे असे काहीसे बिंबवले गेले. इथे ही काकांनी शिवसेनेला पहिल्या रांगेतल्या राष्ट्रवादीसोबत न बसवता फक्त उप्द्रव मुल्य व कार्यकर्त्या पातळीवरच्या संभाजी बिग्रेड सोबत पाट लावुन दिला आहे.उद्या राष्ट्रवादीच्या वरातीत बिग्रेडबरोबरच आता शिवसेनेचे कार्यकर्तेही नाचताना दिसले तर फार आश्चर्य वाटायला नको.

In reply to by श्रीगुरुजी

युतीच करायची तर प्रकाश आंबेडकरांबरोबर करायची होती मग किंवा रामदास भाऊ आठवलेंना भाजप पासून फोडता आले तर बघायायचे होते

In reply to by श्रीगुरुजी

प्रकाश आंबेडकर ना कणभरही जनाधार नाही.???? आ ! मागे प्रकाश राव आणि कोल्हापुरचे वंशज भेटले होते, तेव्हा "महाराष्ट्राचे राजकारण हादरनार होतेना" ! दोन दिग्गजांची ना भूतो ना भविष्यात्त भेट वैगरे बराच काही कल्पनाविलास झाला होत त्यावरून वाटले कि प्रत्यक्ष नातवाला आणि १३ व्या वंशजांना खूपच मोठा जनाधार आहे म्हणून ! नुसतीच हवा कि काय

In reply to by चौकस२१२

प्रकाश आंबेडकर १९९०-९६ या काळात राज्यसभेत राष्ट्रपतीनियुक्त खासदार होते. १९९८ व १९९९ मध्ये ते कॉंग्रेसच्या पाठिंब्याने लोकसभेत निवडून आले. २००४ मध्ये कॉंग्रेसने पाठिंबा न दिल्याने पराभव झाला. २०१९ मध्ये एम आय एम बरोबर युती करूनही सोलापूर लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. निष्कर्ष - जनाधार नसल्याने ते स्वबळावर निवडून येऊ शकत नाहीत. संभाजीराव भोसले २००९ लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकिटावर असूनही अपक्ष सदाशिव मंडलिकांविरूद्ध पराभव झाला. २००९ विधानसभा निवडणुकीत त्यांचे बंधू कोल्हापुरात हरले. संभाजीराव २०१६-२०२२ या काळात राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त खासदार होते. जनाधार नसल्याने त्यांनी सर्वपक्षीय पाठिंबा मागून अपक्ष म्हणून बिनविरोध राज्यसभेत जायचा प्रयत्न केला. परंतु त्यांना पवारांनी पाठिंबा दिला नाही व शिवसेनेत आला तरच खासदारकीला पाठिंबा देऊ अशी उद्धव ठाकरेंनी अट घातल्याने त्यांनी खासदारकीचा नाद सोडला.

कोणी कोणाशीही युती करो. शिंदे + फडणवीस युती बुलंद होत जाणार. कारण? दोघांचे विरोधकांना एकच म्हणणे आहे. आम्ही चिरेबंदी वाड्यात राहतो. यास्तव काचेच्या घरात राहणा-यांनी आमच्या घरावर दगडं मारू नयेत. शिंदे फडणवीसांबरोबर पृथ्विराज आलेले चालतील. पण तो योग नाही. :)

In reply to by Trump

उठांना पर्याय शोधणे सुरू होते. आता शिंदेसारखा आस्तिक, हिदुत्ववादी भक्कम पर्याय मिळालाय. त्यामुळे भाजपाची यापुढची वाटचाल खूपच सुकर होईल असं दिसतंय. अपांची आता भाजपाला जरूरी नाही. भाजपाची मतदान टक्केवारीची मर्यादा आता ३५ च्या पुढे जाणार हे आता नक्की झालंय. "दीड दिवसाचे सरकार हाच योग्य पर्याय होता हे तुम्हाला आता कळून चुकेल" अस वक्तव्य फडणवीसांनी विधानसभेत दादांना उद्देशून केलं. त्यातला गर्भीत इशारा योग्य ठिकाणी गेला नसेल असे वाटत नाही. बाकी पाय ओढाओढीच्या पक्षीय राजकारणात मला रस नाही. महाराष्ट्राच्या भल्यात मला रस आहे. सध्या तरी शिंदे+फडणवीस यांच्यापेक्षा चांगला पर्याय दिसत नाहीये. :) शिव्याशाप देण्यात मला कणभरही एनर्जी वाया घालवायची नसल्याने मी चांगले जे काही आहे तेच शोधण्याचा प्रयत्न करणार. असो.

In reply to by शाम भागवत

भाजपाची मतदान टक्केवारीची मर्यादा आता ३५ च्या पुढे जाणार हे आता नक्की झालंय. 😀 😁 😂 😃 😄 😅 😆

ब्रिगेडशी युती केल्याने आपल्या तोंडचा घास ठाकरेंनी पळविल्याने भाजपला संताप अनावर झाला आहे. काही महिन्यांपूर्वी ब्रिगेडच्या खेडकरांनी भाजपशी युती करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर चंद्रकांत पाटलांनी युती करणार नाही असे न म्हणता ब्रिगेडने युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करू असे सकारात्मक उत्तर दिले होते. तेव्हा ब्रिगेडने स्वातंत्र्यवीर सावरकर, रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव, बाबासाहेब पुरंदरे, पेशवे, ब्राह्मण इ. विषयी अर्वाच्य लेखनातून व आरोपातून जे विष पसरविले होते, कोकाटेकडून नव्याने द्वेषी इतिहास लिहिला होता इ. गोष्टींचा सोयिस्कर विसर पडला होता. आता ठाकरेंनी युती केल्यानंतर बाळ ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा वगैरे भाजपने बोलून बाळ ठाकरेंचे दाखले देणे म्हणजे कोल्ह्याला द्राक्षे आंबट.

In reply to by आनन्दा

महाराष्ट्र भाजपला युतीसाठी तालिबान, एम आय एम सुद्धा चालतील. मेटे तर त्यांच्या जवळपास सुद्धा नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी याला सुंठीवाचून खोकला गेला असे म्हणता येईल. किंवा पाहुण्याच्या हातून साप मारला जातोय. पाहुणा मरतोय की साप? आपल्याला काय घेणे देणे आहे?

In reply to by सुबोध खरे

हेच म्हणतोय. उघड उघड नकार देऊन बिग्रेड ला नाराज करु शकत नव्हते व होकार दिला असता तर नसती ब्याद गळ्यात पाडुन घेतल्यासारखे झाले असते. थोडक्यात नरो वा कुंजरो वा असा पवित्रा घेतला भाजपाने. बिग्रेडच्या ब्राह्मणद्वेषी अजेंड्याला शिवसेना कशा पध्दतीने हाताळते हे पाहण्यासारखे होणार आता.

In reply to by सुबोध खरे

ब्रिगेड हा साप आहे किंवा खोकला आहे असे भाजपला वाटत होते का? भाजपने सुद्धा ब्रिगेडबरोबर युती केली असती.

In reply to by सुबोध खरे

ब्रिगेड हा साप आहे किंवा खोकला आहे असे भाजपला वाटत होते का? भाजपने सुद्धा ब्रिगेडबरोबर युती केली असती.

संभाजी ब्रिगेडच्या पुरूषोत्तम खेडेकरांनी भाजपशी युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता तर दरेकरांनी प्रस्तावाचे स्वागत केले होते.

In reply to by मदनबाण

कैदी हे convict झाले २००८ साली, १४ वर्षे त्यांनी शिक्षा भोगली, त्यांनी अगोदर प्ली टाकली ती रेमिशन पॉलिसी १९९२ बेसिस वर, ते बेसिस अन् ती रेमिशन पॉलिसी सरकारने २०१४ मध्ये स्क्रॅप केली आहे, आता कैद्यांकडून हा प्रतिवाद आला की त्यांना शिक्षा झाली तेव्हा रेमिशन पॉलिसी ऑफ १९९२ चलनात असल्यामुळे त्यांना ती पॉलिसी वापरून रेमिशन द्यावे. इथून legal प्रश्न सुरू होतो , तांत्रिक का मानवतावादी ? तांत्रिक दृष्टीने १९९२ पॉलिसी वापरली जाऊ शकेल कदाचित, पण गुन्ह्याचे स्वरूप पाहून २०१४ पॉलिसी उपलब्ध असताना अपलाय करता आली असती असाही एक मतप्रवाह आहे (मला वैयक्तिक हा पटतो) तरीही ह्यात आपण बिल्कीसचे तीन वर्षीय पोर आपटून मारणे, त्या आरोपींचा स्थानिक विहीप कार्यालयात सत्कार होणे, भाजपचे स्थानिक आमदार सी के राऊलजी ह्यांनी त्यांची "ते संस्कार असणारे संस्कराशिल ब्राह्मण आहेत" छाप भलामण करणे इत्यादी मुद्दे घेतलेले नाहीत. बॉस, तुम्हाला काय म्हणायचं आहे हे तुमच्यापाशी, पण बिल्कीस बलात्कारी बाहेर सोडणे हे मला वैयक्तिक, हिंदू अन् भारतीय अश्या तिन्ही प्लेंस वर निषेधार्ह वाटते. गंमत म्हणजे सी के राऊलजी हे भाजप आमदार २०१७ मध्ये तिकिटाच्या अपेक्षेने भाजपचे सभासद झाले असून ते मूळचे जुन्या पठडीतले काँग्रेसी नेता होते, २०१२ निवडणूक त्यांनी काँग्रेसकडून जिंकली आहे असे समजते, त्या अगोदर अर्थातच "२००२ बद्दल" मोदींच्या विरुद्ध शंख केला होता पण त्याबद्दल त्यांचा पक्षप्रवेश पण थांबला नाही किंवा पवित्र करून घेऊन आमदारकी देणे पण असे एकंदरीत दिसते आहे.

In reply to by जेम्स वांड

जो येईल त्याला पक्षात घेऊन पावन करणे भाजपला भविष्यात महागात जाईल. महाराष्ट्रात या प्रकाराचा अतिरेक झाला आहे. कालांतराने पक्षाची मूळ ओळख पूर्णपणे पुसली जाईल.

In reply to by श्रीगुरुजी

१००% सहमत आहे. पक्षात येऊ द्यावे पण कमीत कमी ५ वर्षे कुठलेही महत्त्वाचे पद, उमेदवारी देऊ नये. ५ वर्षे पक्षात टिकला तर नंतर विचार करावा. अवांतर : भारतीय जनता पक्षाचे नाव भारतीय पतितपावन पक्ष (बीपीपी) असे करावे असा ठराव करावा काय ? अतिअवांतर : आम्ही भाजपाचे निष्ठावान मतदार असून तुमच्या पतितपावन प्रकारामुळे आम्ही नाराज आहोत आणि असेच चालू राहिले तर पुढील निवडणूकीत तुम्हाला मत देणार नाही हे कळविण्यासाठी भाजपाचा अधिकृत विरोपाचा पत्ता असेल तर त्यावर एखादे पाच पन्नास सह्यांचे निवेदन पाठवावे म्हणतो. अति अति अवांतर : संघाच्या रिमोट मधील बॅटरी संपली की काय ? अजिबात चालतच नाही असे दिसतयं.

In reply to by धर्मराजमुटके

महाराष्ट्र विधानसभा व स्थानिक निवडणुकीत मी भाजपला मत देणे २०१७ पासून थांबवलंय. स्वतःच्या खुर्चीसाठी अत्यंत भ्रष्ट, जातीयवादी कंडम नेत्यांना पायघड्या घालून पक्षात आणून पावन करून ३०-३० वर्षे पक्षात असणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडने युतीची इच्छा व्यक्त केल्यावर थेट नाही म्हणण्याऐवजी त्या करंट्या नेत्यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले होते. आता शिवसेनेने युती केल्यावर मत्सर वाटून विनाशकाले विपरीत बुद्धी अशी कुजकट प्रतिक्रिया देत आहेत. मला हे अजिबात मान्य नाही. त्यामुळे माझ्या हातात जे आहे ते मी करतोय.

In reply to by श्रीगुरुजी

त्यामुळे माझ्या हातात जे आहे ते मी करतोय.
तुम्ही जे करता आहात ते बरोबरच आहे. पण भारतीय पतितपावन पक्षाला आपण चुकतोय याची जाणिव करुन देण्याची वेळ आली आहे आणि ही जाणिव केवळ मतदानाच्या दिवशी होऊन फायदा नाही. त्यांना ते अगोदरच सांगीतले पाहिजे आणि मतदाराने देखील सांगीतले पाहिजे असे मला वाटते.

In reply to by धर्मराजमुटके

सध्या ताकतवाण विरोधी पक्ष नाही त्यामुळे लोकं आपल्यालाच मतं देणारं हा समज भाजपचा झालेला आहे. याबरोबरच ed , cbi यांचा पुरेपूर गैरवापर करून घायला आहेतच. ह्याचा फायदा केजरीवालांनी घायला पाहिजे, फक्त त्यांना २०२४ लाच पंतप्रधानांची स्वप्नं नको पडायला.

In reply to by रात्रीचे चांदणे

केजरीवाल ह्यांना अजून परिपक्व होण्याची गरज आहे, प्रवास त्यांचा नीट सुरू आहे पण अजूनही पल्ला गाठावा लागणार आहे त्यांना. आधी त्यांनी सुरुवात वावदुक विधाने करून केली, पंतप्रधान मोदींना सायकोप्याथ वगैरे म्हणून झाले त्यांचे नंतर आंतरराष्ट्रीय परिसंवादात अन् diplomatic meetings मध्ये चपला घालून जाणे झाले, पण नंतर त्यांना कळले (अशी अपेक्षा तरी आहे) की मोदींना जितक्या शिव्या देतील ते तितके मोदीच मोठे होतील, रेटिंग वाढतील त्यांची, त्यामुळे तूर्तास वैयक्तिक मोदींना टार्गेट करण्याचे सोडून त्यांनी भाजपला एक पक्ष म्हणून टार्गेट करणे सुरू केले आहे, उत्तम आहे अन् राजकीय पठडीतले आहे हे चेंजेस, पुढे बघायचे काय काय होईल ते.

नेतेमंडळी जर खोके, डब्बे घेऊन विकली जात असतील तर मतदारांनीच काय घोडं मारलय ? पहिल्यांदा झोपडपट्टीवाले पैसे घेऊन मतदान करतात असे ऐकले की राग यायचा (फक्त ऐकले आहे, पाहिले नाही) पण आता मागे वळून पाहिलं की तेच आपल्यापेक्षा जास्त शहाणे आहेत असे वाटते.

“मला गोमांस खायला आवडतं” ‘बॉयकॉट ब्रम्हास्त्र’ दरम्यान रणबीर कपूरचं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत बॉलीवूडवाले शेखचिल्ली बन रहेल्ले है, जिस फांदी पे बैठेले, उसी को च काट रेले, लगता अपनी कबर अपने हातो खुदवाके ही दम लेंगे !