Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by Trump on Wed, 06/29/2022 - 23:04
मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण? ------ हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल. शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला. राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला. कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला. भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच. जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.
  • Log in or register to post comments
  • 38732 views

प्रतिक्रिया

Submitted by गणेशा on गुरुवार, 06/30/2022 - 19:00

In reply to या सगळ्या गदारोळात खरा गेम by गणेशा

Permalink

आणि मंत्रीमंडळात सहभागी होणार

आणि मंत्रीमंडळात सहभागी होणार नाही असं फडणवीस म्हणताच, जे पी नड्डा ने आदेश दिल्यावर लगेच तसं करावंच लागलं.. आणि मास्टरस्ट्रोक म्हणायचा असेल तर याला उपमास्टरस्ट्रोक म्हणावा :-)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 06/30/2022 - 20:03

In reply to आणि मंत्रीमंडळात सहभागी होणार by गणेशा

Permalink

जे पी नड्डा ने आदेश दिल्यावर

जे पी नड्डा ने आदेश दिल्यावर लगेच तसं करावंच लागलं.. अर्ध्या तासात तोंडावर पडायला झालं पहा
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 06/30/2022 - 19:22

In reply to या सगळ्या गदारोळात खरा गेम by गणेशा

Permalink

परफेक्ट प्रतिसाद.

परफेक्ट प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on गुरुवार, 06/30/2022 - 19:45

In reply to या सगळ्या गदारोळात खरा गेम by गणेशा

Permalink

या सगळ्या गदारोळात खरा गेम

या सगळ्या गदारोळात खरा गेम फडणवीस चा झाला आहे. -- Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 06/30/2022 - 19:48

In reply to या सगळ्या गदारोळात खरा गेम by प्रसाद_१९८२

Permalink

नाही

नाही फडणवीस उप मुख्यमंत्री होणार आहेत. आणि बहुधा गृह खाते सुद्धा स्वतः कडे ठेवतील असा माझा कयास आहे. बाकी-- किरीट सोमय्या याना अर्थ मंत्री करायला पाहिजे म्हणजे मग राष्ट्रवादी आणि राऊत परब सारख्यांची गम्मत पाहायला लै म्हणजे लैच मजा येईल ( अर्थात असे काही होणार नाही हा भाग अलाहिदा)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 06/30/2022 - 19:36

Permalink

आपल्या दोघांच्या अफाट

आपल्या दोघांच्या अफाट बुद्धीमत्तेला आणि अचाट विश्लेषण शक्तीला चार सलाम. जाता जाता -- आता महाराष्ट्र म्हणजे कोणती शिवसेना? श्री उद्धव ठाकरे यांची कि श्री एकनाथ शिंदे
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 06/30/2022 - 19:49

In reply to आपल्या दोघांच्या अफाट by सुबोध खरे

Permalink

फायली “क्लीअर” झाल्याकी परत

फायली “क्लीअर” झाल्याकी परत ऊध्दव ठाकरेंकडे परत आलेल्या आमदारांची. :)
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 06/30/2022 - 20:12

In reply to आपल्या दोघांच्या अफाट by सुबोध खरे

Permalink

महाराष्ट्र कोणता पक्ष नाही..

महाराष्ट्र कोणता पक्ष नाही.. पण सत्तेत सुद्धा - शिवसेना.. विरोधात पण - शिवसेना... स्वतःला समुद्र म्हणताना त्याचे ठाण्यातील खाडीत रूपांतर कधी झाले हे कळाले पण नाही.. शिवसेना संपवण्याचे मनसुभे मनात होते.. मनातच राहिले
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 06/30/2022 - 20:02

Permalink

ऊध्दव ठाकरेंकडे परत आलेल्या

ऊध्दव ठाकरेंकडे परत आलेल्या आमदारांची हमे मालूम है कि ये झूट है मगर दिल बहलाने के लिये ये खयाल अच्छा है गालिब
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Fri, 07/01/2022 - 11:04

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 07/01/2022 - 11:26

Permalink

फडणवीसांनी केंद्राकडे जाणे योग्य होईल.

सर्व अभ्यासू लोकांनी/ उमेदवारांनी लोकसभा हेच ध्येय ठेवावं.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Fri, 07/01/2022 - 11:59

Permalink

मविआची सत्ता गेली, देशाचे

मविआची सत्ता गेली, देशाचे चाणक्याच्या नाका खालुन पण ईथल्या ह्यांना दे फ तोंड घशी पडला ह्याची काळजी पडलीय. देफ ची खरी धास्ती जेल मध्ये गेले अनेक महीने पडुन असलेल्याम्ना, श. प. सं रा यांना आहे. कारण केंद्र सरकार व राज्य सरकार मिळुन आता हतोडा चालवणार. देफ मुख्य मंत्री नाहीत हे बरेच आहे कारण महाराष्ट्राला परत प्रगती पथावर न्यायला लागेल तसे प्रखर निर्णय आता घेता येतील.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 07/01/2022 - 12:12

Permalink

उद्याच्या विश्वास ठराव विरोध

उद्याच्या विश्वास ठराव विरोध करणारी याचिका शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तातडीने सुनावणी देण्यास नकार दिला आहे. परंतु हि याचिका सुद्धा इतर याचिकांबरोबर १२ जुलैलाच सुनावणी साठी घेण्यास मान्यता दिली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 07/01/2022 - 12:20

Permalink

फडणवीस शपथवीधी वेळी नाराज

फडणवीस शपथवीधी वेळी नाराज दिसत होते म्हणे. शरद पवारांनी हे हेरलं. https://www.sarkarnama.in/amp/story/vishesh/fadnavis-was-not-ready-to-post-of-dcm-says-sharad-pawar-yk75
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Fri, 07/01/2022 - 12:32

In reply to फडणवीस शपथवीधी वेळी नाराज by अमरेंद्र बाहुबली

Permalink

बरोबर काम करणारे १०-१२ मंत्री

बरोबर काम करणारे १०-१२ मंत्री नाराज आहेत हे ज्याला कळाल नाही त्याला मंचावर बसलेले दे फा नाराज होते हे दिसले म्हणजे फारच तिक्ष्ण दुरदृष्टी म्हणायची !!
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 07/01/2022 - 13:02

In reply to बरोबर काम करणारे १०-१२ मंत्री by डँबिस००७

Permalink

फडणवींसांचे डोळे पाणावले होते

फडणवींसांचे डोळे पाणावले होते असं धनंजय महाडीक ह्यांनी सांगीतले. आजच्या मटाला बातमी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Fri, 07/01/2022 - 12:57

In reply to फडणवीस शपथवीधी वेळी नाराज by अमरेंद्र बाहुबली

Permalink

वराती मागून घोडे

आता काय हेरत बसले आहेत? त्याचा काय उपयोग आहे? राष्ट्रपतीचा उमेदवार निवडीचे उपदव्याप करण्यासाठी दिल्ली वा-या करण्यापेक्षा, शिंदे गटाची नाराजी वेळीच हेरली असती तर जास्त बरं झालं असतं. पण नियतीलाच ते मान्य नव्हतं म्हटल्यावर..... असो.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Fri, 07/01/2022 - 13:34

In reply to वराती मागून घोडे by शाम भागवत

Permalink

शिंदे गटाची नाराजी वेळीच

शिंदे गटाची नाराजी वेळीच हेरली असती
हेरली असावी नक्कीच काकांनी व हेतुपुर्र्स्सर कानाडोळा केला असावा. काट्याने काटा काढला गेला. आतापर्यंतच्या चित्रानुसार तरी राष्ट्रवादीला खुले रान मिळाले आहे. मागच्या वेळेला काकांनी पावसात भिजुन बाजी मारली ह्यावेळेला आलेल्या ह्या राजकिय सुनामीत तेल लावुन कोरडे ठणठणीत राहिले. काका रॉक्स ऑलवेज.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 07/01/2022 - 13:36

In reply to शिंदे गटाची नाराजी वेळीच by कानडाऊ योगेशु

Permalink

काका रॉक्स ऑलवेज.

काका रॉक्स ऑलवेज. हेच मी नेहमी ईथे सांगीतलं की लगेच काकाद्वेष्टे दांडपट्टा घेऊन लढाई करायला येतात. काकाद्वेष्ट्यांना काका काय चीज आहे हे कधीच कळनार नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Fri, 07/01/2022 - 18:51

In reply to काका रॉक्स ऑलवेज. by अमरेंद्र बाहुबली

Permalink

अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि

अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि भाजपद्वेषामुळे तुम्हाला भाजपाच्या विरोधात जे आहे ते सगळेच योग्य आहेत असे वाटते. पण इथे वस्तुनिष्ठपणे पाहु गेले तर काकांनी शिवसेनेचा भाजपविरूध्द वापर करुन शिवसेनेला वार्यावर सोडुन दिलेले आहे.राजकिय दृष्ट्या त्यात काही चूक नसावी कारण शिवसेना सुध्दा स्वतःच मतलब साधण्यासाठी राष्ट्रवादी सोबत पाट लावुन उभी होती.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 07/01/2022 - 19:28

In reply to अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि by कानडाऊ योगेशु

Permalink

अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि

अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि भाजपद्वेषामुळे तुम्हाला भाजपाच्या विरोधात जे आहे ते सगळेच योग्य आहेत असे वाटते आजीबात नाही. मी काकाद्वेष्ट्यांसारखा नाही. काका विरूध्द जे ते तुम्हाला जसं बरोबर वाटतं तसा मी नाही. काकांनी शिवसेनेचा भाजपविरूध्द वापर करुन शिवसेनेला वार्यावर सोडुन दिलेले आहे. हे कधी झालं?? काकाचर शेवटपर्यंत सोबत होते. गद्दारी आपल्या माणसांनी केली.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Fri, 07/01/2022 - 21:24

In reply to अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि by अमरेंद्र बाहुबली

Permalink

गद्दारी आपल्या माणसांनी केली.

गद्दारी आपल्या माणसांनी केली.
गद्दारीचा काकांना पुरेपुर अनुभव आहे. गद्दारी शिवसेनेच्या माणसांनी शिवसेनेशी केली. गद्दारी होणार हे काकांना हे माहीती नसणे हे मानणे म्हणजे काकांच्या कुवतीवरच शंका घेण्यासारखे होईल.पाहुण्याच्या काठीने साप मरत असताना काका सोयीस्कर रित्या मौन राहिले.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 07/01/2022 - 21:52

In reply to गद्दारी आपल्या माणसांनी केली. by कानडाऊ योगेशु

Permalink

गद्दारी होणार हे काकांना हे

गद्दारी होणार हे काकांना हे माहीती नसणे हे मानणे म्हणजे काकांच्या कुवतीवरच शंका घेण्यासारखे होईल. काकांना माहीत असेल/नसेल तरी काय फरक पडतो? काका प्रत्येक गोष्ट रोखूशकत नाहीत. आता पहाना फडणवीसांचा गेम अमीत शहांनी केलाय हे पुर्ण महाराष्ट्र भाजपला माहीतीय. पण कुणई काही वाकडं करू शकतं का त्यांचं? नाहीना? हेही तसंच.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Fri, 07/01/2022 - 23:02

In reply to गद्दारी होणार हे काकांना हे by अमरेंद्र बाहुबली

Permalink

असो. पुढे बोलण्यात काही अर्थ

असो. पुढे बोलण्यात काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Fri, 07/01/2022 - 14:09

In reply to शिंदे गटाची नाराजी वेळीच by कानडाऊ योगेशु

Permalink

कोणत्याही परिस्थितीत आपली

कोणत्याही परिस्थितीत आपली बाजु भक्कम होइल अशी खेळी केली असती तर शरद पवार चाणक्य ठरले असते. पण एकनाथ शिंदेचे ईतक्या आमदारांना घेऊन मुंबई सोडुन सुरतला जाणे आणी त्यानंतर गोहत्तीला जाऊन सुरक्षित रहाणे हे कोणाच्याही स्वप्नात आले नव्हते. भाजपाचा ह्याला सपोर्ट होता हे एकदम स्पष्ट आहे. आता सर कार बदलले आहे जे श प च्या एकदम विरोधात जाणार आहे. १. अनिल देशमुख व नवाब मलिक जेल मध्ये आहेत. त्या दोघांनाही एकदम वार्यावर सोडणे श पंना राजकीयदृष्ट्या जमणार नाही. त्यातल्या एकाला जेल मधुन सोडवणे हे त्यापेक्षा तापदायक ठरेल. २. म राज्यात सरकार काँग्रेसच्या भागिदारीत असल्याने राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत श पंना वजन होत, आता ते वजन नाहीस झालेल आहे. ३. श पच्यां कुदुंबावर ईडीच्या केसेस आहेत. त्यासाठी कोणताच लिव्हरेज आता हाती उरलेला नाही. ४. आता ईडीने त्रस्त झालेल्या संजय राऊतचे खरे स्वरुप हळुहळु बाहेर पडेल. जो ह्या सर्व केसे स मधुन बाहेर प डा यला मदत करणार नाही त्याच्या वर तोंड सुख घेईल. त्याला सुद्धा श प कडुन बर्याच होप्स आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 07/01/2022 - 19:03

In reply to शिंदे गटाची नाराजी वेळीच by कानडाऊ योगेशु

Permalink

काका रॉक्स ऑलवेज.

काका रॉक्स ऑलवेज. हायला काकांचे दोन मंत्री वर्षभर आतमध्ये आहेत आणि काका काय रॉक शो करताहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Fri, 07/01/2022 - 21:21

In reply to काका रॉक्स ऑलवेज. by सुबोध खरे

Permalink

काका सत्तेसाठी कोणा व्यक्तीशी

काका सत्तेसाठी कोणा व्यक्तीशी बांधील नाहीत. कुणाचाही कसाही वापर करु शकतात. (पवार <-> वापर).
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 07/01/2022 - 21:54

In reply to काका सत्तेसाठी कोणा व्यक्तीशी by कानडाऊ योगेशु

Permalink

काकाद्वेष्ट्यांना हे नाही

काकाद्वेष्ट्यांना हे नाही दिसत का की काका कुनालाही मॅनूपूलेट करू शकतात?? रात्री दोन वाजता राष्ट्रपतीला सही करायला लावली होती काकानी राष्ट्रपती राजवट ऊठवन्यासाठी.:) डोन्ट अंडरस्टीमेट काका.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 07/02/2022 - 09:26

In reply to काकाद्वेष्ट्यांना हे नाही by अमरेंद्र बाहुबली

Permalink

डोन्ट अंडरस्टीमेट काका.

डोन्ट अंडरस्टीमेट काका. डोन्ट ओव्हर एस्टीमेट काका. ज्यांना तीन वेळेस मुख्यमंत्री होऊन सुद्धा स्वतःचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. ज्यांना स्वतःच्या दोन मंत्र्यांना तुरूंगातून एक वर्ष भर काढता आलं नाही. ज्यांना आजतागायत महाराष्ट्रात दोन आकडी खासदार आणि तीन आकडी आमदार निवडून आणता आले नाहीत. त्यांच्या पेक्षा ममता बॅनर्जी, एन टी रामा राव, बिजू पटनायक, जयललिता, मायावती, मुलायम सिंह, लालू प्रसाद, करुणानिधी,चंद्राबाबू नायडू, एच डी देवे गौडा, चंद्रशेखर, चौधरी चरणसिंह असे अनेक स्थानीय नेते किती तरी पटीने जास्त यशस्वी झालेले आहेत हे स्पष्ट असताना काका म्हणजे देव समजणाऱ्या महागुलामांच्या अकलेची कीव येते.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 07/02/2022 - 09:34

In reply to डोन्ट अंडरस्टीमेट काका. by सुबोध खरे

Permalink

५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता

५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. कटकारस्थाने करून, सहकार्यांना घोटाळे वगैरेत अडकवून पाच वर्षे फक्त खुर्ची खुर्ची करनार्यांमधले काका नाहीत. अश्यांचं नंतर काय होतं पाहताय ना?? ज्यांना स्वतःच्या दोन मंत्र्यांना तुरूंगातून एक वर्ष भर काढता आलं नाही. ते प्रामाणीक आहेत म्हणून. नाहीतर कधीच क्लिनचीट दिली असती काकानी. बच्चू कडूना नाही का परवाच क्लिनचीट मिळाली. ज्यांना आजतागायत महाराष्ट्रात दोन आकडी खासदार आणि तीन आकडी आमदार निवडून आणता आले नाहीत. ज्यानी निवडूण आणले त्यांना घरी बसवून तर दाखवले ना :) त्यांच्या पेक्षा ममता बॅनर्जी, एन टी रामा राव, बिजू पटनायक, जयललिता, मायावती, मुलायम सिंह, लालू प्रसाद, करुणानिधी,चंद्राबाबू नायडू, एच डी देवे गौडा, चंद्रशेखर, चौधरी चरणसिंह असे अनेक स्थानीय नेते किती तरी पटीने जास्त यशस्वी झालेले आहेत हे स्पष्ट असताना ह्यातील एकाचेही राज्य पवारांनी विकसीत केलेल्या महाराष्ट्राच्या पुढे नाही. काका म्हणजे देव समजणाऱ्या महागुलामांच्या अकलेची कीव येते. हे मोदींना म्हणताय का? कारण ते काकांना गुरू मानतात. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 07/02/2022 - 10:22

In reply to ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता by अमरेंद्र बाहुबली

Permalink

मी माझ्या प्राथमिक शाळेतील

मी माझ्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना पण गुरु म्हणून मान देतो म्हणून मी त्यांचा सल्ला माझ्या डॉक्टरकीच्या व्यवसायात घेत नाही. श्री मोदी यांनी श्री पवारांना वडिलकीचा मान दिला हे त्यांचे सुसंस्कार आहेत पण म्हणून ते काही त्यांचा सल्ला घ्यायला जात नाहीत. ज्याने सलग १३ वर्षे मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा मान मिळवला आणि सलग आठ वर्षे पंतप्रधान पदावर एकहाती बहुमत मिळवून कार्यरत आहेत ते शरद पवारांसारख्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालेल्या आणि एकदाही पाच वर्षे पूर्ण न करता आलेल्या नेत्याकडून सल्ला घेतील हे म्हणजे गुंतागुंतीच्या मेंदूंच्या शल्यक्रिया करणाऱ्या सर्जनने शाळेत हस्तकला शिकवणाऱ्या शिक्षकाचा ( एके काली ते त्याचे शिक्षक होते म्हणून) सल्ला घेण्यासारखे आहे. अर्थात

शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र

असे समजणाऱ्या तुमच्या सारख्या विद्वत्तापूर्ण लोकांना हे समजावून सांगणे म्हणजे फुटबॉल वर पाणी टाकण्यासारखे आहे. पालथा घडा सरळ केला तर पाणी भरेल पण फुटबॉलचे काहीच करता येत नाही तेंव्हा तुमचे चालू द्या
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Sat, 07/02/2022 - 10:37

In reply to डोन्ट अंडरस्टीमेट काका. by सुबोध खरे

Permalink

खरे सर,

या तुमच्या लीस्टमधे केजरीवालला देखील अ‍ॅड करा. पवारांना ५० वर्षे राजकारणात राहून जे करता आले नाही ते केजरीवालने पहिल्या प्रयत्नात करुन दाखवले. दोन राज्यात संपूर्ण बहुमतातील सरकार.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 07/02/2022 - 10:47

In reply to खरे सर, by प्रसाद_१९८२

Permalink

भाजपला रथयात्रा, दंगली नी काय

भाजपला रथयात्रा, दंगली नी काय काय करावे लागले राज्ये जिंकायला. पण विकासाचं राजकारण करून केजरीवालांनी २ राज्ये जिंकली. अमीत शहा आणी मोदींना केजरीवालांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Sat, 07/02/2022 - 10:59

In reply to भाजपला रथयात्रा, दंगली नी काय by अमरेंद्र बाहुबली

Permalink

आपल्या राज्यात पण बोलवा की

आपल्या राज्यात पण बोलवा की केजरीवालांना विकास करायला, गेल्या अडीच वर्षाचा backlog भरून निघेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 07/02/2022 - 11:06

In reply to आपल्या राज्यात पण बोलवा की by रात्रीचे चांदणे

Permalink

+१ येतील की दिल्ली पंजाब

+१ येतील की दिल्ली पंजाब काबीज केलाय. वाटेत लागनारे युपी, मध्य प्रदेश, गुजरात ही अविकसीत शोषीत भाजपग्रस्त राज्ये काबीज केली की पुढील मोर्चा महाराष्ट्रावर.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Fri, 07/01/2022 - 13:37

Permalink

शरद पवार, राष्ट्रवादी, उद्धव

शरद पवार, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे, काँग्रेस कोण काय आहे, कसे होते..फलाना.. वगैरे असल्या गोष्टी आता भाजपा आणि त्याच बरोबर भाजपा धर्जिन्या लोकांनी आता बंद कराव्यात हि इच्छा... भाजप आणि फडणवीस ज्या पद्धतीने मविआ सरकार आल्यापासून १०० दिवसांत कसे सरकार पडणार..आणि त्यांचे भक्त कसे हे वाईट झाले हे सांगत होते... तसं, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे यांनी काही हि न करावे, आणि त्याच बरोबर गेले तर गेले सरकार असे समजुन,काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे या पक्षाच्या धार्जिन्या लोकांनी नविन सरकार ला काही बोल न लावता नविन सरकार ला चांगल्या कामाच्या शुभेच्छा द्याव्यात... उगाच भाजपा/फडणवीस यांच्या सारखे वागण्याचे कारण नाही.. असो.. मी तरी नविन शिंदे सरकार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.. विकास हाच त्यांचा prime मुद्ददा असावा हि माफक अपेक्षा.. गणेशा... तुर्तास रामराम..
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 07/01/2022 - 13:52

In reply to शरद पवार, राष्ट्रवादी, उद्धव by गणेशा

Permalink

विकास हाच त्यांचा prime

विकास हाच त्यांचा prime मुद्ददा असावा हि माफक अपेक्षा.. बच्चू कडूंना क्लिनचीट मिळालीय. आता पुढचा विकास कोणाचा होतो ते पाहुयात. मला वाटतंय प्रताप सरनाईक किंवा संजय राठोड ह्यांचा विकास झाल्याची बातमी येत्या दोन-तीन दिवसात लगेच येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 07/01/2022 - 13:58

Permalink

राउताना जोवर सेना हाकलून देत

राउताना जोवर सेना हाकलून देत नाही तोवर उठांचे त्याम्च्यावर अवलंबून वाढत जाणार.पर्यायाने ते अवलंबित्व सेनेला आणखीनच गोत्यात आणणार
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 07/01/2022 - 14:02

In reply to राउताना जोवर सेना हाकलून देत by विजुभाऊ

Permalink

सेनेची काळजी नका करू. भाजपची

सेनेची काळजी नका करू. भाजपची करा. सेना आणी राऊत पाहून घेतील काय ते.
  • Log in or register to post comments

Submitted by हणमंतअण्णा शंक… on Fri, 07/01/2022 - 15:18

Permalink

मुंबई

फडणवीसांचे खरे शत्रू शहा आहेत यावर आता माझा पूर्ण विश्वास बसला आहे. शहा हळू हळू त्यांच्या पंतप्रधानपदातले अडसर दूर करत आहेत. पहिल्या निर्णयामागे आणि दुसर्‍या खच्चीकरणामागे "मुंबई" हा सगळ्यात मोठा बार्गेन असला पाहिजे. शहा, मोदी ज्या पद्धतीने आततायी विध्वंसकारी निर्णय घेतात आणि डूखही धरतात त्यावरून मुंबई हे त्यांचे मुख्य टार्गेट आहे, आणि कदाचित मुंबई आंतराष्ट्रीय करण्याच्या बहाण्याने ती 'सिटी-स्टेट' ( पर्यायाने केंद्रशासितच ) करण्याचा घाट घातला आहे की काय अशी शंका येते.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 07/01/2022 - 15:27

In reply to मुंबई by हणमंतअण्णा शंक…

Permalink

अमीत शहा फडणवीसना कधीच

अमीत शहा फडणवीसना कधीच मुख्यमंत्री बनू देनार नाहीत हे मी मागच्या काही धाग्यात सांगीतलं होचं. २०१९ ला ही सरकार ह्यामुळेच बनू दिलं नव्हतं अमात शहांनी.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 07/01/2022 - 19:16

In reply to अमीत शहा फडणवीसना कधीच by अमरेंद्र बाहुबली

Permalink

हायला

हायला अमित शहा यांचे डावपेच त्यांच्या पेक्षा तुम्हालाच जास्त समजतात असा वाटतंय
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Fri, 07/01/2022 - 21:01

In reply to हायला by सुबोध खरे

Permalink

अ. बा. च्या म्हणण्याप्रमाणे

अ. बा. च्या म्हणण्याप्रमाणे अमित शहा सारखा भा ज पा तला उच्च श्रेणीतला नेता जर वागत असेल तर त्यांना भा ज पा बद्दल ईतकी नाराजी का ?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 07/01/2022 - 21:14

In reply to अ. बा. च्या म्हणण्याप्रमाणे by डँबिस००७

Permalink

फडणवीस वला तसा आता हा

फडणवीस वला तसा आता हा राज्सपाल हटवला की आज्बात नाराजी राहनार नाही भाजप बद्दल. :) मग मी नी श्रिगुरूजी दोन्हीही खुश राहू. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 07/02/2022 - 09:28

In reply to फडणवीस वला तसा आता हा by अमरेंद्र बाहुबली

Permalink

तुमच्या नाराजीला शेजारच्या

तुमच्या नाराजीला शेजारच्या पक्या तरी विचारतोय का? बाकी चालू द्या अरण्य रुदन
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 07/01/2022 - 17:00

Permalink

मूळ शिवसेनेचे एकनाथ शिंदे

मूळ शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादीतून भाजपत आलेले राहुल नार्वेकर विधानसभेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार. सरकार पाडण्यासाठी इतका अट्टाहास करून मूळ भाजप नेत्यांना काय मिळणार? सर्वाधिक महत्त्वाची दोन पदे मूळ भाजप नेत्यांना नाहीत. आगामी मंत्रीमंडळात सुद्धा मूळ भाजप नेत्यांऐवजी भाजपत आणलेल्या आयारामांची भरताड असेल असं वाटायला लागलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 07/01/2022 - 17:05

In reply to मूळ शिवसेनेचे एकनाथ शिंदे by श्रीगुरुजी

Permalink

बंडंखोरांनी बंडं फूकट केलेलं

बंडंखोरांनी बंडं फूकट केलेलं नाही. मंत्रीपद सोडून फक्त आमदार रहायला ते काय दुधखुळे आहेत का? त्यांना परत मंतिरापदं मिळताल ह्या बोलीवरच ते भाजप बरोबर संधान बांघायला तयार झाले असावेत. फडणवीयना फत्त मुख्यमंत्रीपद हवं होतं. पण…..
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 07/02/2022 - 10:12

In reply to मूळ शिवसेनेचे एकनाथ शिंदे by श्रीगुरुजी

Permalink

गुरुजी

गुरुजी सामान्य माणसांनी राजकारणी हे धुतल्या तांदळाचे नाहीत हे ( नाईलाजाने का होईना) स्वीकारले आहे. परंतु त्यांची अपेक्षा निदान पैसे घेऊन तरी कामे व्हावीत अशी झाली आहे. शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या मंत्र्यांना उलट आता काम केले नाही तर मतदारसंघात माणसे परत उभी करणार नाहीत हे माहिती आहे. कारण सामान्य माणूस हा सरंजाम शाही वृत्तीचा आहे (राजाचा मुलगाच राजा होणार) . त्यामुळे आज जरी शिवसेना शिंदे गटाकडे गेली तरी पुढच्या काळात शिवसेना हि उद्धव ठाकरे यांच्याकडेच जाणार यात शंका नाही. तेंव्हा आपले पानिपत व्हायचे नसेल तर आपला मतदार संघ शाबूत ठेवणे आवश्यक आहे हे त्यांना माहिती आहे. जसे श्री नारायण राणे आई श्री भुजबळ यांचे झाले तसे आपणही आपला मतदारसंघ शाबूत ठेवायचा असेल तर कामे मकरने आवश्यक आहे हे त्यांना माहिती आहे. वसुली सरकार मध्ये असंख्य उद्योगांना पैसे दिले तरी काम होत नाही असाच अनुभव आला आहे. त्यामुळे या सरकारने निदान कामे तडीस लावली तर जनतेला दिलासा मिळेल. मूळ भाजपाची माणसे उद्या भ्रष्ट होणार नाहीत याची कोणतीही खात्री नाही. कारण एकदा तोंडाला रक्त लागले कि वाघ शिकार सोडत नाही. सरकार चाललं नाही तरी भाजपचे नुकसान नाही. मध्यावधी निवडणूक झाल्या तर भाजप स्वबळावर निवडून येईल हि काळ्या दगडावरची रेघ आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 07/02/2022 - 10:53

In reply to गुरुजी by सुबोध खरे

Permalink

कारण सामान्य माणूस हा सरंजाम

कारण सामान्य माणूस हा सरंजाम शाही वृत्तीचा आहे (राजाचा मुलगाच राजा होणार) सहमत. तसे नसते तर आमदारपुत्र फडणवीस पुन्हा निवडूण आले नसते. वसुली सरकार मध्ये असंख्य उद्योगांना पैसे दिले तरी काम होत नाही असाच अनुभव आला आहे. हे असे कुठला ऊद्योगपती बोलला? की द्वेषातून तुम्ही तुमच्या मनाचंच दिलं चिपकवून? त्यामुळे या सरकारने निदान कामे तडीस लावली तर जनतेला दिलासा मिळेल. कालच नारळ फूटला. बच्चू कडूंच्या क्लिनचीट पासून. आता किलिनचीट यामीनी जाधवांना की सरदेसाईंना? अशी पैज लागलीय मित्राची नी माझी. मूळ भाजपाची माणसे उद्या भ्रष्ट होणार नाहीत याची कोणतीही खात्री नाही. म्हणजे ती भ्रष्ट नाहीत असे तुमचे म्हणणे आहे का??
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Tue, 07/05/2022 - 11:01

In reply to गुरुजी by सुबोध खरे

Permalink

मोदी, योगी, राहुल गांधी यांना मिळणारी वागणुक कशी समजावुन सांगणार

कारण सामान्य माणूस हा सरंजाम शाही वृत्तीचा आहे (राजाचा मुलगाच राजा होणार) . मोदी, योगी, राहुल गांधी यांना मिळणारी वागणुक कशी समजावुन सांगणार?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com