Skip to main content

मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?

लेखक Trump यांनी बुधवार, 29/06/2022 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण? ------ हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल. शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला. राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला. कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला. भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच. जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.

वाचने 39016
प्रतिक्रिया 222

प्रतिक्रिया

अल्पमतात आसलेले सरकार त्यांची केस न्यायालयात प्रलंबित असताना नामांतराचा निर्णय घेऊ शकते का? नामातंर केले म्हणजे हिन्दुत्ववादी आहेत कसे सिद्ध होते. करायचेच होते तर मागील आडिच वर्षात का नाही केले. जेव्हा जेव्हा विषय निघाला तेंव्हा केन्द्रावर खापर फोडले. शेवटच्या क्षणी सद् बुद्धी? कशी सुचली. नामातंर हा विषय वादग्रस्त आसल्याने नविन सरकार करता जाणूनबुजून निर्माण केलेली डोकेदुखी तर नाही. निरोपाच्या भाषणात आडीच वर्षात काय केले याबद्दल काहीच सांगायला नव्हते. नामांतराचा निर्णय हा इतका महत्वाचा होता का. वरिष्ठ, अनुभवी सैनिकांना डावलून मा.अदित्य ठाकरेला मंत्रिपद देणे हे ज्येष्ठांना कुठे खुपले तर नसेल. मुलाला मोठे करण्याची एवढी काय घाई होती. "उधो,कर्मनः की गती न्यारी" भक्त सूरदास लिहून गेले आहेत त्याची आठवण आली.

सर्वात मोठा फायदा बारामतीच्या काकांचा झालाय. त्यांना आता पुढच्या निवडणूकीत पूर्ण बहुमत मिळेल. आणि कोणाचाही पाठिंबा न घेता स्वतःचे सरकार स्थापन करता येईल. सेनेचा मतदार त्यांच्या पक्षाकडे वळणार.

In reply to by विजुभाऊ

सेनेचा मतदार त्यांच्या पक्षाकडे वळणार. भाजपचे सध्याचे गलिच्छ राजकारण पाहीले तर भाजपचा ही वळनार.

एक बाजू लावून धरल्याने धागा चांगला पळतोय. नामांतराचा निर्णय बघून पेपर संपल्याची घंटा झाल्यावर पुरवणी जोडणाऱ्या विद्यार्थ्यांची आठवण झाली.

स्वबळाच्या वल्गना करणाऱ्या ना पुन्हा कुबड्या घ्याव्या लागल्या

In reply to by कपिलमुनी

+१

इतिहास गवाह आहे. काका पुतण्याला वाचवत नाही. आमची सौ. उंदराला पिंजऱ्यात पकडण्यासाठी पोळीला तूप लावते. शिवसेनेचा व्होट बँक मराठी अस्मिता, गुजराती विरोध आणि कट्टर हिंदुत्व. गृह आणि अर्थ खाते हातात ठेऊन काकांनी शिवसेनेला हिंदुत्व पासून दूर नेले आणि शिवसेनेच्या आमदारांच्या हातात नारळ ठेवले. शेवटी शिवसेना फुटली. पुढच्या निवडणुकीत मराठी अस्मिता आणि गुज्जू विरोधी मते काका खातील. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाच हस्तगत केली त्यामुळे भाजपला काहीच फायदा होणार नाही. BMC निवडणूकीत शिंदे सेना अर्ध्या जागा मागतील त्या देणे भाजपला शक्य होणार नाही. दुसरीकडे BMC निवडणूकीत युती ९० पेक्षा जास्त जागा उद्धव सेनेला देणार नाही. एकटे लढून हरल्यास त्यांची गत शोलेच्या असरानी सारखी होईल. तूर्त काका दिवाळी साजरी करत असणार .

In reply to by विवेकपटाईत

इतिहास सांगतो , दिल्लीकराना महाराष्ट्राचे चांगले कधीही बघवत नाही . इतिहास सांगतो, गुज्जू मराठी लोकांचा द्वेष करतात..

In reply to by कपिलमुनी

+१. महापालिका भादपच्या ताब्यात गेली तर मराठी माणूस मुंबईतून संपवायचा प्रयत्न करतील. नंतर मुंबईला केंद्रशासीत प्रदेश मग हळूच गुजरात राज्यात समावेश करवतील. हे सगळं “राष्ट्रहीतासाठी” केलं असंहा सांगतील

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहाहा काय तर्क काय तर्क राजेश भाऊ १८८ , करचुरे साहेब .. हेच जर केंद्रात २ पंजाबी किंवा २ उत्तरपरदेशी सतत केंद्री असते तर तुम्ही पंजाब किंवा उत्तर प्रदेशाचं नावाने ठणाणा केला असता आता सांगा समजा उद्या मोदी शहा ऐवजी गडकरी आणि फडणवीस अशी जोडगोळी आली सत्ताकेंद्री तर काय आरडा ओरडा करणार तुम्ही राजय पातळी वरील पक्ष आणि राष्ट्रउया पातळी वरील पक्ष ( जुना काँगेस किंवा आत्ताच भाजप ) यांच्यात हा वाद सत्तात चालूच राहणार दिल्ली ला स्वतःचे असे अस्तित्व नाही ,, त्यामुळे आज जर २ गुजराथचे तर लगेच दिली गुजराथी झाली का!

In reply to by कपिलमुनी

इतिहास सांगतो, गुज्जू मराठी लोकांचा द्वेष करतात.. इतिहास सांगतो, कानडी मराठी लोकांचा द्वेष करतात. बेळगावात जाऊन पहा. सामना सारखी वर्तमान पत्रे वाचलीत तर मराठी माणूस उत्तर परदेशी किंवा बिहारींचा (भय्ये) द्वेष करतो असे वाटेल. "बजाव पुंगी हटाव लुंगी" सारख्या घोषणा कुणी दिल्या होत्या? बंगलोर मधील वृत्तपत्रे वाचलीत तर तामिळ माणसे कन्नडिगांचा द्वेष करतात असे वाटेल. तुम्ही फक्त तुमचा चष्मा काढा. असा सवंग द्वेष कुणीही करत नाही. गुजरात राजस्थानात प्रत्यक्ष जाऊन पहा शिवाजी महाराजांबद्दल किती आदर आहे ते. आपला मोदि शाह बद्दल चा द्वेष जगजाहीर आहे पण त्यासाठी संपूर्ण गुजराती माणसांना दोषी ठरवणे हि अत्यंत संकुचित मनोवृत्ती आहे.

अडीच वर्षांपूर्वी हीच मागणी होती शिवसेनेची तेव्हा अतिआत्मविश्वास नडला बीजेपिला. आज ताकही फुंकून पित आहेत,आत्मविश्वास गळून पडला.

श्री शिंदे मुख्यमंत्री आणि त्याला भाजपचा आतुन पांठिबा अशी बातमी येत आहे. असे असेल तर भाजपाने २०१९ पासुन विरोधी पक्षात बसुन काय कमावले अशा प्रश्न पडतो. शिवसेना आम्ही भाजपला वाकवले असा मुद्दा नक्की करणार.

In reply to by Trump

शिवसेना आम्ही भाजपला वाकवले असा मुद्दा नक्की करणार. भाजपच्या दृष्टीने महाराष्ट्र हे एक राज्य आहे आणि शिवसेनेच्या दृष्टीने संपूर्ण पक्षाचे भवितव्य. शिवसेना सध्या कुणाकडे जाणार हाच प्रश्न महत्त्वाचा होणार आहे. बाकी डुक्कर रेडे म्हणून विशेषणे लावणाऱ्या राऊतांची मात्र झोप उडाली असेल. "परब, राऊत" आता देव पाण्यात बुडवून बसले असतील. सुधांत सिंह राजपूत यांची केस परत उघडणार काय या भीतीने युवराजांची पचनशक्ती पण बिघडली असेल. काकांना भिजण्यासाठी महाराष्ट्रात भरपूर पाऊस पण पडतो आहे. पहा आता काय होतंय ते. FADANVIS IS HAVING LAST LAUGH

In reply to by Trump

शिवसेना आम्ही भाजपला वाकवले असा मुद्दा नक्की करणार. भाजपच्या दृष्टीने महाराष्ट्र हे एक राज्य आहे आणि शिवसेनेच्या दृष्टीने संपूर्ण पक्षाचे भवितव्य. शिवसेना सध्या कुणाकडे जाणार हाच प्रश्न महत्त्वाचा होणार आहे. बाकी डुक्कर रेडे म्हणून विशेषणे लावणाऱ्या राऊतांची मात्र झोप उडाली असेल. "परब, राऊत" आता देव पाण्यात बुडवून बसले असतील. सुधांत सिंह राजपूत यांची केस परत उघडणार काय या भीतीने युवराजांची पचनशक्ती पण बिघडली असेल. काकांना भिजण्यासाठी महाराष्ट्रात भरपूर पाऊस पण पडतो आहे. पहा आता काय होतंय ते. FADANVIS IS HAVING LAST LAUGH

In reply to by सुबोध खरे

सुधांत सिंह राजपूत यांची केस परत उघडणार काय या भीतीने युवराजांची पचनशक्ती पण बिघडली असेल.
केंद्राने सीबीआय पाठवून “सुशांतनो आत्महत्या केली” असा अहवाल पाठवून केस कधीच बंदं केलीय.

या सगळ्या गदारोळात खरा गेम फडणवीस चा झाला आहे. चंपा आणि फडणवीस यांना कसलेही मास अपील नाहीये .२०१४ नंतर फडणवीस वरुन आदेश आल्यावर cm झाले होते. केंद्रातली सत्ता गेली तर चंपा तर ग्रामपंचायत मध्ये एक सरपंच निवडून आणू शकणार नाही.. आणि मोदी शहा यांच्याकडून सेंट्रली सगळा राज्यकारभार हाकला जातोय, त्यामुळे फडणवीस ला मास्टर स्ट्रोक मारला वगैरे म्हणणे म्हणजे उगाच वर चढवणे आहे, कालचे जनमत ठाकरें प्रती सहानभूती आणि भाजप विरोधी झालेच होते, त्यामुळे जो निर्णय वरून आला तो घ्यावाच लागला.. नाहितर फडणवीस किती सत्तापिपासु आहे हे नव्याने का सांगावे लागेल? आणि जर दुसऱ्याला मुख्यमंत्री करायचे होते तर २०१९ ला गप शिवसेने बरोबर गेल्याचे काय वाईट होते.. त्यामुळे गेम झालाय पण गप मास्टरस्ट्रोक मारला म्हणुन मनात झुरन्यापेक्षा हातात काहीच नाही.. असो, दुसऱ्या साठी खड्डा खांदणारा स्वतःच त्या खड्ड्यात पडतो हे यावरून दिसते आहे.. -- गणेशा

In reply to by गणेशा

आणि मंत्रीमंडळात सहभागी होणार नाही असं फडणवीस म्हणताच, जे पी नड्डा ने आदेश दिल्यावर लगेच तसं करावंच लागलं.. आणि मास्टरस्ट्रोक म्हणायचा असेल तर याला उपमास्टरस्ट्रोक म्हणावा :-)

In reply to by गणेशा

जे पी नड्डा ने आदेश दिल्यावर लगेच तसं करावंच लागलं.. अर्ध्या तासात तोंडावर पडायला झालं पहा

In reply to by प्रसाद_१९८२

नाही फडणवीस उप मुख्यमंत्री होणार आहेत. आणि बहुधा गृह खाते सुद्धा स्वतः कडे ठेवतील असा माझा कयास आहे. बाकी-- किरीट सोमय्या याना अर्थ मंत्री करायला पाहिजे म्हणजे मग राष्ट्रवादी आणि राऊत परब सारख्यांची गम्मत पाहायला लै म्हणजे लैच मजा येईल ( अर्थात असे काही होणार नाही हा भाग अलाहिदा)

आपल्या दोघांच्या अफाट बुद्धीमत्तेला आणि अचाट विश्लेषण शक्तीला चार सलाम. जाता जाता -- आता महाराष्ट्र म्हणजे कोणती शिवसेना? श्री उद्धव ठाकरे यांची कि श्री एकनाथ शिंदे

In reply to by सुबोध खरे

महाराष्ट्र कोणता पक्ष नाही.. पण सत्तेत सुद्धा - शिवसेना.. विरोधात पण - शिवसेना... स्वतःला समुद्र म्हणताना त्याचे ठाण्यातील खाडीत रूपांतर कधी झाले हे कळाले पण नाही.. शिवसेना संपवण्याचे मनसुभे मनात होते.. मनातच राहिले

ऊध्दव ठाकरेंकडे परत आलेल्या आमदारांची हमे मालूम है कि ये झूट है मगर दिल बहलाने के लिये ये खयाल अच्छा है गालिब

मविआची सत्ता गेली, देशाचे चाणक्याच्या नाका खालुन पण ईथल्या ह्यांना दे फ तोंड घशी पडला ह्याची काळजी पडलीय. देफ ची खरी धास्ती जेल मध्ये गेले अनेक महीने पडुन असलेल्याम्ना, श. प. सं रा यांना आहे. कारण केंद्र सरकार व राज्य सरकार मिळुन आता हतोडा चालवणार. देफ मुख्य मंत्री नाहीत हे बरेच आहे कारण महाराष्ट्राला परत प्रगती पथावर न्यायला लागेल तसे प्रखर निर्णय आता घेता येतील.

उद्याच्या विश्वास ठराव विरोध करणारी याचिका शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तातडीने सुनावणी देण्यास नकार दिला आहे. परंतु हि याचिका सुद्धा इतर याचिकांबरोबर १२ जुलैलाच सुनावणी साठी घेण्यास मान्यता दिली आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बरोबर काम करणारे १०-१२ मंत्री नाराज आहेत हे ज्याला कळाल नाही त्याला मंचावर बसलेले दे फा नाराज होते हे दिसले म्हणजे फारच तिक्ष्ण दुरदृष्टी म्हणायची !!

In reply to by डँबिस००७

फडणवींसांचे डोळे पाणावले होते असं धनंजय महाडीक ह्यांनी सांगीतले. आजच्या मटाला बातमी आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आता काय हेरत बसले आहेत? त्याचा काय उपयोग आहे? राष्ट्रपतीचा उमेदवार निवडीचे उपदव्याप करण्यासाठी दिल्ली वा-या करण्यापेक्षा, शिंदे गटाची नाराजी वेळीच हेरली असती तर जास्त बरं झालं असतं. पण नियतीलाच ते मान्य नव्हतं म्हटल्यावर..... असो.

In reply to by शाम भागवत

शिंदे गटाची नाराजी वेळीच हेरली असती
हेरली असावी नक्कीच काकांनी व हेतुपुर्र्स्सर कानाडोळा केला असावा. काट्याने काटा काढला गेला. आतापर्यंतच्या चित्रानुसार तरी राष्ट्रवादीला खुले रान मिळाले आहे. मागच्या वेळेला काकांनी पावसात भिजुन बाजी मारली ह्यावेळेला आलेल्या ह्या राजकिय सुनामीत तेल लावुन कोरडे ठणठणीत राहिले. काका रॉक्स ऑलवेज.

In reply to by कानडाऊ योगेशु

काका रॉक्स ऑलवेज. हेच मी नेहमी ईथे सांगीतलं की लगेच काकाद्वेष्टे दांडपट्टा घेऊन लढाई करायला येतात. काकाद्वेष्ट्यांना काका काय चीज आहे हे कधीच कळनार नाही. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि भाजपद्वेषामुळे तुम्हाला भाजपाच्या विरोधात जे आहे ते सगळेच योग्य आहेत असे वाटते. पण इथे वस्तुनिष्ठपणे पाहु गेले तर काकांनी शिवसेनेचा भाजपविरूध्द वापर करुन शिवसेनेला वार्यावर सोडुन दिलेले आहे.राजकिय दृष्ट्या त्यात काही चूक नसावी कारण शिवसेना सुध्दा स्वतःच मतलब साधण्यासाठी राष्ट्रवादी सोबत पाट लावुन उभी होती.

In reply to by कानडाऊ योगेशु

अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि भाजपद्वेषामुळे तुम्हाला भाजपाच्या विरोधात जे आहे ते सगळेच योग्य आहेत असे वाटते आजीबात नाही. मी काकाद्वेष्ट्यांसारखा नाही. काका विरूध्द जे ते तुम्हाला जसं बरोबर वाटतं तसा मी नाही. काकांनी शिवसेनेचा भाजपविरूध्द वापर करुन शिवसेनेला वार्यावर सोडुन दिलेले आहे. हे कधी झालं?? काकाचर शेवटपर्यंत सोबत होते. गद्दारी आपल्या माणसांनी केली.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गद्दारी आपल्या माणसांनी केली.
गद्दारीचा काकांना पुरेपुर अनुभव आहे. गद्दारी शिवसेनेच्या माणसांनी शिवसेनेशी केली. गद्दारी होणार हे काकांना हे माहीती नसणे हे मानणे म्हणजे काकांच्या कुवतीवरच शंका घेण्यासारखे होईल.पाहुण्याच्या काठीने साप मरत असताना काका सोयीस्कर रित्या मौन राहिले.

In reply to by कानडाऊ योगेशु

गद्दारी होणार हे काकांना हे माहीती नसणे हे मानणे म्हणजे काकांच्या कुवतीवरच शंका घेण्यासारखे होईल. काकांना माहीत असेल/नसेल तरी काय फरक पडतो? काका प्रत्येक गोष्ट रोखूशकत नाहीत. आता पहाना फडणवीसांचा गेम अमीत शहांनी केलाय हे पुर्ण महाराष्ट्र भाजपला माहीतीय. पण कुणई काही वाकडं करू शकतं का त्यांचं? नाहीना? हेही तसंच.

In reply to by कानडाऊ योगेशु

कोणत्याही परिस्थितीत आपली बाजु भक्कम होइल अशी खेळी केली असती तर शरद पवार चाणक्य ठरले असते. पण एकनाथ शिंदेचे ईतक्या आमदारांना घेऊन मुंबई सोडुन सुरतला जाणे आणी त्यानंतर गोहत्तीला जाऊन सुरक्षित रहाणे हे कोणाच्याही स्वप्नात आले नव्हते. भाजपाचा ह्याला सपोर्ट होता हे एकदम स्पष्ट आहे. आता सर कार बदलले आहे जे श प च्या एकदम विरोधात जाणार आहे. १. अनिल देशमुख व नवाब मलिक जेल मध्ये आहेत. त्या दोघांनाही एकदम वार्यावर सोडणे श पंना राजकीयदृष्ट्या जमणार नाही. त्यातल्या एकाला जेल मधुन सोडवणे हे त्यापेक्षा तापदायक ठरेल. २. म राज्यात सरकार काँग्रेसच्या भागिदारीत असल्याने राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत श पंना वजन होत, आता ते वजन नाहीस झालेल आहे. ३. श पच्यां कुदुंबावर ईडीच्या केसेस आहेत. त्यासाठी कोणताच लिव्हरेज आता हाती उरलेला नाही. ४. आता ईडीने त्रस्त झालेल्या संजय राऊतचे खरे स्वरुप हळुहळु बाहेर पडेल. जो ह्या सर्व केसे स मधुन बाहेर प डा यला मदत करणार नाही त्याच्या वर तोंड सुख घेईल. त्याला सुद्धा श प कडुन बर्याच होप्स आहेत.

In reply to by कानडाऊ योगेशु

काका रॉक्स ऑलवेज. हायला काकांचे दोन मंत्री वर्षभर आतमध्ये आहेत आणि काका काय रॉक शो करताहेत.

In reply to by सुबोध खरे

काका सत्तेसाठी कोणा व्यक्तीशी बांधील नाहीत. कुणाचाही कसाही वापर करु शकतात. (पवार -> वापर).

In reply to by कानडाऊ योगेशु

काकाद्वेष्ट्यांना हे नाही दिसत का की काका कुनालाही मॅनूपूलेट करू शकतात?? रात्री दोन वाजता राष्ट्रपतीला सही करायला लावली होती काकानी राष्ट्रपती राजवट ऊठवन्यासाठी.:) डोन्ट अंडरस्टीमेट काका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

डोन्ट अंडरस्टीमेट काका. डोन्ट ओव्हर एस्टीमेट काका. ज्यांना तीन वेळेस मुख्यमंत्री होऊन सुद्धा स्वतःचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. ज्यांना स्वतःच्या दोन मंत्र्यांना तुरूंगातून एक वर्ष भर काढता आलं नाही. ज्यांना आजतागायत महाराष्ट्रात दोन आकडी खासदार आणि तीन आकडी आमदार निवडून आणता आले नाहीत. त्यांच्या पेक्षा ममता बॅनर्जी, एन टी रामा राव, बिजू पटनायक, जयललिता, मायावती, मुलायम सिंह, लालू प्रसाद, करुणानिधी,चंद्राबाबू नायडू, एच डी देवे गौडा, चंद्रशेखर, चौधरी चरणसिंह असे अनेक स्थानीय नेते किती तरी पटीने जास्त यशस्वी झालेले आहेत हे स्पष्ट असताना काका म्हणजे देव समजणाऱ्या महागुलामांच्या अकलेची कीव येते.

In reply to by सुबोध खरे

५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. कटकारस्थाने करून, सहकार्यांना घोटाळे वगैरेत अडकवून पाच वर्षे फक्त खुर्ची खुर्ची करनार्यांमधले काका नाहीत. अश्यांचं नंतर काय होतं पाहताय ना?? ज्यांना स्वतःच्या दोन मंत्र्यांना तुरूंगातून एक वर्ष भर काढता आलं नाही. ते प्रामाणीक आहेत म्हणून. नाहीतर कधीच क्लिनचीट दिली असती काकानी. बच्चू कडूना नाही का परवाच क्लिनचीट मिळाली. ज्यांना आजतागायत महाराष्ट्रात दोन आकडी खासदार आणि तीन आकडी आमदार निवडून आणता आले नाहीत. ज्यानी निवडूण आणले त्यांना घरी बसवून तर दाखवले ना :) त्यांच्या पेक्षा ममता बॅनर्जी, एन टी रामा राव, बिजू पटनायक, जयललिता, मायावती, मुलायम सिंह, लालू प्रसाद, करुणानिधी,चंद्राबाबू नायडू, एच डी देवे गौडा, चंद्रशेखर, चौधरी चरणसिंह असे अनेक स्थानीय नेते किती तरी पटीने जास्त यशस्वी झालेले आहेत हे स्पष्ट असताना ह्यातील एकाचेही राज्य पवारांनी विकसीत केलेल्या महाराष्ट्राच्या पुढे नाही. काका म्हणजे देव समजणाऱ्या महागुलामांच्या अकलेची कीव येते. हे मोदींना म्हणताय का? कारण ते काकांना गुरू मानतात. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मी माझ्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना पण गुरु म्हणून मान देतो म्हणून मी त्यांचा सल्ला माझ्या डॉक्टरकीच्या व्यवसायात घेत नाही. श्री मोदी यांनी श्री पवारांना वडिलकीचा मान दिला हे त्यांचे सुसंस्कार आहेत पण म्हणून ते काही त्यांचा सल्ला घ्यायला जात नाहीत. ज्याने सलग १३ वर्षे मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा मान मिळवला आणि सलग आठ वर्षे पंतप्रधान पदावर एकहाती बहुमत मिळवून कार्यरत आहेत ते शरद पवारांसारख्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालेल्या आणि एकदाही पाच वर्षे पूर्ण न करता आलेल्या नेत्याकडून सल्ला घेतील हे म्हणजे गुंतागुंतीच्या मेंदूंच्या शल्यक्रिया करणाऱ्या सर्जनने शाळेत हस्तकला शिकवणाऱ्या शिक्षकाचा ( एके काली ते त्याचे शिक्षक होते म्हणून) सल्ला घेण्यासारखे आहे. अर्थात

शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र

असे समजणाऱ्या तुमच्या सारख्या विद्वत्तापूर्ण लोकांना हे समजावून सांगणे म्हणजे फुटबॉल वर पाणी टाकण्यासारखे आहे. पालथा घडा सरळ केला तर पाणी भरेल पण फुटबॉलचे काहीच करता येत नाही तेंव्हा तुमचे चालू द्या

In reply to by सुबोध खरे

या तुमच्या लीस्टमधे केजरीवालला देखील अ‍ॅड करा. पवारांना ५० वर्षे राजकारणात राहून जे करता आले नाही ते केजरीवालने पहिल्या प्रयत्नात करुन दाखवले. दोन राज्यात संपूर्ण बहुमतातील सरकार.

In reply to by प्रसाद_१९८२

भाजपला रथयात्रा, दंगली नी काय काय करावे लागले राज्ये जिंकायला. पण विकासाचं राजकारण करून केजरीवालांनी २ राज्ये जिंकली. अमीत शहा आणी मोदींना केजरीवालांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आपल्या राज्यात पण बोलवा की केजरीवालांना विकास करायला, गेल्या अडीच वर्षाचा backlog भरून निघेल.

In reply to by रात्रीचे चांदणे

+१ येतील की दिल्ली पंजाब काबीज केलाय. वाटेत लागनारे युपी, मध्य प्रदेश, गुजरात ही अविकसीत शोषीत भाजपग्रस्त राज्ये काबीज केली की पुढील मोर्चा महाराष्ट्रावर.

शरद पवार, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे, काँग्रेस कोण काय आहे, कसे होते..फलाना.. वगैरे असल्या गोष्टी आता भाजपा आणि त्याच बरोबर भाजपा धर्जिन्या लोकांनी आता बंद कराव्यात हि इच्छा... भाजप आणि फडणवीस ज्या पद्धतीने मविआ सरकार आल्यापासून १०० दिवसांत कसे सरकार पडणार..आणि त्यांचे भक्त कसे हे वाईट झाले हे सांगत होते... तसं, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे यांनी काही हि न करावे, आणि त्याच बरोबर गेले तर गेले सरकार असे समजुन,काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे या पक्षाच्या धार्जिन्या लोकांनी नविन सरकार ला काही बोल न लावता नविन सरकार ला चांगल्या कामाच्या शुभेच्छा द्याव्यात... उगाच भाजपा/फडणवीस यांच्या सारखे वागण्याचे कारण नाही.. असो.. मी तरी नविन शिंदे सरकार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.. विकास हाच त्यांचा prime मुद्ददा असावा हि माफक अपेक्षा.. गणेशा... तुर्तास रामराम..

In reply to by गणेशा

विकास हाच त्यांचा prime मुद्ददा असावा हि माफक अपेक्षा.. बच्चू कडूंना क्लिनचीट मिळालीय. आता पुढचा विकास कोणाचा होतो ते पाहुयात. मला वाटतंय प्रताप सरनाईक किंवा संजय राठोड ह्यांचा विकास झाल्याची बातमी येत्या दोन-तीन दिवसात लगेच येईल.

राउताना जोवर सेना हाकलून देत नाही तोवर उठांचे त्याम्च्यावर अवलंबून वाढत जाणार.पर्यायाने ते अवलंबित्व सेनेला आणखीनच गोत्यात आणणार

फडणवीसांचे खरे शत्रू शहा आहेत यावर आता माझा पूर्ण विश्वास बसला आहे. शहा हळू हळू त्यांच्या पंतप्रधानपदातले अडसर दूर करत आहेत. पहिल्या निर्णयामागे आणि दुसर्‍या खच्चीकरणामागे "मुंबई" हा सगळ्यात मोठा बार्गेन असला पाहिजे. शहा, मोदी ज्या पद्धतीने आततायी विध्वंसकारी निर्णय घेतात आणि डूखही धरतात त्यावरून मुंबई हे त्यांचे मुख्य टार्गेट आहे, आणि कदाचित मुंबई आंतराष्ट्रीय करण्याच्या बहाण्याने ती 'सिटी-स्टेट' ( पर्यायाने केंद्रशासितच ) करण्याचा घाट घातला आहे की काय अशी शंका येते.