Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by Trump on Wed, 06/29/2022 - 23:04
मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण? ------ हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल. शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला. राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला. कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला. भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच. जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.
  • Log in or register to post comments
  • 38732 views

प्रतिक्रिया

Submitted by स्वधर्म on गुरुवार, 06/30/2022 - 14:17

In reply to दुर्दैवाने by चौकस२१२

Permalink

सर्वात मोठा तोटा

>> सर्वात मोठा तोटा झाला तो भारतीय लोकशाही हि परिपक्व आहे या समजुतीचा ,, आणि जनेतेचा ( पण जनतेने तो स्वतःवर ओढवून घेतला ,, घराणेशाही वरील पक्ष जोपासू नका हे त्यांना का काळात नाही अजून ! सहमत! एकदा मत दिल्यावर मतदारांच्या हातात काहीही नसते, याची दु:खद जाणिव.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 06/30/2022 - 14:51

In reply to सर्वात मोठा तोटा by स्वधर्म

Permalink

घराणेशाही वरील पक्ष जोपासू

घराणेशाही वरील पक्ष जोपासू नका हे त्यांना का काळात नाही अजून सहमत. २०१४ ला भाजपने घराणेशाहीतून आलेल्या देवेंद्र फडणवीसांना मामू केले तरी २०१९ ला भाजपला १०५ जागा मिळाल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by चलत मुसाफिर on गुरुवार, 06/30/2022 - 08:57

Permalink

आशा करतो की

शिवसेना यातून योग्य तो धडा घेईल आणि भाजपपेक्षा अधिक प्रखर हिंदुत्ववादी होईल अशी आशा. भाजपला वेळोवेळी आरसा दाखवून भानावर आणील असा एकतरी पक्ष भारतात आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on गुरुवार, 06/30/2022 - 10:05

In reply to आशा करतो की by चलत मुसाफिर

Permalink

शिवसेना यातून योग्य तो धडा

शिवसेना यातून योग्य तो धडा घेईल आणि भाजपपेक्षा अधिक प्रखर हिंदुत्ववादी होईल अशी आशा. भाजपला वेळोवेळी आरसा दाखवून भानावर आणील असा एकतरी पक्ष भारतात आवश्यक आहे.
नक्कीच. त्यामुळे लोकांना शिवसेना आवडायची. आता ढोंगी लोकांच्या नादी लागुन अगदी वाट लावुन घेतली.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on गुरुवार, 06/30/2022 - 10:26

Permalink

माझा अंदाज

२०२४ मध्ये किंवा जेव्हा केव्हा परत विधानसभा निवडणुक होईल तेव्हा समजा काँग्रेस-राष्ट्रवादी युती विरूध्द भाजप विरूध्द शिवसेना अशी तिरंगी लढत झाली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीला मोकळे रान असेल असे मला तरी वाटत नाही. त्याची कारणे: १. १९९९ पासून आजपर्यंत विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या मतांची टक्केवारी बघू- १९९९: काँग्रेस- २७.२% आणि राष्ट्रवादी- २२.६%. दोन पक्ष स्वतंत्र लढले आणि त्यांच्या मतांची बेरीज ४९.८% होती. २००४: काँग्रेस + राष्ट्रवादी- ३९.८% २००९: काँग्रेस + राष्ट्रवादी- ३७.४% २०१४: काँग्रेस- १८.१% आणि राष्ट्रवादी- १७.४%. दोन पक्ष स्वतंत्र लढले आणि त्यांच्या मतांची बेरीज ३५.५% होती. २०१९: काँग्रेस + राष्ट्रवादी- ३३% गेल्या २० वर्षांत काँग्रेस आणि राष्टवादी एकत्र लढले तरी किंवा एकमेकांविरोधात लढले तरी त्यांची मते कमी होत आहेत. २. काँग्रेसची २०१९ पासून राष्ट्रीय पातळीवर अजून जास्त पडझड झाली आहे. उत्तराखंडमध्ये भाजपला इतके मुख्यमंत्री बदलावे लागले याचाच अर्थ आपल्याविरोधात प्रस्थापितविरोधी मते जातील ही भिती भाजपला होती. मला तर वाटले होते की उत्तराखंडमध्ये भाजपने काँग्रेसला बाय दिला आहे. पण तरीही तिथेही काँग्रेसला जी निवडणुक अगदी सहजपणे जिंकायला हवी होती ती गमावली. गोव्यात तर भाजपने अगदी अवर्णनीय गोंधळ घातला होता. २०१७ मध्ये निवडून गेलेल्या विधानसभेतील ४० पैकी तब्बल २६ आमदारांनी पक्षांतर केले होते. असा वाईट विक्रम गोव्यात भाजपने करून दाखवला होता. तरीही काँग्रेसने तिथे २०१७ पेक्षा अधिक वाईट कामगिरी केली. महाराष्ट्र पातळीवरही २०१९ पासून काँग्रेसने काय मोठा पराक्रम केला आहे की त्यामुळे जो कल इतर राज्यांमध्ये बघायला मिळाला त्यापेक्षा वेगळा कल महाराष्ट्रात बघायला मिळेल? ३. शिवसेना-भाजप एकत्र लढून जितकी मते त्यांना मिळाली होती जवळपास तितकीच मते एकट्या भाजपने मिळवली हे देगलूर आणि कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत मिळवली हे दिसून आलेच आहे. याचाच अर्थ पूर्वी जी मते युतीची होती त्यातील शिवसेनेची मते मोठ्या प्रमाणावर भाजपकडे जात आहेत. याचा कारण ठाकरेंनी सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर केलेली सोयरीक शिवसेनेच्या सामान्य मतदारांपैकी बहुतेकांना मान्य नव्हती. ४. समजा एकनाथ शिंदे गटाला पुढच्या विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी द्यावी लागली तरी त्यामुळे भाजपपुढे फार डोकेदुखी निर्माण व्हायला नको. समजा २०१९ च्या निवडणुकांनंतर जे काही झाले ते झालेच नसते आणि शिवसेनेबरोबर युती कायम राहिली असती तर त्या मतदारसंघांमध्ये शिंदे गटाचे आमदार शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे राहिले असते आणि तसाही तिथे भाजपचा उमेदवार नसता. युतीत असताना अनेक मतदारसंघांमध्ये भाजपने एकदाही निवडणुक लढवलीच नव्हती. त्यामुळे तिथे पक्षाची स्थानिक पातळीवर संघटना प्रबळ नाही. कोथरूडमध्ये उमेदवारी द्यावी अशा मेधा कुलकर्णी होत्या तसे उमेदवार सगळीकडे भाजपकडे नाहीत. त्यामुळे त्या कारणाने भाजपपुढे फार डोकेदुखी निर्माण होईल असे वाटत नाही. या कारणांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला पूर्ण मोकळे रान मिळेल असे मला तरी वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 06/30/2022 - 14:38

In reply to माझा अंदाज by क्लिंटन

Permalink

१) या आकडेवारीतून हे दिसतंय

१) या आकडेवारीतून हे दिसतंय की जरी प्रत्येक निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी कमी होताना दिसत असली तरी ती कमी होण्याचा वेग तसा कमी आहे. समजा हाच वेग कायम राहिला तर पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांना किमान ३१% मते मिळतीलच. दुसरीकडे २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर २८.५% मते होती व ही भाजपची सर्वोत्तम कामगिरी होती. २०१९ मध्ये युती असूनही व मराठ्यांना अनेक सवलती देऊनही भाजपला २५.७५% मते होती. म्हणजे आताच दोघांमध्ये ७.२५% मतांचा फरक आहे. जर भाजपने ३.७५% मते वाढवून २९.५% मते मिळविली व कॉंग्रेस-राष्ट्रवादीने तितकीच मते गमावून २९.२५% मते मिळविली तरच भाजपला त्यांच्यापेक्षा थोड्या जास्त जागा मिळू शकतील. परंतु १४४+ जागा जिंकण्यासाठी किमान ३८% मते मिळवावी लागतील (२०१९ मध्ये भाजप-सेनेला जवळपास ४७% मते व १८६ जागा होत्या तर २०१९ मध्ये ४२% मते व १६१ जागा होत्या). त्यासाठी भाजपला २०१९ च्या तुलनेत किमान १२.२५% अधिक मते तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला किमान ५% अधिक मते मिळवावी लागतील. हे उघड आहे की ऑड्स भाजपच्या बाजूने नाहीत. यातील अजून एक घटक म्हणजे सेना. पुढील निवडणुकीत सेना दुर्बल झाल्याने सेनेची काही मते मनसे तर काही मते कॉंग्रेस-राष्ट्रवादी कडे जातील. भाजपकडे ही मते येण्याची शक्यता फार कमी आहे. समजा शिंदे गटाशी युती केली तर अर्थातच भाजपला कमी जागांवर लढावे लागेल, तसेच सेना मतदार शिंदे गटाला किती मते देतील हे आता सांगता येणार नाही. त्यामुळे पुढील निवडणुकीत माझ्या मते आता तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. २) कॉंग्रेसची अवस्था फार चांगली नसली तरी त्यांच्याकडे अजूनही जवळपास सेनेइतकीच १६-१७% मते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर असल्यास कॉंग्रेसला फायदाच होईल. ३) या पोटनिवडणुकीत सेनेचा उमेदवार नव्हता. तो असता तर भाजप उमेदवाराला इतकी मते मिळाली नसती. ४) शिंदे गट आता असलेल्या फक्त ३९ जागांवर समाधान न मानता अधिक जागा नक्की मागणार. तसेच अपक्ष, प्रहार संघटना आणि सध्याचे मित्रपक्ष आहेतच. त्यामुळे तेव्हा जागावाटप करणे तितके सोपे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on गुरुवार, 06/30/2022 - 15:57

In reply to १) या आकडेवारीतून हे दिसतंय by श्रीगुरुजी

Permalink

५ मुद्दे

भविष्यात काय होईल हे सांगता येत नसले तरी- १. २०१४ मध्ये भाजपने स्वतंत्र लढून २८.१% मते मिळवली होती ही सत्य परिस्थिती आहे. पण त्यावेळेस एक महत्वाची गोष्ट झाली होती जी आता बदललेली आहे. २०१४ मध्ये युती तुटली २५ सप्टेंबरला आणि मतदान झाले १५ ऑक्टोबरला. म्हणजे युती तुटल्यानंतर अवघ्या २० दिवसात. दरम्यानच्या काळात उध्दव ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांचा उल्लेख प्रचारादरम्यान केला आणि मोदी दिल्लीहून अफझलखानाचे सैन्य घेऊन महाराष्ट्रात आले आहेत असा वेगळाच इतिहास सांगितला. तसेच शिवसेनेने प्रचारादरम्यानही काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका न करता भाजपवरच टीका केली होती. हे सगळे असले तरी या गोष्टी प्रचाराच्या काळातल्या आहेत, एकदा निवडणुक संपल्यावर परत हे दोन पक्ष एकत्र येतील असे मतदारांना वाटले असेल तर त्यात काही चुकीचे नव्हते. किमानपक्षी नंतरच्या काळात जितके संबंध बिघडले तितके बिघडतील याची कल्पना कोणालाच नव्हती. त्यावेळेस काँग्रेस-राष्ट्रवादी १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर त्यांच्याविरोधात मोठी प्रस्थापितविरोधी लाट होती हे नक्की. अशावेळेस जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला हरवू शकेल इतका प्रबळ भाजपचा उमेदवार नसेल पण असा शिवसेनेचा उमेदवार होता तिथे भाजप मतदारांनीही मते शिवसेनेच्या उमेदवारांना कशावरून दिली नसतील? तेव्हा २८.१% ही भाजपची सर्वोत्तम कामगिरी समजायची का हा प्रश्न आहे. २. आता शिवसेनेबरोबर लढणार नसल्यामुळे शिवसेना मतदारांची मते मिळणार नाहीत त्याप्रमाणेच आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की शिवसेनाविरोधी मतदारांना भाजप आपल्याकडे खेचू शकतो. एक उदाहरण द्यायचे झाले तर मुंबईत महापालिका निवडणुकांमध्ये २०१७ मध्ये युती नव्हती. त्यावेळेस भाजपला मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय मतदारांची मते मिळाली होती आणि भाजपने कधी जिंकल्या नाहीत इतक्या ८२ जागा मुंबई महापालिकेत जिंकल्या. पूर्वी युती असताना ही मते काँग्रेसला जायची. २०१४ नंतर काँग्रेसची पडझड झाली आणि शिवसेनेशी युती नव्हती त्यावेळेस ही मते भाजपकडे गेली. ही मते शिवसेनेच्या विरोधात असल्याने पूर्वी ती मते भाजपकडे कधीच गेली नव्हती. अशी मते काँग्रेसकडून भाजपकडे कशावरून येणार नाहीत? ३. एक पक्ष म्हणून शिवसेनेला मिळणार्‍या मतांमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मिळणारी मते आणि मराठीच्या मुद्द्यावरून मिळणारी मते होती. यापुढे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मिळणार्‍या मतांना शिवसेना हा तितकासा आकर्षक पर्याय राहणे कठीण आहे. ही मते काँग्रेस-राष्ट्रवादीकडे अर्थातच जाणार नाहीत. मग त्यातील बरीचशी मते भाजपकडे का वळणार नाहीत? यातली बरीच मते २०१४ मध्येही स्थानिक पातळीवर शिवसेनेचा उमेदवार प्रबळ असेल तर शिवसेनेला गेली असली तरी यापुढे जातील का हा प्रश्न आहे. तेव्हा शिवसेनेच्या यापुढे होणार्‍या पडझडीचा भाजपला फायदा होणारच नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मराठीचा मुद्दा मुळात मुंबई आणि सभोवतालच्या परिसरात जास्त महत्वाचा आहे. राज्याच्या इतर भागात या मुद्द्याचा इतका प्रभाव नाही. मुंबईत आणि आसपासच्या परिसरातही मराठीच्या मुद्द्यावरून मत देणार्‍यांमध्ये मनसे हा पर्याय मतदारांपुढे आहे. ४. एकनाथ शिंदेंच्या गटाबरोबरच प्रहार संघटना आणि अपक्षांना जागा द्याव्या लागतील म्हणून भाजपत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होईल असे नाही. यापैकी शिंदे गटाच्या बर्‍याचशा जागांवर भाजपची संघटना फार प्रबळ नाही हे वर लिहिलेच आहे. त्यामुळे त्या जागांवर फार प्रश्न येऊ नये. उलट शिंदे गटाचे आमदार आपापल्या भागात स्वतःच्या नावावर बर्‍यापैकी मते घेऊ शकतात त्याचा फायदाच होईल. अपक्ष आणि इतरांपैकी किती आमदार भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आले आहेत? दुसरे म्हणजे हे लोक २०१९ मध्ये स्वतःच्या बळावर निवडून आले असतील तर त्यांची स्वतःची ताकद आहेच ना. अशा उमेदवारांचे समर्थक माणसाला मत देतात पक्षाला नाही. समजा त्यांना भाजपने उमेदवारी दिली आणि जरी बंडखोरी झाली तरी त्यापैकी काही लोक तरी परत निवडून येऊ शकतीलच ना? राज्यात सरकार स्थापन करायचे असेल तर १४५ ची गरज असते पण प्रत्यक्षात ती गरज १३०-१३२ चीच असते. एकदा तो आकडा आला की उरलेले १२-१५ लोक अपक्ष आणि लहान पक्षांकडून मिळू शकतात. असे अपक्ष आणि लहान पक्षवाले लोक बहुतेक वेळा कोणीही सत्तेत असेल त्या बाजूलाच जातात. ५. आता राहिला मुद्दा ब्राह्मण मतदारांमधील नाराजीचा. मागे कोणत्यातरी प्रतिसादात तुम्हीच लिहिले होते की २०१४ मध्ये कोथरूडमधून मेधा कुलकर्णी ६५ हजार मताधिक्याने जिंकल्या पण २०१९ मध्ये चंद्रकांत पाटील यांचे तेच मताधिक्य २५ हजार झाले. हा आकड्यांचा खेळ सुध्दा म्हणता येईल. कारण २०१४ मध्ये मतदान झाले होते १ लाख ९७ हजार तर २०१९ मध्ये १ लाख ९५ हजार म्हणजे जवळपास तेवढेच. २०१४ मध्ये मेधा कुलकर्णींना मते होती १ लाख १ हजार तर २०१९ मध्ये चंपांना मते होती १ लाख ५ हजार. मतांची टक्केवारी बघितली तरी मेधा कुलकर्णींना २०१४ मध्ये ५१.१५% मते होती तर २०१९ मध्ये चंपांना ५३.९३%. मताधिक्य दिसताना इतके कमी दिसते कारण २०१९ मध्ये मनसेच्या किशोर शिंदेंना सगळ्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता आणि आपले उमेदवार त्यांनी उतरवले नव्हते. तीच गोष्ट ओबीसी मतदारांची. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यांचे पंख कापले म्हणजे ओबीसी मतदार नाराज होईलच हे १९९० च्या दशकातले गृहितक झाले. सध्याच्या काळात ते कितपत लागू पडेल याविषयी साशंकता आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचे विधानपरिषदेत पुनर्वसन झाले आहे. समजा फडणवीस परत मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मराठा आरक्षण परत आणायचा प्रयत्न केला तर मात्र ब्राह्मण आणि ओबीसी मतदारांमध्ये ही नाराजी वाढेल हा मुद्दा मान्य. पण समजा तसे झाले नाही तर २०१७-१८ मध्ये फडणवीसांनी मराठ्यांसाठी अमुकतमुक केले म्हणून २०२४ मध्ये त्यांना मते द्यायची नाहीत इतकी सामान्य मतदारांची आठवण तल्लख नसते. संबंधित नेत्यांनी सततचे लांगूलचालन केले तर मतदार मात्र ते लक्षात ठेवतात. म्हणून फडणवीसांना समजा परत मुख्यमंत्रीपद मिळाले तर पुढील दोन वर्षे महत्वाची असतील. तेव्हा भाजपसाठी परिस्थिती इतकी वाईट आहे असे मला तरी वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 06/30/2022 - 10:46

Permalink

जो शरद पवारांच्या नादाला

जो शरद पवारांच्या नादाला लागला त्याचा कार्यभाग बुडाला! स्वतःचे मातृपक्ष अनेक वेळेस फोडून झाले. फडणविसना हसणार्या लोकांनी एवढेच लक्षात ठेवावे की फडणवीस आहेत तिथेच आहेत आणि मी पुन्हा येईन ची खिल्ली उडवली तरी फडणवीस पुन्हा येणारच आहेत पण शिवसेनेचे काय झाले! उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले, आमदारकीचा राजीनामा दिला, पक्ष दुभंगला आणि उद्या मुंबई महापालिका सुद्धा हातातून गेली तर आश्चर्य वाटू नये. शिवसेना सोडून गेलेल्यांची वाताहत झाली असे म्हणणे चूक ठरेल कारण श्री भुजबळ, श्री नारायण राणे आपल्या स्वतःच्या बळावर उभे आहेतच. तेंव्हा रिक्षावाल्याना पानवाल्याना आम्ही उभे केले आणि आम्ही नसलो तर त्यांची वाताहत होईल असे म्हणणे हि सरंजामशाही दर्पोक्ती ठरेल. श्री एकनाथ शिंदे, श्री दीपक केसरकर यांचा आपला बांधलेला मतदार आहे. ते केवळ शिवसेनेच्या पाठबळावर उभे आहेत असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. असे चांगले जनाधार असलेले नेते गमावण्यामुळे उलट शिवसेनेचे फार मोठे नुकसान होईल. आपल्या जनतेची " राजा आणि प्रजा" हि मनोवृत्ती असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक श्री उद्धव ठाकरे यांच्या मागे जातील यात शंका नाही. परंतु जर श्री उद्धव यांनी जमिनीवरच्या सैनिकांकडे दुर्लक्ष करण्याची अक्षम्य चूक पुन्हा केली तर मात्र शिवसेनेचे भविष्य अंधारात असेल. मुसलमानांचे लांगूलचालन केल्यामुळे शिवसेनेस कोणताही फायदा होणार नाही कारण मुसलमान सेनेवर कधीही विश्वास ठेवत नाहीत. उलट त्यामुळे कुंपणावर असणारे हिंदू मात्र मोठ्या प्रमाणावर दुखावले गेले आहेत ज्यात असंख्य शिवसैनिक सुद्धा आहेत. अर्थात हि मते आपोआप भाजपकडे गेल्याने भाजपचा फायदा होईलच पण तुरळक प्रमाणात मुसलमान मते जरी शिवसेनेने खाल्ली तरी राष्ट्रवादी यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यातून श्री अनिल परब आणि श्री संजय राऊत याना इ डी चे बोलावणे आलेले आहे. आता ते किती दिवस बाहेर राहतील हे पाहायला लागेल. कारण ईडीचे लोक सहसा सज्जड पुरावा जमवल्याशिवाय लोकांना आत टाकत नाहीत. राजकीय द्वेषातून अटक झाली इ इ सामान्य मतदारांना सांगण्यासाठी ठीक आहे. पण याचाच व्यत्यास असा आहे कि सामान्य माणसांनी हे पण स्वीकारलेले आहे कि राजकारणी माणूस हा भ्रष्ट असतोच. त्यामुळे एखादा मंत्री/ आमदार आत गेला तर लोक भोग आपल्या कर्माची फळे म्हणून स्वस्थ बसतात त्याला कोणतीही सहानुभूती किंवा जनाधार मिळत नाही त्यात औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद ला धाराशिव करण्यास मान्यता दिल्यामुळे मुस्लिम मतदार दुखावले गेले आहेत धारावी भेंडीबाजार येथील मुसलमान आता भीतीग्रस्त झालेले असतील. त्यांना खरी भीती भाजपची असे. कारण एका व्यापाऱ्याच्या मते शिवसेनेच्या हिंदुत्वाला ते कधीच घाबरत नसत. पैसे दिले कि काम होत असे. परंतु भाजपचे बरेचसे लोक सडे फटिंग असल्याने सहजासहजी पैशाने काम होत नाही. आयुष्यभर सतत कारस्थाने करत राहण्याच्या स्वभावामुळे श्री शरद पवार यांच्यावर कोणीही भरवसा ठेवत नाही. त्यातून त्यांचे दोन मंत्री तुरुंगात बसले आहेत त्यांना बाहेर काढण्यात त्यांना अपयश आल्याने साहेब काहीही करू शकतात यावर खुद्द त्यांच्या पक्षाच्या लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही. वृध्दापकाळात आपल्या पक्षाची वाताहत झाल्याचे सुद्धा पाहणे त्यांच्या नशिबी येणार आहे. पु लं च्या भाषेत शरद पवार यांना शकुनी म्हणावे की अपशकुनी असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ ही म्हण सार्थ आहे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on गुरुवार, 06/30/2022 - 11:15

In reply to जो शरद पवारांच्या नादाला by सुबोध खरे

Permalink

छान विश्लेषण !

छान विश्लेषण ! शकुनी म्हणावे की अपशकुनी --- मला वाटते अपशकुनी म्हणावे. कारण हा माणुस ज्या कोणासोबत जातो त्याचा विनाश होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 06/30/2022 - 11:26

In reply to जो शरद पवारांच्या नादाला by सुबोध खरे

Permalink

कारण ईडीचे लोक सहसा सज्जड

कारण ईडीचे लोक सहसा सज्जड पुरावा जमवल्याशिवाय लोकांना आत टाकत नाहीत. ईडीचे लोक सज्जड पुरावे तसेच भ्रष्ट भाजपेचर पक्षात आहेना ह्याचा पुरावा जमल्याशिवाय लोकांना आत टाकत नाहीत. धारावी भेंडीबाजार येथील मुसलमान आता भीतीग्रस्त झालेले असतील. त्यांना खरी भीती भाजपची असे. कारण एका व्यापाऱ्याच्या मते शिवसेनेच्या हिंदुत्वाला ते कधीच घाबरत नसत. पैसे दिले कि काम होत असे. परंतु भाजपचे बरेचसे लोक सडे फटिंग असल्याने सहजासहजी पैशाने काम होत नाही. कैच्याकै. भाजप म्हणे हिंदूत्ववादी. भाजपने हिंदूंसैठी काय केले हे आजपर्यंत तुम्हाला सांगता आलेले नाही डाक्टर. आयुष्यभर सतत कारस्थाने करत राहण्याच्या स्वभावामुळे श्री शरद पवार यांच्यावर कोणीही भरवसा ठेवत नाही बरोबर. म्हणून सेना आणी काॅंग्रेस ने एकत्र येऊन पवरांच्या भरवस्यावर महाविकाय आघाडी ऊभी केली. कारस्थानं करनार्यांना १०५ असूनही घरी बसावे लागले. खुद्द त्यांच्या पक्षाच्या लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही. हे असं फक्त भाजपच्या लोकांना वाटतं. वृध्दापकाळात आपल्या पक्षाची वाताहत झाल्याचे सुद्धा पाहणे त्यांच्या नशिबी येणार आहे. वाताहत होऊनहा ८० व्या वर्षी ५५ आमदार जिंकवून १०५ घरी बसवून महाराष्ट्र वाचवला होता त्यांनी. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ ही म्हण सार्थ आहे ही म्हण सेनेसाठी सार्थ आहे. ३५ वर्षे ज्यांच्याशी संगं केला त्यांनीच ईडी सीबीआय लावून सेनेचा प्राण घ्यायचा प्रयत्न केला.
  • Log in or register to post comments

Submitted by यश राज on गुरुवार, 06/30/2022 - 11:41

In reply to कारण ईडीचे लोक सहसा सज्जड by अमरेंद्र बाहुबली

Permalink

अहो

.वाताहत होऊनहा ८० व्या वर्षी ५५ आमदार जिंकवून १०५ घरी बसवून महाराष्ट्र वाचवला होता त्यांनी. म्हणे महाराष्ट्र वाचवला होता.. स्वतःच्या २ मंत्र्यांना वाचवू न शकणारे ते. अबा आता त्या धुंदितून बाहेर या,सतत १०५ चा घोशा लावणारे बसलेत आता घरी. व घरी बसलेले जोमाने बाहेर आलेत व आता विरोधी पक्षाला कुठे कुठे बसवतील याचा भरवसा नाहीये. समय का पहिया शेवटी काय...
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 06/30/2022 - 11:58

In reply to अहो by यश राज

Permalink

म्हणे महाराष्ट्र वाचवला होता.

म्हणे महाराष्ट्र वाचवला होता.. स्वतःच्या २ मंत्र्यांना वाचवू न शकणारे ते. त्यांना परस्पर क्लिनचीट दिली नाही. घरी बसलेले जोमाने बाहेर आलेत जोमाने वगैरे नाही ईडीचा धाक दाखवून फोडफोडी करून गुजरात आसाम ला आमदार लपवून मग आलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on गुरुवार, 06/30/2022 - 16:21

In reply to म्हणे महाराष्ट्र वाचवला होता. by अमरेंद्र बाहुबली

Permalink

ऑ!!!!

पास झालो तर मी पास झालो......आणी नापास झाला तर गुरुजींनी (श्रीगुरुजी नाही) नापास केला...................हा रडीचा डाव कधीपर्यंत खेळणार. शरद पवार पुर्ण भिजले असते तर कदाचित सरकार ५ वर्षे टिकले असते पण ते अर्धवट भिजले नी २.५ वर्षात बुंदीवाला त्यांच्या पानापर्यंत येईतोवर लग्नातली बुंदीच संपली. आता आजीवन भावी पंतप्रधान विथ आजीवन भावी मुख्यमंत्रीण बाई. बाकी कोणी कितीही उपटो (हिंदीत पटको) पण गेले ते गेले आले ते आलेच.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 06/30/2022 - 16:27

In reply to ऑ!!!! by इरसाल

Permalink

ह्या बद्दल ईडी, राज्यपाल,

ह्या बद्दल ईडी, राज्यपाल, सीबीआय ह्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on गुरुवार, 06/30/2022 - 17:14

In reply to ह्या बद्दल ईडी, राज्यपाल, by अमरेंद्र बाहुबली

Permalink

हं

पण ह्या लोकांनी काही चुकीचे केले नसेल तर इडी, राज्यपाल आणी सीबीआयला कां म्हणुन घाबरावे. की घोटाळे करुनही आम्हाला कोणी काहीच करु नये अशी अपेक्षा आहे. आता भाजपच्या लोकांना का नाही आटक करत अस बोंबलाल....तर मागचे २.५ वर्ष सरकारात राहुन काय फक्त वसुलीसंचलन केले कां?
  • Log in or register to post comments

Submitted by यश राज on गुरुवार, 06/30/2022 - 11:43

In reply to कारण ईडीचे लोक सहसा सज्जड by अमरेंद्र बाहुबली

Permalink

अहो

.वाताहत होऊनहा ८० व्या वर्षी ५५ आमदार जिंकवून १०५ घरी बसवून महाराष्ट्र वाचवला होता त्यांनी. म्हणे महाराष्ट्र वाचवला होता.. स्वतःच्या २ मंत्र्यांना वाचवू न शकणारे ते. अबा आता त्या धुंदितून बाहेर या,सतत १०५ चा घोशा लावणारे बसलेत आता घरी. व घरी बसलेले जोमाने बाहेर आलेत व आता विरोधी पक्षाला कुठे कुठे बसवतील याचा भरवसा नाहीये. समय का पहिया शेवटी काय...
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on गुरुवार, 06/30/2022 - 10:59

Permalink

एकच गोष्ट नक्की झाली.

एकच गोष्ट नक्की झाली. घराणेशाही असलेले पक्ष फार तर दोन किंवा तीन पिढ्या चालतील त्यानंतर पडझड, पीछेहाट अटळ आहे. पहिली पिढी वाढवते, दुसरी पिढी टिकवते / डुबवते , तिसरी पिढी संपवते. काँग्रेस जात्यात आहे, सेना सुपात आहे तर राष्ट्रवादी पोत्यात आहे. पवारांनी सुध्दा पवार / सुळे प्रेमापोटी वाहवत न जाता स्वतःनंतर पक्षाची धुरा समर्थ हातात जावी यासाठी योग्य निर्णय आताच घेतला पाहिजे
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 06/30/2022 - 11:17

Permalink

घराणेशाही असलेले पक्ष फार तर

घराणेशाही असलेले पक्ष फार तर दोन किंवा तीन पिढ्या चालतील त्यानंतर पडझड, पीछेहाट अटळ आहे. असहमत. मूघलांच्या सात च्या सात पिढ्यांनी राज्य केलं. औरंगजेबाने आपल्या मूलांना राज्यकारभारापासून दूर ठेवलं म्हणून मूघल संपले. गांधी घराण्यात मोतीलाल, जवाहर, ईंदीरा (महापराक्रमी), संजय-राजीव हे चांगलेच नेते होते. एक राहूल गांधींवर फक्त गाडी अडली पुढे प्ढी नाही म्हणून. ठाकरे घराण्यात प्रबोधनकार, बाळासाहेब, ऊध्दव, आदीत्य सर्वच कर्तबगार आहेत. फडणवीस घराण्यात गंगाधर आमदार, शोभाकाकू मंत्री, देवेंद्र मूख्यमंत्री. त्यामुळे तीसरी पिढी दुबळी वगैरे ह्या सर्व कंड्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on गुरुवार, 06/30/2022 - 11:37

Permalink

गेले

का मविआ सरकार.. अगदी वाईट झाले. आता फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून अदिलशाह,अफजल खान, वाघनखे, तलवार, मुंबई महाराष्ट्रपासून तोडायचा डाव, कोमट पाणी, महाराष्ट्राचा अपमान व टोमणे बॉंब या सर्वाला महाराष्ट्रीयन जनता आता मुकणार.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 06/30/2022 - 11:39

Permalink

सगळ्यात मोठा फायदा संजय

सगळ्यात मोठा फायदा संजय राउतांचा झालाय. त्यांना शिवसेना नावाचा पक्ष आयता मिळालाय. उद्धव ठाकरे हे आता संपूर्ण नामधारी रहातील आणि पक्ष संजय राऊत चालवतील. बोलबच्चनगिरीतुन सावरले असतील तर मागून दोर्‍या हलवतील
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on गुरुवार, 06/30/2022 - 11:47

Permalink

नामांतर

अल्पमतात आसलेले सरकार त्यांची केस न्यायालयात प्रलंबित असताना नामांतराचा निर्णय घेऊ शकते का? नामातंर केले म्हणजे हिन्दुत्ववादी आहेत कसे सिद्ध होते. करायचेच होते तर मागील आडिच वर्षात का नाही केले. जेव्हा जेव्हा विषय निघाला तेंव्हा केन्द्रावर खापर फोडले. शेवटच्या क्षणी सद् बुद्धी? कशी सुचली. नामातंर हा विषय वादग्रस्त आसल्याने नविन सरकार करता जाणूनबुजून निर्माण केलेली डोकेदुखी तर नाही. निरोपाच्या भाषणात आडीच वर्षात काय केले याबद्दल काहीच सांगायला नव्हते. नामांतराचा निर्णय हा इतका महत्वाचा होता का. वरिष्ठ, अनुभवी सैनिकांना डावलून मा.अदित्य ठाकरेला मंत्रिपद देणे हे ज्येष्ठांना कुठे खुपले तर नसेल. मुलाला मोठे करण्याची एवढी काय घाई होती. "उधो,कर्मनः की गती न्यारी" भक्त सूरदास लिहून गेले आहेत त्याची आठवण आली.
  • Log in or register to post comments

Submitted by यश राज on गुरुवार, 06/30/2022 - 12:02

In reply to नामांतर by कर्नलतपस्वी

Permalink

सहमत

  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 06/30/2022 - 12:06

In reply to नामांतर by कर्नलतपस्वी

Permalink

मागील आडिच वर्षात का नाही

मागील आडिच वर्षात का नाही केले २०१४ ते २०१९ का नाही केले?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 06/30/2022 - 11:56

Permalink

सर्वात मोठा फायदा बारामतीच्या

सर्वात मोठा फायदा बारामतीच्या काकांचा झालाय. त्यांना आता पुढच्या निवडणूकीत पूर्ण बहुमत मिळेल. आणि कोणाचाही पाठिंबा न घेता स्वतःचे सरकार स्थापन करता येईल. सेनेचा मतदार त्यांच्या पक्षाकडे वळणार.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 06/30/2022 - 12:00

In reply to सर्वात मोठा फायदा बारामतीच्या by विजुभाऊ

Permalink

सेनेचा मतदार त्यांच्या

सेनेचा मतदार त्यांच्या पक्षाकडे वळणार. भाजपचे सध्याचे गलिच्छ राजकारण पाहीले तर भाजपचा ही वळनार.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 06/30/2022 - 12:51

In reply to सेनेचा मतदार त्यांच्या by अमरेंद्र बाहुबली

Permalink

मग महाराष्ट्राचे काय होणार?

मग महाराष्ट्राचे काय होणार?

सेना म्हणजेच महाराष्ट्र

  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on गुरुवार, 06/30/2022 - 12:29

Permalink

एक बाजू

एक बाजू लावून धरल्याने धागा चांगला पळतोय. नामांतराचा निर्णय बघून पेपर संपल्याची घंटा झाल्यावर पुरवणी जोडणाऱ्या विद्यार्थ्यांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 06/30/2022 - 12:58

Permalink

कुबडी

स्वबळाच्या वल्गना करणाऱ्या ना पुन्हा कुबड्या घ्याव्या लागल्या
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 06/30/2022 - 12:59

In reply to कुबडी by कपिलमुनी

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on गुरुवार, 06/30/2022 - 15:43

Permalink

इतिहास गवाह आहे. काका

इतिहास गवाह आहे. काका पुतण्याला वाचवत नाही. आमची सौ. उंदराला पिंजऱ्यात पकडण्यासाठी पोळीला तूप लावते. शिवसेनेचा व्होट बँक मराठी अस्मिता, गुजराती विरोध आणि कट्टर हिंदुत्व. गृह आणि अर्थ खाते हातात ठेऊन काकांनी शिवसेनेला हिंदुत्व पासून दूर नेले आणि शिवसेनेच्या आमदारांच्या हातात नारळ ठेवले. शेवटी शिवसेना फुटली. पुढच्या निवडणुकीत मराठी अस्मिता आणि गुज्जू विरोधी मते काका खातील. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाच हस्तगत केली त्यामुळे भाजपला काहीच फायदा होणार नाही. BMC निवडणूकीत शिंदे सेना अर्ध्या जागा मागतील त्या देणे भाजपला शक्य होणार नाही. दुसरीकडे BMC निवडणूकीत युती ९० पेक्षा जास्त जागा उद्धव सेनेला देणार नाही. एकटे लढून हरल्यास त्यांची गत शोलेच्या असरानी सारखी होईल. तूर्त काका दिवाळी साजरी करत असणार .
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 06/30/2022 - 16:03

In reply to इतिहास गवाह आहे. काका by विवेकपटाईत

Permalink

इतिहास

इतिहास सांगतो , दिल्लीकराना महाराष्ट्राचे चांगले कधीही बघवत नाही . इतिहास सांगतो, गुज्जू मराठी लोकांचा द्वेष करतात..
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 06/30/2022 - 16:14

In reply to इतिहास by कपिलमुनी

Permalink

+१. महापालिका भादपच्या

+१. महापालिका भादपच्या ताब्यात गेली तर मराठी माणूस मुंबईतून संपवायचा प्रयत्न करतील. नंतर मुंबईला केंद्रशासीत प्रदेश मग हळूच गुजरात राज्यात समावेश करवतील. हे सगळं “राष्ट्रहीतासाठी” केलं असंहा सांगतील
  • Log in or register to post comments

Submitted by Doga on गुरुवार, 06/30/2022 - 19:32

In reply to +१. महापालिका भादपच्या by अमरेंद्र बाहुबली

Permalink

विनाकारण मुंबईच्या पन्चायती!

विनाकारण मुंबईच्या पन्चायती!
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Sat, 07/02/2022 - 05:26

In reply to +१. महापालिका भादपच्या by अमरेंद्र बाहुबली

Permalink

अहाहा काय तर्क

अहाहा काय तर्क काय तर्क राजेश भाऊ १८८ , करचुरे साहेब .. हेच जर केंद्रात २ पंजाबी किंवा २ उत्तरपरदेशी सतत केंद्री असते तर तुम्ही पंजाब किंवा उत्तर प्रदेशाचं नावाने ठणाणा केला असता आता सांगा समजा उद्या मोदी शहा ऐवजी गडकरी आणि फडणवीस अशी जोडगोळी आली सत्ताकेंद्री तर काय आरडा ओरडा करणार तुम्ही राजय पातळी वरील पक्ष आणि राष्ट्रउया पातळी वरील पक्ष ( जुना काँगेस किंवा आत्ताच भाजप ) यांच्यात हा वाद सत्तात चालूच राहणार दिल्ली ला स्वतःचे असे अस्तित्व नाही ,, त्यामुळे आज जर २ गुजराथचे तर लगेच दिली गुजराथी झाली का!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 07/02/2022 - 09:35

In reply to इतिहास by कपिलमुनी

Permalink

इतिहास सांगतो, गुज्जू मराठी

इतिहास सांगतो, गुज्जू मराठी लोकांचा द्वेष करतात.. इतिहास सांगतो, कानडी मराठी लोकांचा द्वेष करतात. बेळगावात जाऊन पहा. सामना सारखी वर्तमान पत्रे वाचलीत तर मराठी माणूस उत्तर परदेशी किंवा बिहारींचा (भय्ये) द्वेष करतो असे वाटेल. "बजाव पुंगी हटाव लुंगी" सारख्या घोषणा कुणी दिल्या होत्या? बंगलोर मधील वृत्तपत्रे वाचलीत तर तामिळ माणसे कन्नडिगांचा द्वेष करतात असे वाटेल. तुम्ही फक्त तुमचा चष्मा काढा. असा सवंग द्वेष कुणीही करत नाही. गुजरात राजस्थानात प्रत्यक्ष जाऊन पहा शिवाजी महाराजांबद्दल किती आदर आहे ते. आपला मोदि शाह बद्दल चा द्वेष जगजाहीर आहे पण त्यासाठी संपूर्ण गुजराती माणसांना दोषी ठरवणे हि अत्यंत संकुचित मनोवृत्ती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 07/02/2022 - 10:43

In reply to इतिहास सांगतो, गुज्जू मराठी by सुबोध खरे

Permalink

+१ सहमत.

+१ सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Tue, 07/05/2022 - 10:10

In reply to इतिहास सांगतो, गुज्जू मराठी by सुबोध खरे

Permalink

+१

सहमत !
  • Log in or register to post comments

Submitted by एकुलता एक डॉन on Fri, 07/01/2022 - 01:47

In reply to इतिहास गवाह आहे. काका by विवेकपटाईत

Permalink

आमची सौ. उंदराला पिंजऱ्यात

आमची सौ. उंदराला पिंजऱ्यात पकडण्यासाठी पोळीला तूप लावते खरच?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 07/01/2022 - 02:05

In reply to आमची सौ. उंदराला पिंजऱ्यात by एकुलता एक डॉन

Permalink

पोळीला तूप लावून ऊंदीर कसा

पोळीला तूप लावून ऊंदीर कसा सापडेल? पोळी पिंजर्यात ही ठेवायला हवी ना?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 07/01/2022 - 11:38

In reply to पोळीला तूप लावून ऊंदीर कसा by अमरेंद्र बाहुबली

Permalink

नाही

नाही उंदराला पिंजऱ्यात ठेवून पोळीला तूप लावते. उगाच काहींच्या काही
  • Log in or register to post comments

Submitted by एकुलता एक डॉन on Fri, 07/01/2022 - 12:37

In reply to नाही by सुबोध खरे

Permalink

उन्द्राला तुप लाउन

उन्द्राला तुप लाउन पिन्जर्यात ठेवावे
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 07/01/2022 - 12:59

In reply to उन्द्राला तुप लाउन by एकुलता एक डॉन

Permalink

मग पोळीला काय लावावे?

मग पोळीला काय लावावे?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 06/30/2022 - 16:51

Permalink

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on गुरुवार, 06/30/2022 - 16:52

In reply to एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची by विजुभाऊ

Permalink

म्हणजे नक्की गेम कोणाचा झाला?

म्हणजे नक्की गेम कोणाचा झाला?
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on गुरुवार, 06/30/2022 - 16:58

Permalink

अडीच वर्षांपूर्वी हीच मागणी

अडीच वर्षांपूर्वी हीच मागणी होती शिवसेनेची तेव्हा अतिआत्मविश्वास नडला बीजेपिला. आज ताकही फुंकून पित आहेत,आत्मविश्वास गळून पडला.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on गुरुवार, 06/30/2022 - 17:21

Permalink

श्री शिंदे मुख्यमंत्री आणि

श्री शिंदे मुख्यमंत्री आणि त्याला भाजपचा आतुन पांठिबा अशी बातमी येत आहे. असे असेल तर भाजपाने २०१९ पासुन विरोधी पक्षात बसुन काय कमावले अशा प्रश्न पडतो. शिवसेना आम्ही भाजपला वाकवले असा मुद्दा नक्की करणार.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 06/30/2022 - 18:30

In reply to श्री शिंदे मुख्यमंत्री आणि by Trump

Permalink

शिवसेना आम्ही भाजपला वाकवले

शिवसेना आम्ही भाजपला वाकवले असा मुद्दा नक्की करणार. भाजपच्या दृष्टीने महाराष्ट्र हे एक राज्य आहे आणि शिवसेनेच्या दृष्टीने संपूर्ण पक्षाचे भवितव्य. शिवसेना सध्या कुणाकडे जाणार हाच प्रश्न महत्त्वाचा होणार आहे. बाकी डुक्कर रेडे म्हणून विशेषणे लावणाऱ्या राऊतांची मात्र झोप उडाली असेल. "परब, राऊत" आता देव पाण्यात बुडवून बसले असतील. सुधांत सिंह राजपूत यांची केस परत उघडणार काय या भीतीने युवराजांची पचनशक्ती पण बिघडली असेल. काकांना भिजण्यासाठी महाराष्ट्रात भरपूर पाऊस पण पडतो आहे. पहा आता काय होतंय ते. FADANVIS IS HAVING LAST LAUGH
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 06/30/2022 - 18:33

In reply to श्री शिंदे मुख्यमंत्री आणि by Trump

Permalink

शिवसेना आम्ही भाजपला वाकवले

शिवसेना आम्ही भाजपला वाकवले असा मुद्दा नक्की करणार. भाजपच्या दृष्टीने महाराष्ट्र हे एक राज्य आहे आणि शिवसेनेच्या दृष्टीने संपूर्ण पक्षाचे भवितव्य. शिवसेना सध्या कुणाकडे जाणार हाच प्रश्न महत्त्वाचा होणार आहे. बाकी डुक्कर रेडे म्हणून विशेषणे लावणाऱ्या राऊतांची मात्र झोप उडाली असेल. "परब, राऊत" आता देव पाण्यात बुडवून बसले असतील. सुधांत सिंह राजपूत यांची केस परत उघडणार काय या भीतीने युवराजांची पचनशक्ती पण बिघडली असेल. काकांना भिजण्यासाठी महाराष्ट्रात भरपूर पाऊस पण पडतो आहे. पहा आता काय होतंय ते. FADANVIS IS HAVING LAST LAUGH
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 06/30/2022 - 18:57

In reply to शिवसेना आम्ही भाजपला वाकवले by सुबोध खरे

Permalink

सुधांत सिंह राजपूत यांची केस

सुधांत सिंह राजपूत यांची केस परत उघडणार काय या भीतीने युवराजांची पचनशक्ती पण बिघडली असेल.
केंद्राने सीबीआय पाठवून “सुशांतनो आत्महत्या केली” असा अहवाल पाठवून केस कधीच बंदं केलीय.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 06/30/2022 - 18:57

Permalink

या सगळ्या गदारोळात खरा गेम

या सगळ्या गदारोळात खरा गेम फडणवीस चा झाला आहे. चंपा आणि फडणवीस यांना कसलेही मास अपील नाहीये .२०१४ नंतर फडणवीस वरुन आदेश आल्यावर cm झाले होते. केंद्रातली सत्ता गेली तर चंपा तर ग्रामपंचायत मध्ये एक सरपंच निवडून आणू शकणार नाही.. आणि मोदी शहा यांच्याकडून सेंट्रली सगळा राज्यकारभार हाकला जातोय, त्यामुळे फडणवीस ला मास्टर स्ट्रोक मारला वगैरे म्हणणे म्हणजे उगाच वर चढवणे आहे, कालचे जनमत ठाकरें प्रती सहानभूती आणि भाजप विरोधी झालेच होते, त्यामुळे जो निर्णय वरून आला तो घ्यावाच लागला.. नाहितर फडणवीस किती सत्तापिपासु आहे हे नव्याने का सांगावे लागेल? आणि जर दुसऱ्याला मुख्यमंत्री करायचे होते तर २०१९ ला गप शिवसेने बरोबर गेल्याचे काय वाईट होते.. त्यामुळे गेम झालाय पण गप मास्टरस्ट्रोक मारला म्हणुन मनात झुरन्यापेक्षा हातात काहीच नाही.. असो, दुसऱ्या साठी खड्डा खांदणारा स्वतःच त्या खड्ड्यात पडतो हे यावरून दिसते आहे.. -- गणेशा
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com