मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अतृप्त ओळी

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आत्मसमरूप दिसतात ओळी आत्मस्वरूप असतात ओळी . इथे नदीचा दिसतो काठ तिथे संथ प्रवाह पार लावतात ओळी . निराळ्या वेदनेच्या एकाच गावी दिसता दिसतो आम्ही सहप्रवासी कुठे दूर अंधारात हरवले गाव माझे दिसे मी उगाचच तिथला निवासी असे शब्द साधे येतात साथी कविता त्यातुन वाहते प्रपाती . उरी अंतरी घाव नाजूक खोल वरी दिसते केवळ शांत ज्योती ! आम्ही नाही ऐसे कवी ज्यास म्हणती जशी वेदना ती , तसे शब्द हाती. मनाचेच सारे इथे मांडयाचे .. न पूर्ती मिळे त्यातूनी .. काय त्याचे? असा मी ही अतृप्त अतृप्त आहे . . माझ्या स्वभावी मूळचा शाप आहे . .भोगूनी जाईन अतृप्ती सारी ... तिथे शब्द तृप्त होतील सारे ..! ================ अतृप्त

वाचने 4104 वाचनखूण प्रतिक्रिया 11

Bhakti Wed, 06/29/2022 - 09:15
असे शब्द साधे येतात साथी कविता त्यातुन वाहते प्रपाती . उरी अंतरी घाव नाजूक खोल वरी दिसते केवळ शांत ज्योती !

नि३सोलपुरकर Wed, 06/29/2022 - 09:48
निराळ्या वेदनेच्या एकाच गावी दिसता दिसतो आम्ही सहप्रवासी कुठे दूर अंधारात हरवले गाव माझे दिसे मी उगाचच तिथला निवासी असे शब्द साधे येतात साथी कविता त्यातुन वाहते प्रपाती . उरी अंतरी घाव नाजूक खोल वरी दिसते केवळ शांत ज्योती ! ___/\__ बुवा, १ नंबर

कर्नलतपस्वी Wed, 06/29/2022 - 13:53
असा मी ही अतृप्त अतृप्त आहे . . माझ्या स्वभावी मूळचा शाप आहे . .भोगूनी जाईन अतृप्ती सारी ... तिथे शब्द तृप्त होतील सारे ..! सुंदर, आवडली.