सुरुवातीला नरेंद्र मोदी दूरदर्शनवरून करोनाबाबत बोलले. टाळ्या वाजवून आणि दिवे लावून त्यांनी करोनासाठी काम करणाऱ्यांचे अभिनंदन करावयास सांगितले. प्रत्येक ठिकाणी मास्क घातलेली त्यांची छबी झळकायला लागली. अगदी मन की बात मधे माईक समोर सुद्धा ते तोंडावर मास्क घालू लागले.
स्वतः पंतप्रधानच सांगत असल्यामुळे जनतेनेही करोनाचा धसका घेतला आणि करोनाचा बागुलबुवा उभा राहिला. करोनाच्या उपचारासाठी हॉस्पिटलात दाखल झालेल्यांच्या बातम्या माध्यमांमधे झळकू लागल्या. त्यांचा दिनक्रमही दाखवला जाऊ लागला. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर हे लोक स्वतःला करोना-योद्धे म्हणवत करोना डायरीज लिहू लागले.
करोनापासून वाचण्यासाठी लस कंपल्सरी झाली. सरकार कितीही नाही म्हटले तरी लस नसेल तर अनेक ठिकाणी अडवणूक व्हायला लागली. त्यामुळे मनात नसताना अनेकांना लस घ्यावी लागली. मूळात रोग खरा आहे का याचा पत्ता नाही आणि इथे उपचारांची सक्ती सुरू झाली होती. पण यामधे अनेक लोकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आणि उभ्या केलेल्या करोनाच्या बागुलबुवाला न जुमानता करोनाची लस अजिबात घेतली नाही.
बातमी पहा
आणि आता स्वतः केंद्र सरकार न्यायालयामधे सांगते की लस सक्तीची नाही आणि लसवाल्या कंपन्यांना न्यायालय सांगते की आधी तुमच्या लसीचे कुणाकुणावर दुष्परिणाम झालेले आहेत त्याची आकडेवारी आणून द्या आणि लस निर्मात्या कंपन्या म्हणतात आम्ही अशी आकडेवारी देणार नाही अशी आकडेवारी दिली तर आमच्या लशीच्या खपावर परिणाम होईल.
आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीमधे एक डॉक्टर प्रामाणिकपणाने सांगतात, हा रोग काय आहे ते आम्हाला समजलेले नाही. जगभरात सगळीकडे चाचपडतच उपचार सुरू आहेत.
असे असताना उच्चशिक्षित डॉक्टर्स मात्र करोनाबाबत छातीठोकपणे बोलताना आणि करोनाची भीती आणखीन वाढवताना दिसतात. प्रश्न पडतो हे डॉक्टर्स या गोष्टी मुद्दामून करीत असतात की सामान्य माणसांप्रमाणेच तेही अनभिज्ञ असतात ?
वाचने
33457
प्रतिक्रिया
147
मिसळपाव
प्रतिक्रिया
मतावर ठाम रहा
In reply to बाकी तुम्हाला काही सांगणे by उन्मेष दिक्षीत
हे पालथ्या घड्यावर नव्हे तर
In reply to मतावर ठाम रहा by sunil kachure
करोंनापेक्षा औषधांनी बळी
In reply to 1. शुगर वाढणे, by सुबोध खरे
you get a skin rash that may
In reply to करोंनापेक्षा औषधांनी बळी by विवेकपटाईत
दलाल
करोनामृत्यू व लसमृत्यू
मी फक्त औषधांमुळे झालेले
In reply to करोनामृत्यू व लसमृत्यू by गामा पैलवान