Skip to main content

करोनाचा बागुलबुवा

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 16/05/2022 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवातीला नरेंद्र मोदी दूरदर्शनवरून करोनाबाबत बोलले. टाळ्या वाजवून आणि दिवे लावून त्यांनी करोनासाठी काम करणाऱ्यांचे अभिनंदन करावयास सांगितले. प्रत्येक ठिकाणी मास्क घातलेली त्यांची छबी झळकायला लागली. अगदी मन की बात मधे माईक समोर सुद्धा ते तोंडावर मास्क घालू लागले. स्वतः पंतप्रधानच सांगत असल्यामुळे जनतेनेही करोनाचा धसका घेतला आणि करोनाचा बागुलबुवा उभा राहिला. करोनाच्या उपचारासाठी हॉस्पिटलात दाखल झालेल्यांच्या बातम्या माध्यमांमधे झळकू लागल्या. त्यांचा दिनक्रमही दाखवला जाऊ लागला. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर हे लोक स्वतःला करोना-योद्धे म्हणवत करोना डायरीज लिहू लागले. करोनापासून वाचण्यासाठी लस कंपल्सरी झाली. सरकार कितीही नाही म्हटले तरी लस नसेल तर अनेक ठिकाणी अडवणूक व्हायला लागली. त्यामुळे मनात नसताना अनेकांना लस घ्यावी लागली. मूळात रोग खरा आहे का याचा पत्ता नाही आणि इथे उपचारांची सक्ती सुरू झाली होती. पण यामधे अनेक लोकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आणि उभ्या केलेल्या करोनाच्या बागुलबुवाला न जुमानता करोनाची लस अजिबात घेतली नाही. बातमी पहा आणि आता स्वतः केंद्र सरकार न्यायालयामधे सांगते की लस सक्तीची नाही आणि लसवाल्या कंपन्यांना न्यायालय सांगते की आधी तुमच्या लसीचे कुणाकुणावर दुष्परिणाम झालेले आहेत त्याची आकडेवारी आणून द्या आणि लस निर्मात्या कंपन्या म्हणतात आम्ही अशी आकडेवारी देणार नाही अशी आकडेवारी दिली तर आमच्या लशीच्या खपावर परिणाम होईल. आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीमधे एक डॉक्टर प्रामाणिकपणाने सांगतात, हा रोग काय आहे ते आम्हाला समजलेले नाही. जगभरात सगळीकडे चाचपडतच उपचार सुरू आहेत. असे असताना उच्चशिक्षित डॉक्टर्स मात्र करोनाबाबत छातीठोकपणे बोलताना आणि करोनाची भीती आणखीन वाढवताना दिसतात. प्रश्न पडतो हे डॉक्टर्स या गोष्टी मुद्दामून करीत असतात की सामान्य माणसांप्रमाणेच तेही अनभिज्ञ असतात ?

वाचने 33457
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

In reply to by उन्मेष दिक्षीत

१)प्रतिसाद पहिला. किडनी,लिव्हर वर corona विषाणू परिणाम करतो हे dr ना माहीत होते. २)मी प्रतिवाद केल्यानंतर . प्रतिसाद २) मार्स ,sars मुळे dr ना covid मुळे किडनी आणि लिव्हर वर परिणाम होतो हे थोडेफार माहीत होते..इथे थोडेफार हा शब्द महत्वाचा आहे. आजुन कोणी प्रतिवाद केला तर dr ना covid मुळे किडनी आणि लिव्हर वर परिणाम होत असावा असा संशय होता. अशी पलटी खरे साहेब मारतील.

In reply to by सुबोध खरे

करोंनापेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे धडधडीत असत्य खरे साहेब करोंना वर उगाच दोष देण्यात अर्थ नाही. ही लिंक बघून खात्री करा Common Side Effects Anemia (low number of red blood cells) Fever Kidney damage Hypotension (low blood pressure) Nausea Vomiting Increased liver enzymes https://www.bing.com/search?q=side+effects+of+remdesivir&filters=dtbk:%… बाकी तुम्ही औषधांच्या साईट वर जाऊन खात्री करू शकतात. तुम्ही १०० असत्य म्हंटले तरी सत्य बदलणार नाही.

In reply to by विवेकपटाईत

you get a skin rash that may include itchy, red, swollen, blistered or peeling skin you're wheezing you get tightness in the chest or throat you have trouble breathing or talking your mouth, face, lips, tongue or throat start swelling You could be having a serious allergic reaction and may need immediate treatment in hospital. https://www.nhs.uk/medicines/paracetamol-for-adults/ Paracetamol overdose is one of the leading causes of acute liver failure. https://britishlivertrust.org.uk/researchers-shed-new-light-paracetamol…. आपण रोज घेत असलेल्या क्रोसीन किंवा पॅरासिटामॉल या औषधाचे आहेत जे औषध गरोदर पणात सुद्धा सुरक्षित समजले जाते म्हणून क्रोसीन मुळे रोगापेक्षा जास्त त्रास होतो म्हटल्यासारखे आहे. रेम डेसी व्हिरला साईड इफेक्टस आहेत म्हणून त्याने कोव्हीड रोगापेक्षा जास्त लोक मेले असे म्हणणे केवळ हास्यास्पद आहे.

दलाल. मीडिया आणि बाकी बरेच. ह्यांनी बोंब नाही मारली तर 4th कथित corona लाट आली कधी आणि गेली कधी हे पण माहीत पडणार नाही. पण दलाल बेंबी च्या देटपासून बोंब ठोकणार . दलाली मिळाली पाहिजे ना.

सुबोध खरे डॉक्टर,
करोंनापेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे धडधडीत असत्य
त्याचं काय आहे की मृताच्या अंगात करोना सापडला तर तो ३० दिवसांनीही करोनाचा मृत्यू म्हणूनच धरायचा. भले क्लिनिकल इन्फेक्शन नसलं तरीही. मात्र करोनाची लस टोचून घेतल्यावर आठवड्यात मृत्यू झाला तरीही तो लशीमुळे झालेला मृत्यू धरायचा नाही. या दुटप्पी निकषांमुळे लसमृत्यू दडपले गेले आहेत आणि करोनामृत्यू फुगवले गेले आहेत. आ.न., -गा.पै.