Skip to main content

करोनाचा बागुलबुवा

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 16/05/2022 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवातीला नरेंद्र मोदी दूरदर्शनवरून करोनाबाबत बोलले. टाळ्या वाजवून आणि दिवे लावून त्यांनी करोनासाठी काम करणाऱ्यांचे अभिनंदन करावयास सांगितले. प्रत्येक ठिकाणी मास्क घातलेली त्यांची छबी झळकायला लागली. अगदी मन की बात मधे माईक समोर सुद्धा ते तोंडावर मास्क घालू लागले. स्वतः पंतप्रधानच सांगत असल्यामुळे जनतेनेही करोनाचा धसका घेतला आणि करोनाचा बागुलबुवा उभा राहिला. करोनाच्या उपचारासाठी हॉस्पिटलात दाखल झालेल्यांच्या बातम्या माध्यमांमधे झळकू लागल्या. त्यांचा दिनक्रमही दाखवला जाऊ लागला. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर हे लोक स्वतःला करोना-योद्धे म्हणवत करोना डायरीज लिहू लागले. करोनापासून वाचण्यासाठी लस कंपल्सरी झाली. सरकार कितीही नाही म्हटले तरी लस नसेल तर अनेक ठिकाणी अडवणूक व्हायला लागली. त्यामुळे मनात नसताना अनेकांना लस घ्यावी लागली. मूळात रोग खरा आहे का याचा पत्ता नाही आणि इथे उपचारांची सक्ती सुरू झाली होती. पण यामधे अनेक लोकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आणि उभ्या केलेल्या करोनाच्या बागुलबुवाला न जुमानता करोनाची लस अजिबात घेतली नाही. बातमी पहा आणि आता स्वतः केंद्र सरकार न्यायालयामधे सांगते की लस सक्तीची नाही आणि लसवाल्या कंपन्यांना न्यायालय सांगते की आधी तुमच्या लसीचे कुणाकुणावर दुष्परिणाम झालेले आहेत त्याची आकडेवारी आणून द्या आणि लस निर्मात्या कंपन्या म्हणतात आम्ही अशी आकडेवारी देणार नाही अशी आकडेवारी दिली तर आमच्या लशीच्या खपावर परिणाम होईल. आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीमधे एक डॉक्टर प्रामाणिकपणाने सांगतात, हा रोग काय आहे ते आम्हाला समजलेले नाही. जगभरात सगळीकडे चाचपडतच उपचार सुरू आहेत. असे असताना उच्चशिक्षित डॉक्टर्स मात्र करोनाबाबत छातीठोकपणे बोलताना आणि करोनाची भीती आणखीन वाढवताना दिसतात. प्रश्न पडतो हे डॉक्टर्स या गोष्टी मुद्दामून करीत असतात की सामान्य माणसांप्रमाणेच तेही अनभिज्ञ असतात ?

वाचने 33457
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

In reply to by कॉमी

माझी च चूक झाली. सर्व च मारणार आहेत हे तुमचे मत अगदी योग्य आहे तुमचे मत अगदी योग्य आहे. सर्व च मारणार आहेत.

सुबोध खरे डॉक्टर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
पुस्तके गुप्तपणे वाचायची सवय नाही आणि गरजही नाही.
मग उघडपणे वाचून आणि खरंखोटं का करीत नाही तुम्ही ? २.
असे अनेक लोक मला अनेकदा असून तमुक पुस्तक वाचा आणि अभिप्राय द्या सांगतात.
मी त्या अनेक लोकांमध्ये मोडंत नाही. मी नीतिमत्तेचा महामेरू आहे. मी सांगतो म्हणून वाचा ३.
एकतर मला त्यात रस नाही आणि फुकट घालवायला तितका वेळ ही नाही.
का बरं रस नाही? ते तुमच्याच क्षेत्रातलं पुस्तक आहे. लेखिका सुझान हम्फ्रीझ या नावाजलेल्या व प्रमाणित ( = certified ) मूत्रपिंडतत्ज्ञा आहेत. त्यांना अमेरिकेतल्या मेन ( Maine ) मधल्या रुग्णालयात काम करायचा तसेच रॉबर्ट वूड जॉनसन वैद्यकीय विद्यापीठात सहायक प्राध्यापकीचा अनुभव आहे. त्यांचं कथन तुम्हांस वेळ फुकट घालवणारं वाटतं. हे चर्चच्या मध्ययुगीन बिशपसारखं आहे. बायबलाच्या दोन पुठ्ठ्यांच्या मध्ये जे काही लिहिलंय तेच खरं आहे असा पोपच्या चमच्यांचा अट्टाहास असे. गालिलीयोने केलेले प्रयोग प्रत्यक्षात बघायला रस होता कोणाला? तुम्हीही आलोपाठी मेडिसिनल चर्चचे पादरी झालेले आहात. लशीकरणाला २५०+ वर्षांचा इतिहास आहे आणि तो काळाकुट्ट आहे. पण ते वाचण्यात तुम्हांस रस नाही. आणि बाता कसल्या मारता की म्हणे दुराग्रहांची शांती करता येत नसते. तुम्ही करताय ती एक प्रकारची अरेरावी आहे. जमल्यास ती सोडा. हे लिहितांना मला अजिबात आनंद झालेला नाही. ४.
यात डॉ मनू कोठारी सारख्या के ई एम च्या ऍनाटॉमीच्या प्राध्यापकांनी लिहिलेले पुस्तकही होते ज्यात कर्करोग हे एक थोतांड आहे असे लिहिलेले आहे. (दुर्दैवाने डॉ मनू कोठारी हे पुढे कर्करोगाने कैलासवासी झाले हा भाग अलाहिदा)
सध्या विषय करोना व लस हा आहे. पण कर्करोगासंबंधी एक उदाहरण म्हणून लक्षात ठेवेन. ५.
बाकी तुमच्या सारखे करोना हे एक षडयंत्र आहे असे बोलणारे अनेक लोक आहेत. मी कुठे प्रत्येकाशी वाद घालत बसू?
वाद घालीत बसण्याची आजिबात गरज नाही. सुझन हम्फ्रीझ यांचं पुस्तक वाचून खरंखोटं केलंत तरी पुरेसं आहे. ६.
आम्ही अमुक तमुक स्वामींच्या अंगाऱ्याने बरे झालो पासून होमिओपॅथी मुले आमचा कर्करोग बरा झाला असे छातीठोक पणे सांगणारे लोक सुद्धा मला भेटत असतात
करोनाची लस काय वेगळी आहे? ७.
आणि करायला काहीही नसेल तर मी छानपैकी झोप काढेन.
लशीकरणाचा इतिहास वाचण्यापेक्षा झोप काढणे तुम्हांस अधिक महत्त्वाचं वाटंत असेल तर लवकर जागे व्हा. असो. एक सांगा मला. करोनावर जनुकोपचार खरंच करावे लागतात का? तो इतका खतरनाक खरंच आहे का? जर तो इतका घातक आहे, तर मग लोकांना वारंवार चाचणी करून का पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय? आणि ते आरटी-पीसीआर खरंच चाचणी आहे का? विकिवर त्यास वर्धनतंत्र म्हणजे amplification technique असं म्हंटलंय. हे चाचणी केंव्हापासनं झालं? ते नेमकं कसली चाचणी करतं? रोगाची लागण ( = clinical infection ) म्हणजे काय? आणि ही लागण या तंत्रामुळे कशीकाय सिद्ध होते? जरा उलगडून सांगणार का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

करोनावर जनुकोपचार खरंच करावे लागतात का? फायझर मॉडर्ना च्या लशी या जनुकीय तंत्रज्ञानाने तयार केलेल्या आहेत. त्याचा जनुकीय उपचारांशी दुरान्वये सुद्धा संबंध नाही. या नात्याने सर्व जातीच्या संकरित बियाण्यापासून मिळालेल्या अन्नधान्याचे सेवन म्हणजे पण जनुकीय उपचार होतील. आपला दुराग्रह आणि पूर्वग्रह फार टोकाचा आहे तेंव्हा माझ्या वाक्प्रचारात बदल करून आता असे म्हणावे लागते कि आकाशातील ग्रहांची शांती करता येते पूर्वग्रहाची आणि दुराग्रहाची नाही.

In reply to by गामा पैलवान

एक सांगा मला. करोनावर जनुकोपचार खरंच करावे लागतात का? तो इतका खतरनाक खरंच आहे का? जर तो इतका घातक आहे, तर मग लोकांना वारंवार चाचणी करून का पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय? आणि ते आरटी-पीसीआर खरंच चाचणी आहे का? विकिवर त्यास वर्धनतंत्र म्हणजे amplification technique असं म्हंटलंय. हे चाचणी केंव्हापासनं झालं? ते नेमकं कसली चाचणी करतं? रोगाची लागण ( = clinical infection ) म्हणजे काय? आणि ही लागण या तंत्रामुळे कशीकाय सिद्ध होते? जरा उलगडून सांगणार का?
प्रश्न योग्य आहेत आणि उलगडा झाला पाहिजे. -दिलीप बिरुटे

आज दै.सकाळ पुणे आवृत्तीनुसार करोनाच्या नव्या व्हेरीयंटचे सात रुग्ण आढळले. सर्व जण गृहविलगीकरणात बरेही झाले. एक नऊ वर्षाचा मुलगा सोडून सर्वांनी कोवीड लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते त्यात एक बुष्टर डोसवालाही होता, सर्वांना सौम्य लक्षणे होती. सर्वांनी काळजी घ्या. नाय तर पुन्हा ढोल, ताशे, दिवा-बत्तीचा टास्क पूर्ण करावा लागेल. च्यायला, आयुष्यात लैच पाणचट टास्क पाहावा लागला. ( कप्पाळ बडवणारी स्मायली) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडॉ, अवघ्या एकदीड कोटी लोकसंख्येच्या पुण्यात तब्बल सात रुग्ण आढळले. काय भयाण हाहाकार माजला असेल, नाही? आ.न., -गा.पै.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर्वांनी काळजी घ्या. नाय तर पुन्हा ढोल, ताशे, दिवा-बत्तीचा टास्क पूर्ण करावा लागेल. च्यायला, आयुष्यात लैच पाणचट टास्क पाहावा लागला. ng>आकाशातील ग्रहांची शांती करता येते पूर्वग्रहाची आणि दुराग्रहाची नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर इनो घ्या जळजळ जास्त होणे प्रकृतीस अपायकारक असतं

पोलिओ डोस सारखे प्रतेक घरी जावून प्रतेक व्यक्ती ची covid टेस्ट केली तर किती तरी covid positive सापडतील. अगदी नवीन variant चे पण सापडतील. प्रयोग म्हणून पुण्यातील किंवा कोणत्या ही शहरातील एका भागात हा प्रयोग करावा. आता मित्र झाला आहे corona विषाणू.

सुबोध खरे डॉक्टर,
फायझर मॉडर्ना च्या लशी या जनुकीय तंत्रज्ञानाने तयार केलेल्या आहेत.
करोनासारख्या किरकोळ विषाणूसाठी एव्हढं प्रगत जनुकीय तंत्र का वापरावं लागतंय? आणि त्या लशीत नेमकं काय द्रव्य आहे? आणि ते करोनाचा नायनाट कसं करतं? की करोना नष्ट न करता फक्त शरीराच्या प्रतिकारयंत्रणेस करोनाची ओळख करवून दिली जाते? याबद्दल चकार शब्द कोणी सांगंत नाही. म्हणूनंच मी पूर्वग्रह बाळगले आहेत. कृपया त्यांची शांती करणे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

करोनासारख्या किरकोळ विषाणूसाठी 6,311,139 हा आजपर्यंतच्या जगभरातील मृत्यूचा आकडा आहे. म्हणूनंच मी पूर्वग्रह बाळगले आहेत. आपल्या पुर्वग्रहांची शांती करणे हि माझी जबाबदारी नाही. ज्याला कुणाला वेळ असेल, हौस असेल आणि न थकता कंटाळता वितंडवाद करण्याची क्षमता असेल तिकडे प्रयत्न करा असे आपल्याला नम्रपणे सांगणे आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे डॉक्टर, ६३,११,१९६ हा फुगवलेला आकडा आहे. करोनासंगे मृत याचा अर्थ करोनामुळे मृत असा नाही. बाकी, लशीमुळे प्रतिपिंड उलटून नेमका विरुद्ध परिणाम कसा साधला जातो यासबंधी इथे एक लेख आहे : https://health.ucdavis.edu/news/headlines/antibodies-mimicking-the-viru… असे प्रकार पूर्वीही घडलेत. त्यास Original Antegenic Sin असं म्हणतात. लशीमुळे मुख्य प्रतिकारयंत्रणेची झालेली मोडतोड असं सामान्य भाषेत म्हणता येईल. सुझान हम्फ्री यांच्या पुस्तकातनं घेतलेला उतारा (पी डी एफ पान २५२ ) :
Before the vaccine era, naturally acquired disease usually provided comprehensive long-term immunity because natural immunity involves a more broad-spectrum response to the entirety of the bacteria and their toxins. Remember that being immune to any degree does not stop the bacteria from flying around and entering the airway. When a naturally immune person reencounters whooping cough bacteria, the body will efficiently respond and clear them from the system. This is not necessarily true of vaccinated people.
करोनाच्या लशीबाबत हे अभ्यास झाले आहेत का? तुम्ही माझ्या समर्पक प्रश्नांना पूर्वग्रह ठरवून बगल देताय हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो. आ.न., -गा.पै.

In reply to by sunil kachure

कचरे बुवा तुमचा टंकणारा मेंदू आणि विचार करणारा मेंदू यात काहीच सामंजस्य नाही याचे कारण काय असेल या प्रश्नाचे उत्तर द्या मग मी गामा पैलवान यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा विचार करेन

असे प्रश्न सगळ्यांनी, बालवाडीच्या मुलांनी सुद्धा विचारले पाहिजेत. मी कॉमर्स विद्यार्थी आहे. पहिल्यांदा फ्लाईट मध्ये चढत होतो तेव्हा पायलटला १०००००० प्रश्न विचारले. विमान कसे उडते ? कोणत्या धातूपासून बनवले आहे ? इंजिन काम कसे करते ? इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे नक्की काय असते ? संदेशवहन कसे होते ? बटणं काम कशी करतात ? पायलट मला म्हणाला हे मी तुम्हाला समजावून सांगू शकत नाही. तुम्ही ११ वी १२ वी फिजिक्स सुद्धा केले नाहीये. मी म्हणलं अहो पण त्याशिवाय मी विमानात कसं बसू ? हे सगळं मला समजावून सांगणे तुमची जबाबदारी आहे. बरं, अधनमधन विमानं क्रॅश होतात कि नाही ? मग मी तुमचे विमान क्रॅश होणार नाही हे तपासायला नको काय, तुम्ही लाख तपासात पण मी पुन्हा तपासणे हे माझे कर्तव्य आहे. तुमची संस्था कितिका मोठी असेना, कितिका लाखो लोकांनी तपासले असेना, प्रत्येक बारीकसारीक गोष्ट मी व्यक्तिष: तपासणारच आहे. पायलटने सिक्युरिटी बोलवून मला हाकलून लावलं.

In reply to by कॉमी

ते एयरोडायनॅमिक्स / हाड्रॉलिक्स थोतांड आहे हे नाही सांगितले का? हाड्रॉलिक्स ऑइल वापरण्या ऐवजी पाणी वापरु शकतो पण तमाम विमान कंपण्या मॅकले छाप वागतात व किंमत वाढवण्यासाठी पाण्या ऐवजी ऑइल वापरतात. यावर हाड्रॉलिक्स चे दोन तीन शोध निबंध त्या पायलट्च्या तोंडावर फेकायला पाहिजे होते .. पुढच्या वेळी लक्षात ठेवा ..

In reply to by कॉमी

कॉमी, विमान आस्थापनाच्या संशोधन ( R & D ) , व्यवहार ( Operations ) इत्यादि विभागांस विचारायचे प्रश्न वैमानिकास विचारायचे नसतात. तुमचे प्रश्न मात्र रास्त आहेत, याबाबत शंका नाही. लशीच्या बाबतीत माझे प्रश्न कोणास करू? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विमान आस्थापनाच्या संशोधन ( R & D ) , व्यवहार ( Operations ) इत्यादि विभागांस विचारायचे प्रश्न वैमानिकास विचारायचे नसतात. हायला मग हे प्रश्न तुम्ही डॉक्टरांना कशाला विचारताय? आदार पुनावाला किंवा अल्बर्ट बुर्ला याना विचार कि. कशाला उगाच माझ्या मागे लागताय?

In reply to by सुबोध खरे

मग हे प्रश्न तुम्ही डॉक्टरांना कशाला विचारताय? खरे साहेब तुमच्या ह्या प्रतिसाद वर मना पासून हसलो. लस निर्मिती आणि लसी चे शरीरावर अल्प किंवा दीर्घ परिणाम आणि लसी ची शरीरात होणारी रासायनिक अभिक्रिया . आणि त्या मधून मिळणारा रिझल्ट. ह्याच्या डॉक्टर लोकांचा काही संबंध नाही हे गा . मा आणि बाकी लोक पण उत्तम समजतात. मग जे आपले क्षेत्र च नाही त्या लसी चे समर्थन तुम्ही मोठ्या आत्मविश्वास नी का करत होता.

In reply to by sunil kachure

sunil kachure, मस्त नेम धरलाय तुम्ही. उद्धव ठाकऱ्यांनी डॉक्टरांना काय कळतं असे उद्गार काढले होते. त्याची अशी पुष्टी मिळेलसं कधी वाटलं नव्हतं. आ.न., -गा.पै.

वाचा आणि शांत बसा. इथे सर्व शिक्षित आहेत. भौतिक,जीव,रसायन,शास्त्र सर्व लोकांनी उत्तम शिकली आहेत. कोणाला बालवाडी चा विद्यार्थी समजू नका. बकवास करण्या पेक्षा उत्तर ध्या त्यांच्या प्रश्नानं ची.

In reply to by sunil kachure

गुगल करा- Pfizer vaccine how it works. पहिल्या पानावर CDC, न्यू यॉर्क टाइम्स, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, न्यूझीलंड गव्हर्नमेंट, ऑकलँड युनिव्हर्सिटी न्यूझीलंड ह्यांचे लेख आहेत. नीट वाचा.

In reply to by कॉमी

गा. पे नी आणि बाकी लोकांनी पण तो वाचला आहे..तो लेख फक्त तुमच्या साठी नव्हता. तुम्ही एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र बुध्दी चे आहात.. तुमचं मत सांगा. चुकीचे असले किंवा बरोबर असले तरी ते तुमचे मत असेल .ते वाचायला आवडेल.

हिंदू स्थान युनिलिव्हर च्या पोर्टल वर गेले की fair and lovely कसा गोरा रंग मनाच्या चेहऱ्याला देते ह्याचे शास्त्रीय समीकरण दिलेली असतात. पण त्या थापा असतात. जाहिरात असते. इतके स्व बुध्दी असणाऱ्या व्यक्ती लं नक्कीच समजते. स्व बुद्धी नसेल तर कोणतेच प्रश्न पडत नाहीत.

In reply to by sunil kachure

कचरे बुवा औषध आणि सौंदर्य प्रसाधने यांच्या बद्दल माहिती देण्यासाठी असणारे कायदे, त्यांच्या घटकांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामाच्या चाचण्या कशा करायच्या आणि त्या उत्पादन विपणन या वर कोणती नियंत्रणे असावीत याबद्दल चे कायदे आणि त्यावर लावला जाणारा कर ( ५% आणि २८ % वसेक /GST) हे वेगळे आहेत. एकदा हि माहिती करून घातली असती तर फायझरची लस आणि फेअर अँड लव्हली सारखे गोरे करणारे सौंदर्य प्रसाधन याची तुलना केली नसतीत

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://api.nati… काळी बुरशी निर्माण होणें हा अत्यंत दुर्मिळ आजार covid काळात मोठ्या प्रमाणात वाढला. अनेक लोकांना डोळे गमवावे लागले,जबड्यात दोष निर्माण झाला .आणि मृत्यू पण झाले. पण हा अतिशय दुर्मिळ आजार covid काळात भारतात का वाढला ह्या वर कोणीच चर्चा करणार नाही. डॉक्टर,संशोधक,सरकारी अधिकारी चुकून पण एक शब्द पण बोलणार नाहीत. मीडिया तर काळी बुरशी मधील( का ) हा शब्द पण वापरायला कच घाईल. Covid वर उपचार करताना स्टरोईड चा अतिरिक्त वापर ह्या मुळे हा काळी बुरशी हा दुर्मिळ आजार भारतात वाढला असे निष्कर्ष आहेत. बाकी कारणे पण आहेत च. पण कोणी चुकून पण काही बोलणार नाही ह्या विषयात. वर लिंक दिली आहे. वाचण्याची तसदी घ्यावी.

ब्लॅक फंगस भारतात त्याच वेळी कसा आला. हे तुमचे अगोदरचे वाक्य काहीही माहिती न घेता टंकलेलं त्यावर मी प्रतिसाद दिला होता ब्लॅक फंगस अनादी काला पासून भारतात आहे सर्वत्र पसरलेली आहे. तुमच्या पावावर किंवा मुरंब्यावर येणारी बुरशी आहे ती. आणि आता पण हा अतिशय दुर्मिळ आजार covid काळात भारतात का वाढला ह्या वर कोणीच चर्चा करणार नाही. डॉक्टर,संशोधक,सरकारी अधिकारी चुकून पण एक शब्द पण बोलणार नाहीत. हे भंपक वाक्य टंकलंय

ब्लॅक fungus चे इन्फेक्शन माणसात होणे ही दुर्मिळ घटना covid काळात भारतात का घडली ... ह्याची कारणे काय Steroid च प्रमाण बाहेर covid उपचार साठी वापर हे एक कारण आहेच.(वर नॅशनल geography ची लिंक दिली आहे) दूषित ऑक्सिजन पुरवठा करणारे सिलिंडर हे दुसरे कारण आहे अजून काय कारणे आहेत... आणि ह्याची जबाबदारी कोण घेणार

ब्लॅक fungus चे इन्फेक्शन माणसात होणे ही दुर्मिळ घटना covid काळात भारतात का घडली ... ह्याची कारणे काय Steroid च प्रमाण बाहेर covid उपचार साठी वापर हे एक कारण आहेच.(वर नॅशनल geography ची लिंक दिली आहे) दूषित ऑक्सिजन पुरवठा करणारे सिलिंडर हे दुसरे कारण आहे अजून काय कारणे आहेत... आणि ह्याची जबाबदारी कोण घेणार

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.wash… पूर्ण जग covid काळात ब्लॅक fungus ह्या बुरशीचे माणसाला का इन्फेक्शन झाले ह्याची कारणे समजून घेत आहेत.चुका मान्य करत आहेत. पण भारतीय फक्त अहंकार प्रचंड असल्या मुळे ह्या विषयावर शब्द पण बोलत नाहीत. अजब देशाची गजब कहाणी.

In reply to by sunil kachure

पण भारतीय फक्त अहंकार प्रचंड असल्या मुळे ह्या विषयावर शब्द पण बोलत नाहीत. आपण कुठेही काहीही न वाचता केवल टंकन करताय म्हणून भारतीय डॉक्टर कुठे आणि किती याबद्दल चर्चा करतात याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. म्हणून हे भंपक वाक्य टंकलंय. उचलला हात आणि बडवला कळफलक

लोकहो, स्पेनमध्ये लशीकरणाची खोटी प्रमाणपत्रे देणारे घपलाजाळे पकडले. उच्चभ्रू लोकांना खरी लस टोचून घायची नाहीच्चे मुळी. का ते मी सांगायला हवंच का? संबंधित बातमी ( इंग्रजी दुवे ) : १. https://libertyrising.substack.com/p/over-2000-high-profile-spanish-paid २. https://www.euronews.com/2022/01/25/spain-arrests-seven-suspects-for-se… हज्जारो युरो खर्च करून खोटी प्रमाणपत्रे मिळवायला पैसेवाले मूर्ख आहेत का ? गूगळण्यासाठी : https://www.google.co.uk/search?q=%22operation+jenner%22+spain आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हज्जारो युरो खर्च करून खोटी प्रमाणपत्रे मिळवायला पैसेवाले मूर्ख आहेत का ?
पैसेवाले ( उदा. टॉम क्रूज ) अत्यंत निर्बुद्ध गोष्टींच्या (उदा. चर्च ऑफ सायंटॉलॉजी ) मागे लागतात हा काय शहाणपणा असतो का? लशीने जीवनमरणाची सीमा कशी अधोरेखित होते हे मी माझ्या काकांच्या कोविड निधनाने आणि काकूंच्या वाचण्याने फार जवळून पाहिले आहे. कितीही तर्क लढवले तरी, अगदी लस हा प्लासिबो उपचार असून प्लासिबो म्हणूनच जीवनदायिनी आहे असे जरी १०० टक्के सिद्ध झाले तरी मी तिचे महत्त्व अजिबात अमान्य करणार नाही. सर सलामत तो लशी पचास म्हणून लशीही पचवू. आपला विनीत, हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर, तुम्ही म्हणता तसं त्यांना आपण महामूर्ख समजून चालू. त्या यादीत फार्मा-मार या स्पेनमधल्या औषध आस्थापनाचा अध्यक्ष ( फार्मा कंपनीचा प्रेसिडेंट ) आहे. त्याचं नाव जोस मरिया फर्नांदेझ सूसा-फारो. औषध आस्थापनाच्या अध्यक्षाचा औषधावर विश्वास नाही आणि लोकांना टोचायला निघालेत. जोस मरिया फर्नांदेझ सूसा-फारो किती नावाजलेला आहे ते इथे वाचायला मिळेल ( इंग्रजी लेख ) : https://247newsaroundtheworld.com/trending/was-dr-sousa-faro-arrested-f… आ.न., -गा.पै.

गामा पैलवान आणि दिलीप बिरुटे यांचे प्रतिसाद आवडले. बाकी थोतांड असलेल्या रोगाची अंधश्रद्धा जपण्याचा सध्याचे डॉक्टर लोक किती प्रयत्न करीत असतात ते आता दिसते आहे. डॉक्टरां इतके रोगावर कुणाचे प्रेम असणार ?

थोतांडाच्या केसेस मुंबईमध्ये वाढत आहेत. बहुतेक रात्री कुलूप फोडून डॉक्टर आत घुसत असणार आणि रात्रीतून लोकांवर औषधांचा भडिमार करत असणार, म्हणजे दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह येणार.

In reply to by कॉमी

कुठे लोकांशी वितंडवाद घालत बसताय? People will always believe what they want to believe. This is due to the fact that people wish to create their own truths; anything but the truth that's real. My creed is simple: Let them! Their beliefs don't alter your truth. Moreover, your attempt at altering them won't do any good for you.”

In reply to by कॉमी

कॉमी, अंगात करोना सापडलेले लोकं करोनाचे रुग्ण खरोखरीच आहेत का? क्लिनिकल इन्फेक्शन म्हणजे काय? आणि ते पी.सी.आर तंत्राच्या सहाय्याने कसं निश्चित करता येतं? आ.न., -गा.पै.

In reply to by सुक्या

मुख्यमंत्री साहेबांची सूचना पाळणे हे तुमचे कर्तव्य च आहेत.संजय साहेब राज्य सरकार चे निर्णय सांगत अस्तात त्यांचे पण ऐकावे लागेल. महाराष्ट्र मध्ये आता वास्तव्य करत नसाल तर इतक्या विषयात लक्ष देवू नये .

In reply to by sunil kachure

साहेब, मी महाराष्ट्रात राहतो की नाही हा मुद्दा गैरलागु आहे. मामु म्हणतात मास्क लावा .. तुम्ही म्हणतात मामु जे बोलतात ते करा. आता हा तुमचा प्रतीसाद बघा .. यात तुम्ही म्हणता आहात की कितीही काळजी घ्या हा रोग होणार. तसेच निष्काळजी लोकांपेक्षा जास्त काळजी घेणारे च जास्त covid चे बळी ठरले आहेत. मग मी काळजी घेउन का आजारी पडु? (http://misalpav.com/comment/1141360#comment-1141360) आता मामु म्हणतात काळजी घ्या .. तुम्ही म्हणता काळजी घेउ नका .. मग कोण खरे बॉ? एकतर मामु खोटे बोलत आहेत किंवा तुम्ही .. काय करावे ब्र? आडाण्याला मार्गदर्शन करावे .. उपकार होतील.

In reply to by सुक्या

हाहाहा, तोंडास डायपर लावून आत्तापर्यंत कोणता रोग बरा झाला आहे? की कुठली साथ आटोक्यात आलीये? &‌#129318;&‌#8205;&‌#9794; -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा मा .. डायपर ?? जरा अती होतय. (तुमच्याशी प्रतीवाद करुन फायदा नाही .. भले भले थकले. तेव्हा माझा पास)

In reply to by सुक्या

सुक्या, मी नाही हो, लोकंच असं म्हणताहेत : https://www.google.co.uk/search?q=%22face+diapers%22 बाळाला कसा डायपर घालतात, तसा सरकारला जनतामुखास लंगोट नेसवायचाय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हे अमेरिकन पण काय काय धंदे शोढून काढतील... हा टीशर्ट २३ डॉलरात विकला जातो आहे (म्हणे) खखोदेजा. . आणि खानावळीवर बोर्ड लावले जात आहेत (म्हणे) .

In reply to by सुक्या

>> तुमच्याशी प्रतीवाद करुन फायदा नाही .. भले भले थकले. तेव्हा माझा पास थकले नाही हो, कॉमन सेन्स नसणार्यांशी कोण प्रतीवाद करत बसणार ? बाकी गामा आणि त्यांच्या प्रश्नांवरुन मला जुदाई मधला परेश रावल आठवला!

In reply to by उन्मेष दिक्षीत

गामा ज्याचा आधार देउन "फेस डायपर" वगेरे बोलत आहेत ... ते फ्लोरिडा मधले एक हॉटेल आहे. तेव्ह्डे एकच. जौ दे. आपण का भुगा करायचा डोक्याचा!! बाकी परेश रावल - चे प्रश्न म्हणजे खरच नमुने होते . . . ... :-)

In reply to by सुक्या

सुक्या, इथे उत्तर आयर्लंडाविषयी ब्रिटीश सरकारने एक अहवाल प्रकाशित केला आहे ( इंग्रजी दुवा ) : https://www.gov.uk/government/publications/education-recovery-in-early-… वरील पानावर जाऊन कृपया Impact on children यावर सर्च मारणे. त्या परिच्छेदात करोना निर्बंधांचे ( टाळेबंदी, मुखलंगोट, इत्यादि) अर्भक व लहान मुलांवरील दुष्परिणाम नोंदवलेले आहेत. करोना हे थोतांड आहे. टाळेबंदी हे महाथोतांड आहे. लस हे भीक नको पण कुत्रं आवर असा थोतांडोपचार आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

करोना हे थोतांड आहे. टाळेबंदी हे महाथोतांड आहे. लस हे भीक नको पण कुत्रं आवर असा थोतांडोपचार आहे.
लगे रहो गापैभाई. असे एकदम वरीजनल - हटके - टोकाचे विचार करणारे, अभ्यास करणारे आणि त्यानुसार मते मांडणारे लोक समाजात असणे अत्यंत गरजेचे आणि समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक आणि उपयोगी असते हे मानवी इतिहासात वारंवार दिसून आलेले आहे. मानवी संस्कृतीचा गाडा पुढे पुढे ओढून नेण्यात अशा व्यक्तींचाही मोलाचा वाटा असतो. तस्मात लगे रहो आणि आपल्या नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञेचा अविष्कार करत नवनवे विचार मांडते रहो. 'थोतांडोपचार' हा शब्द प्रचंड आवडल्या गेला आहे.

In reply to by गामा पैलवान

आता तुम्ही गोल पोस्ट बदलताय !! आधी मास्क मुळे कुठलाही साथ रोग बरा झाला नाही .. सबब मुखपट्टी ची गरज नाही हा तुमचा मुद्दा होता. आता तुम्ही मुखपट्टी/टाळेबंदी मुळे लहान मुलांवर काय परीणाम झाला यावर आला आहात. नेहेमीचेच आहे ते, नवीन काही नाही. असो. मुद्याकडे येउ या. या कोरोना च्या साथीमुळे जगात अगदी सगळीकडे सोशल / ईमोशनल / शैक्षणीक बाबतीत प्रभाव पडला आहे हे खरे आहे. ह्युमन इंटर्‍याक्षन मुलांच्या बाबतीत अगदी गरजेचे आहे हे नक्की. पण शैक्षणीक नुकसान जरा जास्त झाले आहे. तरी बर्‍याच ठीकानी (यात भारत ही आला) ऑनलाईन क्लास घेतले गेले. यात शिक्षकांबरोबर पालकांचीही जबाब्दारी तितकीच होती. आपला पाल्य काय शिकतो आहे. त्याला समजते आहे की नाही हे पाहण्याची जबाब्दारी त्यांची पण होती. जगात लागलेल्या टाळेबंदी मुळे मुलांचे शैक्षणीक नुकसान झाले हे मात्र खरे आहे. दुसरा मुद्दा मुखपट्टी मुळे २ वर्षे वयाच्या मुलांवर झालेला परीणाम. खरे तर लोक मुखपट्टी बाहेर वापरत होते. घरात नाही. त्यामुळे मुले बोलताना त्यांना ओठांची हालचाल बघताच आली नाही हा मुद्दा गैर्लागु आहे. तो डे-केयर मधे जाणार्‍या मुलांच्या बाबतीत खरा जरी असला तरी मुले घरी आई - बापाला पाहुन / त्यांच्या शी बोलुन भाषा शिकतात हे ही तितकेच खरे आहे. बाकी लस / थोतांड यावर आपला पास.

सुबोध खरे यांच्या प्रतिसाद करोंनापेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे सत्य ही काही वर्षांत कबूल केले जाईल इतका धडधडीत असत्य मी गेल्या अनेक दिवसात मिपावर पाहिलेलं नाही यात सत्यापेक्षा पूर्वग्रह आणि एकांगी विचार कितीतरी जास्त आहे. साहेब तुम्ही गूगल सर्च करा किंवा त्या औषधींच्या साईट वर ही तपासू शकता. प्रोटोकॉल मधील औषधींचे वाईट परिणाम 1. शुगर वाढणे, 2. लीवर आणि किडनी वर वाईट परिणाम 4. हृदय गती आंनियंत्रित होणे. इत्यादि. त्यातले एक ही औषध करोंना विषाणू वर प्रभावी नव्हते हे विशेष. बाकी काही औषधे प्रोटोकॉल मधून बाहेर ही झाली. पण त्यांनी किती हजार कोटींचा धंधा केला हे ही माहिती असेल. मला खोटे म्हंटले तरी काही फरक पडत नाही. करोंना सोबत चुकीची औषधी दिली नसती तर मरण्याचे प्रमाण कमी झाले असते. जी औषधी डॉक्टरांना वाचवू शकत नव्हती ती रुग्णांना वाचवेल यावर विचार .... आपले आणि रुग्णांचे प्राण वाचविण्यासाहती अधिकान्श डॉक्टर या काळात काढा इत्यादि आयुर्वेदिक औषधी घेत होते आणि रुग्णांना ही देणे सुरू केले होते (प्रोटोकॉल मध्ये नसतानाही) यात दिल्लीतले अधिकान्श मोठी हॉस्पिटल्स होती. बाकी औषधी ही फक्त औषधी असतात. पैथी या आधारावर भेदभाव करणे मूर्खता असते. त्यामुळे आयएमए ह्या संस्थेवर ही प्रश्न चिन्ह आहेत.

In reply to by विवेकपटाईत

1. शुगर वाढणे, 2. लीवर आणि किडनी वर वाईट परिणाम 4. हृदय गती आंनियंत्रित होणे. इत्यादि. या सर्व गोष्टी करोनाच्या विषाणू चा थेट प्रभावामुळे होत असत हे हि डॉक्टरांना माहिती आहे. या शिवाय डेक्सामेथासोन या औषधामुळे सुद्धा रक्तातील साखर वाढते हे डॉक्टरांना माहिती आहेच परंतु डेक्सामेथासोन या औषधामुळे ३३% अधिक लोकांचे जीव वाचलेले आहेत हे अनेक चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले आहे. बाकी रेम्डेसीव्हीर किंवा टॉसिलीझूमॅब हि औषधे बहुतांशी निरुपयोगीच ठरली यातही संशय नाही त्यात औषधी कंपन्यांनी भरपूर पैसा केला हेही सत्य आहे परंतु

करोंनापेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे धडधडीत असत्य

आहे यात मुळी सुद्धा शंका नाही

In reply to by सुबोध खरे

ह्या सगळ्या बाबतीत आपली हर्ड मेंटॅलिटी कारणीभुत आहे. रेम्डेसीव्हीर किंवा टॉसिलीझूमॅब ही औषधे मला वाटते फक्त भारतात दिली जात होती. ईतर ठिकाणाची मला कल्पना नाही. किंवा त्या कंटेंट ची ईतर औषधे असावीत. पण भारतात अगदी आफाट प्रमाणात स्टेरॉईड्स वापरली गेली त्याचा खुप वाईट परिणाम झाला. तीच बाब व्हॅकसीन ची. सुरुवातीला कुणीच व्हॅकसीन घ्यायला तयार नव्हते. मग अचानक सगळे केंद्रावर गर्दी करु लागले .. मग आमदार / खासदार यांच्या चिठ्या घेउन लोग व्हॅकसीन शोधत बसले. काळ्या बाजारातुन व्हॅकसीन विकत घ्यायला लागले ... जशी लाट ओसरली तशी ही केंद्रे परत रिकामी झाली. आता पुन्हा केसेस वाढत आहेत .. काही दिवसांनी परत लोक बुस्टर घ्यायला विना मास्क गर्दी करतील .. मग परत सरकार च्या नावाने शिमगा .. की सरकार काहीच करत नाही ते ..

In reply to by सुक्या

भारतात अगदी आफाट प्रमाणात स्टेरॉईड्स वापरली गेली त्याचा खुप वाईट परिणाम झाला. साथ ज्यावेळेस आपल्या शिखरावर होती त्यावेळेस एक टोकाचा उपाय म्हणून सर्व रुग्णांवर स्टिरॉइडचा वापर झाला हि वस्तुस्थिती. कारण डेक्सामेथासोन हे एकच औषध कोव्हीड मध्ये गुणकारी आहे हे सिद्ध झाले आहे. अनेक वेळेस रेमडेसीव्हिर देऊन फायदा होत नाही हे डॉक्टरांना माहिती होते तरी रुग्णांच्या दबावाखाली ते दिले गेले. तसेच एक शेवटचा उपाय म्हणून डेक्सामेथासोन हेही दिले गेले आणि त्यामुळे निदान ३० % रुग्णा चे प्राण वाचले हि वस्तुस्थिती.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे डॉक्टर, या ३० % प्रमाणाचा काही स्रोत आहे का? बाकी, करोनावर उपचार म्हणून आयव्हरमेक्टिन या औषधाची चर्चा का होत नाही? आ.न., -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

डॉ. साहेब आपल्या चिकाटीला एक सलाम केल्याशिवाय आता रहावत नाही. "सलाम आपल्या चिकाटीला _/\_ "

In reply to by सुबोध खरे

कारोना व्हायरस नवीन आहे .त्या बाबत काही माहीत नाही. जणू पृथ्वी ची निर्मिती झाल्या नंतर करोडो वर्षांनी 2020 मध्येच जा व्हायरस पृथ्वी वर अस्तित्वात आला. Corona virus नवीन आहे ,ओळखीचा नाही असे छाती बडवून जग भरात सर्व डॉक्टर आणि संशोधक सांगत होते. Dr हा घटक आरोग्य विभागात सर्वात घालचा घटक आहे हे माझे मत परत इथे व्यक्त करतो. पण संशोधक पण नवीन आहे नवीन आहे हेच सांगत होते. आणि dr खरे दावा करत आहेत. Covid मुळे. किडनी ,लिव्हर, वर परिणाम होतो हे dr ना माहीत होते. Good जोक. व्हायरस नवीन आहे ह्या दव्यानंतर फक्त प्रयोग केले गेले आणि उपचार मुळेच लोक मेली. व्हायरस नी मेली नाहीत. ज्यांनी उपचार घेतले नाहीत ते वाचले.

In reply to by sunil kachure

कचरे बुवा आपला पगार किती? आपण बोलता किती? सार्स (SARS) किंवा मर्स(MERS) हे पण कोव्हीड सारखेच करोना जातीचेच विषाणू आहेत आणि त्यामुळे पण माणसांना रोग होऊन सार्स मुळे ७५० च्या वर माणसे मेलेली आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Coronavirus https://en.wikipedia.org/wiki/2002%E2%80%932004_SARS_outbreak मर्स(MERS) हा उंटांना होणार रोग माणसात पसरला आणि मध्यपूर्वेत त्याची साथ आली होती https://www.who.int/health-topics/middle-east-respiratory-syndrome-coro… त्यामुळे करोना विषाणू शरीरावर कुठे परिणाम करतात याची थोडी फार माहिती डॉक्टरना होतीच. फक्त कॉव्हिडची साथ एखाद्या वावटळीसारखी आली त्यामुळे जगभरची आरोग्यव्यवस्था कोलमडली. बाकी तुम्हाला काही सांगणे हे पालथ्या घड्यावर नव्हे तर फुटबॉल वर पाणी टाकण्यासारखे आहे. कुठूनही टाका ते बाहेरच जाणार