Skip to main content

हातात फक्त आठ वर्षे!

लेखक तर्कवादी यांनी मंगळवार, 14/06/2022 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय वृत्तमाध्यमांत पर्यावरणविषयक बातम्या वा चर्चा या खरेतर फक्त हवामान व पर्जन्य याबद्द्लच मर्यादित आहेत. पावसाचा अंदाज, पावसाचे वृत्त, पूर , भूस्खलन, चक्रीवादळे ईत्यादी बद्दलच्या संक्षिप्त बातम्या इतकंच काय ते पर्यावरणाला मिळणारं फूटेज. पण सध्याची परिस्थिती पाहता पर्यावरण हा अतिशय महत्वाचा व गंभीर आणि प्राधान्याने ज्यावर विचार व कृती करायला हवी असा विषय बनला आहे. ग्लोबल वॉर्मिंग, कार्बन उत्सर्जन, भूजलाची घटती पातळी, वाढते जल व वायू प्रदूषण, प्लॅस्टीक व इतर कचर्‍याच्या समस्या, घटते जैववैविध्य , वाढते पूर, चक्रीवादळे असे अनेक उपविषय पर्यावरणात सामाविष्ट आहेत. त्यातही ग्लोबल वॉर्मिंग हा नावाप्रमाणेच सर्वात हॉट विषय असावा. आजच ओझोन प्रदूषणाविषयीचा एक धागा मिपावर आलाय. आपण (सन्माननीय अपवाद वगळता) जरी बहुधा या विषयातले तज्ञ नसलो तरी पर्यावरणाबद्दल जागरुकता असणंही चर्चा करण्याकरिता पुरेस आहे. चर्चा करत हळूहळू आपल्या ज्ञानात भर पडत राहील. पर्यावरणाचा विषय आला की संबंधित सरकारी धोरण हा महत्वाचा पैलू असणारच. पण तरी राजकारण्यांबद्दलची टिप्पणी (अगदीच आवश्यक असल्याखेरीज) टाळून चर्चा झाल्यास बरे. पुढचे आठ वर्षे हा धागा जिवंत रहावा ही अपेक्षा !! चर्चेच्या सुरुवातीला "हातात फक्त आठ वर्षे" या लोकसत्तातील लेखाचा दुवा देत आहे.

वाचने 19252
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

In reply to by तर्कवादी

आजच्या घडीला संपूर्ण जगात रिन्यूएबल एनर्जी फक्त ३०% आहे व उरलेली खनिज तेलाद्वारे उत्पन्न केलेली. ह्या व्हिडियोत म्हंटल्या प्रमाणे कार्बन टॅक्स लावला तरी तो भरून आपले उत्पादन चालू ठेवणे हेच कंपन्यांना फायदेशीर आहे. त्यामुळे खनिज तेल किंवा कोळश्याचा उपयोग करून वीज उत्पन्न करणे हे फायदेशीर ठरू शकतं. हल्लीच आलेल्या बातमीवरून असे दिसतंय की भारत सरकार अदानी ग्रुपकडून त्यांच्या ऑस्ट्रेलियातील खाणीतील ८३०८ करोड रुपयांचा कोळसा आयात करणार आहे. जरी सामान्य माणसाने त्याच्या त्याच्या व्यक्तिगत पातळीवर पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा थोडाफार प्रयन्त जरी केला तरी काहीतरी फरक हा नक्कीच पडेल. रामसेतू बंधनातला हा खारीचा वाटा जरी असला तरी तो स्वागतार्ह आहे.

In reply to by सौन्दर्य

जरी सामान्य माणसाने त्याच्या त्याच्या व्यक्तिगत पातळीवर पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा थोडाफार प्रयन्त जरी केला तरी काहीतरी फरक हा नक्कीच पडेल. रामसेतू बंधनातला हा खारीचा वाटा जरी असला तरी तो स्वागतार्ह आहे.
बरोबर आहे. व्यक्तिगत प्रयत्न करत रहायला हवेत. मी एकट्याने केल्याने काय होईल असा विचार न करता प्रयत्न सुरु ठेवायला हवेत. तसेच पर्यावरण विषयक जागरुक असलेल्या लोकांची संख्या वाढत राहिक्यास उद्योगांवरही पर्यावरणपूरक उत्पादने बाजारात आणण्याकरित अप्रत्यक्ष दबाव निर्माण होईल.

जलस्तर खाली गेला ह्या विषयी पण सर्रास खोटी माहिती पसरवली जाते. उपसा वाढल्यामुळे जलस्तर खाली जात आहे. ते कारण आहेच पण त्या पेक्षा पण बाकी करणे जास्त महत्वाची आहेत पण त्याचा उच्चार कोणी करत नाही किंवा ती कारण चर्चेत पण येऊ दिली जात नाहीत. १) मोकळ्या जागा कमी झाल्या . काँक्रिट करणं वाढले त्या मुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जावू लागले. २)दलदली च्या जागा नष्ट झाल्या ह्या दलदलीच्या जागा नैसर्गिक रित्या जळभरण करत होत्या. ३) जंगल कमी झाली. झाडांची मुळं पाणी धरून ठेवतात पाणी वाहून देत नाहीत. त्या मुळे जमिनीत पाणी मुरते. उपसा नाही केला तरी जमिनीतील पाण्याची पातळी ठराविक पॉइंट च्या वर कधीच येणार नाही... नाहीतर एक दोन हजार वर्षापूर्वी जमिनीवरून पाणी वाहत असते..पण तसे काही पूर्वी घडल्याची नोंद नाही . आमचा आड होता माझ्या आजोबांच्या काळातील १५० वर्ष तरी जुना असेल त्याची खोली ५० फूट होती. आणि आज पण त्याच अंतरावर पाणी लागते. कारण जल भरन करणारी नैसर्गिक स्थिती आज पण जास्त बदलेली नाही. आणि विविध सरकार नी थोडे फार प्रयत्न पण केले आहेत तलाव बांधणे,खड्डे खोदणे,झाडे लावणे ह्या योजना राबवल्या आहेत.

https://www.bbc.com/marathi/india-61808395 पर्यावरण बदलाचा असा पण परिणाम होईल.मी माझ्या अगोदर च्या पोस्ट मध्ये उल्लेख केला होता झाडे फळं देणे बंद करतील. त्याची सुरुवात आहे जे कोकणातील हापूस आंब्य विषयी घडतं आहे.

1. मी आंघोळीला 5 लीटर पेक्षा कमी आणि जेंव्हा शेंपू लावला तरीही 10 लीटर पेक्षा कमी पाणी वापरतो. बाकी साबण शेंपू सर्व हिरवे निशाण वाले वापरतो. फरशीसाठी गोनाईल. कपडे दर तीन दिवसांनी. मशीन सेमी ऑटो. कपडे व्यवस्थित पिळून ड्रायर मध्ये टाकतो. पाणी कमी लागते. बाकी फ्री पाण्यामुळे सकाळी 4 वाजता उठावे लागते. तरच सरासरी 300 लीटर पाणी भरणे शक्य होते. एक फायदा योग आणि व्यायाम करण्याची सवय जडली. याचे श्रेय माननीय केजरिवाल यांना देता येईल. 2. घरात मोठ्या गमल्यांत एक विदेशी पाम ( एक लहान गमल्यात), मधुमालतीची, गिलोय, मोगर्‍याची वेल, जास्वंद, कढी पत्ता 3 (एक मोठ्या आणी 2 लहान), पारिजात, सदाफुली, तुळशी 3, दोन मध्ये गुलाबाची वेल, दोन आयातकर कमी उंचीच्या गमल्यांत नेहमीच पुदिना राहतो. दोन मध्ये वेळोवेळी हिवाळ्यात टोमॅटो, मिरची, वांगी, पालक, कोथिंबिर झेंडू इत्यादि. झेंडू अजूनही जीवंत आहे. पुन्हा ऑक्टोबर मध्ये लावतो. इत्यादि. रोज तीस लीटर पाण्यात हे सर्व जमते. हिवाळ्यात कमी लागते. जेंव्हा पाणी मुबलक मिळत होते. तेंव्हा जास्त गमले ठेवले होते. पूजेसाठी फुले क्वचितच विकत घेतो.

In reply to by विवेकपटाईत

मी आंघोळीला 5 लीटर पेक्षा कमी आणि जेंव्हा शेंपू लावला तरीही 10 लीटर पेक्षा कमी पाणी वापरतो
हा प्रयत्न करुन बघेन. काही वेळा सवयी मोडणं कठीण जातं पण तरी प्रयत्न करेन.

In reply to by साहना

ते एकतर झिरो ग्रॅविटी मध्ये आंघोळ करत असतील किंवा पाण्याचे सर्फेस टेन्शन कमी करून आंघोळ करत असतील. तसं असेल तर ५ लिटर पाणी म्हणजे पाण्याचा अपव्यय करतात ते.

सरकार ही अशी यंत्रणा आहे त्यांना सुनियोजित कारभार व्हावा आणि लोकांचे आयुष्य ठीक चालावे म्हणून निर्माण केले आहे सरकार मध्ये सामील असणाऱ्या सर्व दर्जा च्या लोकांना जनता त्यांच्या कुटुंब सहित सांभाळते..मग पंतप्रधान असून किंवा साधा शिपाई. देशाला धोकादायक अशी स्थिती पर्यावरण हानी मुळे होत असेल तर जे जनतेच्या पैशावर गुजराण करतात त्यांनी उपाय शोधले पाहिजेत. सरकारी यंत्रणेने हुशार लोकांची मत विचारत घेवून सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून ...उपाय योजले पाहिजेत..जनता पैसा पुरवत आहे स्वतः कष्ट करून ...त्या पैश्याच्या जोरावर सरकार कडे अनेक यंत्रणा आहेत जे जनतेच्या पैशावर उदर निर्वाह करत आहेत...त्यांनी योजना आखून उपाय करावेत.. पाहिले तर नदीत सांडपाणी सोडणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकावे सरकारी विभाग असेल bmc वैगेरे तर महापौर आणि आयुक्त ह्यांना तुरुंगात टाकावे.जर सांडपाणी नदीत जात असेल तर अनवशक्या चैनी चे प्रॉडक्ट पूर्ण बंद करावेत.. two wheeler ल ६५० cc che इंजिन ..फालतू गिरी असे प्रॉडक्ट निर्माण करणाऱ्या लोकांना आजन्म तुरुंगात टाकावे .सरकारी यंत्रणा नी प्रामाणिक पने काम केले आणि आपण जनतेच्या पैस्यावर दोन खास खात आहे आणि ऐश करत आहे ह्याची जाणीव ठेवली तर सर्व अडचणी काहीच वर्षात दूर होतील.

नऊशे सदनिका,सत्तर दुकाने . सिवेज ट्रीटमेंट प्लान्ट ट्रीटेड पाणी फ्लश आणी बागेत वापरतात डोमेस्टिक वेस्ट मॅनेजमेंट प्लांट,उर्वरक बागेत वापरतात. रेन हार्वेस्टिंग काही प्रमाणात इ वेस्ट डिस्पोजल कॅम्प हे सर्व व्यवस्थित राबवले आहे. परीसरात झाडे,फुलबागा आसल्यामुळे गारवा राहून उन्हाळ्यात वातानुकूलित यंत्रांचा तुलनात्मक वापर कमी.

सामान्य माणूस करतो हो पण सरकारी जेवढं कार्यलये आहेत तिकडेच बोंब आहे. पाणी, वीज, जेवण याची अक्ष्म्य हेळसांड चालू आहे.

संक्षिप्त अमेरिका अमेरिकेत मुख्य पाणीपुरवठा यंत्रणेने गाठलेला तळ, युरोपातील बहुतांश देशांत पडलेला भीषण दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा यांमुळे कृषी उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्हे असून त्याचे दुष्परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. आफ्रिका खंडातील २२ दशलक्ष लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागण्याच्या भीतीसह २०२२-२३मध्ये जगात अन्नधान्यांची दरवाढ, टंचाई निर्माण होण्याची शक्यता विविध अहवालांतून व्यक्त केली जात आहे. ‘वल्र्ड इकॉनॉमिक फोरम’ आणि अमेरिकेच्या ‘नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ने (नासा) जाहीर केलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील सुमारे २५ दशलक्ष लोकांना पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ‘लेक मीड’ या जलाशयाने तळ गाठला आहे. अशी स्थिती १९३७ नंतर प्रथमच निर्माण झाली आहे. कमी पाऊस आणि उष्णतेच्या लाटांमुळे अमेरिकेतील दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, टेक्सास, ओरेगॉन, नेवाडा, उटाह आणि न्यू मेक्सिको या राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती सर्वात गंभीर आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुष्काळाचा अमेरिकेच्या कृषी आणि पशूधनावर विपरीत परिणाम होणार आहे. दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेमुळे गवतांच्या कुरणांचे मोठे नुकसान झाल्यामुळे पशुधनाचे उत्पादन कमी होऊ शकते युरोप युरोपातील अनेक देशांना वर्षांच्या सुरुवातीपासून दुष्काळाच्या झळा बसत आहेत. जुलै, ऑगस्ट महिन्यात या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. युरोपातील नद्या कोरडय़ा पडल्या आहेत. पिण्याचे पाणी, शेतीसाठीेचे पाणी आणि जलविद्युत क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. हाईन, डॅन्यूब, ओडर, लोरी, पो, वाल या प्रमुख नद्यांसह अनेक नद्या कोरडय़ा पडल्या आहेत. युरोपात गेल्या पाचशे वर्षांतील सर्वात मोठा भीषण दुष्काळ पडला आहे. चीन चीन ६१ वर्षांतील भीषण दुष्काळाचा सामना करीत आहे. यांगत्से नदीचा प्रवाह रोडावला आहे. शांघायसह अन्य प्रमुख शहरातील दिवे रात्री बंद केले जात आहेत, इतण्या भीषण वीज टंचाईला चीन सामोरे जात आहे. टेस्ला, टोयाटो सारख्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विजेअभावी आपले प्रकल्प बंद केले आहेत. पूर्ण बातमी /लेख

यांच्या यांच्या नेमके उलट, भारतामध्ये भरपूर पाऊस पडायला लागलेला आहे. चार महिन्याची सरासरी दोन-तीन महिन्यात गाठली जात आहे. कधी न भरणारी धरणे सुद्धा भरून वहायला लागली आहेत. भारताच्या सध्याच्या राज्यकर्त्यांना अनुकूल अशी भूमिका निसर्ग का घेत आहे काही कळत नाही. या शेवटच्या वाक्यावरती हा धागा जोरदार पळायला आता काही हरकत नसावी. :)

In reply to by शाम भागवत

यांच्या यांच्या नेमके उलट, भारतामध्ये भरपूर पाऊस पडायला लागलेला आहे.
हवामान बदलाचाच हा ही एक भाग आहे. कुठे सरासरीपेक्षा जास्त पाऊस तर कुठे सरासरीपेक्षा कमी. पण जास्त पावसाच्याबाबत ही एक निरीक्षण असे आहे की पावसाचे दिवस कमी झालेत आणि प्रत्येक दिवशी पडणारा पाऊस खूप जास्त असे होत आहे. माझे पुर्ण आयुष्य पिंपरी चिंचव॑ड शहरात गेले आहे आणि हे निरीक्षण अगदी खात्रीने मलाही जाणवत आहे गेले ३-४ वर्षांपासून.

कधी न भरणारी धरणे सुद्धा भरून वहायला लागली आहेत.
वर्षानुवर्षे धरणांतील गाळ उपसला न गेल्यामुळे त्यांची साठवणक्षमता पुर्वीपेक्षा कमी झाली असेल आणि त्यामुळे ती लवकर भरत असतील अशी काही शक्यता असू शकते काय ?

अमेरिकेत सध्या उष्णतेची लाट आली आहे. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कॅलिफोर्निया राज्यातही सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीमध्ये 53 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. निसर्गाची हानी होत असल्यानं, निसर्गाने आपला प्रकोप केला आहे. आपल्याला उष्णतेच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याची माहिती कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूजम यांनी दिली. पृथ्वीला तीव्र पूर आणि वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचे गेविन यांनी सांगितले. राज्यातील ग्रीड ऑपरेटर्संनी वीज तोडण्याचा इशारा दिल्याने लोकांच्या अडचणी वाढू शकतात. ग्रीड ऑपरेटरने संभाव्य वीज संकटाचा इशारा देखील दिला आहे. त्यामुळं वीज खंडित होत असल्याने ई-वाहन चालकांना त्यांच्या वाहनांचे शुल्क न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याने जनतेसाठी कूलिंग सेंटरही उभारले आहेत. 2020 च्या उन्हाळ्यापासून कॅलिफोर्नियाच्या ग्रीडसाठी ही सर्वात मोठी चाचणी आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यातील काही भागात भीषण वीज संकट होते. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळं युरोपमधील ऊर्जा संकट वाढत असताना सध्याचे संकट आले आहे. यासह, जगभरातील हवामान बदलामुळं विक्रमी तापमानात वाढ होत आहे. पूर्ण बातमी

ही थोडी जुनी बातमी आहे सध्या ब्रिटनमध्ये उष्णतेचा कहर सुरु आहे. देशातील बहुतांश जलस्रोत आता कोरडे पडत आहेत. उष्णतेच्या लाटेचा थेम्स नदीवर देखील परिणाम झाला आहे. बातमी