Skip to main content

नुपुर शर्माचे यांचे काय चुकले? भारत सरकारची अशी प्रक्रिया अशी का?

लेखक Trump यांनी सोमवार, 06/06/2022 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
काही प्रश्न १. त्यांनी कुराण आणि हदीथ यांचा संदर्भ दिला. त्यामुळे त्यांनी खोटे बोलल्याचे सिध्द होत नाही. नक्की त्यांच्या वक्तव्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे? कोणत्या कायद्यांचा भंग होत आहे? २. त्यांना पक्षातुन काढुन टाकण्यामागे भाजपाची कोणती चाल / अपरिहार्यता असावी? देशातील मुस्लिम समाजाची होणारी प्रतिक्रिया किंवा इतर देशांची प्रतिक्रिया यांचा कितपत संबध असावा? ३. भारत सरकारने आखाती देशापुढे गुढगे का टेकले? तेथील भारतीय हिंदुच्या नोकर्‍या, येणारे तेल ह्याचा काय संबध आहे का? ते आखाती देश चीनबद्दल ब्र काढत नाहीत, मग भारत सरकार का असे वागत आहे? ४. हि तात्पुरती माघार आहे की मोदी सरकारने मुस्लिम लांगुलचालन सुरु केले आहे? ५. हिंदुत्व / हिंदुवादी लोकांची काय भुमिका असेल? ते भाजपाला एक अपरिहार्यता म्हणुन मतदान करणे चालु ठेवतील की पर्यांयाचा विचार करतील? ६. इतर पक्ष कॉंग्रेस, आप इ. कसे ह्याचा लाभ उठवतील?

वाचने 37680
प्रतिक्रिया 155

प्रतिक्रिया

In reply to by कॉमी

+ १ आंतरराष्ट्रीय राजकारण, देशाचे हितसंबंध, कूटनीति, पोलिटिकली करेक्ट विधाने व पोलिटिकली करेक्ट निर्णय हे विषय ज्यांना अजिबात समजत नाहीत त्यांनाच मोदी कणाहीन, गुडघे टेकणारे वगैरे असल्याचे भ्रम होतात. IC814 मधील १७० प्रवाशांना सोडविण्यासाठी कोणताही पर्याय शिल्लक नव्हता व त्यामुळे ३ अतिरेकी नाईलाजाने सोडावे लागले तेव्हा सुद्धा वाजपेयी कणाहीन, गुडघे टेकणारे आहेत असाच दुष्प्रचार या अज्ञान्यांनी केला होता.

दोन प्रवक्ते हटविले म्हणजे प्रकरण संपले असे होत नाही. दीर्घ कालीन त्याचे परिणाम होत असतात. गहू अजून फिरत च आहे. कच्चे तेल भारताला चढ्या किमतीत विकले जाईल. सहकार्य आता पहिल्या सारखे केले जाणार नाही. परिणाम तर दीर्घ कालीन होणारच. व्हिसा कायदे भारतीय लोकांसाठी प्रतिकूल केले जातील.

In reply to by sunil kachure

हे सगळं झालं म्हणजे मग इथे एक धागा काढून आम्हाला सांगा. त्यावेळेस मान्य करू. ओपेकची मस्ती कमी करायची असेल तर दीर्घकालीन योजना कराव्या लागतील. त्या परिस्थितीत जर एखादे पाऊल मागे घ्यावे लागले तर तुमच्यासारख्याना आनंदाच्या उकळ्या फुटणे साहजिक आहे. पण थोडी शक्ती 2024 साठी शिल्लक ठेवा..

असो, पण या निमित्ताने समान नागरी कायदा आल्यावर काय काय होऊ शकते याची एक झलक पाहायला मिळाली.. आता सरकार काय काय करते हे बघणे रोचक ठरेल. कायदा येईल तेव्हा येईल, पण त्यावेळेस समर्थकांनी बोलताना किती सावध राहिले पाहिजे याचा धडा या निमित्ताने सर्वांना मिळाला आहे.

नुपुर शर्माचे यांचे काय चुकले? सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् , न ब्रूयात् सत्यम् अप्रियम् । प्रियं च नानृतम् ब्रूयात् , एष धर्मः सनातन: ॥

In reply to by श्रीगुरुजी

सावत्र आईचे ऐकणारे आणि पत्नीला वनवासात घेउन जाणारे प्रभु श्रीराम शहाणे नव्हते असे विधान ओवेसीनी केले तर नुपुर शर्मा/जिंदाल ऐकुन घेणार का? की भावना दुखावतील?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

असे अनेक हिंदू निधर्मांध सुद्धा म्हणतात. त्यांना आजवर कोणी काही केलंय का?

In reply to by श्रीगुरुजी

श्री कलबुर्गी यांनी गणेश मूर्तीवर मूत्र विसर्जन केले होते त्या बद्दल कुठे मोर्चे किंवा दंगली झाल्या होत्या का?

In reply to by सुबोध खरे

थोडी सुधारणा. यू आर अनंतमूर्ती यांनी एका हिंदू मूर्तीवर (गणेश मूर्ती नाही) मूत्रविसर्जन केले होते व तसे आत्मचरित्रात लिहिले आहे. कलबुर्गींनी एका भाषणात त्याचा संदर्भ देऊन त्या प्रकारचे समर्थन केले होते.

In reply to by सुबोध खरे

दाभोलकर,कलबर्गी आणि त्या लिस्ट मधील बाकी गुलाम.. हे तज्ञ,किंवा हुशार नव्हतेच. हे राजकीय पक्षांचं गुलाम होते ह्यांना पैसा नक्कीच कोणी तरी हिंदू विरोधी पुरवत होता. दाभोलकर ची मुलाकात बघितली. तेव्हा त्याने एक मत व्यक्त केले .बालवाडी पासूनच च हिंदू धर्म,संस्कार,निती,हे शिक्षण पद्धती मधून काढून टाकायचे . म्हणजे हा गुलामच होता ह्यांचे हेतू च साफ नव्हते . संत गाडगे महाराज,संत नामदेव महाराज ह्यांनी हिंदू धर्मातील चुकीच्या कर्मकांड विरुद्ध अतिशय कठोर शब्दात टीका केली आहे . तरी ते आम्हाला प्रेरणा देणारे,आदरणीय च आहेत. कोणताच हिंदू त्यांचा द्वेष करत नाही..कारण त्यांचा हेतू अतिशय पवित्र होता . हिंदू नी नेहमी लवचिकता दाखवली आहे.. म्हणून हिंदू म्हणून मला हिंदू धर्माचा खूप अभिमान आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

असली वक्तव्ये करायला ओवेसीची गरज नाही, कितीतरी हिंदुच असले अपमानास्पद बोलतात. ती वक्तव्ये कानाआड केल्या गेली. पण यापुढे, तसे होणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

कायच्या काही ! नुपूर ह्यांची बडतर्फी त्यांनी अप्रिय भाष्य केले म्हणून नाही विदेशी शक्तींनी मागणी केल्याने हकालपट्टी केली गेली आहे. नाहीतर कतार च्या पत्राची वाट पाहायला भाजप अध्यक्ष बसले नसते. जो पर्यंत कतार ने आक्षेप व्यक्त केला नव्हता तो पर्यंत ह्याच पक्षाचे नेते अतिशय हिरीरीने हे "सत्य" शेर करत होते. बरे हे "सत्यम ब्रूयात" वगैरे मनुस्मृतीतील तत्वे भाजपाची नाहीत आणि भारत सरकारची नाहीत. नाहीतर येव्हाना अर्धा भाजपा बडतर्फ झाला असता कारण बहुतेक मंडळी एक तर धांदात खोटे किंवा अत्यंत अप्रिय अश्याच गोष्टी बोलत असतात. आणि मनुस्मृतीत तत्वे आचरणात आणायचीच असतील तर सर्वच आणावीत. म्लेंछ लोकांच्या संदर्भांत मनुस्मृती काय म्हणते हे भारत सरकारने १९४७ मध्येच गांभीर्याने घेतले असते तर आजची वेळच अली नसती. दुसरी गोष्ट म्हणजे उगाच आपल्या चाटूगिरीला सोयीस्कर असे सुभाषित उचलायचे आणि त्यालाच जणू काही आपले तत्व म्हणून ठोकून द्यायचे आणि विद्वत्तेचा आव आणायचा. म्हणजे आपल्याला घाई आहे तेंव्हा "कल करे सो आज" हा कबीर ह्यांचा दोहा. ठोकून द्यायचा आणि आळस वाटत असेल तर "धीरे धीरे रे मना, " हा कबीर ह्यांचाच दोहा ठोकून द्यायचा. मनुस्मृतीतील सदर सुभाषितावर अत्यंत सविस्तर टीका विविध विद्वानांनी केली आहे. सनातन धर्मातील तत्वे (उदा क्षमा इत्यादी) जेंव्हा म्लेंच्छना लागू केली तेंव्हा म्लेंच्छानी त्याचा येथेच्छ फायदा घेऊन हिंदूंनाच धूळ चारली. कुठले तत्व कुठे लावावे ह्याला सुद्धा तारतम्य असायला पाहिजे. नुपूर ह्यांनी असत्य किंवा अप्रिय असे काहीही बोलले नव्हते त्यांचा प्रत्येक शब्द सरळ हदिथ मधूनच उचललेला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हिंदू धर्म बुडवायला निघाले होते असे हिंदूच म्हणत होते. त्यांचे मारेकरी कोणत्या धर्माचे असतील?

In reply to by आग्या१९९०

असे म्हणणारे मूठभर धर्मांध असतील. त्यांचे मारेकरी कोणत्याही धर्माचे असू शकतील कारण मारेकरी कोण होते, त्यांना मारण्यामागील हेतू काय हे अजून स्पष्ट नाही. मारण्यात वापरली गेलेली शस्त्रे, वाहने इ. पुरावे अजूनही सापडलेले नाहीत. अनेक वेगवेगळ्या लोकांवर संशय घेऊन अनेकांना अटक करून चौकशी करूनही कोणतेही सबळ पुरावे मिळाले नाहीत. मुळात त्यांना धार्मिक कारणावरून मारले की त्यामागे अन्य कारणे होती हेच अजून सांगता येत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

सगळ्यांचे मारेकरी हिंदूच संघटना असणार हे आज ना उद्या उघड होईलच. तपास यंत्रणांची संशयाची सुई हिंदू संघटनांकडेच कशी वळते?

In reply to by आग्या१९९०

कारण गुन्हे घडले त्या काळात महाराष्ट्रात व कर्नाटकात हिंदूविरोधी सरकार सत्तेत होते. २००८ मध्ये मालेगाव स्फोटानंतर पवारांनी व २०१३ मध्ये दाभोळकर हत्येनंतर पृथ्वीराज चव्हाणांनी संशयाची व तपासाची दिशा जाणूनबुजून हिंदू संघटनांकडे वळविली होती. इतक्या वर्षांनंतर आजतागायत काहीही पुरावे मिळाले नाहीत व काहीही सिद्ध झाले नाही.

इस्लामी देशात अशा गुन्ह्याला फाशी हीच शिक्षा आहे आणि ती योग्यच आहे. कोणाचा तरी एकाचा किडा वळवळा करतो आणि तो करोडो लोकांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या देव देवतांच्या वर गल्लीच्छ टीका करतो. हा गुन्हाच.ईश निंदा हा कायदा भारतात पण हिंदू आणि मुस्लिम ह्या धर्माच्या देव देवता विषयी लागू झाला पाहिजे. हिंदूंच्या देव देवता वर पण काही अती शहने नीच शब्दात कॉमेंट करत असतात. पण हिंदू मुस्लिम लोकांसारखे हिंसक प्रतिक्रिया देत नाहीत त्याचा फायदा उचलला जातो हे खरेच आहे. ईश निंदा कायदा असता तर कितीतरी पुरोगामी कायद्याच्या चापात अडकले असते आणि तो प्रकार बंद झाला असता. Bjp कडे पूर्ण बहुमत आहे हिदू हिताचा कायदा bjp नी परित करावा.

In reply to by sunil kachure

Bjp कडे पूर्ण बहुमत आहे हिदू हिताचा कायदा bjp नी परित करावा.
BJP तसं काहीही करणार नाही. --- आठ वर्षे झाली. हिंदुत्वाच्या नावाने, हिंदूंच्या मतावर बहुमत मिळवलेल्या सरकारने - १. हिंदूंच्या फायद्याचा एकतरी नवीन कायदा आणि त्याची अंमलबजावणी केला आहे का? २. हिंदूंचे नुकसान थांबेल असा एकतरी जुना कायदा रद्द केला आहे का? माझ्या माहितीनुसार आणि समजुतीनुसार एकही नाही. --- केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही. याउलट, पूर्वीच्या मुस्लिमहितवादी सरकारात, "या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे" हे ठणकावून सांगण्याची आणि तशी प्रत्यक्ष कृती करण्याची धमक होती. --- "पाठ्यपुस्तकांतून शिकवला जाणारा इतिहास खोटा आहे, तो बदलण्याची गरज आहे" असे पांचजन्य / ऑर्गनाइझर मधून नुसते सांगायचे पण हाती सत्ता असुनही प्रत्यक्षात मात्र काहीही करायचे नाही. उलट आम्ही चार वर्षांत पाठ्यपुस्तकांचे एकही प्रकरण बदलले नाही असे सांगणाऱ्या बुळ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार? --- प्रश्न केवळ नुपूर शर्मांच्या बडतर्फीचा नाही; आठ वर्षांत प्रचंड बहुमत असूनही या सरकारने हिंदूंच्या हिताचे काहीही केले नाही, ही निराशा, सल, खदखद मनात आहे. --- अवांतरः मरतुकड्या सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे अशी हिंदूंची मनोधारणा होत चालली आहे आणि २०२४ च्या निवडणुकीत ती प्रतिबिंबित होणार आहे.

In reply to by वामन देशमुख

हिंदूंकडून सतत होणारी समान नागरी कायद्याची मागणी पूर्ण करू शकते हे सरकार परंतु किती हिंदू पाठींबा देतील ह्या कायद्याला ? कारण "हिंदू अविभक्त कुटुंब कायद्याचे" फायदे हिंदूंना मिळणार नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

माहीत नाही. परंतु हिंदूंची समान नागरी कायद्याची मागणी हिंदू हितापेक्षा दुसऱ्या धर्मातील नागरिकांना धार्मिक सवलती मिळू नये ह्याबद्दल असते.

In reply to by श्रीगुरुजी

मी चुकत नसल्यास अहिंदूंना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्यात यावे अशी वामनजींची इच्छा आहे. चुभुद्याघ्या.

In reply to by कॉमी

असहमत. मला अजिबात नाही वाटत असे. एक कायदा RTE संदर्भात असू शकतो. सर्व शाळांना लागू केला जावा. मुघलांशी संबधीत अभ्यासक्रम बदलला जावा. ते अजुन त्यांची लिस्ट देतीलच.

In reply to by कॉमी

मी चुकत नसल्यास अहिंदूंना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्यात यावे अशी वामनजींची इच्छा आहे. चुभुद्याघ्या.
नाही हो, असे नाही. आधीच भारतात हिंदू हे दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत त्यांना किमान समान अधिकार तरी मिळावेत अशी माझी इच्छा आहे. मागे एका चर्चेत मी "हिंदूंनी खरेतर हिंदूंना झुकते माप देणारा असमान नागरी कायदा करावा यासाठी प्रयत्न करावेत" असे म्हटले होते पण ते एका वेगळ्या संदर्भात होते. (हिंदूंनी भारतात हिंदू म्हणून रहावे + अहिंदूंनी हिंदू व्हावे यासाठी काय इन्सेन्टिव्ह आहेत असा तो संदर्भ होता.) प्रस्तुत चर्चा वेगळी आहे.

In reply to by वामन देशमुख

हो, त्याच प्रतिसादामुळे माझा तसा समज झालेला. तसे तुमचे मत नाही हे समजून बरे वाटले.

In reply to by वामन देशमुख

आता येथे ह्या संदर्भांत थोडी चर्चा सुरू आहे, म्हणून जे. साई दीपक ह्या, सर्वोच्च न्यायालयांतील कार्यरत वकिलांचे ह्याबद्दलचे मत येथे ऐकावे. तसेच त्यांनी एका चर्चेच्या दरम्यान ह्याच विषयावरील काही तांत्रिक माहिती (पूर्वपीठिका) विशद केली आहे, तीही ०२:२० पासून ऐकावी.

In reply to by श्रीगुरुजी

हिंदूहित किंवा हिंदूंचा फायदा होण्यासाठी कोणते कायदे करावै लागतील?
उदा. १. शिक्षण हक्क कायद्यात हिंदूंवर अन्याय करणाऱ्या तरतुदी रद्द करणे. (साहना यांनी त्याबद्धल मिपावर भरपूर लिहिलंय) २. जातीय हिंसाचार प्रतिबंधक कायदा प्रस्ताव २०११ यामध्ये हिंदूंच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या तरतुदी उलट मार्गे बदलून तो कायदा लागू करणे. https://www.legallyindia.com/views/entry/the-ugly-truth-behind-the-comm… ३. पाठ्यपुस्तकांतून चुकीचा इतिहास बदलून हिंदूंचा गौरव होईल असा खरा इतिहास मांडणे. अश्या अनेक बाबी करण्यासारख्या आहेत.

In reply to by वामन देशमुख

१) याविषयी मला फारशी माहिती नाही. हिंदू आहे म्हणून कोणत्याही शिक्षणसंस्थेत माझ्यावर कधीही अन्याय झालेला नाही. परंतु सवर्ण असल्याने नक्कीच अन्याय झाला आहे. २) हे विधेयक तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने मागे घेतल्याने त्याचे कायद्यात रूपांतर झाले नाही. https://www.google.com/amp/s/www.ndtv.com/cheat-sheet/after-fierce-deba… ३) पाठ्यपुस्तकातून मुघलांवरील लेखनाचे प्रमाण कमी करून त्याऐवजी हिंदू राजांच्या सविस्तर इतिहासाचा समवेश २०१७ पासून केला गेला आहे. त्याविरूद्ध निधर्माधांनी खूप आरडाओरडा केला होता. https://www.google.com/amp/s/www.firstpost.com/india/mughals-disappeari… https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/india/story/chapter-…

In reply to by वामन देशमुख

>>> नुपुर शर्माचे यांचे काय चुकले? भारत सरकारची अशी प्रक्रिया अशी का? नुपुर शर्माचे यांचे काय चुकले हे जाणून घेण्यासाठी - नुपुर शर्मा नेमकं काय बोलल्या? त्यांच्या बोलण्याचा नेमका संदर्भ काय होता? चर्चा नेमकी काय सुरु होती? हे माहित असायला हवे. ते कुठुनही माहित होणार नाही. त्या चर्चेचा विडिओ सर्व ठिकाणांहून हटविण्यात आला आहे. किमान मलातरी सापडला नाही, कुणाला सापडल्यास इथे लिंक द्यावी. शांतिदूतांनी सांगितले की नुपूर शर्मांनी गुन्हा केला आहे मग झाले, तो विडिओ बघण्याची काय गरज आहे? थेट शिक्षा द्यायला हवी नाही का? --- प्रश्न नुपुर शर्माचे यांचे काय चुकले हा नाही, प्रश्न हा आहे की भारत सरकारची अशी प्रक्रिया अशी का? कारण मोदी-प्रणित केंद्र सरकार कणाहीन आहे; हिंदूहितैषी तर नाहीच नाही, भारतीय-नागरिकहितैषी देखील नाही. --- नुपूर शर्मा ह्या दोषी आहेत / निर्दोष आहेत हे, जर हे प्रकरण कोर्टात गेले तर कोर्ट ठरवेल. पण त्याआधी एक भारतीय नागरिक म्हणून / एक हिंदू व्यक्ती म्हणून / एक स्त्री म्हणून / भाजपाच्या प्रवक्त्या म्हणून शर्मांचे संरक्षण करण्यात भाजपने / केंद्र सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. उलट भाजपने लांडग्यांच्या तोंडी शेळीला हवाली केले. आणि भाजपने असं पहिल्यांदाच केलंय असं नाही! --- केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही.

In reply to by वामन देशमुख

आंतरराष्ट्रीय राजकारण हि एक वेगळीच कथा आहे. केवळ एक वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा याना पदावरून हटवले तसेच श्री महातीर महम्मद यांनी काश्मीर वर टिप्पणी केल्याबद्दल भारताशी संबंध खराब झाले https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/mahathir-… यानंतर भारताने मलेशियाच्या पाम तेलावर निर्बंध घातले आणि त्यामुळे मलेशियाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आणि त्यामुळे होणाऱ्या घडामोडीनंतर श्री महातीर याना पदावरून हटवले गेले. https://www.reuters.com/article/us-india-malaysia-palmoil-exclusive-idU… भारताने सध्या गरम असलेल्या तेलाच्या किमतीत अजून आग लागू नये म्हणून नुपूर शर्मा याना पदावरून हटवले आणि मध्यपूर्वेतील लोकांशी संबंध सध्या तरी बिघडणार नाहीत याची काळजी घेतली. यासाठी श्री मोदींना भाजप विरोधीच नव्हे तर समर्थकांकडून हि शिव्या खाव्या लागल्या. पण अशा गोष्टी आंतरराष्ट्रीय राजकारणात घडतच असतात

In reply to by वामन देशमुख

राजस्थानात नुपूर शर्मांचे समर्थन केले म्हणून कन्हैय्यालालची हत्या पुन्हा एका काफिराला, त्याने कुफ्र करण्याची शिक्षा मिळाली. अर्थात, सध्या केंद्र सरकारच्या / भाजपच्या धोरणानुसार हे चालायचेच. नुपूर शर्मांची पाठराखण करू न शकणाऱ्या मोदी-शहा, भाजप, संघ यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? --- बंगालातल्या निवडुणकोत्तर हिंसाचारात मारले गेलेले, जखमी झालेले भाजप कार्यकर्ते (सामान्य नागरिक सोडा, ते तर खिजगणतीतही नाहीत) अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातल्या अनेकांनी बंगाल राज्य सोडून इतरत्र स्थायिक झालेले आहेत. त्यांचे संरक्षण करू न शकणाऱ्या मोदी-शहा, भाजप, संघ यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? --- दिल्लीत २०२०च्या दंगलीत मारले गेलेले, जखमी झालेले हिंदू लोक अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यांचे संरक्षण करू न शकणाऱ्या मोदी-शहा, भाजप, संघ यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? --- रच्याक, नुपूर शर्मांच्या वक्तव्याची विडिओ लिंक कुणाला सापडली का? अर्थात, इतरांचे सोडा, भाजपलाही शर्मांची पाठराखण करायची नाहीय, मग त्यांच्या निर्दोषत्वाचे पुरावे सांभाळून ठेऊन तरी काय करायचे आहे म्हणा? --- केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही.

In reply to by वामन देशमुख

रच्याक, नुपूर शर्मांच्या वक्तव्याची विडिओ लिंक कुणाला सापडली का? कालपर्यंत ह्या धाग्यावरचीच लिंक एक्टीव होती. तुम्हा पाहीली नाही का क्लिप? युट्युब ला सर्च करून खोदकाम करा. सापडेल.

भावना भडकावून हिंदू हीत साधता येणार नाही. म्हणून मी bjp विरोधी मत देतो. खुप पुढचे प्लॅन असावे लागतात. सहणा किंवा बाकी जे एक्साईट होवून बोलत आहेत ते खऱ्या परिस्थिती शी विपरीत भावनेच्या आहारी जावून बोलत आहेत. त्याला काडी ची किंमत नाही सर्व मुस्लिम देश विरोधी गेले तर भारत मोठ्या आर्थिक संकटात सापडेल. सरकार मूर्ख नाही . फक्त भारत हाच हिंदू चा देश आहे.हिंदू चे शत्रू फक्त मुस्लिम नाहीत . जाती धर्म,भाषा,पुरोगामी हे सर्व शत्रू आहेतं Bjp ची कुवत असेल तर ते भारताला हिंदू राष्ट्र बनवू शकतात. पण त्या साठी नियोजन हवे फालतू भावनिक जोश नको. 1)प्रतेक हिंदू आर्थिक बाबतीत सक्षम असावा कायदेशीर आणि बे कायदेशीर सर्व मार्ग वापरून. २) प्रशासन मध्ये बदल करून फक्त हिंदू हीत ,आणि हिंदू प्रेम असणारेच लोक योग्य ठिकाणी हवीत. कायदे बदला तुम्हाला बहुसंख्य हिंदू सत्तेवर बसवतील. ४) आखाती देश ना कोंडीत पकडायची एक संधी सोडू नका. तालिबान लं पाठिंबा देवून अमेरिका नी तेच केले. मुस्लिम लोकांनाच आखाती देशात हिंसाचार करण्यास पूर्ण सहकार्य करणे.. प्लॅन नसेल तर फक्त तोंडाची हवा bjp नी घालवू नये. पोकळ बडबडीला कुत्रा पण विचारत नाही.

अलेक्झांडर,ब्रिटिश,जर्मनी . मुस्लिम लोकांना जग जिंकणे जमले नाही. खुप कमी भू भाग मुस्लिम लोकांकडे आहे. कारण .. फक्त भावनिक जोश योजना नाहीत,नियोजन नाही. भारत ब्रिटिश लोकांनी ताब्यात घेतला जोशात येवून नाही भारत हिंदू राष्ट्र व्हावे असे वाटत असेल तर योजना हव्यात,संयम हवा ,आणि नियोजन तर हवेच .नुपूर वर फालतू बडबड करून काही फायदा नाहीं

हे भारतीय राज्य भारतासाठी डोके दुखी आहे बांगलादेश,पाकिस्तान ,इंडोनेशिया हे देश सोडले तर जगातील कोणत्या ही मुस्लिम देश पेक्षा उत्तर प्रदेश मध्ये जास्त मुस्लिम आहे..देशासाठी सर्व बाबतीत डोके दुखी.

नुपूर चुकीची बोलाली की बरोबर ह्याला काही अर्थ नाही. भारत सरकार तिच्या बोलण्यावर कडक react होण्यास सक्षम आहे का? हा प्रश्न आहे.. भारतात सत्ता मिळवणे हा हेतू मनी ठेवून . कोणी हिंदू हीत वादी असतो,कोणी मुस्लिम हीत वादी,कोणी दलित हीत वादी. पण ही सर्व नाटक असतात . ज्यांचे प्रतिनिधित्व आपण करतो त्यांचे हीत कोणी जपत नाही. अक्कल शून्य नेते आणि अक्कल शून्य जनता हे समीकरण भारतात यशस्वी होते.

नुपूर चुकीची बोलाली की बरोबर ह्याला काही अर्थ नाही. भारत सरकार तिच्या बोलण्यावर कडक react होण्यास सक्षम आहे का? हा प्रश्न आहे.. भारतात सत्ता मिळवणे हा हेतू मनी ठेवून . कोणी हिंदू हीत वादी असतो,कोणी मुस्लिम हीत वादी,कोणी दलित हीत वादी. पण ही सर्व नाटक असतात . ज्यांचे प्रतिनिधित्व आपण करतो त्यांचे हीत कोणी जपत नाही. अक्कल शून्य नेते आणि अक्कल शून्य जनता हे समीकरण भारतात यशस्वी होते.

नुपूर चुकीची बोलाली की बरोबर ह्याला काही अर्थ नाही. भारत सरकार तिच्या बोलण्यावर कडक react होण्यास सक्षम आहे का? हा प्रश्न आहे.. भारतात सत्ता मिळवणे हा हेतू मनी ठेवून . कोणी हिंदू हीत वादी असतो,कोणी मुस्लिम हीत वादी,कोणी दलित हीत वादी. पण ही सर्व नाटक असतात . ज्यांचे प्रतिनिधित्व आपण करतो त्यांचे हीत कोणी जपत नाही. अक्कल शून्य नेते आणि अक्कल शून्य जनता हे समीकरण भारतात यशस्वी होते.

नुपूर शर्मा चुकीचं बोलल्यात असं दिसत नाहीच. पण बोलण्याची पद्धत काहीशी चुकली असं म्हणता येईल एखाद्या धर्मग्रथांत काही गोष्टी अशास्त्रीय असतील तरी धर्मग्रंथ लिहिले गेलेत तो काळ, संदर्भ , त्याकाळी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेले ज्ञान ई गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. पुढे काही गोष्टी शास्त्रीय कसोट्यांवर चुक असल्याचे दिसून येते. अनेक धर्माच्या ग्रंथात वा समाजोपयोगी आणि आदरणीय मानलेल्या ग्रंथांत अशा चुका असू शकतात. माझ्या आठवणीप्रमाणे , आयुर्वेदातही काही अशास्त्रीय गोष्टी आहेत (कृपया संदर्भ मागू नये , आता नेमके आठवत नाही ) पण त्यामुळे आयुर्वेदाचे महत्व कमी होत नाही किंवा त्यामुळे आयुर्वेदाची खिल्ली उडवणे समर्थनीय ठरणार नाही. तसेच धर्मग्रंथात लिहिलंय म्हणून "पृथ्वी सपाट आहे" असं मानणारे फारसे कुणी असतील असं मला वाटत नाही. सर्वच समाजात शास्त्रीय ज्ञानाचा स्वीकार वाढलाय , वाढतोय. धर्मग्रंथांतील काही उपयुक्त , काळाच्या कसोटीवर टिकणार्‍या गोष्टी त्या फक्त घेवून बाकी ग्रंथ हळूहळू बासनात बांधून ठेवायला हवे. या सगळ्याला थोडा वेळ लागेल. याकरिता अधिकाधिक विज्ञानवादी नेते पुढे यायला हवेत... "आता वेळ आली आहे, धर्मग्रंथ बाजूला ठेवायची" असा हळुवार शब्दात पण ठामपणे संदेश सामान्य जनतेला देवू शकतील असे नेते हवे आहेत. पण सध्या याबाबत प्रगती होताना दिसत नाही, उलटपक्षी आतापर्यंत नास्तिक म्हणून ओळख असलेल्या नेत्याबाबतही आता ते नास्तिक नव्हेतच असा दावा त्यांच्या निकटवर्तीयांकडून केला जात आहे. जणू काही नास्तिक असणे म्हणजे पाप आहे !! असो. "काय तुमचे ते धर्मग्रंथ ? काय फालतु अशास्त्रीय लिहिलेय त्यात ?" अशा प्रकारचा सूर लावणे उचित नाही. नुपूर शर्मा यांचा सूर काहीसा तसा वाटला. असे मुद्दे वेगळ्या प्रकारे हाताळले गेले पाहिजेत. मी त्या कार्यक्रमाची संपुर्ण चित्रफित पाहिलेली नाही. . टीव्ही चॅनेलवरच्या चर्चा मी फारशा बघत नाही, किंबहून वृत्त वाहिन्याच फारशा बघत नाही. पण तरी जेव्हा कधी अशा चर्चा पाहिल्यात तेव्हा दिसून आले की या चर्चांमध्ये (खरंतर यांना चर्चा का म्हणायचं हा प्रश्न आहे) औपचारिक चर्चा वा वादविवादातले सभ्यतेचे किमान नियमही पाळले जात नाहीत. एक व्यक्ती बोलत असताना तिचे बोलणे तोडत दुसरी व्यक्ती बोलते आपलेच बोलणे ऐकले जावे म्हणून लोक मोठ्यामोठ्याने ओरडून बोलतात. अँकरलाही बहुधा हेच हवे असते. [ प्रत्येकाला बोलायला काही मिनिटे दिलीत , एक जण बोलत असताना दुसरे लोक शांतपणे ऐकतायत, कुणी कुणाचे बोलणे तोडत नाही , आरडाओरडा न करता अभ्यासपुर्ण मुदे मांडले जात आहेत - अशा सभ्य वातावरणातल्या चर्चा कोणत्या वाहिनीवर चालत असतील का ? असल्यास कृपया तपशील द्यावा. ] बाकी गोरक्षकांकडून झालेल्या हत्या वगैरेवर शांत असलेले इस्लामिक देश एका वृत्तवाहिनीवरील टुकार चर्चेतील दोन चार वाक्यांनी अचानक जागे झालेत आणि एकमुखाने निषेध वगैरे व्यक्त करु लागलेत हे अनाकलनीय आहे. दाल मे कुछ काला है !!

In reply to by तर्कवादी

बाकी गोरक्षकांकडून झालेल्या हत्या वगैरेवर शांत असलेले इस्लामिक देश एका वृत्तवाहिनीवरील टुकार चर्चेतील दोन चार वाक्यांनी अचानक जागे झालेत आणि एकमुखाने निषेध वगैरे व्यक्त करु लागलेत हे अनाकलनीय आहे. दाल मे कुछ काला है !! त्या चर्चेत नूपुर शर्मा जे बोलल्या त्याचा कांगावा राहुलसहीत अनेक निधर्माधांनी अगदी आंतरराष्ट्रीय मंचावर सुद्धा केल्याने ते इस्लामिक देशांपर्यंत पोहोचलं. अन्यथा भारतातील एका वाहिनीवरील चर्चेतील दोनचार वाक्यांकडे भारतात सुद्धा कोणी लक्ष देत नाही.

In reply to by तर्कवादी

श्री तर्कवादी,
एखाद्या धर्मग्रथांत काही गोष्टी अशास्त्रीय असतील तरी धर्मग्रंथ लिहिले गेलेत तो काळ, संदर्भ , त्याकाळी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेले ज्ञान ई गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. पुढे काही गोष्टी शास्त्रीय कसोट्यांवर चुक असल्याचे दिसून येते.
१. एकाद्या धर्मग्रंथात (उदा. इस्लाम, इसाई) यांच्यात लिहीले सगळे बरोबर. ते सगळे इतर कोणत्याही कायद्यापेक्षा वरती. २. ते देवाने पाठवलेला हा शेवटता हा शेवटचा प्रेषित आहे. तो (प्रेषित) नेहमीचे बरोबर असतो, काहीच चुका करत नाही. ३. आणि फक्त आमचाच देव आणि प्रेषित बरोबर बाकीचे चुकीचे. अश्या जर असेल तर तुम्ही त्यांना कसे काही गोष्टी सोडण्यास किंवा सुधारण्यास सांगाल?

In reply to by Trump

ट्रम्पजी
अश्या जर असेल तर तुम्ही त्यांना कसे काही गोष्टी सोडण्यास किंवा सुधारण्यास सांगाल?
तुम्ही म्हणताय तसं काही लोक मानत असतील तरी घटना व कायदा सर्वश्रेष्ठ आहे. घटनेनुसारच राज्यकारभार चालतो व कायद्याप्रमाणेच न्याय केला जातो. बाकी पृथ्वी गोल आहे की सपाट , देव आहे की नाही , पुनर्जन्म आहे की नाही, स्वर्ग -नरक संकल्पना या आणि तत्सम अनेक बाबतीत एखाद्याची वैयक्तिक मते काहीही असली तरी त्याने कायद्याने चालणार्‍या राज्यात फरक पडत नाही. पण हे खरे की आपले जीवनमान उंचावण्याकरिता, स्वतःची व कुटुंबाची सर्वांगीण प्रगती करण्याकरिता या भ्रामक कल्पनांपासून दूर जाणे योग्य. एखाद्या समाजातील सगळेच लोक शास्त्रीय दृष्टीकोन बाळगून असतात किंवा एखाद्या समाजातील सगळेच लोक अशास्त्रीय दृष्टीकोन बाळगतात असे नाही. आधुनिक ज्ञानाचा स्वीकार सर्वच समाजात कमी अधिक प्रमाणात झालेला आहे व होत आहे आणि होत राहिल. नाहीतर पृथ्वी सपाट आहे असं मानणार्‍या समाजातून डॉ कलाम सारखे रॉकेट शास्त्रज्ञ निर्माण झाले नसते विज्ञानवादी नेते, शिक्षक यांनी सक्रीय पुढाकार घेतल्यास धर्मातील कालबाह्य कल्पनांपासून दूर जाण्याच्या प्रक्रियेला बळ व वेग मिळेल.

In reply to by तर्कवादी

तुम्ही म्हणताय तसं काही लोक मानत असतील तरी घटना व कायदा सर्वश्रेष्ठ आहे. घटनेनुसारच राज्यकारभार चालतो व कायद्याप्रमाणेच न्याय केला जातो.
हे तुमचे मत झाले, त्यांचे नाही. त्यांना बदलावयाचे आहे, तुम्हाला नाही.

In reply to by Trump

हे तुमचे मत झाले, त्यांचे नाही
त्यांचे कुणाचे ? देशाचा कारभार कसा चालतो ? घटनेनुसार वा कायद्यानुसार राज्यकारभार चालत नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?

#IStandWithNupurSharma असे किंवा तत्सम काहीतरी लिहिल्याबद्दल जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी तीन भाजपेयींवर गुन्हा दाखल केला ! आता हे मात्र बेण्डिंग ओव्हर वाटतेय. देशाने अधिकृतपणे प्रवक्त्यांचे विधान दूर करणे वेगळे आणि सोशल मीडियावर पोस्ट केली म्हणून धरणे वेगळे.

समान नागरी कायद्याला विरोध करण्याचे मुस्लिम लोकांस काही कारण नाही.मुस्लिम लोकांपेक्षा पुरोगामी जास्त विरोध करतात. समान नागरी कायदा झाले की . सर्व धर्मीय एकच कायद्याच्या कक्षेत येतील ही पोट दुखी आहे. 1)घटस्फोट चे नियम सर्वांस सारखे. २) किती बायका करू शकतो हा नियम सर्वांस सारखा. ३) वारसा हक्क हा नियम सर्वास सारखा. ४)पोडगी चा नियम सर्वास सारखा. आणि सर्वात महत्वाचे. लग्न केल्यानंतर पण बायको नवऱ्यावर बलात्कार ची केस करू शकते हे पुरोगामी लोकांचे फॅड बंद होईल. हिंदू ची कुटुंब व्यवस्था नष्ट करून हिंदू च्या मुळावर च घाव घालणारे कायदे करा असे हट्ट धरणारे पुरोगामी शांत होतील. समान नागरी कायद्या मुळे काही फायदा आणि काही तोटा पण होईल . पण स्वतः काही तरी वेगळे आहोत ही धारणा नष्ट होईल.

पुरोगामी समान नागरी कायद्याला विरोध करतात ? कोण आहेत हे पुरोगामी, काही उदाहरणे आहेत का ? मी तर जो बघेल तो समान नागरी कायद्याला समर्थनच देतोय असे अनुभवतो आहे. मिसळपाववर तुम्ही स.ना.का. ला का समर्थन करत नाही असा चॅलेंज कम प्रश्न ज्या ज्या वेळी झाला आहे त्या त्या वेळी पुरोगाम्यांनी समर्थन करतो असेच उत्तर दिले आहे. उदाहरणार्थ- मी, आग्या आणि गणेशा ह्यांनी तरी समर्थन केल्याचे मला आठवते आहे.

भारतातील एका ही मुस्लिम नेत्याने जाहीर पने आखाती देश ना घडसावले नाही. की. आमच्या देशात तुम्ही हस्तक्षेप करू नका ,आमचे प्रश्न आम्ही सोडवू. हे स्वतःला पाहिले मुस्लिम आणि नंतर भारतीय मानत असतील तर. तर भारतात त्यांना दुय्यम नागरिक म्हणूनच कायद्याने मान्यता देण्यात काही चुकीचे नाही.

मुस्लिम कसे ही असले तरी हिंदू देव देवता वर अभद्र टिपनी ते करत नाहीत. अपवाद असतील. ते स्वतः आस्तिक असल्या मुळे हिंदू च्या धार्मिक भावना दुखावतील असे वक्तव्य ते करत नाहीत. हिंदू धर्मावर ,त्यांच्या देव देवतावर अभद्र टीपणी दुसराच वर्ग करत असतो. त्यांच्याकडे लक्ष द्यावे इतके ते प्रबळ नसल्या मुळे कोणी लक्ष पण देत नाही. हा भाग वेगळा.

मोदी सरकारच्या या एका घोडचूकीमुळे हिंदू जनमानसात प्रचंड क्रोध \ उद्वेग निर्माण झाला आहे. नुपुर शर्माने जर इस्लाम मधील ग्रथांचा /पुस्तकांचा इइइ. संदर्भ देऊन वक्तव्य केले असेल आणि भगवान भोलेनाथांच्या टिंगल टवाळीला प्रतिउत्तर देताना तीने व्यक्तव्य केले तर तिला देशा समोर आणि जगासमोर चूक का ठरवले गेले ? हा प्रश्न लोकांना सातत्याने पडला आहे. सोशल मिडियावर भाजपाची चांगली खिल्ली उडवली जात आहे,लोक राग व्यक्त करत आहेत. जाता जाता :- हिंदू स्त्रीस जिहादी लांडग्यां समोर टाकुन दिल्या बद्धल भाजपाचे अभिनंदन ! तुम्ही जगाला दाखुवुन दिले की समोराच्या ने वाक म्हंटले तर आम्ही लोटागण तर घालतो पण आमच्या स्त्रियांचा सन्मान देखील स्वाहा करु शकतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “It takes a great deal of courage to stand up to your enemies, but even more to stand up to your friends.” – J. K. Rowling

In reply to by मदनबाण

हिंदू स्त्रीस जिहादी लांडग्यां समोर टाकुन दिल्या बद्धल भाजपाचे अभिनंदन !
तिने जोहार करण्याची धमकी द्यायला हवी. मोदी / भाजपची पळता भुई थोडी होईल.

In reply to by Trump

LMAO

https://www.lokmat.com/national/bhim-army-announces-rs-1-crore-reward-f… ह्या प्रकरणात आता कुणीही हात धुवुन घेत आहे. मुस्लिम लांगुलचालन आता जवळ्पास सारे करत आहेत. अचानक? ही भीम आर्मी आता बक्षिस देणार आहे. गंम्मत म्हणजे ह्या भीम अर्मी चे ब्रीद वाक्य आहे "भारत एकता मिशन" काय एकता दाखवताय बघा ...

तिने जोहार करण्याची धमकी द्यायला हवी. अशी वेळ कोणत्याच हिंदू किंवा इतर स्त्रियांवर येऊ नये. मोदी / भाजपची पळता भुई थोडी होईल. तिच्यावर जर प्राण घातक हल्ला झाला तर मात्र लोक भाजपा ला सोडणार नाहीत. जाता जाता :- कराचीवुड मधला नसीरुद्दीन नावाचा विषारी आणि महा नॉटी साप परत बाहेर येऊन फुत्कार टाकु लागला आहे, या सापाने मागे मुघल आक्रमक अत्याचारी नव्हे, राष्ट्रनिर्माते होते अशी इस्लामी गरळ ओकली होती. याकुब मेमनच्या फाशी विरुद्ध दया याचिकेवर या सापाने सही केली होती. हा देशद्रोही साप लव्ह जिहाद बद्धल, हिंदू देवतांच्या टिंगल करण्या बद्धल मात्र चकार शब्द काढणार नाही. ही भीम आर्मी आता बक्षिस देणार आहे. गंम्मत म्हणजे ह्या भीम अर्मी चे ब्रीद वाक्य आहे "भारत एकता मिशन" काय एकता दाखवताय बघा सन्माननिय बाबासाहेब यांचे नाव घेऊन हिंदू द्रोह करण्याचा प्रकार बर्‍याच काळा पासुन चालु आहे, जय भीम जय मीम घोषणा वगरै देखील दिल्या जातात. बरेच तथाकथित नेते स्वतःचे उपद्रव मुल्य दाखवण्यासाठी देखील बाबा साहेबांचे नाव घेऊन त्यांनाच बदनाम करत आले आहेत. आता बाबा साहेबांनीच काय लिहले आहे ते इथे देतो :- P1 P2

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही. :- विनायक दामोदर सावरकर

राजकीय पक्षांना कोणाची पर्वा नाही हे सत्य आहे .हिंदू नी पूर्ण विश्वास ठेवून bjp ल पाठिंबा दिला तर तेच बहुसंख्य हिंदू ना कमजोर करतील . मुस्लिम लोकांचे तारणहार पण त्याच लायकीचे आहेत फक्त मत हवी आहेत. भीम आर्मी नी काय दीवा लावला आहे दलितांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी. सर स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यरत आहेत. हिंदू ची नवीन संघटना स्थापन केली पाहिजे. अराजकीय . आणि खोगीर भरती नको . बाळासाहेब ठाकरे,प्रमोद महाजन आणि असे अनेक नेते आता हवे होते ज्यांच्यावर विश्वास ठेवता आला असता. मोदी,शाह हिंदू चे हीत रखतील ह्या विषयी संशय आहे.. वांझोटी चर्चा आहे . हिंदू ना नेता च नाही.

१) कट्टर मुस्लिम पासून हिंदू वाचतील. २)हिंदू ना आर्थिक सशक्त bjp करेल ,सत्तेत सहभागी करेल. ३)पुरोगामी ना कायदेशीर कारवाई करून कमजोर करेल. तर जे काही घडणार नाही. हिंदू नेहमी मुस्लिम आणि पुरोगामी ह्यांच्या दबावात राहतील अशीच व्यवस्था ते करतील. हिंदू च्या मुळावर घाव घालणारा . Atrocity सारखा कायदा न्यायालयाने रद्द केला होता . हा कोर्टाचा निर्णय bjp नीच फिरवला. ह्या एका उदाहरण वरून ह्यांची नियत फक्त सत्ता मिळवणे हीच आहे. नुपूर चे कडक पने समर्थन bjp नी केले नाही. हे दुसरे उदाहरण समोर आहे.. बाळासाहेब ठाकरे मध्येच ही धमक होती. मोदी आणि शाह मध्ये नाही. योगी तर पिल्लू आहे .फक्त प्रचार.

ईश निंदा अक्षम्य करणारा कायदा मोदी सरकारने भारतात आणावा. हे आजच्या परिस्थितीत योग्यच ठरेल. कारण अनेक अहिन्दु आणि हिन्दुसुद्धा हिन्दुविशयी आणि त्यान्च्या धर्माविशयी अचकट विचकट विधाने करत आहेत त्यान त्यामुळे जरब बसेल.

In reply to by दिगोचि

ईश निंदा अक्षम्य करणारा कायदा मोदी सरकारने भारतात आणावा.
पण इथे ईश्वर नाही तर ईश्वराच्या प्रेषिताविषयी बोलले गेले आहे. आणि जे काही बोलले गेले आहे ते पण त्यांच्याच ग्रंथामध्ये केलेल्या उल्लेखाला धरून आहे. आणि तरीही इतके आकांडतांडव होत असेल तर त्याला औषध काय? शुक्रवारी जो प्रकार झाला त्यानंतर योगींनी बुलडोझर वापरले तशाप्रकारेच जरब बसविणे हाच एक उपाय. दुसरे काय?

नुपूर शर्मा असेल किंवा बाकी बिनडोक पुरोगामी.एकच लायकीचे आहेत. धर्म,संस्कृती,मानवाचा इतिहास,धर्माचा इतिहास हा खूप मोठा विषय आहे. आलतू फालतू लोकांनी त्या विषयात न बोलणेच उत्तम. कागदी डिग्री आणि सरकारी स्टॅम्प पडला की कोणी ज्ञानी होत नाही हे शिक्षित अडाणी च असतात. जी लोक पूर्ण आयुष्य माणसाचा इतिहास,धर्माचा इतिहास,संस्कृती च इतिहास हे समजून घेण्यासाठी वेचातात. तेव्हा त्यांना काहीच टक्के सत्य माहीत पडते. खुप गहन आहे विषय. पुरोगामी डिग्री वाले, आणि अडाणी ,अविचारी,बिलकुल बुध्दी नसणारे, बेवडे जेव्हा महान हिंदू धर्मावर फालतू प्रश्न करून त्यांच्या फालतू बुध्दी चे दर्शन घडवतात . तेव्हा अशा लोकांना भर चौकात नागडे करून मारावे अशी इच्छा होते त्या साठी ईश निंदा कायदा हवा आणि त्या मध्ये ही तरतूद हवी. हिंदू मध्ये जे असे अती शहाणे आहेत त्यांना मी जे पुरोगामी चे वर्णन केले आहे तेच लागू होते. नुपूर शर्मा त्या मधील एक त्यांना पण त्याच कायद्याखाली शिक्षा हवी. ज्या महान लोकांनी पूर्ण आयुष्य धर्म आणि संस्कृती हे समजून घेण्यासाठी वेचले आहे. ते एक तर उथळ बोलत नाहीत. त्या लोकांच्या मताला ग्राह्य समजण्यात काही कमी पना नाही.