Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by Trump on Mon, 06/06/2022 - 13:24
काही प्रश्न १. त्यांनी कुराण आणि हदीथ यांचा संदर्भ दिला. त्यामुळे त्यांनी खोटे बोलल्याचे सिध्द होत नाही. नक्की त्यांच्या वक्तव्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे? कोणत्या कायद्यांचा भंग होत आहे? २. त्यांना पक्षातुन काढुन टाकण्यामागे भाजपाची कोणती चाल / अपरिहार्यता असावी? देशातील मुस्लिम समाजाची होणारी प्रतिक्रिया किंवा इतर देशांची प्रतिक्रिया यांचा कितपत संबध असावा? ३. भारत सरकारने आखाती देशापुढे गुढगे का टेकले? तेथील भारतीय हिंदुच्या नोकर्‍या, येणारे तेल ह्याचा काय संबध आहे का? ते आखाती देश चीनबद्दल ब्र काढत नाहीत, मग भारत सरकार का असे वागत आहे? ४. हि तात्पुरती माघार आहे की मोदी सरकारने मुस्लिम लांगुलचालन सुरु केले आहे? ५. हिंदुत्व / हिंदुवादी लोकांची काय भुमिका असेल? ते भाजपाला एक अपरिहार्यता म्हणुन मतदान करणे चालु ठेवतील की पर्यांयाचा विचार करतील? ६. इतर पक्ष कॉंग्रेस, आप इ. कसे ह्याचा लाभ उठवतील?
  • 37455 views

प्रतिक्रिया

Submitted by sunil kachure on Mon, 06/06/2022 - 13:38

Permalink

मझ्या मते

1)नुपूर ही bjp ची प्रवक्ती आहे पक्षाची आणि सरकार ची भूमिका मांडणे हे त्यांचे काम. थोडक्यात त्या पक्ष आणि सरकार ह्यांची धोरणे,दृष्टिकोन मांडत असतात सत्ताधारी पक्षाशी संबंध असल्या मुळे सरकारचा दृष्टिकोन पण तोच आहे असे समजले जाते २) गरीब लोकांचे रोजगार आणि देशाचे हित जपण्यासाठी bjp sarkar नी आखाती देशासमोर गुडघे टेकले नाहीत अंबानी,अडाणी,आणि बाकी मित्र ह्यांचे आर्थिक हीत लगेच धोक्यात येईल .ह्याची जाणीव त्यांना मित्रांनी करून दिली . म्हणून कारवाई. ३)चीन जसे वागतो तसेच असं वागले तर जग react करणार नाही. फ्रान्स जसा मुस्लिम लोकांशी वागतो तसे आपण वागले तर मुस्लिम देश react करणार नाहीत.. हा विचार च चुकीचं आहे. किती ही ढोल वाजवत असला तरी भारत अजून पण मागास आहे. फक्त आपण ते मान्य करत नाही.

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Mon, 06/06/2022 - 15:15

Permalink

नुपूर शर्मा

नुपूर शर्मांचे तसे काही चुकले नाही. जर हे प्रकरण देशातल्या देशात राहिले असते आणि तरीही पक्षाने त्यांना काढून टाकले असते तर ते अयोग्य ठरले असते हे नक्की. पण आताच्या काळात असे काही झाले तर ते भारताबाहेरच्या कोणाला समजणार नाही असे होणे अशक्य. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांची आखाती देशांमधून प्रतिक्रिया उमटली. गेल्या काही वर्षात आखाती देशांबरोबर- विशेषतः युएई आणि सौदीबरोबर संबंध सुधारायचे जाणीवपूर्वक प्रयत्न मोदींनी केले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून म्हणा ३७० कलम हटविल्यानंतर टर्की आणि मलेशिया सोडून एकाही मुस्लिम देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिला नव्हता. ऑगस्टा-वेस्ट्लँड प्रकरणातील आरोपी राजीव सक्सेना परंपरेप्रमाणे दुबईला पळून गेला होता. भारतीय अधिकार्यांनी त्याला तिथे जाऊन उचलून आणले हे युएई सरकारच्या सहकार्याशिवाय थोडीच झाले होते? असे संबंध चांगले होत असतील तर त्यात मिठाचा खडा टाकला जायची शक्यता या नुपूर शर्मांच्या वक्तव्यात होती. समजा भविष्यात पाकिस्तानविरोधात आणखी काही कोंडीत पकडायची पावले उचलायची असतील तर त्यावेळेसही मुस्लिम देशांनी ३७० प्रकारेच भूमिका घ्यावी हे आपल्या देशाच्या हिताचे आहे. तसेच आखाती देशांमध्ये अक्षरशः लाखो भारतीय (विशेषतः केरळी लोक) कामाला आहेत. त्यांना या प्रकरणामुळे अगदी जीवाला धोका नाही तरी अन्य काही अडचणींना (नोकरी जाणे वगैरे) सामोरे जावे लागायला नको हे पण बघणे गरजेचे होते. बहुदा म्हणून पक्षाने नुपूर शर्मांना काढलेले दिसते. एकदा प्रकरण देशाबाहेर गेल्यानंतर नक्की काय परिणाम होतील याविषयी आपल्यासारखे लोक नुसते असे तर्कच लढवू शकतात. नुपूर शर्मांचे काही चुकलेच असेल तर त्यांनी खूप शक्तीशाली लॉबीला अंगावर घेतले हेच. या निमित्ताने एक गोष्ट लिहाविशी वाटते. मुनावर फारूकीने हिंदू देवदेवतांची टवाळी केली होती आणि त्याबद्दल त्याला काही दिवस तुरूंगात टाकले आणि त्याचे शो होऊ दिले नाहीत म्हणून अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी वगैरे मोठ्यामोठ्या गोष्टी बोलणारे अनेक लोक होते. मिपावरही त्याविषयी एका प्रतिसादात लिहिले गेले होते. पण नुपूर शर्मा प्रकरणी मात्र कोणीच काही बोलायला तयार नाही. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का? विशेषतः जे काही बोलल्या त्यात काहीही चूक नसताना?

Submitted by Trump on Wed, 06/08/2022 - 23:09

In reply to नुपूर शर्मा by चंद्रसूर्यकुमार

Permalink

धन्यवाद चंद्रसूर्यकुमार.

धन्यवाद चंद्रसूर्यकुमार.
नुपूर शर्मांचे काही चुकलेच असेल तर त्यांनी खूप शक्तीशाली लॉबीला अंगावर घेतले हेच.
+१
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 06/06/2022 - 16:13

Permalink

Some Muslim states that have

Some Muslim states that have been mute on China's assault on Islam, including incarcerating over a million Muslims and confiscating Korans, have played up the anti-Muslim remarks of two Indians now expelled from the ruling party. Is it because they perceive India as a soft state?

— Brahma Chellaney (@Chellaney) June 6, 2022

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।

Submitted by कॉमी on Mon, 06/06/2022 - 16:48

Permalink

ह्या नुपूर शर्मा बाईंना

ह्या नुपूर शर्मा बाईंना अधूनमधून किंचाळताना, "म्हाताऱ्या, तू मूर्ख आहेस, गप्प बस" टाईप गोष्टी प्राईम टाईम डिबेट वर ओरडताना पहिल्या आहेत. आता नक्की काय डिबेट होती, आणि त्यात काय कारणाने कुराण आणि हदीस चा संदर्भ देऊन बोलावे लागले काहीही कल्पना नाही. पण मुस्लिमद्वेष्टा कंटेंट टीव्हीवर चालू असतो- टाइम्स नाऊ, झी, सुदर्शन, रिपब्लिक इत्यादी वाहिन्यांवर इतके माहित आहे. एकूण आजपर्यंत ज्याज्यावेळेस ह्या नुपूर बाईंचे बोलणे ऐकले त्यात्या वेळेस त्या बाई पक्क्या सटकलेल्या आहेत आणि पक्षाच्या प्रवक्ता म्हणून ठेवण्याच्या लायकीचा नाहीत असेच मत झाले आहे. ती ओपी इंडियाची "पत्रकार" नुपूर शर्मा "अनसटलदेसी" नावाने वावरते, तिने बंदुकधारी मुलीचे चित्र ठेवलेले- जे भाजपाच्या नुपूर बाईंसारखेच दिसत होते. या बाईसुद्धा तितक्याच येड्यांच्या इस्पितळातून ट्विट करायच्या त्यामुळे सदर दोन्ही व्यक्ती एकच आहेत असा समज होता. कालपरवा "अन्स्टलदेसी नुपुरशर्माबीजेपी यांची मुलाखत घेणार" असे ट्विट वाचले तेव्हा कळले की ह्या दोन्ही मेंटल केसेस वेगवेगळ्या आहेत. असो. पहिले मुहम्मद झुबेर ह्यांचे बाबत. झुबेर ने लाईव्ह टीव्ही डिबेट मधली एक चित्रफीत टाकली असता प्रवक्त्या बाईंनी "एडिटेड क्लिप" "पर्सनल आट्याक" असा कांगावा केला. मी मेल्यास मुहम्मद झुबेरला जबाबदार धरा असे ट्विटरवर रडणे सुद्धा झाले. आता ह्या बाईंना जर हत्या आणि बलात्काराच्या धमक्या येत असल्यास ते नक्कीच अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे. त्यांना सुरक्षा देणे, धमकावणाऱ्यांना अटक करणे इत्यादी गोष्टी नक्की केल्या जाव्यातच. पण बाई के बोलल्या तेच ट्विटरवर पोस्ट करणे ह्यात नक्कीच काही चुकीचे होत नाही. बाई काय बोलल्या त्यातल्या एका गोष्टीकडे त्यांनी लक्ष मात्र वेधून घेतले. त्यापुढे, नुपुरबाईंना हवे ते बोलायचा हक्क आहेच. त्यासाठी त्यांना जर जीवित हानी किंवा इतर प्रकारे आर्थिक हानी होत असेल तर चूक आहे. पण बोलणे पक्षहीत आणि राष्ट्रहित विरोधी असेल तर पक्षप्रवक्त्या हे पद त्यांच्याकडे असणे किती उपयोजक आहे? त्यामुळे त्यांना पक्ष प्रवक्त्या पदावरून काढून टाकणे ह्यात काहीही खळबळजनक वाटत नाही. बाकी कॉमेडियन काय बोलला आणि सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्या काय बोलल्या ह्यात साम्य शोधणाऱ्या बुद्धीला मानाचा मुजरा !

Submitted by Trump on Mon, 06/06/2022 - 17:49

In reply to ह्या नुपूर शर्मा बाईंना by कॉमी

Permalink

Ad hominem

Ad hominem ची तक्रार तुम्ही खुप वेळा करता. तुम्हीही तेच येथे केले आहे. असो. मुळ वक्तव्याबद्दल काहीच लिहीले नाही. https://en.wikipedia.org/wiki/Ad_hominem

Submitted by कॉमी on Mon, 06/06/2022 - 18:02

In reply to Ad hominem by Trump

Permalink

?

नुपुरबाईंना हवे ते बोलायचा हक्क आहेच. त्यासाठी त्यांना जर जीवित हानी किंवा इतर प्रकारे आर्थिक हानी होत असेल तर चूक आहे. पण बोलणे पक्षहीत आणि राष्ट्रहित विरोधी असेल तर पक्षप्रवक्त्या हे पद त्यांच्याकडे असणे किती उपयोजक आहे?

Submitted by Trump on Mon, 06/06/2022 - 18:07

In reply to ? by कॉमी

Permalink

हदीथ आणि कुराणमधील संदर्भ देउन बोलणे राष्ट्रविरोधी कसे होउ शकते?

अच्छा. हदीथ आणि कुराणमधील संदर्भ देउन बोलणे राष्ट्रविरोधी कसे होउ शकते?

Submitted by कॉमी on Mon, 06/06/2022 - 18:11

In reply to हदीथ आणि कुराणमधील संदर्भ देउन बोलणे राष्ट्रविरोधी कसे होउ शकते? by Trump

Permalink

आखाती देशातील देशांसोबत संबंध

आखाती देशातील देशांसोबत संबंध बिघडू शकतात हे कारण स्पष्ट नाही काय ?

Submitted by Trump on Mon, 06/06/2022 - 18:16

In reply to आखाती देशातील देशांसोबत संबंध by कॉमी

Permalink

आखाती देशातील देशांसोबत संबंध

आखाती देशातील देशांसोबत संबंध बिघडू शकतात हे कारण स्पष्ट नाही काय ?
म्हणजे आखाती देशांना कुराण आणि हदीथ मान्य नाही का? ते खोटे आहे असे समजतात का? तसे असेल तर त्यांना मुस्लिमद्वेषी का म्हणु नये?

Submitted by Trump on Mon, 06/06/2022 - 18:16

In reply to आखाती देशातील देशांसोबत संबंध by कॉमी

Permalink

तर त्यांना मुस्लिमद्वेषी का म्हणु नये?

आखाती देशातील देशांसोबत संबंध बिघडू शकतात हे कारण स्पष्ट नाही काय ?
म्हणजे आखाती देशांना कुराण आणि हदीथ मान्य नाही का? ते खोटे आहे असे समजतात का? तसे असेल तर त्यांना मुस्लिमद्वेषी का म्हणु नये?

Submitted by कॉमी on Mon, 06/06/2022 - 18:27

In reply to तर त्यांना मुस्लिमद्वेषी का म्हणु नये? by Trump

Permalink

हो त्यांना कुराण आणि हदिथ

हो त्यांना कुराण आणि हदिथ मधील काही बाबी ऐकायला आवडत नाहीत असे म्हणू शकतो.

Submitted by Trump on Mon, 06/06/2022 - 17:50

In reply to ह्या नुपूर शर्मा बाईंना by कॉमी

Permalink

Ad hominem

Ad hominem ची तक्रार तुम्ही खुप वेळा करता. तुम्हीही तेच येथे केले आहे. असो. मुळ वक्तव्याबद्दल काहीच लिहीले नाही. https://en.wikipedia.org/wiki/Ad_hominem

Submitted by कॉमी on Mon, 06/06/2022 - 17:54

In reply to Ad hominem by Trump

Permalink

ऍड होमिनेम कसे बुवा ?

ऍड होमिनेम कसे बुवा ? त्यांच्या वक्तव्यासाठी त्यांना शिक्षा किंवा इजा होऊ नये हे लिहिलेय ना ?

Submitted by Trump on Mon, 06/06/2022 - 18:01

In reply to ऍड होमिनेम कसे बुवा ? by कॉमी

Permalink

तुम्हाला खरच समजत नाही की तुम्ही समजुन न समजल्यासारखे करताय?

तुम्हाला खरच समजत नाही की तुम्ही समजुन न समजल्यासारखे करताय?
ऍड होमिनेम कसे बुवा ? त्यांच्या वक्तव्यासाठी त्यांना शिक्षा किंवा इजा होऊ नये हे लिहिलेय ना ?
तुम्ही त्यांचे वक्तव्य चुकीचे कसे आहे किंवा नाही हे लिहीलेच नाही. परंतु त्याच्या चारित्राबद्दल आणि इतर गोष्टीबद्दल बरेच लिहीले आहे.

Submitted by कॉमी on Mon, 06/06/2022 - 18:04

In reply to तुम्हाला खरच समजत नाही की तुम्ही समजुन न समजल्यासारखे करताय? by Trump

Permalink

त्यांचे वक्तव्य चुकीचे नाही.

त्यांचे वक्तव्य चुकीचे नाही. पण प्रवक्त्या म्हणून बेजबाबदारीचे आहे.

Submitted by काड्यासारू आगलावे on Mon, 06/06/2022 - 19:16

In reply to त्यांचे वक्तव्य चुकीचे नाही. by कॉमी

Permalink

त्यांचे वक्तव्य चुकीचे नाही.

त्यांचे वक्तव्य चुकीचे नाही. पण प्रवक्त्या म्हणून बेजबाबदारीचे आहे. कसेकाय?? तुम्हाला वाटते म्हणून का त्यामागे काही लाॅजीक देखील आहे?

Submitted by कॉमी on Mon, 06/06/2022 - 20:01

In reply to त्यांचे वक्तव्य चुकीचे नाही. by काड्यासारू आगलावे

Permalink

प्रवक्त्यांनी इतर देशांसोबत

प्रवक्त्यांनी इतर देशांसोबत संबंध बिघडवू शकणाऱ्या गोष्टी बोलायच्या नसतात. आपल्या देशाच्या डिप्लोमाटिक इंट्रेस्ट वर दुष्परिणाम होईल अशा गोष्टी बोलायच्या नसतात. खऱ्या असल्या तरी.

Submitted by काड्यासारू आगलावे on Mon, 06/06/2022 - 20:08

In reply to प्रवक्त्यांनी इतर देशांसोबत by कॉमी

Permalink

प्रवक्त्यांनी इतर देशांसोबत

प्रवक्त्यांनी इतर देशांसोबत संबंध बिघडवू शकणाऱ्या गोष्टी बोलायच्या नसतात का? प्रवक्ता तर फक्त बोलली. चिन तर अनेकांच्या प्रत्यक्ष नांग्या ठेचतोय. चिनला भिती वाटते का संबंध बिघडायची? आपल्या देशाच्या डिप्लोमाटिक इंट्रेस्ट वर दुष्परिणाम होईल अशा गोष्टी बोलायच्या नसतात. खऱ्या असल्या तरी. मग सरकारी अधिकारी, मंत्री संत्रा काय फक्त विमानाचं पेट्रोल जाळायला ना फोटो काढायला परदेशात जाता का?? डिप्लोम्टीक ईंट्रेस्ट भाजप पक्ष प्रवक्त्याने सांभाळावा? सलाम तुमच्या बुध्दीमत्तेला.

Submitted by कॉमी on Mon, 06/06/2022 - 20:47

In reply to प्रवक्त्यांनी इतर देशांसोबत by काड्यासारू आगलावे

Permalink

प्रवक्ता तर फक्त बोलली. चिन

प्रवक्ता तर फक्त बोलली. चिन तर अनेकांच्या प्रत्यक्ष नांग्या ठेचतोय. चिनला भिती वाटते का संबंध बिघडायची? चीन कडे भारतापेक्षा जास्त बार्गेनिंग पॉवर असावी. त्यामुळे चीन मुस्लिमांवर अत्याचार करत असून सुद्धा त्यांच्यासोबत जास्त खळखळ करता येत नाही.
सरकारी अधिकारी, मंत्री संत्रा काय फक्त विमानाचं पेट्रोल जाळायला ना फोटो काढायला परदेशात जाता का?? डिप्लोम्टीक ईंट्रेस्ट भाजप पक्ष प्रवक्त्याने सांभाळावा? सलाम तुमच्या बुध्दीमत्तेला.
डिप्लोमॅट ने तर सांभाळायचा असतोच. पण पक्ष प्रवक्त्यांचे बोलणे सुद्धा आंतराष्ट्रीय पातळीवर गंभीरपणे घेतले जाणारच.

Submitted by काड्यासारू आगलावे on Mon, 06/06/2022 - 21:14

In reply to प्रवक्ता तर फक्त बोलली. चिन by कॉमी

Permalink

पण पक्ष प्रवक्त्यांचे बोलणे

पण पक्ष प्रवक्त्यांचे बोलणे सुद्धा आंतराष्ट्रीय पातळीवर गंभीरपणे घेतले जाणारच. तालीबान प्रवक्त्यांना कोण सिरीयस घेतं? मुस्लिम ब्रदरहूडचा प्रवक्ता काय बोलला हे भारत सरकार पर्यंत तरी पोहोचतं का?

Submitted by कॉमी on Mon, 06/06/2022 - 21:29

In reply to पण पक्ष प्रवक्त्यांचे बोलणे by काड्यासारू आगलावे

Permalink

काड्यासारु,

उगाच वाट्टेल त्या तुलना करू नका. भारत तालिबानला सरकार म्हणून मान्यता देत नाही. भारत आणि तालिबान मध्ये कसलेही डिप्लोमॅटिक नाते नाही. भारताने काबूल मधली एम्बसी बंद केली आहे. त्यामुळे तालिबान वाले वाट्टेल ते बडबडले तरी डिप्लोमॅटिक नाते जे सध्या शून्य आहे ते आणखी खाली जाऊ शकत नाही. बाकी भारत फ्रंट वर तालिबान सध्या वाईट न बोलता भारताला आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करत आहे. इथे वाचु शकता.

Submitted by आग्या१९९० on Mon, 06/06/2022 - 16:52

Permalink

शिवलिंग की फव्वारा हे अजून

शिवलिंग की फव्वारा हे अजून सिद्ध होण्यापूर्वीच बिजेपीच्या जिंदालाने तारे तोडले. आखाती देशांनी हिसका दाखविल्यानंतर लगेच पक्षातून बाहेर काढले. काय गरज होती नसते तारे तोडायची? आता घाबरून बसलाय.माझा पत्ता सार्वजनिक करू नका म्हणतोय. असुरक्षित देशात राहतोय ह्याचा त्याला गर्वच असेल. दुबळ्या सरकारचे दुबळे कार्यकर्ते.

Submitted by आग्या१९९० on Mon, 06/06/2022 - 16:59

Permalink

बाकी कॉमेडियन काय बोलला आणि

बाकी कॉमेडियन काय बोलला आणि सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्या काय बोलल्या ह्यात साम्य शोधणाऱ्या बुद्धीला मानाचा मुजरा ! अगदी बरोबर. तुलना करताना आपण ज्या व्यक्तीचे समर्थन करतोय तिला कुठल्या पातळीवर नेतोय हेच समजत नाही समर्थकांना. सवय नाही आगीशी खेळायची म्हणून गोंधळ होतोय.

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Mon, 06/06/2022 - 17:46

Permalink

कुवेतचे सुपरमार्केट

या प्रकरणामुळे कुवेतच्या एका सुपरमार्केटमध्ये भारतीय उत्पादने काढली आहेत. https://timesofindia.indiatimes.com/india/kuwait-supermarket-pulls-indian-products-as-row-grows-over-prophet-remarks/articleshow/92039040.cms मागे डेन्मार्कमध्ये एका वर्तमानपत्रात व्यंगचित्रे छापून आली होती तेव्हाही त्या देशाच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकायचे प्रकार झाले होते. अशा प्रकारामुळे व्यापारी आणि अन्य हितसंबंधांना धोका पोचत असेल तर त्यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवून पडदा टाकायचा प्रयत्न असावा असे दिसते.

Submitted by sunil kachure on Mon, 06/06/2022 - 17:57

Permalink

ईथे नुपूर योग्य बोलली तरी चूक

नुपूर किती ही खरे बोलली असेल तर ती चूकच कारण. भारत सक्षक्त राष्ट्र नाही,powerful राष्ट्र नाहीं भारतीय राजकीय लोकांनी देशाला पूर्ण भिकेला लावले. भारत सशक्त असता तर नुपूर ही आज देशाची आदर्श व्यक्ती असते.

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 06/06/2022 - 18:46

Permalink

जगाला दाखविण्यासाठी नूपुर

जगाला दाखविण्यासाठी नूपुर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर तोंडदेखली कारवाई केलेली दिसते. अर्थात राहुल गांधी, कॉंग्रेस, समाजवादी पक्ष हे आग भडकावून आगीत तेल ओतण्याचे काम करून मजा पहात आहेत. ते दोघे काय बोलले त्यापेक्षा ही मंडळी आग लावण्याचे जे काम करीत आहेत तेच राष्ट्रविरोधी आहे. यातून मोदी अडचणीत येतील किंवा आपल्याला राजकीय फायदा होईल हा यांचा भ्रम आहे. यातून फक्त देशच अडचणीत येऊ शकतो.

Submitted by काड्यासारू आगलावे on Mon, 06/06/2022 - 19:15

In reply to जगाला दाखविण्यासाठी नूपुर by श्रीगुरुजी

Permalink

जगाला दाखविण्यासाठी नूपुर

जगाला दाखविण्यासाठी नूपुर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर तोंडदेखली कारवाई केलेली दिसते. हिंदू धर्माचा कुणीही अपमान केला तर चालेल पण ईतर धर्माचा तुम्हा अपमान केला तर कारवाई होईल हा संदेश भाजपने दिलाय.

Submitted by Trump on Wed, 06/08/2022 - 23:12

In reply to जगाला दाखविण्यासाठी नूपुर by श्रीगुरुजी

Permalink

तसे असेल तर छानच आहे.

जगाला दाखविण्यासाठी नूपुर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर तोंडदेखली कारवाई केलेली दिसते.
तसे असेल तर छानच आहे.

Submitted by काड्यासारू आगलावे on Mon, 06/06/2022 - 18:52

Permalink

नुपुर शर्माचे यांचे काय चुकले

नुपुर शर्माचे यांचे काय चुकले? त्यांचे हे तुकले की आपण कोणत्या पक्षाच्या प्रवक्ता आहोत हे त्या विसरल्या. -आपल्या पक्षाचं काम हिंदूत्वाच्य् नावाने निवडणूका जिंकणं आहे ना की हिंदूंचा हक्कांसाठी लढणं. - मागे कमलेश तिवारी ह्या हिंदूत्वावाद्याची हत्या तथाकथीत हिंदूत्ववादी योगीच्या राज्यात दिवसाढवळ्या झाली. आपल्या मुलाच्या हत्येला योगी जबाबदार आहे हे त्याच्या मात्यापितांनी सांगीतले. - ऊद्या नूपूर शर्मांचेही तेच होनार. ना भाजप्याना फरक पडनार ना ढोंगी हिंदूत्ववाद्यांना.
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Mon, 06/06/2022 - 19:00

Permalink

नुपूरबाई व आखाती देश

Trump, वर चंद्रसूर्यकुमार यांनी म्हंटलंय ते बरोबर आहे. नुपूर शर्मांचं वक्तव्य बरोबर असलं तरी मोठ्या दबावगटास ( लॉबीस ) अंगावर घेतलं ही चूक आहे. बाकी, अमेरिका आखाती देशांना कस्पटासमान वागवते. तिचा निषेध करायची शक्ती कुणाच्याही अंगी नाही. भारत पडला नरम देश. म्हणून निषेध होतो. चालायचंच! आ.न., -गा.पै.

Submitted by काड्यासारू आगलावे on Mon, 06/06/2022 - 19:08

In reply to नुपूरबाई व आखाती देश by गामा पैलवान

Permalink

भारत पडला नरम देश. म्हणून

भारत पडला नरम देश. म्हणून निषेध होतो. चालायचंच! गामाजी दुरूस्ती सुचवतो. भारत पडला नरम नेत्याचा देश. म्हणून निषेध होतो. चालायचंच! (ईंदीरा गांधींचा काळ पहा)

Submitted by भीमराव on Mon, 06/06/2022 - 19:39

Permalink

एक हिंदू आणि एक मुसलमान कधीच

एक हिंदू आणि एक मुसलमान कधीच मित्र होऊ शकत नाहीत. हे मी बोललो तर गुन्हा आणि मुहम्मद बोलला तर सत्य असतं

Submitted by काड्यासारू आगलावे on Mon, 06/06/2022 - 20:21

Permalink

महामानव मोदीजी नी महाताकदवान

महामानव मोदीजी नी महाताकदवान गृहमंत्री अमितशहा असतानाही नुपूर शर्मा नी नवीन जिंदाल ह्यांना भिती वाटत असेल तर ह्या देशात खरोखरच हिंदू खतरेमे है. हिंदूंनो स्वतःच स्वतः चा सुरक्षा करायला शिका सरकार फक्त बोलघेवडेपणा करायला आहे.

Submitted by sunil kachure on Mon, 06/06/2022 - 20:31

Permalink

उत्तर द्यावे

नुपूर आणि जिंदाल हे bjp चेच प्रवक्ते होते. आणि त्यांनी जी भूमिका मांडली ती bjp पक्ष म्हणून जी भूमिका मांडत आला आहे त्याच्या शी सुसंगत च आहे. त्याच जोरावर तर bjp हा हिंदू चा पक्ष म्हणून ओळखला जातो..मग . Bjp नी नुपूर आणि जिंदाल ल का काढून टाकले? ह्याचे उत्तर काय.

Submitted by sunil kachure on Mon, 06/06/2022 - 20:35

Permalink

हे कारण तर नसेल

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://wap.business-standard.com/article-amp/companies/uae-s-ihc-to-invest-2-billion-in-three-adani-group-s-portfolio-companies-122040800412_1.html&ved=2ahUKEwjB8u_DjJn4AhUBgpQKHeYVCMUQFnoECAcQAQ&usg=AOvVaw3q_gQXQxFuoSKYdl2UC1EM

Submitted by sunil kachure on Mon, 06/06/2022 - 20:39

Permalink

मित्रांचे नुकसान चालणार नाही हिंदू चे झाले तरी चालेल

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.ndtv.com/world-news/adani-group-explores-partnerships-with-saudi-arabias-aramco-2833622/amp/1&ved=2ahUKEwjB8u_DjJn4AhUBgpQKHeYVCMUQFnoECBEQAQ&usg=AOvVaw3Q2LFi1YXqBTzBbwAOcL_y हे कारण तर नसेल.ही गुंतवणूक धोक्यात तर येणार नव्हती ना?

Submitted by काड्यासारू आगलावे on Mon, 06/06/2022 - 21:14

In reply to मित्रांचे नुकसान चालणार नाही हिंदू चे झाले तरी चालेल by sunil kachure

Permalink

बरोबर. दोस्तिसाठी शेठने केले

बरोबर. दोस्तिसाठी शेठने केले असावे हे.

Submitted by sunil kachure on Mon, 06/06/2022 - 21:02

Permalink

ईश निंदा सारखा कायदा भारतात पण हवा

हिंदू संयमी आहे पण हिंदू च्या देव देवतांची निंदा नालस्ती करण्याचे पुरोगामी प्रकार भारतात पण खूप होतात..त्या वर हिंसक प्रतिक्रिया येत नाही कारण हिंदू संयमी आहे. ईश निंदा सारखा कायदा भारतात पण मोदी सरकार नी आणांवा. आणि त्या मध्ये हिंदू आणि मुस्लिम ह्या महत्वाचे धर्मांना च समाविष्ट करावे. खुप गरजेचं आहे.

Submitted by गणामास्तर on Wed, 06/08/2022 - 13:01

In reply to ईश निंदा सारखा कायदा भारतात पण हवा by sunil kachure

Permalink

तुम्ही खरंच पहिल्यापासून इतके

तुम्ही खरंच पहिल्यापासून इतके हुशार आहात कि काही कोर्स वगैरे केला ?

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 06/09/2022 - 09:59

In reply to तुम्ही खरंच पहिल्यापासून इतके by गणामास्तर

Permalink

ते मुळात हुशार आहेतच

ते मुळात हुशार आहेतच आणि त्यावर त्यांनी रा रा पप्पूची खास ऑनलाईन शिकवणी लावली होती.

Submitted by सुक्या on Mon, 06/06/2022 - 21:09

Permalink

ही तोंड देखल कारवाई आहे हे

ही तोंड देखल कारवाई आहे हे मला वाटते. अखाती किंवा मुस्लिम राष्ट्रे आपापसात कितीही भांडत असली तरी कुराण / धर्म या बाबतीत ते एक होतात. त्यांच्या अस्तित्वाचा तो पाया आहे. त्यामुळे फतवे जारी केले जातात, बहिष्कार टाकला जातो. यात अगदी टोकाची भुमिका पण घेतली जाते ज्यात द्विराष्ट्रीय संबंध खराब होतात. भारतासारख्या देशाला ज्याच्या आजु बाजु असलेले देश नेहेमी काड्या सारत असतात, भारतातल्या अंतर्गत बाबी ना आंतर्राष्ट्रीय रुप देतात अशा वेळा वेळीच एखादा मुद्दा शांत झाला नाही तर दुरगामी परीणाम होतात. त्यामुळे अशी तोडदेखली कारवाई करावी लागते. पुढे काही महिण्यांनी जेव्हा सगळे शांत होइल तेव्हा नुपूर शर्मा व नवीन जिंदाल पुन्हा नवीन रुपात दिसतील.

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 06/06/2022 - 21:12

In reply to ही तोंड देखल कारवाई आहे हे by सुक्या

Permalink

हैच मी आधीच्या प्रतिसादात

हैच मी आधीच्या प्रतिसादात लिहिलंय. काही वेळा प्रत्यक्षात चुकीची असली तरी पोलिटिकली करेक्ट भूमिका घ्यावी लागते. ही कारवाई तशीच पोलिटिकली करेक्ट आहे.

Submitted by आग्या१९९० on Mon, 06/06/2022 - 21:22

In reply to हैच मी आधीच्या प्रतिसादात by श्रीगुरुजी

Permalink

अशीच भूमिका मागील सरकारांनी

अशीच भूमिका मागील सरकारांनी केले तर लांगुलचालन, भेकडपणा, हातचे बाहुले असे संबोधून मोकळे व्हायचे.

Submitted by कंजूस on Mon, 06/06/2022 - 21:24

Permalink

शिवाबद्दल कुणी बोलले त्यास विरोध करणे गरजेचे आहे.

पण त्यांच्यातला दोष काढणे, सांगणे हे त्यांच्या एकीमुळे खपवून घेतले जात नाही. १३५ लाख परदेशींपैकी ८७ लाख लोक खाडी देशांत नोकरीला आहेत. उत्पादने काढली तशी यांनाही परत पाठवायची हिंमत ते देश दाखवू शकतात. कारण त्या देशांचे अडणार नाही. पण आपले अडणार.

Submitted by काड्यासारू आगलावे on Mon, 06/06/2022 - 21:58

Permalink

७०० शेतकरी मरू देनार्या नी

Image removed.७०० शेतकरी मरू देनार्या नी कश्मिरी पंडीतांचे पलायन चालू असलेले दिसत असतांनाही दुर्लक्ष करनार्या मोदी सरकारला आखाता देशात वयनोकरी करनार्यांची पर्वा असेल हे एकतर वेड र लोका्ना रटेल किंवा भक्तांना पण वर कचुरेंनी लिंक दिल्याप्रमाणे अदाणीची डील धोक्यात येऊ नये म्हणूनच नुपूर शर्मा ह्यांना पक्षातून काढले असावे. शेवटी दोस्ती महत्वाची!

Submitted by sunil kachure on Mon, 06/06/2022 - 21:58

Permalink

साधी गोष्ट आहे

पाकिस्तान दहशत वादाला पाठिंबा देतो. काश्मीर मध्ये अतिरेकी नाहीत तर पाकिस्तानी फौज च हिंसाचार करत असते. उघड सत्य.. भारतासारख्या बलाढ्य,उत्तम प्रशिक्षित फौजेशी सामान्य अतिरेकी लढू शकणार नाही... ते पाकिस्तानी सैनिक च असतात..योग्य प्रशिक्षण घेतलेले. पण पाकिस्तान सरकार किंवा किंवा पाकिस्तान मधील सत्ता धारी पक्षाचे प्रवक्ते ते कधीच मान्य करत नाहीत. हे पाकिस्तानी लोकांना कळत. पण नुपूर आणि जिंदाल ह्या सत्ता धारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी कळत नाही. म्हणजे त्यांची boudhik कुवत काय असेल. शितावरून भाताची परीक्षा.

Submitted by सुबोध खरे on Tue, 06/07/2022 - 12:15

In reply to साधी गोष्ट आहे by sunil kachure

Permalink

काश्मीर मध्ये अतिरेकी नाहीत

काश्मीर मध्ये अतिरेकी नाहीत तर पाकिस्तानी फौज च हिंसाचार करत असते. मग मेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबाला निवृत्तीवेतन वगैरे देतच नसतील. कारण हे आमचे सैनिक नाहीतच असे सांगावे लागेल ना? जसे कारगिल मध्ये झाले होते. बाकी तुमचे कळफलक बडवणे चालू द्या. विचार वगैरे काय नंतर सुद्धा करता येईल

Submitted by sunil kachure on Tue, 06/07/2022 - 14:42

In reply to काश्मीर मध्ये अतिरेकी नाहीत by सुबोध खरे

Permalink

खरे तुम्ही खरेच फौजेत होता का?

१९६९, cisf ची स्थापना आणि १९८२ अर्माड फोर्स चा दर्जा. मग १३ वर्ष कोणत्या कायद्याने सर्व सुविधा मिळत होत्या.(लॉ ऑफ पार्लमेंट ,काय असतो तो) भारतात हे घडू शकतं तर पाकिस्तान मध्ये काही ही घडू शकतं. निवृत्ती वेतन हा फालतू मुद्धा आहे.

Submitted by सुबोध खरे on Tue, 06/07/2022 - 14:48

In reply to खरे तुम्ही खरेच फौजेत होता का? by sunil kachure

Permalink

डावा आणि उजवा मेंदू यात काही

डावा आणि उजवा मेंदू यात काही संबंध नाही हे परत सिद्ध करताय

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com