आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
काल (१५ मे २०२२ रोजी) त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते माणिक साहा यांनी शपथ घेतली.
मार्च २०१८ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव केला आणि बिप्लब देब यांना मुख्यमंत्री केले गेले. सुरवातीचा महिना-दीड महिना मुख्यमंत्री झाल्याचं वारं या गृहस्थांच्या अंगात इतकं शिरलं होतं की ते विनाकारण बाष्कळ आणि अनावश्यक बडबड करत सुटले. महाभारत काळात इंटरनेट होतं ही त्या मानाने बरीच निरूपद्रवी बडबड होती. सगळ्यात आक्षेपार्ह बडबड होती १९९७ मधील विश्वसुंदरी डायना हेडन विषयी. बिप्लब देब यांनी म्हटले होते- डायना हेडनचे सौंदर्य ऐश्वर्या रायप्रमाणे 'भारतीय सौंदर्य' नाही. त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले.
एकंदरीत भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. त्या अंतर्गतच गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या त्यामानाने अपरिचित चेहर्याला मुख्यमंत्री केले. विजय रूपाणींकडून राजीनामा घेतल्यावर नवा नेता निवडायला झालेल्या आमदारांच्या बैठकीत हे भूपेंद्र पटेल शेवटच्या रांगेत बसायला चालले होते तेव्हा त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले गेले असे बातम्यांमध्ये आले होते. कर्नाटक आणि उत्तराखंडमध्येही पक्षाने नवे मुख्यमंत्री नेमले.
आता १० महिन्यांनी होणार्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होते ते बघायचे.
वाचने
30699
प्रतिक्रिया
265
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन प्रकार
In reply to 5 दिवसात दुसरी घटना; धर्म परिवर्तनासाठी दबाव, तरुणीचे आक्षेपार्ह by मुक्त विहारि
मोदींवर टिका केली म्हणून
पुढचा मुख्यमंत्री
नवीन बातमी
रस्त्यावर पडलेली प्रत्येक
In reply to नवीन बातमी by जेम्स वांड
आपण काहीही केले तरी ते जनता
In reply to रस्त्यावर पडलेली प्रत्येक by श्रीगुरुजी
चंसुकू ह्यांच्या
In reply to रस्त्यावर पडलेली प्रत्येक by श्रीगुरुजी
बदल
२०२१-२२ या आर्थिक वर्षात
सरकारने गंभीर झाले पाहिजे
कचरे बुवा
In reply to सरकारने गंभीर झाले पाहिजे by sunil kachure
काँग्रेसच्या नेत्यांना यंग
समन्स टाळण्याची तयारी पण सुरू
In reply to काँग्रेसच्या नेत्यांना यंग by विजुभाऊ
समन्स टाळण्याची तयारी पण सुरू
In reply to काँग्रेसच्या नेत्यांना यंग by विजुभाऊ
सरकारी यंत्रणा