हळव्या झाल्या काळजातल्या ओल्या खुणा
हृदयातला रेशमी घाव दाखवू कुणा
फुले शोधता लागला जिव्हारी काटा
डोळ्यातल्या दर्यात उसळती अश्रूंच्या लाटा
नभाच्या वेशीवर उदास रंग उतरे
उरी लागलेला बाण घेऊन रावा फिरे
हरवून दूर गेली ओळखीची वाट
मोरपीशी स्वप्नांचा कोसळू लागे तट
मावळतीच्या वणव्यात सूर्यबिंब जळून गेले
प्राणाच्या शेजेवर निखारे उधळून गेले
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3586
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त.
धन्यवाद
In reply to मस्त. by सुरसंगम
सुंदर काव्य!
छान
मस्त
सर्वांचे मनापासून आभार
हळव्या झाल्या काळजातल्या
एकंदरित कविता वगैरे सुचणे, लिहीणे हे काहीतरी भारी काम असते..
तुम्ही म्हणताय ते खरंय.. पण
In reply to एकंदरित कविता वगैरे सुचणे, लिहीणे हे काहीतरी भारी काम असते.. by चित्रगुप्त
छान
सर्वांचे मनापासून आभार