Skip to main content

ओल्या खुणा

लेखक चांदणशेला यांनी सोमवार, 09/05/2022 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
हळव्या झाल्या काळजातल्या ओल्या खुणा हृदयातला रेशमी घाव दाखवू कुणा फुले शोधता लागला जिव्हारी काटा डोळ्यातल्या दर्यात उसळती अश्रूंच्या लाटा नभाच्या वेशीवर उदास रंग उतरे उरी लागलेला बाण घेऊन रावा फिरे हरवून दूर गेली ओळखीची वाट मोरपीशी स्वप्नांचा कोसळू लागे तट मावळतीच्या वणव्यात सूर्यबिंब जळून गेले प्राणाच्या शेजेवर निखारे उधळून गेले
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3586
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

आवडली कविता.
मावळतीच्या वणव्यात सूर्यबिंब जळून गेले प्राणाच्या शेजेवर निखारे उधळून गेले
खास. -दिलीप बिरुटे

छान आहे कविता आवडली पैजारबुवा,

काळजातल्या ओल्या खुणा हळव्या होणे - रेशमी घाव - फुले - जिव्हारी काटा- अश्रूंच्या लाटा - नभाची वेस - उदास रंग - उरी लागलेला बाण घेऊन फिरणारा रावा - हरवून दूर जाणे - मोरपीशी स्वप्ने - मावळतीच्या वणव्यात सूर्यबिंब जळून जाणे - प्राणाच्या शेजेवर निखारे उधळून जाणे --- या सगळ्या शब्दांच्या पसार्‍यातून कवीला नेमके झाले तरी काय आहे, हे आमच्यासारख्या अगदी गद्य, दळभद्री, गधड्या माणसाला कळणे कधीच शक्य नाही बुवा. तरी एकंदरित कविता वगैरे सुचणे, लिहीणे हे काहीतरी भारी काम असते, ते करू शकणारे लोक प्रतिभावंत वगैरे असतात, असे आम्हास वाटते, सबब आमुचा रामराम घ्यावा.

In reply to by चित्रगुप्त

तुम्ही म्हणताय ते खरंय.. पण अगदी असेच असते असे मात्र नाही. अनेक जण खूप साधे शब्द वापरूनही रचना करत असतात. अर्थात् शब्द सोपे असोत वा जड.. जर मुळात गाभा पोहोचत नसेल तर रचना वाया जाते हे मान्य. :-)

मस्त