Skip to main content

अहमदनगर कट्टा!

लेखक टर्मीनेटर यांनी मंगळवार, 12/04/2022 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, दिनांक १५ आणि १६ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर येथे मुक्काम होणार आहे. दिवस भटकंतीत पार पडेल पण अहमदनगर परिसरात कोणी मिपाकर रहात असतील तर एक सायंकट्टा करता येऊ शकेल ह्यासाठी हा धागा प्रपंच. लागून चार दिवस सुट्टी आली असल्याने अनेकांचे काही कार्यक्रम अगोदरच ठरले असतील ह्याची कल्पना आहे, तरी कुणाला अशा अचानक होऊ शकणाऱ्या कट्ट्याला उपस्थित राहणे शक्य होणार असेल तर जरूर कळवा, वेळ आणि ठिकाण सर्वांच्या सोयीनुसार ठरवता येईल. धन्यवाद.

वाचने 36825
प्रतिक्रिया 176

प्रतिक्रिया

गेल्या नोव्हेंबर मधे नाशिक येथे यशस्वी मिपा कट्टा झाला. त्यानंतर बहुधा हाच मिपा कट्टा आयोजित होत आहे. यशस्वीतेसाठी शुभेच्छा. एकेकाळी ठाणे व पुणे येथे बहुतांश मिपा कट्टे व्हायचे. आता इतरही शहरांत होत आहे याचा आनंद वाटतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

धन्यवाद श्रीरंग जोशी! गेल्या २ वर्षांत कुटुंबियांना सालाबादाप्रमाणे कुलदेवीच्या (योगेश्वरी, अंबाजोगाई) दर्शनाला जाणे जमले नाही त्यामुळे ह्यावेळच्या दौऱ्यात औरंगाबाद आणि सोलापूर अशी नेहमीची ठिकाणे टाळून अहमदनगर आणि परिसरात भटकंती करण्याचे ठरवले आहे त्यामुळे अहमदनगर येथे २ रात्री मुक्काम होणार आहे. त्या जोडीला अहमदनगरात एखादा मिपा कट्टा झाला तर दुधात साखर!

एकेकाळी मिपा संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले आणि आता लोप पावलेले सार्वजनिक कट्टे पुन्हा होताना दिसत आहेत. कट्ट्याला शुभेच्छा .

कट्ट्यास शुभेच्छा. भ्रमंती कुठे कुठे असणार आहे? निघोजची रांजणकुंडे, टाकळी ढोकेश्वर लेणी, वडगाव दऱ्याचे लवणस्तंभ तिथून तसे जवळच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

म्युझियममध्ये सिल्व्हरघोस्ट रोल्स रॉयस आर्मर्ड कार ही १९२१ मध्ये बनलेली, भारतीय पॅटर्न असलेली, जगात एकमेव कार कम रणगाडा अशी गाडी फक्त नगर मध्येच आहे. जगात यातल्या फक्त सहा शिल्लक आहेत पैकी एक नगरला आहे. आशा आहे की ही पहिली असेल. बहुदा हीचा वापर दुसर्‍या महायुद्धात झाला असावा. पण खात्रीशीर माहिती मिळाली नाही. शिवाय येथे दोन जपानी रणगाडे पण आहेत हे दुसर्‍या महायुद्धात बर्मा ते इम्फाळ या दरम्यान पकडलेले गेलेले आहेत / असावेत.

In reply to by निनाद

हे रणगाडा संग्रहलय खूपच छान आहे, त्यात ठेवलेल्या विविध प्रकारच्या रणगाड्यांवर एक चित्रलेख लिहावा म्हणतोय! तुम्ही म्हणताय ती 'सिल्व्हरघोस्ट रोल्स रॉयस आर्मर्ड कार' पाहिली. तिचे काही फोटो खाली देत आहे. इथे प्रत्येक रणगाड्याची माहिती देणारे फलक हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत लावले आहेत पण सदर फोटोत आलेला बोर्ड हिंदी भाषेतला आहे त्यामुळे काही मिपाकरांच्या भावना दुखावल्या गेल्यास आधीच दिलगिरी व्यक्त करून ठेवतो 😀 1 2 3

In reply to by प्रचेतस

भ्रमंती कुठे कुठे असणार आहे?
सध्या तरी मांजरसुंभा जवळील शिव गोरक्ष मंदिर हे एकमेव ठिकाण नक्की केले आहे. शुक्रवारी परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई करून अहमदनगरला पोहोचायला संध्याकाळ होइल. शनिवारचा पूर्ण दिवस आणि रविवारी दुपार पर्यंत जे काही पहाता येईल तितके पाहून परतीचा प्रवास सुरु करणार! प्रतिसादांतून तुम्ही आणि अन्य मिपाकरांनी अनेक चांगली ठिकाणे सुचवली आहेत, त्यातले कानिफनाथांची मढी आणि रणगाडा संग्रहालय पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे, अर्थात बाकीचीही ठिकाणे नक्कीच चांगली वाटत आहेत, उपलब्ध वेळात त्यातली जितकी पाहता येतील तितकी पाहण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद.

In reply to by टर्मीनेटर

निघोजची रांजणकुंडे मात्र नक्कीच बघा, हे ठिकाण नगरपासून थोडं लांब असलं तरी अद्भूत आहे. नुसते जालावरील फोटो पाहून त्यांची कल्पना कधीच येणार नाही. प्रत्यक्ष बघूनच हे अनुभवावे असेच आहे. पुण्यास परत येताना टाकळी हाजीस जाऊन हे बघता येईल.

In reply to by प्रचेतस

टाकळी ढोकेश्वर लेणी आणि वडगाव दऱ्याचे लवणस्तंभ दोन्ही मस्त आहेत. आवडले! धन्यवाद प्रचेतस आणि भक्ती. तुम्हा दोघांचे लेख वाचत बघितल्यामुळे जास्त मजा आली. ढोकेश्वर मंदिर / लेणी 1 2 वडगाव दऱ्याचे लवणस्तंभ. 3 4 दर्याई आणि वेल्हाई देवी मंदिराबाहेरील वनारसेना. 5

In reply to by टर्मीनेटर

कूल कूल :) आम्ही गेलो होतो,तेव्हा माझा नवरापण लवकर बाहेर येत नव्हता.बळेच बाहेर आणलं.नंतर मी वानरसेनेबरोबर फोटो काढत होते,तर नवरा गायब ..परत आत गुहेत गेला होता ;)

In reply to by टर्मीनेटर

>>> प्रचेतस आणि भक्ती. तुम्हा दोघांचे लेख वाचत बघितल्यामुळे जास्त मजा आली. सहमत..! प्रचेतस यांनी भटकंतीचे दालन समृद्ध केले आता त्या पाठोपाठ भक्ती यांचेही लेखन माहितीपूर्ण असते. दोघांचेही मन:पूर्वक आभार. असेच लिहिते राहा. धन्स्. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

आमच्या गावी कट्टा होत आहे. मन भरून आले ;-) कट्ट्याला शुभेच्छा! सचित्र वृत्तांत अवश्य टाका.

शुभेच्छा !

छान! एक भटकंती सूचवते कल्याण रोड १.जामगाव महादजी शिंदे भुईकोट किल्ला(नगरपासून३० किमी) २.टाकळी ढोकेश्वर लेणी(जामगाव पासून साधारण १० किमी) ३.लवणस्तंभ(लेणीपासून सा.२० किमी) ४.पळशी वाडा(टाकळी पासून १६-१७ कि) मी हा पाहिला नाही , पण इथलं विठ्ठल मंदिर,वाडा सुंदर आहे असं वाचलंय . सकाळी लवकर प्रवास सुरू केल्यास तर ही सगळी ठिकाणे पाहता येईल , नाही तर एखादं स्कीप होईल. नगराचा लस्सीचा कट्टा माझ्याकडून :)

In reply to by Bhakti

नगराचा लस्सीचा कट्टा माझ्याकडून :)
तुम्ही अहमदनगरला राहता का? तसे असेल तर लस्सी कट्टा होऊनच जाऊदे! लेणी बघण्यात फक्त मला आणि भाऊजींना रस आहे, बाकीची मंडळी तयार झाली तर टाकळी ढोकेश्वर लेणी बघता येतील प्रचेतस आणि तुम्ही सुचवलेले 'लवणस्तंभ' बघण्याची इच्छा नक्कीच आहे, बघू काय काय पाहता येते ते! धन्यवाद.

मिपा कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा. अ. नगर जवळच्या नातेवाईकांचे गाव असून देखिल अ. नगर परिसर पाहिला नाही. तुमच्या सोबत येणे (कट्ट्यासह ) आवडले असते, पण आधीच ठरलेल्या कार्यक्रमानुसार येणे जमणार नाही ! भटकंती आणि कट्टा वृतांत जोरकस येईल या प्रतिक्षेत आहेच !

एकतर पुण्यात कट्टा नाही. आणि १५-१६ एप्रिलला आमची हनुमान जयंती यात्रा असल्याने मुक्काम गावी असणार. अजून एक कट्टा मिस करावा लागेल :(

शनी शिंगणापूर, देवगड, कानिफनाथांची मढी, मायंबा गड, मोहटादेवी, नगर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावरील बुर्हानगर येथिल भवानी माता, रणगाडा संग्रहालय,चांदबिबी चा महाल,मेहेरबाबा , पुणे ते नगर प्रवास करत असाल तर निघोज येथिल रांजणखळगे आणी मळगंगा माता, राळेगण सिध्दी, हिवरेबाजार, चास कामरगाव येथिल वाडा, वाटेत सुपा येथे फुलांचे हार खरेदी करावीत, सरदवाडी येथे भेळ खायचा बेत करावा, खर्डा,नगर येथील भुईकोट किल्ले पहावेत.. वेळ भेटला तर नगरमधिल सोपान वडापाव चा बेत करावा.

In reply to by चिक्कु

परतीचा प्रवास नगर पुणे मार्गावरून करणार आहे त्यावेळी तुम्ही सुचवलेल्यातली काही ठिकाणे पाहण्याचा प्रयत्न करणार! धन्यवाद.

In reply to by चिक्कु

अंबिका नगर म्हणायचे आहे का? आम्ही या नगरीला नगर किंवा अंबिका नगर असेच म्हणतो!

In reply to by चिक्कु

@ चिक्कू:- तुम्ही सुचवलेल्या ठिकाणापैकी कानिफनाथांची मढी आणि रणगाडा संग्रहालय बघितले. मंदिर फारच आवडले. 1 2 3 4 5 सर्व ठिकाणे नाही पाहता आली, अर्थात अवघा दीड दिवस नगर शहर आणि परिसर बघण्यासाठी खूपच अपुरा वेळ आहे हे लक्षात आले आहे. धन्यवाद.

In reply to by कंजूस

आणखी एक ट्रिप करा आणि सर्व ठिकाणं पाहा.
हो, तसेच करावे लागणार आहे, नगर परिसरातील भटकंतीसाठी दीड दिवस खूपच कमी पडला!
कट्ट्याला विशाल जनसागर उसळो.
कट्ट्याला 'विशाल' (आलो आलो) + जनसागराच्या रूपात आम्ही अन्य चार जण उपस्थित होतो, त्यामुळे तुमचे शब्द खरे ठरले आहेत 😀

कपिलमुनी, निनाद, जुइ, कुमार१, चौ. को, तुषार काळभोर, कंकाका प्रतिसाद आणि शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार!

माझ्या भाच्यांबरोबर काढतो तेव्हा हे काहीतरी भाऊसाहेबांची बखर मधील प्रकरण असावे असा त्यांचा चेहेरा असतो. माझा नगरमधील शेवटचा मोठा मुक्काम ८७ सालचा. एक पडदा सिनेमाला घरघर लागण्याचे दिवस खूपच लांब होते. सरोष टॉकीजच्या आजूबाजूला बाग सदृश्य मोकळी जागा असे. संध्याकाळी तिथल्या कॅंटीनमध्ये चहा पित चकाट्या पिटणे हा आवडता उद्योग होता. गुलमोहोर रोडवर सायंतारा नावाची टपरी होती. तेथील साबुदाणा वडा फार फेमस होता. सिदधी बागेच्या समोर मोकळ्या जागेत नगरची सुप्रसिध्ध रॉयल कुल्फी मिळायची. कुठेही असह्य अशी गर्दी नसायची, मोकळी कोरडी हवा, उन्हाळ्यात देखील मध्य रात्रीनंतर थंड वाटावे असे वातावरण आणि आटोपशीर, टुमदार असा शहराचा आकार. आपण लहान शहरात राहतो याची काही खंत नव्हती. नगरच्या काही खास गोष्टी इतर ठिकाणी सहसा मिळत नाहीत. त्या म्हणजे कणकेची बिस्किटं आणि रोट बनवून देणारी बेकरी, या बेकरींमधून मिळणारं आमण बिस्कीट नावाचा प्रकार, गुलाब रेवडी आणि मढी येथे मिळणाऱ्या मोठ्या आकाराच्या रेवड्या, नगरची पतंगबाजी, आणि बन्सीलालची चुरमा बर्फी.

In reply to by सर टोबी

नगर शहरातल्या 'न्यू टिळक' रस्त्यावरील 'नंदनवन' हॉटेल मध्ये बघितलेले एक दृष्य माझ्या कायम आठवणीत राहील 😀 १४ एप्रिलला दुपारी सव्वा दोन-अडीचच्या दरम्यान आम्ही तिथे जेवण्यासाठी गेलो होतो. मुख्य उपहारगृह, बार, फॅमिली रूम अशा खानपानाच्या (स्वतंत्र इमारतीत) व्यवस्था असणाऱ्या ह्या मोठ्या हॉटेलमध्ये पार्किंग शेजारच्या मोकळ्या जागेत भव्य मांडव घालून त्यात तीस एक टेबल्स लावून (विस्तारित) बार तयार केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यादिवशी 'ड्राय डे' होता, पण इथले दृष्य मात्र भलतेच विलक्षण होते. टळटळीत दुपार असूनही ग्राहकांनी तुडुंब भरलेल्या त्या 'विशेष' कक्षातले एकही टेबल रिकामे नव्हते. ड्राय डे च्या दिवशीही ग्राहक मंडळी जणू काही ३१ डिसेंबर असावा इतक्या सहजपणे मद्यपान करत होती हे बघून नगरकरांचा हेवा वाटला! चार वर्षांपूर्वी २६ जानेवारीच्या दिवशी केरळ मध्ये असेच दृष्य पाहिले होते आणि केरळमध्ये २६ जानेवारी ह्या भारतीय प्रजासत्ताकदिनी देखील ड्राय डे नसतो हे समजले तेव्हा जसे आश्चर्य वाटले होते तसेच आश्चर्य इथले दृष्य पाहूनही वाटले, फक्त परिस्थिती उलट होती 😀

In reply to by टर्मीनेटर

नाही म्हणजे नंदनवन म्हटले कि आमच्याकडे भुवया वर होतात ड्राय डे च्या दिवशी ईतर वेळी कोणी जास्त जात नाही तिकडे २०० मीटर नियमावली वेळेस जबऱ्या गर्दी अनुभवलीये

In reply to by आलो आलो

सहज निवडले हॉटेल कि .....
परळीला जात असताना जेवणासाठी चांगले हॉटेल शोधत होतो, सहज दिसले, चांगले वाटले आणि
  • वातानुकूलीत स्वतंत्र फॅमिली रूम्स
  • व्हेज नॉन-व्हेज साठी दोन स्वतंत्र किचन्स
अशी वैशिष्ट्ये वाचून इथे जायचे ठरवले. पण बाकी काही असो इथले जेवण मात्र खूप छान होते. 'पनीर तुफानी', काळा मसाला घालून बनवलेली 'शेव भाजी', 'दाल तडका', 'जिरा राईस', 'मसाला ताक' असे सर्वच पदार्थ रुचकर होते.

पूर्वी असे कट्टे पुणे वठाणे येथे होत मग आताच काय झालय? ,आम्हा नविन एकही कट्टा न बघीतलेल्याना अनुभवता येईल व सोयीचे होईल . तरी पुणे ठाणे येथे एक कट्टा कराच आम्हा नविन मेंबरांना अनुभवता येइल.

In reply to by nutanm

इथे एकमेकांशी कचाकचा भांडणारे लोक कट्ट्याला मात्र एकमेकांच्या बशीतला चहा पितात असे ऐकुन आहे खखोदेजा पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हा हा ! सही पकडे है!

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

तसेच आहे .... वैचारिक मतभेद, वैयक्तिक मनभेदात रुपांतरीत होत नाहीत... एका बशीत चहा पिणारे, नंतर देखील इथे, वैचारिक मतभेद व्यक्त करत असतातच....

अहमदनगर चे नामांतर केल्यास अंबिकानगर चांगले वाटेल की शहाजी नगर? मला शहाजीनगर ठेवलेलं आवडेल.

In reply to by चिक्कु

थोडीशी अक्षरांची फेर्जुळवणी करून 'द अहम नगर' करता येईल. फोटोसकट कट्ट्याच्या वृत्तांताची प्रतिक्षा आहे. शुभेच्छा.

कुठं हायसा पाव्हणं ?

In reply to by आलो आलो

@ आलो आलो काल रातच्याला नगरात पोचल्यांव, आता टाकळी ढोकेश्वर लेणी आणि लवणस्तंभ बघायला चाललोय... सांजच्याला भेटूयात....

मस्त झाला कट्टा! आलो आलो (विशाल), भक्ती आणि त्यांची मुलगी गिरीजा, मी आणि माझी बायको असे पाच जण उपस्थित होतो. कट्ट्याचा वृत्तांत भक्ती किंवा आलो आलो ह्यांनी लिहावा, बाकीचे त्यात भर टाकतीलच! 1 डावीकडून मी, विशाल, अदिती, गिरीजा आणि भक्ती. 2 2 नगरचे ग्रामदैवत.

In reply to by टर्मीनेटर

+१ विशाल गणपतीची आरती ऐकणे एक सुंदर अनुभव असतो,ज्याचा लाभ काल पुन्हा मिळाला.

In reply to by Bhakti

विशाल गणपतीची आरती ऐकणे एक सुंदर अनुभव असतो
+१००० त्याबाबतीत तुम्ही नगरकर खूपच भाग्यवान आहात. आम्ही हा सुंदर अनुभव पहिल्यांदाच घेतला. आपल्याकडे वेळ कमी होता नाहीतर नगारा आणि अन्य मंगलवाद्यांच्या साथीने सुमारे तासभर होणारी ही आरती पूर्ण ऐकायला नक्कीच आवडले असते!

|| कै. तात्या म्हाराज कि जै || मिपा संस्थापक तात्यासायाब ह्यांनी मिपा संस्कृतीमध्ये कट्ट्याची सुरुवात करून दिली त्या संस्कृतीला अनुसरून आज आपले सर्वांचे लाडके (प्रसिद्द्य लेखक) टर्मिनेटर भौ ह्यांच्या फुडाकाराने आमच्या अहमदनगरात मिपा कट्टा साजरा झाला. या कट्ट्याला याची देही उपस्थिती लावता आली यातच आम्ही धान्य जाहलो. मागच्या आठवड्यात टर्मिनेटर सायबांनी अहमदनगर कट्ट्याचा धागा काढला आणि आपुन नी लगेच कट्ट्याला जायचा निर्धार केला व तसा तो त्यांना लगेच कळवला. मिपा वरील आमच्या नगरच्या (एकमेव ऍक्टिव्ह) असलेल्या भक्ती तैनीं सुद्धा लगेच उत्साह दाखविला त्याबद्दल अखिल नगर मिपा संघटनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. या ऐतिहासिक कट्ट्याला टर्मिनेटर भौ त्यांच्या सुविद्य पत्नी सह तसेच भक्ती तै आपल्या छकुली (गिरीजा सह ) व अस्मादिक (एकलेच) असा भव्य जनसागर लोटला होता. फूडच्या कट्ट्यासाठी आजपासूनच तैय्यारी सुरू ..... अर्रर्ये - बोल बजरंग बली कि जय | असो .... टर्मिनेटर भाऊ यांनी आपल्या घाईच्या शेड्युलमध्ये कट्ट्यासाठी आवर्जून वेळ राखला व ठरल्याप्रमाणे कट्टा साजरा केला व भक्ती ताईंनी सुद्धा त्यांच्या कामातून वेळ काढून कट्ट्यासाठी उपस्थिती लावली हे पाहून अस्सल मिपाकर असल्याचा आज खरेच आनंद झाला. सर्व मिपाकर बंधू भगिनींचे आभार सर्व लेखकांचे आभार आमच्यासारख्या बाकीच्या सर्व वाचकांचे आभार हम सबको यह मौका देनेके लिये मिपा के सभी संपादकोंका आभार . या कट्ट्याचा साद्यन्त - सचित्र असा वृत्तांत प्रसिद्ध लेखक टर्मिनेटर भाऊ अथवा प्रसिद्ध लेखिका भक्ती ताई आपल्या ओघवत्या लेखणीतून आपल्यासमोर लवकरच देतीलच तोपर्यंत आजच्या कार्यक्रमाची पोच म्हणून हे माझे दोन शब्द आहेत. कळावे लोभ असावा

In reply to by आलो आलो

छान लिहिलंय. श्री व सौ टर्मीनेटर यांनी आत्मियतेने कट्टयाला उपस्थिती दाखवली,छान वाटलं.आलो आलो यांना बराच वेळ वाट पाहावी वाटली, क्षमस्व.माझी व्यर्थ लुडबुड (मुलगी) बरोबर असल्यामुळे जरा फास्टच झाला कट्टा! नगरात काय पाहायला आहे? यावर अनेक पर्याय मिळाले. सगळे लिहीत राहा! :)

In reply to by आलो आलो

भारी पोचवृतांत, "आलो आलो" ! नावाला जागून कट्ट्याला आलात (म्हंजे उपस्थित राहिलात), लै भारी झकास !!!

ही जबराट लेखनशैली बघून आपण नेहमी का लिहित नाही हा प्रश्न पडला !

In reply to by चौथा कोनाडा

चौ को भौ आमच्या नगरात नेहमीच पाऊस कमी.... कला सांस्कृतिकदेखील.... त्यामुळे मिपा वरील साहित्य वर्षा हीच आमची वाचनाची तृष्णा भागविण्याचे हक्काचे व्यासपीठ ....आणि चक्क वळिवाप्रमाणे टर्मिनेटर भौनीं कट्ट्याचे नियोजन केले म्हटल्यावर आमची हजेरी क्रमप्राप्तच. एके दिवशी मराठी याहू M1 येथील एका मित्राने (कळव्याचा खोटा सिक्का ID होता का तो ?) मिपा बद्दल ओळख करून दिली. त्यानंतरची बरीच वर्षे (अंदाजे १० ?) मिपा वाचक म्हणून रेग्युलर वावरत आहे. कै. तात्या सोबत बऱ्याचदा फोनवर आणि फेबु वर संवादहि झालाय पण बाकी कोणाशीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क झालाच नाही ...किंबहुना माझ्याकडून तसा काही प्रयत्न केला गेला नाही (खंत ?) चला आता कालपासून श्रीगणेशा झालाच आहे तर यापुढे नक्कीच. माझ्या अबकड चे कौतुक करून प्रेरणा दिल्याबद्दल चौको आपले आभार व्यक्त करतो.

In reply to by आलो आलो

वर वर पाहता असे वाटू शकते. या शहराला स्वतःची प्रसिद्धी करणं जमलं नाही. पण हे शहर कलाकारांच्या बाबतीत अगदीच दुष्काळी होते आणि आहे असं ज्यांना वाटते त्यांच्या साठी हा प्रतिसाद. अमर भूपाळी मधील प्रसिद्ध गायक आणि नट पंडितराव नगरकर हे नगरचे. पटवर्धन चौकाजवळ असणाऱ्या लंके वाड्यात त्यांचे वास्तव्य होते. बालकवी ठोंबरे यांचेही वास्तव्य नगरला होते. प्रसिद्ध नाटककार मधुकर तोरडमल नगरला प्राध्यापक होते. सी. रामचंद्र नगर जवळील चितळीचे. कृष्णाची हातखंडा भूमिका करणारे शाहू मोडक नगरचे. प्रसिद्ध मूर्तिकार साखळकर आणि अंबादास मुदगंटी तसेच मोल्डेड प्लास्टिक पासून अप्रतिम शिल्प बनवणारे प्रमोद कांबळे, फलज्योतिषमध्ये दबदबा असणारे दत्तू रेखी. या खेरीज रेव्ह. टिळक यांची नगर ही कर्मभूमी. रामदास फुटाणे आणि जागतिक स्तरावर ग्रामीण आरोग्य सेवेचं आधारभूत कार्य केलेले डॉ. रमाकांत आरोळे हे नगरमधील जामखेड तालुक्यातील आहेत. सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे विठ्ठलराव विखे नगरचे. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख प्रशासनाची सुरुवात करणारे अनिलकुमार लखिना यांनी नगरचे जिल्हाधिकारी असताना त्यांची ओळख असणारे प्रारूप तयार केले. नगरचे सहकार सभागृह हे कला व्यासपीठासाठी लागणाऱ्या गुंतवणुकीच्या दृष्टीने एक आदर्श प्रारूप होते. नगरला सकाळ सारखे आपल्याच शहराची टिमकी वाजवनारे वर्तमानपत्र मिळाले असते तर या शहराचा खूप बोलबाला झाला असता.