Skip to main content

अहमदनगर कट्टा!

लेखक टर्मीनेटर यांनी मंगळवार, 12/04/2022 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, दिनांक १५ आणि १६ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर येथे मुक्काम होणार आहे. दिवस भटकंतीत पार पडेल पण अहमदनगर परिसरात कोणी मिपाकर रहात असतील तर एक सायंकट्टा करता येऊ शकेल ह्यासाठी हा धागा प्रपंच. लागून चार दिवस सुट्टी आली असल्याने अनेकांचे काही कार्यक्रम अगोदरच ठरले असतील ह्याची कल्पना आहे, तरी कुणाला अशा अचानक होऊ शकणाऱ्या कट्ट्याला उपस्थित राहणे शक्य होणार असेल तर जरूर कळवा, वेळ आणि ठिकाण सर्वांच्या सोयीनुसार ठरवता येईल. धन्यवाद.

वाचने 36825
प्रतिक्रिया 176

प्रतिक्रिया

नगरचे नवे दत्त मंदिर भारी आहे, त्याचा फोटो नाही दिसला. मी रात्रीच्या वेळी गेलेलो. लै भारी दिसते. आणि मोठेही आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नगरचे नवे दत्त मंदिर भारी आहे, त्याचा फोटो नाही दिसला.
1 ह्याच मंदिराबद्दल म्हणताय का? क्षीरसागर महाराजांचे (सावेडी) दत्त मंदिर म्हणुन प्रसिद्ध आहे. आम्ही गेलो होतो तिथे. पण गेटवरच बेल्ट काढून ठेवा, फोन स्विच ऑफ करा अशा सूचना तिथल्या सिक्युरिटी गार्डनी दिल्यावर मी बाहेरच थांबणे पसंत केले, असले नखरे असतील अशा ठिकाणी मी जात नाही, आखिर अपने भी कुछ उसूल हैं भाय 😀 घरची सगळी मंडळी आत जाऊन आली आणि मंदिर खूप छान असल्याचे त्यांनी सांगितले. (ह्याच मंदिरात घरच्यांनी खूप वेळ घालवल्याने कट्ट्याची आधी ठरलेली ६:३० ची वेळ बदलून ती ७:०० ची करावी लागली!)

In reply to by टर्मीनेटर

राहुरी ला शिकत असताना बर्‍याच वेळा ह्या मंदीरात गेलो आहे. तेव्हा हे अगदीच छोटे मंदिर होते (१९९३ - १९९७) . तेव्हाही तिथे बेल्ट काढून ठेवावा लागत असे. विद्यार्थीदशेत असल्याने तेव्हा फार काही वाटायचे नाही परंतु आताशा ह्या असल्या फाजिल नियमांचा राग येतो. देवाच्या दर्शनाला जातोय तर चामड्याच्या वस्तु बाहेर ठेवा / फोन बंद ठेवा असल्या बाश्कळ नियमांमुळे काय साध्य होते कुणा ठाउक. बर्‍याच ठिकाणी मंदीरात आत फोन न्यायला बंदी/ बॅकपॅक न्यायला बंदी. मंदीराचे फोटो काढु नका, देवाचे फोटो काढु नका. असले नियम असतात. त्याने काय साध्य होते काय माहीत. नेला कुणी फोन मधे काढले दोन चार फोटो तर काय बिघडणार आहे?

In reply to by सुक्या

परंतु आताशा ह्या असल्या फाजिल नियमांचा राग येतो.
अगदी... अगदी.... 👍 फोटो काढण्यास मनाई बाबतही सहमत!

In reply to by सुक्या

देवाच्या दर्शनाला जातोय तर चामड्याच्या वस्तु बाहेर ठेवा / फोन बंद ठेवा असल्या बाश्कळ नियमांमुळे काय साध्य होते कुणा ठाउक.
चामडे हे मृत प्राण्याचा भाग आहे. अनेकदा ते शिकार करुन देखील कमावलेले असू शकते. देवाच्या दरबारी अशी हिंसेपासून मिळविलेली वस्तू घेऊन जाण्यास बंदी असते. त्यामुळेच चपला / बूट देखील बाहेर काढावे लागतात.
आत फोन न्यायला बंदी/ बॅकपॅक न्यायला बंदी. मंदीराचे फोटो काढु नका, देवाचे फोटो काढु नका. असले नियम असतात. त्याने काय साध्य होते काय माहीत.
बरीच कारणे आहेत. गर्दीच्या वेळी फोटो काढणार्‍यांमुळे इतरांना व्यत्यय येतो. काही जण तर स्वतःचे फोटो व्यवस्थित यावेत म्हणून इतरांना बाजूला सरकायला सांगतात. भांडणे होतात. मोबाईल फोनवर बोलल्याने इतरांना त्या आवाजाचा त्रास होतो. शांतताभंग, साधनेत व्यत्यय, इत्यादी. काही ठिकाणी मंदिराची छायाचित्रे, सचित्र माहितीपुस्तके इत्यादी साहित्य विक्रीकरिता उपलब्ध असते. पर्यटकांनी स्वतःच फोटो काढले तर हे साहित्य विकले जात नाही. मी स्वतः नास्तिक असल्याने असल्या नियमांचे समर्थन करीत नाही फक्त त्या नियमांमागील कारणे इथे विषद केली आहेत. मला चप्पल / बूट काढून मंदिरात जाणे यात फारसे तथ्य वाटत नाही. कारण बुट (जर नाडीचे असतील) काढताना हात अस्वच्छ होतातच. तसेच बूट काढल्यानंतर त्यापुढच्या परिसरात धूळ, माती इतर अस्वच्छता असेल तर पाय देखील खराब होतात. त्यामुळे कोणासोबत मला जर मंदिरात जायची वेळ आलीच तर जिथवर चपला बूटांसहित जाता येते तिथवर मी जातो. मग पादत्राणे काढून इतर सोबती पुढे जातात मी त्यांची वाट पाहत तिथेच थांबतो. अर्थात नारायणी धाम (तुंगार्ली, लोणावळ्याजवळ) सारखे मंदीर असल्यास आत देखील जातो. इथे चप्पल / बुट काढल्यावर पुढे जाण्याचा परिसर अतिशय स्वच्छ असल्याने पायास घाण लागत नाही. तसेच बूट काढताना हात अस्वच्छ होत असल्याने तिथेच हात धुवायची उत्तम सोय देखील आहे. गेल्याच महिन्यात पत्नीच्या आग्रहाखातर बत्तीस वर्षांनी आमच्या मूळ गावी (देडगाव बालाजी - तालुका नेवासा - जिल्हा अहमदनगर) अजिबात गर्दी नसताना गेलो होतो तर अगदी मंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच बूट काढले आणि सोबत मंदिर व्यवस्थापकाने पाणी ठेवले असल्याने हात धुवून मगच मंदिर प्रवेश केला. बेल्ट उतरवा, फोटो काढू नका असले काहीही बंधन नव्हते. तसेही शुद्ध चामड्याचा कमरपट्टा मी वापरत नाहीच. फोन देखील चालूच ठेवला होता. इन फॅक्ट मंदिरास देणगी देखील फोन पे चा वापर करुनच दिली.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

तसेही शुद्ध चामड्याचा कमरपट्टा मी वापरत नाहीच.
हल्लीच्या सिंथेटीक लेदर / रेगझीनच्या काळात किती जण शुद्ध चामड्याचे पट्टे वापरत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल, त्यामुळेच असल्या नियमांचा राग येतो. शुद्ध चमड्याचा पट्टा असल्यास तो काढून ठेवण्यास भाविकांनाही हरकत नसावी.

In reply to by टर्मीनेटर

मृगजीन चालायचे म्हणे पूर्वी. :) बऱ्याच श्रीमंत घरात, आश्रम मठात मंदिरात असायची मृगाजिने. आता फॉरेस्ट वाले जप्त करतात, तुरुंगात घालतात.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

शेगावला आनंद सागर परिसरात मेडीटेशन साठी छानसं ठिकाण आहे. स्मार्ट फोनचा सुळसुळाट नव्हता त्या दिवसात तेथे गेलो होतो. परिसरात खूप ठिकाणी मेडीटेशन हॉल मध्ये कसे वागावे याच्या सूचना होत्या. तरीही फोनचा सततचा व्यत्यय, लहान मुलांना घेऊन हॉल मध्ये जाणे, चुळबुळ करणे असे प्रकार चालले होते. चामड्याच्या वस्तूंची मला आवड आहे पण एकदा चेन्नईला गेलो असताना एकाने काफ लेदरची बॅग दाखवली. त्यामुळे चामडी वस्तू वापरण्याचा सोस एकदम बंद झाला. विगन लाईफ स्टाईल खूप महाग आहे पण जेव्हा परवडेल तेव्हा अंगीकार करेन. तुळजापूर देवस्थान स्वच्छतेबाबत काही नावाजलेले नाही पण तेथे पाय धुण्यासाठी वाहते पाणी असते, जी छान कल्पना आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

शेगावला आनंद सागर परिसरात मेडीटेशन साठी छानसं ठिकाण आहे. स्मार्ट फोनचा सुळसुळाट नव्हता त्या दिवसात तेथे गेलो होतो. परिसरात खूप ठिकाणी मेडीटेशन हॉल मध्ये कसे वागावे याच्या सूचना होत्या. तरीही फोनचा सततचा व्यत्यय, लहान मुलांना घेऊन हॉल मध्ये जाणे, चुळबुळ करणे असे प्रकार चालले होते. चामड्याच्या वस्तूंची मला आवड आहे पण एकदा चेन्नईला गेलो असताना एकाने काफ लेदरची बॅग दाखवली. त्यामुळे चामडी वस्तू वापरण्याचा सोस एकदम बंद झाला. विगन लाईफ स्टाईल खूप महाग आहे पण जेव्हा परवडेल तेव्हा अंगीकार करेन. तुळजापूर देवस्थान स्वच्छतेबाबत काही नावाजलेले नाही पण तेथे पाय धुण्यासाठी वाहते पाणी असते, जी छान कल्पना आहे.

In reply to by कंजूस

राणकपुरला हेच नियम आहेत.
मी २०१६ मध्ये राणकपूर मंदिरात जाऊन आलोय पण तेव्हा तिथे कोणी पट्टा काढून ठेवायला आणि मोबाईल स्विच ऑफ करायला सांगितले नव्हते! सोमनाथ मंदिरात मात्र फारच कडक नियम आहेत. तिथे काहीच आत नेऊन देत नाहीत (इथे काढून ठेवलेला माझा चांगल्यातला पट्टा चोरीला गेला होता 😀) पट्टा, मोबाईल, बॅग, पर्स इतकंच नव्हे तर हेडफोन पण बाहेर ठेऊन आत जावे लागते.

In reply to by टर्मीनेटर

पट्टा काढून ठेवलेला चोरीला गेला!!! अरेरे... मी बूट काढून ठेवलेले नांदेडच्या गुरुद्वारात. मला परत मिळाले तेव्हा नव्यासारखे!! एक सेकंद तर मी परतच देत होतो की हे माझे नाहीत म्हणून!! .... (अतिशयोक्ती नाही. सेवा म्हणून कुणा भाविकाने पॉलिश केले होते. )

In reply to by असंका

सेवा म्हणून कुणा भाविकाने पॉलिश केले होते.
हो. गुरुद्वारात सेवा म्हणुन बर्‍याच गोष्टी शिख लोक करतात. लंगर मधे सेवा, झाड पुस, ईतर स्वच्छता वगेरे वगेरे ... त्यात आलेल्या भाविकांचे पादत्राणे स्वच्छ करुन देतात. त्यात त्यांना काहीही कमीपणा वाटत नाही. एरवी टेबलावरची चपाती ताटात न घेणारी ही मंडळी गुरुद्वारात मात्र सगळी कामे करतात. कॉलेजात असताना ग्वाल्हेर च्या किल्यात असलेल्या गुरुद्वारात जायचा योग आला होता. वेळ सकाळची असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती. तेव्हा एक मर्सिडीझ मधुन आलेल्याला ईतर भविकंच्या म्हणजे आमच्या चपला पुसताना पहिले होते. तिथेही आमच्या डोक्यावरचे ठेवलेले रुमाल थोडे सरकले होते तर तिथल्या सेवादाराने "सर मे कील ठोकु क्या?" अशी धमकी दिली तेव्हाही ते आवडले नव्हते.

In reply to by सुक्या

या गुरुद्वार सेवेवरुन आठवले. सत्ताधारी पक्षातील एकाने (बहुधा बुटासिंह) केंद्रात मंत्री असताना गुरुद्वारात बुटपॉलिश सेवा केली होती. ही सेवा त्यांनी शिक्षा म्हणुन केलेली पुसटसी आठवते. आठवते आहे का कुणाला हे ?

In reply to by चौथा कोनाडा

हो. बुटासिंग यांना त्यांच्या ओपरेशन ब्लु स्टार मधील भुमिकेमुळे ५६ दिवस गुरुद्वारात सेवा करण्याचे आदेश (हुकुमनामा) दिले होते. सुरजित सिंग बर्नाला यांना पण बहुदा १६ दिवस अशीच शिक्षा मिळाली होती . .

In reply to by टर्मीनेटर

तर अहिंदू लोकांना प्रवेशही दिला जात नाही, मला वाटतं इतर ठिकाणांत उज्जैन महाकलेश्वर मंदिर आणि तिरुपती बालाजी इथं पण तोच नियम आहे.

In reply to by चौथा कोनाडा

तिरुपतीला आता आधार कार्ड दाखवणे अनिवार्य आहे. त्यावरून अंदाज बांधत असावेत, त्याआधी काय पद्धत होती कल्पना नाही.

In reply to by जेम्स वांड

उज्जैन महाकालेश्वर मंदिरात खूप वर्षांपूर्वी गेलो असल्याने त्याबद्दल ठाम माहिती नाही पण सोमनाथ आणि तिरुपती बालाजी इथे अहिंदूंना प्रवेश दिला जात नाही हे नक्की! अवांतर: इजिप्त सफरीत भेटलेला पोर्तुगालचा 'रुई' फेब्रुवारी २०१९ मध्ये २० दिवसांसाठी भारतात येऊन गेला. त्याने काशी विश्वेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन भारतभ्रमंतीला सुरुवात केली होती. ह्यावरून लक्षात येते की खुद्द काशीलाही असा काही नियम नाही. त्याच्या भारतभेटीत ३ दिवस आम्ही सोबत फिरत होतो, तेव्हा गेटवे ऑफ इंडिया, एलीफंटा केव्हज (घरापुरी लेणी), अलिबागचा जलदुर्ग आणि आसपासचा थोडा परिसर फिरलो आणि काही मंदिरांतही गेलो होतो, पण कुठेही त्याचे अहिंदू असणे आड आले नव्हते आणि ते योग्यही वाटले. अहिंदूंमध्ये हिंदू धर्माबद्दल प्रेम / गोडी / आकर्षण निर्माण व्हावे ह्यासाठी कर्मठपणा सोडून असले कालबाह्य नियम रद्दबातल करावेत आणि सर्वांना प्रवेश खुला करावा असे माझे वैयक्तिक मत.

In reply to by टर्मीनेटर

ह्यावरुन रिचर्ड फ्रान्सिस बर्टन ह्याने मुस्लिम वेषभूषा करुन मक्केत तर प्रवेश केलाच पण अगदी काबागृहाला पण भेट दिली याची आठवण आली. उघडकीस आले असते तर मृत्युदंड मिळाला असता. हा रिचर्ड बर्टन तोच ज्याने अरेबियन नाईट्स संकलित केले. वेताळ पंचविशीचे इंग्रजीत भाषांतर केले. बाळ सामंतांनी ह्या अवलियावर लिहिलेले शापित यक्ष हे चरित्र वाचण्यासारखेच असे आहे.

In reply to by प्रचेतस

बापरे... भलतेच धाडस केले होते की रिचर्ड बर्टनने!
उघडकीस आले असते तर मृत्युदंड मिळाला असता.
शिरच्छेद कन्फर्म होता 😀 शापित यक्ष वाचावे लागेल.

In reply to by प्रचेतस

ढण्यू प्रचेतस पुस्तकाच्या संदर्भासाठी. शापित यक्ष अतिशय रोचक दिसत आहे. आता वेळ काढून वाचणे आले.

In reply to by टर्मीनेटर

त्यामुळे खात्रीने सांगू शकते की अहिंदूंना प्रवेश नाही असे म्हणणे चुकीचे आहे. आधारकार्ड वगैरेही काही तपासत नाहीत.

In reply to by गोरगावलेकर

चार पाच वर्षांपूर्वी सोमनाथ मंदिराला दिलेल्या शेवटच्या भेटीत हिंदू सोडून अन्यधर्मियांना प्रवेश नाही अशा आशयची पाटी तिथे वाचल्याचे स्पष्ट आठवते. मंदिर प्रवेशाआधी तीन ठिकाणी होणाऱ्या सुरक्षा तपासण्याही कंटाळवाण्या होत्या. आता परिस्थिती बदलली असल्यास आनंदाची गोष्ट आहे 👍 (तसे असल्यास पुढच्या गिरनार भेटीत पुन्हा सोमनाथला जाण्याचा विचार करता येईल!)

प्रतिसाद कोणाला एकाला उद्देशून नाही पण घरात आपली बायका, मुले आपले ऐकत नाही, ऑफीसात बॉस ऐकत नाही तिथे आपण जुळवून घेतो मात्र मंदिरांमधे जायची वेळ आली आणि तिथले नियम जमत नसले तर आपल्याला लगेच राग येतो. नक्की काय कारण असावे ? देवाकडे जाताना नतमस्तक व्हावे, आपला मान अपमान बाजूला ठेवावा असे मानतात. कदाचित आपल्यात किती मान, अहंपणा उरलाय हे तपासण्यासाठी तर असे चित्र विचित्र नियम आखलेले नसतील ना ? असा विचार मनात येऊन गेला.

In reply to by धर्मराजमुटके

अजीब हम हैं सबब के बग़ैर चाहते हैं तुम्हें तुम्हारी तलब के बग़ैर चाहते हैं फ़क़ीर वो हैं जो अल्लाह तेरे बंदों को हर इम्तियाज़-ए-नसब के बग़ैर चाहते हैं मज़ा तो ये है उन्हें भी नवाज़ता है रब जो इस जहान को रब के बग़ैर चाहते हैं नहीं है खेल कोई उन से गुफ़्तुगू करना सुख़न वो जुम्बिश-ए-लब के बग़ैर चाहते हैं ठठुरती रात में चादर भी जिन के पास नहीं वो दिन निकालना शब के बग़ैर चाहते हैं जमी है गर्द सियासत की जिन के ज़ेहनों पर मुशाएरा भी अदब के बग़ैर चाहते हैं है ए'तिमाद उन्हें ख़ुद पर ग़ुरूर की हद तक अकेले जीना जो सब के बग़ैर चाहते हैं

In reply to by आलो आलो

अजीब हम हैं सबब के बग़ैर चाहते हैं तुम्हें तुम्हारी तलब के बग़ैर चाहते हैं

अहमदनगरला निझाम अली शाह याने त्याचा एक हत्ती "गुलाम अली" याने तालिकोट १५६५ च्या लढाईत विशेष कामगिरी बजावल्याबद्दल त्याचे स्मारक उभारले होते. ते आजही आस्तित्वात आहे असे वाचनात आले. तरी त्याबद्दल अधिक माहिती नगरच्या स्थानिक जाणकारांनी येथे दिली तर आनंद होईल. धन्यवाद.

मंडळी पुण्यात कोणी भेटतंय का ? ठरवा कट्टा किंवा विद्यापीठात जे साहित्य संमेलन आहे - श्रीरंग जोशी यांनी माहित दिल्याप्रमाणे तिथे भेटत असाल तरी भेटू या किंवा स्वतंत्र

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

स्वतंत्रपणे किंवा मिपा कट्टा स्वरूपात भेटायला आवडेल. साहित्य संमेलन मला झेपणार नाही ! :)))

टर्मिनेटर कट्टा उत्तम झाला अगदी फोटो वगैरे सहित