Skip to main content

त्यांनी हिंदीत का बोलावं?

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 11/04/2022 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी. https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-dif… या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे. आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल. आता प्रश्न असे आहेत. १. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का? २. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? ३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी? ४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा? ५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?

वाचने 108679
प्रतिक्रिया 510

प्रतिक्रिया

In reply to by सुक्या

इंग्रजी का चालते किंवा का चालावी? इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. ती ज्ञानभाषा आहे. ती शालेय अभ्यासक्रमांतून काढून टाकल्यास नुकसान आपलेच होईल. निव्वळ संपर्क साधणे ,कामचलाऊ संवाद साधणे याच्या बरेच पलिकडे इंग्रजी भाषेचे उपयोग आहेत. हिंदी ही ज्ञानभाषा नाही.ती निव्वळ संपर्कभाषा आहे. त्यापलीकडे या भाषेचा काडीचाही उपयोग नाही.त्यामुळे शालेय अभ्यासक्रमांतून हिंदी हाकलली तरी काहीही बिघडत नाही. कुठेही हिंदी चे आक्रमण दिसत नाही. डोळ्यावर पट्टी बांधून फिरता की काय? मुंबईत हिंदी ही सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. महाराष्ट्रातल्या बाकीच्या मोठ्या शहरांचीही तीच अवस्था आहे. चेनै सारख्या ठिकाणी मोडकी तोडकी इंग्रजी बोलुन हसं करुन घेतात लोक. चेन्नैतल्या लोकांनी मोडकीतोडकी हिंदी बोलली तर चालेल का?

In reply to by उपयोजक

इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. ती ज्ञानभाषा आहे. ती शालेय अभ्यासक्रमांतून काढून टाकल्यास नुकसान आपलेच होईल.
हा विचार कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा नसावा. अमित शहांचे सुद्धा असे मत शंभर टक्के नसणार. ज्ञानभाषा म्हणजे काय असते ? हिंदी ज्ञानभाषा का नाही ? भाषेचा उपयोग संवाद साधणे हा असतो. तो हिंदीचा सुद्धा आहे. हिंदी भाषिक लोकांनी मुंबईत येऊन राहणे म्हणजे आक्रमण समजायचे का- मग दाक्षिणात्य शहरांमध्ये- उदा चेन्नई बेंगलोर हैदराबाद- इथे मराठी लोकं नोकऱ्या करतात, ते ही आक्रमण म्हणायचे का ? (कारण दाक्षिणात्य भाषा तिथल्या मराठी लोकांनी शिकून घ्याव्यात असे कधीही कुठून ऐकायला वाचायला मिळत नाही.)

In reply to by कॉमी

ज्ञानभाषा म्हणजे काय असते वैज्ञानिक चर्चा नेमक्या संज्ञा वापरुन करता यावी इतक्या ताकदीची भाषा म्हणजे ज्ञानभाषा. आज तांत्रिक तसेच वैद्यकिय क्षेत्रातले सर्वात कठीण अभ्यासक्रम हे इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सर्वाधिक शोधनिबंध हे इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होतात. इंग्रजीचा एकूण शब्दसाठा हा ५ लाखांपेक्षा जास्त आहे. इंग्रजी खालोखाल जर्मन तसेच जपानी , कोरियन यांना ज्ञानभाषा म्हणता येईल. कारण या भाषांमधे उच्च तांत्रिक शिक्षण उपलब्ध तर आहेच पण त्या देशातली बहुसंख्य जनता त्या भाषांमधून स्वखुशीने तांत्रिक अभ्यासक्रम शिकायला तयार असते. हे सगळं हिंदी भाषेबाबत होतं का? आहे का ताकद तितकी हिंदी भाषेची. आता हिंदीची ताकद किती आहे ते एका सोप्या उदाहरणावरुन स्पष्ट करतो. तुम्ही महाराष्ट्रात सरकारी बँकेचं नाव तीन भाषांमधे फलकावर पाहिलं असेल. ते State bank of India स्टेट बैंक ऑफ इंडिया आणि मराठीत स्टेट बँक ऑफ इंडिया असे लिहिलेले आढळेल. अता हिंदीत बैंक का? आणि मराठीत बँक असं का? तर हिंदीच्या खड़ी बोलीत ै चा उच्चार ॅ असा होतो. पण गंमत अशी की याच हिंदीच्या अवधि ,मैथिली या भाषांमधे मात्र ै याचा उच्चार ऐ असाच आहे. आठवा अनुप जलोटांचं भजन मैय्या मोरि मैं नहीं माखन खायो यात तुम्हाला मॅया असा उच्चार ऐकू येणार नाही. थोडक्यात प्राथमिक गोष्टींमधेच हिंदीत एकवाक्यता नाही.अशी ही निव्वळ संवादापुरती असलेली , पाच गावचा पाचुंदा गोळा करुन 'बनवलेली' भाषा ज्ञानभाषा होईलच कशी?

In reply to by उपयोजक

हिंदी ही अविकसित बिमारू राज्यांची भाषा आहे. मराठी माणसे या बिमारू भाषेत बोलताना दिसली की लाज वाटते व संतापही येतो.

In reply to by उपयोजक

हिंदीमध्ये तसेही अनेक इंग्लिश शब्द वापाले जातात. मराठीप्रमाणे हिंदीत शुद्ध भाषेचा आग्रह फारसा नाही. सुशिक्षित वर्गात बोलताना जरी मराठीत इंग्लिशची भेसळ वाढली असली तरी चांगल्या दर्जाची मराठी वृत्तपत्रे , पुस्तके , काही चांगले मराठी चित्रपट व मालिका (अलिकडे मी टीव्ही चॅनेलवरील मालिका बघत नाही पण पुर्वी बघितलेल्या काही मालिका आठवतात) यामध्ये मराठी बहुतांशी शुद्ध असते. पण हिंदीत तसे नाही. हिंदी वृत्तपत्रे चुकून हाता आली तरी हातात धरवत नाहीत.. त्यातली भाषा वाचून फारसा आनंद मिळतच नाही. हिंदीतले चित्रपटही कथा, अभिनय, तंत्रज्ञान ई मुळे बघायला आवडत असले तरी त्यातून मधूर संवादांचा , भाषेतील सौंदर्याचा आनंद अभावानेच मिळतो (फक्त चटपटीत संवादांची मात्र रेलचेल असते ) . त्याऐवजी मी असे अनेक मराठी चित्रपट सुचवू शकतो जे मला संवादांत असलेले भाषेचे नादमाधुर्य , भाषेतील अलंकारांचा उत्कृष्ट प्रयोग , भावना नेमकेपणाने व्यक्त करणारे शब्द याकरिता खूप आवडलेत...(या चित्रपटांना "मै जो कहता हू वो मै करता हू " किंवा "मैने एक बार कमिट कर दी...." छाप चटपटीत संवादांची गरज नसते ) हिंदीतली भेसळ अफाट आहे - इंग्लिश आणि उर्दु /फारसी (आणि माहित नाही अजून कोणकोणत्या भाषा असतील यात असो !!) - तजुर्बा , मद्दे नजंर , बाईज्जत बरी , इत्तेदा , इन्तेहा, बावजूद , दर्खास्त , हैसियत आणि काय काय .. असली प्रचंड भेसळ असलेली हिंदी फक्त कामचलाऊ भाषा वाटते.. मग अशी प्रचंड भेसळ असलेली भाषा दक्षिणी लोकांना शिकाविशी वाटली नाही तर त्यात काय नवल ? मला कोणतीही दक्षिणी भाषा येत नाही पण तरी माझा अंदाज आहे की त्या भाषांत भेसळ ही खूप कमी असावी ... त्या लोकांनी आपली भाषा भेसळीपासून जपली असावी. मराठीत जसे सावरकरांनी भाषाशुद्धीकरणाचा भाग म्हणून अनेक सुलभ , कर्णमधूर असे नवीन मराठी शब्द या भाषेला दिलेत तसे काही प्रयत्न हिंदीत फारसे झाले असावेत असे दिसत नाही खरं तर हिंदी भाषिकांनी हिंदीची उपेक्षा केली आणि अशी भेसळीची भाषा दुसर्‍यांवर लादू पाहत आहेत.. उदाहरणादाखल नवभारत टाईम्स या नावाजलेल्या वृत्तपत्रातील एका बातमीतला काही भाग खाली डकवत आहे कर्नाटक में मंगलवार को संतोष पाटिल नाम के एक ठेकेदार ने आत्महत्या कर ली। बीजेपी का समर्थन करने वाले संतोष ने अपने सूइसाइड नोट में लिखा कि राज्य के ग्रामीण विकास और पंचायत राज मंत्री केएस ईश्वरप्पा के कारण वह आत्महत्या कर रहा है। उसने यह भी आरोप लगाया कि उससे 40 पर्संट कमिशन मांगा जा रहा है इसलिए वह परेशान है। संतोष की मौत के बाद कर्नाटक की राजनीति गरमा गई है। केएस ईश्वरप्पा विवादों में आ गए हैं। विपक्ष ईश्वरप्पा का मंत्रिमंडल से बर्खास्त करने की मांग कर रहा है। फिलहाल उडुपी पुलिस ने ईश्वरप्पा के खिलाफ एफआईआर दर्ज कर ली है। ईश्वरप्पा ने इस मामले में सफा दी है कि 'मैं नहीं जानता कि संतोष पाटिल कौन हैं। मैंने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई से घटना की जांच करने को कहा है।' यह पहली बार नहीं है जब ईश्वरप्पा विवादों में आए हैं। वह कर्नाटक के ऐसे बीजेपी नेता हैं जो आएदिन अपने विवादित बयानों को लेकर सुर्खियों में बने रहते हैं। ईश्वरप्पा ही वह नेता हैं जिन्होंने येदियुरप्पा को मुख्यमंत्री पद से हटाने की अगुवाई की थी। हालांकि इस बार ईश्वरप्पा वह फंसते नजर आ रहे हैं

In reply to by तर्कवादी

असली प्रचंड भेसळ असलेली हिंदी फक्त कामचलाऊ भाषा वाटते..
याचा अर्थ तिची अर्थात संपर्क भाषा म्हणजेच युनिव्हर्सल भाषा होण्याकडे वाटचाल चालू आहे ! म्हणजेच इंग्रजी प्रमाणे. (सध्या काही प्रमाणात आहेच)
मराठीत जसे सावरकरांनी भाषाशुद्धीकरणाचा भाग म्हणून अनेक सुलभ , कर्णमधूर असे नवीन मराठी शब्द या भाषेला दिलेत तसे काही प्रयत्न हिंदीत फारसे झाले असावेत असे दिसत नाही
सध्याच्या वेगवान आयटी काळात भाषाशुद्धीकरणाची संकल्पना कालबाह्य झाली की काय असे वाटते.
खरं तर हिंदी भाषिकांनी हिंदीची उपेक्षा केली
असं काही झालं नाही, इतर भाषिकांनी हिंदी आपलीशी करताना त्यांच्या भाषेतील शब्द देखिल मिसळले.
उदा. मराठीमुळे "वाट लगाना" हा वाक्प्रचार रुढ झाला !
... आणि अशी भेसळीची भाषा दुसर्‍यांवर लादू पाहत आहेत.. हिंदी देशपातळीवर संपर्क भाषा व्हावी या साठी गेल्या काही दशकांपासून प्रयत्न सुरु आहेत, सध्याचे केंद्र शासन "वन अमुक, वन तमुक" च्या अंतर्गत "एक देश, एक भाषा" लागू करू पहात आहे !

In reply to by चौथा कोनाडा

याचा अर्थ तिची अर्थात संपर्क भाषा म्हणजेच युनिव्हर्सल भाषा होण्याकडे वाटचाल चालू आहे ! म्हणजेच इंग्रजी प्रमाणे. हिंदीची तुलना इंग्रजीसारख्या सुंदर भाषेशी करणे हास्यास्पद आहे. सध्याच्या वेगवान आयटी काळात भाषाशुद्धीकरणाची संकल्पना कालबाह्य झाली की काय असे वाटते. आयटीचा काळ आला असेल तर इंग्रजीच बरी.मागास हिंदी कशाला?

In reply to by चौथा कोनाडा

याचा अर्थ तिची अर्थात संपर्क भाषा म्हणजेच युनिव्हर्सल भाषा होण्याकडे वाटचाल चालू आहे ! म्हणजेच इंग्रजी प्रमाणे. पूर्वी फक्त दक्षिणेत व काही प्रमाणात बंगालमध्ये हिंदीला विरोध होता. आता महाराष्ट्रात सुद्धा हिंदीविरोध वाढत आहे. अनेक पूर्वोत्तर राज्यांनी अमित शहांच्या हिंदी वापरण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. अनेक मराठी वाहिन्यांवर बऱ्याच उत्पादनांच्या जाहिराती आता मराठीत भाषांतर करून दाखवितात ज्या पूर्वी बहुतांशी हिंदीत असायच्या. Google, Facebook, WhatsApp अशी समाजमाध्यमे व Tata Sky, Amazon सारख्या कंपन्यांनी मराठी भाषेचा पर्याय दिला आहे. एकंदरीत हिंदी, इंग्लिश प्रमाणे, संपर्कभाषा होण्याची शक्यता दिसत नाही. अजून काही दशकांनी स्थानिक भाषा व इंग्लिश या दोनच संपर्कभाषा असतील.

In reply to by चौथा कोनाडा

सध्याच्या वेगवान आयटी काळात भाषाशुद्धीकरणाची संकल्पना कालबाह्य झाली की काय असे वाटते.
मराठीत डेटा साठी 'विदा' हा प्रतिशब्द अलिकडच्या काळातच शोधला गेला असावा बहुधा.

In reply to by तर्कवादी

खरं तर हिंदी भाषिकांनी हिंदीची उपेक्षा केली आणि अशी भेसळीची भाषा दुसर्‍यांवर लादू पाहत आहेत..
मराठीत काही वर्षांपूर्वी काहे दिया परदेस नावाची मालिका प्रसारित व्हायची. मुंबईतली एक मराठी मुलगी हिंदीभाषिक मुलाच्या प्रेमात पडते. आधी तो तिच्याशी / तिच्या कुटुंबियांशी संवाद साधतो तेव्हढेच संवाद हिंदीत होते आणि बाकी मराठी. मग पुढे त्या दोघांचं लग्न आणि नंतर ती मुलगी सासरी वाराणसीला जाते आणि त्यानंतर अख्खी मालिकाच हिंदी बनून गेली होती. मराठी वाहिनीवर हिंदी नावाची आणि जवळपास सर्वच संवाद हिंदीत असलेली आणि वाराणसी शहरात घडणार्‍या घटना दाखविणारी मालिका काही मराठी भाषा प्रेमी (व आग्रही देखील) मोठ्या कौतुकाने पाहत असत. त्याच्याही अनेक वर्षे पूर्वी विक्रम गोखले यांनी मराठीत मुंबई दूरदर्शन वर डरनेका नही असे शीर्षक असलेली आणि अतिशय गचाळ बंबैय्या हिंदीत संवाद असलेली मराठी मालिका केली होती. या अशा कलाकृतीच्या निर्मात्यांनी केलेल्या चूकांचा दोष भाषेकडे कसा काय जातो?

In reply to by सुक्या

इंग्रजी सारखी भारतातल्या एक टक्काही लोकांना परिणामकारकरीत्या न बोलता येणारी किंवा न समजणारी भाषा ही राष्ट्रभाषा आहे का? इंग्रजी न बोलता येणं / न समजणं हा न्यूनगंड का ठरतोय? हिंदी ला उत्तर भारतीय लोकांची प्रादेशिक भाषा समजून तिला राष्ट्रभाषा होऊ न देण्याचा अट्टाहास तर्कहीन आहे. खरे तर उत्तर भारतीय राज्यातील लोकांची प्रादेशिक भाषा हिंदी ही नाहीच. ते लोक इतर राज्यांतील लोकांना समजणे सोयीचे जावे म्हणून त्यांच्या सोबत हिंदीत बोलतात पण आपसांत ते मैथिली, भोजपुरी, मघई, बज्जिका, अग्निका, इत्यादी भाषेत बोलतात. त्यामुळे हिंदी त्यांची अंतर्राज्यीय भाषा नसून इतर राज्यांतील लोकांशी संवाद साधणारी आंतर-राज्यीय भाषा आहे. हिंदी चित्रपट देखील मुंबई व महाराष्ट्र भागात जितका पाहिला जातो तितका उत्तर प्रदेश वा बिहार येथे पाहिला जात नाही. त्यापेक्षा ते भोजपुरी चित्रपट मोठ्या संख्येने पाहतात. पूर्वी फक्त दक्षिणेकडील राज्ये हिंदी विरोध करीत असत. आता त्यांच्या जोडीला महाराष्ट्र देखील हिंदी विरोध अगदी सरसावून करीत आहे. या विरोधामुळेच मग इंग्रजी हीच दोन राज्यांमधली संवाद साधण्याची भाषा ठरत आहे. परक्या भाषेसोबत मग संस्कृतीदेखील परकीयच होत जाते. एखादे उदाहरण द्यायचे तरी शेक्सपियरचे नाटक किंवा गॉडफादर सिनेमाचा संदर्भ दिला जातो. वि. वा. शिरवाडकरांच्या साहित्यातला किंवा राजश्री चित्रसंस्थेतील एखाद्या उत्तम दर्जाच्या (क्लासिक म्हणावं का? जास्त भारदस्त वाटेल) चित्रपटातील संवादाचा दाखला देणारा गावरान समजला जातो. त्याला देसी म्हणून हिणवले जाते.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

+१ गुगळे यांच्याशी पूर्ण सहमत आहे

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मराठीचं नाव घेत हिंदी विरोध करणार्‍यांना देखील शेवटी हनुमान चालिसाचाच आधार घ्यावा लागला, मारुती स्तोत्राचा नाही यातच काय ते आलं.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

हा हा हा बरोब्बर. रच्याकने ते वसंत मोरेंचे नाराजी नाट्य परत राज ठाकरेंची भेट आणि प्रकरणावर पडदा वगैरे पण आधीच ठरवून केल्यासारखे वाटत होते. आज ठाण्यात काय करणार आहेत बघू.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

परत रामदास स्वामींचा विषय निघणार, मग गुरु होते की नाही हा विषय चर्चला जाणार ... त्या पेक्षा नकोच मराठी स्त्रोत्र, हनुमान चालीसा बरी, हिंदी भाषिक मतदार ही सोबत येणार....

In reply to by चेतन सुभाष गुगळे

हिंदी ला उत्तर भारतीय लोकांची प्रादेशिक भाषा समजून तिला राष्ट्रभाषा होऊ न देण्याचा अट्टाहास तर्कहीन आहे. हिंदी ही सगळ्या भारताची भाषा आहे का? नसेल तर मग काही राज्यांमधे बोलली जाणारी भाषा सगळ्या देशावर लादण्याचं कारण काय? तसं पाहिलं तर देशाला जोडणारी एकच भारतीय भाषा आहे 'संस्कृत'

In reply to by उपयोजक

संस्कृत काही उपयोगाची भाषा नाही असे रानरेडा यांच्या पुढील प्रतिसादावरून दिसते. http://misalpav.com/comment/1137842#comment-1137842 संस्कृत ही संपर्कभाषा करायची असे ठरावले तरी ते व्यवहारात आणायला २००-४०० वर्षे लागतील !

In reply to by उपयोजक

ते कसे ? भारतभर संस्कृत बोलली/लिहिली जायची का ? याबद्दल काही वाचनास असेल तर नक्की सांगावे.

In reply to by सुक्या

हिंदी चालत नसेल तर परदेशी असलेली इंग्रजी का चालते किंवा का चालावी? व परदेशी असलेली इंग्रजी चालते तर हिंदी का चालु नये?
या दोन्ही प्रश्नांचं उत्तर कधीच मिळणार नाही. कारण ... हा उत्तर वि, दक्षिण असा वर्चस्वाचा मुद्दा आहे.

पण मी म्हणतो तुम्ही सगळे आताच का बरे जागृत झालात नाही म्हणजेइथे जे बोलत आहेत त्यांना शाळेत १० वी पर्यत शिकताना एकतर पूर्ण हिंदी किंव ५०:५० मार्कांचे हिंदी संस्कृत हे विषय घेऊनच १० वी उत्तीर्ण झाले असणार. तेव्हा कोणालाच अगदी तुमच्या पालकांना सुद्धा मंडळला किंवा शाळेत जाऊन आम्हांला हिंदी ऐवजी तामिळ, तेलगू, असामी, बंगाली, गुजरात, वगैरे इतर आपल्या आवडीच्या भाषेची निवड करू द्या असं सांगायला हवं होतं. नाही पक्षी असं म्हणू की तुम्ही बाल वयात होतात व तुमचे पालक जागरूक नव्हते. पण मग आत्ता तुम्ही सर्व तुमच्या पाल्यासाठी असा आवाज उठवू शकताच की. मग करा सुरुवात इथे गळे काढून काय होणारंय. आणि आता सुरुवात केलीत तरच तुमची पुढची पिढी आणि नातवंड मराठीत आणि एक दुसरी प्रादेशिक ऐच्छिक अशी बोलणारी असेल.

In reply to by सुरसंगम

आहेत .. असे खुप लोक आहेत. जी मराठी लोक हैद्राबाद / बेण्गलोर अशा ठिकाणी कामानिमित्त आहेत त्यांची मुले सर्रास मराठी / तेलुगु किंवा मराठी / प्रांतीय भाषा बोलतात .. अगदी लिहितात ही. माझ्या बरोबर अशे कित्येक मित्र आहेत जे मराठी / मारवाडी आहेत पण दुसर्‍या प्रांतात राहिल्यामुळे तिथली भाषा अगदी सुंदर बोलतात ... माझा अजुन एक मित्र आहे .. बंगाली (घोष) आहे. लग्न मराठी मुलीशी केलं. आता तो आणी मुलं मस्त बंगाली / मराठी बोलतात .. खरं सांगु का .. ज्या लोकांना काही प्रोब्लेम नसतो ते सुखाने राहतात .. ज्या लोकांचे पोट अशा फुकाच्या वादावर चालते त्यांना कुठेही प्रोब्लेम च दिसतो ..

In reply to by सुक्या

ज्या लोकांना काही प्रोब्लेम नसतो ते सुखाने राहतात .. ज्या लोकांचे पोट अशा फुकाच्या वादावर चालते त्यांना कुठेही प्रोब्लेम च दिसतो. ज्या लोकांना पाठीचा कणा नसतो त्यांनाच स्वभाषाभिमानही नसतो. हपापल्यागत फक्त पैसा मिळवण्याचाच उद्देश असेल तर भाषा वगैरे गोष्टी निरर्थक वाटू लागतात.

In reply to by उपयोजक

प्रामाणिकपणे हे वेगवेगळे अभिमान समजून घ्यायला आवडेल. म्हणजे हे असेल अभिमान नसल्यावर काय नुकसान होतं आणि असल्यावर काय फायदा होतो असे माहिती झालं तर बरे. आज इतक्या वर्षात अखिल भारतीय मारवाडी संमेलन भरलेलं पाहिलं नाही. पण त्यामुळे काही नुकसान झाल्याचं ऐकिवात नाही. बहुतेकांचा घरचा व्यवसाय असतो. त्यामुळे भविष्याची चिंता न करता मुलं अगदी समरसून शिकतात आणि उत्तम यश मिळवितात. बऱ्याच मारवाडी लोकांची भाषा प्रादेशिक भाषेशी सरमिसळ झाल्यामुळे इतकी धेडगुजरी झाली आहे परंतु तिचे प्रमाणीकरण वगैरे करण्याच्या फंदात कोणी पडत नाही. तरी त्यांचं उत्तम चाललं आहे. माझा प्रश्न प्रामाणिक आहे. कुणाला डिवचन्याचा उद्देश नाही.

In reply to by सर टोबी

प्रामाणिकपणे हे वेगवेगळे अभिमान समजून घ्यायला आवडेल. म्हणजे हे असेल अभिमान नसल्यावर काय नुकसान होतं आणि असल्यावर काय फायदा होतो असे माहिती झालं तर बरे. भाषा हा सांस्कृतिक ठेवा आहे. तिच्यात फायदा का बघावा? माणूस सगळ्या गोष्टी आर्थिक फायद्यासाठीच करत असतो का?

In reply to by उपयोजक

हा जास्त करून भाषणांचा फड जिंकून हृदयसम्राट आणि विश्वगुरू होणाऱ्या मंडळींचा बनाव आहे. आपल्या भावना कशामुळेदेखील उचंबळून येतात हेच आपले मोठे दुर्दैव आहे. मला आपले उगीचच वाटले की हे अभिमान खरेच कुठे तरी उपयोगी पडतात म्हणून.

In reply to by सुरसंगम

पण मग आत्ता तुम्ही सर्व तुमच्या पाल्यासाठी असा आवाज उठवू शकताच की. मग करा सुरुवात इथे गळे काढून काय होणारंय. आणि आता सुरुवात केलीत तरच तुमची पुढची पिढी आणि नातवंड मराठीत आणि एक दुसरी प्रादेशिक ऐच्छिक अशी बोलणारी असेल. सहमत आहे.

In reply to by सुरसंगम

गेली ३५ एका वर्षे तरी १०० मार्कांचे संस्कृत मराठी माध्यमातील मुलांना आठवीपासून घेता येते आणि हिंदी सोडता येते, मी आणि अनेकानी केले होते - मी ८९ च्या बॅच ला होतो = हे आपणास माहित नाही काय ? अर्थात संस्कृत इतके बकवास , अर्थशून्य आणि निरुपयोगी मी काही शिकले नसेल. दहावीला ९० मार्क मिळण्यापलीकडे त्याचा काहीही उपयोग झाला नाही . तसे आठवीनंतर मराठी शिकून हि काही फायदा झाला नाही पण संस्कृत म्हणजे पूर्ण अडगळ असो आता CBSE ला फ्रेंच / जर्मन असेल तर मराठी आणि हिंदी दोन्ही सोडता येते !

In reply to by रानरेडा

याचा अर्थ ७ वी पर्यंत हिंदी शिकावे लागले का? एकही वर्ष हिंदी नाही असा एखादा अभ्यासक्रम महाराष्ट्रात आहे का?

मुळात भाषा ही माणसाचं जीवन सहज, सुलभ आणि सजग करण्याचे साधन आहे. जीवन असह्य करून मिळवणारे साध्य नाही. ज्याला जी भाषा लहानपणी बोबड्या बोलाने शिकवली गेली ती त्या त्या व्यक्तीची सहज येणारी बोली भाषा ठरली. आज जे सर्व मीपबाहेरील सुद्धा मराठी भाषा आणि लिपी सुद्धा जपली पाहिजे बोलणारे कितीजण धनादेश मराठीत लिहतात बरं? आणि जरी लिहला तरी सही रोमन लिपीत न लिहणारे टक्के किती?

भाषा हे संवाद साधण्याचे साधन. दोन परप्रांतीय एकत्र आले आणी आपापल्या भाषेत बोलू लागले तर संवाद साधणे कठीण होते.म्हणून दोघांना येणारी आशा भाषेचा वापर केला जातो. त्यात काहीच चूक नाही. मद्रास रेजिमेंट मधे इतर भाषीय आधीकारी सुद्धा अस्खलित तामीळ भाषा बोलतो. त्यामुळेच जसा देश तसा वेश या न्यायाने स्थानिक भाषा शिकणे केंव्हाही चांगलेच. जीतक्या जास्त भाषा येतील तीतके त्या त्या स्थानिक समाजात समरस होणे सोपे आसते. भाषावार प्रांतरचना आहे हा वाद नेहमीच राहाणार. तुम्ही माझ्या मातृभाषेचा सन्मान करा मी तुमच्या मातृभाषेचा सन्मान करेन. मातृभाषेचा अभिमान हवाच पण दुसर्‍या भाषेबद्दल द्वेष नसावा. बाकी ज्ञान भाषा शिकणे न शिकणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. दोन दक्षिण भारतीय एकत्र आले तर बहुतांशी आपलीच भाषा बोलतात आसे माझे निरीक्षण आहे.पण मराठी माणूस परप्रांतीय बरोबर त्याच्या भाषेत बोलतो हा त्याचा गुण आहे याचा अर्थ त्याला मराठीचा अभिमान नाही आसे मानायला कुठलाही आधार नाही. कित्येक परप्रांतीय जे मराठी मुलखात आहेत ते सुंदर मराठी बोलतात हे पण बघीतले आहे. बाकी राजकारण तर घालूच आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

सहमत.

भाषा हे संवाद साधण्याचे साधन. दोन परप्रांतीय एकत्र आले आणी आपापल्या भाषेत बोलू लागले तर संवाद साधणे कठीण होते.म्हणून दोघांना येणारी आशा भाषेचा वापर केला जातो. त्यात काहीच चूक नाही. मद्रास रेजिमेंट मधे इतर भाषीय आधीकारी सुद्धा अस्खलित तामीळ भाषा बोलतो. त्यामुळेच जसा देश तसा वेश या न्यायाने स्थानिक भाषा शिकणे केंव्हाही चांगलेच. जीतक्या जास्त भाषा येतील तीतके त्या त्या स्थानिक समाजात समरस होणे सोपे आसते. भाषावार प्रांतरचना आहे हा वाद नेहमीच राहाणार. तुम्ही माझ्या मातृभाषेचा सन्मान करा मी तुमच्या मातृभाषेचा सन्मान करेन. मातृभाषेचा अभिमान हवाच पण दुसर्‍या भाषेबद्दल द्वेष नसावा. बाकी ज्ञान भाषा शिकणे न शिकणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. दोन दक्षिण भारतीय एकत्र आले तर बहुतांशी आपलीच भाषा बोलतात आसे माझे निरीक्षण आहे.पण मराठी माणूस परप्रांतीय बरोबर त्याच्या भाषेत बोलतो हा त्याचा गुण आहे याचा अर्थ त्याला मराठीचा अभिमान नाही आसे मानायला कुठलाही आधार नाही. कित्येक परप्रांतीय जे मराठी मुलखात आहेत ते सुंदर मराठी बोलतात हे पण बघीतले आहे. हनुमान चालीसा का भीमरूपी महारूद्रा, बाकी राजकारण तर चालूच आहे.

इंग्लिश ज्ञानभाषा असल्याने शिकलीच पाहिजे. मराठी मातृभाषा व राज्याची भाषा असल्याने शिकलीच पाहिजे. हिंदी किंवा इतर भाषा ज्यांना शिकारच्यात त्यांनी शिकाव्या, ज्यांना शिकायच्या नाहीत त्यांच्यावर शिकण्याची सक्ती अजिबात नको. जनगणनेत मी फक्त मराठी, इंग्लिश व संस्कृत या तीनच भाषा येतात असे सांगणार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मी मराठी आणि हिंदी येते असे लिहिणार. ज्याचे पोट इंग्रजी किंवा संस्कृतवर भरते त्याने तसे लिहावे. माझे पोट मराठी आणि हिंदीवर भरते.

चेन्नई मध्ये मारवाडी ( सुवर्ण व्यावसायिक )आणि बोहरी ( मुस्लिम) ज्यांची हार्ड वेअर ची दुकाने आहेत ते अस्खलित तामिळ बोलताना मी पाहिलेले आहेत. याचे कारण तेथील लोकान हिंदि येत नाही/ आले तरी ते बोलत नाहीत. याउलट आपण मराठी माणसे आपसात बोलताना सुद्धा मराठीत बोलत नाही. ए एफ एम सी मध्ये माझ्या वर्गात ११ मराठी होते. त्यापैकी २ जण आपसात सुद्धा मराठी अजिबात बोलत नाहीत. जर इतर लोक अमराठी असतील तर तुम्ही सर्वाना समजावे म्हणून हिंदीत बोलता हे समजू शकतो. माझ्या कडे येणारे अनेक गुजराती कच्छी रुग्ण माझ्याशी छान मराठीत बोलतात. (काही उच्चार चुकीचे असतील.) याउलट शिंदे आणि भोसले यासारखी आडनावे असणारी माणसे आपल्या ४-५ वर्षाच्या मुलांशी हिंदीत बोलताना दिसतात तेंव्हा मात्र संताप येतो. आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या मुलांना मराठी अजिबात येत नाही आणि दुर्दैवाने या गोष्टीची लाज वाटण्या ऐवजी त्यांना त्याचा अभिमान वाटतो. लष्करात असताना आम्ही आमच्या मुलांशी कटाक्षाने मराठीत बोलत असू. त्यामुळे आमची मुले इंग्रजी माध्यमात असूनही आपसात किंवा मराठी मित्रांशी व्यवस्थित माहित बोलतात. माझ्या मुलीने पंजाबी मुलाशी प्रेम विवाह केला आहे पण तो समोर असला तरी आम्ही मराठीतच बोलतो आणि आता त्याला मराठी बऱ्यापैकी समजू लागले आहे. माझ्या मुलीला मी पंजाबी शिकून घे म्हणून मागे लागलो होतो पंरतु माझ्या जावयाला किंवा व्याह्याला पंजाबी लिहिता वाचता आणि बोलता ही येत नाही. केवळ समजते (तीन पिढ्यापासून लष्करात असल्याचा परिणाम) त्यामुळे मुलीला पंजाबी शिकणे दुरापास्त झाले आहे. मला गुजराती समजते वाचता येते पण सराव नसल्याने बोलता येत नाही (याची खंत आहे). आणि मी मराठी हिंदी आणि इंग्रजी जवळ जवळ ९५ % (कदाचित जास्त) शुद्ध बोलतो आणि अर्धवट हिंदी/ इंग्रजी बोलण्यापेक्षा शुद्ध हिंदी शुद्ध इंग्रजी किंवा शुद्ध मराठी बोलण्याबद्दल माझा कटाक्ष असतो. एवं प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान जरूर बाळगावा परंतु दुसऱ्या भाषेचा दु:स्वास करण्याची आवश्यकता नाही.

In reply to by सुबोध खरे

प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान जरूर बाळगावा परंतु दुसऱ्या भाषेचा दु:स्वास करण्याची आवश्यकता नाही.

In reply to by ॲबसेंट माइंडेड…

शाळेपासून सरकारी कार्यालयापर्यंत सर्वत्र हिंदी सक्तीने लादली जात असल्याने, हिदीसमोर माझ्या मातृभाषेला दुय्यम स्थान देण्याचे प्रयत्न सुरू असल्याने व हिंदीभाषिकांच्या मगरूरी आणि आडमुठेपणामुळे या भाषेविषयी चीड निर्माण होत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मग तुम्ही तुमच्या मुला मुलींना मराठी शाळेत घातलत की कॅान्व्हेंट मधे की पुर्ण किंवा सेमी इंग्रजी माध्यमात?

प्रत्येक भाषेचा अभिमान, सन्मान, आदर असावाच. कोणतीही भाषा हीन नाही, प्रत्येक भाषेतून ज्ञान मिळतेच. दुसऱ्याची भाषा शिकण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे गरज. जर आपण पर प्रांतात गेलो असू आणि तेथे संवाद साधणे आपल्याला गरजेचे वाटत असेल तर ती भाषा आपण शिकतो किंवा शिकण्याचा प्रयत्न तरी करतो. नोकरी निमित्ते गुजरातच्या खेडोपाडी फिरण्याचा संबंध आला आणि नाईलाजाने गुजराती शिकावीच लागली. त्यात गैर अथवा कमीपणा वगैरे काहीच नाही, उलट मातृभाषे व्यतिरिक्त अजून एक भाषा शिकायला मिळाली ह्याचा आनंदचं आहे. अमेरिकेत आपले भारतीय आपली मूळ नावे बाजूला ठेवून अमेरिकन नावे अंगिकारतात. संदीपचे सँडी, राजीवचे रॉजर, सलीमच्या सॅम वगैरे, का ? तर म्हणे त्यांना आपली नावे उच्चारता येत नाहीत. मला हे पटत नाही. आपले नाव उच्चारायची जास्त गरज कोणाला आहे ह्यावरून मूळ नाव ठेवायचे का बदलायचे हे ठरत असावे. मी ज्या कंपनीत काम करत होतो तेथे अनेक मार्केटिंग कॉल्स यायचे व त्यांना आमची जास्त गरज असायची. ते माझे 'सौंदर्य' नाव खूपसे बरोबर उच्चरायचे. तेच जर मला त्यांची गरज असती तर त्यांच्या सोयीसाठी मला देखील माझे नाव 'सँडी' वगैरे करावे लागले असते. अजून एक अनुभव - २०१५ला भारतात आलॊ होतो त्यावेळी एका नातेवाईकाचा सेल फोन टेम्पररी वापरात होतो. नक्की कोणती फोन कंपनी होती ते आठवत नाही. तर एकदा त्याच्यात काहीतरी बिघाड झाला व त्यांच्या कस्टमर केअरला फोन करावा लागला. त्यात मराठीत बोलण्यासाठी एक नंबर दाबण्याचे ऑप्शन दिले होते. तो नंबर दाबल्यावर देखील समोरून हिंदीत संभाषण सुरु झाले. मी म्हंटले मला मराठीतच बोलायचे आहे त्यावर ती व्यक्ती म्हणाली तो पर्याय उपलब्ध नाही. "जर पर्याय उपलब्ध नव्हता तर तसे फसवे पर्याय का दिलेत ?" असं विचारल्यावर ती व्यक्ती म्हणाली "ऐसा गर्व्हरमेंट का कायदा है, इसलीये वो ऑप्शन दिया है". म्हणजे ऑप्शन द्यायचे पण मराठीत बोलणारी व्यक्तीच नाही ठेवायची असा एकूण कारभार दिसला. त्या क्षणी मला जास्त गरज होती म्हणून जास्त वाद न घालता गुपचूप हिंदीत काम चालवून घेतले.

In reply to by सौन्दर्य

अजून एक अनुभव - २०१५ला भारतात आलॊ होतो त्यावेळी एका नातेवाईकाचा सेल फोन टेम्पररी वापरात होतो. नक्की कोणती फोन कंपनी होती ते आठवत नाही. तर एकदा त्याच्यात काहीतरी बिघाड झाला व त्यांच्या कस्टमर केअरला फोन करावा लागला. त्यात मराठीत बोलण्यासाठी एक नंबर दाबण्याचे ऑप्शन दिले होते. तो नंबर दाबल्यावर देखील समोरून हिंदीत संभाषण सुरु झाले. मी म्हंटले मला मराठीतच बोलायचे आहे त्यावर ती व्यक्ती म्हणाली तो पर्याय उपलब्ध नाही. "जर पर्याय उपलब्ध नव्हता तर तसे फसवे पर्याय का दिलेत ?" असं विचारल्यावर ती व्यक्ती म्हणाली "ऐसा गर्व्हरमेंट का कायदा है, इसलीये वो ऑप्शन दिया है". म्हणजे ऑप्शन द्यायचे पण मराठीत बोलणारी व्यक्तीच नाही ठेवायची असा एकूण कारभार दिसला. त्या क्षणी मला जास्त गरज होती म्हणून जास्त वाद न घालता गुपचूप हिंदीत काम चालवून घेतले.
कधी कधी हिंदी मनुष्यही मराठीचा पर्याय स्विकारल्यानंतर उपलब्ध नसतो. मग तसेच वाट बघत बसावे लागते, शेवटी इंग्रजी किंवा हिंदी पर्याय घ्यावा लागतो.

पण वरती सुरवातीच्या प्रतिसादांत लिहिले आहे ते बरोबर आहे. दक्षिणी राज्यांत मुस्लिम लोक खूप आहेत. खासगी बसेसवर तर हिंदी बोलणारेच कर्मचारी असतात. त्यामुळे काम होते. स्थानिक भाषा किंवा इंग्रजी येत नसल्याने काहीही अडत नाही.

"हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?" चेन्नाई,बेंगळूरू,कोची.. दक्षिणी राज्यांतील अनेक हिंदी भाषिक दुकानदार उत्तम स्थानिक भाषा बोलतात. मारवाडी समाजातील लोक तर जेथे जातात तेथील भाषा चटकन आत्मसात करताना दिसतात. पुणे शहराबाबतही तसेच म्हणता येईल. जे नोकर्या करण्यासाठी आपल्या राज्याबाहेर जातात त्यांना मात्र स्थानिक भाषा आत्मसात करायला वेळ लागतो. हैद्राबादमध्ये अनेक वर्षे राहुन तेलुगु बोलता न येणारे मराठी असंख्य दिसतील. बेंगळूरमध्ये २/२.५ लाख मराठी सहज असतील पण कन्नड बोलता लिहिता येणार्यांची संख्या नगण्य असेल हे खात्रीलायक सांगू शकते. दोष त्यांचा नाही. मोठ्या महानगरांमध्ये स्थानिक भाषेशिवाय तुमचे व्यवहार चालू राहू शकतात. व्यापार्/धंदा असेल तर मात्र स्थानिक भाषा आत्मसात करण्यावाचुन पर्याय नसतो. मुंबईत अमराठी दुकानदार(गुजराती/मारवाडी) मराठी उत्तम बोलू शकतात पण टॅक्सीवाले तसे मराठी बोलू शकणार नाहीत कारण बोलणे मर्यादित असते-"कुठे जायचे आहे? व बील किती झाले?" एवढेच मर्यादित असते. हिंदीचा दुस्वास हा मुख्यतः तामिळनाडूत दिसतो कारण "आमची(च) भाषा सर्वात श्रेष्ठ व जुनी" हा दुराभिमान हे आहे. गंमत म्हणजे अनेक तामिळ, विशेष करून मुंबईतील वा अमेरिकेतील, अगदी स्पष्ट हिंदी बोलताना दिसले आहेत.

कुठल्याही प्रदेशातील भारतीय लोकांना आपल्या प्रादेशीक भाषांचा फुकाचा पोकळ अभिमान असतो मात्र आपल्या राज्यात आलेल्या परभाषकाने ती शिकावी, ती शिकण्याच्या सहज संधी त्याला उपलब्ध करून द्याव्यात यासाठी कुठलेही चांगले प्रयत्न करायची त्यांची तयारी नसते. मराठीसाठी गळे काढणार्‍या कुणालातरी ड्युओलिंगो सारखे एखादे मराठी शिकवणारे अ‍ॅप तयार करावेसे वाटते का? कि सरकार आपली मराठी भाषा, संस्कृती इतरापर्यंत पोचवण्यासाठी काही चांगले प्रयत्न करते?व नुसत्या पाट्या मराठीत करायला लावले की झाले? एखाद्या हिंदी भाषकाला मराठी शिकायची असेल तर एकही चांगले माध्यम उपलब्ध नाही. तीच गत तमिळची किंवा बंगालीची. राष्ट्रीय स्तरावर कुठलीही भाषा सहजपणे घरबसल्या शिकता येईल असा एक तरी उपक्रम या माहिती तंत्रज्ञानाच्या बहारीच्या काळात आहे का? वेबसिरीज, सिनेमा या माध्यमांमुळे एखादी भाषा शिकावीशी वाटते पण ते करायचे कसे? अमित शहा सुद्धा उंटावरूनच शेळ्या हाकताहेत. हिंदी शिकण्यासाठी तमिळ किंवा तेलुगुमध्ये चांगला कंटेंट उपलब्ध करून दिला तर भाषा शिकण्याची आवड असणार्‍यांना सोयीचे ठरेल. हिंदीभाषकांनीसुद्धा आपला हेका सोडून आवडीने इतर भाषा शिकायला हव्यात. उप्र, मप्र, हरयाणा इथल्या एकाभाषक जन्तेला इतर भाषा, संस्कृती याबद्दल काही माहिती कशी मिळणार? मिळाली तर फक्त स्टिरियोटाईप्स कळतील. रेमडोक्यासारखे आमची भाषा राष्ट्रभाषा, आमची भाषा नोबेलविजेत्यांची भाषा, आमची भाषा प्राचीन भाषा असले नुसते गंड पाळुन त्या भाषेचा कसला उद्धार शक्य आहे? माझेच उदाहरण सांगतो. मला बंगाली आणि मल्याळम या भाषा शिकण्याची फार इच्छा आहे. पण पुस्तके वगळता कुठलेही चांगले माध्यम मला मिळाले नाही. संस्कृतसाठी मात्र एनपिटीएलचे नितांतसुंदर कोर्सेस फुकटात उपलब्ध आहेत ते तरी बरे. कोरियनसारखी भाषा आज इतकी पॉप्युलर आहे, ती सहज शिकली जाते, प्रचंड कंटेंट उपलब्ध आहे आंतरजालावर तो देखिल मोफत. जर्मनसाठी गोएथे इंस्टिट्युट आहे, फ्रेंचसाठी आलियांझ फ्रान्स्वा. कुठल्या भारतीय भाषेसाठी असे व्यासपिठ उपलब्ध आहे? का फुकाचा आपल्या भाषिक वैविध्याचा डांगोरा पिटायचा?

In reply to by पुंबा

Ling-App, Shoonya, Marathi Shala, Learn Marathi, Letter2Sound (Marathi), Marathi Dictionary, uTalk Marathi अशी अनेक Apps मराठी शिकण्यासाठी उपलब्ध आहेत. परंतु महाराष्ट्रात मराठी जनतेला सक्तीने हिंदी शिकवित असल्याने परप्रांतीयांना मराठी शिकण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यामुळे फारसे कोणी मराठी शिकत नसावे.

In reply to by पुंबा

तुम्ही फक्त तर्काने किंवा अर्धवट माहितीने लिहिले असावे अशी शक्यता आहे. माझा आंजावरुन भाषा (हिंदी आणि मराठी) शिकवण्याचा अनुभव सांगतो. कोणतीही भाषा शिकण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. पुरेसा वेळ देणे आणि चांगली स्मरणशक्ती. मी महाराष्ट्रात राहणार्‍या तमिळ ,मल्याळी ,कन्नड ,तेलुगू भाषिकांना मराठी शिकवतो. अगदी मोफत. माझा अनुभव किंवा निरीक्षण असं आहे की लोक आपल्या रोजीरोटीला आणि कौटुंबिक गोष्टींना आधी महत्व देतात. यातून वेळ उरला तर मग जिथे पोट भरतो तिथली भाषा वगैरे शिकायला बघतात. ते सुद्धा स्थानिकांशी रोजचा संवाद अधिक सुकर व्हावा म्हणून. मराठी ही यांची राज्यभाषा आहे. ती न शिकता आपण हिंदीतून बोलून इथली राज्यभाषा शिकणं टाळतोय हे योग्य नाही असं काही त्यांना वाटून ते मराठी शिकत वगैरे नाहीत. जाता जाता सहज होण्यासारखं असेल तर शिकू मराठी. असे विचार असतात. मग इतकी तीव्र इच्छा असल्यावर त्याचे फलित काय असणार? आणि हे मी पश्चिम महाराष्ट्र आणि मुंपुठा इथे किमान ७+ वर्षांपासून राहणार्‍या दक्षिण भारतीयांबद्दल बोलतोय. ते सुद्धा सुशिक्षित द.भारतीय बरं का! झाडून सगळे द. भारतीय असेच असतात असं नाही. काही आवडीने शिकणारेही असतात. पण त्यांचे प्रमाण तुरळक असते. सुशिक्षित हिंदीभाषिक हे मराठी शिकायला तयार असतात. पण त्याचं कारण दोन्ही भाषा संस्कृतोद्भव असणं ,दोन्हींची लिपी एकच असणं बरेचसे शब्द समान असणं या गोष्टी आहेत. या गोष्टींमुळे त्यांना मराठी शिकणं सोपं जातं. तेच यांना तमिळ किंवा मल्याळी शिकणं कठीण जातं. महाराष्ट्रात रस्त्यावर ,हातगाडीवर व्यवसाय करणारे , रिक्षा , टॅक्सीचालक असे उत्तरभारतीय हे मराठी शिकायला सर्वात नाखुष असतात. शिकवायला कोणी तयार असलं तरी शिकण्याची फारशी कुवत नसल्याने , त्यांचं त्यामुळे फारसं अडत नसल्याने मराठी शिकत नाहीत. दक्षिण भारतीय हे उत्तरेकडच्या भाषा हे न्यूनगंडामुळे किंवा आपण हिंदी शिकलो नाही तर मागे पडू या भितीने हिंदी शिकायचा प्रयत्न करतात. तितका न्यूनगंड बॉलीवूडचे सिनेमे आणि दक्षिण भारतात पसरलेले हिंदीभाषिक यांनी नक्कीच निर्माण केला आहे. हिंदी पट्ट्यात व्यापार वाढवू इच्छिणारे दक्षिण भारतीय लघुउद्योजक/व्यापारी किंवा केंद्र सरकारचे उत्तरेत नोकरी मिळालेले दक्षिण भारतीय कर्मचारी यांनी हिंदी शिकली तर समजण्यासारखं आहे.पण जे यात येतच नाहीत ते दक्षिण भारतीयदेखील हिंदी येत नसल्याचा न्यूनगंड आणि भिती बाळगून आहेत. हिंदीची ही दहशत नक्कीच निषेधार्ह आहे. एक तमिळ माणूस आणि एक तेलुगू माणूस दोघांना तमिळमधून किंवा तेलुगूमधून व्यवस्थित बोलता येत असेल तर त्यांनी दोघांनाही धड येत नसलेल्या हिंदीतून का बरं बोलावं?

In reply to by उपयोजक

भाषिक अस्मिता हि आपली पोळी भाजून घेण्याची चांगली सोय असल्यामुळे राजकारण्यांची अतिशय आवडती असते. लष्करात असणारे सर्व दक्षिण भारतीय आपोआप हिंदी शिकून घेतात. लषकरी अधिकारी ज्या रेजिमेंट मध्ये असतात त्या रेजिमेंटचे भाषा आपोआप शिकून घेतात. जसे सॅम माणेकशॉ गुरखा रेजिमेंट मध्ये होते त्यामुळे त्यांना गोरखली भाषा उत्तम येत असे. असेच माझे तीन चार मित्र गुरखा रेजिमेंट मध्ये होते त्यामुळे त्यांना गोरखाली भाषा उत्तम येते आणि आमचा वर्गमित्र आता नेपाळ लष्कराच्या वैद्यकीय विभागाचा महासंचालक आहे त्याच्याशी छान गोरखाली भाषेत संवाद करतात ज्या मित्रांचे पोस्टिंग पंजाब रेजिमेंट मध्ये होते ते पंजाबी शिकले ज्या अमराठी मित्रांचे पोस्टिंग मराठा किंवा महार रेजिमेंट मध्ये होते ते मराठी शिकले. कुठेही कुणाची अस्मिता दुखावली नाही कि अहंगंड दुखावला नाही. आणि यात व्यवसाय धंदा करण्याचा किंवा पैशाचा प्रश्न नव्हता. माझे कोची ला पोस्टिंग होणार होते तेंव्हा मी मल्याळी शिकायला सुरुवात केली होती आणि ती वाचायला यायला लागली परंतु पोस्टिंग विशाखा पटणम ला झाले आणि मी तेलगू शिकेपर्यंत( एक वर्षातच) परत गोव्याला बदली झाली. आणि मग ते राहूनच गेले याची आता खंत वाटते. हिरानंदानी रुग्णालयात माझ्या दोन्ही सहकारी (एक मल्याळी आणि दुसरी पंजाबी) रुग्णांशी किंवा आमच्या कर्मचाऱ्यांशी उत्तम मराठी बोलत असत. आणि दोघीही जन्मापासून कोट्याधीश आहेत( एक पेडर रोड वर जन्म गेलेली आणि दुसरी हिरानंदानी मध्येच राहत असलेली). मूळ मुद्दा मराठी बोलणे हे त्यांना कमीपणाचे वाटले नाही (बिलो डिग्निटी) किंवा यांचा इगो दुखावला नाही. याउलट जया भादुरी सारख्या नतद्रष्ट बायका येथे बक्कळ पैसे कमावून सुद्धा मला मराठी येत नाही हे भूषण म्हणून सांगतात तेंव्हा त्यांना रस्त्यावर बडवावेसे वाटते.

In reply to by सुबोध खरे

याउलट जया भादुरी सारख्या नतद्रष्ट बायका येथे बक्कळ पैसे कमावून सुद्धा मला मराठी येत नाही हे भूषण म्हणून सांगतात तेंव्हा त्यांना रस्त्यावर बडवावेसे वाटते.
जया बच्चन यांनी बक्कळ पैसे कमावले आहेते हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करुन, मराठी चित्रपटांत (एक अपवाद आहे त्यांच्या मेकअपमनने जेव्हा एक मराठी चित्रपट निर्माण केला होता तेव्हा त्यात जया व अमिताभ बच्चन यांनी अतिथी कलाकार म्हणून भूमिका केली होती) नव्हे. हिंदी चित्रपटांत अभिनय ही त्यांची आवड आणि कमाईचे साधन आहे. या संबंधित एफटीआयआय ही संस्था ज्यात त्यांनी शिक्षण घेतले ती पुण्यात आहे आणि पुढे त्यांचे कार्यक्षेत्र अर्थात चित्र निर्मिती संस्था व बहुसंख्य स्टुडिओज् हे मुंबईत आहेत, म्हणजे आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण आणि व्यवसाय करण्यास त्यांना महाराष्ट्रात यावे लागले. अर्थात एनएसडी ही एक संस्था दिल्लीत देखील आहे पण तिथल्या अभिनय शिक्षणाचा बाज वेगळा आहे त्यामुळे ज्याला एफटीआयआय च्या पद्धतीचे अभिनय प्रशिक्षण हवे असेल त्याला एनएसडी हा पर्याय समर्पक असेलच असे नाही. असो. समजा एफटीआयआय सारखी संस्था आणि विविध चित्रनिर्मिती संस्था / स्टुडिओज् यांची उभारणी जर उत्तर भारतातच केली तर उत्तर भारतीय मंडळींना येथे येण्याची गरज भासणार नाही व महाराष्ट्राच्या लोकसंख्येत अतिरिक्त भर पडून जो सोयीसुविधांवर ताण येत आहे तोदेखील येणार नाही. अर्थात अशा वेळी बॉलीवूड महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही छापाची विधाने मराठी नेतेमंडळींकडून केली जातात त्या दुटप्पी वर्तनाचीही नोंद घ्यावीच लागेल. म्हणजे यूपीत स्टूडिओ बनवायला विरोध आणि इथल्या स्टुडिओत येऊन काम केले तर आमच्या जीवावर कमविता असे डबल स्टँडर्ड विधान करणे तार्किकतेच्या कसोटीवर टिकणारे नाही.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

यातही विरोधाभास असा की जया बच्चन या कट्टर मोदीविरोधक आहेत. हिंदी आग्रह देशभर धरलाय मोदींनी (आणि आता त्यांच्या तर्फे अमित शाह यांनी). म्हणजे हिंदी आग्रहाबाबत जयाजी मोदींसोबत आहेत का? समजा तसे असेल तर हाच हिंदी आग्रह बंगालमध्येही धरण्यात आला तर जयाजींचे काय मत असेल? समजा
मुंबईत असताना मी मराठी बोलणार नाही केवळ हिंदीतच बोलेन
असा पवित्रा त्यांनी घेतला आणि कोलकात्यात गेल्यावर या महानगरात
हिंदीत कामकाज चालणार नाही प्रत्येक कोलकातावासियाला बंगाली आलेच पाहिजे
अशी उलट भूमिका घेतली तर मात्र याबाबत जया बच्चन यांचा निषेधच करावा लागेल.

In reply to by सुबोध खरे

जया भादुरी सारख्या नतद्रष्ट बायका येथे बक्कळ पैसे कमावून सुद्धा मला मराठी येत नाही !
मुंबईत कित्येक वर्षे राहणार्‍या, बक्कळ पैसे कमावणार्‍या किंवा जेमतेम पोट भरणार्‍या बर्‍याच लोकांना मराठी येत नाही. "हम हिंदीमें ही बात करेंगे" चा संदर्भ वेगळा होता (मला आठवते त्याप्रमाणे) त्यांनी इंग्लीश मध्ये बोलण्याला विरोध करत "हम युपीकें हैं, हम हिंदीमें ही बात करेंगे" असे विधान सहज केले होते होते तेव्हा त्याला कसलाही भाषिक, प्रादेशिक, राजकीय विखार नव्हता. "हम हिंदीमें ही बात करेंगे" हे वाक्य पकडून तिच्या विरुद्ध राळ उठवण्यात आली !

In reply to by चेतन सुभाष गुगळे

हे पण मोडतोड केलेले वृत्त वाटते. मला आठवतंय त्या नुसार त्या समारंभात इतर लोक इंग्लीशमध्ये बोलत होते, त्या पार्श्वभुमीवर जया बच्चन तसे म्हणाल्या होत्या. आंजावर त्या समारंभाचे कव्हरेज सापडले नाही (मला तरी... आपणास सापडल्यास नक्की द्या) सगळ्या बातम्या राज ठाकरे आणि जया बच्चनच्या वादाच्या दिसतात.

In reply to by चौथा कोनाडा

तोच संदर्भ आहे. फार जुना (२००८) असल्याने कदाचित वर्तमानपत्रांच्या लिंक्स सापडणार नाही. द्रोण चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी घडलेली घटना आहे. https://youtu.be/-4sBKE9aVQc व्हिडीओ २ मिनिटे १० सेकंदापुढे पाहा. सर्व स्पष्टीकरण मिळेल.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

चेतन सुभाष गुगळेजी, व्हिडीओ संदर्भासाठी धन्यवाद ! पण आधीची दृष्ये त्यात दाखवली नाहीत, विशेषतः " समारंभात इतर लोक इंग्लीशमध्ये बोलत होते" हा. बाकीचे लोक इंग्लीश मध्ये बोलत होते, हिंदी सिनेमाचे प्रमोशन आणि इंग्लीश का ? असे म्हणत "हम युपीकें हैं, हम हिंदीमें ही बात करेंगे" असे विधान सहज केले होते पण पुढे " महाराष्ट्रके लोग हमें माफ करें " या विधानाने त्यांचा घात केला. कदाचित मराठीत नीट बोलता येणार नाही म्हणून त्या असे म्हणाल्या. असो. या संदर्भात काही सापडले तर मी नक्की पोस्ट करेन !

In reply to by चौथा कोनाडा

निदान माझ्या माहितीत (ही माहिती अर्थातच त्यावेळच्या प्रसारमाध्यमांमधूनच मिळालेली) तरी मराठी विरोध म्हणूनच त्या तसे बोलल्या होत्या. २००८ सालची गोष्ट आहे हे ध्यानात घ्या. त्यावेळी राज ठाकरे मराठी सक्ती हा विषय घेऊन एकदम फॉर्मात होते. मनसेला बस्तान बसविण्याकरिता एक विषय हवा होता आणि हिंदी भाषिक मंडळी हे सॉफ्ट टार्गेट होते.

In reply to by चौथा कोनाडा

मला वाटतं भाषा ही माणसाच्या सोयीसाठी बनवली आहे. तिला तश्याच दृष्टीने पाहावं. ज्यांना एखादी भाषा शिकण्याची आवड आहे किंवा आर्थिक इनसेंटिव्ह आहे त्यांनीच भाषा शिकावी. एखाद्याने न शिकल्यास दुसऱ्यांना दुःख होण्याचे काहीही कारण नाही.

In reply to by सुबोध खरे

याउलट जया भादुरी सारख्या नतद्रष्ट बायका येथे बक्कळ पैसे कमावून सुद्धा मला मराठी येत नाही हे भूषण म्हणून सांगतात तेंव्हा त्यांना रस्त्यावर बडवावेसे वाटते.
कायदा सुव्यवस्था सुशासन न्यायदान प्रक्रिया हे केवळ पुस्तकी शब्द नाहीत, त्यांचा व्यवहारात देखील उपयोग करता येतो. तितका संयम नसल्यास निषेध करण्याचे अनेक सभ्य व सुसंस्कृत मार्ग आहेत. कोणत्याही परिस्थितीत पाऊणशे वयाच्या एका महिलेला शारिरीक इजा करण्याची इच्छा होणे व ती समाजमाध्यमावर जाहीर व्यक्त करणे ही निरोगी पुरुषाची मानसिकता नाही.

In reply to by पुंबा

ज्याच्या हाती काठी, त्याची म्हैस प्लासीच्या लढाईत जर, फ्रेंच जिंकले असते तर आज भारतात फ्रेंच भाषेचे वर्चस्व असते .... मराठीसाठी गळे काढणार्‍या कुणालातरी ड्युओलिंगो सारखे एखादे मराठी शिकवणारे अ‍ॅप तयार करावेसे वाटते का? .... हीच खरी गोम आहे. भाषा आधारित मते मिळवायची आणि राज्य हाकायचे ... जाऊ दे, आपल्याला काय करायचे आहे? .... जे ज्ञान हवे आहे, ते ज्ञान ज्या भाषेत उपलब्ध असेल, ती भाषा शिकणे उत्तम ....

( हा प्रतिसाद परभाषिक शब्द न वापरता लिहिण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात येईल ) १. सर्व भारतीय भाषा कोणत्याही प्रकारच्या आधुनिक ज्ञाननिर्मितीसाठी, ज्ञानदळणवळणासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाकडून कळत-नकळत कालबाह्य ठरविल्या जात आहेत. ( घटक- समाज, शासन-प्रशासन, माध्यमं इत्यादि ) २. व्यवहार या पातळीवर भाषा नेहमीच लवचिक राहिली आहे. ती कोणतीही भाषा असो. त्यामुळे भाषिक व्यवहार आणि व्यवहारासाठीची भाषा यांच्यातला फरक आपल्याला करावाच लागेल. दोन्हीकडून रेटा आल्याशिवाय कोणतीही भारतीय भाषा आजच्या रूपात २० वर्षांनी तग धरणार नाही. २. मुलांना कोणत्याही भारतीय भाषेविषयी प्रेमच उत्पन्न होऊ नये अशी व्यवस्था आपण जाणीवपूर्वक उभी केली आहे. ( शिक्षणाचे माध्यम पूर्णपणे बदलणे, दरवर्षी त्याचा खेळखंडोबा करणे इत्यादि. ) भाषेचे प्रेम घेऊन कोणी जन्माला येत नाही. आज मराठी संस्थळ, माध्यमं इत्यादिंवर मराठी लेखन करणारी बहुतेक सर्वजण मराठी माध्यमातूनच शिकली आहेत. १००० मुलांना ५ विषय मराठीतून १० वर्षे शिकवल्यावर त्यातली १० मुले खुद्द 'भाषा' या गोष्टीकडे आत्कृष्ट होतात. ५ मुलांना आवर्जून साहित्य वाचावंसं वाटतं, आणि दोघा तिघांना भाषेवर असे प्रेम जडते की त्यांना भाषेतून ललित अभिव्यक्ती करावीशी वाटते. ३. (किमान उच्च शिक्षण घेतलेल्या शहरी आणि निमशहरी) लोकांना भाषेविषयी इतर अनेक गोष्टींप्रमाणे नुसताच फुकाचा 'हबिमाण', किंवा आजच्या बोलीत 'गर्व' असतो. जरासं खोदून पाहिलं तर त्याच्याखाली अनेक प्रकारचा असुरक्षितपणा, अनेक गंड-न्यूनगंड वळवळ करताना दिसतात. ४. ज्यांना कळवळा आहे अश्या सर्वच जणांना भाषिक भविष्याविषयी फारशी आशा नाही. ज्यांना कळवळा नाही पण जे चाणाक्ष आहेत ते अभिजन, आणि त्यांचा मागोवा घेत जाणारे इतर सर्व आपली मुले इंग्रजी माध्यमात घालतात. त्यापैकी कळवळाधारक परंतु 'आम्ही घरातच (बहुतेकदा क्रियापदापुरती) मराठी बोलतो' वगैरे बोलून स्वतःचे आणि इतरांचे समाधान करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. बाकीच्यांना केवळ एकच भारतीय भाषा येत असल्याने, स्वजातीय कुटुंब असलेला आणि दुसरा भाषिक पर्यायच माहित नसलेला ग्रामीण भाग ज्याने उच्च शिक्षण घेतलेलेच नाही तो मात्र आपापल्या बोलीत सेंद्रियरित्या बोलत असतो. परंतु त्यांच्यात भाषिक अस्मिताच नसते. कारण त्यांच्या रोजीरोटीला भाषिक अस्मिता पूरकही आणि मारकही नसते. ५. आमच्या रावळगुंडवाडीत ९० टक्के लोक कन्नड बोलतात, शासकीय व्यवहारांची भाषा मराठी आहे, घरांतली भाषा कन्नड आहे, लिहायची-वाचायची आणि शिक्षणाची भाषा मराठी आहे, शेतकामांतली भाषा कन्नड आहे. आध्यात्मिक व्यवहाराची भाषा मुख्यत्वे कन्नड आहे. (लिंगायत) मुसलमानीवळणाची दख्खनी बरेच लोक बोलू शकतात. गेल्या हजारवर्षात एकदाही भाषिक संघर्ष झालेला नाही. असला विचारही कोणाच्या मनात येत नाही. शासकीय व्यवहाराची भाषा म्हणून उद्या कोणी रावळगुंडवाडीमध्ये इंग्रजी/हिंदी लादली तरीही काही फार फरक पडणार नाही. कारण स्वभाषेचेच उन्नत आणि औपचारिक स्वरूप आत्ताच्या घडीला सगळ्यांनाच परके आहे त्यामुळे ती भाषा काय किंवा परकी भाषा काय? ६. मुलांची स्थिती मात्र वेगळी आहे. मुलांवर भाषिक संस्कार टीव्ही आणि आता इंटरनेट हेच घडवत आहे. जवळजवळ प्रत्येक मूल दिवसाला २ तास या सरासरीने कार्टून्स पाहतात. त्यामुळे यु-ट्यूब, मेटा या कंपन्यांचे अल्गोरिदम आणि कार्टून-मालिका मुलांची भाषिक समज घडवत आहेत. त्यामुळे भाषेविषयी प्रेम उत्पन्न व्हायला लागणारे भाषिक वैविध्य आणि समृद्धी मुलांना शिक्षणाऐवजी इंटरनेटकडून मिळत आहे. जिथे सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. ७. जगभर सध्या जपानी भाषेची क्रेझ आहे. मुख्य कारण जपानी अ‍ॅनिमे. भारताला असा कोणताच सांस्कृतिक ठेवा निर्माण करता येत नाही. म्हणजे आपल्याकडे त्या गोष्टी नाहीत असे नाही, भरपूर आहे. योगाने जगाला भुरळ घातली आहे. आता योग, अध्यात्म इत्यादि गोष्टींची भाषा ९५ टक्के भारतीयांनाच उपलब्ध नव्हती/नाही, तर त्यांच्यामार्फत जगातले लोक भारतीय भाषांकडे का आकर्षित होतील? आणि आपण तर स्वतःच नैवेद्य सर्व्ह करतो, ह्याच्यात ते मिक्स करतो वगैरे वगैरे.. ८. या सर्वांवरून आजच्या रूपातल्या भारतीय भाषा 'संस्कृतीकरणाकडे' चालल्या आहेत. म्हणजे या 'कल्ट' या रूपात नांदतील. व्यवहारात प्रयोग जवळजवळ शून्य पण अकादमिक रूपात जिवंत राहतील. व्यवहारातली भाषा अशी होईल -> स्थानिक भाषांचे क्रियापदी व्याकरण + बहुतेक इंग्रजी/हिंदी शब्द + नावाला स्थानिक शब्द + रोमन लिपी. अगदी नेमकं सांगायचं म्हणजे महाराष्ट्रात हिंदाळलेली मिन्ग्लिश बोलतील लोक काही वर्षांनी..

In reply to by उपयोजक

तामिळ ही जोडणारी भाषा आहे असे रहमान म्हणाला. द हिंदू ह्या व्रुत्तपत्रात जवळपास रोज ह्या विषयावर लेख येत आहेत. "हिंदीची सक्ती नको' असे स्पष्ट मत दिले जात आहे. मराठी कलावंत नेहमीप्रमाणे कुंपणावर बसून आहेत का ? मागे एका तामिळ चेनलवर रहमान एक वाक्य हिंदीत बोलू लागला. निवेदिकेने त्याला ताबडतोब थांबवला व "हा तामिळ चॅनेल आहे. हिंदी चॅनेल नाही"असे स्पष्ट सांगितले. ही हिंमत मराठी चॅनेलवाले दाखवू शकतील्?शक्यता नाही कारण हे लोक 'विशेष मुलाखती'साठी बॉलिवूड कलावंताना अनेक्वेळा बोलवतात व हिंदीतच मुलाखत घेतात. ए बी पी माझा ह्याचे उदाहरण आहे. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हिंदीला दक्षिणेकडील राज्य परंपरागत पद्धतीने विरोध करतायत हा समज योग्य नाही. हिंदी हि व्यवहारासाठीची भाषा आहे अशी गुळमुळीत सुरुवात करून नंतर सर्व शासकीय स्तरावर उपकृत झालेल्या सरकारी बाबूंची वर्णी लावायची असा मास्टर प्लॅन असू शकतो. अगोदरच एवढे असंवेदनशील, भंकस सरकार सत्तेवर आहे. त्यात आणखीन नोकरशाही देखील सामील झाली तर सामान्य माणसाचे हाल कुत्रं खाणार नाही.

In reply to by सर टोबी

नंतर सर्व शासकीय स्तरावर उपकृत झालेल्या सरकारी बाबूंची वर्णी लावायची असा मास्टर प्लॅन असू शकतो. उगाच काहींच्या काही. तामिळनाडू शासनात स्थानिकांचीच भरती होते आणि त्यात तामिळ आवश्यक असते. तर केंद्र सरकारच्या कोणत्याही खात्यात कोणतीही स्थानीय भाषा अत्यावश्यक नसते. इतकी वर्षे काँग्रेसचे सरकार हिंदी ची सक्ती करत होते तेंव्हा पासून बाबूंची वर्णी लावली होती का? हा प्रश्न खरं तर पक्ष विरहित आहे. राजकारणासाठी तामिळ अस्मितेचा प्रश्न पणाला लावल्यापासून हिंदी तामिळ असा संघर्ष सुरु झाला तसाच संघर्ष तामिळ आणि कन्नडिगा यांच्यात कावेरी नदीच्या पाण्यासाठी झाला. जिथे तिथे राजकारण्यांच्या भल्यासाठी अस्मिता आड येते हेच खरे

अतिशय बेदबाबदार विधान. सुशिक्षीत माणूस मोठा पदावर नसला की काय होतं ह्याचं ऊदाहरण.

म्हणुन घटनेने निवडली आहे. त्यामुळे अमित शहा काही नवीन विचार आणत नाहीयेत. गुलाम लोक उगीचच गळा काढत आहेत. मुम्बैत उर्दु भवन सुरु करायचे प्रयत्न चालु आहेत ते निमुट बघायचे. मराठी आणि हिन्दी ज्या समान देवनागरी लिपी वापरतात त्याना आपापसात भान्डायला लावायचे. हिन्दी भाषिक लोकान्ची मुम्बैत मराठी मधे न बोलण्याची दादागिरि असते तर तो त्या लोकान्चा माजोरडेपणा आहे. त्यात हिन्दी भाषेचा काहिही दोष नाही. खालील लिखाण मला Canada मधील University च्या साइट वर मिळाले. https://www.uottawa.ca/clmc/language-provisions-constitution-indian-uni… Article 343 Official language of the Union (1) The official language of the Union shall be Hindi in Devanagari script. The form of numerals to be used for the official purposes of the Union shall be the international form of Indian numerals. (2) Notwithstanding anything in clause (1), for a period of fifteen years from the commencement of this Constitution, the English language shall continue to be used for all the official purposes of the Union for which it was being used immediately before such commencement: Provided that the President may, during the said period, by order authorise the use of the Hindi language in addition to the English language and of the Devanagari form of numerals in addition to the international form of Indian numerals for any of the official purposes of the Union. (3) Notwithstanding anything in this article, Parliament may by law provide for the use, after the said period of fifteen years, of (a) the English language, or (b) the Devanagari form of numerals, for such purposes as may be specified in the law.