✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

त्यांनी हिंदीत का बोलावं?

उ
उपयोजक यांनी
Mon, 04/11/2022 - 18:52  ·  लेख
लेख
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी. https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-different-states-should-speak-hindi-not-english-shah-7858861/lite/ या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे. आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल. आता प्रश्न असे आहेत. १. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का? २. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? ३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी? ४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा? ५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
105992 वाचन

💬 प्रतिसाद (510)

प्रतिक्रिया

सर

जेम्स वांड
Mon, 04/25/2022 - 17:31 नवीन
राजस्थानी अशी एकही भाषा अस्तित्वात नसून राजस्थानात बोलली जाणारी भाषा ही मारवाडी ही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

चेतन

उपयोजक
Sun, 04/17/2022 - 09:14 नवीन
आताशा इंग्रजी ज्ञान वाढले असल्याने इतके गैरसमज होत नाहीत चांगलंय की मग! म्हणजे हिंदीला दूर ठेवण्यात चांगलं यश मिळवलंय द.भा नी. हिंदी येत असली तरी मुद्दामच बोलत नाहीत. समोरच्याची अडचण करणे हाच मुख्य उद्देश असतो. त्यांच्याशी उत्तरभारतीय हिंदीत का बोलतात? मोडक्यातोडक्या इंग्रजीत का असेना ते मदतीला तयार असतात. मग समोरच्याची अडचण करणे हा उद्देश कसा काय बुवा? किती मराठी लोकांना शेजारच्या कर्नाटकाची कन्नड किंवा तेलंगणाची तेलुगू येते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

आय टी

कपिलमुनी
Mon, 04/11/2022 - 20:48 नवीन
आयटी सेक्टर मध्ये तर महाराष्ट्रात हिंदी सर्वमान्य भाषा असल्या सारखी वापरतात. चेन्नई मध्ये मात्र तमिळ आणि इंग्रजी वापरावी लागते
  • Log in or register to post comments

बँक ऑफ महाराष्ट्र मधे तर

विजुभाऊ
Mon, 04/11/2022 - 23:51 नवीन
बँक ऑफ महाराष्ट्र मधे तर हल्ली सगळा अमराठी कर्मचारीवर्ग आहे. आपले सरकार भाषेच्या बाबतीत इतके गुळमुळीत धोरण का स्वीकारते कोण जाणे. हिंदी भाषीकांचा इतर भाषा शिकण्यास इतका विरोध का असतो हे कोणी समजावून सांगेल का? दुसरे म्हणजे की या हिंदी भाषिकांना इतर राज्यात कामसाठी जायला भाग पाडणारे त्यांचे नेते जनतेला राज्यात कामे नोकर्‍या का मिळत नाहीत या बाबतीत मौन धारण करतात.
  • Log in or register to post comments

विजुभाऊ

उपयोजक
Tue, 04/12/2022 - 08:02 नवीन
आपले सरकार भाषेच्या बाबतीत इतके गुळमुळीत धोरण का स्वीकारते कोण जाणे. मतांसाठी. आम्ही तुमची सोय करतो तुम्ही आम्हाला एकगठ्ठा मतदान करा असे डिल असते. हिंदी भाषीकांचा इतर भाषा शिकण्यास इतका विरोध का असतो हे कोणी समजावून सांगेल का? त्यांचं म्हणणं असतं की आम्ही तुमच्या राज्यात आलोय ते पैसे कमवायला. तुमची राज्यभाषा शिकत बसणं हे आमच्यासाठी जादाचं काम/डोक्याला ताप आहे. आम्ही तो का करुन घेऊ? राज्यभाषा न समजल्याने येणार्‍या अडचणींना हे हिंदीभाषिक कोणाच्या ना कोणाच्या मदतीने मॆनेज करतात. जसे की ज्यांची मोलकरीण किंवा दुकानात नोकर ठेवायची ऐपत आहे ते घरातली मोलकरीण दुकानातला नोकर ही स्थानिक भाषा येणारीच ठेवण्याला प्राधान्य देतात. मुंबईसारख्या मराठी लोकसंख्या कमी असणार्‍या शहरातही बहुसंख्य मोलकरणी या मराठीच का असतात हे लक्षात यावे. जे हिंदीभाषिक हातगाडीवर व्यवसाय करतात ते मराठी न समजल्याने अडचण आल्यास मराठी हातगाडीवाल्याची मदत घेतात.शेजारी कोणी मराठी व्यावसायिक असेल तर त्याच्याकडून मदत मिळवतात. वेळ मारुन नेतात. स्थानिक लोक स्वत:च या हिंदीभाषिकांच्या मदतीला तत्पर असल्याने ते राज्यभाषा शिकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

दक्षिणेतल्या सर्वसामान्य

कानडाऊ योगेशु
Tue, 04/12/2022 - 00:27 नवीन
दक्षिणेतल्या सर्वसामान्य लोकांना इंग्लिश येतेच येते हा ही एक भ्रम आहे. काही वर्षापूर्वी काही कामानिमित्त चेनै मध्ये होतो तेव्हा हे जाणवले. पण एक निदर्शनाला आलेली बाब म्हणजे जिथे मुस्लिम समुदायाची दुकाने होती तिथे हिंदीमध्ये बोलणे चालुन गेले. हाच अनुभव एका सौदेंडियन मित्रानेही सांगितला हैद्राबादमध्ये असल्यामूळे उर्दूमिश्रीत हिंदी बोलु शकत होता त्यामुळे दुसर्या दाक्षिणात्य प्रदेशात गेल्यावर बाय डिफॉल्ट मुस्लीम दुकानदार किंवा स्टाफ असलेल्या दुकानातच जायचा. हिंदी ला प्रमोट करण्यामागे हाही एक उद्देश असावा म्हणजे कर्नाटकातल्या एका खेडेगावातला मनुष्य तामिळनाडु अथवा केरळामधल्या एका शहरात गेला वा ह्याच्या उलट झाले तर जी गैरसोय होईल ती हिंदीमुळे काही प्रमाणात कमी होऊ शकेल. पण हिंदी भाषिकांची अरेरावी सहन करण्यापलिकडे असते हे ही एक निरिक्षण नोंदवतो.
  • Log in or register to post comments

ह्या प्रतिसाद दुर्लक्षणे महागात पडू शकते

चेतन सुभाष गुगळे
Sun, 04/17/2022 - 19:11 नवीन
मुस्लिम समुदायाची दुकाने होती तिथे हिंदीमध्ये बोलणे चालुन गेले. हाच अनुभव एका सौदेंडियन मित्रानेही सांगितला हैद्राबादमध्ये असल्यामूळे उर्दूमिश्रीत हिंदी बोलु शकत होता त्यामुळे दुसर्या दाक्षिणात्य प्रदेशात गेल्यावर बाय डिफॉल्ट मुस्लीम दुकानदार किंवा स्टाफ असलेल्या दुकानातच जायचा.
हिंदी ला प्रमोट करण्यामागे हाही एक उद्देश असावा म्हणजे कर्नाटकातल्या एका खेडेगावातला मनुष्य तामिळनाडु अथवा केरळामधल्या एका शहरात गेला वा ह्याच्या उलट झाले तर जी गैरसोय होईल ती हिंदीमुळे काही प्रमाणात कमी होऊ शकेल.
हा एक फार महत्त्वाचा मुद्दा इथे मांडला गेला आहे. हिंदी विरोध करुन कोणाचं नुकसान होईल हे येथे लक्षात येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

हिंदी ल विरोध करून कोणाचे नुकसान होईल

sunil kachure
Sun, 04/17/2022 - 19:36 नवीन
आकडेवारी बघितली तर हिंदी भाषिक लोक खूप मोठ्या संख्येने (प्रचंड हा शब्द अगदी योग्य आहे)बिगर हिंदी भाषा असलेल्या राज्यात स्थलांतरित झालेली आहेत. हिंदी संपर्क भाषा असण्याचा सर्वात जास्त फायदा हिंदी भाषा असणाऱ्या लोकांना आहे. तमिळ,कर्नाटक मध्ये,कर्नाटकी तमिळ nadu मध्ये.मराठी लोक दक्षिण भारतात गेले आहेत ते जास्त करून शिक्षित आहेत इंग्रजी जाणतात. मोजकेच लोक अशिक्षित आहेत. त्या मुळे हिंदी चे समर्थन करण्यासाठी दक्षिण भारतातील आपसात झालेल्या स्थलांतरित लोकांची किंवा मराठी लोक कर्नाटक मध्ये गेल्यावर काय होईल . ही लंगडी उदाहरणे आहेत. हिंदी भाषा संपर्क भाषा म्हणून पण बिगर हिंदी राज्यांनी स्वीकारली नाही तर. हिंदी भाषिक पट्टा आर्थिक संकटात नक्की सापडेल. दुर्दशा पण होवू शकते. पण इतके प्रचंड नुकसान हिंदी न स्वीकारल्या मुळे बिगर हिंदी राज्यांचे होणार नाही. स्थलांतरित लोकांची आकडेवारी तपासा . पटेल हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

आकडेवारी बघितली तर हिंदी

चेतन सुभाष गुगळे
Sun, 04/17/2022 - 19:52 नवीन
आकडेवारी बघितली तर हिंदी भाषिक लोक खूप मोठ्या संख्येने (प्रचंड हा शब्द अगदी योग्य आहे)बिगर हिंदी भाषा असलेल्या राज्यात स्थलांतरित झालेली आहेत.
ह्या पहिल्या मुद्द्याबाबत अनेकांना फार मोठे गैरसमज आहेत. त्यांना तिकडे खायला मिळत नाहीत म्हणून इथे येतात हा त्यातला एक. वस्तुस्थिती सर्वच ठिकाणी अशी नाही. सरकारी योजना रोहयो / मनरेगा वगैरेमुळे त्यांना पोटाला पुरेल इतके त्यांच्या राज्यांत देखील बर्‍यापैकी मिळते. आपल्या लोकांना त्यांची जास्त गरज आहे. मी धुळ्यात असताना आणि उर्वरित महाराष्ट्रात देखील बरेच ठिकाणी पाहिले आहे. बारा तास स्वस्तात राबू शकणारे मनुष्यबळ म्हणून आपल्या इथले उद्योजक ठेकेदारामार्फत त्यांना त्यांच्या गावी जाऊन चांगले अमिष दाखवून इथे मजूरीकरिता आणतात. २०१४ चा रेट सांगतो रुपये दीडशे फक्त + जेवण + निवासाची सोय यावर रोज बारा तास राबणारे मजूर सर्रास ठेकेदारामार्फत बिहार झारखंड छत्तीसगड उत्तरप्रदेश येथून मागविला जाई. अनेकदा तर इथे सहा महिने काम केल्यावर ते कंटाळत घरी जायची मागणी करीत तरी ठेकेदार त्यांना कधी प्रेमाने तर कधी सक्ती धाकदपटशाचा उपयोग करुन येथेच अडकवून ठेवत. पगार महिन्याच्या महिन्याला पूर्ण न देता बराचसा स्वतःकडे सिक्यूरिटी डिपॉझिटच्या नावाखाली दाबून ठेवणे ही अजून एक धूर्त खेळी असे. तरीही मग फारच असह्य झाले तर ठेकेदाराची नजर चुकवून बाकी पगारावर पाणी सोडत ही मुले मिळेल त्या वाहनाने पळून स्वतःच्या गावी जायचा प्रयत्न करीत पण जर तेव्हा ठेकेदाराच्या तावडीत सापडले तर असह्या मार खावून पुन्हा येथेच काम करावे लागे. हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी जवळून पाहिले आहे. या अमराठी तरुणांना तुम्ही मराठी / इंग्रजीची सक्ती करणार काय? त्याचवेळी स्थानिक मराठी मजूर तीनशे ते साडेतीनशे रुपये रोजाने (बारा तास) मिळे + त्यांच्या वाहतूकीकरिता सिक्स सिटरची सोय करावी लागे. स्थानिक जत्रा, देवीचा सण असे काही निमित्त काढून सुट्या घेण्याची प्रवृत्ती यामूळे कामाचे फार नुकसान होई. अशा परिस्थितीत मराठी उद्योजकाला देखील एक तर बाहेरचा मजूरच ठेवणे (त्याकरिता मनसेला खंडणी देऊन देखील) परवडते किंवा मग मराठी मजूर ठेवला तर स्वतःच्या उत्पादनाची किंमत वाढवणे भाग पडते ज्याचा परिणाम खप कमी होण्यात होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

विषयांतर करत आहात

sunil kachure
Sun, 04/17/2022 - 20:08 नवीन
स्थलांतर करणाऱ्या लोकात हिंदी भाषिक लोकांचे बिगर हिंदी प्रदेशात प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले आहे. ह्याची आकडेवारी बघा. ह्या मुळ. विषयाला कलाटणी देवून स्वस्त मजूर,आपली गरज . हे विषयाशी संबंधित नसलेले मुद्ध्ये पुढे करू नका. अगदी काल परवा पर्यंत बिहार सारख्या राज्यात पगार सोडा फक्त मोजकेच अन्न देवून लोकांकडून काम करून घेतली जात होती. बंदुकीच्या जोरावर. स्थलांतरित झाल्या मुळे च त्यांची त्या मधून सुटका झाली हे पण सत्य आहे. त्या मुळे आपल्या फायद्या साठी त्यांना इथे आणले ह्या वाक्याला काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

अगदी काल परवा पर्यंत बिहार

चेतन सुभाष गुगळे
Sun, 04/17/2022 - 23:41 नवीन
अगदी काल परवा पर्यंत बिहार सारख्या राज्यात पगार सोडा फक्त मोजकेच अन्न देवून लोकांकडून काम करून घेतली जात होती. बंदुकीच्या जोरावर.
हे वीस वर्षांपूर्वी पर्यंत खरं होतं. नंतर परिस्थिती बदलली आहे.
विषयाला कलाटणी देवून स्वस्त मजूर,आपली गरज . हे विषयाशी संबंधित नसलेले मुद्ध्ये पुढे करू नका. त्या मुळे आपल्या फायद्या साठी त्यांना इथे आणले ह्या वाक्याला काही अर्थ नाही.
विषयाशी संबंध नाही कसा? आपण स्वतः आणलेल्या मजूरांना कशी काय भाषिक सक्ती करणार? स्वस्त मजूर धंद्याकरिता फायद्याचे ठरतात म्हणून उद्योजक त्यांना ठेवतात ही वस्तुस्थिती आहे. सर्व एम आय डी सी भागात जाऊन खात्री करु घ्या. त्यांना ठेवू नये याकरिताच मनसेनी आंदोलने केलीत आणि नंतर एखादे स्क्रॅप उचलण्याचे कंत्राट किंवा मोठ्या रकमेच्या खंडणीवर सेटलमेंट केली. मी शिवसेना सोडली तेव्हा फक्त माणसे सोबत आली, शिवसेनेचे फंड्स मला मिळाले नाहीत. पक्ष वाढविण्याकरिता पैसा लागतो असे समर्थन देखील या तोडपाण्याबद्दल राज ठाकरेंनी केले होते. २००८-०९ मध्ये मी स्वतः हे रांजणगाव - कारेगाव या एमआयडीसीत आणि जवळच्या शिरूर - सुपे येथील उद्योग धंद्यांमध्ये पाहिलं आहे. ही खंडणी गोळा करण्याकरिता जी विशिष्ट माणसे मोठ्या प्रमाणात नेमली होती आता ती भोंगा प्रकरणापासून मनसेला सोडून जात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

मजुरांचे वर्गीकरण महत्वाचे आहे

Trump
Sun, 04/17/2022 - 23:55 नवीन
श्री गुगळे यांचा मुद्दा बरोबर आहे. (मराठी मजुर मिळायला अवघड जाते, मिळाले तरी परवडत नाही. इतर कारणे त्यांनी वरती दिली आहेतच.) -मजुरांचे वर्गीकरण महत्वाचे आहे. ते कुशल / अकुशल, तात्पुरते रहिवासी / दिर्घमुदतीचे रहिवासी इ. गोष्टी महत्वाच्या आहेत. -- तात्पुरत्या आलेल्या मजुरांना मराठी शिकवण्यात व शिकण्यात काही रस नाही, ते दोन्हीबाजुने परवडणारे नाही.. व्यवहारीक मराठी आले तरी पुरेसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

मराठी मजुर मिळायला अवघड जाते,

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/18/2022 - 00:05 नवीन
मराठी मजुर मिळायला अवघड जाते, मिळाले तरी परवडत नाही. कमी मजूरी देऊन मजूराला पिळून काढायचे नी बक्कळ नफा कमवायचा,वरून मजूर मिळत नाही म्हणून बोंबलायचे. असली कामे मराठी माणूस करत नाही कारण त्यालाईतरत्र कमी श्रमात चांगला मोबदला मिळतो. ह्या ऊलट कुत्र-डूकरांसारखी मानवी पैदास करून त्याना खाऊ घालणे जमत नाही म्हणून महाराष्ट्रात मजूरी करायला नी हिंदी लादायला पाठवायचे. आता ह्यात चुक कोणाची मराठी माणसाचीच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

तुमचा उद्वेग समजला.

Trump
Mon, 04/18/2022 - 00:08 नवीन
तुमचा उद्वेग समजला. कमी मजूरी देऊन मजूराला पिळून काढायचे नी बक्कळ नफा कमवायचा तो धंद्याचा नियम आहे आंइ भांडवलशाहीच तेच चालते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तो धंद्याचा नियम आहे आहे. भांडवलशाहीत तेच चालते.

Trump
Mon, 04/18/2022 - 00:28 नवीन
तो धंद्याचा नियम आहे आहे. भांडवलशाहीत तेच चालते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

त्यांना मजुरीवर ठेवणारे चूक की बरोबर हे ठरवा

चेतन सुभाष गुगळे
Mon, 04/18/2022 - 00:26 नवीन
ह्या ऊलट कुत्र-डूकरांसारखी मानवी पैदास करून त्याना खाऊ घालणे जमत नाही म्हणून महाराष्ट्रात मजूरी करायला नी हिंदी लादायला पाठवायचे. आता ह्यात चुक कोणाची मराठी माणसाचीच का?
स्वखुशीने आलेले सोडाच. पण मराठी उद्योजक देखील जेव्हा त्यांना पैसे वाचविण्याकरिता इथे प्रयत्नपूर्वक बोलावून घेतात तेव्हा ती चूक कोणाची असते. चितळेंच्या म्हशी धुणारे बिहारी मजूर आहेत. आता काय यांना सक्ती केली होती का बिहारी मजूर नेमायची? यांनी मराठी माणसे का नेमली नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कारण त्याना बिहारात काम मिळत

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/18/2022 - 00:44 नवीन
कारण त्याना बिहारात काम मिळत नाही म्हणून ईथे पडेल तिया मजूरात काम करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

मराठी मजूर कमी पैशात काम करत

कानडाऊ योगेशु
Sat, 04/23/2022 - 21:49 नवीन
मराठी मजूर कमी पैशात काम करत नाहीत असे मलाही वाटत होते.पण काही वर्षांपूर्वी बंगळूरात असताना काही मजूरांचा एक ग्रुप टपरीवर चहा पित होता काही मराठी शब्द कानावर पडले म्हणुन लक्षपूर्वक ऐकले तर ते चक्क मराठी बोलत होते म्हणजे पोटासाठीची भटकंती महाराष्ट्रातुनही इतरत्र प्रदेशात होत होती/असावी. हीच गोष्ट भिकार्यंची बंगळुरात आणि तिरुपतीला "तुम्ही मराठी आहात का?" असे विचारणारे एक गरीब बिचारे वाटणारे जोडपे व कधीतर सोबत एखादे मूल असा परिवार जवळ येत असत.संवादाला जर प्रत्युत्तर दिले तर काहीही कारण सांगुन पैशाची मागणी होत असे. हा अनुभव मुंबईत आला होता व एकदा फसलोही होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ठरवून सत्य मान्य न करणे

sunil kachure
Sat, 04/23/2022 - 22:37 नवीन
ठरवून ,हट्ट नी ,सत्य मान्य न करणे. चुकीची अपुरी माहिती देवून सत्य काही वेगळेच आहे असे भासवन . ह्यालाच च आडगेपणा म्हणतात. मराठी लोक,कामगार,भिकारी दुसऱ्या राज्यात काम करायला जात नाहीत असा दावा कोणीच केला नाही. मराठी लोक पण दुसऱ्या राज्यात जातात मजुरी,किंवा नोकऱ्या करायला. पण त्यांचे प्रमाण किती आहे? ते बघा ना . बिहारी आणि यूपी किंवा बाकी राज्यांची लोक दुसऱ्या राज्यात किती कोटी आहेत आणि मराठी लोक दुसऱ्या राज्यात किती आहेत जे मजुरी किंवा नोकऱ्या करायला गेले आहेत. फक्त अगदी लाखात च संख्या असेल पूर्ण देशात. आणि फक्त बिहार ची लोक जी दुसऱ्या राज्यात गेली आहेत त्यांची संख्या किती तरी कोटी आहे. तुलना तरी होवू शकते का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

दोन प्रश्न . . .

सुक्या
Tue, 04/12/2022 - 06:04 नवीन
हिंदी चालत नसेल तर परदेशी असलेली इंग्रजी का चालते किंवा का चालावी? व परदेशी असलेली इंग्रजी चालते तर हिंदी का चालु नये? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे कुणी देईल का? दक्षिणेत हिंदी चालत नाही यामागे फुकाचा अभिमान आहे. आजवर कुठल्याही राज्यात ते महाराष्ट्र असो की गुजरात की ओरिसा. इथे लोक हिंदी बोलतात व तितक्याच त्या त्या राज्यांच्या बोलीभाषा बोलल्या जातात. कुठेही हिंदी चे आक्रमण दिसत नाही. राहीला प्रश्न शहरी भागात, जिथे अठरापगड लोक एकत्र येतात तिथे एक सामाइक भाषा असतेच. मग ती साईन लँगवेज का असेना. शहरी भाग म्हणजे खिचडी असते .. कुठेही जा. गंम्मत अशी आहे .. की चेनै सारख्या ठिकाणी मोडकी तोडकी इंग्रजी बोलुन हसं करुन घेतात लोक. पण फुकाच्या अभिमनापायी दुसरी भाषा मात्र शिकणार नाहीत.
  • Log in or register to post comments

सुक्या

उपयोजक
Tue, 04/12/2022 - 08:12 नवीन
इंग्रजी का चालते किंवा का चालावी? इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. ती ज्ञानभाषा आहे. ती शालेय अभ्यासक्रमांतून काढून टाकल्यास नुकसान आपलेच होईल. निव्वळ संपर्क साधणे ,कामचलाऊ संवाद साधणे याच्या बरेच पलिकडे इंग्रजी भाषेचे उपयोग आहेत. हिंदी ही ज्ञानभाषा नाही.ती निव्वळ संपर्कभाषा आहे. त्यापलीकडे या भाषेचा काडीचाही उपयोग नाही.त्यामुळे शालेय अभ्यासक्रमांतून हिंदी हाकलली तरी काहीही बिघडत नाही. कुठेही हिंदी चे आक्रमण दिसत नाही. डोळ्यावर पट्टी बांधून फिरता की काय? मुंबईत हिंदी ही सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. महाराष्ट्रातल्या बाकीच्या मोठ्या शहरांचीही तीच अवस्था आहे. चेनै सारख्या ठिकाणी मोडकी तोडकी इंग्रजी बोलुन हसं करुन घेतात लोक. चेन्नैतल्या लोकांनी मोडकीतोडकी हिंदी बोलली तर चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

?

कॉमी
Tue, 04/12/2022 - 08:51 नवीन
इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. ती ज्ञानभाषा आहे. ती शालेय अभ्यासक्रमांतून काढून टाकल्यास नुकसान आपलेच होईल.
हा विचार कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा नसावा. अमित शहांचे सुद्धा असे मत शंभर टक्के नसणार. ज्ञानभाषा म्हणजे काय असते ? हिंदी ज्ञानभाषा का नाही ? भाषेचा उपयोग संवाद साधणे हा असतो. तो हिंदीचा सुद्धा आहे. हिंदी भाषिक लोकांनी मुंबईत येऊन राहणे म्हणजे आक्रमण समजायचे का- मग दाक्षिणात्य शहरांमध्ये- उदा चेन्नई बेंगलोर हैदराबाद- इथे मराठी लोकं नोकऱ्या करतात, ते ही आक्रमण म्हणायचे का ? (कारण दाक्षिणात्य भाषा तिथल्या मराठी लोकांनी शिकून घ्याव्यात असे कधीही कुठून ऐकायला वाचायला मिळत नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

कॉमी

उपयोजक
Tue, 04/12/2022 - 21:52 नवीन
ज्ञानभाषा म्हणजे काय असते वैज्ञानिक चर्चा नेमक्या संज्ञा वापरुन करता यावी इतक्या ताकदीची भाषा म्हणजे ज्ञानभाषा. आज तांत्रिक तसेच वैद्यकिय क्षेत्रातले सर्वात कठीण अभ्यासक्रम हे इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सर्वाधिक शोधनिबंध हे इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होतात. इंग्रजीचा एकूण शब्दसाठा हा ५ लाखांपेक्षा जास्त आहे. इंग्रजी खालोखाल जर्मन तसेच जपानी , कोरियन यांना ज्ञानभाषा म्हणता येईल. कारण या भाषांमधे उच्च तांत्रिक शिक्षण उपलब्ध तर आहेच पण त्या देशातली बहुसंख्य जनता त्या भाषांमधून स्वखुशीने तांत्रिक अभ्यासक्रम शिकायला तयार असते. हे सगळं हिंदी भाषेबाबत होतं का? आहे का ताकद तितकी हिंदी भाषेची. आता हिंदीची ताकद किती आहे ते एका सोप्या उदाहरणावरुन स्पष्ट करतो. तुम्ही महाराष्ट्रात सरकारी बँकेचं नाव तीन भाषांमधे फलकावर पाहिलं असेल. ते State bank of India स्टेट बैंक ऑफ इंडिया आणि मराठीत स्टेट बँक ऑफ इंडिया असे लिहिलेले आढळेल. अता हिंदीत बैंक का? आणि मराठीत बँक असं का? तर हिंदीच्या खड़ी बोलीत ै चा उच्चार ॅ असा होतो. पण गंमत अशी की याच हिंदीच्या अवधि ,मैथिली या भाषांमधे मात्र ै याचा उच्चार ऐ असाच आहे. आठवा अनुप जलोटांचं भजन मैय्या मोरि मैं नहीं माखन खायो यात तुम्हाला मॅया असा उच्चार ऐकू येणार नाही. थोडक्यात प्राथमिक गोष्टींमधेच हिंदीत एकवाक्यता नाही.अशी ही निव्वळ संवादापुरती असलेली , पाच गावचा पाचुंदा गोळा करुन 'बनवलेली' भाषा ज्ञानभाषा होईलच कशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

हिंदी ही अविकसित बिमारू

श्रीगुरुजी
Tue, 04/12/2022 - 21:58 नवीन
हिंदी ही अविकसित बिमारू राज्यांची भाषा आहे. मराठी माणसे या बिमारू भाषेत बोलताना दिसली की लाज वाटते व संतापही येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.

कॉमी
Tue, 04/12/2022 - 22:10 नवीन
स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

बहुतांशी सहमत

तर्कवादी
Wed, 04/13/2022 - 14:05 नवीन
हिंदीमध्ये तसेही अनेक इंग्लिश शब्द वापाले जातात. मराठीप्रमाणे हिंदीत शुद्ध भाषेचा आग्रह फारसा नाही. सुशिक्षित वर्गात बोलताना जरी मराठीत इंग्लिशची भेसळ वाढली असली तरी चांगल्या दर्जाची मराठी वृत्तपत्रे , पुस्तके , काही चांगले मराठी चित्रपट व मालिका (अलिकडे मी टीव्ही चॅनेलवरील मालिका बघत नाही पण पुर्वी बघितलेल्या काही मालिका आठवतात) यामध्ये मराठी बहुतांशी शुद्ध असते. पण हिंदीत तसे नाही. हिंदी वृत्तपत्रे चुकून हाता आली तरी हातात धरवत नाहीत.. त्यातली भाषा वाचून फारसा आनंद मिळतच नाही. हिंदीतले चित्रपटही कथा, अभिनय, तंत्रज्ञान ई मुळे बघायला आवडत असले तरी त्यातून मधूर संवादांचा , भाषेतील सौंदर्याचा आनंद अभावानेच मिळतो (फक्त चटपटीत संवादांची मात्र रेलचेल असते ) . त्याऐवजी मी असे अनेक मराठी चित्रपट सुचवू शकतो जे मला संवादांत असलेले भाषेचे नादमाधुर्य , भाषेतील अलंकारांचा उत्कृष्ट प्रयोग , भावना नेमकेपणाने व्यक्त करणारे शब्द याकरिता खूप आवडलेत...(या चित्रपटांना "मै जो कहता हू वो मै करता हू " किंवा "मैने एक बार कमिट कर दी...." छाप चटपटीत संवादांची गरज नसते ) हिंदीतली भेसळ अफाट आहे - इंग्लिश आणि उर्दु /फारसी (आणि माहित नाही अजून कोणकोणत्या भाषा असतील यात असो !!) - तजुर्बा , मद्दे नजंर , बाईज्जत बरी , इत्तेदा , इन्तेहा, बावजूद , दर्खास्त , हैसियत आणि काय काय .. असली प्रचंड भेसळ असलेली हिंदी फक्त कामचलाऊ भाषा वाटते.. मग अशी प्रचंड भेसळ असलेली भाषा दक्षिणी लोकांना शिकाविशी वाटली नाही तर त्यात काय नवल ? मला कोणतीही दक्षिणी भाषा येत नाही पण तरी माझा अंदाज आहे की त्या भाषांत भेसळ ही खूप कमी असावी ... त्या लोकांनी आपली भाषा भेसळीपासून जपली असावी. मराठीत जसे सावरकरांनी भाषाशुद्धीकरणाचा भाग म्हणून अनेक सुलभ , कर्णमधूर असे नवीन मराठी शब्द या भाषेला दिलेत तसे काही प्रयत्न हिंदीत फारसे झाले असावेत असे दिसत नाही खरं तर हिंदी भाषिकांनी हिंदीची उपेक्षा केली आणि अशी भेसळीची भाषा दुसर्‍यांवर लादू पाहत आहेत.. उदाहरणादाखल नवभारत टाईम्स या नावाजलेल्या वृत्तपत्रातील एका बातमीतला काही भाग खाली डकवत आहे कर्नाटक में मंगलवार को संतोष पाटिल नाम के एक ठेकेदार ने आत्महत्या कर ली। बीजेपी का समर्थन करने वाले संतोष ने अपने सूइसाइड नोट में लिखा कि राज्य के ग्रामीण विकास और पंचायत राज मंत्री केएस ईश्वरप्पा के कारण वह आत्महत्या कर रहा है। उसने यह भी आरोप लगाया कि उससे 40 पर्संट कमिशन मांगा जा रहा है इसलिए वह परेशान है। संतोष की मौत के बाद कर्नाटक की राजनीति गरमा गई है। केएस ईश्वरप्पा विवादों में आ गए हैं। विपक्ष ईश्वरप्पा का मंत्रिमंडल से बर्खास्त करने की मांग कर रहा है। फिलहाल उडुपी पुलिस ने ईश्वरप्पा के खिलाफ एफआईआर दर्ज कर ली है। ईश्वरप्पा ने इस मामले में सफा दी है कि 'मैं नहीं जानता कि संतोष पाटिल कौन हैं। मैंने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई से घटना की जांच करने को कहा है।' यह पहली बार नहीं है जब ईश्वरप्पा विवादों में आए हैं। वह कर्नाटक के ऐसे बीजेपी नेता हैं जो आएदिन अपने विवादित बयानों को लेकर सुर्खियों में बने रहते हैं। ईश्वरप्पा ही वह नेता हैं जिन्होंने येदियुरप्पा को मुख्यमंत्री पद से हटाने की अगुवाई की थी। हालांकि इस बार ईश्वरप्पा वह फंसते नजर आ रहे हैं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

असली प्रचंड भेसळ असलेली हिंदी

चौथा कोनाडा
Wed, 04/13/2022 - 17:29 नवीन
असली प्रचंड भेसळ असलेली हिंदी फक्त कामचलाऊ भाषा वाटते..
याचा अर्थ तिची अर्थात संपर्क भाषा म्हणजेच युनिव्हर्सल भाषा होण्याकडे वाटचाल चालू आहे ! म्हणजेच इंग्रजी प्रमाणे. (सध्या काही प्रमाणात आहेच)
मराठीत जसे सावरकरांनी भाषाशुद्धीकरणाचा भाग म्हणून अनेक सुलभ , कर्णमधूर असे नवीन मराठी शब्द या भाषेला दिलेत तसे काही प्रयत्न हिंदीत फारसे झाले असावेत असे दिसत नाही
सध्याच्या वेगवान आयटी काळात भाषाशुद्धीकरणाची संकल्पना कालबाह्य झाली की काय असे वाटते.
खरं तर हिंदी भाषिकांनी हिंदीची उपेक्षा केली
असं काही झालं नाही, इतर भाषिकांनी हिंदी आपलीशी करताना त्यांच्या भाषेतील शब्द देखिल मिसळले.
उदा. मराठीमुळे "वाट लगाना" हा वाक्प्रचार रुढ झाला !
... आणि अशी भेसळीची भाषा दुसर्‍यांवर लादू पाहत आहेत.. हिंदी देशपातळीवर संपर्क भाषा व्हावी या साठी गेल्या काही दशकांपासून प्रयत्न सुरु आहेत, सध्याचे केंद्र शासन "वन अमुक, वन तमुक" च्या अंतर्गत "एक देश, एक भाषा" लागू करू पहात आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

चौरा

उपयोजक
Wed, 04/13/2022 - 17:39 नवीन
याचा अर्थ तिची अर्थात संपर्क भाषा म्हणजेच युनिव्हर्सल भाषा होण्याकडे वाटचाल चालू आहे ! म्हणजेच इंग्रजी प्रमाणे. हिंदीची तुलना इंग्रजीसारख्या सुंदर भाषेशी करणे हास्यास्पद आहे. सध्याच्या वेगवान आयटी काळात भाषाशुद्धीकरणाची संकल्पना कालबाह्य झाली की काय असे वाटते. आयटीचा काळ आला असेल तर इंग्रजीच बरी.मागास हिंदी कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

याचा अर्थ तिची अर्थात संपर्क

श्रीगुरुजी
Wed, 04/13/2022 - 18:24 नवीन
याचा अर्थ तिची अर्थात संपर्क भाषा म्हणजेच युनिव्हर्सल भाषा होण्याकडे वाटचाल चालू आहे ! म्हणजेच इंग्रजी प्रमाणे. पूर्वी फक्त दक्षिणेत व काही प्रमाणात बंगालमध्ये हिंदीला विरोध होता. आता महाराष्ट्रात सुद्धा हिंदीविरोध वाढत आहे. अनेक पूर्वोत्तर राज्यांनी अमित शहांच्या हिंदी वापरण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. अनेक मराठी वाहिन्यांवर बऱ्याच उत्पादनांच्या जाहिराती आता मराठीत भाषांतर करून दाखवितात ज्या पूर्वी बहुतांशी हिंदीत असायच्या. Google, Facebook, WhatsApp अशी समाजमाध्यमे व Tata Sky, Amazon सारख्या कंपन्यांनी मराठी भाषेचा पर्याय दिला आहे. एकंदरीत हिंदी, इंग्लिश प्रमाणे, संपर्कभाषा होण्याची शक्यता दिसत नाही. अजून काही दशकांनी स्थानिक भाषा व इंग्लिश या दोनच संपर्कभाषा असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

सध्याच्या वेगवान आयटी काळात

तर्कवादी
Wed, 04/13/2022 - 19:42 नवीन
सध्याच्या वेगवान आयटी काळात भाषाशुद्धीकरणाची संकल्पना कालबाह्य झाली की काय असे वाटते.
मराठीत डेटा साठी 'विदा' हा प्रतिशब्द अलिकडच्या काळातच शोधला गेला असावा बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

खरं तर हिंदी भाषिकांनी

चेतन सुभाष गुगळे
Sun, 04/17/2022 - 16:25 नवीन
खरं तर हिंदी भाषिकांनी हिंदीची उपेक्षा केली आणि अशी भेसळीची भाषा दुसर्‍यांवर लादू पाहत आहेत..
मराठीत काही वर्षांपूर्वी काहे दिया परदेस नावाची मालिका प्रसारित व्हायची. मुंबईतली एक मराठी मुलगी हिंदीभाषिक मुलाच्या प्रेमात पडते. आधी तो तिच्याशी / तिच्या कुटुंबियांशी संवाद साधतो तेव्हढेच संवाद हिंदीत होते आणि बाकी मराठी. मग पुढे त्या दोघांचं लग्न आणि नंतर ती मुलगी सासरी वाराणसीला जाते आणि त्यानंतर अख्खी मालिकाच हिंदी बनून गेली होती. मराठी वाहिनीवर हिंदी नावाची आणि जवळपास सर्वच संवाद हिंदीत असलेली आणि वाराणसी शहरात घडणार्‍या घटना दाखविणारी मालिका काही मराठी भाषा प्रेमी (व आग्रही देखील) मोठ्या कौतुकाने पाहत असत. त्याच्याही अनेक वर्षे पूर्वी विक्रम गोखले यांनी मराठीत मुंबई दूरदर्शन वर डरनेका नही असे शीर्षक असलेली आणि अतिशय गचाळ बंबैय्या हिंदीत संवाद असलेली मराठी मालिका केली होती. या अशा कलाकृतीच्या निर्मात्यांनी केलेल्या चूकांचा दोष भाषेकडे कसा काय जातो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

सहमत

चेतन सुभाष गुगळे
Tue, 04/12/2022 - 15:01 नवीन
इंग्रजी सारखी भारतातल्या एक टक्काही लोकांना परिणामकारकरीत्या न बोलता येणारी किंवा न समजणारी भाषा ही राष्ट्रभाषा आहे का? इंग्रजी न बोलता येणं / न समजणं हा न्यूनगंड का ठरतोय? हिंदी ला उत्तर भारतीय लोकांची प्रादेशिक भाषा समजून तिला राष्ट्रभाषा होऊ न देण्याचा अट्टाहास तर्कहीन आहे. खरे तर उत्तर भारतीय राज्यातील लोकांची प्रादेशिक भाषा हिंदी ही नाहीच. ते लोक इतर राज्यांतील लोकांना समजणे सोयीचे जावे म्हणून त्यांच्या सोबत हिंदीत बोलतात पण आपसांत ते मैथिली, भोजपुरी, मघई, बज्जिका, अग्निका, इत्यादी भाषेत बोलतात. त्यामुळे हिंदी त्यांची अंतर्राज्यीय भाषा नसून इतर राज्यांतील लोकांशी संवाद साधणारी आंतर-राज्यीय भाषा आहे. हिंदी चित्रपट देखील मुंबई व महाराष्ट्र भागात जितका पाहिला जातो तितका उत्तर प्रदेश वा बिहार येथे पाहिला जात नाही. त्यापेक्षा ते भोजपुरी चित्रपट मोठ्या संख्येने पाहतात. पूर्वी फक्त दक्षिणेकडील राज्ये हिंदी विरोध करीत असत. आता त्यांच्या जोडीला महाराष्ट्र देखील हिंदी विरोध अगदी सरसावून करीत आहे. या विरोधामुळेच मग इंग्रजी हीच दोन राज्यांमधली संवाद साधण्याची भाषा ठरत आहे. परक्या भाषेसोबत मग संस्कृतीदेखील परकीयच होत जाते. एखादे उदाहरण द्यायचे तरी शेक्सपियरचे नाटक किंवा गॉडफादर सिनेमाचा संदर्भ दिला जातो. वि. वा. शिरवाडकरांच्या साहित्यातला किंवा राजश्री चित्रसंस्थेतील एखाद्या उत्तम दर्जाच्या (क्लासिक म्हणावं का? जास्त भारदस्त वाटेल) चित्रपटातील संवादाचा दाखला देणारा गावरान समजला जातो. त्याला देसी म्हणून हिणवले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

+१

सौंदाळा
Tue, 04/12/2022 - 15:48 नवीन
+१ गुगळे यांच्याशी पूर्ण सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

धन्यवाद.

चेतन सुभाष गुगळे
Tue, 04/12/2022 - 16:36 नवीन
मराठीचं नाव घेत हिंदी विरोध करणार्‍यांना देखील शेवटी हनुमान चालिसाचाच आधार घ्यावा लागला, मारुती स्तोत्राचा नाही यातच काय ते आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

हा हा हा

सौंदाळा
Tue, 04/12/2022 - 17:13 नवीन
हा हा हा बरोब्बर. रच्याकने ते वसंत मोरेंचे नाराजी नाट्य परत राज ठाकरेंची भेट आणि प्रकरणावर पडदा वगैरे पण आधीच ठरवून केल्यासारखे वाटत होते. आज ठाण्यात काय करणार आहेत बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

परत रामदास स्वामींचा विषय

चौथा कोनाडा
Tue, 04/12/2022 - 17:34 नवीन
परत रामदास स्वामींचा विषय निघणार, मग गुरु होते की नाही हा विषय चर्चला जाणार ... त्या पेक्षा नकोच मराठी स्त्रोत्र, हनुमान चालीसा बरी, हिंदी भाषिक मतदार ही सोबत येणार....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

चेतन

उपयोजक
Tue, 04/12/2022 - 21:58 नवीन
हिंदी ला उत्तर भारतीय लोकांची प्रादेशिक भाषा समजून तिला राष्ट्रभाषा होऊ न देण्याचा अट्टाहास तर्कहीन आहे. हिंदी ही सगळ्या भारताची भाषा आहे का? नसेल तर मग काही राज्यांमधे बोलली जाणारी भाषा सगळ्या देशावर लादण्याचं कारण काय? तसं पाहिलं तर देशाला जोडणारी एकच भारतीय भाषा आहे 'संस्कृत'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

संस्कृत काही उपयोगाची भाषा

चौथा कोनाडा
Wed, 04/13/2022 - 12:22 नवीन
संस्कृत काही उपयोगाची भाषा नाही असे रानरेडा यांच्या पुढील प्रतिसादावरून दिसते. http://misalpav.com/comment/1137842#comment-1137842 संस्कृत ही संपर्कभाषा करायची असे ठरावले तरी ते व्यवहारात आणायला २००-४०० वर्षे लागतील !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

.

कॉमी
Wed, 04/13/2022 - 13:07 नवीन
ते कसे ? भारतभर संस्कृत बोलली/लिहिली जायची का ? याबद्दल काही वाचनास असेल तर नक्की सांगावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

हिंदी चालत नसेल तर परदेशी

चौथा कोनाडा
Tue, 04/12/2022 - 17:32 नवीन
हिंदी चालत नसेल तर परदेशी असलेली इंग्रजी का चालते किंवा का चालावी? व परदेशी असलेली इंग्रजी चालते तर हिंदी का चालु नये?
या दोन्ही प्रश्नांचं उत्तर कधीच मिळणार नाही. कारण ... हा उत्तर वि, दक्षिण असा वर्चस्वाचा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

पण मी म्हणतो तुम्ही सगळे आताच

सुरसंगम
Tue, 04/12/2022 - 06:42 नवीन
पण मी म्हणतो तुम्ही सगळे आताच का बरे जागृत झालात नाही म्हणजेइथे जे बोलत आहेत त्यांना शाळेत १० वी पर्यत शिकताना एकतर पूर्ण हिंदी किंव ५०:५० मार्कांचे हिंदी संस्कृत हे विषय घेऊनच १० वी उत्तीर्ण झाले असणार. तेव्हा कोणालाच अगदी तुमच्या पालकांना सुद्धा मंडळला किंवा शाळेत जाऊन आम्हांला हिंदी ऐवजी तामिळ, तेलगू, असामी, बंगाली, गुजरात, वगैरे इतर आपल्या आवडीच्या भाषेची निवड करू द्या असं सांगायला हवं होतं. नाही पक्षी असं म्हणू की तुम्ही बाल वयात होतात व तुमचे पालक जागरूक नव्हते. पण मग आत्ता तुम्ही सर्व तुमच्या पाल्यासाठी असा आवाज उठवू शकताच की. मग करा सुरुवात इथे गळे काढून काय होणारंय. आणि आता सुरुवात केलीत तरच तुमची पुढची पिढी आणि नातवंड मराठीत आणि एक दुसरी प्रादेशिक ऐच्छिक अशी बोलणारी असेल.
  • Log in or register to post comments

आहेत .. असे खुप लोक आहेत. जी

सुक्या
Tue, 04/12/2022 - 07:08 नवीन
आहेत .. असे खुप लोक आहेत. जी मराठी लोक हैद्राबाद / बेण्गलोर अशा ठिकाणी कामानिमित्त आहेत त्यांची मुले सर्रास मराठी / तेलुगु किंवा मराठी / प्रांतीय भाषा बोलतात .. अगदी लिहितात ही. माझ्या बरोबर अशे कित्येक मित्र आहेत जे मराठी / मारवाडी आहेत पण दुसर्‍या प्रांतात राहिल्यामुळे तिथली भाषा अगदी सुंदर बोलतात ... माझा अजुन एक मित्र आहे .. बंगाली (घोष) आहे. लग्न मराठी मुलीशी केलं. आता तो आणी मुलं मस्त बंगाली / मराठी बोलतात .. खरं सांगु का .. ज्या लोकांना काही प्रोब्लेम नसतो ते सुखाने राहतात .. ज्या लोकांचे पोट अशा फुकाच्या वादावर चालते त्यांना कुठेही प्रोब्लेम च दिसतो ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरसंगम

सुक्या

उपयोजक
Tue, 04/12/2022 - 08:16 नवीन
ज्या लोकांना काही प्रोब्लेम नसतो ते सुखाने राहतात .. ज्या लोकांचे पोट अशा फुकाच्या वादावर चालते त्यांना कुठेही प्रोब्लेम च दिसतो. ज्या लोकांना पाठीचा कणा नसतो त्यांनाच स्वभाषाभिमानही नसतो. हपापल्यागत फक्त पैसा मिळवण्याचाच उद्देश असेल तर भाषा वगैरे गोष्टी निरर्थक वाटू लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

स्वभाषाभिमान

सर टोबी
Tue, 04/12/2022 - 22:50 नवीन
प्रामाणिकपणे हे वेगवेगळे अभिमान समजून घ्यायला आवडेल. म्हणजे हे असेल अभिमान नसल्यावर काय नुकसान होतं आणि असल्यावर काय फायदा होतो असे माहिती झालं तर बरे. आज इतक्या वर्षात अखिल भारतीय मारवाडी संमेलन भरलेलं पाहिलं नाही. पण त्यामुळे काही नुकसान झाल्याचं ऐकिवात नाही. बहुतेकांचा घरचा व्यवसाय असतो. त्यामुळे भविष्याची चिंता न करता मुलं अगदी समरसून शिकतात आणि उत्तम यश मिळवितात. बऱ्याच मारवाडी लोकांची भाषा प्रादेशिक भाषेशी सरमिसळ झाल्यामुळे इतकी धेडगुजरी झाली आहे परंतु तिचे प्रमाणीकरण वगैरे करण्याच्या फंदात कोणी पडत नाही. तरी त्यांचं उत्तम चाललं आहे. माझा प्रश्न प्रामाणिक आहे. कुणाला डिवचन्याचा उद्देश नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

सर टोबी

उपयोजक
Tue, 04/12/2022 - 23:28 नवीन
प्रामाणिकपणे हे वेगवेगळे अभिमान समजून घ्यायला आवडेल. म्हणजे हे असेल अभिमान नसल्यावर काय नुकसान होतं आणि असल्यावर काय फायदा होतो असे माहिती झालं तर बरे. भाषा हा सांस्कृतिक ठेवा आहे. तिच्यात फायदा का बघावा? माणूस सगळ्या गोष्टी आर्थिक फायद्यासाठीच करत असतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

भाषा हा सांस्कृतिक ठेवा आहे

सर टोबी
Wed, 04/13/2022 - 08:56 नवीन
हा जास्त करून भाषणांचा फड जिंकून हृदयसम्राट आणि विश्वगुरू होणाऱ्या मंडळींचा बनाव आहे. आपल्या भावना कशामुळेदेखील उचंबळून येतात हेच आपले मोठे दुर्दैव आहे. मला आपले उगीचच वाटले की हे अभिमान खरेच कुठे तरी उपयोगी पडतात म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

+1

कर्नलतपस्वी
Wed, 04/13/2022 - 10:23 नवीन
+1 जग घुमीय्या थारे जैसा दुजा न कोई ,आसे कुठलतरी गाणे आहे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

.

कॉमी
Tue, 04/12/2022 - 08:53 नवीन
खरं सांगु का .. ज्या लोकांना काही प्रोब्लेम नसतो ते सुखाने राहतात ..
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

सुरसंगम

उपयोजक
Tue, 04/12/2022 - 08:13 नवीन
पण मग आत्ता तुम्ही सर्व तुमच्या पाल्यासाठी असा आवाज उठवू शकताच की. मग करा सुरुवात इथे गळे काढून काय होणारंय. आणि आता सुरुवात केलीत तरच तुमची पुढची पिढी आणि नातवंड मराठीत आणि एक दुसरी प्रादेशिक ऐच्छिक अशी बोलणारी असेल. सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरसंगम

१०० मार्कचे संस्कृत ?

रानरेडा
Tue, 04/12/2022 - 19:16 नवीन
गेली ३५ एका वर्षे तरी १०० मार्कांचे संस्कृत मराठी माध्यमातील मुलांना आठवीपासून घेता येते आणि हिंदी सोडता येते, मी आणि अनेकानी केले होते - मी ८९ च्या बॅच ला होतो = हे आपणास माहित नाही काय ? अर्थात संस्कृत इतके बकवास , अर्थशून्य आणि निरुपयोगी मी काही शिकले नसेल. दहावीला ९० मार्क मिळण्यापलीकडे त्याचा काहीही उपयोग झाला नाही . तसे आठवीनंतर मराठी शिकून हि काही फायदा झाला नाही पण संस्कृत म्हणजे पूर्ण अडगळ असो आता CBSE ला फ्रेंच / जर्मन असेल तर मराठी आणि हिंदी दोन्ही सोडता येते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरसंगम
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा