✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

द काश्मीर फाइल्स

न
निनाद यांनी
Wed, 03/09/2022 - 09:04  ·  लेख
लेख
द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे. हा चित्रपट भारतातल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष यांचे चित्रण आहे. ९० च्या दशकात काश्मिर खोर्‍यात केल्या गेलेल्या हिंदुंच्या कत्तलीचे एक डॉक्युमेंटेशन तरी करतो. आजवर असा प्रयत्न ही झालेला नाही. लेखक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदी भाषेत याची निर्मिती केली आहे. ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रमुख कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आदी आहेत. या चित्रपटाला विरोध झाला आहे. याविरुद्ध याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता या चित्रपटाची चर्चा ही होऊ नये म्हणून दडपून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत असे दिसते. उदा: काश्मिरच्या हिंदूंचा ज्वलंत विषय असूनही कपिल शर्मा शो ने याचे प्रमोशन नाकारले आहे. आपल्याच इंडस्ट्रीतील सिनेमा असूनही विषय हिंदू विषयक असल्याने कोणत्याही खान किंवा प्रस्थापित चित्रपट कलावंतांनी द काश्मीर फाइल्सचा उल्लेख पूर्णपणे टाळला आहे. या चित्रपटाची चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
93294 वाचन

💬 प्रतिसाद (327)

प्रतिक्रिया

स्पष्ट मत

sunil kachure
Wed, 03/16/2022 - 14:12 नवीन
काश्मीर मध्ये जे घडले ते अचानक घडले नाही. त्याची तयारी ,संघटन ,योजना निर्माण करण्यास दीन चार वर्ष गेली असतील .भारत सरकार कडे अनेक एजन्सी आहेत ..भारत सरकार ल काश्मीर मध्ये काय घडतं आहे ह्याची माहिती नक्कीच असणार .घटना घडली तेव्हा केंद्र सरकार मध्ये हिंदू वादी BJP होती..जगात कोणत्याच देशात नाहीत इतके प्रचंड अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्र पती ह्यांना भारतात घटनेने दिले आहेत... देशाच्या हद्दीत हत्याकांड होते ह्याला जबाबदार फक्त त्या वेळ चे भारत सरकार आहे. सशक्त केंद्रीय दल,सशक्त लष्कर असणाऱ्या देशाच्या हद्दीत हे घडलेच कसें.ह्याचे फक्त एकच..कारण राजकीय फायदा घेण्याची राजकीय पक्षांची वृत्ती. कोणाला ही न विचारता आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्र पती ना आहे. का नाही त्याचा वापर केलं
  • Log in or register to post comments

खरंय

उपयोजक
Wed, 03/16/2022 - 21:27 नवीन
हा माणूस नक्कीच विचारवंत असणार. कारण असल्या लोकांना समोर दिसत असते ते बघायचे नसते. त्यातही बळी पडणार्‍यांमध्ये हिंदू असले तर त्याकडे कानाडोळा करायचा हा या लोकांचा शिरस्ता असतो. निखिल वागळ्यानंही हीच आकडेवारी त्याच्या वॉलवर लावलीय फेबुवर
  • Log in or register to post comments

फेबुवरुन साभार

उपयोजक
Wed, 03/16/2022 - 21:30 नवीन
द काश्मीर फाईल्सचा विषय देशभर तापलेला असताना, देशाच्या, समाजाच्या दुर्दैवाने, काही लोकांनी विविध नॅरेटिव्ह विनाकारण सेट करायला घेतले आहेत. काश्मिरी पंडितांबद्दल एवढं वाटतं - पण गोध्राबद्दल, खैरलांजीबद्दल, दलितांवरील अत्याचारांबद्दल काहीच वाटत नाही का? : हा असाच एक नॅरेटिव्ह. जणूकाही काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांवर भरभरून लिहिणाऱ्यांना "इतर" प्रकरणांचं काहीच वाटत नाही! वास्तव फार वेगळं आहे. गोध्रा, खैरलांजी, हजारो वर्षांपूर्वी झालेले दलितांवरील अत्याचार - सर्वांवर भरपूर लिहिलं, बोललं जातं. सहवेदना व्यक्त केली जाते. सैराट, झुंड, जय भीम - मनापासून उचलून धरले जातात. गोध्रा दंगलीचा निषेध समाजातील सर्व स्तरांमधील लोकांकडून वेळोवेळी झाला आहे. गुन्हेगारांवर न्यायालयात केसेस दाखल झाल्या, त्यांचे निकाल देखील लागून झालेत. नरेंद्र मोदी गोध्रास जबाबदार आहेत असं वाटणारे देखील काही कमी नाहीत. त्यांनी आजपर्यंत तो मुद्दा वेळोवेळी उचलून धरलाय आणि त्याची मेनस्ट्रीम मीडियामध्ये न भूतो न भविष्यती चर्चा देखील झाली आहे. खैरलांजी वा इतरही अनेक दलित अत्याचार देखील "अज्ञात, अचर्चित, दुर्लक्षित" अजिबात नाहीत. असूच नयेत. परंतु काश्मिरी पंडितांची झालेली दैना मात्र आजपर्यंत माध्यमांमध्ये चर्चिलीच गेली नव्हती. काश्मीर फाईल्स गाजतोय तो हा "लपवला गेलेला इतिहास" एकदम उघड झाल्यामुळे. १९९० साली २५-३० वर्षांचे असतील असे कित्येक ज्येष्ठ नागरिक आज थियेटर बाहेर पडताना हताशपणे "हे इतकं घडून गेलं आणि आम्हाला काहीच कसं माहिती नाही?!" हा विषाद व्यक्त करतात. मुद्दा हाच आणि इतकाच आहे. मोदींनी गोध्रा घडवलं - हे ओरडून ओडून सांगता आलं अनेकांना. देशाच्या कानाकोपऱ्यात तो आवाज पसरवता आला. त्यांना त्यांचं म्हणणं व्यक्त करता आलं - तो हक्क बजावता आला. हा हक्क फार महत्वाचा आहे. न्याय होणं - हा भाग नंतरचा. पंडितांना सुद्धा न्याय मिळणं तर सोडाच - आवाज उचलण्याचा हक्क देखील नाकारला गेला होता. हेच वास्तव बहुतेकांना बेचैन करून सोडतंय. तुम्हाला हेही मान्य का होऊ नये? इतरांना ते जाणवतंय तर तुम्हाला ते इतकं जड का जावं? कश्मिरी पंडित "विरुद्ध" इतर सर्व : असा अजून एक नॅरेटिव्ह बेमालूम पसरवला जातोय. अन्याय - मग तो कुठल्या का जात, धर्म, भाषा, पंथावर का झालेला असेना - वाईटच. भारतातील सामान्य नागरिक जात धर्म बघून अत्याचारावर प्रतिक्रिया देण्याचा क्षुद्र विचार करत नाही. काश्मिरी "पंडितांवर" झालेल्या अत्याचाराचा विषय मात्र काही क्षुद्र लोक आम्ही "विरुद्ध" तुम्ही - असा घेत आहेत. हा "विरुद्ध" केल्याचा दोष कुणाचा? चित्रपट निर्मात्यांचा, चित्रपट उचलून धरणाऱ्यांचा - की - हे इकडचे विरुद्ध तिकडचे अशी मांडणी करणाऱ्यांचा? अजून एक. त्यावेळी सत्तेत कोण होतं - याची एक यादी फिरतीये सर्वत्र. महत्वाची यादी आहे ती. "जबाबदार कोण" हा प्रश्न म्हत्वाचाच आहे. पण मग फक्त यादी पसरवून कसं चालेल? ज्यांनी वास्तवात जीव घेतले - त्यांचं काय? ज्यांनी जाणीवपूर्वक जीव घेणाऱ्यांना पाठीशी घातलं त्यांचं काय? त्यांच्या प्रेरणा काय होत्या - त्या अभ्यासाचं, त्या मूळ विषयाचं काय? हे सगळं स्पष्टपणे बोलणारे थेट कम्युनल आणि विनाकारण "पंडित विरुद्ध इतर" असं मांडणारे तुम्ही सेक्युलर?! काश्मीर फाईल्स राजकीय हेतूने प्रेरित आहे - हा शेवटचा टिपिकल नॅरेटिव्ह. आहेच. हा चित्रपट राजकीय हेतूने प्रेरित आहेच. वादच नाही. ताकाला जाऊन भांडं लपवण्यात अर्थ नाही. चित्रपट तयार करणाऱ्यांनी ते नाकारलं असेल तर असुदेत - समर्थन करणारे अनेक राजकीय हेतूने करताहेत हे मान्य करायला हरकत नाहीच. गंमत त्या पुढे आहे. "त्या" बाजूला तुम्ही हा विषय अजेंडा म्हणून का मिळू देता? तुम्हीसुद्धा काश्मिरी पंडितांच्या बाजूने का बोलत नाही? सहवेदना व्यक्त करणं तुम्हाला का जड जातं? काश्मिरी पंडितांचं हत्याकांड - हा विषय इकडच्या "किंवा" तिकडच्या लोकांनी उचलायला हवा - असं "आयदर ऑर" समीकरण तुम्हीच का रुजवताय? हा अजेंडा काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय "समोर" आणला जाणे : हाच आणि इतकाच असावा. त्यात राजकीय अँगल येऊ नं देणं तुमच्या आमच्याच हातात आहे. नाहीये का? फक्त कल्पना करा. काँग्रेस, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी या विषयावर भरभरून लिहिलं तर काय होईल? सहवेदना व्यक्त केली तर काय होईल? पुरोगाम्यांच्या अख्ख्या इकोसिस्टिमने हे हत्याकांड कसं झालंच नव्हतं - हे पटवण्यासाठी चालवलेले प्रयत्न थांबवून, तीच ऊर्जा काश्मिरी पंडितांबरोबर आहोत, यापुढेही असू - असं म्हणण्याकडे वळवली - तर काय होईल? तुमच्या मते कम्युनल असलेल्या लोकांना तुम्ही सहज निष्प्रभ कराल या मार्गाने. पण तुमचं काहीतरी भलतंच सुरु आहे! समजून घ्या - राजकीय मारामाऱ्यांच्या फंदात अजिबात नं पडणारे कितीतरी लोक काश्मीर फाईल्सवर भरभरून व्यक्त होताना दिसताहेत. हे भेसूर वास्तव इतके दिवस लपून होतं याबद्दल दुःख व्यक्त करताहेत. चित्रपट बघून धाय मोकलून रडणाऱ्यांचे व्हिडीओ बघून हताशपणे मान हलवताहेत. या सर्वांची खिल्ली उडवून, खोचक प्रतिप्रश्न विचारून तुम्ही या सर्वांना दूर ढकलताय. या विषयांवर असंबंद्ध उदाहरणांची यादी देऊन "तेव्हा कुठे होतात?" छाप प्रश्न विचारून नकळत या लोकांना देखील "तुम्ही आमचे नाही" असं ठरवून मोकळे होताय. काय साध्य करताय तुम्ही यातून? जाताजाता एकच. देशात कम्युनल टेन्शन वाढू नये असं प्रामाणिकपणे वाटत असेल तर कम्युनल टेन्शन वाढू शकतील असे विषय तुम्हीच आधी उचलून घेऊन, सहवेदना व्यक्त करून, पीडितांना हरप्रकारे आधार देऊन, समस्या निवारण करून त्या अन्यायाला कम्युनल कोन नं मिळण्याची खबरदारी घ्यायला हवी. जमत असेल तर बघा. नाहीतर आम्ही विरुद्ध तुम्ही - रोजची सर्कस आहेच आपली. ओंकार दाभाडकर
  • Log in or register to post comments

हम्म.

कॉमी
Wed, 03/16/2022 - 21:40 नवीन
चांगली आहे पोस्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

ह्याचे उत्तर दोन च वाक्यात आहे

sunil kachure
Wed, 03/16/2022 - 21:43 नवीन
काश्मिरी हिंदू वर झालेल्या अत्याचार ची सर्वांना चीड आहे त्यांना न्याय अजून कसा मिळाला नाही ह्याचे आश्चर्य सर्वांना वाटत आहे.. त्या साठी असलेल्या लोकांना कडक शिक्षा व्हावी असे सर्व लोकांना वाटत इथे सर्व म्हणजे काश्मीर फाईल ह्या सिनेमा विरुद्ध लिहणारे ,सर्व च आले..सरकार नी त्या काश्मिरी हिंदू ना परत तिथे स्थापित करावे सरकार चे स्वागत आहे. त्यांना न्याय मिळवून द्यावा त्याचे स्वागत आहे ..विरोध फक्त ह्या साठी आहे की ह्या सिनेमाचा राजकीय प्रचार करण्यासाठी वापर केला जात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

पटले एकदम

सुखीमाणूस
Wed, 03/16/2022 - 22:37 नवीन
टोकाचा विरोध करुन उलट चित्रपटाला जास्त प्रसिद्धी मिळते आहे. Helmed by Vivek Agnihotri, TKF is made on a moderate budget of 20 crores. It's really low when compared to the costs of normal Bollywood flicks that are being made nowadays. With such a sizeable investment, the film is doing wonders which even big-budget movies fail to do. https://www.koimoi.com/box-office/the-kashmir-files-box-office-continues-its-out-of-this-world-run-with-already-201-returns-in-kitty/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

नरसिंहरावांचे प्रतिज्ञापत्र

चंद्रसूर्यकुमार
Wed, 03/16/2022 - 23:20 नवीन
टाईम्स नाऊवर गेली दोन-तीन दिवस धक्कादायक बातमी दाखवली जात आहे. नरसिंहरावांच्या काँग्रेस सरकारने काश्मीरमधून हिंदू स्वेच्छेने इतरत्र स्थलांतरीत झाले त्यामुळे त्यांना 'व्हिक्टीम' मानता येणार नाही अशाप्रकारचे प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे सादर केले होते. ते पुढील व्हिडिओत बघता येईल. हे खरोखरच धक्कादायक आहे. इतके दिवस नरसिंहरावांविषयी ते काँग्रेसमध्ये असले तरी आदर वाटायचा. जर राजीव गांधी, इंदिरा गांधी, नेहरू इतकेच काय मोरारजी देसाई यांच्यासारख्यांना भारतरत्न दिले जाऊ शकते तर मग नरसिंहरावांना का नाही हा प्रश्न नेहमी पडायचा. पण आता तो आदर पूर्णपणे संपुष्टात आला. असल्या माणसाला भारतरत्न दिले नाही ते चांगलेच झाले. अर्थातच नरसिंहराव हे काँग्रेसच्या सगळ्या पंतप्रधानांपैकी त्यातल्या त्यात चांगले होते- म्हणजे इतरांपेक्षा बरे होते. आणि नरसिंहराव असे असतील तर इतर काँग्रेसी पंतप्रधान कसे असतील/होते याची कल्पनाच केलेली बरी.
  • Log in or register to post comments

काळ धामधुमीचा होता

Trump
Wed, 03/16/2022 - 23:53 नवीन
नरसिंहरावांच्या काँग्रेस सरकारने काश्मीरमधून हिंदू स्वेच्छेने इतरत्र स्थलांतरीत झाले त्यामुळे त्यांना 'व्हिक्टीम' मानता येणार नाही अशाप्रकारचे प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे सादर केले होते.
श्री नरसिंहरावांचा काळ धामधुमीचा होता, जवळपास दिवाळखोर अर्थव्यवस्था, बाबरी मशीद प्रकरण, नुकतीच झालेली राजीव गांधीची हत्या, मंडल आयोग आंदोलने, धगधगता पंजाब आणि स्वतःचे अबहुमतातील सरकार अश्या बर्‍याच आघाड्या होत्या. मंत्रीमंडळातील बरेचसे निर्णय पंतप्रधान स्वतः घेत नाही, तर ते सर्व संमतीने घेतात आणि आताची तातडीची निकड कोणती ह्यावर पंतप्रधान आपली उर्जा खर्च करतात. इतर गोष्टी जर ठिक नसतील तर इच्छा असुन देखील काही गोष्टी करता येत नाहीत. श्री नरसिंहरावांच्या प्रमाणपत्राच्या वेळी असेच काही तरी झाले असण्याची शक्यता आहे. त्यांचे प्रमाणपत्र कायदेशीरदृष्या बरोबरच आहे. फक्त हिंदू स्वेच्छेने इतरत्र स्थलांतरीत झाले ह्याच्या व्याख्येवर सगळे अवलंबुन आहे. अतिरेक्याच्या भितीने झालेले स्थलांतर म्हणजे स्वेच्छेने झालेले स्थलांतर नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

नाही

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/17/2022 - 09:05 नवीन
नाही. नरसिंहराव सरकारने दुसरे प्रतिज्ञापत्र सादर केले ते ६ मे १९९६ रोजी. याची टाईमलाईन नक्की लक्षात येते आहे का? १९९६ च्या लोकसभा निवडणुकांसाठी ३ फेर्‍यात मतदान झाले होते त्यापैकी तिसरी फेरी ७ मे रोजी होती. आणि यानंतर १० दिवसात म्हणजे १६ मे रोजी अटलबिहारी वाजपेयींनी १३ दिवसांचे सरकार स्थापन केले होते. म्हणजेच हे दुसरे प्रतिज्ञापत्र नरसिंहराव सरकारच्या कार्यकाळाच्या अगदी शेवटी सादर केले गेले होते. त्यावेळेस या सगळ्या समस्या मागे पडल्या होत्या.
फक्त हिंदू स्वेच्छेने इतरत्र स्थलांतरीत झाले ह्याच्या व्याख्येवर सगळे अवलंबुन आहे. अतिरेक्याच्या भितीने झालेले स्थलांतर म्हणजे स्वेच्छेने झालेले स्थलांतर नव्हे.
तोच तर मुद्दा आहे. उत्तर प्रदेश-बिहारमधून हजारो लोक मुंबईत येतात ते मुंबईत आपल्याला अधिक चांगले पैसे मिळू शकतील या अपेक्षेने. असे लोक स्वेच्छेने मुंबईत येतात आणि त्यांना त्यांच्या गावी 'मरा/धर्मांतर करा किंवा जा' असे तीन पर्याय ठेवत नसते. काश्मीरी हिंदूंचे असे स्वेच्छेने स्थलांतर झाले होते का? आपल्या मालकीच्या चांगल्या सफरचंदाच्या बागा सोडून त्यातील अनेक लोक नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडले होते ते उगीच का? पण नरसिंहराव सरकारने तसे प्रतिज्ञापत्र सादर केले होते हे धक्कादायक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

श्री नरसिंहराव यांच्यावर पुर्ण दोष देण्यात काही अर्थ नाही.

Trump
गुरुवार, 03/17/2022 - 15:59 नवीन
आपल्या मालकीच्या चांगल्या सफरचंदाच्या बागा सोडून त्यातील अनेक लोक नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडले होते ते उगीच का? पण नरसिंहराव सरकारने तसे प्रतिज्ञापत्र सादर केले होते हे धक्कादायक आहे.
तुमचा मुद्दा मान्य आहे. मी वरतीही तसेच लिहीले आहे. फक्त श्री नरसिंहराव यांच्यावर पुर्ण दोष देण्यात काही अर्थ नाही. काँग्रेसमध्ये मुस्लिम लांगुलचालनाचा परंपरा आहे, त्यामुळे त्यांना तो विरोध मोडुन काढणे जमले नसावे किंवा तत्सम कारणे असावीत. माझ्या मते त्यांना संशयाचा फायदा (benefit of doubt) मिळायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

त्यांना संशयाचा फायदा

सुबोध खरे
Tue, 03/22/2022 - 10:44 नवीन
त्यांना संशयाचा फायदा (benefit of doubt) मिळायला हवा. असा असेल तर आर्थिक उदारतेचं धोरण सुद्धा त्यांनी ( आणि डॉ मनमोहन सिंहांनी) एकट्याने राबवलेलं नव्हतं. मग त्यांना एकट्याना (आणि डॉ मनमोहन सिंहांना ) श्रेय कशाला द्यायचं? किंवा गोध्रा मध्ये कारसेवक हिंदूंना जाळून मारल्यामुले गुजरातेत दंगल झाली त्याचा दोष श्री मोदींना कसा द्यायचा? असं मुळमुळीत लिखाण उपयोगी नाही. नेता/ राज्यकर्ता किंवा पंतप्रधान यांनी आपण केलेल्या कृत्याची संपूर्ण जबाबदारी घेतलीच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

.

कॉमी
गुरुवार, 03/17/2022 - 08:09 नवीन
देशांतर्गत विस्थापित असे क्लासिफाय केल्यास आंतरराष्ट्रीय संस्थांना ढवळाढवळ करता येईल म्हणून केले गेले नाही. असे न्यूजलॉन्ड्रीच्या व्हिडिओत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

कणाहिनपणा

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/17/2022 - 09:16 नवीन
देशांतर्गत विस्थापित असे क्लासिफाय केल्यास आंतरराष्ट्रीय संस्थांना ढवळाढवळ करता येईल म्हणून केले गेले नाही.
बोंबला. म्हणजे आपण किती कणाहिन होतो याची जाहिर कबुली नरसिंहराव सरकारने दिली नव्हती का? बरं एकीकडे म्हणायचे की काश्मीरमध्ये युध्दबंदी करा या संयुक्त राष्ट्राच्या ठरावाला ८-९ महिने फाट्यावर मारत आम्ही युध्द सुरूच ठेवले आणि जेव्हा घुसखोरांना एका मर्यादेपलीकडे पिटाळणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर १ जानेवारी १९४९ रोजी युध्दबंदी केली. दुसरे म्हणजे १९७१ च्या युध्दाच्या वेळेस पूर्ण अमेरिकेच्या वेस्टर्न ब्लॉकला आपण अंगावर घेतले होते. याचाच अर्थ आपण १९४८ आणि १९७१ मध्येही जगातील महासत्तांना वाटाण्याच्या अक्षता लाऊ शकत होतो. असे असताना १९९० च्या दशकात आंतरराष्ट्रीय संस्थांना (देशांनाही नाही) घाबरायचे काय कारण होते? म्हणजे आपण किती कणाहिन होतो याची कबुली दिल्यासारखे नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

कश्याच्या जिवावर कणा दाखवायचा?

Trump
गुरुवार, 03/17/2022 - 16:05 नवीन
बोंबला. म्हणजे आपण किती कणाहिन होतो याची जाहिर कबुली नरसिंहराव सरकारने दिली नव्हती का?
हो. आणि खरोखरच कणाहीन होतो. कश्याच्या जिवावर कणा दाखवायचा? तेलासाठी अरब देश हवेत आणि पैश्याच्यासाठी युरोपियन हवेत.
असे असताना १९९० च्या दशकात आंतरराष्ट्रीय संस्थांना (देशांनाही नाही) घाबरायचे काय कारण होते?
कारण अर्थव्यवस्था आणि सोव्हीयत संघाचे विसर्जन झाल्यानंतर भारताला कोणाचाही पाठींबा नव्हता. रशियाची आर्थिक परिस्थितीसुध्दा योग्य नव्हती. (सध्याच्या युक्रेनच्या युध्दाची कारणे त्यात आहेत). ती कारणे १९९१ च्या आधी नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

आजच 'काश्मीर फाईल्स' हा

सौन्दर्य
Wed, 03/16/2022 - 23:42 नवीन
आजच 'काश्मीर फाईल्स' हा चित्रपट पाहिला. १९९० साली काश्मीर खोऱ्यामधून काश्मिरी पंडितांना जुलूम - जबरदस्तीने हाकलून लावले, विस्थापित केले त्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या अगदी सुरवातीलाच ह्या चित्रपटात दाखवलेल्या घटना, प्रसंग, हत्याकांड वगैरे हे स्वतंत्र्यरित्या सत्यापित (independently verified) केले आहे हे पडद्यावर दाखवले जाते त्यामुळे ह्यातील घटना जवळजवळ ९५% सत्य असाव्यात असे धरून चालायला हरकत नसावी. काश्मीर खोऱ्यातील स्थानीय मुसलमानांनी पाकिस्तानच्या चिथावणीवरून काश्मिरी पंडितांवर जे अनन्वित अत्याचार केले त्याचे चित्रण ह्या चित्रपटात आहे. कितीतरी अश्या क्रूर घटना ह्या चित्रपटात दाखविल्या आहेत की त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते, माणूस इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो हे मनाला पटतच नाही. आज ह्या घटनेला ३२ वर्षे झाली पण काही तुरळक बातम्या सोडल्या तर काश्मिरी पंडितांवर इतके अत्याचार झाले हे निदान मला तरी त्यावेळी समजले नव्हते. १९९० मध्ये माझी गुजरातला बदली झाली आणि त्याच वेळी अडवाणींनींची रथयात्रा सुरु झाली. ह्या रथयात्रेमुळे गुजरातभर हिंदू-मुसलमान दंगे उसळले व त्याचे लोण हळूहळू देशभर पसरले. त्यावेळी ह्या बातम्या तेव्हढ्याच तीव्रतेने दाखविल्या गेल्याचे मला आठवत नाही. का हे सर्व काही राजकीय स्वार्थासाठी टोपलीखाली झाकून ठेवले गेले ? पण एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे आणि ती म्हणजे कोणताही नागरिक आपल्या मूळ स्थानापासून कोणी फक्त "येथून निघून जा" म्हणाले म्हणजे जाणार नाही. ज्यावेळी स्व:ताच्या आणि कुटुंबियांच्या जिवाची सुरक्षा नाहीशी होते, अमानुष अत्याचार झेलावे लागतात त्याच वेळी माणूस परागंदा होतो किंवा त्याला व्हावे लागते. त्यामुळे ह्या कश्मिरी पंडितांवर अत्याचार झालेच नाहीत, ते स्व:ताहून खोऱ्यातून निघून गेले हा प्रचार खोटाच आहे. मग हे ज्यावेळी घडले त्यावेळच्या राज्यकर्त्यांने हे विस्थापन, पलायन थांबविण्यासाठी काय केले ? ह्यातील दोषींना काय शिक्षा केली ? ह्याची उत्तरे आजही अनुत्तरितच आहेत असे म्हणावे लागेल ? जरी हा हिंदू-मुस्लिम संघर्ष होता, तरी काश्मीर खोऱ्यातून सगळेच हिंदू परागंदा झाले असही नाही, तेथील डोग्रा समाज बहुतांशी तेथेच राहिला. ह्या हत्याकांडात उदारमतवादी मुस्लिम देखील भरडले गेले, मग फक्त काश्मिरी पंडितांनाच का तेथून पळून निघावे लागले ? ह्या चित्रपटातील संदर्भ जर खरा मानला तर त्यात, 'दोन टक्के काश्मिरी पंडितांनी संपूर्ण प्रशासनावर कबजा मिळवला व इतरांना वर येऊ दिले नाही, त्यांच्यावर अन्याय केला,' हा मूळ मुद्दा होता. ह्यातील काय खरं? काय खोटं ? हे कसे कळणार ? ह्या घटनेनंतर आज ३२ वर्षांनी ३७० कलम रद्द करण्यात आले आहे. आता कोणताही भारतीय नागरिक काश्मीरमध्ये जाऊन राहू शकतो, स्थावरजंगम मालमता, जमीन वगैरे खरेदी करू शकतो, नोकरी धंदा करू शकतो. काश्मिरी पंडितही जाऊन आपल्या मूळ स्थानी राहू शकतात, पण प्रश्न असा आहे की अजूनही त्यांना जी अभिप्रेत किंवा अपेक्षित आहे ती सुरक्षा तेथे आहे का ? आणि जरी असली, तरी ते पुन्हा आपल्या मूळ स्थानी जाण्यास किती उत्सुक असतील ? आणि ते तेथे जाऊन करणार काय ? मग काश्मीरच्या खोऱ्यातील विस्थापित पंडितांना किंवा भारताच्या इतर नागरिकांना तेथे जाऊन राहावेसे कधी वाटेल ? ह्याचं उत्तर आहे ज्यावेळी काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित होईल, सर्वांगीण प्रगती, विकास घडून येईल, नवीन संधी उपलब्ध होतील, रोजगार निर्माण होईल. वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये उपलब्ध होतील, त्यावेळीच काश्मिरी पंडित व इतर भारतीय नागरिक काश्मीर खोऱ्यात जाऊन स्थाईक होण्याचा विचार व कृती करू शकतील. पण ज्यावेळी हे असे घडून येईल त्यावेळी काश्मीर खोऱ्यातील मूळ नागरिक अश्या 'उपऱ्यांना' खुल्या मनाने स्वीकारतील का आमच्या भूमीवर हे परकीय लोक नकोत म्हणून एक वेगळेच आंदोलन सुरु होईल ? सध्या फोफावलेला प्रांतवाद, भाषावाद, वंशवाद पाहता ही शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments

सहमत

आग्या१९९०
Wed, 03/16/2022 - 23:53 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

बाकी सगळं चालू द्या.. फक्त

आनन्दा
गुरुवार, 03/17/2022 - 06:17 नवीन
बाकी सगळं चालू द्या.. फक्त एका मुद्द्यावर बोलतो दोन टक्के काश्मिरी पंडितांनी संपूर्ण प्रशासनावर कबजा मिळवला व इतरांना वर येऊ दिले नाही, त्यांच्यावर अन्याय केला,' स्वातंत्र्य मिळाले तेव्हा valley मध्ये हिंदू 20 टक्के होते. प्रशासनावर कबजा मिळवून 2 टक्क्यांवर आले असतील तर मग मजाच आहे. डावी इकॉसिस्टम कसा narrative सेट करतेय याचे हे उत्तम उदाहरण आहे. हाच narrative आपल्याकडे ब्राह्मणांविरुद्ध पण बेमालूम सेट केला जातो आणि लोक विश्वास पण ठेवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

अहो पण मूळ प्रतिसादकर्त्याने

कॉमी
गुरुवार, 03/17/2022 - 08:12 नवीन
अहो पण मूळ प्रतिसादकर्त्याने "या चित्रपटातला संदर्भ" असे लिहिले आहे. आता यात कुठून आली डावी इकोसिस्टीम !?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

काहीतरी चूक होतेय.

सौन्दर्य
गुरुवार, 03/17/2022 - 18:34 नवीन
सिनेमात अगदी सुरवातीलाच ह्यातील घटना, प्रसंग, आकडे हे independently verified केले गेले आहेत असे लिहुन येते. ह्या सिनेमातील इतर घटना आपण सत्य म्हणून पाहणार असू तर ह्याच सिनेमात हे 'दोन टक्क्यांचे' वाक्य आहे ते कसे डाव्या इकोसिस्टिमचे झाले ? आपल्यापैकी कोणीच काश्मिरी पंडित नाहीत किंवा त्यावेळेच्या घटनेचे साक्षीदार नाहीत. तत्कालीन सरकारने देखील ही वंशहत्या लपवून ठेवली असा बहुतेकांचा आक्षेप असताना सिलेक्टिव्ह स्वीकारणे बरोबर नाही असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

राग कोणावर ....

गामा पैलवान
गुरुवार, 03/17/2022 - 00:46 नवीन
लोकहो, दहशतवाद्यांचा रागराग करून उपयोग नाही. भारत सरकार गप्प का बसलं होतं, याची जास्त चीड आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मागील सरकारच्या चुका सध्याचे

आग्या१९९०
गुरुवार, 03/17/2022 - 01:04 नवीन
मागील सरकारच्या चुका सध्याचे सरकारही करत आहे. पंतप्रधान सिनेमाचे कौतुक करत आहे आणि लोकांना बघायचा आग्रही करत आहेत. त्यापेक्षा सरकार प्रत्यक्ष कृती का करत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

सरकार प्रत्यक्ष कृती का करत नाही?

प्रदीप
गुरुवार, 03/17/2022 - 10:54 नवीन
प्रश्न तत्वतः बरोबर आहे. मात्र मला वाटते, मोदी सरकारला ह्या विशिष्ट बाबीबद्दल कसलीही कृती करतांना अतिशय जपून पाउले टाकावी लागतील. असे पहा: जेव्हा हे प्रत्यक्ष घडून आले, तेव्हा तत्कालिन सरकारने, सदर स्थलांतर देशांतर्गत विस्थापित असे क्लासिफाय केल्यास आंतरराष्ट्रीय संस्थांना ढवळाढवळ करता येईल असे सांगून (म्हणे), त्याकडे काणाडोळा केला. नंतरच्या अनेक सरकारांनेही असेच केले. खरे तर, वर्षांनूवर्षे हे प्रकरण दडपले गेले, असे काही झालेच नव्हते, असे जनता समजू लागली. ह्याचा परिपाक असा, की त्या कालखंडानंतर जन्मलेल्यांना तर हे असे काही भीषण घडले होते, ह्याविषयी कल्पनाही नाही. वास्तविक मोदी सरकारने काही कामे अतिशय धडाडीने केली-- जसे ३७० कलम, सी.ए.ए. ची तरतूद वगैरे. ह्यांतील प्रत्येक वेळी, समाजातील ठराविक घटकांकडून ह्यांना प्रचंड विरोध करण्यात आला. ह्यांत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणारे, आंतर्देशिय पक्ष; स्वतः प्रादेशिक असले, तरी स्वतःला आंतर्देशिय समजणारे पक्ष वगैरे होतेच, पण जागातिक पातळीवरून मदत घेऊन 'आंदोलन घडवून आणणारे' अनेक अ‍ॅक्टिव्हिस्ट व त्यांची एको- व ईकोसिस्टीम्सही होत्या. तेव्हा, आता गेल्या काही वर्षांत देशांतील समाजांत दुही पसरवण्याचे, व ती रूजवण्याचे काम, काही संस्थांकडून व पक्षांक्डून रीतसर सुरू झालेले आहे. साधे, हिजाबच्या शाळेतील वापरावरील बंदीचे उदाहरण घ्या. शाळेच्या युनिफॉर्ममधे जे बसत नाही, ते विद्यार्थ्यांना वर्गांत घालता येणार नाही, इतका सरळ विषय होता, त्याला मुद्दाम धार्मिक रंग देण्यात आला. आताच केवळ ह्या चित्रपटाविषयी सुरू असलेल्या चर्चा आपण ऐकल्य/ पाहिल्या/वाचल्या असतीलच. 'हे असे काही फारसे झालेले नाही' इथपासून, 'झाले असेल, पण आता हे कशाला मुद्द्दाम उकरून काढायचे?' असे अनेक सूर आपण ऐकतो आहोत. कालच एका प्रतिष्ठित चॅनेलच्या चर्चेत, एक स्वत:ला 'काश्मिरी पंडीत म्हणवून घेणारी स्त्री 'सुमारे १०० मारले गेले, गेला बाजार आपण ५००-- अगदी १,००० पंडित मारले गेले -- असे समजले तरीही ह्याला जेनोसाईड म्हणता येणार नाही', असा वाद घालत होती. (बाईला कुणीतरी तिथल्या तिथे जेनोसाईड ह्या शब्दाची डिक्शनरीतील व्याख्या दाखवली असती तर तिची पुंगी बंद झाली असती). मुल्लांच्या इशार्‍यावर नाचणार्‍या समाजाचे सोडाच, पण अगदी हिंदू समाजांतूनही ह्याविषयीचे प्रबोधन अद्यापि झालेले नाही, अशी वस्तुस्थिती आहे. आता कुठे ह्या चित्रपटाच्या निमीत्ताने, निदान काही चर्चा तरी होते आहे. ओंकार दाभाडकरने म्हटल्याप्रमाणे, हा चित्रपट राजकीय हेतूने बनवला गेला असावा. आता थोडेफार मैदान तयार झाल्यावर, निदान चार अलिप्त ('आम्हाला काय त्याचे?') टाळक्यांत तरी वस्तुस्थितीचा थोडाफार प्रकाश पडल्यावर, मोदी सरकार काही पाऊले उचलू शकेल. अर्थात, सद्य परिस्थितीत, देशांतील मुद्दाम निर्माण केले गेलेले वातावरण, व त्याची अतिशय एकांगी चर्चा करणारी पाश्चिमत्य माध्यमे, तेथील राजकीय पक्ष व लॉबीज हे सर्व ध्यानांत घेऊनच मोदी सरकारला सदर विषयाच्या संदर्भांत पाऊले उचलावी लागतील. अगोदरच्या अनेक सरकारांच्या जाणूनबुजून अथवा नि:ष्काळजीने केलेल्या हेळसांडीचे भूत आता मोदी सरकारच्या माथ्यावर येऊन बसले आहे. त्याला उतरवणे, वाटते तितके सोपे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

अच्छा. असं असतं व्हय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/21/2022 - 17:56 नवीन
भाजपाचा आता एकूण सत्तेतील पंधरा पेक्षा अधिक वर्षाचा काळ झालेला आहे, जनता पक्ष, व्हीपीसिंग, वाजपेयी, आणि सध्याची शेठची आठ वर्ष. आता काश्मीरी पंडितांच्या विषयांवर राजकारण करण्यापेक्षा, चर्चा वाढविण्यापेक्षा, जात-धर्मातील दरी वाढविण्यापेक्षा, इतर पक्षांनी काहीच केले नाही हेही जवळ-जवळ आता आपल्याला समजलेले आहे, आता सर्वच वाईट गोष्टींचे खापर इतर पक्षावर फोडण्यापेक्षा, गप्पा कमी करून दमदार पाऊले टाकून सद्य सरकारने पंडितांचे पुनर्वसन केले पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

सहमत आहे .....

मुक्त विहारि
Mon, 03/21/2022 - 20:00 नवीन
पण, 370 हटवण्या बाबत, CAA and NRC बाबत, स्वतःला हिंदू हितवादी समजणारी, शिवसेना कुंपणावरच बसली... शिवसेना आणि भाजप, एकत्र येणे ही, काश्मीर साठी अतिशय योग्य गोष्ट ठरेल ... राज्यात भांडा पण काश्मीरसाठी तरी एकत्र या ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अस्सं.....

प्रदीप
Tue, 03/22/2022 - 19:20 नवीन
तुमच्या ह्या व ह्या संदर्भांतल्या इतरस्त्र दिलेल्या प्रतिसादांवरून, मला वाटते, तुम्ही व मी वेगवेगळ्या ग्रहांवर रहात असूं. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रत्यक्ष कृती का करत नाही?

सुबोध खरे
Tue, 03/22/2022 - 10:48 नवीन
प्रत्यक्ष कृती का करत नाही? म्हणजे नक्की काय करायचं? जरा स्पष्ट पणे लिहा बरं. आपण नेहमीच तोंडची वाफ दवडण्यापेक्षा एकदा काश्मीरला जाऊन या म्हणजे असे फालतू प्रतिसाद येणार नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हा प्रतिसाद आग्या१९९० याना

सुबोध खरे
Tue, 03/22/2022 - 10:49 नवीन
हा प्रतिसाद आग्या१९९० याना होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

J&K See 22-Fold Jump In

सुबोध खरे
Tue, 03/22/2022 - 10:59 नवीन
J&K See 22-Fold Jump In Development Projects Finished In A Year: Report https://www.ndtv.com/india-news/j-k-may-see-22-fold-jump-in-developmet-projects-finished-in-a-year-report-2829849
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

दोन टक्के काश्मिरी पंडितांनी

कर्नलतपस्वी
गुरुवार, 03/17/2022 - 06:38 नवीन
दोन टक्के काश्मिरी पंडितांनी संपूर्ण प्रशासनावर कबजा मिळवला व इतरांना वर येऊ दिले नाही, त्यांच्यावर अन्याय केला,' हा मूळ मुद्दा होता. ह्यातील काय खरं? काय खोटं ? हे कसे कळणार ? खुप मोठा इतिहास आहे.रजनीकांत पुराणिक यांनी आपल्या नेहरंवर लिहीलेल्या पुस्तकात सोप्या भाषेत समजावून सांगीतले आहे. पुस्तक आंतरजालावर उपलब्ध आहे. त्यावेळी काश्मीर खोऱ्यातील मूळ नागरिक अश्या 'उपऱ्यांना' खुल्या मनाने स्वीकारतील का आमच्या भूमीवर हे परकीय लोक नकोत म्हणून एक वेगळेच आंदोलन सुरु होईल ? सध्या फोफावलेला प्रांतवाद, भाषावाद, वंशवाद पाहता ही शक्यता नाकारता येत नाही. शंका रास्त आहे,
  • Log in or register to post comments

काही लोकं सिनेमाचं तिकीट

आग्या१९९०
गुरुवार, 03/17/2022 - 07:56 नवीन
काही लोकं सिनेमाचं तिकीट काढून सिनेमा बघायला जाणार नाहीत ,कारण त्यांना निर्मात्याची काळजी. हीच लोकं जास्तीत जास्त नाकरिकांनी हा सिनेमा बघायला मिळावा म्हणून अमूक राज्यसरकारने ह्या सिनेमावरील करमणूक कर माफ करावा म्हणून आग्रही आहेत. सगळे भावनेच्या भरात चालू आहे. कुठेतरी एका चित्रपटगृहात हाऊस फूलचा बोर्ड लावलेला आणि आत फक्त ३०% प्रेक्षक होते. लोकांनी झापले त्याच्या मालकाला. शक्यता दोन असू शकतात. १) निर्मात्याची काळजी घेणाऱ्यांनी तिकिटे घेतल्यासातील २) सिनेमा विरोधींनी तिकिटे हडप करून प्रेक्षकांना दूर ठेवले असेल.
  • Log in or register to post comments

''कश्मीर फाइल्स'पासून मालेगावकर वंचित का?'

मुक्त विहारि
गुरुवार, 03/17/2022 - 08:54 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/why-kashmir-files-is-not-screening-on-nashik-malegaon-bjp/amp_articleshow/90250116.cms स्वयंघोषित हिंदू हितवादी शिवसेना, आता काय Action घेते? हे बघणे रोचक ठरेल ....
  • Log in or register to post comments

द कश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त करण्यास राज्य सरकारचा नकार,

मुक्त विहारि
गुरुवार, 03/17/2022 - 08:56 नवीन
द कश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त करण्यास राज्य सरकारचा नकार, अजित पवार म्हणाले “केंद्र सरकारनेच…” https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-government-denied-to-declare-kashmir-files-as-tax-free-said-ajit-pawar-prd-96-2844312/ इतर राज्यांनी, केंद्राकडे बोट दाखवले नाही ... आलं अंगावर तर ढकल केंद्रावर, ही वृत्ती, ह्या राजवटीत जास्त बघायला मिळत आहे ....
  • Log in or register to post comments

द काश्मिर फाईल्स' चित्रपटावर बंदी घाला; खासदार बदरुद्दीन अजमल

मुक्त विहारि
गुरुवार, 03/17/2022 - 09:00 नवीन
द काश्मिर फाईल्स' चित्रपटावर बंदी घाला; खासदाराची मागणी https://www.esakal.com/desh/mp-badruddin-ajmal-has-demanded-a-ban-on-the-film-the-kashmir-files-ss01 खरा इतिहास दाखवला तर, बंदी का घालायची?
  • Log in or register to post comments

https://youtu.be/w5UkmK2DhBI

शाम भागवत
गुरुवार, 03/17/2022 - 09:20 नवीन
https://youtu.be/w5UkmK2DhBI हा व्हिडिओ भाऊ तोरसेकरांचा आहे हे मुद्दामहून लिहितोय. त्यामुळे मिपाकरांना ही लिंक उघडायची की नाही हे अगोदरच ठरवता येऊ शकेल. मी ही लिंक इथे दिलीय त्याचे कारण म्हणजे त्यांनी केलेली भविष्यवाणी. त्यांचे म्हणणे असे आहे की काय बॉलीवूडवर राज्य करण्याची सद्दी हा चित्रपट संपवेल व खऱ्या अन्यायाच्या गोष्टी बाहेर काढणाऱ्या चित्रपटांची आता त्सुनामी यायला लागेल व त्यात आत्ताचे बॉलीवूड सत्ताधारी वाहून जातील. बघूया, भविष्यात काय दडलाय ते. :)
  • Log in or register to post comments

तसे काही होणार नाही ....

मुक्त विहारि
गुरुवार, 03/17/2022 - 09:40 नवीन
कारण, हिंदू स्त्रीया जास्त उदारमतवादी आहेत ... “मुस्लीम नाही तर काय झालं, नमाज पठण…”, लहान मुलीचे बोल ऐकून पल्लवी जोशीला बसला धक्का .....(https://www.loksatta.com/manoranjan/the-kashmir-files-actress-pallavi-joshi-recalls-how-a-little-girl-asked-her-to-do-namaz-irrespective-of-religion-and-said-one-must-do-it-dcp-98-2843577/lite/) हिंदू इतके कट्टर नाहीत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

हिंदू कट्टर नाहीत

sunil kachure
गुरुवार, 03/17/2022 - 12:07 नवीन
हिंदू इतके कट्टर नाहीत ह्या वाक्याशी पूर्ण सहमत. देशातील फक्त एका राज्यात मुस्लिम बहुसंख्य आणि हिंदू अल्प संख्याक आहेत . त्याच परिणाम म्हणून तेथील मुस्लिम लोकांनी ते राज्य च हिंदू मुक्त केले. पण देशातील बाकी राज्यात हिंदू 80% पेक्ष जास्त आहेत. तिथे मुस्लिम अगदी आनंदात त्यांचे जीवन जगत आहेत. बहुसंख्य हिंदू त्यांच्या वर कोणताच दबाव आणत नाहीत. आणि हे जगातील एकमेव उदाहरण असावे .हिंदू हे उदारमतवादी च आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

‘द कश्मीर फाइल’ पाहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, आसामचे धोरण

मुक्त विहारि
गुरुवार, 03/17/2022 - 09:35 नवीन
‘द कश्मीर फाइल’ पाहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना ‘या’ दोन अटींवर मिळणार ‘हाफ डे’; मुख्यमंत्र्यांची घोषणा https://www.loksatta.com/desh-videsh/half-day-for-assam-government-employees-to-watch-the-kashmir-files-scsg-91-2844001/
  • Log in or register to post comments

काश्मीरी पंडीत ह्या

आग्या१९९०
गुरुवार, 03/17/2022 - 10:01 नवीन
काश्मीरी पंडीत ह्या सिनेमाविषयी नक्की काय म्हणतात? https://www.bbc.com/hindi/india-60758365
  • Log in or register to post comments

The Kashmir फाईल

sunil kachure
गुरुवार, 03/17/2022 - 12:16 नवीन
ह्या सिनेमा मुळे दीन गोष्टी स्पष्ट झाल्या. Main stream media पण कसा एजेंडा चालवतो. काश्मीर मध्ये इतके काही होत होते तरी त्याची दखल देशातील main stream media ni घेतली नाही जगापासून ते ठरवून लपवले काश्मिरी हिंदू वर जे काही अत्याचार होत होते त्याच्या बातम्या काश्मीर मधील स्थानिक मीडिया मध्येच येत होत्या. Main stream media नी पूर्ण दुर्लक्ष त्या घटनेकडे. खूप भयंकर आहे है. Bjp नी दोन वेळा केंद्रात सत्ता स्थापन केली अनेक state मध्ये सत्ता स्थापन केली. त्या मुळे एक गोष्ट स्पष्ट झाली भारतात जिंकून येण्यासाठी अल्पसंख्याक लोकांचे फुकट लाड करण्याची गरज नाही ह्या दोन चांगल्या गोष्ट ह्या दोन घटनेतून घडल्या.
  • Log in or register to post comments

राजेश१८८ यांचा ऐसीवरील

शाम भागवत
गुरुवार, 03/17/2022 - 16:52 नवीन
राजेश१८८ यांचा ऐसीवरील आश्चर्यकारक प्रतिसाद<\a>
  • Log in or register to post comments

भांगेच्या शेतात उगवलेली तुळस

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/17/2022 - 19:17 नवीन
ऐसीवर असा लेख वाचल्यावर भांगेच्या शेतात अचानक तुळस उगवलेली बघितल्यावर जसे वाटेल तसे वाटले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

मायबोली

Trump
गुरुवार, 03/17/2022 - 21:01 नवीन
मायबोलीवरील चर्चा वाचली. काहीतरी वाचल्यासारखे जबरदस्त वाचल्यासारखे वाटले.
https://www.maayboli.com/node/81285
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

ऐसी अक्षरे

Trump
गुरुवार, 03/17/2022 - 21:12 नवीन
लेख ठिक आहे. चर्चा सुरु होताच संपली. :(
https://aisiakshare.com/node/8414
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

मायबोलीने धागा उडवलेला दिसतोय

शाम भागवत
Fri, 03/18/2022 - 22:53 नवीन
मायबोलीने धागा उडवलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

यावर काय म्हणाल?

उपयोजक
गुरुवार, 03/17/2022 - 19:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हाऊसफुलचा बोर्ड

Trump
गुरुवार, 03/17/2022 - 19:44 नवीन
कदाचित लोक, तिकिट घेउन बघण्याची हिम्मत नसल्याने बघत नसतील. कोणताही चित्रपटगृह मालक का म्हणुन आणि किती दिवस हाऊसफुलचा बोर्ड लावेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

काश्मीर फाईल्स

उपयोजक
गुरुवार, 03/17/2022 - 19:12 नवीन
बघून हिंदूंना राग आला आणि त्यातून पेटून कोणी ध्वनीप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून दररोज भोंगे लावून ५ वेळा ऐकू येणारी नमाज जरी बंद केली तरी भरुन पावलं. होणारेय का हे? मुस्लिम भोंगे काढा म्हटलं की जथ्था घेऊन येऊन दादागिरी करतात. हिंदूंना जमणारेय का हे?
  • Log in or register to post comments

हिंदू मंदिरे पण हेच करतात ....

मुक्त विहारि
गुरुवार, 03/17/2022 - 19:30 नवीन
हिंदू मंदिरांनी, एक वर्षभर जरी ध्वनी प्रदूषण बंद केले तरी मग इतर धर्मियांना पण ध्वनी प्रदूषण बंद करावेच लागेल .. दुर्दैवाने, आमच्या डोंबोलीत तरी, मंदिरे देखील, राजकीय पक्षांनी वाटून घेतली आहेत, असेच वाटते... पुर्वी डोंबिवलीत, इतके ध्वनी प्रदूषण होत न्हवते. आता काही विचारू नका, गणपती असो की नवरात्र, गोंगाट केल्या शिवाय, एक सण साजरा होत नाही. सध्या एक नवीन फॅड आले आहे, दहीहंडी रात्री फोडायची. सकाळ पासून ते रात्री पर्यंत, डीजे सूरूच... दहीहंडी पण राजकीय पक्षांनी, वाटून घेतली आहे की काय? असा संशय येतो ... स्वतः ला सुशिक्षित समजणार्या, पण सार्वजनिक ठिकाणी अशिक्षिता सारखे वागणार्या, डोंबिवलीत ही तर्हा असेल तर, इतर गावी तर धुमाकूळच असेल ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

+१

Trump
गुरुवार, 03/17/2022 - 19:33 नवीन
हिंदू मंदिरांनी, एक वर्षभर जरी ध्वनी प्रदूषण बंद केले तरी मग इतर धर्मियांना पण ध्वनी प्रदूषण बंद करावेच लागेल ..
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ममता बॅनर्जी ....चित्रपटात खोटी कहाणी....

मुक्त विहारि
गुरुवार, 03/17/2022 - 21:34 नवीन
चित्रपटात खोटी कहाणी, 'द कश्मीर फाइल्स' Tax Free करणार नाही https://www.loksatta.com/desh-videsh/asaduddin-owaisi-slams-modi-govt-on-the-kashmir-files-movie-hrc-97-2845652/ खरा इतिहासच जर, स्वीकारला जात नसेल तर, काय बोलणार? गंमत अशी की, अशा नेत्यांच्या बरोबर, "शिवसेना" युती करते.... कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, हे हिंदू हितवादी कधीच न्हवते, त्यामुळे, त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही... पण, शिवसेनेची आधीची धोरणे आणि आत्ताची वागणूक, ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे.... इंद्राय स्वाः, तक्षकाय स्वाः, असेच म्हणायची वेळ, आता आली आहे...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा