Skip to main content

द काश्मीर फाइल्स

लेखक निनाद यांनी बुधवार, 09/03/2022 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे. हा चित्रपट भारतातल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष यांचे चित्रण आहे. ९० च्या दशकात काश्मिर खोर्‍यात केल्या गेलेल्या हिंदुंच्या कत्तलीचे एक डॉक्युमेंटेशन तरी करतो. आजवर असा प्रयत्न ही झालेला नाही. लेखक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदी भाषेत याची निर्मिती केली आहे. ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रमुख कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आदी आहेत. या चित्रपटाला विरोध झाला आहे. याविरुद्ध याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता या चित्रपटाची चर्चा ही होऊ नये म्हणून दडपून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत असे दिसते. उदा: काश्मिरच्या हिंदूंचा ज्वलंत विषय असूनही कपिल शर्मा शो ने याचे प्रमोशन नाकारले आहे. आपल्याच इंडस्ट्रीतील सिनेमा असूनही विषय हिंदू विषयक असल्याने कोणत्याही खान किंवा प्रस्थापित चित्रपट कलावंतांनी द काश्मीर फाइल्सचा उल्लेख पूर्णपणे टाळला आहे. या चित्रपटाची चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे.

वाचने 94267
प्रतिक्रिया 327

प्रतिक्रिया

In reply to by तर्कवादी

श्री तर्कवादी. मग आताच " काश्मीर फाईल्स" बाबत हे का घडत आहे ? या चित्रपटाने अतिरेक्याबद्दल चीड निर्माण होणे अपेक्षित आहे की सरसकट मुस्लिमविरोधी वा भावनांना उत्तेजन दिले जात आहे/किंवा तेच अपेक्षित आहे काय? आणि मुस्लिमांना सरसकट व उघडपणे थेट शिव्या घालणे पॉलिटिकली इनकरेक्ट ठरेल म्हणून सेक्युलर लोकांना शब्दांनी बडवावे - अशी काही मांडणी अभिप्रेतच आहे ?
याचा बराचसा दोष तथाकथित पुरोगामी लोकांना जातो. माझ्या माहितीमध्ये कट्टर कॉंग्रेसवाले किंवा तत्सममतवाले, भाजपा कि समकंक्षविचारणीकडील पक्षाकडे वळले आहेत. ढोंगी पुरोगामी लोकांनी ज्या पध्दतीने हिंदु मंदीरावर हल्ले झालेच नाहीत, इस्लाममध्ये सगळेच कसे समान असतात, दंगलीमध्ये हिंदुचा दोष नेहमी कसा असतो, बाटला हाऊस, इसरत जहॉ प्रकरण, समान नागरी कायदा, अश्या उचापती केल्याने मध्यममार्गी लोक वैतागले आहेत आणि संयम जवळपास संपला आहेत. तेच मतदारपेटीमधुन व्यक्त होत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुस्लिमांनी आणि युरोपियन हिंदुंची आणि भारतीयांची माफी मागणे अपेक्षित होते. इतर देशांमध्ये truth and reconciliation commission सारखे प्रयोग झाले, दुर्देवाने ते भारतामध्ये झाले नाहीत उलट भारतामध्ये डावी लोक इतरांना बोलुनही देत नाहीत. उदा. सीएए आणि एनआरसी सारखे युरोपियन देशांमध्ये आहेत, मुस्लीमांना तिथे त्यांच्याबद्दल अडचण नाही, पण भारतामध्ये आंदोलने चालतात. मुस्लीम इतर देशामध्ये समानतेसाठी आंदोलने करतात आणि भारतामध्ये समान नागरी कायद्याला विरोध करतात. तांत्रिक प्रगतीमुळे आणि वाढलेल्या संवादामुळे ह्या गोष्टी सहज कळतात आणि ढोंगी डाव्यांच्या दांभिकपणा उघडकीस येतो. मी श्री पटेल यांचे भाषण येथे डववतो, तुम्हीच सांगा हे भाषण कोणताही कॉंग्रेसवाला किंवा तथाकथित डावा आज देईल का? ---- तथाकथित डाव्यांच्या जोडीला गजवा - ए - हिंद, बुरखा, इस्लाममधील असमानता हे जोडीला आहेतच. तुम्हाला जवळचे उदाहरण देतो. https://www.misalpav.com/comment/1127514#comment-1127514

In reply to by Trump

ट्रम्पजी,
याचा बराचसा दोष तथाकथित पुरोगामी लोकांना जातो.
माफ करा .. पण मला वाटते आपण कारण मीमांसा नंतर करुयात. मला फक्त आता चित्रपटामुळे प्रेक्षकांची किंवा चित्रपटाच्या एकुणच समर्थकांची प्रतिक्रिया काय स्वरुपाची आहे - म्हणजे साधारणपणे १) काश्मीरमध्ये १९९० साली काश्मीरपंडितांवर झालेले अत्याचार मला व्यथित करत आहेत २) क्र १ + त्यामुळे काश्मिरी अ तिरेक्यांबद्दल माझ्या मनात अतिशय राग निर्माण झाला आहे ३) क्र १ + क्र २ + असे घडण्यास प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कारणीभूत सर्व राजकारण्यांबद्दल मनात अतिशय राग निर्माण झाला आहे ४) क्र १+ क्र२ + क्र ३ + सर्वच मुस्लिम व्यक्तिंबद्दल माझ्या मनात राग व संशय निर्माण झाला आहे ५) क्र १+ क्र२ + क्र ३ + क्र ४ + या घटनेबद्दल मी व इतरांनी जमेल तेव्हा जमेल तसा सूड घ्यायला हवा असे मला वाटते. किंवा अन्य काही प्रतिक्रिया....किंवा वरच्या १ ते ५ मधले इतर काही कॉम्बीनेशन्स... तुम्हाला काय वाटते ? साधारण पणे काय प्रतिक्रिया निर्माण होत आहेत ?
मी श्री पटेल यांचे भाषण येथे डववतो, तुम्हीच सांगा हे भाषण कोणताही कॉंग्रेसवाला किंवा तथाकथित डावा आज देईल का?
सध्या तरी मला चित्रपटाच्या परिप्रेक्ष्यातुन फक्त चर्चा करायला आवडेल. एक सामान्य व्यक्ती म्हणून माझी फक्त इतकीच अपेक्षा आहे की - चित्रपट जरुर बनावेत, बघितलेही जावेत, इतिहास लोकांसमोर नक्कीच यावा पण चित्रपट अशा प्रकारचा असाव की त्याची प्रतिक्रिया म्हणून समाजात एखाद्या जाती वा धर्माविरुद्ध द्वेष निर्माण होवू नये- एखाद्या चुकीच्या प्रवृत्तीबद्दल फक्त राग असावा. - जसे मी वरच्या प्रतिसादात पिंजर या चित्रपटाचे उदाहरण दिले-- हा चित्रपट कुठल्याही प्रकारे द्वेषास उत्तेजन देत नाही. माझ्या या अपेक्षेचे आणि व एकूण्च माझ्या मुस्लिमद्वेष न करण्याचे वर्गीकरण ढोंगी पुरोगामी म्हणून केले जाईल का ? एकूणातच मुस्लिमद्वेष मनात न बाळगणे = ढोंगी पुरोगामी असे नवसमीकरण (न्यू नॉर्मल) तयार होत आहे का ?

In reply to by तर्कवादी

सध्या तरी मला चित्रपटाच्या परिप्रेक्ष्यातुन फक्त चर्चा करायला आवडेल.
सध्या तरी मला चित्रपटाच्या परिप्रेक्ष्यातुन फक्त चर्चा करायला आवडेल.
जर तुम्ही सगळी पार्श्वभुमी काढुन टाकली तर चर्चा कशी करणार!!! दुर्देवाने भारतीय लोकांना त्याविषयी ईतिहास आहे, आणि तो काढुन टाकणे अशक्य आहे. उदा. किलींग फिल्ड (https://en.wikipedia.org/wiki/The_Killing_Fields_(film)) नावाचा चित्रपट आहे, तसे सध्याच्या कंबोडीयाबरोबर भारतीय समाजाचे संबध कमी आहेत, त्यामुळे भारतीय समाज त्याविषयी तट्स्थ मत देउ शकतो. जर तुम्हाला तटस्थ (फक्त चित्रपटाच्या परिप्रेक्ष्यातुन) मत हवे असेल तर ज्यांचा कोणतही संबध नाही अशी लोक घ्यायला हवेत.
माझ्या या अपेक्षेचे आणि व एकूण्च माझ्या मुस्लिमद्वेष न करण्याचे वर्गीकरण ढोंगी पुरोगामी म्हणून केले जाईल का ? एकूणातच मुस्लिमद्वेष मनात न बाळगणे = ढोंगी पुरोगामी असे नवसमीकरण (न्यू नॉर्मल) तयार होत आहे का ?
ढोंगी पुरोगामी म्हणजे आपल्या उध्दीष्ठासाठी खोटा / अपुरा किंवा एकतर्फी इतिहास तयार करतात, इतिहासिक चुका न स्वीकारता, त्यावर पांघरुन घालतात त्यांना म्हणतात. तुम्ही तसे करता का, हा प्रश्न तुम्हीच तुम्हाला विचारा.

In reply to by तर्कवादी

उत्तम प्रतिसाद. मला वाटते १-५ सर्वच रेंजमध्ये काही प्रतिक्रिया येत आहेत. पण ४-५ या प्रतिक्रिया जास्त चर्चिल्या जाणार. त्यामुळे साधारणपणे काय होते हे सांगणे अवघड आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

उत्तम प्रतिसाद.
धन्यवाद
माझ्यासाठी क्रमांक ३
परफेक्ट !!

In reply to by तर्कवादी

पण सध्यातरी चित्रपटाचे प्रमोशन व प्रेक्षकांच्या ढोबळ प्रतिक्रिया बघता ही अपेक्षा अवास्तवच ठरेल व पहिल्या वाक्यात उल्लेखलेली भीतीच खरी ठरेल की काय असे चित्र आहे.
हे निव्वळ कंजेक्चर आहे. आणि अर्थात हे व्यक्तिगत आहे. उदा. मी स्वतः उजवीकडे झुकणारा असल्याने, सोशल मीडियावर मी त्याच बाजूच्या अनेकांना फॉलो करतो. ह्यांतील एकानेही, आपण खाली दिलेल्या श्रेणीक्रमांतील १- ३ च्या वर (४ आणि/ अथवा ५) प्रतिक्रिया दिलेली नाही. एक मात्र खरे, ह्या चित्रपटाच्या निमीत्ताने जी चर्चा होते आहे, त्यांतील डाव्या व तथाकथित उदारमतवाद्यांच्या आक्रस्ताळ्या भूमिका पहाता, त्याची दाहकता मूळापेक्षा वाढली आहे. म्हणजे, तुमच्या श्रेणीक्रमांत खरे तर ३अ आहे-- 'जे ढळढळीत पुराव्यांनिशी मांडले जात आहे, त्याविषयी नकारात्मक, सांशयिक भूमिका घेणार्‍या त. क. उदारमतवाद्यांविषयी माझ्या मनांत राग व संशय निर्माण झाला आहे' ते बर्‍याच जनतेचे होत आहे. 'जे झाले असे चित्रपट मांडतो, ते तसे झालेच नाही'/ 'इतक्या पूर्वी होऊन गेलेल्या त्या घटनांचा आता उल्लेख कशाला?"/ 'ह्याने समाजांत दुफळी निर्माण होईल' असली वावदूक वक्तव्ये ही मंडळी चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीपासून आतापर्यंत करत आली आहेत, ते चीड आणणारे आहे. 'शिंडलर्स लिस्ट' सारखा चित्रपट प्रसिद्ध झाल्यावर, ह्यामुळे दुफळी माजेल, लोक समस्त जर्मनांशी वाईट वागू लागतील, असले काही झालेले नाही. आताही ह्यांतून हिंदू- मुस्लिम दुफळी निर्माण होण्याइतका हिंदू समाज बावळट नाही. सर्वसामान्य जनता व त. क. पुरोगामी/ उदारमतवादी ह्यांतील दुफळी नक्कीच वाढेल, मात्र. आणि त्याला चित्रपट निर्माता/ दिग्दर्शक जबाबदार न राहता, हे त. क. पुरोगामीच असतील.

In reply to by प्रदीप

धन्यवाद प्रदीप जी
ह्यांतील एकानेही, आपण खाली दिलेल्या श्रेणीक्रमांतील १- ३ च्या वर (४ आणि/ अथवा ५) प्रतिक्रिया दिलेली नाही
वाचून बरं वाटलं.
आताही ह्यांतून हिंदू- मुस्लिम दुफळी निर्माण होण्याइतका हिंदू समाज बावळट नाही
बस.. हीच अपेक्षा आहे.. सर्वांनी ह्याच सुज्ञ विचारसरणीची कास धरावी ..

The Kashmir Files : ‘देशविरोधी सरकार जुन्या जखमा कोरून…’ काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे भाजपावर टीकास्त्र https://www.loksatta.com/manoranjan/the-kashmir-files-congress-criticiz… कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, हे हिंदू हितवादी नाहीत, असेच माझे वैयक्तिक मत, अधिक दृढ होत चालले आहे ....

In reply to by मुक्त विहारि

पंडीतांनी काश्मिरमधे कधी जायचे ते सरकारला विचारवे - सचिन सावंत अतिशय निर्लज्ज विधान. दुसर्‍या महायुध्दानंतर ज्युंच्या वंशविच्छेदानंतर इस्त्राइल जसा बनला तसे सोल्युशन काँग्रेसी बगलबच्चांना चालेल का. साधे रोपटे पण एका कुंडीतून उपटून दुसर्‍या कुंडीत घातले की नेहमीच तग धरत नाही. भाड्याचे घर बदलताना पण जरी शेजारच्या इमारतीत जायचे असेल तरी किती तांरांबळ उड्ते इकडे काश्मिरी कितीतरी कुटुंबे विस्थापित झाली त्यात काहींचे बाप, भाऊ वगैरे मारले गेले होते, त्यांचे अंत्यसंस्कार तरी झाले होते का देव जाणे. त्यांना फक्त काश्मिरमधे जागा दिली की झाले असे ज्यांना वाटते त्यांचा धिक्कार. थू तुमच्या आयुष्यावर.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आणि काश्मीरचा प्रश्र्न युनोत का नेला? ते पण जाऊ दे 1965 आणि 1972 मध्ये, काश्मीर स्वतंत्र करता आले असते, ते का केले नाही? आजही, CAA आणि NRCला विरोध करून, कॉंग्रेस हिंदू हितवादी नाही, हेच सिद्ध होत आहे.... कॉंग्रेसची धोरणे, तेंव्हाही हिंदू हितवादी न्हवती आणि आज देखील नाहीत...

In reply to by मुक्त विहारि

३७० कलम रद्द करायला जमले नाही सत्तेवर असताना कौन्ग्रेस् ला. आता याना त्रास होतोय काश्मिर फाइल्स प्रदर्शित झाला म्हणुन..

In reply to by मुक्त विहारि

कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, हे हिंदू हितवादी नाहीत मला असे गेली अनेक वर्शे वाटत आहे. लोकसत्ताचे सम्पादक कुबेर हे नेहेमी भाजप विरोधी राहिले आहेत. तुम्ही दिलेल्या लोकसत्तेच्या सदरातले "सरकार जुन्या जखमा कोरून त्या भळभळत राहतील हे पाहते" हे वाक्य घेतले तर पन्डिताना जखम झाली हे कबुल करताना त्यानी मोदीसरकारला देशविरोधी हे विशेशण लावले आहे.

The Kashmir Files : पुण्यातील 'हॉटेल खान्देश'चा देशप्रेमी तडका,'द कश्मीर फाइल्स'चे तिकीट दाखवा अन्... https://marathi.abplive.com/news/pune/hotel-khandesh-in-pune-collect-ti… उत्तम निर्णय...

कोणतेही मत बनवायच्या अगोदर थोडा विचार करायलाच हवा पण माणूस बुद्धिमान आहे असे वाटत असले तरी तो उथळ विचाराचा आहे . हे अनेकदा सिद्ध झाले आहे. जेव्हा कोणत्याही समाज कडून ( ह्या मध्ये सर्व गट आले,धार्मिक,जातीय,प्रांतीय,भाषिक) हिंसक प्रतिक्रिया उठते . तेव्हा ते असे हिंसक का झाले ह्याला मोठी पार्श्वभूमी असते. समाज एकत्र होवून हिंसक कारवाया करण्यास लगेच तयार होत नाही त्या साठी तसे प्रयत्न किती तरी वर्ष काही लोक करत असतात. चंद्रकुमार ह्यांनी उल्लेख केल्या प्रमाणे स्फोटक तेल निर्माण करावे लागते. मग ठिणगी टाकली की आज लागणार च.. केंद्रात जे सत्तेवर असतात त्यांची एक निती असते विरोधी पक्षांची राज्य सरकार अडचणीत आणणे..त्या साठी राज्यपाल हा सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता त्या साठी वापरला जातो. (राज्यपाल हे पद राजकीय व्यक्ती लं असू च नये.) इंदिरा गांधी ची वृत्ती पण तशीच होती विरोधी पक्षांची राज्य सरकार काही ही योग्य कारण नसताना फक्त राजकीय हेतू साठी बरखास्त करणे. चंद्र सूर्य कुमार ह्यांनी त्याचा उल्लेख केला आहे. राज्यसरकार ही राज्याचं प्रतिनिधित्व करतात राज्यातील लोकांच्या भावना राज्य सरकार शी जुळेल्ल्या असतात. केंद्रात सत्तेत असणाऱ्या पक्षाने राजकीय हेतू नी राज्य सरकार बरखास्त केले किंवा अडचणीत आणले की त्या राज्यातील जनता अस्वस्थ होते त्यांना असुरक्षित वाटते. काश्मीर मधील सरकार केंद्रातील काँग्रेस नी बरखास्त केले आणि जगमोहन हे राज्यपाल होते त्या काळात. चंद्रकुमार ह्यांची पोस्ट. आणि नंतर असलेल्या vp sing सरकार नी त्या जगमोहन ह्यांना च राज्यपाल म्हणून नेमणूक केली .इथेच हिंसाचार ची बीज आहेत काश्मीर मध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत म्हणून त्याला धार्मिक रंग आहे. पण तो संघर्ष स्थानिक जनता विरुद्ध बाहेरचे असाच आहे.. हिंदुस्थान सरकार म्हणजे हिंदू चे सरकार. म्हणजे आमच्या अधिकारावर गदा आणणारे . म्हणून हिंदू विरुद्ध तेथील जनता एक झाली आणि पुढे हिंसाचार झाला. माझ्या मते हेच कारण आहे .त्या मध्ये संधी बघून धर्म वेडे सहभागी झाले असतील पण बोट घालण्यास जागा दिल्ली मधील राजकीय लोकांनीच निर्माण केली. आज पण मोदी सरकार बंगाल ,महारष्ट्र मध्ये त्यांच्या अधिकाराचा गैर वापर करत आहे. दोन्ही राज्यातील जनता त्या मुळे केंद्र सरकार वर नाराज आहे. हे स्फोटक तेल च आहे पण जास्त ज्वालाग्राही अजून तरी नाही.

भाजप संसदीय समिती बैठकीत द काश्मीर फाईल्स ह्या चित्रपटाचे कौतूक केले आहे पंतप्रधान महोदयांनी ह्या प्रसंगी प्रत्येकाने पहावा असे वर्णन काश्मीर फाईल्स ह्या चित्रपटाचे केले आहे.

काश्मिरी हिंदू चे पुनर्वसन कसे करणार ह्या वर देशाच्या पंतप्रधान असलेल्या व्यक्ती नी बोलले पाहिजे. पण ते काम खूप अवघड आहे ,त्या साठी कष्ट आहेत. सर्वात सोप हिंदू मुस्लिम मध्ये दरी निर्माण करून राजकीय फायदा करणे . आणि सत्ता मिळवणे.

राज्यपाल हे सरळ त्या राज्यातील लोकांच्या मतदान नी सरळ निवडून आला पाहिजे.. हे पद अनेक समस्या चे कारण आहे .यूपी ची राज्यपाल आनंदी बाई पटेल. Bjp पक्षाची गुजरात ची माजी मुख्य मंत्री जोक आहे मोठा. महाराष्ट्राचे राज्यपाल bjp चे कार्यकर्ते rss शी संबंधित .ही लोक निरपेक्ष निर्णय घेवूचं शकत नाहीत

युवक काँग्रेस निवडणूक, तौसिफ खान नागपूरचे शहराध्यक्ष, निवडणुकीत गैरप्रकार झालाय? https://www.tv9marathi.com/maharashtra/nagpur/youth-congress-election-t… वसीम खान, अक्षय घाटोळे यांच्या म्हणण्यानुसार, तौसिफ खानवर गुन्हे दाखल आहेत. शिवाय वय पस्तीस वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळं तौसिफ खान युवक काँग्रेसची निवडणूक लढू शकत नाहीत. शीलजरत्न पांडे समर्थकांनी आक्षेप घेतला की, सर्वाधिक मते घेणारे तीन उमेदवार निवडणुकीसाठी पात्र नाहीत.....

In reply to by मुक्त विहारि

हा प्रतिसाद ताज्या घडामोडी धाग्यावर चपखल बसेल असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी तुम्ही म्हणाल ते प्रमाण, नाहीतरी आपण मिपावर अमरपट्टा घेऊनच वावरता आम्ही मर्त्य उगा आपलं आदराने काहीतरी सुचवायचं म्हणून बोललो हो :)

https://marathi.abplive.com/entertainment/the-kashmir-files-film-imdb-r… रेटिंग कितीही असो, ज्याला सिनेमा बघायचा आहे, तो बघणारच ...

किती घाण करणार!!!
‘द काश्मीर फाईल्स’मुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न, गृहमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता या चित्रपटाच्या आडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे, अशी चिंता दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील नेमकं काय म्हणाले? काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराशी संबधित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला करमाफी देण्याची मागणी भाजप सदस्यांनी केली होती. मात्र हा चित्रपट संपला की चित्रपटगृहाच्या बाहेर लोकांना एकत्र करुन हिंदू जनजागृती विशेष संवादाच्या माध्यमातून धर्म प्रसार केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता झुंड चित्रपटाचे मोफत खेळ दाखविले जात आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील म्हणाले. https://www.loksatta.com/manoranjan/home-minister-dilip-walse-patil-con…

एक गोष्ट लक्षात आली आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून समस्त जमात-ए-पुरोगामी चवताळून त्या चित्रपटावर हल्ला करायला लागले आहेत- जणू काही हा चित्रपट म्हणजे त्यांच्याच जीवनमरणाचा प्रश्न आहे. पण आता ते लोक असे का करत आहेत त्याचे कारण समजले. हा चित्रपट खरोखरच त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. इतकी वर्षे समाजकार्य किंवा अन्य दुसरे कोणते लेबल लाऊन हिंदूविरोध हाच अजेंडा हे लोक राबवत होते. इतकी वर्षे ही गोष्ट हिंदूंच्या लक्षात आली नाही म्हणून किंवा बरेच लोक बावळट होते म्हणून ती गोष्ट कळूनही त्याला पाठीशी घातले गेले. पण आता या चित्रपटाच्या निमित्ताने हे लोक नक्की कोणाचे समर्थन करत होते हे आता सामान्यांना समजले आहे. मग हळूहळू लोक इतर प्रश्नही विचारायला सुरवात करत आहेत. उदाहरणार्थ अरूंधती रॉय आणि यासीन मलिकचे नक्की काय साटेलोटे होते की त्याच्याबरोबर अगदी खिदळत होती? roy इंडिया टुडेने यासिन मलिकला त्यांच्या इंडीया टुडे कॉनक्लेव्हमध्ये पण बोलावले होते. अशी इतर उदाहरणेही असतीलच. काश्मीरमधून हिंदूंचे विस्थापन झाले हे सगळ्यांना माहित असली तरी परिस्थिती नक्की किती भयानक होती याची कल्पना सगळ्यांना नसते. ती कल्पना सगळ्यांना या चित्रपटामुळे मिळाली आहे. आपसूकच इतकी वर्षे हे जमात-ए-पुरोगामी नक्की कोणाची बाजू घेत होते हे समजले की मग त्यांनी जी डावी इकोसिस्टीम उभी केली आहे त्याच्या विश्वासार्हतेला तडा जाऊन त्यांच्या अस्तित्वावरच घाला येईल हे त्यांना समजले नसेल असे अजिबात नाही. एका अर्थी हा चित्रपट आणि त्याला मिळणारा उदंड प्रतिसाद या जमात-ए-पुरोगामीच्या अस्तित्वावरच प्रहार करायची क्षमता बाळगून आहे. मग ते चवताळून उठले नाहीत तरच नवल.

चित्रपट पाहायचा आहे पण 2.5 वर्षाचा मुलाला सोबत घेऊन जाता येईल का ?? घरी सांभाळणारे कोणी नाही ... त्याला एकट्याला सोडून जाता देखील येणार नाही... त्यामुळे कसे करावे ते समजत नाही.. कोणी लहान मुलाला घेऊन हा चित्रपट पाहिला आहे का. थेटर मध्ये सोडतात का?

In reply to by बापूसाहेब

माझा सल्ला: लहान मुलांना असल्या ठिकाणी घेउन जाउन नये. मुले रडल्यामुळे इतरांना त्रास होतो. मुलांना तत्सम चित्रपटातील भयवहता पाहुन त्रास होतो.

या नावाखाली हिन्दु जाती जातीन्मधे तेढ निर्माण करायची. आणि राज्य करायचे. या पुरोगाम्याना हिन्दु उच्च जातिन्चा राग का? एक कारण पैसाआहे. तेलामुळे मुस्लिम् देशान्कडे पैसा आहे. आणि पाश्चात्य देशान्कडे भरपुर पैसा आहे. मग परदेशी मदत मिळवायची तर हिन्दु धर्म आणि त्यातल्या उच्च जाती याना बदनाम करणे सोपे आहे. यात परत जिवाला धोका नाही. आणि३.५ की ४.५ टक्के लोकान्ची भीती दाखवुन उरलेला समाज ताब्यात ठेवणे सोपे तस पाहिल तर कुळ कायदा करुन शेतीचे कुळाना वाट्प, आरक्शण, ईतक्या वर्षाचे कौन्ग्रेस्स सरकार, आम्बेडकरान्ची घटना, असे असताना देश सुजलाम सुफलाम व्ह्यायला हवा होता,एकदम धरतीवरचा स्वर्ग... काश्मिर फाइल्स च्या निमित्ताने समाज ढवळुन निघतो आहे हे खुप चान्गले आहे. सगळ्या बाजु समोर येतायत हे देखिल चान्गले आहे. वैचारिक बदल होताना त्रास तर होणारच. बर्याच युरोप मधील देशाना मुस्लिम बहुसन्ख्य झाल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे भारताने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुखीमाणूस

या पुरोगाम्याना हिन्दु उच्च जातिन्चा राग का?
बनावटी पुरोगामी लोकांना हिंदुमध्ये जातीद्वेष पसरवायला आवडतो.
बर्याच युरोप मधील देशाना मुस्लिम बहुसन्ख्य झाल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागतो आहे.
कोणत्या युरोपियन देशांत मुस्लिम बहुसंख्य झाले आहेत?

In reply to by सुखीमाणूस

बहुसंख्य होणे आणि लोकसंख्या वाढणे ह्यात फरक आहे. कृपया मुस्लीम बहुसंख्य झालेल्या युरोपियन देशांची नावे द्यावीत.

In reply to by Trump

युरोपमधे मुस्लिम बहुसन्ख्य होउ घातल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागेल अशी चिन्ता व्यक्त होते आहे असे म्हणायचे आहे. चुक लक्शात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.

खऱ्या काश्मीर फाइल्स/स्टोऱ्या पाहायच्या असतील तर खालील ३ व्हिडीओ पहा. प्रोपोगंडा नाही. म्हणजे यांचाही नाही आणि त्यांचाही नाही. काश्मिरी पंडितांचे शिरकाण करणाऱ्या मुस्लिम अतिरेक्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती ऐकून काटा आला. १. मुस्लिम अतिरेक्यांची मानसिकता, अतिशय प्रतिगामी इस्लामी कट्टरता ( डार्विनला विरोध, आधुनिक शिक्षणाला विरोध, स्त्री समानतेचा विरोध ) काय चीज आहे हे अतिशय थोडक्यात पण परिणामकारकरित्या कळते. सॅम हॅरिस म्हणतो की "(धार्मिक) मूलतत्ववाद हा वाईट नसतो जर धर्माची मूलतत्त्वेच चांगली असतील तर. उदा. एखादा जैन जितका कट्टर होत जाईल तितका तो समाजावर उपकारक, अहिंसक आणि चांगला होत जाईल. इतका की पडलेली फळं खाऊन पोट भरेल, चालताना मुंगी देखील चिरडणार नाही, बोलताना तोंड झाकून घेईल. म्हणून इस्लामी मूलतत्ववादी आणि जैन मूलतत्ववादी यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे." अर्थात व्यवहारात सगळ्याच धर्माची मूलतत्त्वे तितकी साधी सरळ आणि सोपी मात्र नाहीत हे ही तितकेच खरे आहे. आणि असली तरी अनुयायी त्यांचे वेगवेगळे अर्थ लावून असंख्य प्रथा परंपरा रूढी निर्माण करतातच. अशा गोष्टींवर बळावरच आधुनिक समाज चालवणे, त्यासाठी कायदे करणे हे शेवटी समाजाला मागासच करणार आहे. आता व्हिडीओत दाखवलेल्या इस्लामी मागण्या (डार्विनला विरोध, आधुनिक शिक्षणाला विरोध, स्त्री समानतेचा विरोध ) ह्या कमी अधिक फरकाने हिंदुत्ववादीही तेही समाज प्रबोधनाच्या नावाने करतच आहेत. ( उदा. आपले लाडके कॉमेडी कीर्तनकार). आणि मूळ विषय म्हणजे पंडितांचे विस्थापन, त्यांच्या हत्या. त्यांचे समर्थन डोके ताळ्यावर असलेला कुणीही माणूस करूच शकत नाही. संतोष शिवनच्या चित्रपटात भुतासारखा हिंडणारा काश्मिरी पंडित बघून, भीषण सिंग चे हे श्रीनगरचे चित्र पाहून वेदना होतात. २. दुसरा व्हिडीओ: अभाविप आणि तत्सम संघटनांनी केलेले आंदोलने (एकता यात्रा) हा मुख्य विषय. गमंत म्हणजे आपले लाडके विश्वगुरु तेव्हाही तितकेच थापाडे होते हेही लक्षात येईल. साक्षात आदरणीय अटल बिहारी देखील त त प प करताना पाहून मला धक्का बसला. ( परंतु निदान पत्रकारांना सामोरं गेले हे सुद्धा पुरेसे आहे ) ३. तिसरा व्हिडीओ: दुराईस्वामी अपहरण, त्यांचा स्टॉकहोम सिन्ड्रोम, मस्त गुल ह्या पाकिस्तानी अतिरेक्याची मुलाखत असा आहे. हा पण अतिशय धक्कादायक. असो. काश्मीर फाईल्स पाहण्यापूर्वी पूर्वतयारी केली आहे. या वीकांताला पाहण्याचा प्लॅन आहे.

सॅम हॅरिस म्हणतो की "(धार्मिक) मूलतत्ववाद हा वाईट नसतो जर धर्माची मूलतत्त्वेच चांगली असतील तर. उदा. एखादा जैन जितका कट्टर होत जाईल तितका तो समाजावर उपकारक, अहिंसक आणि चांगला होत जाईल. इतका की पडलेली फळं खाऊन पोट भरेल, चालताना मुंगी देखील चिरडणार नाही, बोलताना तोंड झाकून घेईल. म्हणून इस्लामी मूलतत्ववादी आणि जैन मूलतत्ववादी यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे." हा मुद्दा नाही पटला कुठलाही धर्म जेव्हा कट्टरते कडे झुकतो तेव्हा त्याचे दोष दिसू लागतात. स्वतःला शांतताप्रेमी म्हणून मिरवणारे जैन धर्मीय जेव्हा मांसाहारी मराठी लोकांना सोसायटी मधून हाकलून देतात किंवा मुंबई मध्ये आसुन घर द्यायला नकार देतात, तेव्हा धर्म शेवटी कुठे घेऊन जातो ते कळते

In reply to by डाम्बिस बोका

कुठलाही धर्म जेव्हा कट्टरते कडे झुकतो तेव्हा त्याचे दोष दिसू लागतात. स्वतःला शांतताप्रेमी म्हणून मिरवणारे जैन धर्मीय जेव्हा मांसाहारी मराठी लोकांना सोसायटी मधून हाकलून देतात किंवा मुंबई मध्ये आसुन घर द्यायला नकार देतात, तेव्हा धर्म शेवटी कुठे घेऊन जातो ते कळते
तुम्ही चुकीचे अजिबात बोलला नाही आहात. अति सर्वत्र वर्जयेत पण. मी माझे घर कोणाला द्यायचे याचा अधिकार मला असणे मी योग्य समजतो. मी मासे खात नाही. त्याचा वासही मला सहन होत नाही. असे असताना मी का बरे मासे खाणार्‍या माणसांना माझ्या घरात जागा देऊ? अगदी त्याच पध्दतीने साधारणतः माझ्या विचारांची जवळीक असलेला शेजार असेल तर तो मला भावतो. इथे कोणत्या धर्माचा वगैरे प्रश्न नसून ही साधारणतः मानसिकता असते. त्या बद्दल बोलतोय. कट्टर जैन कसे वागतात याच्या समर्थनार्थ मी हे बोलत नाही आहे. पण ते असो. जैन कितीही कट्टर झाला तरीही ते दोषपूर्ण वर्तवणूक करतात म्हणजे ते बलात्कार, खून, जाळपोळ वगैरे करत नाहीत. किंवा "जैन धर्म स्विकारा किंवा मरा" अशा अटीही लादत नाहीत. एवढे तरी मान्य करू शकाल का? "काश्मिर फाईल्स" हा धाग्याचा विषय आहे म्हणून विचारतोय. तरीही काश्मीर फाईल्स मधली कट्टरता व जैन कट्टरता ही एकाच प्रकारची आहे. त्यात डावे उजवे असे काहीही करता येत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर मात्र माझा पास.

In reply to by शाम भागवत

जैन कितीही कट्टर झाला तरीही ते दोषपूर्ण वर्तवणूक करतात म्हणजे ते बलात्कार, खून, जाळपोळ वगैरे करत नाहीत.
हे फारच धाडसी विधान झाले काका. बलात्कार खून जाळपोळ हे फक्त धार्मिक सेंटिमेंट्स मधूनच होतात असे नाही ना हो. म्हणजे वरील गुन्हे करायला आर्थिक, सामाजिक व इतरही कारणे असू शकतात ना,

In reply to by जेम्स वांड

म्हणजे वरील गुन्हे करायला आर्थिक, सामाजिक व इतरही कारणे असू शकतात ना,
धाग्याचा विषय आहे काश्मीर फाईल्स. मी धागा विषयाच्या संदर्भात बोलतोय. काश्मीर फाईल्स मधे आर्थिक व सामाजिक तसेच इतरही कारणे असून धार्मिक कारणे ही त्यामुळे फारशी महत्वाची ठरत नाहीत असे तुम्हाला म्हणावयाचे असेल तर माझा पास.

In reply to by शाम भागवत

फक्त "जैन असे करत नाहीत" ह्या क्लीनचिटला माझा आक्षेप होता, किंबहुना काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कर घुसले त्या क्षणापासून ते धर्मयुद्ध होतेच की, त्याबाबतीत वादच नाही माझा काही. मुद्दा अजून सुलभ करता, जैन अजिबातच हिंसक गुन्हे करत नाहीत असे नाही इतके मात्र मी म्हणतोय.

In reply to by जेम्स वांड

मला जे काही म्हणावयाचे आहे ती मी म्हटले आहे. तुम्ही जो काही खुलासा करायचा आहे तो केला आहे. मिपाकर सुज्ञ आहेत. ते योग्य तो बोध त्यातून घेतीलच.

In reply to by शाम भागवत

मराठी माणसाला बऱ्याच गुजराती सोसायटीमध्ये घर भाड्याने सोडा पण विकतही घेता येत नाही. घराचे उदाहरण सोडल्यास जैन वगैरे लोक कितीही कट्टर वागले तरीही त्यांचा मात्र होईल आस वाटत नाही.

In reply to by शाम भागवत

थोडे अवांतर होते आहे. विषय वेगळा आहे म्हणून हा मुद्दा आटोपता घेऊया. बाकी चर्चा खूप चांगलीं चालली आहे. बरीच नव्याने माहिती मिळाली.

हिंदू एक असला पाहिजे. आपल्या बांधवांवर कुणी हल्ल्ला करत असेल तो परतवण्यासाठी हे आवश्यक आहे. आज वर आपल्याला कसा धार्मिक छळ भोगावा लागला याचे रेकॉर्ड्स जपले पाहिजेत. त्या चुकातून शिकले पाहिजे. पण चित्र काय आहे? हिंदूंचा छळ हे एक विकिपिडिया चे पान सुद्ध आपण पाहिले तर पूर्ण झालेले नाही. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A… यात लाल रेघा असलेले प्रत्येक पान हिंदूंनी तयार केले पाहिजे! जितका छळ आपला हिंदूंचा झाला आहे तेव्हढा कोणत्याही धर्माचा या भूतलावर झालेला नाही. मग प्रत्येक छळाचा प्रकार येथे नोंदलेला हवा. तुम्ही चांगली चित्रे काढता? मग काढा या छळाची चित्रे आणि डकवा येथे! अगदी साठी लाईन आर्ट पण चालतील पण त्यातून काय भोगले ते कळले पाहिजे पुढील पीढीला. हे एक गोष्ट लक्षात ठेवा इंग्रजी विकि हा डाव्यांनी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे तिकडे जाण्यात अर्थच राहिलेला नाही! मग कोण कोण येतंय?

हिंदू एक असला पाहिजे. आपल्या बांधवांवर कुणी हल्ल्ला करत असेल तो परतवण्यासाठी हे आवश्यक आहे. नक्की काय करायला हवे?

In reply to by आग्या१९९०

https://www.esakal.com/manoranjan/kashmir-files-is-tax-free-in-bjp-ruli… हिंदू हितवादी भाजपने तर करून दाखवले... आता स्वयंघोषित हिंदू हितवादी शिवसेना काय निर्णय घेते? हे बघणे रोचक ठरेल...

In reply to by आग्या१९९०

हिंदूंनi एकत्र व्हायचे म्हणजे नक्की काय करायचे? २)एकत्र येवून नॉन पॉलिटिकल संस्था स्थापन करायच्या आणि जेव्हा असे धार्मिक हल्ले होतील तेव्हा एकजूट होवून प्रतिकार करायचा. २) हिंदू च्या उन्नती साठी सामूहिक प्रयत्न करायचे. ३) की हिंदू वादी म्हणून स्वतःला प्रमोट करणाऱ्या राजकीय पक्षांना मत द्यायचे. ४) की कोणत्या ही योग्य राजकीय पक्षांना मत द्यायचे पण त्यांना मुस्लिम धर्माचे वेगळे लाड करून द्यायचे नाहीत. नक्की काय करायचे. हिंदुवादी म्हणून स्वतःला प्रोमोट करणाऱ्या राजकीय पक्षांना मत देणे सोडून बाकी सर्व हिंदू नी केले तर . त्याला हिंदू नी एकत्र येणे समजले जाईल का? की फक्त आणि फक्त हिंदुत्व वादी पक्षांना निवडणुकीत मत देणे म्हणजे हिंदू नी एकत्र येणे अशी एका वाक्यात व्याख्या आहे.

मुळांत, हे तिन्ही सिनेमे, सत्य घटनेवर आधारित आहेत... सकारात्मक विचारसरणी असलेले लोक काय करू शकतात? हे झूंड दाखवतो तर, इतरांना धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडणारे आणि इतर धर्मियांना त्रास देणारे, काय करू शकतात? हे काश्मीर फाइल्स दाखवतो. पावनखिंड हा उत्कृष्ट नेता असेल तर, सामान्य जनता देखील, त्या नेत्याच्या पाठीमागे कशी उभी राहते? हेच दाखवतो ...

येथे लिहिणार्या अनेकाना हे ठाउक नसावे की कुराणात अनेक ठिकाणी असेच सान्गितले आहे. कि जे मुस्लिम नाहीत त्यानी मुस्लिम धर्म स्वीकारावा नाहीतर मरायला तयार रहावे. उदा" Muster against them all the men and cavalry at your disposal so that you can strike terror into the enemies of Allah and of the believers and others besides them who may be unknown to you, though Allah knows them. अजुनहि मुस्लिम्स तेच करत आहेत कारण कुराणच्या विरुद्ध कोणीहि बोलु शकत नाही कारण तो अल्लाह चा शब्द आहे. (रच्याकने अल्ला या शब्दाचा अर्थ आई असाआहे)

काश्मीर मध्ये जे घडले ते अचानक घडले नाही. त्याची तयारी ,संघटन ,योजना निर्माण करण्यास दीन चार वर्ष गेली असतील .भारत सरकार कडे अनेक एजन्सी आहेत ..भारत सरकार ल काश्मीर मध्ये काय घडतं आहे ह्याची माहिती नक्कीच असणार .घटना घडली तेव्हा केंद्र सरकार मध्ये हिंदू वादी BJP होती..जगात कोणत्याच देशात नाहीत इतके प्रचंड अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्र पती ह्यांना भारतात घटनेने दिले आहेत... देशाच्या हद्दीत हत्याकांड होते ह्याला जबाबदार फक्त त्या वेळ चे भारत सरकार आहे. सशक्त केंद्रीय दल,सशक्त लष्कर असणाऱ्या देशाच्या हद्दीत हे घडलेच कसें.ह्याचे फक्त एकच..कारण राजकीय फायदा घेण्याची राजकीय पक्षांची वृत्ती. कोणाला ही न विचारता आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्र पती ना आहे. का नाही त्याचा वापर केलं

हा माणूस नक्कीच विचारवंत असणार. कारण असल्या लोकांना समोर दिसत असते ते बघायचे नसते. त्यातही बळी पडणार्‍यांमध्ये हिंदू असले तर त्याकडे कानाडोळा करायचा हा या लोकांचा शिरस्ता असतो. निखिल वागळ्यानंही हीच आकडेवारी त्याच्या वॉलवर लावलीय फेबुवर

द काश्मीर फाईल्सचा विषय देशभर तापलेला असताना, देशाच्या, समाजाच्या दुर्दैवाने, काही लोकांनी विविध नॅरेटिव्ह विनाकारण सेट करायला घेतले आहेत. काश्मिरी पंडितांबद्दल एवढं वाटतं - पण गोध्राबद्दल, खैरलांजीबद्दल, दलितांवरील अत्याचारांबद्दल काहीच वाटत नाही का? : हा असाच एक नॅरेटिव्ह. जणूकाही काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांवर भरभरून लिहिणाऱ्यांना "इतर" प्रकरणांचं काहीच वाटत नाही! वास्तव फार वेगळं आहे. गोध्रा, खैरलांजी, हजारो वर्षांपूर्वी झालेले दलितांवरील अत्याचार - सर्वांवर भरपूर लिहिलं, बोललं जातं. सहवेदना व्यक्त केली जाते. सैराट, झुंड, जय भीम - मनापासून उचलून धरले जातात. गोध्रा दंगलीचा निषेध समाजातील सर्व स्तरांमधील लोकांकडून वेळोवेळी झाला आहे. गुन्हेगारांवर न्यायालयात केसेस दाखल झाल्या, त्यांचे निकाल देखील लागून झालेत. नरेंद्र मोदी गोध्रास जबाबदार आहेत असं वाटणारे देखील काही कमी नाहीत. त्यांनी आजपर्यंत तो मुद्दा वेळोवेळी उचलून धरलाय आणि त्याची मेनस्ट्रीम मीडियामध्ये न भूतो न भविष्यती चर्चा देखील झाली आहे. खैरलांजी वा इतरही अनेक दलित अत्याचार देखील "अज्ञात, अचर्चित, दुर्लक्षित" अजिबात नाहीत. असूच नयेत. परंतु काश्मिरी पंडितांची झालेली दैना मात्र आजपर्यंत माध्यमांमध्ये चर्चिलीच गेली नव्हती. काश्मीर फाईल्स गाजतोय तो हा "लपवला गेलेला इतिहास" एकदम उघड झाल्यामुळे. १९९० साली २५-३० वर्षांचे असतील असे कित्येक ज्येष्ठ नागरिक आज थियेटर बाहेर पडताना हताशपणे "हे इतकं घडून गेलं आणि आम्हाला काहीच कसं माहिती नाही?!" हा विषाद व्यक्त करतात. मुद्दा हाच आणि इतकाच आहे. मोदींनी गोध्रा घडवलं - हे ओरडून ओडून सांगता आलं अनेकांना. देशाच्या कानाकोपऱ्यात तो आवाज पसरवता आला. त्यांना त्यांचं म्हणणं व्यक्त करता आलं - तो हक्क बजावता आला. हा हक्क फार महत्वाचा आहे. न्याय होणं - हा भाग नंतरचा. पंडितांना सुद्धा न्याय मिळणं तर सोडाच - आवाज उचलण्याचा हक्क देखील नाकारला गेला होता. हेच वास्तव बहुतेकांना बेचैन करून सोडतंय. तुम्हाला हेही मान्य का होऊ नये? इतरांना ते जाणवतंय तर तुम्हाला ते इतकं जड का जावं? कश्मिरी पंडित "विरुद्ध" इतर सर्व : असा अजून एक नॅरेटिव्ह बेमालूम पसरवला जातोय. अन्याय - मग तो कुठल्या का जात, धर्म, भाषा, पंथावर का झालेला असेना - वाईटच. भारतातील सामान्य नागरिक जात धर्म बघून अत्याचारावर प्रतिक्रिया देण्याचा क्षुद्र विचार करत नाही. काश्मिरी "पंडितांवर" झालेल्या अत्याचाराचा विषय मात्र काही क्षुद्र लोक आम्ही "विरुद्ध" तुम्ही - असा घेत आहेत. हा "विरुद्ध" केल्याचा दोष कुणाचा? चित्रपट निर्मात्यांचा, चित्रपट उचलून धरणाऱ्यांचा - की - हे इकडचे विरुद्ध तिकडचे अशी मांडणी करणाऱ्यांचा? अजून एक. त्यावेळी सत्तेत कोण होतं - याची एक यादी फिरतीये सर्वत्र. महत्वाची यादी आहे ती. "जबाबदार कोण" हा प्रश्न म्हत्वाचाच आहे. पण मग फक्त यादी पसरवून कसं चालेल? ज्यांनी वास्तवात जीव घेतले - त्यांचं काय? ज्यांनी जाणीवपूर्वक जीव घेणाऱ्यांना पाठीशी घातलं त्यांचं काय? त्यांच्या प्रेरणा काय होत्या - त्या अभ्यासाचं, त्या मूळ विषयाचं काय? हे सगळं स्पष्टपणे बोलणारे थेट कम्युनल आणि विनाकारण "पंडित विरुद्ध इतर" असं मांडणारे तुम्ही सेक्युलर?! काश्मीर फाईल्स राजकीय हेतूने प्रेरित आहे - हा शेवटचा टिपिकल नॅरेटिव्ह. आहेच. हा चित्रपट राजकीय हेतूने प्रेरित आहेच. वादच नाही. ताकाला जाऊन भांडं लपवण्यात अर्थ नाही. चित्रपट तयार करणाऱ्यांनी ते नाकारलं असेल तर असुदेत - समर्थन करणारे अनेक राजकीय हेतूने करताहेत हे मान्य करायला हरकत नाहीच. गंमत त्या पुढे आहे. "त्या" बाजूला तुम्ही हा विषय अजेंडा म्हणून का मिळू देता? तुम्हीसुद्धा काश्मिरी पंडितांच्या बाजूने का बोलत नाही? सहवेदना व्यक्त करणं तुम्हाला का जड जातं? काश्मिरी पंडितांचं हत्याकांड - हा विषय इकडच्या "किंवा" तिकडच्या लोकांनी उचलायला हवा - असं "आयदर ऑर" समीकरण तुम्हीच का रुजवताय? हा अजेंडा काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय "समोर" आणला जाणे : हाच आणि इतकाच असावा. त्यात राजकीय अँगल येऊ नं देणं तुमच्या आमच्याच हातात आहे. नाहीये का? फक्त कल्पना करा. काँग्रेस, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी या विषयावर भरभरून लिहिलं तर काय होईल? सहवेदना व्यक्त केली तर काय होईल? पुरोगाम्यांच्या अख्ख्या इकोसिस्टिमने हे हत्याकांड कसं झालंच नव्हतं - हे पटवण्यासाठी चालवलेले प्रयत्न थांबवून, तीच ऊर्जा काश्मिरी पंडितांबरोबर आहोत, यापुढेही असू - असं म्हणण्याकडे वळवली - तर काय होईल? तुमच्या मते कम्युनल असलेल्या लोकांना तुम्ही सहज निष्प्रभ कराल या मार्गाने. पण तुमचं काहीतरी भलतंच सुरु आहे! समजून घ्या - राजकीय मारामाऱ्यांच्या फंदात अजिबात नं पडणारे कितीतरी लोक काश्मीर फाईल्सवर भरभरून व्यक्त होताना दिसताहेत. हे भेसूर वास्तव इतके दिवस लपून होतं याबद्दल दुःख व्यक्त करताहेत. चित्रपट बघून धाय मोकलून रडणाऱ्यांचे व्हिडीओ बघून हताशपणे मान हलवताहेत. या सर्वांची खिल्ली उडवून, खोचक प्रतिप्रश्न विचारून तुम्ही या सर्वांना दूर ढकलताय. या विषयांवर असंबंद्ध उदाहरणांची यादी देऊन "तेव्हा कुठे होतात?" छाप प्रश्न विचारून नकळत या लोकांना देखील "तुम्ही आमचे नाही" असं ठरवून मोकळे होताय. काय साध्य करताय तुम्ही यातून? जाताजाता एकच. देशात कम्युनल टेन्शन वाढू नये असं प्रामाणिकपणे वाटत असेल तर कम्युनल टेन्शन वाढू शकतील असे विषय तुम्हीच आधी उचलून घेऊन, सहवेदना व्यक्त करून, पीडितांना हरप्रकारे आधार देऊन, समस्या निवारण करून त्या अन्यायाला कम्युनल कोन नं मिळण्याची खबरदारी घ्यायला हवी. जमत असेल तर बघा. नाहीतर आम्ही विरुद्ध तुम्ही - रोजची सर्कस आहेच आपली. ओंकार दाभाडकर

In reply to by उपयोजक

काश्मिरी हिंदू वर झालेल्या अत्याचार ची सर्वांना चीड आहे त्यांना न्याय अजून कसा मिळाला नाही ह्याचे आश्चर्य सर्वांना वाटत आहे.. त्या साठी असलेल्या लोकांना कडक शिक्षा व्हावी असे सर्व लोकांना वाटत इथे सर्व म्हणजे काश्मीर फाईल ह्या सिनेमा विरुद्ध लिहणारे ,सर्व च आले..सरकार नी त्या काश्मिरी हिंदू ना परत तिथे स्थापित करावे सरकार चे स्वागत आहे. त्यांना न्याय मिळवून द्यावा त्याचे स्वागत आहे ..विरोध फक्त ह्या साठी आहे की ह्या सिनेमाचा राजकीय प्रचार करण्यासाठी वापर केला जात आहे.

In reply to by उपयोजक

टोकाचा विरोध करुन उलट चित्रपटाला जास्त प्रसिद्धी मिळते आहे. Helmed by Vivek Agnihotri, TKF is made on a moderate budget of 20 crores. It's really low when compared to the costs of normal Bollywood flicks that are being made nowadays. With such a sizeable investment, the film is doing wonders which even big-budget movies fail to do. https://www.koimoi.com/box-office/the-kashmir-files-box-office-continue…

टाईम्स नाऊवर गेली दोन-तीन दिवस धक्कादायक बातमी दाखवली जात आहे. नरसिंहरावांच्या काँग्रेस सरकारने काश्मीरमधून हिंदू स्वेच्छेने इतरत्र स्थलांतरीत झाले त्यामुळे त्यांना 'व्हिक्टीम' मानता येणार नाही अशाप्रकारचे प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे सादर केले होते. ते पुढील व्हिडिओत बघता येईल. हे खरोखरच धक्कादायक आहे. इतके दिवस नरसिंहरावांविषयी ते काँग्रेसमध्ये असले तरी आदर वाटायचा. जर राजीव गांधी, इंदिरा गांधी, नेहरू इतकेच काय मोरारजी देसाई यांच्यासारख्यांना भारतरत्न दिले जाऊ शकते तर मग नरसिंहरावांना का नाही हा प्रश्न नेहमी पडायचा. पण आता तो आदर पूर्णपणे संपुष्टात आला. असल्या माणसाला भारतरत्न दिले नाही ते चांगलेच झाले. अर्थातच नरसिंहराव हे काँग्रेसच्या सगळ्या पंतप्रधानांपैकी त्यातल्या त्यात चांगले होते- म्हणजे इतरांपेक्षा बरे होते. आणि नरसिंहराव असे असतील तर इतर काँग्रेसी पंतप्रधान कसे असतील/होते याची कल्पनाच केलेली बरी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

नरसिंहरावांच्या काँग्रेस सरकारने काश्मीरमधून हिंदू स्वेच्छेने इतरत्र स्थलांतरीत झाले त्यामुळे त्यांना 'व्हिक्टीम' मानता येणार नाही अशाप्रकारचे प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे सादर केले होते.
श्री नरसिंहरावांचा काळ धामधुमीचा होता, जवळपास दिवाळखोर अर्थव्यवस्था, बाबरी मशीद प्रकरण, नुकतीच झालेली राजीव गांधीची हत्या, मंडल आयोग आंदोलने, धगधगता पंजाब आणि स्वतःचे अबहुमतातील सरकार अश्या बर्‍याच आघाड्या होत्या. मंत्रीमंडळातील बरेचसे निर्णय पंतप्रधान स्वतः घेत नाही, तर ते सर्व संमतीने घेतात आणि आताची तातडीची निकड कोणती ह्यावर पंतप्रधान आपली उर्जा खर्च करतात. इतर गोष्टी जर ठिक नसतील तर इच्छा असुन देखील काही गोष्टी करता येत नाहीत. श्री नरसिंहरावांच्या प्रमाणपत्राच्या वेळी असेच काही तरी झाले असण्याची शक्यता आहे. त्यांचे प्रमाणपत्र कायदेशीरदृष्या बरोबरच आहे. फक्त हिंदू स्वेच्छेने इतरत्र स्थलांतरीत झाले ह्याच्या व्याख्येवर सगळे अवलंबुन आहे. अतिरेक्याच्या भितीने झालेले स्थलांतर म्हणजे स्वेच्छेने झालेले स्थलांतर नव्हे.

In reply to by Trump

नाही. नरसिंहराव सरकारने दुसरे प्रतिज्ञापत्र सादर केले ते ६ मे १९९६ रोजी. याची टाईमलाईन नक्की लक्षात येते आहे का? १९९६ च्या लोकसभा निवडणुकांसाठी ३ फेर्‍यात मतदान झाले होते त्यापैकी तिसरी फेरी ७ मे रोजी होती. आणि यानंतर १० दिवसात म्हणजे १६ मे रोजी अटलबिहारी वाजपेयींनी १३ दिवसांचे सरकार स्थापन केले होते. म्हणजेच हे दुसरे प्रतिज्ञापत्र नरसिंहराव सरकारच्या कार्यकाळाच्या अगदी शेवटी सादर केले गेले होते. त्यावेळेस या सगळ्या समस्या मागे पडल्या होत्या.
फक्त हिंदू स्वेच्छेने इतरत्र स्थलांतरीत झाले ह्याच्या व्याख्येवर सगळे अवलंबुन आहे. अतिरेक्याच्या भितीने झालेले स्थलांतर म्हणजे स्वेच्छेने झालेले स्थलांतर नव्हे.
तोच तर मुद्दा आहे. उत्तर प्रदेश-बिहारमधून हजारो लोक मुंबईत येतात ते मुंबईत आपल्याला अधिक चांगले पैसे मिळू शकतील या अपेक्षेने. असे लोक स्वेच्छेने मुंबईत येतात आणि त्यांना त्यांच्या गावी 'मरा/धर्मांतर करा किंवा जा' असे तीन पर्याय ठेवत नसते. काश्मीरी हिंदूंचे असे स्वेच्छेने स्थलांतर झाले होते का? आपल्या मालकीच्या चांगल्या सफरचंदाच्या बागा सोडून त्यातील अनेक लोक नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडले होते ते उगीच का? पण नरसिंहराव सरकारने तसे प्रतिज्ञापत्र सादर केले होते हे धक्कादायक आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आपल्या मालकीच्या चांगल्या सफरचंदाच्या बागा सोडून त्यातील अनेक लोक नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडले होते ते उगीच का? पण नरसिंहराव सरकारने तसे प्रतिज्ञापत्र सादर केले होते हे धक्कादायक आहे.
तुमचा मुद्दा मान्य आहे. मी वरतीही तसेच लिहीले आहे. फक्त श्री नरसिंहराव यांच्यावर पुर्ण दोष देण्यात काही अर्थ नाही. काँग्रेसमध्ये मुस्लिम लांगुलचालनाचा परंपरा आहे, त्यामुळे त्यांना तो विरोध मोडुन काढणे जमले नसावे किंवा तत्सम कारणे असावीत. माझ्या मते त्यांना संशयाचा फायदा (benefit of doubt) मिळायला हवा.