Skip to main content

द काश्मीर फाइल्स

लेखक निनाद यांनी बुधवार, 09/03/2022 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे. हा चित्रपट भारतातल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष यांचे चित्रण आहे. ९० च्या दशकात काश्मिर खोर्‍यात केल्या गेलेल्या हिंदुंच्या कत्तलीचे एक डॉक्युमेंटेशन तरी करतो. आजवर असा प्रयत्न ही झालेला नाही. लेखक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदी भाषेत याची निर्मिती केली आहे. ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रमुख कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आदी आहेत. या चित्रपटाला विरोध झाला आहे. याविरुद्ध याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता या चित्रपटाची चर्चा ही होऊ नये म्हणून दडपून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत असे दिसते. उदा: काश्मिरच्या हिंदूंचा ज्वलंत विषय असूनही कपिल शर्मा शो ने याचे प्रमोशन नाकारले आहे. आपल्याच इंडस्ट्रीतील सिनेमा असूनही विषय हिंदू विषयक असल्याने कोणत्याही खान किंवा प्रस्थापित चित्रपट कलावंतांनी द काश्मीर फाइल्सचा उल्लेख पूर्णपणे टाळला आहे. या चित्रपटाची चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे.

वाचने 94191
प्रतिक्रिया 327

प्रतिक्रिया

चित्रपट करमुक्त करून मोदी सरकार आमच्या…”; The Kashmir filesवर फारुख अब्दुल्लांची टीका https://www.loksatta.com/desh-videsh/farooq-abdullah-reaction-on-the-ka… काय बोलणार?

https://www.loksatta.com/manoranjan/mns-to-show-the-kashmir-files-film-… मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. कश्मीर फाइल्स या हॅशटॅगसहीत संदीप देशपांडेंनी एक फोटो पोस्ट केलाय. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा विशेष मोफत शो दाखवला जाणार आहे. २४ मार्च २०२२ मध्ये संध्याकाळी सव्वा सात वाजता माहीममधील एल. जे. रोडवरील सिटी लाईट चित्रपटगृहामध्ये हा शो दाखवला जाणार आहे,” असं या फोटोमध्ये म्हटलं आहे.... ------ उत्तम निर्णय ...

संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी, कारण ठरला The Kashmir Files; भाजपा झाली आक्रमक https://www.loksatta.com/desh-videsh/the-kashmir-files-uproar-in-rajast… ही एक प्रकारची दंडेलशाही आहे ...

आता, आमची सौ म्हणते की, ह्यापुढे, मुस्लिम अभिनेत्यांचे सिनेमे पैसे खर्च करून बघणार नाही. मी तर, मुस्लिम अभिनेत्यांचे सिनेमे टाॅकीज मध्ये बघणे, कधीच सोडून दिले आहे.

In reply to by कॉमी

वा, काय ती देशभक्ती, किती हा त्याग.
खरंय....!
डोळे पाणावले.
माझे सुद्धा...! =)) -दिलीप बिरुटे

In reply to by मुक्त विहारि

हि एक विचित्रच मेण्टॅलिटी डेव्हलप होताना दिसतेय हल्ली. पठाण फ्लॉप करा, लालसींग चड्ढा बुडवा.. का? तर ते शहारुख, आमीरचे चित्रपट आहेत म्हणुन. (कप्पाळ बडवणारी स्माईली कशी द्यायची...)

In reply to by अर्धवटराव

हि एक विचित्रच मेण्टॅलिटी डेव्हलप होताना दिसतेय हल्ली. हे तर काहीच नाही,काही महाभाग ह्या सिनेमाचे तिकीट काढून थिएटर मध्ये बघायला जाणार नाहीत. जनतेनी हा सिनेमा बघण्याचा पंतप्रधान आग्रह करत आहेत. सर्वांना निर्मात्याच्या कमाईची काळजी. निर्मात्याचा पैसा वसूल झाला आहे, पण कोणीच त्याला मोफत यू ट्यूबवर टाकायला सांगत नाहीत. राज्यांनी करमणूक कर माफ करावा असल्या फालतू गोष्टी सांगायला लाजही वाटत नाही काहींना.

In reply to by आग्या१९९०

निर्मात्याचा पैसा वसूल झाला आहे, पण कोणीच त्याला मोफत यू ट्यूबवर टाकायला सांगत नाहीत.
का? ह्यांतून जो नफा मिळेल, त्यावर त्याला पुढील निर्मीती कमी खर्चीक जावी, ना? तसेच स्वतःसाठी नफा हवाच की. त्याने काही विषयाने भारून जाऊन, त्यावर रीसर्च केला व चित्रपट बनवला. तेव्हा मग त्याने तो यूट्यूबवर फुकट का करावा? ही खास मेंटॅलिटी मलातरी समजत नाही. एकतर, कुणाला जगण्यासाठी किती पैसा लागतो, हे त्या व्यक्तिने स्वतः ठरवावे. जोंवर त्या व्यक्तिचे, तिच्या कुटुंबियांची लाईफ स्टाईल, संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन करत नाही, तोपर्यंत इतरांना त्याबद्त्दल काहीही टीका करण्याची जरूर नाही. हेच आर्गुमेंट काही सुप्रसिद्ध मराठी कलाकारांविषयी पूर्वी केले गेलेले ऐकून मी थक्क झालो आहे. असो, तो वादाचा एक वेगळा मुद्दा झाला.
राज्यांनी करमणूक कर माफ करावा असल्या फालतू गोष्टी सांगायला लाजही वाटत नाही काहींना.
खुद्द निर्मात्याने असे सांगितले नाही. दुसरे, ह्यांतून निर्मात्याला काहीच थेट लाभ नाही. कर कमी केल्याने, जास्त जनता तो चित्रपट पहाण्यास उद्युक्त होईल, इतकाच ह्या 'काहींची' ह्या मागणीमागे हेतू आहे. आणि असे झाल्याने, काश्मिरांतील हिंदूंवर तीन द्शकांपूर्वी, जे प्रचंड अत्याचार झाले होते, ते परागंदा झाले होते, व ज्याविषयी आतापर्यंतची सर्व सरकारे, मीडीया इत्यादी सर्वच मूग गिळून बसले होते, ते सर्व जास्त लोकांच्या नजरेत येईल, ह्यांत 'लाज वाटण्यासारखे' नेमके काय आहे?

In reply to by प्रदीप

ज्याविषयी आतापर्यंतची सर्व सरकारे, मीडीया इत्यादी सर्वच मूग गिळून बसले होते, ते सर्व जास्त लोकांच्या नजरेत येईल पुढे काय? आणि टॅक्स फ्री करावे असे कोण मागणी करतेय ते पण बघा. राज्यांनी का आपल्या महसुलावर पाणी सोडावे? मुळात हा प्रश्न सामाजिक जागृती करून सोडविण्यासारखा नाही. जे काही करायचे आहे ते केंद्र सरकारने करायचे आहे. पंतप्रधानांनी हा सिनेमा बघितला आहे, त्यांना काश्मीरी जनतेच्या वेदना,व्यथा नीट समजल्या असतील तर त्यांनी करावे सरकारी पातळीवर प्रयत्न. जनतेकडून काय अपेक्षा आहेत पंतप्रधानांची?

In reply to by आग्या१९९०

आणि राज्यात सत्तेवर मुस्लिम फेवरिसम वाले आणि केन्द्रात हतबल नेत्रुत्व असलेले सरकार असले तर काय होउ शकते हे हा चित्रपट दाखवतो. काश्मिरची स्वायत्तता काढुन घेतली आहे पण तिथे अजुन बरेच काम करायला हवे आहे. तसेच समान नागरी कायदा आणायचा तर जनमानस त्याद्रुष्टिने तयार करणे आवश्यक आहे. हा चित्रपट त्यासाठी योग्य वातावरण निर्माण करतोय. आणि हिन्दु मुळात सहिष्णु असल्यामुळे या चित्रपटामुळे दन्गे उसळु नयेत ही अपेक्शा. मुठभर लोक अतिरेकी विचाराने वागतात आणि वाइट काम करतात आणि बहुसंख्य त्यांच्यापुढे मन झुकवतात. हिंदू मध्ये दुफळी असल्यामुळे हिंदूंची धार्मिक कट्टरता आपलेच लोक कंट्रोल करतात. तसे मुस्लिम नाही करत. त्यामुळेच तर काश्मिर मधे एवढे मुस्लिम देखिल (खखोदेजा) अतिरेकी लोकान्कडुन मारले गेले तरी कोणी आवाज उठवला नाही. आणि बरेच हिन्दु मात्र या सिनेमामुळे दुफळी माजेल या काळजीत आहेत.

In reply to by आग्या१९९०

पंतप्रधानांच माहित नाही पण सर्वसामान्य माणसाची , जनेते कडून हि अपेक्षा ठेवली तर चालेल का साहेब? १) केंद्र सरकार या बाबत ठोस भूमिका घेत असेल तर राजकीय मते बाजूला ठेवून त्यास निंदण या बाबतीत तरी साथ देणे २) अशी साथ देताना अप्लाय आवडीचा ( भाजप सोडून) पक्ष जर " काड्या" घालायला लागला तर त्यांना "तुम्ही सध्या तरी चूप बसा " हे ठणकावून सांगणे अर्हताःत हे होणे नाही ... येथे जर काश्मिरी हिंदूंना न्याय द्यायला कोणी लागले तर " हे इस्लामोफोबिक " आहे म्हणून "आग " लावयायाला लावयायला लोक तयारच आहेत ,

In reply to by चौकस२१२

इथे बरेच लोक टमरेल गॅंगचे आहेत. म्हणजे श्री मोदींची स्वच्छ भारत योजना निकामी होण्यासाठी रस्त्यावर टमरेल घेऊन बसणारे. या लोकांना काश्मिरी हिंदू जनतेबद्दल सहनुभूती आहे परंतु त्यातून श्री मोदींना अंशभर जरी क्रेडिट मिळाले तरी यांचे बद्धकोष्ठ आणि कपाळशूल उठलाच असे समजा. नवरा मेळा तरी चालेल पण सावंत रंडकी व्हायला पाहिजे हि विचारसरणी.

In reply to by सुबोध खरे

या लोकांना काश्मिरी हिंदू जनतेबद्दल सहनुभूती आहे ( कदाचित असावी !)परंतु त्यातून श्री मोदींना अंशभर जरी क्रेडिट मिळाले तरी यांचे बद्धकोष्ठ आणि कपाळशूल उठलाच असे समजा. नवरा मेळा तरी चालेल पण सावंत रंडकी व्हायला पाहिजे हि विचारसरणी. १००%

In reply to by आग्या१९९०

>>>मुळात हा प्रश्न सामाजिक जागृती करून सोडविण्यासारखा नाही. जे काही करायचे आहे ते केंद्र सरकारने करायचे आहे. पंतप्रधानांनी हा सिनेमा बघितला आहे, त्यांना काश्मीरी जनतेच्या वेदना,व्यथा नीट समजल्या असतील तर त्यांनी करावे सरकारी पातळीवर प्रयत्न. जनतेकडून काय अपेक्षा आहेत पंतप्रधानांची ? सामाजिक जागृती, वोट बँकेची करायची आहे. वादविवाद,तंटे, द्वेष उभा करणे हाच ज्या पक्षाचा अजेंडा आहे, त्यांच्याकडून काहीही अपेक्षा नाही. कोणत्याही विषयावरुन वाद कसा करायचा याचे 'चिंतन' मुख्यकेंद्र महाराष्ट्रातील 'संत्री' जिथून मिळते तिथून हे सुरु होते. समाजात दुफळी कशी निर्माण होईल त्याचा सातत्याने प्रयत्न इथे होतांना दिसतो. चित्रपटात जे घडले ते घडलेच आहे, कमी जास्त प्रमाणात. अधिक-उणे अशा कलाकृतीत असू शकते. तो संवेदनशील विषय आहे. त्याचं राजकारण करण्याचा विषय नाही. असे म्हणतात की 'अर्धे सत्य सांगणे हे खोटे सांगण्यापेक्षा मोठे पाप आहे' अर्धे सत्य सांगून जनतेला धुसमुसत ठेवण्याचा पडद्याआडून एक तो प्रयत्न आहे. काश्मिरी पंडितांची जी ससेहोलपट झाली त्याचं दु:ख मोठं आहे. कोणत्याही विस्थापिताचे दुखाची कल्पना फक्त सोसणा-यालाच माहिती असते. काश्मिरी पंडित जेव्हा विस्थापित होत होते, त्यांच्यावर अत्याचार होत होते, तेव्हा सरकारचा पाठींबा काढून घेतला नाही, सत्तेचा मोह भयंकर असतो, तो त्यांना सुटला नाही. आजही सुटत नाही. आज बत्तीस वर्षात पंडितांच्या पुनवर्सनासाठी किती प्रयत्न केले. किती पंडितांचे पुनवर्सन केले, हा मुख्य प्रश्न असतो. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. अश्वत्थाम्या सारखी काश्मी्री पंडितांची जखम केवळ भळभळत ठेवली जाते. आज रात आठ बजेसे सब बंद रहेगा. असे म्हणून लाखो हातावर पोट भरणा-या मजुरांना क्षणात विस्थापित केले गेले. कितीक मेले, किती जगले याचा हिशेब नाही. अनवाणी पुरुष, गरोदर स्त्रीया मरणप्राय वेदना सहन करीत कितीतरी किलोमिटरचा प्रवास घरापर्यंत करत, काही घरी, पोहोचले, काही पोहोचलेच नाही. हे सर्व विसरुन जाऊ, कारण त्याचा मतांवर फार परिणाम होणार नाही. पण, 'आज रात आठबजह से सभी पंडितोकी एक सुची बनाकर सभी को अपने घर मिल्ट्री के द्वारा घर घर छोडा जायेगा' असा निर्णय घेणारी छाती छप्पन्न इंचाची नव्हे तर, असा निर्णय घेणारी निधड्या छातीची या पंडितांना गरज आहे. सिनेमा पाहा असे म्हणून पंडितांचे पुनवर्सन होणार नाही. राजकारणातील रक्तपिपासू जळु हे इतक्या लवकर होऊ देणार नाहीत, हेही माहिती आहे. बाकी, जनतेकडून त्यांची अपेक्षा फ़क्त मतांची असते. दुसरं काही नाही. जय हिंद जय भारत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर तुम्हाला तोंडघशी पडायची सवयच लागली आहे. कारण आपला अभ्यास कमी पडतो आहे. The minister said that the government provides Rs 13,000 per month to the families of 44,000 Kashmiri Pandits who have relief cards Government's 2022 J&K plan: Resettlement of Kashmiri Pandits, 25,000 jobs, train link Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/80899281.cms?utm_source=… आणि हा २०२१ चा दुवा आहे. नाही तर परत म्हणाल कि आता सिनेमा आला म्हणून श्री मोदी ( तुमच्या भाषेत फेकूशेठ नाहीं तर तुम्हाला समजणार नाही कोण ते) यांनी हि योजना चालू केली. आणि हा दुवा एकदा नीट वाचूनही घ्या त्यात काय काय लिहिलंय ते.

In reply to by सुबोध खरे

आपला अभ्यास मला माहिती आहे. करोना काळात तो अनुभव घेतला आहे. आपल्या अभ्यासाबद्दल एकच प्रतिसाद टाकला आहे. देऊ का दुवा. बाकी, व्यक्तीगत टीका करण्यात मला इंट्रेष्ट नाही. हं तर, मोदीशेठ. निवडणूकीपूर्वी असे म्हणाले होते की आम्ही सर्व पंडितांचे पूनर्वसन करु. आज आठवर्ष झाली काय दिवे लावले शेठने. नुसत्या थापा. काँग्रेसनेही विषयावर काही कमी थापा मारल्या नाहीत. त्यांनीही आश्वासने भरपूर दिली होती. पण, राहिला आर्थिक मदतीचा विषय. पंतप्रधान पॅकेज काही तुमच्या शेठने आत्ताच सुरु केलेली योजना नाही. काँग्रेसने एक गोष्ट केली. जम्मूमधे विस्थापितांसाठी कायमस्वरुपी छावण्या वसवल्या आणि पीएमपॅकेज त्यांनी आणले. माहिती नसेल तर शोधा. माहिती मिळेल. २००८ मधे, मनमोहनसिंग सरकारच्या काळात पीएम पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं. त्याचबरोबर त्या योजनेअंतर्गत काश्मीरमधील विस्थापितांसाठी नौक-याही देण्यात आल्या होत्या. या योजनेअंतर्गत २००८ आणि २०१५ मधे काश्मिरी पंडितांसासह विविध वर्गातील लोकांसाठी ६००० हजार नौक-या जाहीर करण्यात आल्या होत्या. आज काही हजार विस्थापित लोक नौक-या करीत आहेत. पण, काश्मीरमधे बांधलेल्या ट्रान्झिट हाऊसमधे त्यांना राहावे लागते. (ट्रान्झिट हाऊस सतत वाद आणि चर्चेत राहीले) दुवा. काश्मिरी पंडितांचे म्हणने असे होते की, आम्हाला नौक-या दिल्या पण म्हणून याकडे पुनर्वसन योजना म्हणून बघीतल्या जाऊ नये. म्हणजे, काश्मीरमधे त्यांचं वडिलोपार्जीत घरे सोडावी लागली आणि ते जम्मूत राहण्यासाठी आले. सरकारने अशा विस्थापितांना काश्मीरमधे नौकरी करायला लावली. पण घरे दिली नाहीत. १९९० पासून काश्मीर खोरे सोडलेल्या सर्वच विस्थापितांना पीएम पॅकेज अंतर्गत रोजगाराव्यतिरीक्त ज्या कुटुंबांना मुळ ठीकाणी स्थायिक व्हायचं आहे, अशांना आर्थिक मदतीची तरतुद आहे. तसंच काश्मिरी स्थलातंरितांना रोख मदतही दिल्या जाते. मनमोहनसिंग सरकारनेही विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मदत आणि पुनर्वसनाची घोषणा केली. तेव्हा काश्मिरी पंडित संघर्ष समितीनेही विस्थापित नसलेल्या पंडितांसाठी वाटा मागितला होता. पुढे विस्थापित उच्च न्यायालयात गेले निर्णय फक्त विस्थापितांसाठी असा निर्णयही आला. (चर्चा दुवा )सध्या काश्मिरी खो-यात परतणे आणी पुनर्वसन हीच महत्वाची गोष्टा राहीलेली आहे. आपल्या शेठने सिनेमा पाहा असा सल्ला देण्याऐवजी. पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा. थापा बंद कराव्यात. अब कुछ करनेका वक्त है. मन की बाते करने का नही. एवढे बोलून थांबतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या शेठने सिनेमा पाहा असा सल्ला देण्याऐवजी. पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा. थापा बंद कराव्यात. अब कुछ ३२- ७ सध्याचे - ५ - -३ इतरांचे = काँग्रेस चे १७ नरसिंह राव शेठ आणि मनमोहन सेठ यांनीही तर काय दिवे लावले? आणि आता खरंच काँग्रेस ला काश्मिरी हिंदूंच्या बद्दल पुळका असले तर मग या एवढीं नाकारात्मकता का हो? ( हो हिंदूच त्यांची जात महत्वाची नाही) चित्रपट हे निमित्त आहे मूळ प्रश्नाला वाचा फोडणे हा मूळ हेतूआहे ,काँग्रेस च्या काळात यावर "दुर्लक्ष कर किंवा बंदी आणली असती हिंदूंचे दुख्ख ते दुख्ख नाही ? त्यासाठी मग मेणबत्यांचं मोर्चह काढायला वेळ नसणार देशभर आणि जगभर लोकांना हिंदूंवर हा अत्याचार झाले होते हे कळले यामुळे जळफळाट होतोय असं दिसतंय !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर तुम्ही दिलेला इतका भंपक आणि फाल्तु दुवा दुसरा नसेल. डोंगर पोखरून झुरळ बाहेर काढलंय All IndiaWritten by Sheikh Zaffar IqbalUpdated:

January 24, 2017

3:03 pm IST According to government figures, after the unrest in Kashmir started in

early 1990s,

37,347 Hindu families, 2,257 Muslim families and 1,758 Sikh families had migrated from Kashmir. a Central grant of ₹ 1618.4 crore sanctioned in 2008-2009, administrative officials in Kashmir valley have already identified 723 kanals of land which has a tentative cost of land ₹ 374.65 crore money

will be

used to build 6,000 transit accommodations १९९० सालच्या वंश विच्छेदा साठी २००९ साली १६१८ कोटी मंजूर झाले. (१९ वर्षांनी) त्यावर २०१७ पर्यंत फक्त ३७४ कोटींची जमीन निश्चित झाली ( २७ वर्षांनी) आणि त्यावर ६ हजार घरे बांधण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. कशाला उगाच फालतू दुवे देऊन स्वतःचे हसे अन इतरांची करमणूक करताय?

In reply to by सुबोध खरे

डॉ.साहेब. देशच भंपक नेतृत्वाच्या नादी लागलेला आहे, अनुयायी तसेच. त्यामुळे तुम्हाला सर्व भंपकच वाटणार. बाकी, अजून खुप दुवे देता येतील पण शेवटी समजून घेण्याच्या तुमच्याही वयोमर्यादांचा आदर करावा लागतो. बाकी, राहीला विषय करमणुकीचामोंदी भक्तांमुळे देशभर करमणुक होत असते. लवकर बरे व्हा...! वाढदिवसाच्या शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोंदी भक्तांमुळे देशभर करमणुक होत असते. हो ना काय ती भक्ती करोडोंन्चि दोन वेळा निवडून दिले .. शी शी शी ... तुंमपे लानत है भारतीय जनता .. तुम्हारा चुक्याच कधी एकदा हे संपतंय आणि अतिशय परिपक्व असे राजकुमार राहुल गादि वर बसत आहेत .. याची वाट पाहती आहे "गुलाम" जनता

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लवकर बरे व्हा @प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मुद्देसूद उत्तर देता आले नाही म्हणून असे गोलगोल लिहिणे आपल्याला शोभत नाही. बाकी वैयक्तिक पातळीवर उतरलात हे पाहून समाधान वाटले कारण त्याचा अर्थच असा आहे कि आपल्याकडे मुद्देच राहिलेले नाहीत. बाकी २०२४ मध्ये श्री मोदीच परत येणार हि काळया दगडावरची रेघ आहे त्यामुळे जळजळ अजून साडे सात वर्षे राहणार आहे. लॉन्ग टर्म उपाय शोधून ठेवा

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजकारणातील रक्तपिपासू जळु .... हि जळू कुठे निर्माण होते ? अलाहाबाद च्या "आनंद भावनापासून" कि सांबारमतीच्या आश्रमातून अर्थात आपण म्हणार कि जेथून संत्री मिळतात तिथून हे गृहीत आहे आज रात आठबजह से सभी पंडितोकी एक सुची बनाकर सभी को अपने घर मिल्ट्री के द्वारा घर घर छोडा जायेगा' काय ते काय ते स्वप्नरंजन .. जादूची कांडी जणू.... नुसता असा विचार जरी केला तरी काय आंगडोंब उसळवाल हे काय आमहास माहीत नाही ! पहिला शब्द फेकला जाईल कि हे इस्लाम विरोधी आहे ! ( हायला काश्मिरी हिंदूंना त्यांच्या स्वतःच्या घरी जर वसवायला कोणी मदत केली तर ते इस्लाम च्या विरुद्ध कसे काय होईल कोण जाणे आधी समान नागरी कायद्यातील "स" जरी शेठ नि उच्चारला तर तुम्ची काय प्रतिक्रिया येईल हे तर बघू

In reply to by आग्या१९९०

इथे कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ति आठवतात... समिधाच नव्हे त्या, त्यांत कसला ओलावा, कोठून फुलांपरी मकरंद वा मिळावा, जात्याच रूक्ष त्या, एकच त्या आकांक्षा, तव आंतरअग्नि क्षणभरी तरी फुलावा. हे झाले, हेही खूप झाले. पुढे हा आंतरअग्नि मार्ग दाखवेलच.

In reply to by आग्या१९९०

निर्माता / दिग्दर्श काने १५ कोटी + आपलला जीव धोक्यात घालून चित्रपट काढला.. जनतेने स्वखुशीने डोकयावर घेतले तर मी तर म्हणतो कि यातील "जीवाची किंमत = झालेलया फायदा आहे.. त्यामुळे कोणी कुठे वापरणार हे विचारयाचाह अधिकार नाही .. असल्या काड्या घालणं बंद करा.. हवे तर तो चित्रपट पाहू नका दुसरे असे कि यातील कलाकारांवर निश्चित पाने आटा काही निर्माते "गुप्ता फतवा काढून त्याला वाळीत टाकणार " तर त्यांना हि यातील पैसे हरकत नाही मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी भरकटवण्यासतचे हे टूल किट आहे दुसरे काय .. लाज वाटली पाहिजे

In reply to by अर्धवटराव

का काय का अहो ? सांगितले ना त्यांनी मुस्लिम अभिनेते आहेत म्हणून.

In reply to by अर्धवटराव

+१ अभिव्यक्ती सादरीकरण आणि स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. थेटरात कशाला घरीपण "स्वदेस",डिडिलजे,सिक्रेट सुपरस्टार ,पीके नाही पाहत टीव्ही वर काही लोक. कलेला कला राहू द्या राव!

In reply to by Bhakti

बाकी तुमच्या प्रतिसादातील इतर टिपण्णीवर काहीही म्हणायचे नाही, पण
कलेला कला राहू द्या राव!
हा निव्वळ भुक्कडपणा आहे, असे माझे मत आहे. कलाकार समाजात रहातात, त्यांचे समाजाशी देणेघेणे असते. समाजातील घटकांनी त्यांची दखल घेतलीच नाही, तर त्यांच्या कलेचे काय होईल, हाही विचार त्या तरंगणार्‍या कलाकारांनी करणे जरूरी आहे.

In reply to by प्रदीप

समाजातील घटकांनी त्यांची दखल घेतलीच नाही, तर त्यांच्या कलेचे काय होईल, हाही विचार त्या तरंगणार्‍या कलाकारांनी करणे जरूरी आहे.
खरे आहे. मुसलमान कलाकारांनी जन्म घेण्याआधीच विचार करायला हवा होता. या context मध्ये दुसरा कोणता विचार अपेक्षित असू शकतो ?!

In reply to by कॉमी

माझ्या वक्तव्यात धर्माचा विषय कुठून आला? मी तसा काहीही उल्लेख केलेला नाही, अथवा तसे काही हिंटही केलेले नाही. माझी टिपण्णी सर्वसाधारण कुठल्याही कलाकाराला लागू आहे. 'कलेसाठी कला, एव्हढेच आम्ही जाणतो' असे म्हणून समाज/ देश ह्यांविरूद्ध काहीही बडबडणार्‍यांविषयी आहे; आपली व एखाद्या शेजारी देशाची मोठी कुरबूर सुरू असतांनाही, तेथे जाऊन कार्यक्रम करणार्‍यांविषयी आहे. माझ्या आयुष्यांत सर्वधर्मिय कलाकारांनी मला आनंद दिलेला आहे. मी स्वतः सर्वधर्मिय कलकारांसमवेत कार्यक्रमांत भाग घेतलाय. आणि एव्हढेच नव्हे, दोन वर्षांपूर्वी, आमच्या येथील हिंदू मंदिरातील आमच्या कार्यक्रमांत, आम्ही 'बेकस पे करम कीजिये' हा नातही आळवला होता. अर्थात, मी मुविंच्या कडव्या भूमिकेशी सहमत नाही.

In reply to by प्रदीप

मुविंच्या भूमिकेचे समर्थन असा माझा गैरसमज झाला.

In reply to by कॉमी

ती माझी चूक होती.

In reply to by प्रदीप

माझ्या आयुष्यांत सर्वधर्मिय कलाकारांनी मला आनंद दिलेला आहे +१ जेवढे ज्ञानदेव ईश्वराकडे घेऊन जातात तेवढेच संत कबीर ही ईश्वर रूप दाखवतात.. कलेला कलाच राहू द्या _/\_

In reply to by प्रदीप

कलाकार समाजात रहातात, त्यांचे समाजाशी देणेघेणे असते. समाजातील घटकांनी त्यांची दखल घेतलीच नाही, तर त्यांच्या कलेचे काय होईल, हाही विचार त्या तरंगणार्‍या कलाकारांनी करणे जरूरी आहे. म्हणजे नक्की कशी कलाकृती घडवावी नवरसांपैकी?

In reply to by Bhakti

त्यांना जशी सुचते तशी घडवावी. मात्र अनेकदा काही कलाकार, आपण वॅक्युममधे रहात असल्याचे दर्शवतात. त्याला आक्षेप आहे.

In reply to by प्रदीप

कलाकारांची ते रहातात त्या समाजाशी बांधिलकी असते, हे मान्य करून कार्य करावे.

In reply to by प्रदीप

माझी पचनशक्ती अतिशय अशक्त आहे. मी सकाळी एकपेक्षा जास्त चपाती खाल्ली तर डोकेदुखी, मळमळ होते. सतत अस्वस्थ वाटत रहाते. खुप झोप येते. एकच चपाती खाल्ली तर काहीच त्रास होत नाही फक्त एक तासाने भूख लागते. कामावर, बाहरगावी असताना अडचण होते. पचनशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय आहे का? डॉक्टरांना दाखवून, औषधी घेऊन झाली पण विशेष फायदा झाला नाही.

In reply to by अर्धवटराव

हि एक विचित्रच मेण्टॅलिटी डेव्हलप होताना दिसतेय हल्ली. पठाण फ्लॉप करा, लालसींग चड्ढा बुडवा.. का? तर ते शहारुख, आमीरचे चित्रपट आहेत म्हणुन.
काही मंडळी आहे जी खास करुन शाहरुखच्या मागे नेहमीच हात धुवून लागलेली आहेत.. मग कधी त्याने पाकिस्तानला मदत केल्याची अफवा उठवली गेली. आर्यन खान ड्रग्जच्या केसमध्ये अडकल्यावर तर अनेक पोस्ट्सना अगदी उत आला होता त्यानंतर अमेरिकेच्या कुठल्यशा विमानतळावर लघुश्ंका केल्याचा कुणाचा तरी व्हिडिओ आर्यन खानच्या नावाने प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न झाला मग लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी शाहरुखने मुस्लिम समाजातील काही प्रथेप्रमाणे फुंक मारली त्या प्रसंगाला तो थुंकला म्हणत त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला.. वानखेडे स्टेडियमवर शाहरुखने एकदा काहीतरी गोंधळ घातला होता. पण असा एखाद दुसरा प्रसंग वगळला तर तो फारस कधी काही वावगं वागला आहे असं दिसत नाही. तरी काही लोक नेहमीच त्याला बदनाम करण्याच्या प्रयत्नात असतात असे दिसते. [अर्थात शाहरुखचे गेले काही वर्षातले बहुतेक चित्रपट हे टुकार व फ्लॉप होण्याच्या लायकीचे होते ही गोष्ट वेगळी ] अमिरला ट्रोल केलं जातं ते त्याने पीके चित्रपटात हिंदू धर्मातील काही प्रथांवर टीका केली म्हणून.. अशा पोस्ट्स मध्ये "आमिरचा पीके" असे म्हंटले जाते.. पण पीकेचे निर्माते आहेत विधू विनोद चोप्रा व राजकुमार हिरानी तर दिग्दर्शक हिरानी आहेत. मग तो "आमिरचा" चित्रपट कसा ? आणि निर्माता दिग्दर्शक असेही काही नवखे नाहीत की ज्यांचा चित्रपट अभिनेत्याने आपल्या पध्द्दतीने हायजॅक करावा. आमिरला ट्रोल करण्याचे दुसरे कारण असते त्याने दोन हिंदू तरुणींशी लग्न केले आणि मग काही वर्षांनी त्यांना घटस्फोट दिला.. आणि काहींना यातही लव्ह जिहाद दिसतो..(धन्य!!) पण या ट्रोल्समधून सहसा सलमानची मात्र सुटका होते. हे पण एक कोडेच आहे... खरेतर सलमानची ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हची केस ज्यात रस्त्यावर झोपलेले काही गरीब लोक मारले गेले ती अतिशय गंभीर बाब होती आणि काळवीट शिकारची केसही गंभीर होतीच. पण तरी सलमानचे चित्रपट प्लॉप करा अशा पोस्ट्स सहसा फिरत नाहीत .. सलमान स्वतःला हिंदू व मुस्लिम असे दोन्ही म्हणवून घेतो (संदर्भ : विकीपीडिया) म्हणून असेल काय ? .. बाकी त्याच्या अतिरेकी अभिनयामुळेच झाले तर काही फ्लॉप होतात पण बहुधा इतर चित्रपटात चांगला माल मसाला असल्याने सलमानच्य वाईट अभिनयालाही डोक्यावर घेत त्याचे चाहते चित्रपट हिट करतातच.

https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood… उदारमतवादी हिंदू, आता काय मत व्यक्त करणार? हे बघणे रोचक ठरेल ....

आता पर्यंत काश्मिर फाइल्सने मिडीया रिपोर्ट नुसार २२८.१८ कोटींचा व्यवसाय केला आहे आणि २५० कोटींकडे घोडदौड चालू आहे. आर.आर.आर सारखी तगडी व्यावसायिक स्पर्धा असताना देखिल काश्मिर फाइल्स प्रभाव ओसरत नाहीय. तीन तासांपेक्षा जास्त लांबीमुळे आर.आर.आर बद्दल नारा़जीचे सूर उमटताना दिसताहेत !

“जेव्हा मुस्लीम बहुसंख्यांक असतो तेव्हा हिंदू…”, शरद पवारांचं The Kashmir Files वरील वक्तव्य चर्चेत https://www.loksatta.com/manoranjan/ncp-chief-sharad-pawar-criticizes-t… माननीय शरद पवार, पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये, अल्पसंख्यांकांचे काय हाल होत आहेत? हे बघायला विसरले असतील किंवा गेला बाजार, अफगणिस्तान येथील बौद्ध मुर्तींचा विध्वंस कुणी केला? हे वाचायचे विसरले असतील .... बाकी, गाथा इराणी, हे पुस्तक माननीय शरद पवार, यांनी न वाचण्याची शक्यता जास्त आहे ...