✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी मार्च - भाग १

न
निनाद यांनी
Tue, 03/01/2022 - 08:20  ·  लेख
लेख
दिल्ली हिंदूविरोधी दंगल - दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली. फेब्रुवारी २०२० च्या हिंदू विरोधी दंगलीला भडकावणाऱ्या CAA विरुद्धच्या निदर्शनांदरम्यान त्यांनी द्वेषपूर्ण भाषणे केल्याचा आरोप आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या इतरांमध्ये आप नेते मनीष सिसोदिया आणि अमानतुल्ला खान, एआयएमआयएम नेते वारिस पठाण आणि अकबरुद्दीन ओवेसी, मेहमूद प्राचा, वादग्रस्त डाव्या विचारसरणीचा 'कार्यकर्ता' हर्ष मंडर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांचा समावेश आहे. माजी JNU विद्यार्थी उमर खालिद हा देखील या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक होता, ज्यावर प्रदेशात हिंसाचार भडकवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. राजकीय-धार्मिक वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी मुस्लिम अल्पसंख्याक गटाने हिंदू समुदायाची हत्या करण्यासाठी आयोजित केलेली हिंसा होती असा आरोप केला गेला आहे. सीएए विरोधी निदर्शनांचा एक भाग म्हणून ईशान्य दिल्लीत दंगल उसळली होती. या हिंसाचारात ५३ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला, २०० हून अधिक लोक जखमी झाले आणि ४०० लोक विस्थापित झाले. मुस्लिम जमावाने घरे, दुकाने आणि मंदिरे जाळली आणि हल्ले केले. शाहरुख नावाच्या व्यक्तीने सर्वसामान्य लोकांना आणि पोलिस कर्मचाऱ्यांना खुलेआम धमकावले. नंतर त्याला यूपीच्या शामली जिल्ह्यातून अटक करण्यात आली. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात दिल्ली पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांना जीव गमवावा लागला.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
45882 वाचन

💬 प्रतिसाद (168)

प्रतिक्रिया

खोटं काय त्यात?

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/03/2022 - 09:24 नवीन
खोटं काय त्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

साप मित्र असतो शेतकर्यान्चा....

सुखीमाणूस
गुरुवार, 03/03/2022 - 09:36 नवीन
साप उन्दिर आणि घुशिन्चा नायनाट करतो. उपद्रवी प्राण्यान्ची चान्गलीच पळापळ चालु झाली सापाने फणा काढल्यावर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

+1

मुक्त विहारि
Fri, 03/04/2022 - 09:33 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस

अजिबात नाही

जेम्स वांड
गुरुवार, 03/03/2022 - 09:58 नवीन
एका मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभा देत नाही मुळीच, मग तो सेनेचा असो अथवा भाजपचा :) महाराष्ट्रापुरते बोलत असलात तर ह्या पॉलिटिकल स्लेजिंग गेममध्ये सेना निर्विवाद टीम ऑस्ट्रेलिया आहे बघा, पण एकंदरीत बोलत असले तर मात्र खेदाने म्हणावे लागेल की हमाम में सब नंगे हैं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

स्लेजिंग गेम राजकारणात फारसा

रावसाहेब चिंगभूतकर
गुरुवार, 03/03/2022 - 17:25 नवीन
स्लेजिंग गेम राजकारणात फारसा उपयोगी ठरत नाही. काँग्रेस पार्टीला आणि श्री. मणिशंकर ऐयर यांना ते चांगलेच माहिती आहे. कदाचित श्री. संजय राऊत आणि "ठाकरी भाषा"(!) वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांची वेगळी कल्पना असावी, पण शिवराळ भाषा वापरणारे राजकारणी जनतेला पसंत पडत नाहीत असा इतिहास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

भाषा तर शोभत नाही ते आहेच,

रावसाहेब चिंगभूतकर
गुरुवार, 03/03/2022 - 17:20 नवीन
भाषा तर शोभत नाही ते आहेच, शिवाय कुणी कुणाला दूध पाजलं, कुणाचे 1985 पर्यंत कुठेही अस्तित्व नव्हते वगैरे गोष्टी अगदी मिपा वरच बऱ्याच जणांनी लिहिल्या आहेत. मा. मुख्यमंत्र्यांना त्या माहीत नसतील असे नाही, पण माझ्या अंदाजाने एक तर त्यांना (नेहमीप्रमाणे) रेटून खोटे बोलायचे असेल किंवा मग बाकीचे लोक मूर्ख आहेत असा त्यांचा गैरसमज असावा. श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांच्या 19 नसलेल्या बंगल्याचे प्रकरण श्रीयुत संजय राऊत यांनी उकरून काढल्यानंतर तर मुख्यमंत्र्यांचा जळफळाट अधिकच वाढलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

सेना फक्त बोलतच नाहीतर करूनही

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 03/03/2022 - 10:46 नवीन
सेना फक्त बोलतच नाहीतर करूनही दाखवते. वाझे सारख्या खुनी माणसाची पाठराखण करणे, राणेंविषयी आदर नाही पण राणेंच ऑफिस तोडणाऱ्यांबरोबर फोटोसेशन करणे असली कामे मुखमंत्र्यानी केलेली आहेत. त्यामानाने सापाला दूध पाजणे असली विधाने किरकोळच आहेत.
  • Log in or register to post comments

फक्त हेच विषय

sunil kachure
गुरुवार, 03/03/2022 - 12:05 नवीन
राणे,सुशांत सिंग,कंगना, दिशा, आणि ed संपली bjp ची बुद्धिमत्ता. हे फालतू विषय घेवून पक्षाची ताकत वाया घालवणे हेच bjp से ब्रीद आहे लोक आता वैतागली आहेत. जोकर समजत आहेत महाराष्ट्र bjp ल. मोदी जे काही थोडेफार चांगले काम आहे . त्या वर पण पाणी फिरवत आहे महाराष्ट्र bjp. Bjp आता तरी नैराश्य मधून बाहेर यावे पक्षाला सर्कस मधील जोकर बनवू नये
  • Log in or register to post comments

सर्वात भंगार बातमी वाचली

sunil kachure
गुरुवार, 03/03/2022 - 12:38 नवीन
कोण तरी दार म्हणून वकील आहे त्याने सर्वोच्च न्यायालय त याचिका केली आहे भारतीय मुलांना बाहेर काढण्यासाठी विदेश मंत्रालय ल आदेश ध्या. ह्या दर्जा ची याचिका फेटाळून अब्जो रुपये दंड याचिका कर्त्या वर न्यायालय नी लावला पाहिजे होता भारतीय सर्वोच्य न्यायालय रशिया ला काही निर्देश देवून युद्ध थांबवण्याची सूचना करू शकते का. विदेश मंत्रालय त्यांचे काम व्यवस्थित करत आहे. याचिका दाखल करणे जसे चुकीचे आहे तसे ती फेटाळली न जाणे ही पण चूक आहे.
  • Log in or register to post comments

भारताने लोकांवर टॅक्स लावावा

sunil kachure
गुरुवार, 03/03/2022 - 13:07 नवीन
भारताने लोकांवर टॅक्स लावावा आणि असंख्य मेडिकल ची सरकारी कॉलेज प्रतेक राज्यात योग्य प्रमाणात निर्माण करावीत..भारतीय लोकं सर्वात जास्त डॉक्टर लोकांची लूट ह्या मुळे संकटात आहेत. भारतीय नागरिक वर एक्स्ट्रा टॅक्स लावा पण भारत डॉक्टर बाबत sur प्लस झाला पाहिजे आरोग्य यंत्रणा जी आज चंबळ मधील डाकू पेक्षा जास्त लुटारू आहे . त्यांना नियंत्रणात आणणे खूप गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments

ओबीसी आरक्षण

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/03/2022 - 13:54 नवीन
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण संबंधी अहवाल अमान्य केला आहे. पुढील आदेश येईपर्यंत स्थानिक स्वराज्यसंस्थ्यांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नसेल असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. https://maharashtratimes.com/india-news/sc-directs-maharashtra-govt-and-state-election-commission-not-to-act-upon-the-interim-report-of-state-backward-class-commission/articleshow/89964356.cms?minitv=true मुंबई महापालिकेची निवडणुक वॉर्डांची पुनर्रचना आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवर अडकली होती. वॉर्डांची पुनर्रचना हा मुद्दा बर्‍यापैकी स्पष्ट झाला असावा असे वाटते. निदान त्याविषयी गेल्या काही दिवसात फार काही वाचायला मिळाले नाही म्हणजे तो मुद्दा स्पष्ट असावा असे वाटते. ओबीसी आरक्षण हा मुद्दा पण स्पष्ट झाला असेल तर आता महापालिका निवडणुक घ्यायला हरकत नसावी. सध्या मार्चचा पहिला आठवडाच चालू आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा १४-१५ मार्चच्या आसपास झाली होती आणि मतमोजणी २३ मे या दिवशी होती. जर ७-८ फेर्‍यांमध्ये मतदान होत असलेल्या लोकसभा निवडणुका दोन-सव्वा दोन महिन्यात पूर्ण करता येत असतील तर मतदानाची एकच फेरी घ्यावी लागेल अशा महापालिका निवडणुका दीडेक महिन्यात आरामात पूर्ण करता यायला हव्यात. अजून एक महिन्यानी जरी मतदानाच्या तारखांची घोषणा झाली तरी मे च्या मध्यापर्यंत म्हणजे पाऊस सुरू होण्यापूर्वी निवडणुक आरामात पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे खरं तर ही महापालिका निवडणुक न घेण्यामागे जी कारणे दिली जात होती ती राहिली नाहीत. पाऊसही जूनमध्ये सुरू होईल. तेव्हा आता जर निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली नाही तर राज्य सरकारला या निवडणुकांमध्ये मतदारांना सामोरे जायची भिती वाटत असल्याने निवडणुका शक्य तितक्या पुढे ढकलण्याकडे राज्य सरकारचा कल आहे यापेक्षा वेगळे अनुमान काढता येणे मला तरी शक्य नाही. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाऊन आणखी वेळकाढूपणा करायचाही बेत असेल. बघू काय होते ते.
  • Log in or register to post comments

ओबीसी आरक्षण

चंद्रसूर्यकुमार
Fri, 03/04/2022 - 12:00 नवीन
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता तापलेला दिसतो. काल सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात पुढील आदेश येईपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नसेल असा आदेश दिला होता. त्यावर ओबीसी आरक्षण नसेल तर निवडणुकाच घेणार नाही असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. https://www.loksatta.com/maharashtra/obc-reservation-state-ministers-meeting-no-elections-without-obc-reservation-vsk-98-2827327/ आज विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षणसंदर्भात राज्य सरकारने सादर केलेल्या अहवालात नक्की काय गफलत करून ठेवली आहे याचा समाचार घेतला. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने सादर केला तेव्हा त्यावर साधी तारीखही घातली नव्हती हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावरून दोन प्रश्न पडतात- १. हे सगळे जाणूनबुजून होत आहे का? म्हणजे नक्की नाकारला जाईल असाच अहवाल सादर करणे हे ठरवून केले गेले आहे का? म्हणजे तो अहवाल नाकारला गेला की मग न्यायालयाचा पुढचा आदेश येत नाही तोपर्यंत निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नसेल हे कारण दाखवून निवडणुकच घेणे टाळायचे? म्हणजे मुख्य हेतू निवडणुक टाळणे हा असेल तर मग त्या हेतूच्या पूर्तीसाठी हे सगळे जाणूनबुजून केले गेले आहे? त्यातही निवडणुक टाळायला काहीतरी कारण हवे असेल तर 'आम्ही घाबरलो आहोत' हे कारण न देता ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून कोणत्याही समाजघटकावर अन्याय व्हायला नको वगैरे गोष्टींचा मुलामा त्याला दिला गेला आहे? २. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा बेमुदत टाळता येतात? १९९१ मध्ये संसदेने घटनादुरूस्ती पास करून सगळ्या राज्यांना या निवडणुका दर ५ वर्षांनी घेणे बंधनकारक केले आहे. पूर्वी राज्यघटनेत अशी तरतूद नव्हती. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये या निवडणुका वेळेवर व्हायच्या नाहीत. महाराष्ट्रात १९९२ पासून दर ५ वर्षांनी या निवडणुका व्हायला लागल्या. त्यापूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका १९७९ मध्ये झाल्या होत्या अशी त्यावेळी आलेली बातमी वाचल्याचे आठवते. कोरोना वगैरे काही काही कारण असेल तर निवडणुक टाळलेली समजू शकतो. पण आता ते कारणही राहिलेले नाही. तसे असताना या निवडणुका अनिश्चितकाळासाठी पुढे ढकलणे हा राज्यघटनेतील तत्वांचा भंग होत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

शेवटच्या उता-याविषयी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/04/2022 - 12:38 नवीन
निवडणुका अनिश्चितकाळासाठी पुढे ढकललेल्या नाही तर, ओबीसी आरक्षण सोडून निवडणुका घेतल्या गेल्या आहेत. जवळ जवळ एकशे पंचवीसपेक्षा जास्त ग्रामपंचायत पाच ते सहा जिल्हापरिषद आणि सतरा अठरा नगर पंचायती. ( तंतोतंत विदा उपलब्ध नाही) आता राहीलेल्या जागांचा निर्णय निवडणूक आयोग कसा घेते त्या जागा कशा पद्धतीने भरायच्या आणि राज्यसरकार त्यात खोडा कसे घालते हे बघणे बाकी आहे. बाकी, राजकारणात राजकारण करायची संधी कोणी सोडत असते का ? बाकी राहीला राज्यघटनेच्या तत्वांचा भंग करण्याचा प्रश्न. च्यायला, नेमका हा भंग कुठे कुठे झाला... आणि त्याची सुरुवात कुठून करु इतकाच प्रश्न माझ्यापुढे उभा आहे. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

'द काश्मीर फाईल्स'विरुद्ध जनहित याचिका

निनाद
Fri, 03/04/2022 - 05:03 नवीन
'द काश्मीर फाईल्स' हा प्रचाराचा भाग आहे, मुस्लिम समाजाविरुद्ध द्वेषाला प्रोत्साहन देते अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करून घेतली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की चित्रपटाच्या रिलीजमुळे भारतातील सर्व सक्रिय भागांमध्ये हिंसाचार होण्याची शक्यता आहे म्हणून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ही याचिका उत्तर प्रदेशातील रहिवासी इंतेझार हुसैन सय्यद यांनी ट्रेलर पाहून केली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी हा चित्रपट बनवला आहे. 'द काश्मीर फाईल्स' चा ट्रेलर यूट्यूबवर १० दिवसांत सुमारे दहा कोटी लोकांनी पाहिला असे दिसते आहे. द काश्मीर फाईल्स हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
  • Log in or register to post comments

टोटल मूर्खपणा होय

जेम्स वांड
Fri, 03/04/2022 - 06:48 नवीन
ही असली याचिका दाखल करून काश्मीरमधील हिंसाचार हा भौगोलिक-राजकीय स्वातंत्र्यप्रणित नसून तो धर्मयुद्ध उर्फ जिहादचा भाग असल्याचे ह्यांनी स्वतःच कबूल केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

ह्यावरून अजून काही

प्रदीप
Tue, 03/08/2022 - 14:29 नवीन
अशा याचिका दाखल करून घेण्यासाठी, कायद्याच्या चौकटीत, नक्की काय तरतूद असते, हे मला माहिती नाही. पण सुप्रिम कोर्टाने अलिकडे दाखल करून घेतलेल्या, व त्यावर सुनावणी केलेल्या याचिकांत, एका, 'युक्रेनमध्ये व त्या देशाच्या संलग्न देशांच्या सीमांवर अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे निर्वासन (ईव्हॅक्युएशन) करावे' ह्या अर्थाच्या याचिकेचाही समावेश आहे. ह्याची प्रत्यक्ष सुनावणीही कोर्टाच्या तीन जज्जेसच्या बेंचसमोर (ज्यांत त्या कोर्टाचे चीफ जज्ज श्री. रामण्णाही आहेत) झाली. कोर्टाने, एका याचिकर्त्याला काही तिखट सुनावलेही आहे...
The bench also slammed advocate Vishal Tiwari for filing a PIL in the matter and asked if he was looking for publicity by taking advantage of the situation. The CJI told Tiwari that he has seen from the Supreme Court website that he has filed several PILs in the past which were dismissed with costs. "If you want to do something, this isn't the way to file petitions with paper cuttings etc. You know this is a sensitive situation, we can't say anything, don't try to take advantage," the bench said.
पण इतरही काही याचिकर्ते होते, व सुनावणी झाली. 'आम्ही काही सदर दोन देशांना युद्ध थांबवा असे सांगू शकत नाही' (त्या दोन देशांचे किती नशीब!). पण तरीही कोर्टाने सरकारी वकिलांना 'त्यांचे स्वतःचे वजन (सरकार दरबारी)टाकून' विद्यार्थ्यांची सुटका करावी' असे सांगितले. व पुढे सरकार ह्यासाठी नक्की काय करते आहे, ह्याची कोर्टास माहिती द्यावी, असा आदेश दिला. आता, तेथून परत आणलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय विद्यापीठांत शिकता यावे, ह्या विषयीची सुनावणी सुरू आहे. तर, माझ्यासारख्या, ह्या विषयांतील अज्ञ माणसाला प्रश्न पडतो, की एखाध्या विषयाबद्दल काय निर्णय घ्यायचा ह्याचा हक्क, व त्याबद्दलची अंमलबजावणी हे विषय नक्की कुणाच्या अखत्यारींत येतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा, राष्ट्रवादीच्य

मुक्त विहारि
Tue, 03/08/2022 - 12:37 नवीन
राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचीच तक्रार https://www.tv9marathi.com/crime/maharashtra-sangli-miraj-ncp-corporator-sangeeta-abhijeet-harge-booked-under-atrocity-for-abusing-ncp-leader-656152.html कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, हे माझे वैयक्तिक मत आहे....
  • Log in or register to post comments

पुण्यात, राष्ट्रवादीच्या नेत्याने, दहा लाखाची खंडणी उकळली...

मुक्त विहारि
Tue, 03/08/2022 - 12:51 नवीन
https://www.lokmat.com/pune/ncp-leader-threatened-students-and-demanded-a-ransom-of-10-lakh-pune-crime-a737/ ह्या राजवटीत, नक्की काय चालले आहे?
  • Log in or register to post comments

एकदा नाही, चारवेळा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, इति शरद पवार

मुक्त विहारि
Tue, 03/08/2022 - 12:55 नवीन
एकदा नाही, चारवेळा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, कधी कुणी झालं होतं का?' https://www.esakal.com/maharashtra/sharad-pawar-spoke-about-his-political-career-in-osmanabad-ndj97 पण स्वबळावर नाही ... हे पण तितकेच सत्य ...
  • Log in or register to post comments

स्वबळावरच व्हावे असं कुठल्या

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/08/2022 - 20:53 नवीन
स्वबळावरच व्हावे असं कुठल्या ग्रंथात लिहीलंय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कुठेच लिहिलेलं नाही.

शाम भागवत
Tue, 03/08/2022 - 23:10 नवीन
कुठेच लिहिलेलं नाही. तसेच मुख्यमंत्रीपदाची ५ वर्षांची मुदत पूर्ण करावी असेही कुठे म्हटलेले नाही. कृ.ह.घ्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मनोरंजक प्रतिसाद...

मुक्त विहारि
Wed, 03/09/2022 - 05:29 नवीन
शरद पवार, पहिल्यांदा मुख्यमंत्री कसे झाले? हा इतिहास नक्कीच वाचा.. छान करमणूक होईल जाताजाता, गोष्ट शरद पवार यांच्या बाबतच चालू आहे, हा एक मुद्दा लक्षांत घेतलात तर उत्तम ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

BJP

sunil kachure
Tue, 03/08/2022 - 13:30 नवीन
लोकांच्या समस्या,देशाच्या समस्या,ग्रामीण अर्थ व्यवस्था,शहरी अर्थ व्यवस्था,सामजिक प्रश्न,धार्मिक प्रश्न विदेशी धोरणात. मित्र कोण,मूर्ख कोण बनवत आहे ह्या बद्धल काडी ची अक्कल नसलेला पक्ष म्हणजे . आता चा bjp. Bjp आल्या पासून भारताचे एका पण शेजारी देशांशी प्रेमाचे संबंध नाहीत. ना भारताला जगातील महा सत्ता विचारत आहेत. फक्त event वर अब्ज रुपये खर्च करून जाहिरात करण्यात हा पक्ष पुढे आहे . पाढी राखे तर अशिक्षित आंधळे आहेत. त्यांना कोणत्या ही गोष्टी चे कौतुक वाटते.
  • Log in or register to post comments

बॉर. मग?

नावातकायआहे
गुरुवार, 03/10/2022 - 21:56 नवीन
बॉर. मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

मुंबई महानगर पालिका.

sunil kachure
Tue, 03/08/2022 - 15:41 नवीन
मुंबई च्या महापौर ची मुदत संपली आहे त्या मुळे पालिकेवर प्रशासक नेमला जाईल आणि तो कोण असेल ते राज्य सरकार ठरवेल. म्हणजे सेने चीच सत्ता मुंबई वर असेल. आणि त्या मध्ये काही गैर नाही केंद्र सरकार राज्यपाल मार्फत राज्यांवर सत्ता गाजवत असतेच.. आणि राष्ट्रपती राजवटी खाली लोकशाही चा खून करत असतेच केंद्र सरकार. मी तर म्हणतो कायम स्वरूप मध्ये हीच पद्धत असावी ..मुंबई वर राज्य सरकार नी सत्ता गाजवली तर ते राज्य हिताचेच आहे.
  • Log in or register to post comments

??

चंद्रसूर्यकुमार
Tue, 03/08/2022 - 16:21 नवीन
मी तर म्हणतो कायम स्वरूप मध्ये हीच पद्धत असावी ..मुंबई वर राज्य सरकार नी सत्ता गाजवली तर ते राज्य हिताचेच आहे.
बाकीचे जाऊ द्या. मतदारांना सामोरे जायला सत्ताधारी पक्ष आणि त्याचे समर्थक घाबरत आहेत हे स्वतः मान्य केलेत हे काय कमी आहे? जर का राज्यात कायमस्वरूपी अशीच पध्दत असावी असे म्हणत असाल तर मग इतर कोणी 'महाराष्ट्रावर कायमस्वरूपी केंद्रानेच राज्य करावे ते महाराष्ट्राच्या हिताचे आहे' अशी मागणी केली तर त्याला विरोध तुम्ही कोणत्या तोंडाने करणार? की रावणाकडून एखादे तोंड उसने आणणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

की रावणाकडून एखादे तोंड उसने

सुबोध खरे
Tue, 03/08/2022 - 18:34 नवीन
की रावणाकडून एखादे तोंड उसने आणणार? हसून हसून पुरे वाट झाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

:)

शाम भागवत
Tue, 03/08/2022 - 23:08 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

:D

सुखी
Tue, 03/08/2022 - 22:29 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

हिजाबप्रश्नी प्रक्षोभक विधान; काँग्रेस नेत्यास अटक

मुक्त विहारि
Wed, 03/09/2022 - 05:55 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh/congress-leader-held-for-provocative-statements-on-hijab-zws-70-2833984/ मुकर्रम खान यांचा एक चित्रफीत समाजमाध्यमांद्वारे सर्वत्र पसरली असून, त्यात त्यांनी, ‘‘जो कोणी हिजाबला विरोध करेल त्याचे तुकडे तुकडे केले जातील,’’ असे प्रक्षोभक विधान केल्याचे दिसत आहे. ------- परमपूज्य राहूल गांधी, आता काय Action घेतात? हे वाचणे रोचक ठरेल .... -----
  • Log in or register to post comments

भयंकर

निनाद
Wed, 03/09/2022 - 08:29 नवीन
असे चिथावणी देणे भयंकर आहे. आधीच एक हर्षा नावाचा तरुण याचा बळी गेलेला आहे. यांना हिंसाचार सुरू करून परत मोपला कांड करायचे आहे की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

फडणवीसांनी काल विधानसभेत

सौंदाळा
Wed, 03/09/2022 - 10:09 नवीन
फडणवीसांनी काल विधानसभेत केलेले आरोप फारच धक्कादायक आहेत. राज्य सरकारमधील मंत्री, सरकारी वकील, पोलिस, मंत्र्यांचे सचिव एकत्र येऊन भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांवर खोट्या केसेस कशा लावायच्या, बनावट पुरावे कसे बनवायचे, साक्षीदार, पंचांना कसे पढवायचे या सगळ्याचे १२५ तासांचे व्हिडीओ रेकोर्डिंगच सादर केले. सकृतदर्शनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा यात ठळक सहभाग दिसत आहे.
  • Log in or register to post comments

तक्रार

कपिलमुनी
गुरुवार, 03/10/2022 - 20:33 नवीन
तक्रार पोलिसात , न्यायालयात करायची असते , विधानसभेत आरोप करून काय षष्प उपयोग नाही. उगा हवा करायची. गाडीभर पुरावे सारखा आहे हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

बघू पुढे काय होतय

सौंदाळा
गुरुवार, 03/10/2022 - 20:46 नवीन
बघू पुढे काय होतय मलिकची पण अशीच केली होती नोव्हेंबर मधे वाझेची पण विधानसभेतच केली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

विधानसभेत आरोप करून काय षष्प

सुबोध खरे
Fri, 03/11/2022 - 10:12 नवीन
विधानसभेत आरोप करून काय षष्प उपयोग नाही. हायला हे तुमच्या युगपुरुषांना का समजावले नाही गेली ८ वर्षे? जे सगळे आरोप त्यांनी केले ते केवळ दिल्ली विधानसभेतच केले एक तरी एफ आय आर केला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आमचे तुमचे

कपिलमुनी
Mon, 03/14/2022 - 10:39 नवीन
असले झेंडे तुम्हाला लखलाभ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हवा इत्यादी...

प्रदीप
Mon, 03/14/2022 - 12:04 नवीन
ह्या प्रसंगांत पोलिसांत तक्रार करता येणे हास्यास्पद आहे, कारण त्यांचाही सदर कृत्यांत सहभाग आहे, असा फडणवीसांचा आरोप आहे. कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत, फडणवीसांनी हायकोर्टांत आपण दाद मागणार आहोत असे सूचित केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हायकोर्टातील दाद

प्रदीप
Mon, 03/14/2022 - 18:27 नवीन
ह्याविषयीच्या वरील उल्लेखासाठी येथे पहावे (१५:०० पासून पुढे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

सोळाव्याचं निमित्त साधून

कंजूस
गुरुवार, 03/10/2022 - 18:45 नवीन
राज ठाकरेंनी प्रथमच शिवसेनेवर आणि राउतांवर तोफ डागली हे विशेष आहे. राउतांना तर उत्तरही सुचलं नाही.
  • Log in or register to post comments

सर्वात ताकदवान नेता

मदनबाण
गुरुवार, 03/10/2022 - 23:08 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'Life is like ice cream, enjoy it before it melts'
  • Log in or register to post comments

भाऊ पत्रकार की प्रवक्ते??

अमरेंद्र बाहुबली
Fri, 03/11/2022 - 17:28 नवीन
भाऊ पत्रकार की प्रवक्ते?? त्यांना राज्यसभेतील खासदारकी, पद्मभूषण द्यायलाच पाहीजे. नसेल दिलं तर केंद्र सरकारचा निषेध, कानामागून आलेली कंगना पद्मभूषण पटकावून गेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

कोचिंग संस्थांचे नक्की काय चालले आहे?

निनाद
Fri, 03/11/2022 - 14:40 नवीन
असे दिसते की हिंदुफोबिया, इस्लामी व्हाईटवॉशिंग आणि रंगीबेरंगी विविधतेचे विकृतीकरण हे खरे तर भारतातील अनेक UPSC कोचिंग संस्थांचा एक महत्त्वाचा भाग बनवले गेले आहेत. आता अवध ओझा हे पेशाने वकील वकील असलेले प्राध्यापक(!?) शिकवत आहेत की ओसामा बिन लादेन कसा ग्रेट होता! या आधी व्हिजन आयएएस वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. असे दिसते आहे की डावे लोक विकृती करण चालू ठेवण्यासाठी डाव्या लोकांची भरती आता कोचिंग संस्थांमध्ये करत आहेत. हा एक वेगळाच धोकाच तयार झाला आहे.
  • Log in or register to post comments

9 मार्चला भारताकडून अनवधानाने

रात्रीचे चांदणे
Fri, 03/11/2022 - 21:04 नवीन
9 मार्चला भारताकडून अनवधानाने एक मिसाईल फायर झाले आणि ते पाकिस्तान मध्ये land झाले. ह्यमध्ये कुठलीही जिवीतहानी झालेली नसली तरी काही रहिवाशी इमारतींचे नुकसान झाले. त्यानंतर पाकिस्तानने भडकाऊ भाषा न वापराता भरताकडे स्पष्टीकरण मागितले. साध्यच्या बतम्यांनुसार भारताने दिलगीरी व्यक्त करून चौकशीचे आदेश दिलेले आहेत. सध्या कदाचित भारत आणि पाकिस्तान मध्ये पडद्याआड चर्चा चालू असण्याची शक्यता आहे. नाहीतर एरवी ही घटना मोठी केली असती.
  • Log in or register to post comments

असे अनावधानाने कसे होऊ शकते

कॉमी
Fri, 03/11/2022 - 21:28 नवीन
असे अनावधानाने कसे होऊ शकते पण ? चेन ऑफ कमांड असणार ना काहीतरी ? डॉक्टर स्ट्रेंजलव्ह सिनेमा आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

एक टाईम्स नाऊ सोडले तर

प्रसाद_१९८२
Sat, 03/12/2022 - 11:34 नवीन
एक टाईम्स नाऊ सोडले तर इतर कोणत्याच माध्यमांत याबाबतची कोणतीच बातमी दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

खूप जणांनी, ही बातमी दिली आहे

मुक्त विहारि
Sat, 03/12/2022 - 11:40 नवीन
चुकलेले मिसाइल भारत ते पाकिस्तान असे गुगलबाबाला विचारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

लव्ह जिहाद - मोहम्मद इजाजने अपूर्वा पुराणिकला २३ वेळा भोसकले

निनाद
Sat, 03/12/2022 - 04:36 नवीन
लव्ह जिहाद प्रकरणातील एका भीषण घटनेत, कर्नाटकातील मोहम्मद इजाज याने त्याची पत्नी एमबीए पदवीधर असलेल्या अपूर्वा पुराणिक उर्फ ​​अरफा भानू हिला २३ वेळा भोसकले. मोहम्मद इजाज एक रिक्षा चालक आहे. मोहम्मद इजाज आधीच विवाहित आणि तीन मुलांचा बाप असल्याचे कळल्यानंतर घटस्फोट मागितल्याबद्दल मोहम्मद ने क्रूरपणे भोसकले. इजाज घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. कर्नाटकातील गदग जिल्ह्यात गुरुवारी ही घटना घडली. पीडितेची प्रकृती गंभीर असून ती शहरातील स्थानिक रुग्णालयात जीवाशी झुंज देत आहे. इजाजने तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्यानंतर हिंदू परंपरा पूर्णपणे सोडायला लावल्या होत्या. अपूर्वाच्या कुटुंबानेही मुलीशी समेट घडवून आणला आणि मुलगी आणि इजाज यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्यास सुरुवात केली. या जोडप्याला एक मुलगाही झाला. काही महिन्यांनंतर, अपूर्वाला कळले की इजाजने त्याच्या पहिल्या लग्नाची माहिती लपवली होती. वृत्तानुसार, इजाजने अपूर्वासोबत लग्नाआधीच एका मुस्लिम महिलेशी लग्न केले होते आणि त्याला तीन मुले झाली होती. ही माहिती त्याने लपवली होती. त्याबद्दल तिने जाब विचारला होता.
  • Log in or register to post comments

उदारमतवादी हिंदूंना किती समजावून सांगणार?

मुक्त विहारि
Sat, 03/12/2022 - 07:01 नवीन
हिंदू तितका मेळवावा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

दोन प्रकार

चंद्रसूर्यकुमार
Mon, 03/14/2022 - 10:49 नवीन
अशा लव्ह जिहादला बळी पडणार्‍या मुली दोन प्रकारच्या असतात. पहिल्या प्रकारातील मुलींना जगात काय चालले आहे याविषयी काहीही माहित नसते. आणि दुसर्‍या प्रकारातील मुलींना सगळे काही माहित असते पण तरीही आपण किती उदारमतवादी, आपण किती धर्मनिरपेक्ष, आपण किती अमुक, आपण किती तमुक अशी क्रेडेन्शिअल्स जगापुढे दाखवायची त्यांना अनिवार इच्छा होत असते त्यातून त्या आपण होऊन तसे करतात. त्यापैकी दुसर्‍या प्रकारातील मुलींविषयी शष्प सहानुभूती नाही. सगळे काही माहित असूनही परत तसेच करणे म्हणजे स्वतःहून संकट ओढावून घेणे. तसे त्यांनी स्वत:हून केल्यास दुसरे कोण काय करणार? पहिल्या प्रकारातील हिंदू मुली फसू नयेत म्हणून काश्मीर फाईल्ससारख्या चित्रपटांचा उपयोग होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

अली आणि चौघांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

निनाद
Sat, 03/12/2022 - 04:47 नवीन
गुवाहाटीमध्ये बिकी अली आणि त्याच्या मित्रांनी अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. शिवाय आरोपी इतके निर्ढावलेले आहेत की त्यांनी गुन्ह्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. मुलीवर बलात्काराचा व्हिडिओ बनवल्यानंतर, बिकी अलीने तिला हॉटेलमध्ये जाण्यासाठी परत ब्लॅकमेल केले. ही मुलगी घाबरलेली असल्याने ती तेथे गेली. जिथे त्याने आणि इतर ४ जणांनी फैजूर अली, पुना अली, पिंकू अली आणि राजा अली यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. गुवाहाटी पोलीस अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी बिकी अली, फैजूर अली, पुना अली, पिंकू अली आणि राजा अली नावाच्या पाच तरुणांचा शोध घेत आहेत. हे सर्वजण प्रौढ वयाचे असून, फरार आहेत. मुलीने तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आणि लगेचच तिच्या पालकांनी शहरातील पानबाजार महिला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे, पीडितेने नाव दिलेल्या पाच जणांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा