Skip to main content

युक्रेनवरून तणाव

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 12/02/2022 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही. नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली. नॉर्मंडी आराखडा जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. लिंक https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html

वाचने 118110
प्रतिक्रिया 434

प्रतिक्रिया

त्या तमिळ nadu मधील व्यक्ती ल जबरदस्ती नी युक्रेन सेनेत सामील केले असेल तर भारत सरकार नी हस्तक्षेप करावा. पण तो स्वतःच्या इच्छे नी रशिया विरुद्ध लढत असेल तर ते देश द्रोही काम आहे. रशिया भारताचा मित्र आहे कोणत्या तरी मूर्ख व्यक्ती साठी देश हित संकटात येता कामा नये .

In reply to by Trump

श्री पुतीन युक्रेन जिंकण्याऐवजी श्री झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणुन आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यात जास्त उत्सुक असावेत. एकदा युक्रेनने मागण्या मान्य केल्या की रशियावरील बंधनांना कोणताच आधार राहत नाही, युक्रेनच्या पुनर्बांधणीचा खर्च वाचतो, युक्रेनचे सरकार पुढे चालवण्यासाठी सैनिक ठेवण्याची गरज नाही.

सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नेत्यांचा श्री बायडेन यांचा दुरध्वनी घेण्यास नकार. मी ही पहिल्यांदा बघत आहेत. अरब देश कायम अमेरिकेच्या कच्छपि होते. - Saudi Arabia, UAE Leaders Reportedly Decline Calls With Biden Amid Ukraine Crisis https://news.yahoo.com/saudi-arabia-uae-leaders-reportedly-041055907.ht…

दिवस १३ : * युक्रेन ला मिग विमाने देण्याचा प्रयत्न पोलंड करत असला तरी हि विमाने नक्की उडवून कोण युक्रेन मध्ये नेणार हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हे होण्याची शक्यता कमीच वाटते. * रशियन बनावटीची विमान विरोधी यंत्रणा अनेक युरोपिअन देशांकडे आहे ती युक्रेन कडे पोचविण्यात येत आहे. * एकूण १७,००० रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रे युक्रेन मध्ये पोचली आहेत. रशियाकडे एकूण साधारण १२,००० रणगाडे असले तरी त्यातील फारतर २८०० ऑपेरेशनल आहेत. * एक भारतीय मुलगा युक्रेन तर्फे लढत आहे. भारतीय सैन्यांत प्रवेश नाही मिळाला म्हणून हा गॉर्जिया देशाच्या फॉरेन लिजिअन मध्ये गेला आणि त्यांच्या तर्फे आता तो युक्रेन मध्ये आहे. * रशियन रक्षा मंत्रालयाचा इंग्रजी टेलिग्राम चॅनेल आहे त्यावर रशियन सरकार तर्फे माहिती इंग्रजीतून मिळते : https://t.co/fEgYZ6tlvj * सौदी अरेबिया आणि इतर अरब राष्ट्र प्रमुखांनी बायडन ह्यांच्याशी बोलण्यास नकार दिला. सौदी अरेबिया हा देश आणि त्याचे प्रमुख ह्यांच्या विषयी मला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. अतिशय तटस्थ माहिती हवी असेल तर हा लेख/मुलाखत मला खूप आवडली मार्च ३ ची आहे : https://www.theatlantic.com/magazine/archive/2022/04/mohammed-bin-salma… * CIA डिरेक्टर बिल बर्न्स ह्यांची मुलाखत : https://www.npr.org/2022/03/08/1085155440/cia-director-putin-is-angry-a… > The CIA director said Putin premised his war on four false assumptions: He thought Ukraine was weak, he believed Europe was distracted and wouldn't mount a strong response, he thought Russia's economy was prepared to withstand sanctions and he believed Russia's military had been modernized and would fight effectively. > "He's been proven wrong on every count," said Burns, who served as the U.S. ambassador to Russia from 2005 to 2008. * युक्रेन मधील युद्धाचा भारताला काही ठिकाणी बराच फायदा होणार आहे. मागच्या वर्षी भारतांत हजारो टन गहू सडून गेला. FCI कडे अक्षरशः लक्षावधी टन गहू पडून आहे ह्यांतील ५०० हजार टन भारत निर्यात करणार आहे आणि वर्षअखेर पर्यंत ७ दशलक्ष टन गहू निर्यात करण्यात येणार आहे. * दोन रशियन FSB अधिकाऱ्यांचा संवाद इंटरसेप्ट करण्यात आला. ह्यांत FSB अधिकारी जनरल मेजर वीतली गररिसिमोव ह्यांचा मृत्यू खारकीव मध्ये झाला असे आपल्या बॉस ला सांगतो. हा एक अत्यंत उच्चपदस्थ तसेच खूप मेडल्स प्राप्त general होता : https://twitter.com/christogrozev/status/1500959074653024259 * काही मोठ्या रशियन अधिकाऱ्यांचा मृत्यू ह्या युद्धांत झाला आहे. हि माहिती रशियाने सुद्धा काही ठिकाणी मान्य केली आहे तर काही ठिकाणी मृतांच्या परिवारजनानी सुद्धा हे मान्य केले आहे. जास्त माहिती साठी : https://twitter.com/RALee85/status/1500794161963937793 * रशियन युद्धनीती ह्या युद्धांत कशी दिसून येत आहे त्याची चांगली वाईट बाजू कशी दिसून येत आहे आणि सैन्याच्या ढिसाळपणाची करणे काय आहेत त्यावर मेजर जनरल मायिक रायन ह्यांचे लेखन वाचण्यासारखे आहे : https://twitter.com/WarintheFuture/status/1501358032034275329 * एकूण हे युद्ध खुप दिवस लांबणार असे दिसते. युद्ध जितके दिवस लांबेल तितके ह्या युद्ध जिंकण्यासाठी रशिया आणखीन अधीर होईल. आधीच रशियन अर्थव्यवस्था कोलमडली आहे पण युद्धाचा खर्च त्यावर आणखीन ताण टाकेल. युक्रेन सोबत वाटाघाटी करून रशिया "जितं मया" करू शकतो पण ह्या वाटाघाटीत निर्बंध मागे घ्यावेत अशी मागणी करणे सध्यातरी रशियाला शक्य नाही. * युद्ध जितके जास्त काळ चालेल तितकी रशियन अर्थव्यवस्था आणि रशियन कारखाने हे कमकुवत होत जातील. वेगाने पडणाऱ्या रशियन कंपन्यांचे स्टोक कवडीमोल किमतीत चीन विकत घेईल त्यामुळे गझप्रोम सारखया रशियन कंपन्या कदाचित चीन च्या हातांत जातील. ह्या सर्वाचा परिणाम शेवटी भारतीय संरक्षण सज्जतेवर होईल असे भाकीत अनेक लोक व्यक्त करत आहेत. भारतीय विमाने, बोटी इत्यादी रशियन बनावटीचे असल्याने त्या नेहमी सज्ज तेहवण्यासाठी सुटते भाग वगैरे रशियातून येणे आवश्यक आहे. त्यामुळे युद्धाचा सोक्षमोक्ष लवकर लागणे भारताच्या हिताचे आहे असे दिसते. * सध्या इराण आणि नॉर्थ कोरिया ह्यांच्या पेक्षा रशियावर जास्त निर्बंध आहेत.

In reply to by साहना

एकत्र सगळी माहीती मिळाली. तुम्ही चान्गले सन्कलन करत आहात.

मार्च १३: वैयक्तिक कारणांनी व्यस्त असल्याने जास्त लिहू शकले नाही पण युक्रेन मधील घडामोडीवर बारीक नजर आहे ! * युक्रेन आणि रशिया मध्ये वाटाघाटी चालू आहेत. सध्याच्या माहिती प्रमाणे वाटाघाटी ठरविक वेळेंत न होता, आता विविध छोट्या वर्किंग कमिटी निर्माण करून त्याच्या मध्ये होत आहेत. * रशियाचे ३ उच्चपदस्थ अधिकारी मेजर जनरल मारले गेले आहेत असे युक्रेन ने सांगितले असले तरी त्यातील एकच confirmed आहे. * रशियन सैन्य खरेच ढिसाळ आहे कि निव्वळ युक्रेनी-पाश्चात्य प्रोपागंडा ? ह्या प्रश्नाचे उत्तर आता हळू हळू मिळत आहे. पुतीन ह्यांनी आधी आपल्या भाषणात आपण conscript सैनिक वापरत नाहीत असे प्रतिपादन केले होते पण त्याच्याच आर्मीने काही दिवसांनी सार्वजनिक स्वरूपांत ह्यांचे खंडन केले. conscript होते आणि ते आता माघारी बोलवत आहोत असे त्यांनी सांगितले. * पुतीन ह्यांनी आपल्या भाषणांत "सर्व काही प्लॅन प्रमाणेच चालले आहे" अशी घोषणा केली होती पण आज त्यांचे चेचेन मधील हस्तक kadyrov ह्यांनी रशियन प्रगती फार संथ असल्याने आणि अपेक्षेप्रमाणे नसल्याने सैनिकांचे मनोबल कमकुवत आहे असे सार्वजनिक पद्धतीने सांगितले. https://twitter.com/DAlperovitch/status/1502886300243927040 * पुतीन ह्यांनी आपल्या गुप्तहेर यंत्रणेचे एक प्रमुख आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी ह्यांना नजरकैदेत टाकले आहे. ह्या दोघांनी आपली दिशाभूल केली अशी पुतीन ह्यांची समजूत असावी असे अज्ञातवासांत असलेल्या ओझेचकीन ह्या रशियन वार्ताहराने सांगितले. * चीन ने रशियाला विमानाचे सुट्टे भाग द्यायला नकार दिला. त्यामुळे रशियन विमाने आता उडू शकणार नाहीत (नागरी/व्यावसायिक) आणि बर्मुडा ने सुद्धा ह्या विमानांचे परवाने रद्द केले. बहुतेक रशियन व्यावसायिक विमाने बर्मुडा मध्ये रजिस्टर आहेत. * रशियन रक्षा मंत्रायलने आपल्या टेलिग्राम चॅनल वर तसेच इतर माध्यमातून आपली बाजू दाखवायचा प्रयत्न केला आहे. रशियांतील विविध गांवातील मृत सैनिकांचा अंतिम संस्कार होत आहेत त्यामुळे बळींची संख्या नक्की किती असावी ह्याचा अंदाज येत आहे. युक्रेनी मंत्रालयाने रशियन बळींची संख्या साधारण १२,००० आहे असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात हि ५००० च्या आस पास असावी असा इतर देशांच्या गुप्तहेरांचा अंदाज आहे. * फोटो उपलब्ध आहेत त्यावरून रशियाने साधारण १९३ रणगाडे गमावले आहेत असे दिसून येते. युक्रेनी मंत्रालयाने हाच एकदा ५०० आहे असे सांगितले आहे. ह्याउलट रशियन मंत्रालयाने आपण युक्रेन चे ४०० रणगाडे नष्ट केले आहेत असे सांगितले आहे. * खेरसण शहरावर रशियाने ताबा घेऊन तिथे आपला मेयर नियुक्त केला आहे. * मेलिटोपोल हे शहर सुद्धा रशियाच्या ताब्यांत आले असून तिथे त्यांनी मेयर चे अपहरण केले आहे. * पुढील आठवडा खारकीव आणि क्यिव शहरांवर रशिया कदाचित लक्ष केंद्रित करेल. अवांतर: जणू काही जगांतील सर्व समस्या कमी होत्या म्हणून कि काय भारतीय रक्षादलाने सुद्धा अत्यंत बेजबाबदार पणा दाखवला आणि भारतीय क्षेपणास्त्र म्हणे अपघाताने उडून पाकिस्तान मध्ये जाऊन पडले !

In reply to by साहना

जणू काही जगांतील सर्व समस्या कमी होत्या म्हणून कि काय भारतीय रक्षादलाने सुद्धा अत्यंत बेजबाबदार पणा दाखवला आणि भारतीय क्षेपणास्त्र म्हणे अपघाताने उडून पाकिस्तान मध्ये जाऊन पडले !
जर चुकुन झाले तर निव्वळ मुर्खपणा आणि बेजबाबदारपणा. - पण जर मुद्दामहुन केले असेल तर हीच वेळ योग्य. सगळे जग युक्रेनमध्ये गुंतले आहे. हीच वेळ असल्या उचापती करण्याची.

In reply to by Trump

HQ-9P पाकिस्तान विकत घेतलेल्या वायु संरक्षण योजनेची उपयुक्ता जितकी जाहीर केली होती तितकी दिसुन येत नाही. https://thesvi.org/induction-of-hq-9p-air-defence-system-by-pakistan-cr… https://militarywatchmagazine.com/article/pakistans-hq9p-complicate-ind… https://www.sundayguardianlive.com/news/pak-fails-intercept-indias-miss…

भारतीय क्षेपणास्त्र म्हणे अपघाताने उडून पाकिस्तान मध्ये जाऊन पडले !
पाकीस्तानी मिडियामधील ही चर्चा रोचक वाटली.

मार्च १४ : नितीन पै ह्यांचा हा लेख वाचण्याजोगा आहे. ह्या लेखांत युक्रेन युद्ध आणि भारतीय धोरण ह्यांचा उहापोह केला आहे. ठळक मुद्दे * रशियावरील भारताच्या अति अवलंबनाने भारताचे धोरणात्मक सार्वभौमत्व मर्यादित आहे असे दिसून येत आहे. * कुठलाही निर्णय राष्ट्रहिताचा असावा. पण योग्य ते निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य असणे महत्वाचे आहे. * रशियाला डच्चू देण्याची भारतासाठी हि सुवर्ण संधी होती. भारतीय हिताच्या दृष्टीने आणि भारतीय भविष्यासाठी पाश्चात्य राष्ट्रांशी जास्त व्यापार, त्यांची जास्त गुंतवणूक हि भारतासाठी रशिये पेक्षा कैक पटीने महत्वाची आहे. ह्या युद्धाने रशिया हे चिनी मांडलिक राष्ट्र बनण्याची जास्त शक्यता आहे आणि त्याची फार मोठी झळ भारताला बसेल. टीप: भारतीय नौदलाची बहुतेक टर्बाईन्स हि युक्रेन मध्ये बनवली जातात. ह्या फॅक्टरीवर आज रशियाने हल्ला करून ती नष्ट केली. https://notes.nitinpai.in/In+no+particular+order/Indian+foreign+policy+…

युरोपियन गुंतवणूक करतील ह्या आशेवर भारताने रशियाला डच्चू वगैरे देऊ नये. परंतु भरताने संरक्षण क्षेत्रातील अवलंबित्व मात्र कमी करावे मग ते कोणत्याही देशावर का असेना. काहीच दिवसापूर्वी आपण अमेरिकेबरोबर होणार ड्रोन चा सौदा कॅन्सल केला आहे, DRDO स्वतः बनवणार आहे.

मार्च १७ : पुतीन ह्यांनी आज एक भाषण केले. पुतीन ह्यांत बरेच चिडलेले आणि वैफल्यग्रस्त वाटत होते. https://twitter.com/nntaleb/status/1504210862852165636 मागील काही दिवसांत यूक्रेन रशियन वाटाघाटीत रशियाला बरीच माघार घ्यावी लागली आहे आणि वेळ जाईल तशी आणखीन माघार घ्यावी लागेल अशी चिन्हे आहेत. कदाचित ह्याच मुले पुतीन भयंकर चिडलेले वाटत आहेत. ह्या भाषणात त्यांनी युक्रेन पेक्षा रशियन लोकांवरच जास्त तोंडसुख घेतले कास्ट (जात ह्या अर्थी), स्कम, देशद्रोही, गुलाम, ५वा स्तंभ (घरचे भेदी) अशी विविध विशेषणे लावून त्यांनी देशाला "सेल्फ प्युरिफिकेशन" ची गरज आहे म्हणजे ह्या लोकांना काढून टाकले पाहिजे शी चीड चीड व्यक्त केली. https://twitter.com/simonmontefiore/status/1504184497042079755