Skip to main content

युक्रेनवरून तणाव

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 12/02/2022 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही. नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली. नॉर्मंडी आराखडा जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. लिंक https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html

वाचने 118110
प्रतिक्रिया 434

प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांना परत आणण्यावर जो दंगा चालू आहे त्यावरचा हा ट्विटर थ्रेड नक्की वाचा ट्विट

In reply to by कपिलमुनी

ही हिंदूची बातमी आहे.
"The leaders reviewed the situation in Ukraine, especially in the city of Kharkiv, where many Indian students are stuck. They discussed the safe evacuation of the Indian nationals from the conflict areas," a government release stated. Mr. Modi had spoken to Mr. Putin on February 24 when he had sought "immediate cessation of violence". That was followed by a conversation with President Volodymyr Zelensky of Ukraine when Mr. Modi sought a similar ceasefire.

काळ्या समुद्रानजीकच युक्रेनचं खेरसोन बंदर रशियाच्या ताब्यात रशियन सैनिकांनी दक्षिणेकडील खेरसन शहर ताब्यात घेतल्याची माहिती युक्रेनच्या प्रशासनाने दिली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या आठव्या दिवशी खेरसन शहर रशियाच्या ताब्यात गेले.एएफपी या वृत्तसंस्थेने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. खेरसन हे काळ्या समुद्रावर वसलेले एक महत्त्वाचे बंदर शहर आहे.

* रशियन सैन्य जगांतील सर्वांत मोठ्या आण्विक प्रकल्पावर गोळाफेक करत आहे. * Georgia आणि मोल्दोवाने EU सभासद होण्यासाठी अर्ज केला. * फिनलंड ला रशियाने पत्र पाठवूंन जाब विचारला. (फिनलंड नाटो मध्ये जाऊ बघतोय). * विविध वातावरण बदल संघटनांना रशियन सरकार आणि कंपन्यांनी लांच देऊन युरोप मध्ये गॅस फ्रॅकिंग वर बंदी घालण्यास भाग पाडले होते अशी माहिती पुढे येत आहे. ह्यावर मी जास्त विस्ताराने भविष्यांत लिहीन. वातावरण बदल ह्या विषयावर काम करणाऱ्या प्रत्येक संघटनेला भारतांत संशयास्पद नजरेने पाहणे गरजेचे आहे. * पुतीन ह्यांनी स्वतःहून फ्रेंच अध्यक्ष मॅक्रोन ह्यांना कॉल केला. * पुतीन ह्यांनी आज अप्लाय सुरक्षा सल्लागारांची बैठक घेतली. त्यांचे भाषण उपलब्ध आहे. आपले "स्पेशल ऑपरेशन" अगदी व्यवस्थित आणि अपेक्षे पणे सुरु असून नव नाझी मंडळींना हरवूनच आपण शांत बसू से त्यांनी सांगितले. * रशियातून अनेक मंडळी फिनलॅण्ड मध्ये पळून जात आहे. हेलसिंकीचे रेल्वे तिकीट $७५०० पर्यंत महाग झाले आहे. रशिया काही दिवसांत देशांत मार्शल लॉ लावेल अशी अफवा(?) पसरवली जात आहे. ह्यांत सर्व पुरुषांना जबरदस्तीने सैन्यात भरती केले जाईल आणि कुणालाहि देश सोडून बाहेर जाता येणार नाही. माझ्या ओळखीची एक व्यक्त रशिया सोडून फिनलंड मध्ये पोचली.

In reply to by साहना

वातावरण बदल ह्या विषयावर काम करणाऱ्या प्रत्येक संघटनेला भारतांत संशयास्पद नजरेने पाहणे गरजेचे आहे.१००% सहमत आहे! भारतातच का सर्वत्र या वळवळीकडे संशयास्पद नजरेने पाहणे गरजेचे आहे.

In reply to by निनाद

भारतातच का सर्वत्र या वळवळीकडे संशयास्पद नजरेने पाहणे गरजेचे आहे.
'वळवळी'च खर्‍या त्या. त्यांच्याकडे सर्वच आशियाई देशांनी संशयास्पद नजरेने पाहणे जरूरी आहे, ह्याविषयी १०१% सहमत.

माजी रशियन जनरल स्टाफ Mikhail Khodarenok ह्यांचे हे एक महिना मागचे लेखन इंग्रजी भाषांतरित आहे. मूळ लेख रशियन होता. युक्रेन काही मिनिटांत ताब्यांत येईल हि रशियन अपेक्षा चुकीची आहे असे त्यांचे म्हणणे आहे. युक्रेन मदत अति-आत्मविश्वास हा रशियन राजकीय चमच्याची खेळी असून मिलिटरी नेतृत्वाने त्यांना गांभीर्याने घेऊ नये आणि युक्रेनी आक्रमण रशियाच्या राष्ट्रहितात नाही असे त्यांनी लिहिले होते. जुना लेख असल्याने युद्धाच्या धुक्यापासून दूर आहे आणि प्रखर रशियन राष्ट्रभक्ताने लिहिला आहे. https://russiandefpolicy.com/2022/02/07/mass-fire-strike-on-ukraine/

युक्रेनमधला मोठा अणुऊर्जा प्रकल्प रशियाच्या ताब्यात रशियन सैन्याने युक्रेनच्या आग्नेय भागात झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतला आहे, स्थानिक प्राधिकरणाने आज सांगितले. रशियन सैन्याने युक्रेन अणुऊर्जा केंद्राच्या हद्दीत प्रवेश केला

Hyundai I10 Nios व Maruti Celerio यातील कोणती कार चांगली?

In reply to by श्रीगुरुजी

ह्युंदाय शक्यत्तो घेऊ नकात. रशियन बाजरात ह्युंदाय गाड्यांचा मह्त्वाचा वाटा आहे. या युद्धामुळे ह्युंदायच्या आर्थिक बाबींवर परिणाम होऊन ह्युंदायचे अर्थकारण गडगडण्याची शक्यता आहे ज्याचा परिणाम भारतातील त्यांच्या सर्व्हिसिंग आणि स्पेअरपार्ट धंद्यावर होऊ शकतो.

In reply to by चौथा कोनाडा

नाही उलट उलटे. रशियांत माल, स्पेर्स खपत नाही म्हट्लायवर त्यांच्या किमती भारतात कमी होतील.

जीवित हानी आणि वित्त हानी प्रजेची होवू नये ह्याची काळजी घेणे हे देशाचे प्रमुख म्हणून राष्ट्र अध्यक्ष चे कर्तव्य आहे युक्रेन च्या राष्ट्र पती नी स्वतःच स्वतःच्या देशाची वाट लावून घेतली. युक्रेन चे सार्वभौमत्व कुठेच धोक्यात आले नव्हते,रशियन फौजा युक्रेन मध्ये अतिक्रमण करत नव्हत्या .. फक्त युरोपियन देश आणि अमेरिका ह्यांच्या नादी लागून जोकर अध्यक्ष नी स्व देशाचे स्वतंत्र पण धोक्यात आणले आणि विनाश पण ओढवून घेतला इराक युद्धात पण सद्धाम मोठ्या मोठ्या बाता मारत होता . मीडिया त्याला चढवत होती. काय आवस्था झाली इराक ची. पण saddham हुसैन ची बाजू तरी न्यायाची होती.त्यांनी युद्ध ओढवून घेतले नव्हते. तालिबान मुळे काय अवस्था आहे अफगाणिस्तान ची. लोक अतिशय गरिबीत जीवन जगत असतील. तुम्ही मोठे शुर असे फक्त जग बोलणार ना. पण अफगाणी लोकांचे आयुष्य नरक झालेच ना. अजून वेळ गेली नाही . रशिया वरचढ आहे.युद्ध युक्रेन च्या भूमीत च चालू आहे .प्रचंड वित्त आणि जीवित हानी त्यांचीच होत आहे.

डिलन बर्न्स आणि स्टिव्ह बॉनेल II उर्फ डेस्टीनी हे दोघे ट्विच स्ट्रीमर आहेत. हे दोघे पोटापाण्यासाठी डिबेट करतात. दोघांनी युक्रेनची बाजू तोडफोड मांडली आहे. रस असेल तर पूर्ण पहा, रस नसेल तर दोघांची ओपनिंग स्टेटमेंट तरी ऐका. https://youtu.be/pqktQZT5W2w ११:२२ पासून दोघांचे ओपनिंग स्टेटमेंट.

In reply to by Trump

महत्व माहित नाही. लोकप्रिय नक्की आहेत. डेस्टीनी तर बराच प्रसिद्ध आहे. https://en.m.wikipedia.org/wiki/Destiny_(streamer) जनरली खूप विचार करून आधार असेल तर आणि तार्किक बोलतो.

श्री झेलेन्स्की यांनी नाटोला अउड्डाण प्रदेश (no fly) घोषीत न केल्याने दोष द्यायला सुरु केले आहे. त्यांना शेवटी युक्रेनच्या मदतीला कोणीच येणार नाही हे कळाले आहे. येथुन पुढे मरणार्‍या लोकांचे रक्ताचे डाग तुमच्यावर असतील असे बोलणे म्हणजे बहुतेक अपरिहार्हता आणि खेळ संपल्याची लक्षणे आहेत.

In reply to by Trump

“नेहरुंच्या धोरणानेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाचवले”, संजय राऊतांचं युक्रेनमधील परिस्थितीवरून टीकास्त्र! संजय राऊत म्हणतात, “…तेव्हा विदेश मंत्रालय नेमकं काय करत होतं? विदेश मंत्रालयाच्या डोक्यावर आता काळी टोपी आणि अंधभक्तीचा प्रभाव दिसत आहे” https://www.loksatta.com/desh-videsh/sanjay-raut-slams-pm-narendra-modi…

gulagu हे एक जुने रशियन संकेतस्थळ असून २०११ पासून रशियांत होणाऱ्या रशियन अत्याचारांची माहिती गोळा करत आहे. ह्या संकेतस्थळाचे संस्थापक रशियन असून ह्या आधी रशियन सरकारने त्यांना जेल ची हवा खायला लावली आहे आणि त्यांनी केलेल्या संशोधनाने अनेक भ्रष्ट आणि अत्याचारी सरकारी अधिकाऱ्यांना आपली नोकरी सुद्धा गमवावी लागली आहे. त्या दृष्टिकोनातून हे संकेतस्थळ आणि त्याचे संस्थापक ओश्किन क्रेडिबल (विश्वसार्ह) आहेत. त्यांनी काळ एक पत्र प्रकाशित केले. हे पत्र त्यांना म्हणे सध्याच्या FSB (रशियन RAW ) एजेंट ने पाठवले आहे. युक्रेनी हल्ल्याची पार्श्वभूमी त्यांत आहे. * युक्रेन वर हल्ल्याची तयारी एक गृहीतक म्हणून FSB ला करायला सांगितली होती. प्रत्यक्षांत हल्ला होणार नसून फक्त बौद्धिक खेळ म्हणून हि तयारी करायची होती. त्यामुळे FSB ने सुद्धा जास्त गांभीर्याने हल्ल्याचे नियोजन केले नाही. * रशियन सैन्य सीरिया मध्ये चांगलेच व्यस्त असल्याने FSB ला हा हल्ला खरोखरच होईल असे अजिबात वाटले नाही. * काही उच्चपदस्थ लोक सॊडल्यास सैनिकांना सुद्धा आपण कुठे आणि का जात आहोत हे ठाऊक नव्हते. युक्रेनी सीमा सुद्धा आपण का ओलांडत आहोत ह्याची माहिती अगदी शेवट पर्यंत कुणालाच नव्हती. * FSB ने तयार केलेल्या युद्ध नीतीवरून हल्ला चालला असला तरी नक्की शेवट काय असेल हे FSB ने सुद्धा जास्त गांभीर्याने घेतले नव्हते. झेलेन्स्की आणि त्याचे मंत्री ४८ तासांत शरण येतील, त्यानंतर ते शरणागती पत्करतील आणि झेलेन्स्की ह्यांच्या एखाद्या राजकीय विरोधकाला रशियन सामर्थ्याच्या जोरावर अध्यक्ष करता येईल असे फसबी चे प्लॅनिंग होते. आता सर्वच देश इतका एकजूट होईल आणि विरोधक सुद्धा रशियाचा विरोध करतील असे चित्र निर्माण झाल्याने झेलेन्स्की ह्यांना पकडल्यानंतर काय करायचे हा प्रश्न आहे. * FSB ला सध्या भेसडावणारा प्रश्न म्हणजे आता सीरिया चे काय होणार ? सिरीयात रसद कशी पुरवली जाईल कारण तुर्की ने रशियन बोटींना मनाई केल्यास हवाईमार्ग हा एकच मार्ग उरतो. त्यापेक्षा आता रशियाने सीरियांत माघार घ्यावी हेच श्रेयस्कर ठरेल असे FSB ला वाटत असले तरी नेतृत्वाला तो सल्ला नको आहे. * आंतरराष्ट्रीय निर्बंधाची अपेक्षा FSB ला नेहमीपासून असली तरी निर्बंध ह्या थराला जातील ह्याची अजिबात कल्पना नसल्याने त्यासाठी पूर्वनियोजीत पाने तयारी कुणीच केली नव्हती. * ईराणी शासनाने रशियाला काहीतरी खोटी माहिती दिली आणि कायडोरवो नावाच्या कुठल्यातरी रशियन अधिकाऱ्याबद्दल सुद्धा काही माहिती पत्रांत आहे पण मला समजले नाही. * रशियाची अण्वस्त्रे वापरायचा अधिकार फक्त अध्यक्षांना नसून त्याच्या साठी अनेक लोकांना स्वीकृती द्यावी लागते. कागदावर हि प्रोसेस असली तरी प्रत्यक्ष्यांत कशी आहे हे कुणालाच ठाऊक नाही. त्याशिवाय अण्वस्त्रांतील प्लुटोनियम प्रत्येक १० वर्षांनी बदलवावे लागते जे नक्की झाले आहे का हे कुणालाच ठाऊक नाही. * किती रशियन सैनिक युक्रेन मध्ये अद्याप मारले गेले आहेत ह्याची माहिती रशियन सरकारने कुणालाच दिली नसली तरी ती काही हजारांच्या संख्येत आहे. शत्रुप्रदेशांत खोलवर जाण्यासाठी ज्या ६ पॅराट्रूपर्स ना पाठवले होते त्यांतील फक्त एकालाच मर्यादित यश आले. * सध्या युक्रेन युद्ध पूर्णपणे सोपवण्याची डेडलाईन जुन पर्यंत आहे कारण त्यानंतर माघार घेण्यासाठी रशियेत जास्त काही असणार नाही (आर्थिक निर्बंधांनी). https://www.facebook.com/vladimir.osechkin/posts/4811633942268327 [गूगल ट्रान्सलेट वापरू शकता] https://twitter.com/christogrozev

In reply to by साहना

बहुतेक भाकड. त्यांनाही बरीच युरोपियन पारितोषिक मिळाली आहेत.
Bellingcat exec director. Emmy & Nannen Prize for investigative journalism 2021, European Prize for Investigative Journalism and London Press Club Prize 2019. https://twitter.com/christogrozev

In reply to by कॉमी

हा काय ऍड हॉम चा भाग नाही. ज्यापध्दतीने श्री साहना एकतर्फी प्रचारतंत्र चालु केले आहे. त्यामुळे प्रत्येक मुद्याला उत्तर देणे शक्य नाही. माझा इशारा इकडे होता.
> + पुलित्झरधारी किंवा मॅगेसेसे वगैरे मिळालेले/मिळवलेले लेखक म्हणजे अजेंडाधारी पत्रकारिता असणार याची खात्री बाळगता येते! १००% जेंव्हा हिटलर ने "स्वरक्षण" म्हणून पोलंड वर आक्रमण केले तेंव्हा न्यू यॉर्क टाईम्स मधील दोन वार्ताहरांनी भाला मोठा लेख लिहून ह्यांत पोलंडचीच चूक कशी होती असा युक्तिवाद केला होता आणि त्यांना त्या लेखासाठी पुलित्झर कि काय तो पुरस्कार मिळाला होता. आपल्या केजरीवाल ला मॅगेसेसे पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे हे पुरस्कार कशाचेही द्योतक नाहीत. गुप्ताजी एक नंबरचे डांबिस, खोटारडे आणि नीच व्यक्ती आहेत. ह्यांच्या व्हिडिओना शेर करून ह्यांना महत्व देऊ नये. http://www.misalpav.com/comment/1134398#comment-1134398

In reply to by कॉमी

तुम्ही एकही मुद्द्याचे खंडन केले नाही.
किती वेळा खंडन करायचे !! श्री खरे, श्री प्रदिप आणि मी बर्‍याच वेळा खंडन केले. श्री साहना यांनी त्यांचे प्रतिसाद हे एकतर्फी प्रचार आहे हे स्वतःच सांगितल्यामुळे मला काही फारसा रस राहीला नाहे. संदर्भरहित एकतर्फी प्रचार वाचण्यात काही मजा नाही. फक्त युरोपियन लोकांचा प्रचार मराठीतुन वाचण्याचा लाभ, जास्त काही नाहे. तुम्ही करा प्रयत्न. माझ्या शुभेच्छा. संदर्भ: http://www.misalpav.com/comment/1134700#comment-1134700 http://www.misalpav.com/comment/1134771#comment-1134771 http://www.misalpav.com/comment/1134837#comment-1134837

In reply to by Trump

आपल्या पूर्वग्रहाला पचत नाही असे काहीही दिसले कि ते खोटे, आम्हाला हे आधीच ठाऊक होते, किंवा त्रिकालदर्शी पुतीन ह्यांना हे आधीच ठाऊक असून त्यांनी ह्याच्यासाठी आधीच कुठली तरी ४डी खेळी खेळून ठेवलीय जी आणखीन महिन्याने दिसेल, सर्वच मंडळी खोटारडी, इतर सर्व पूर्वग्रहदूषित, नाटो मूर्ख पण सर्वाना कंट्रोल करण्याची आश्चर्यकारक क्षमता आहे, नाटो ला हेच हवे होते पण आता त्यांना पाहिजे ते मिळाले तोच त्यांचा पराभव, पुतीन मुद्धाम आपले सैन्य ढिसाळ असण्याचे नाटक करत आहेत, त्यांच्याकडे ४००० विमाने आहेत पण ते मृदुहृदयाचे असल्याने आपली बी टीम ला पाठवत आहेत, बातम्या वाचून लिहणार्यांना युद्धाचे डावपेच काय ठाऊक ?, युक्रेनी फौज नागरिकांच्या घरांत लपून असल्याने अतिशय निरुपायाने रशियन सैनयाला इस्पितळ वगैरेवर हल्ला करावा लागतो, अश्या प्रकारच्या निरर्थक मस्तिष्कशार्विका प्रमाणे पसरलेल्या टीकेला काय म्हणून प्रत्युत्तर द्यायचे ? बहुतेक टीका ही शेवटी चक्राकार तर्कांच्या सदरात मोडते. त्याला प्रत्त्युत्तर देणे म्हणजे भिंतीवर डोके आपटणे. * मी सांगते तेच काही सत्य आहे आणि इतरांचे सर्व म्हणणे खोटे आहे असे मी कुठेही लिहलेले नाही. उलट लोकांनी प्रतिवाद केला आणि त्याच्यासाठी विपुल पण अर्थपूर्ण लेखन केले कि वाचायला आनंदच होतो. * विविध बातम्या माहिती मी देते ते मराठीतून विविध प्रकारची माहिती लोकांना मिपा तसेच इतर प्लॅटफॉर्म वर उपलब्ध व्हाव्ही म्हणून. आधीच सांगितल्याप्रमाणे मला ह्याचे पैसे मिळत नाही, आणि मिळत असते तर आनंदाने घेतले असते. * युद्धाच्या धुक्यांतली कुठलीही बातमी शेवटी संशयास्पद नजरेनेच पहिली पाहिजे ह्याचा अर्थ सर्वच माहिती खोटी आणि विशेष म्हणजे आपल्याला पचत नाही ती बातमी इतरांची आत्मवंचना किंवा काही तरी महा कौटिलीय खेळी जी माझ्या सारख्या पामरांना समजत नाही असे नाही. * एकूणच रशिया, युक्रेन इत्यादी विषयावर इथे अक्षरशः हजारो शब्दांचे लेखन केले आहे. बहुतेक लेखन "बातमी" ह्या सदरांत न मोडता वैचारिक लेखन आहे. उगाच कुठले तरी लिंक देऊन हे पहा असे म्हटले नाही. हे लेखन कुणा इंटरनेट वरील अनोळखी व्यक्तीला चुकीचे ठरविण्याच्या आनंदासाठी नाही केले. मराठी वृत्तपत्रांत किंवा इतर साहित्यांत क्वचितच मांडले जाणारे मुद्दे मांडावेत आणि भविष्यांत इतरांना ते सापडावेत ह्या उद्धेशाने केले आहे. रशिया किंवा युक्रेन च्या मळ्यांतली भाजी मी खाते म्हणून नाही. * माझ्या अत्यंत जवळचे आणि ओळखीच्या व्यक्ती युद्धांत अडकलेल्या होत्या/आहेत. त्यांची उध्वस्त घरे, त्यांच्या जाळून टाकलेल्या शाळा आणि विशेष म्हणजे सध्या त्यांची मानसिक अवस्था पाहून हे युद्ध लवकर संपावे असे वाटते. * नैतिक दृष्ट्या माझे मत अगदी साफ आहे. युद्धांत रशियाची चूक असून पुतीन ह्यांना जबाबदार ठरविण्यात आणि शिक्षा करण्यात इतर जगाला यश आले तर त्याचा आनंदच होईल. असे होण्याचा इतिहास कमीच असला तरी पहिल्यांदाच पुतीन हे आपल्या पतनाच्या इतके जवळ आले आहेत. * युद्ध सुरु होण्याच्या खूप आधीच मी ह्या विषयावर लेखन सुरु केले होते. तेंव्हा लोक फक्त "नॉर्दस्ट्रीम २" चा विषय चघळत बसले होते, मग अमेरिका उगाच खोट्या अफवा पसरवत आहेत असा प्रचार सुरु झाला. चिल्लर पैश्याची गॅस लाईन रोखण्यासाठी अमेरिका हे खोटे आरोप करत आहे आणि पुतीन बिचारे फक्त तेल आणि गॅस विकायला पाहत आहेत असा समज पसरवला जात होता. नंतर खरोखरचे युद्ध सुरु झाले तेंव्हा पुतीन ह्यांची सेना युक्रेन, नाटो वगैरे थपडा लावून युक्रेनी राष्ट्राध्यक्षांना रडवेल आणि मग हे पळून वगैरे जातील असली आत्मवंचना सुरु झाली. त्यानंतर नाटो युक्रेन ला पाण्यात सोडून आपण गुपचूप आपल्या कामाला लागतील अशी आत्मवंचना सुरु झाली. आता सध्या पुतीन ह्यांना निर्बंध वगैरे सर्व आधीच ठाऊक असल्याने त्यांना फिकर पडत नाही पण अमेरिकेतल्या कुठल्यातरी शुल्लक फंड ने तिथे चिल्लर गुंतवली होती ती शून्य झाल्याने अमेरिका हादरेल अशी आत्मवंचना सुरु झाली आहे. * युद्ध सुरु होण्याच्या आधीच मी भाकिते व्यक्त केली होती. त्यांत रशियन सैन्य ढिसाळ आहे हे प्रमुख होते. त्यावेळी कुणीही ह्याची अपेक्षा केली नव्हती. युद्धाचे बिगुल वाजण्याच्या आधी बेलारूस मध्ये ज्या बातम्या प्रकाशित केल्या होत्या त्यावरून मी ते भाकीत व्यक्त केले होते. ते आता बऱ्यापैकी सामान्य न्यान झाले आहे. * क्यिव ७२ तासांत रशियाच्या ताब्यांत येईल हे माझे भाकीत सपशेल चुकीचे ठरले. त्याचा सुद्धा आनंदच आहे. कारण सैन्य ढिसाळ असले तरी इतके ढिसाळ असेल असे वाटले नव्हते. टीप : मी पोट तिडकीने लिहिते ह्याचा अर्थ मला अमुकच एका प्रकारच्या परिमाणाची खूप अपेक्षा आहे असे नाही. आणि असली तरी मी काही लिहून ते साध्य होणार नाही.

In reply to by साहना

नैतिक दृष्ट्या माझे मत अगदी साफ आहे. युद्धांत रशियाची चूक असून पुतीन ह्यांना जबाबदार ठरविण्यात आणि शिक्षा करण्यात इतर जगाला यश आले तर त्याचा आनंदच होईल.
सहमत आहे.

In reply to by कॉमी

याचा भारताच्या धोरणाशी संबंध नाही. भारताने घेतलेली पोझिशन योग्य वाटते. त्यात वाद नाही. भारताने ताबडतोब कोणतीतरी बाजू घेण्याची काही गरज नाही.

In reply to by कॉमी

समुदाय अ हा सतत इतर देशांना सगळे कायदे फाट्यावर मारुन, समुदाय बच्या इशार्‍यांकडे दुर्लक्ष करुन इतर देशांवर हल्ले करत असेल. आणि आता समुदाय ब ने तोच कित्ता गिरवत इतर देशांवर हल्ले केले. आता चुक समुदाय अ ची कि ब ची?

In reply to by कॉमी

दोन्ही अनैतिकच.
बरोबर उत्तर. दुर्देवाने समुदाय अ हा आपली चुक स्वीकारत नसल्याने समुदाय बला ही ते नियम लागु होत नाहीत, हा झाला व्यवहारिकपणा.
व्हॉट अबौट्री का ?
असले मुद्दे आणु नका पुन्हा. हे आपले दु:ख कसे मोठे, बाकीच्यांना कसे तेच नियम लागु होत नाहीत हे सिध्द न करता, त्यांचे तोंड बंद करायला वापरतात. आफ्रिकन आणि ज्यु भरपुर वापर करतात याचा. माझ्या अनुभवाने सांगतो. युरोपियन होलोकास्टबद्दल रडारड करतात, पण तेच लोकांना जेव्हा अयुरोपियन लोक मरतात त्याबद्दल काही वाटत नाही. असल्या दांभिकपणाची किळस वाटते. आता बाकीचे लिहीत नाही.

In reply to by Trump

अयुरोपियन लोक मरतात तेव्हा आमचे माननीय नोम चोम्सकीच रडतात. आमचे नोम चोम्सकी आणि आमचे चिकागो सेव्हन आणि आमचे बरणी सँडर्सचं पॅसिफिस्ट आंदोलने करतात. त्यामुळे आम्ही अयुरोपियन लोकांच्या मृत्यूंबद्दल बोललो नाही असे तुम्हाला वाटत असेल तर फार मोठी थट्टा आहे तुमची.

In reply to by कॉमी

अयुरोपियन लोक मरतात तेव्हा आमचे माननीय नोम चोम्सकीच रडतात. आमचे नोम चोम्सकी आणि आमचे चिकागो सेव्हन आणि आमचे बरणी सँडर्सचं पॅसिफिस्ट आंदोलने करतात.
किती उपयोग झाला त्याचा? किती युध्दे थांबली? किती धोरणे बदलली गेली?

In reply to by Trump

अंडरस्टाण्डिंग पॉवर या पुस्तकात प्रश्नोत्तरे आहेत. एका बाईने चोम्सकीला विचारले- "पोलिटिकल ऍक्टिव्हिसम चा किती फायदा झाला ?" हा तुमचा थेट ओरशन आहे आणि चोम्सकीने थेट उत्तर दिले आहे. असो, व्हॉट अबौट्री करताय म्हणूनच हे सांगितलं. पुन्हा आणखी एक व्हॉट अबौत्रीची पारंबी आणणार असाल तर थांबावं लागेल. नैतिकता तपासण्याचे कष्ट तुम्ही अजूनही घेतले नाहीत. फक्त यावेळी तुमची नैतिकता कुठे जाते इतकेच विचारले.

In reply to by कॉमी

व्यवहारात दुर्बलाच्या नैतिकतेला काही किंमत नसते. लोकांना थोडी भितीही वाटावी लागते. जर नैतिकतेला इतकी किंमत असती तर सैन्य, लष्करी सिध्दता, पोलिस, न्यायालय, कागदे यांची काहीच गरज नाही. जिथे सगळे समान आहेत, सगळे कसे छान छान आहे, असा साम्यवाद पण व्यवहारात चालला असता.

In reply to by Trump

फार अज्ञान प्रगट करताय. पोलीस आणि कायदे तत्कालीन नैतिकतेचा विचार करूनच बनवलेले असतात. जगात सगळे नैतिकतेने चाललेय असे मी म्हणलेच नाहीये, पण एखादी गोष्ट चूक कि बरोबर हे आपण नैतिकतेला धरूनच बोलतो. जर तुमचा या गोष्टीवर विश्वास नाही तर पुतीन यांनी योग्य का अयोग्य केले या वादात तुम्ही पडूच नका, तो तुमचा एरिया नाहीच.

In reply to by कॉमी

जर तुमचा या गोष्टीवर विश्वास नाही तर पुतीन यांनी योग्य का अयोग्य केले या वादात तुम्ही पडूच नका, तो तुमचा एरिया नाहीच.
असो. तुम्ही वैयक्तिक टिकाटिपण्णी करताय. ----- नैतिकतेचा नियम दोन्ही बाजुला असतो, एका बाजुला नव्हे. जर समुदाय अ ने नैतिकता सोडली आणि बरेचदा सांगुन समजत नसेल, तर समुदाय ब ला नैतिकता सोडायचा अधिकार आहे. तुमचा तर्क किंवा इच्छा जर समुदाय अ ने एक मुस्काटीत मारल्यानंतर समुदाय ब ने दुसरा गाल पुढे करावा असे असेल तर पुढे बोलण्यात अर्थ नाही.

In reply to by Trump

ह्यात वयक्तिक काय आहे ? तुम्हीच तर माझ्या खरडवहित म्हणाला की नैतिकता वैगेरे बोलासाठी असतात त्यांचा खऱ्या आयुष्यात काही संबंध नसतो. मग तसे असल्यास तुम्ही या वादात पडण्याचेच काही कारण नाही. समुदाय ब ला नैतिकता सोडायचा अधिकार आहे असे जरी मानले (असे मानू, मला खरं तर नाही पटत) तरी, प्युअर कॉल्ड तर्काने तुम्ही माझेच म्हणणे मान्य करताय कि समुदाय ब ने नैतिकता सोडली आहे. माझा मुद्दा तोच आहे, कि नैतिकता सोडली आहे. बरं, हे समुदाय पातळीवरच चालते कि वयक्तिक पातळीवर पण ? व्यक्ती अ ने व्यक्ती ब चा खून केला तर व्यक्ती क ला व्यक्ती ड चा खून करायचा हक्क आहे का, किंवा त्याचे तसे करणे योग्य झाले का ? जर वयक्तिक पातळीवर हा नियम चालत नसेल तर का नाही चालत ?

In reply to by कॉमी

हे म्हणजे आधी " रामायण खरे वाटत नाही, ते झालेच नाही" असे म्हणणे, आणि नंतर येऊन "रामाचा जन्म अयोध्येत या जागी नाही, तर दुसऱ्या जागी झालेला" असे म्हणणे. उदाहरण म्हणून हे तुमच्या तर्काला चालेल.

In reply to by कॉमी

ह्यात वयक्तिक काय आहे ? तुम्हीच तर माझ्या खरडवहित म्हणाला की नैतिकता वैगेरे बोलासाठी असतात त्यांचा खऱ्या आयुष्यात काही संबंध नसतो. मग तसे असल्यास तुम्ही या वादात पडण्याचेच काही कारण नाही. वैयक्तिक टिकाटिप्पणी नको असल्याने, येथे उत्तर नाही. खरडवहीत लिहा.
समुदाय ब ला नैतिकता सोडायचा अधिकार आहे असे जरी मानले (असे मानू, मला खरं तर नाही पटत) तरी, प्युअर कॉल्ड तर्काने तुम्ही माझेच म्हणणे मान्य करताय कि समुदाय ब ने नैतिकता सोडली आहे. माझा मुद्दा तोच आहे, कि नैतिकता सोडली आहे.
दोघांनीही नैतिकता सोडली आहे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. पण समुदाय ब ने केले ते बरोबर आहे, त्याला कोणताही इतर पर्याय शिल्लक नव्हता.
बरं, हे समुदाय पातळीवरच चालते कि वयक्तिक पातळीवर पण ? व्यक्ती अ ने व्यक्ती ब चा खून केला तर व्यक्ती क ला व्यक्ती ड चा खून करायचा हक्क आहे का, किंवा त्याचे तसे करणे योग्य झाले का ? जर वयक्तिक पातळीवर हा नियम चालत नसेल तर का नाही चालत ?
दुर्देवाने उत्तर आहे 'हो'. समाज हा नियमावर आधारित चालतो. जर एक समुदाय अ हा नियम पाळत नसेत, सरकार हतबल असेल किंवा त्यात सहभागी असेल तर समुदाय बला नक्कीच स्वसरंक्षणाचा हक्क आहे.

In reply to by कॉमी

जाउ द्या आता. तुम्हाला सगळे पुन्हा सांगायची गरज आहे. नाटो, रशिया, श्री पुतीन यांची भाषणे, इशारे, क्युबन क्ष्रेपणास्त्र पेच इत्यादी वाचा.

In reply to by साहना

त्यांच्याकडे ४००० विमाने आहेत पण ते मृदुहृदयाचे असल्याने आपली बी टीम ला पाठवत आहेत, बातम्या वाचून लिहणार्यांना युद्धाचे डावपेच काय ठाऊक ?, तिकडचं धुणं इथे धुवायची गरज नव्हती. घाव वर्मी लागलाय असं दिसतंय. जाऊ द्या मीच माघार घेतो. चालू द्या तुमचं एकतर्फी.

संरक्षण सचिवांसाठी ट्रम्प-नियुक्त माजी वरिष्ठ सल्लागार म्हणतात की रशियन सैन्याने युक्रेनवर 'खूप सौम्य' केले आहे आणि झेलेन्स्कीला 'कठपुतली' म्हटले आहे. A Trump-appointed former senior adviser to the Secretary of Defense says Russian forces have been 'too gentle' on Ukraine and called Zelensky a 'puppet' https://news.yahoo.com/trump-appointed-former-senior-adviser-073609454…

एक राष्ट्र दुसर्‍या राष्ट्राचे राष्ट्रत्व काढुन घेऊ शकते का? मी असे पहील्यांचा बघतो आहे. इतर अभ्यासु लोकांनी अधिक प्रकाश टाकावा. कोठे तरी भारत - पाकिस्तान, रशिया - युक्रेन यांची तुलना पाहीली.
  • जर रशिया युक्रेनचे राष्ट्रत्व काढुन घेउन एक पायंडा पाडत असेल तर त्याच नियमाचा वापर करुन भारत सरकार, पाकिस्तान बाग्लादेश आणि म्यानमार (संदर्भ: https://www.irrawaddy.com/specials/on-this-day/burma-separated-british-…) ह्यांचे राष्ट्र्त्व काढुन घेउ शकते का? असे नक्की आपण किती मागे जाउ शकतो?
  • हे सगळे नियमांमध्ये कसे बसणार? कि वसाहतवाद ३.० म्हणायचे याला? https://www.un.org/press/en/2020/gacol3342.doc.htm
पुतिन यांच्या म्हणण्यानुसार, "कीवमधील सध्याच्या सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे की जर त्यांनी असेच वागणे सुरू ठेवले तर ते युक्रेनच्या राज्याचे भविष्य धोक्यात आणतील. आणि असे झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल." According to Putin, "the current government in Kyiv has to realise that if they continue to behave like this, they will endanger the future of Ukraine’s statehood. And if this happens it will be entirely their responsibility." https://www.pravda.com.ua/eng/news/2022/03/5/7328496/ - https://theweek.com/russo-ukrainian-war/1010961/ukrainians-have-receive…

पण भारतीय हिंदी न्यूज चॅनेल जगात मस्करी चे विषय झाले आहेत. न्यूज अँकर ,त्यांनी बोलावलेल् पाहिजे असे काही अक्कले चे तारे तोडत आहेत की खूप दया येत आहे . भारतीय हिंदी न्यूज चॅनेल वर. ह्या हुशार न्यूज चॅनेल ना . पुतीन कधी अणुबॉम्ब टाकणार आहे हे पण माहीत असते युक्रेन काय डावपेच करणार हे पण ह्यांना माहीत असते.. युक्रेन आणि रशिया चे अध्यक्ष भारतीय न्यूज चॅनेल ह्या साठी बघतात. की त्यांचे स्वतःचे प्लॅनिंग काय आहेत,डावपेच काय आहेत हे त्यांना समजावे म्हणून. आणि 24 तास तोच तमाशा. युद्ध कोणत्या देशात war room भारतात. आणि ती पण 24 तास.

In reply to by sunil kachure

काहीच दिवसापूर्वी ukrain ला ताब्यात घेण्याचा रशियाचा प्लॅन TV9 च्या हाती लागला होता. पण रशियन सैनिकांना मराठी/हिंदी समजत नसल्यामुळे कदाचित अजून ukrain ताब्यात आला नसेल. 26 जानेवारिला भारतीय सैन्यदलने आपल्या गणवेशात काहीतरी बदल केले आहेत. बरीचशी हिंदी न्यूज चॅनेल्स अब नही दिखेंगे भारतीय सैनिक" " अशी ब्रेकिंग न्युज देत होते. पहिले राफेल भारतात येताना तर भारतीय चॅनेल्स ने अगदी उन्माद केला होता. सुशांतसिंग च्या वेळी आपल्या थोर मीडियाने त्याच्या girlfriend ला खुनी म्हणून जाहीरही केलं होतं.

४०० झाले. आता दुसरा धागा काढा. प्रतिसाद शोधाताना डोक्याचा युक्रेन होतोय.

In reply to by Trump

परत परत शेखर गुप्ताचा कचरा कशाला आणताय? हा माणूस वार दिसेल तशी पाठ फिरवतो! आधी लॉजिकल बोलून मग हळूच डावा अजेंडा घुसवण्यात पटाईत! त्याला म्हणा; काँग्रेसच्या काळात तू इतका श्रीमंत अचानक कसा झाला यावर बोल. तुला सोनिया बाईने पद्म का आणि कसे दिले यावर बोल. मग लोकांना ज्ञान वाट!

In reply to by Trump

हल्ली त्यांच्या विश्लेषणाची गुणवत्ता चांगलीच वाढली आहे. ह्या बाबतीत सहमत. नाहीतर आजकाल निपक्ष पत्रकार राहिलेत कुठे. एक तर भाजपा समर्थक आहेत नाहीतर विरोधक. त्यातल्यात्यात शेखर गुप्ता बरा वाटतो.

दिवस १२ : * युद्धाच्या बाराव्याला मोठे काही घडले नाही. * रशिया युक्रेन ह्यांच्या चर्चची ३ री फेरी झाली. त्यातून काही अपेक्षित नव्हतेच. * रशियन सैन्य आता शहरांत घुसायच्या ऐवजी दुरून गोळाफेक जास्त करत आहे. * सीमेवर गोळा झालेले १००% सैन्य आता युक्रेन मध्ये सक्रिय आहे. * फोटोग्राफिक पुराव्याद्वारे रशियाचे साधारण किमान १२० रणगाडे नष्ट झाले आहेत. रशियाच्या एकूण चालू शकणार्या रणगाड्या पैकी हे ४% आहेत. * रशिया आपले रिसर्व सैनिक युक्रेन मध्ये आणत आहे असे पुरावे नाहीत असे अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने सांगितले. * युद्धामुळे भारतांत कदाचित वनस्पती तेलाचा तुडवडा भासू शकतो. * भारताचे QUAD हे सुद्धा इंडो पॅसिफिक मधील NATO च असे चीन समजतो अशी धमकीवजा घोषणा चिनी पर राष्ट्र मंत्रालयाने केली. * आधी आठवडा भरांत संपेल असे वाटणारे युद्ध आता कदाचित बराच काळ लांबेल. * माझ्या कामाच्या ठिकाणचे (पण थेट ओळख नसलेले) काही युक्रेनी-अमेरिकन मातृभूमी साठी लढायला परत देशांत गेले. दोन्ही लोकांना युक्रेनी सैन्यांत कर्तव्य करण्याचा अनुभव होता.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील २१ वर्षीय विद्यार्थी, सैनिकेश रविचंद्रन हा रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनियन निमलष्करी दलात सामील झाला आहे. वृत्तानुसार, अधिकार्‍यांनी त्याच्या घरी जाऊन रविचंद्रनच्या पालकांशी संवाद साधला आणि असे कळले की त्याने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला होता पण तो नाकारण्यात आला होता. रविचंद्रन २०१८ मध्ये अभ्यासासाठी युक्रेनच्या खार्किव शहरात गेला होता. त्याचा अभ्यासक्रम २०२२ मध्ये पूर्ण होणार होता. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रविचंद्रन यांच्या कुटुंबाचा संपर्क तुटला होता. दूतावासाची मदत घेतल्यानंतर कुटुंबीयांनी रविचंद्रन यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान, रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनच्या निमलष्करी दलात सामील झाल्याचे रविचंद्रनने कुटुंबीयांना सांगितले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh/indian-student-reached-ukraine-to-…

ह्या तमिळ nadu मधील व्यक्ती ला भारतीय समजू नये . शत्रू समजून योग्य तो व्यवहार करावा

In reply to by sunil kachure

श्री कचुरे, हे जरा जास्तच होतेय. वेगळे मत असणे वेगळे आणि उघड उघड इतर देशवासी लोकांबद्दल शत्रुत्वाची भावना वेगळी. - कृपया वर्तणुकीमध्ये सुधारणा करावी.