सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे.
युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही.
नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा
युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली.
नॉर्मंडी आराखडा
जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html
वाचने
118110
प्रतिक्रिया
434
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपल्या विरोधकांचे कौतुक
In reply to जुन्या, नव्या गोष्टी by कॉमी
विरोधक कसले आलेत, दोघे लंगोटी
In reply to आपल्या विरोधकांचे कौतुक by Trump
विरोधकांचे मन जिंकुन त्यांना
In reply to विरोधक कसले आलेत, दोघे लंगोटी by कॉमी
हाहा चांगला जोक केला बघा.
In reply to विरोधकांचे मन जिंकुन त्यांना by Trump
माझ्या वक्तव्याने तुम्हाला
In reply to हाहा चांगला जोक केला बघा. by कॉमी
भारताची मीडिया
क्रिमिया: एक रशियन दृष्टीकोन.
रशिया व अमेरिका हे स्वार्थी
आज भारताचीही परीक्षा असणार
In reply to रशिया व अमेरिका हे स्वार्थी by शाम भागवत
तटस्थ राहणे. दुसरं काय? बोलणी
In reply to आज भारताचीही परीक्षा असणार by रात्रीचे चांदणे
कोणिही मधे पडू नका हेच तर
In reply to तटस्थ राहणे. दुसरं काय? बोलणी by शाम भागवत
युक्रेनच्या युध्दात बर्याच
In reply to कोणिही मधे पडू नका हेच तर by शाम भागवत
भारताने पण हिरो बनू नये
एक जरी निर्बंध टाकला तरी अन्न
In reply to भारताने पण हिरो बनू नये by sunil kachure
तांदूळामधे भारताचा जगात दुसरा
In reply to एक जरी निर्बंध टाकला तरी अन्न by सुबोध खरे
काय बंधन टाकली होती
In reply to एक जरी निर्बंध टाकला तरी अन्न by सुबोध खरे
शरणागतीची तयारी सुरु झाली.
फिनलंड आणि स्वीडन
भारत, रशिया, चायना आणि अरब
योग्य निर्णय
In reply to भारत, रशिया, चायना आणि अरब by कॉमी
विश्वगुरु आणि युद्ध परिस्थिती.
In reply to भारत, रशिया, चायना आणि अरब by कॉमी
सुप्रभात सर.
In reply to विश्वगुरु आणि युद्ध परिस्थिती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही हा फॉरवर्ड नाही
In reply to विश्वगुरु आणि युद्ध परिस्थिती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगं आई गं...!
In reply to तुम्ही हा फॉरवर्ड नाही by साहना
ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पणा गुण लागला
In reply to अगं आई गं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अमेरिका किँवा ब्रिटन
दिवस ३ :
छान माहीती.
In reply to दिवस ३ : by साहना
वाचतो आहे.
In reply to दिवस ३ : by साहना
प्रविण स्वामी:
धन्यवाद.
In reply to प्रविण स्वामी: by Trump
चीन, भारत आणि संयुक्त अरब अमिराती या सर्व देशांनी अलिप्त राहिले.
संयुक्त अरब अमिरातीचा सर्वात
In reply to चीन, भारत आणि संयुक्त अरब अमिराती या सर्व देशांनी अलिप्त राहिले. by Trump
हे कशावरून ? काही पूर्व घटना
In reply to संयुक्त अरब अमिरातीचा सर्वात by शाम भागवत
इस्लामिक संघटनेच्या
In reply to हे कशावरून ? काही पूर्व घटना by कॉमी
.
In reply to इस्लामिक संघटनेच्या by शाम भागवत
भागवत काका असले भयानक विनोद
In reply to संयुक्त अरब अमिरातीचा सर्वात by शाम भागवत
:)
In reply to भागवत काका असले भयानक विनोद by अमरेंद्र बाहुबली
भारताची उपस्थिती असेल तर
भाऊ तुमची तुलना गैरलागु आहे.
In reply to भारताची उपस्थिती असेल तर by शाम भागवत
तो भणंग रशियाच्या बाजूने
In reply to भाऊ तुमची तुलना गैरलागु आहे. by Trump
पण मोदी रशियाची तळी उचलून UAE
In reply to तो भणंग रशियाच्या बाजूने by शाम भागवत
तसंही, रशिया व्हेटोच करणार
In reply to पण मोदी रशियाची तळी उचलून UAE by कॉमी
मी तरी या विषयावर थांबलोय. :)
In reply to तसंही, रशिया व्हेटोच करणार by कॉमी
ओके, नो प्रेशर.
In reply to मी तरी या विषयावर थांबलोय. :) by शाम भागवत
माझ्या मते
आत्ता पर्यंत साधारण एक लाख
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे | वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे || कवी वाल्मीकीसारिखा श्रेष्ठ ऐसा |नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ||आपल्यासाठी चांगली बातमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे | वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे || कवी वाल्मीकीसारिखा श्रेष्ठ ऐसा |नमस्कार माझा सदगुरु रामदासा ||ज्या गतीचे रशियन फौजा
युक्रेनियन लोक फार तर आणखीन
In reply to ज्या गतीचे रशियन फौजा by Trump
माझी मते किंवा विश्लेषण
In reply to युक्रेनियन लोक फार तर आणखीन by साहना
अर्नब गोस्वामीची अरडाओरड आवडत
अमित सेनगुप्ता:
अमित सेनगुप्ता:
In reply to अमित सेनगुप्ता: by Trump
वेळ लागत आहे
संबधित लेखः चीन, रशिया आणि मुक्त समाज - अंतिम भाग
रशियन सैन्य खार्किवमध्ये घुसले
युक्रेनमधील रशियन युद्ध - कीव
In reply to रशियन सैन्य खार्किवमध्ये घुसले by Trump
भारत युक्रेन आणि रशिया
कृपया संदर्भ द्यावेत.
In reply to भारत युक्रेन आणि रशिया by साहना
युक्रेन १९९८ मध्ये UNSC चा
In reply to कृपया संदर्भ द्यावेत. by Trump
युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
In reply to युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण by Trump
युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
In reply to युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण by Trump
यूएन मधे सपोर्ट न केल्याचा
In reply to युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण by Trump
युक्रेन मध्ये युद्ध चालु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “At the heart of racism is the religious assertion that God made a creative mistake when He brought some people into being.” :- Friedrich Otto Hertzभारताने आपल्या बॅटलशिप्स
In reply to युक्रेन मध्ये युद्ध चालु by मदनबाण
आणि नक्की कुठल्या बंदरांत बरे
In reply to भारताने आपल्या बॅटलशिप्स by रावसाहेब चिंगभूतकर
हसून हसून वाट लागली. ब्रिटिश
In reply to आणि नक्की कुठल्या बंदरांत बरे by साहना
ब्रिटिश प्रधान मंत्री बोरिस ह्यांनी मोदींना फोन करून शक्य असल्यास आपल्या काही नागरिकाना अनु शकता का अशी विचारणा केली त्यावर नक्की आणू पण बसायला मिळणार नाही असे ठणकावून सांगितले.हे तर कहर होतं.व्हाट्सअप्प बद्दल काही माहिती
In reply to आणि नक्की कुठल्या बंदरांत बरे by साहना