चीन, रशिया आणि मुक्त समाज - भाग १
In reply to बोल्शेविक by चंद्रसूर्यकुमार
सरकार रिपब्लिकन असो किंवा democrat अमेरिकन सत्तेने रशियन सत्तेला सतत शह दिला आणि त्यांच्या मागे इंग्लंड, फ्रांस, जर्मनी, इत्यादी युरोपिअन सत्ता ठाम पणे उभ्या राहिल्या.असे नक्कीच नाही. पुतीन, रशिया यांची पत त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या मानाने नक्कीच मोठी. जर भारताची आणि रशिया, याची लोकसंख्या, अर्थव्यवस्था यांची तुलना केली तर कोणाची पत नक्की मोठी आहे? पुतीन यांना काय पाहीजे हे जर जाणुन घ्यायचे असेल तर तुम्हाला १९९० च्या दशकात पाठीमागे जावे लागेल. गार्बाचेव्ह, येल्त्सिन त्यावेळीची परिस्थिती, चेचेन्या इत्यादी संदर्भ महत्वाचे आहेत. त्यांना नक्की काय हवे ते उघड आहे. काही उपयुक्त दुवे: https://www.theguardian.com/world/2022/jan/12/russias-belief-in-nato-betrayal-and-why-it-matters-today https://www.voanews.com/a/russia-putin-western-leaders-nato-expansion/6392427.html https://www.latimes.com/opinion/op-ed/la-oe-shifrinson-russia-us-nato-deal--20160530-snap-story.html https://www.theguardian.com/world/2021/nov/04/ex-nato-head-says-putin-wanted-to-join-alliance-early-on-in-his-rule https://www.brookings.edu/blog/order-from-chaos/2021/09/08/the-impact-of-september-11-on-us-russian-relations/
पुतीनचा रशियांतील धाक वाढत गेला आहे. रशियाची सैनिक ताकद, आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांचे महत्व इत्यादी कमी होत गेले आहे. अमेरिकन जाणकारांच्या मते पुतीन ह्यांचा कुणावरही विश्वास नसल्याने सध्या त्यांचे आंतरिक वर्तुळ म्हणजे फारतर ५ लोकांचे आहे. पुतीन ला नक्की काय पाहिजे आणि काय नको ह्याची कल्पना त्यामुळे कोणालाच नाही.असे तुम्ही चीन बाबतीत म्हणु शकता. रशियन नेते नक्कीच मनापासुन साम्यवादी प्रयत्न करत होते. ते इतर देशांमध्ये साम्यवाद पसरावा म्हणुन प्रयत्न करत होते.
सोविएत रशिया किंवा लेनिन चे राज्य कदाचित बाहेरून फक्त साम्यवादी वाटले तरी त्यांचा मूळ पाया हा रशियन राष्ट्रवाद हा होता. भूतकाळांतील "थोर रशिया" त्यांना निर्माण करायचा होता. साम्यवाद हे एक राजकीय टूल होते.ह्याचे नक्की स्त्रोंत काय आहेत?
फक्त फरक इतका आहे कि पुतीन ला आज रशियन लोकांचाच तितका पाठिंबा नाही. झाकली मूठ सव्वा लाखाची ह्या न्यायाने कठोर निर्णय घ्यायला पुतीन कचरत आहेत. रशियन लोकांना युद्ध नको आहे, युक्रेन, एस्टोनिया इत्यादी राष्ट्रे स्वतंत्र म्हणून जास्त खुश आहेत. पुतीन च्या मैत्रीवर गब्बर पैसे कमावलेल्या रशियन व्यापारी ठग मंडळींना युद्ध नको आहे. त्यामुळे सैनिकी क्षमता असून सुद्धा प्रत्यक्षांत कुठल्याही युद्धांत भाग घेण्याचा निर्णय पुतीन करतील हे शक्य नाही आणि त्यांनी तसे केल्यास रशिया ला आणखीन नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे पुतीन चा नक्की डाव काय आहे ह्यांत पाश्चात्य नेतृत्वांत बराच संभ्रम आहे.
बायडन आणि कमलाबाई ह्यांच्यांत विस्तव जात नाही कारण मुळांत त्यांना फक्त त्यांचे लिंग आणि वर्ण ह्यासाठी उप राष्ट्राध्यक्ष केले होते.हा घाणेरडा प्रकार लिब्बू पुरोगामी विचारवंतांनी सुरू केला आहे. डायव्हर्सिटीच्या नावावर पात्र नसलेल्यांनाही पुढे आणायचे. अनेक अमेरिकन विद्यापीठांमध्ये मास्टर्स लेव्हलला प्रवेश घेताना आपण येणार्या बॅचच्या डायव्हर्सिटीमध्ये कसा हातभार लाऊ शकतो याविषयी एक निबंध लिहायला सांगतात. त्यात अगदी स्टॅनफर्डसारख्या आघाडीच्या विद्यापीठाचाही समावेश होतो. एक गोष्ट समजत नाही. समजा एखादा उमेदवार शनीवरून प्रवेशासाठी अर्ज करत आहे या कारणावरून त्या उमेदवाराला प्रवेश देणार का? उमेदवाराची पात्रता, गुणवत्ता वगैरे गोष्टींचे महत्व कमी तर केले जात नसेल? समजा पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश द्यायचा असेल तर मग हे डायव्हर्सिटी स्टेटमेन्ट कशाकरता? लिब्बू लोकांनी अमेरिकेची अगदी वाट लावली आहे. पूर्वी एक प्रश्न पडायचा. डेमॉक्रॅटिक पक्षाला बायडन या म्हातार्यापेक्षा दुसरा बरा उमेदवार मिळाला नसता का? पण आता जाणवते की या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. बायडन नसता तर कोणाला उमेदवार करणार होते? बर्नी सँडर्सला? त्याच्यापेक्षा बायडन परवडला. एओसीसारखी डावी कधीतरी अमेरिकेची अध्यक्षा बनेल असे वाटते. कारण वय तिच्याबाजूने आहे. म्हणजे ज्या तत्वांवर अमेरिकेची स्थापना झाली त्याचीच ती प्रतारणा ठरेल. शीतयुध्दाच्या काळात ज्या शक्तींविरोधात अमेरिकेने संघर्ष केला होता त्या शक्तींचा तो विजय असेल आणि जगाच्या इतिहासातील तो एक दुर्दैवी दिवस असेल हे नक्कीच.* पुतीननी क्रायमिया २०१४ मध्येच आपल्या अंमलात आणला होता. त्यावेळी ट्रम्पतात्या अध्यक्ष व्हायचे होते आणि श्री.रा.रा ओबामा अध्यक्ष होते. ही एक सुधारणा सुचवू इच्छितो. आणखी एक गोष्ट म्हणजे या लेखात अमेरिका, रशिया आणि युक्रेन यांच्यात १९९४ मध्ये झालेल्या त्रिपक्षीय कराराचा उल्लेख असायला हवा होता असे वाटते. सोव्हिएट रशियाच्या काळात युक्रेनमध्ये अण्वस्त्रे ठेवली गेली होती. १९९१ मध्ये सोव्हिएट रशियाचे विघटन झाल्यानंतर युक्रेन स्वतंत्र झाला आणि या अण्वस्त्रांचे करायचे काय हा प्रश्न उभा राहिला. तेव्हा रशियाने युक्रेनला आम्ही तुमच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन करणार नाही ही हमी आणि अमेरिकेने युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करायची हमी या कराराद्वारे दिली तर त्या बदल्यात युक्रेनने अण्वस्त्रे नष्ट करावीत असा हा करार होता. क्रायमियामध्ये ९५% रशियन वंशाचे लोक होते तरी तो कायदेशीर दृष्टीने युक्रेनचा भाग होता आणि तो ताब्यात घेऊन रशियाने त्या करारात दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला होता. *: रॉनाल्ड रेगन यांनी भाषणात एक गोष्ट सांगितली होती. एकदा त्यांना क्युबातून आलेला एक निर्वासित म्हणाला की तुम्ही एका स्वतंत्र देशात जन्माला आलात याबद्दल मला तुमचा हेवा वाटतो. त्यावर रेगन त्याला म्हणाले की आपल्या स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे हे लक्षात आल्यावर पळून जायला तुला अमेरिका हा देश तरी होता याबद्दल मला तुझा हेवा वाटतो. जर माझ्या देशात अशी व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करणारी राजवट सत्तेत आली तर मला पळून जायला दुसरे कोणते ठिकाणही नसेल. जर एओसी अध्यक्षा झाली तर हे भाकित खरे ठरेल ही भिती वाटते.
In reply to काहीसे विस्कळीत by चंद्रसूर्यकुमार
In reply to काहीसे विस्कळीत by चंद्रसूर्यकुमार
In reply to काहीसे विस्कळीत by चंद्रसूर्यकुमार
In reply to आपल्या एका कमेंट मध्ये खूप by साहना
पण एक पैलू म्हणजे हार्वर्ड आणि काही डावी विद्यापीठे हि श्रीमंत गोर्या पोरांसाठी फिनिशिंग स्कुल्स होती. इथे फक्त टाईमपास करत करत काही तरी डिग्री घ्यायची आणि त्या दरम्यान आपल्यासारख्या उच्चभ्रू मंडळींबरोबर सलगी करायची, प्रसंगी डेट आणि लग्न सुद्धा (हिलरी आणि बिल ह्यांची भेट येल मध्ये झाली, ) . ह्यातून नेटवर्किंग होऊन मग हि मंडळी आपली आर्थिक पातळी आणखीन उंचावत असत.हा अँगल माहित नव्हता.
माझ्या माहिती प्रमाणे स्टॅनफर्ड मध्ये हि थेरं जास्त चालत नाहीत, कालटेक मध्ये तर अजिबात नाहीत.मी १३-१४ वर्षांपूर्वी बर्याच विद्यार्थ्यांना अमेरिकन विद्यापीठात एम.एस साठी प्रवेशअर्ज करताना मार्गदर्शन केले होते. तेव्हा बर्याच विद्यार्थ्यांना या डायव्हर्सिटी स्टेटमेंटसाठी मदत केली होती. आताही गुगलबाबाने सांगितले की स्टॅनफर्ड, कार्नेगी मेलन वगैरे विद्यापीठांमध्ये ते स्टेटमेंट मागतात. आता या स्टेटमेंटला कितपत महत्व असते याची कल्पना नाही.
उच्च शिक्षणाचे दिवस भरले आहेत. बहुतेक विषयासाठी आता विद्यापीठांत जायची गरज उरली नाही (आरोग्य, मेकॅनिकल इत्यादी अपवाद सोडल्यास). त्यामुळे कॉलेज मध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या घटेल असेच मला वाटते.हो पुढील काही वर्षात हे होईलच. नाहीतरी कॉलेजमध्ये पुढील नोकरीत उपयोगी पडेल असे फार काही शिकवतात असेही नाही. तेव्हा कॉलेजला पर्याय अशी काही व्यवस्था झाल्यास (त्याची सुरवात होत आहेच) तर कॉलेजला जायची गरज राहणार नाही. तसे झाल्यास एक गोष्ट सगळ्यात चांगली होईल. मोठ्या मोठ्या डाव्या विद्यापीठांमधील ढुढ्ढाचार्यांचे महत्व कमी होईल.
In reply to काहीसे विस्कळीत by चंद्रसूर्यकुमार
In reply to काहीसे विस्कळीत by चंद्रसूर्यकुमार
पुतीननी क्रायमिया २०१४ मध्येच आपल्या अंमलात आणला होता. त्यावेळी ट्रम्पतात्या अध्यक्ष व्हायचे होते आणि श्री.रा.रा ओबामा अध्यक्ष होते. ही एक सुधारणा सुचवू इच्छितो. आणखी एक गोष्ट म्हणजे या लेखात अमेरिका, रशिया आणि युक्रेन यांच्यात १९९४ मध्ये झालेल्या त्रिपक्षीय कराराचा उल्लेख असायला हवा होता असे वाटते. सोव्हिएट रशियाच्या काळात युक्रेनमध्ये अण्वस्त्रे ठेवली गेली होती. १९९१ मध्ये सोव्हिएट रशियाचे विघटन झाल्यानंतर युक्रेन स्वतंत्र झाला आणि या अण्वस्त्रांचे करायचे काय हा प्रश्न उभा राहिला. तेव्हा रशियाने युक्रेनला आम्ही तुमच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन करणार नाही ही हमी आणि अमेरिकेने युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करायची हमी या कराराद्वारे दिली तर त्या बदल्यात युक्रेनने अण्वस्त्रे नष्ट करावीत असा हा करार होता. क्रायमियामध्ये ९५% रशियन वंशाचे लोक होते तरी तो कायदेशीर दृष्टीने युक्रेनचा भाग होता आणि तो ताब्यात घेऊन रशियाने त्या करारात दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला होता.
In reply to काहीसे विस्कळीत by चंद्रसूर्यकुमार
पुतीननी क्रायमिया २०१४ मध्येच आपल्या अंमलात आणला होता. त्यावेळी ट्रम्पतात्या अध्यक्ष व्हायचे होते आणि श्री.रा.रा ओबामा अध्यक्ष होते. ही एक सुधारणा सुचवू इच्छितो. आणखी एक गोष्ट म्हणजे या लेखात अमेरिका, रशिया आणि युक्रेन यांच्यात १९९४ मध्ये झालेल्या त्रिपक्षीय कराराचा उल्लेख असायला हवा होता असे वाटते. सोव्हिएट रशियाच्या काळात युक्रेनमध्ये अण्वस्त्रे ठेवली गेली होती. १९९१ मध्ये सोव्हिएट रशियाचे विघटन झाल्यानंतर युक्रेन स्वतंत्र झाला आणि या अण्वस्त्रांचे करायचे काय हा प्रश्न उभा राहिला. तेव्हा रशियाने युक्रेनला आम्ही तुमच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन करणार नाही ही हमी आणि अमेरिकेने युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करायची हमी या कराराद्वारे दिली तर त्या बदल्यात युक्रेनने अण्वस्त्रे नष्ट करावीत असा हा करार होता. क्रायमियामध्ये ९५% रशियन वंशाचे लोक होते तरी तो कायदेशीर दृष्टीने युक्रेनचा भाग होता आणि तो ताब्यात घेऊन रशियाने त्या करारात दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला होता.
In reply to क्रिमिया हा पुर्वी रशियाचा भाग होता. by Trump
नाटो समुहाने पुर्वीची सोव्हियत राज्ये नाटोमध्ये घेणार नाही असे रशियाला वचन दिले होते. ते नाटोने मोडले.याविषयी नक्की कोणते आश्वासन नाटोने दिले होते याविषयी पुरेशी स्पष्टता नाही. याविषयी दोन्ही बाजूचे लिहिले/बोलले गेले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जेम्स बेकर आणि रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्यात १९९० मध्ये बैठक झाली तेव्हा बर्लिनची भिंत पडली होती आणि जर्मन एकीकरण दृष्टीपथात आले होते. तेव्हा गोर्बाचेव्ह यांनी पूर्व जर्मनी असलेल्या भागात नाटोचे सैन्य येऊ नये आणि कोणतीही लष्करी installations असू नयेत हा मुद्दा मांडला. त्यावर जेम्स बेकर म्हणाले होते की पूर्व जर्मनी असलेल्या भागात जर्मनेतर सैन्य डिप्लॉय केले जाणार नाही आणि पूर्व जर्मनीत कोणतेही लष्करी installations असणार नाहीत (NATO will not move to the east by one inch). आता याच्यात ईस्ट म्हणजे पूर्व जर्मनी की पूर्व युरोप आणि पूर्वीच्या सोव्हिएट रशियातील संघराज्ये? या मुद्द्यावर दोन बाजूंमध्ये मतभेद आहेत. पण जेम्स बेकर यांनी १९९० मध्ये हे वक्तव्य केले होते तेव्हा सोव्हिएट रशिया डगमगत असला तरी वर्षभरात फुटेल अशी अपेक्षा फार कोणी केली नसेल. तेव्हा पूर्वीच्या सोव्हिएट संघराज्यांना नाटोत घेणार नाही हे आश्वासन द्यायचा प्रश्न कुठे येतो? समजा भारताची अशी कोणती लष्करी युती असेल तर त्यात बलुचिस्तान आणि सिंधला घेणार नाही हे आश्वासन आताच देण्यासारखे झाले. आम्ही युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा आदर करू हा रशियाच्या अध्यक्षांची सही असलेला करार https://treaties.un.org/doc/Publication/UNTS/Volume%203007/Part/volume-3007-I-52241.pdf वर बघता येईल. त्याप्रकारे नाटोमध्ये पूर्वीच्या सोव्हिएट संघराज्यांना घेणार नाही असा कोणता करार आहे का? दुसरे म्हणजे समजा जेम्स बेकर यांनी ते तथाकथित आश्वासन दिले होते त्याचा रशियाने लावलेला अर्थ ग्राह्य धरला तरी ते वक्तव्य होते १९९० मधील. त्यानंतर १९९४ मध्ये आम्ही युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा आदर करू हे आश्वासन रशियाने सही करून दिले होते. त्यावेळी करार युक्रेनमधील अण्वस्त्रांविषयी होता. पण त्या करारात युक्रेनने नाटोचा सदस्य होऊ नये असे कुठेही म्हटलेले नाही. तिसरे म्हणजे जर पूर्वीची सोव्हिएट संघराज्ये स्वतंत्र आणि सार्वभौम देश झाले असतील तर त्यांनी नाटोचा सदस्य व्हायला नको ही अट रशियाने घालायचा संबंध कुठे येतो? त्यातही जर कुठे करार करून असे आश्वासन नाटोच्या बाजूने दिले गेले असेल तर गोष्ट वेगळी. तसा कुठला करार आहे का?
In reply to मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
पण जेम्स बेकर यांनी १९९० मध्ये हे वक्तव्य केले होते तेव्हा सोव्हिएट रशिया डगमगत असला तरी वर्षभरात फुटेल अशी अपेक्षा फार कोणी केली नसेल.प्रत्येक मोठ्या देशाचे स्वत:चे प्रभावश्रेत्र असते. इतर देशांनी त्यात किती खुट्पुट करावी त्याला मर्यादा असतात. जसे तसे नसेल तर क्युबन क्षेपणास्त्र संघर्ष काय होता? चीनची पाणबुडी जेव्हा श्रीलंकेमध्ये येते तेव्हा भारतात खळखळ का होते?
तिसरे म्हणजे जर पूर्वीची सोव्हिएट संघराज्ये स्वतंत्र आणि सार्वभौम देश झाले असतील तर त्यांनी नाटोचा सदस्य व्हायला नको ही अट रशियाने घालायचा संबंध कुठे येतो? त्यातही जर कुठे करार करून असे आश्वासन नाटोच्या बाजूने दिले गेले असेल तर गोष्ट वेगळी. तसा कुठला करार आहे का?
In reply to क्रिमिया हा पुर्वी रशियाचा भाग होता. by Trump
क्रिमिया हा पुर्वी रशियाचा भाग होता. सोव्हीयत काळात तो प्रशासकीय सोयीसाठी आणि रशिया व युक्रेन मैत्री दर्शवण्यासाठी युक्रेनकडे हस्तांतरीत केला होता. https://en.wikipedia.org/wiki/1954_transfer_of_Crimea बरेचदा हा भाग सोयिस्कररित्या गाळला जातो.असे का ना. जर असे अधिकृत हस्तांतरण झाले असेल तर कायदेशीर दृष्टीने क्रायमिया हा युक्रेनचा भाग झाला ना? स्टालिनने पण प्रशासकीय सोय वगैरे कारणे देऊन आर्मेनियन बहुसंख्या असलेला नागोरनो-काराबाख भाग अझरबैजानला नव्हता का दिला? त्यामुळे कागदोपत्री आणि कायदेशीर दृष्टीने नागोरनो-काराबाख हा अझरबैजानचा भाग झाला होता त्यामुळे १९९४ मध्ये आर्मेनियाने तो भाग ताब्यात घेतला त्याला अझरबैजानवरील आक्रमणच मानले गेले. त्याचप्रमाणे क्रायमिया ताब्यात घेतला त्याला रशियाचे युक्रेनवरील आक्रमणच मानायला हवे.
In reply to त्याने काय फरक पडतो? by चंद्रसूर्यकुमार
असे का ना. जर असे अधिकृत हस्तांतरण झाले असेल तर कायदेशीर दृष्टीने क्रायमिया हा युक्रेनचा भाग झाला ना? स्टालिनने पण प्रशासकीय सोय वगैरे कारणे देऊन आर्मेनियन बहुसंख्या असलेला नागोरनो-काराबाख भाग अझरबैजानला नव्हता का दिला? त्यामुळे कागदोपत्री आणि कायदेशीर दृष्टीने नागोरनो-काराबाख हा अझरबैजानचा भाग झाला होता त्यामुळे १९९४ मध्ये आर्मेनियाने तो भाग ताब्यात घेतला त्याला अझरबैजानवरील आक्रमणच मानले गेले. त्याचप्रमाणे क्रायमिया ताब्यात घेतला त्याला रशियाचे युक्रेनवरील आक्रमणच मानायला हवे.
In reply to अमेरिका by sunil kachure
अमेरिका भारताचा खरा हित चिंतक कधीच होणार नाही.
In reply to ह्या जगात कोण कोणाचा हितचिंतक by Trump
In reply to प्रत्येक देश स्वार्थ बघतो by sunil kachure
रशिया पासून लांब जावून अमेरिकेच्या छत्र छायेत जाण्या मुळे भारताचा काय स्वार्थ आहे.तंत्रज्ञान, बाजारपेठ, आर्थिक भागंभाडवल, युन नकाराधिकार, चीनविरोधातील संघर्षात साथी. रशिया पुर्वइतका बलदंड नाही, आणि जवळपास चीनच्या कच्छपी लागला आहे. ते दोन्ही बाजुला वाटायला हवे, एका बाजुला वाटुन काय होणार!! हे म्हणजे मी शाकाहारी आहे, त्यामुळे जंगलात वाघ मला खाणार नाही असे म्हणण्यासारखे आहे. मुस्लिम शत्रू म्हणजे पाकिस्तान जर असेल तर. पाकिस्तान भारतासाठी फारसे महत्वाचे नाही. शेजारी राष्ट्र शी शांततामय संबंध असणे हे भारताच्या जास्त फायद्याचे आहे की दुसऱ्याच्या नादाला लागून देशाच्या सर्व शेजारी राष्ट्रांशी असलेल्या सीमा धगधगत्या ठेवण्यात भारताचे जास्त फायदा
रशिया पासून लांब जावून अमेरिकेच्या छत्र छायेत जाण्या मुळे भारताचा काय स्वार्थ आहे. रशिया शी जवळीक भारताच्या जास्त फायद्याची आहे की अमेरिकेची गुलामी.. शेजारी राष्ट्र शी शांततामय संबंध असणे हे भारताच्या जास्त फायद्याचे आहे की दुसऱ्याच्या नादाला लागून देशाच्या सर्व शेजारी राष्ट्रांशी असलेल्या सीमा धगधगत्या ठेवण्यात भारताचे जास्त फायदा कधी स्वतचं स्वार्थ कशात आहे ह्याचा पण विचार पर राष्ट्र धोरण ठरवणाऱ्या लोकांनी ठेवले पाहिजे मुस्लिम शत्रू आहे आणि त्याच भोवती गुंफलेले पर राष्ट्र धोरण साफ चुकीचे ठरत आहे.
In reply to रशिया पासून लांब जावून by Trump
In reply to तरी सुद्धा by sunil kachure
भारत ,रशिया आणि चीन ह्यांची युती होणे हे भारताच्याच नाही तर तिन्ही देशाच्या हिताचे आहे. युरोपियन देश वापरून भारताला वाऱ्यावर सोडतील
In reply to भारतीय लोकांना by sunil kachure
भारतातील लोकांना स्वतःच्या देशातील सर्व राज्यांची पूर्ण माहिती नाही आणि असे असून पण जेव्हा चीन, रशिया ,अमेरिका,चीन वर भारतीय चर्चा करतो. ह्या सारखा दुसरा कोणता सर्वात मोठा जोक नाही.
In reply to हाच मुख्य शत्रू by निनाद
त्याचप्रमाणे क्रायमिया ताब्यात घेतला त्याला रशियाचे युक्रेनवरील आक्रमणच मानायला हवे.हे आक्रमण जरी मानलं तरी क्रिमियन जनतेने रशियात विलीन होण्यासाठी कौल दिला आहे. हे सार्वमत रशियाने आक्रमणानंतर घेतलं होतं. रशियन सैनिकांच्या उपस्थितीत सार्वमत घेतलेलं असल्याने बरेच देश यास अवैध धरतात. मात्र बहुसंख्य स्थानिक क्रिमीयन जनतेचा रशियात विलीन व्हायला पाठिंबा आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे तिथे स्थायिक असलेली बरीचशी लोकं रशियन आहेत. स्थानिक तार्तारांचा मात्र रशियात विलीन व्हायला विरोध आहे. पण ते अल्पसंख्य आहेत. दुसरा एक मुद्दा म्हणजे रशियाचा काळ्या समुद्रातला नाविक चमू. हा चमू पूर्वी सोव्हियेत चमू होता. महासंघाच्या विघटनानंतर त्याची फाळणी होऊन एक भाग युक्रेन नौदलात सामील झाला, तर दुसरा भाग रशियात आला. मात्र रशियन चमूचं ठिकाण क्रीमियातील सावेस्तोपोल हेच राहिलं.ज्या प्रकारे युक्रेनचे अध्यक्ष यानुकोव्हिच यांनी पळ काढला, त्यावरून कृष्णसागरचमू बद्दल रशियाला ( पुतीन यांना) साधार भीती वाटू लागली. उर्वरित युक्रेनात अनागोंदी माजली तिचं लोण क्रीमियात येण्याआधी हालचाल करणं चमूच्या रक्षणार्थ आवश्यक होतं. यावर उपाय म्हणून बहुसंख्य रशियन नागरिक असलेल्या क्रीमियात सैन्य घुसवलं. हा मार्ग विवादास्पद असला तरी सावळागोंधळ टळला. मात्र ही अनागोंदी उर्वरित युक्रेनात चालूच राहिली. स्थानिकांच्या पाठिंब्यामुळे युक्रेनला फारसे आक्षेप घेता आले नाहीत. तसंही पाहता १९९१ साली सोव्हियेत महासंघ कोसळल्यावर १९९२ साली क्रीमिया काही अटींवर युक्रेनात सामील झाला होता. त्यामुळे क्रीमिया हा युक्रेनचा अविभाज्य घटक नव्हे. आ.न., -गा.पै.
बोल्शेविक