Skip to main content

युक्रेनवरून तणाव

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 12/02/2022 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही. नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली. नॉर्मंडी आराखडा जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. लिंक https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html

वाचने 118110
प्रतिक्रिया 434

प्रतिक्रिया

In reply to by Trump

विरोधक कसले आलेत, दोघे लंगोटी यार असल्यासारखं आहे दोघांचं वागणं. आत्ता रशियन मीडिया सातत्याने ट्रम्प पुतीनचे कसे कौतुक करतोय हे दाखवतीये. https://www.google.com/amp/s/www.rt.com/russia/550312-trump-putin-savvy…

आताच सहज म्हणून नजर टाकली. आज तक च्या महान न्यूज वाचायला मिळाली १)आखिर क्यू चाहिए रशिया को युक्रेन की जमीन. २) बचाव मोदी जी. युक्रेन मधील भारतीय विद्यार्थी ची हाक. रशिया जगातील सर्वात मोठा देश आहे त्याला युक्रेन ची जमीन ची काही गरज नाही. युक्रेन मध्ये अडकलेले विद्यार्थी kg मध्ये शिकत नाहीत त्यांनी स्वतः च देश का नाही सोडला. आज तक च्या वरील दोन्ही हेड लाईन म्हणजे मूर्ख पणाच कळस आहे. सरकार नी न्यूज चॅनेल चालवण्यासाठी परवानगी देताना न्यूज च दर्जा काय असावा ह्याची अट ठेवलीच पाहिजे. नाही तर भारतीय मीडिया देशाला जगात तोंड दाखवायला जागा ठेवणार नाहीं

रशिया व अमेरिका हे स्वार्थी आहेत व ते फक्त त्यांचे उद्दीष्ट्य पूर्ण करत आहेत असे वाटते. मला वाटते की युक्रेनच्या शरणागतीनंतर अमेरिका व रशिया दोधेही विनविन सिच्युएशन मधे असणार आहेत. युक्रेनचं काहीही होवो. नविन पाईपलाईन सुरू झाली नाही पाहिजे हे उद्दीष्ट आहे अमेरिकेचे. ते साध्य झालंय. जर्मनीने नविन पाईपलाईनचा वापर सुरू करण्याची वेळ बेमुदत पुढे ठकललीय. पुतिनला पूर्विचा रशिया परत उभा करायचाय. तो एकेक प्रांत परत मिळवतोय. अमेरिका व रशिया दोघेही खूष. अमेरिका जरा जास्तच खूष. एवितेवी युक्रेन रशियाच्या घशात जाणारच होता. तर मग चांगल्या स्थितील युक्रेन ऐवजी खराब स्थितीतला युक्रेन गेला तर आणखीन बरं. त्यासाठी त्याच्या मागे असल्याचे दाखवून त्याला लढाईला प्रवृत्त करणे आवश्क होते. ते अमेरिकेला नक्की जमलेलं आहे. शिवाय युक्रेनिअन लोकं रशियनांविरूध्द आता आणखीनच संतापलेली असणार. त्यामुळे युक्रेन ताब्यात ठेवण्याची रशियाची किंमतही जास्त असणार. युध्दात जेवढी रशियाची हानी होईल तो अमेरिकेचा बोनस. ;) मधल्यामधे पाकिस्तानचा मामा बनणार आहे. रशियाचा भेटीची जबरदस्त किंमत अमेरिका पाकिस्तानकडून वळती करणार असं दिसतंय. ग्रे लिस्टमधे जातोय की काय? दोन बैलांच्या झुंझीत हे बारकूस पिल्लू कशाला मधे गेलं कुणास ठाऊक? तैवान बाबतचा रशियाचा पाठिंबा ही एक खेळी आहे हे न कळण्या इतपत चीन मूर्ख नक्कीच नाही. पण या गुगलीला इम्रानसाहेब गंडले की काय? :)

In reply to by शाम भागवत

आज भारताचीही परीक्षा असणार आहे, UN मध्ये आज राशियाविरुद्ध अमेरिका ठराव आणण्याची शक्यता आहे. अर्थातच रशिया आणि चीन त्याला विरोध करणार. आपण काय करणार हे आपल्यासाठी महत्वाचे असणार आहे. यापूर्वी रशियाने प्रत्येक वेळी आपल्याला मदत केली आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

तटस्थ राहणे. दुसरं काय? बोलणी करून प्रश्न सोडवा असं काहीसं म्हणत राहणे. अमेरिका व रशिया दोघांनाही हेच अपेक्षीत असणार आहे. :))

In reply to by शाम भागवत

कोणिही मधे पडू नका हेच तर रशियाचे म्हणणे आहे. युक्रेनने भारताविरोधात भूमिका दोन तीन वेळा घेतलेली असल्याने भारताने युक्रेनच्या बाजूने उभे रहावे हे अमेरिका भारताला कसे सांगू शकेल?

रशिया,अमेरिका बलाढ्य देश आहेत. भारत पण कमकुवत देश आहे. एक पण जागतिक झटका सहन करू शकणार नाही. अलिप्त राहावे. उगाच नाहीतर पाकिस्तान पेक्षा पण वाईट अवस्था होईल. सामर्थ्याचा चुकीचा भ्रम पण भारत सरकार नी करू नये. एक जरी निर्बंध टाकला तरी अन्न मिळणे मुश्कील होईल.

In reply to by sunil kachure

एक जरी निर्बंध टाकला तरी अन्न मिळणे मुश्कील होईल. इतका कडक हर्बल तंबाखू कुठे मिळतो सांगा. पोखरण २ अणुस्फोटानंतर टाकलेल्या कडक निर्बंधामुळे आपल्याकडे किती भूकबळी गेले आहेत? भारतात अन्नधान्य अतिरिक्त आहे हे आपल्याला माहिती आहे का? Management of foodgrain surplus key challenge for India: RBI report https://www.business-standard.com/article/economy-policy/management-of-…

In reply to by सुबोध खरे

कॅनडा आणि जपान नी आर्थिक मदत देणे (,कर्ज देणे) थांबवण्याचे संकेत दिले. अमेरिका नी संरक्षण समुर्ग्री विकणार नाही अशी पुडी सोडली. आणि भारताच्या अणू चाचणी चा फायदा घेवून पाकिस्तान नी पण आणि चाचणी केली. १९९८ नी आज चा काळ खूप फरक आहे फक्त मोठे आकडे दिसतात म्हणजे भारतात आर्थिक सुबत्ता आली नाही. स्वलांबन तर नाहीच नाही .गाव खेड्यातील आज ची स्थिती आणि १९८८ मधील स्थिती ह्याची तुलना केली तर अधोगती च दिसत आहे. १९८८ चा काळ. शेतीला वीज २४ तास होती. आज आढवड्या मधून काहीच तास ती पण रात्री असते. सिंचन योजना व्यवस्थित होत्या. आज सर्व योजना मोडकळीस आलेल्या आहेत. साखर कारखाना ,बाकी सहकार क्षेत्र योग्य स्थिती मध्ये होते ..आज पूर्ण मोडकळीस आले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था उत्तम असणारे राज्य म्हणून महाराष्ट्र चा दबदबा होता आज फक्त सुखद आठवणी आहेत. शहरांची अवस्था पण काही वेगळी नाही. १९८८ आणि त्या नंतर चा काळ.. मुंबई मध्ये नोकऱ्या उपलब्ध होत्या,चांगले पगार होते. आज चा काळ नोकऱ्या सर्व कॉन्ट्रॅक्ट पद्धती वर. एक जागा आणि हजारो त्या साठी प्रयत्न करणारे. ही महाराष्ट्र ची अवस्था .बाकी राज्य विषयी न बोललेले च बर.

शरणागतीची तयारी सुरु झाली. दोन दिवसपण टिकत नाहीत बहुतेक. युक्रेन तटस्थतेवर चर्चा करण्यास तयार - युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की Ukraine ready to discuss neutrality – Ukrainian President Zelensky https://www.firstpost.com/world/ukraine-to-surrender-ready-to-discuss-n… https://www.newsfirst.lk/2022/02/25/ukraine-ready-to-discuss-neutrality… --------------- लवकर शरणागती पत्करली तर लवकर स्थैर्य येईल.

फिनलंडच्या प्रधानमंत्र्यांनी युक्रेन इन्व्हेजनमुळे फिनलंड नाटो मध्ये सामील होण्याच्या "चर्चा बदलतील", म्हणजेच नाटो मध्ये सहभागी होण्याची इच्छा सूचित केली होती. त्यावर प्रतिसाद म्हणून, रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी फिनलंड नाटो मध्ये जोडल्या गेल्यास गंभीर परिणाम होतील असे पत्रकार परिषदेत सांगितले. इथे वाचा.

भारत, रशिया, चायना आणि अरब एमिरेट्स या देशांनी युएन सिक्युरिटी कौन्सिलच्या रशियाला निषेध करायच्या ठरावावर मत देणे टाळले.

In reply to by कॉमी

काल सकाळी आठ-साडेआठला स्नानाला जाता जाता, आपल्या वाट्सॅप इंडियावर 'हालात बेकाबू हो रहे है, मोदी मदद करे- युक्रेन' 'मोदी पुतीन और युक्रेन के राष्ट्रपतीसे बात करे युक्रेन' 'नरेंद्र मोदी दुनिया के बहुत मजबूत नेता है- युक्रेन' अशा बातम्यांमुळे मला वाटलं तासा-दोन तासात मा. मोदीजी ' युद्ध नको, बुद्ध हवा' अशी भूमिका जाहीर करतील आणि युद्ध थांबेल असे वाटले पण तसे काही झाले नाही. मला काल स्नानाला दुपारचे बारा वाजले. काल पाकिस्तानचे प्रधानमंत्री रशियाच्या दौ-यावर जाऊन तिकडे काश्मिरचा प्रश्न असाच आहे वगैरे गरळ टाकून आले. आणि आपण देशांतर्गत निवडणूकात व्यस्त होतो, युक्रेन रशिया युद्धाचे ढग दिसत असतांना युक्रेन मधे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आणायला आपल्याकडे जो पर्यंत रशिया युक्रेनमधे घुसत नाही आणि बाँबवर्षाव करीत नाही तो पर्यंत दोन्ही देशाकडे फार लक्ष द्यायचे नाही ही भूमिका मला फार फार आवडली. विमानभाडे प्रचंड वाढलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना परतायला अडचणी निर्माण होत आहेत अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या येत होत्या. रशियाने किव्हवर जोरदार हल्ला चढवल्याच्या बातम्या येत आहेत. युक्रेनने आपल्या नागरिकांनाही युद्धात सहभागी करुन घेतल्याचे दिसत असून 'झुकेगा नही' असे म्हणत मित्र राष्ट्रांनी रशियाला एकाकी पाडावे असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केले आहे. युक्रेन राष्ट्राध्यक्षांनी आम्ही एकाकी पडलो असून बलाढ्य देश आम्हास मदत करीत नाहीत असे भाऊक उद्गार काढले आणि ''आम्ही सर्व इथेच आहोत. आपले सर्व नागरिक इथेच आहेत, आमचे सर्व सैन्य इथे आहे, आमच्या देशाचे संरक्षण करत आहोत आणी कायम इथे असेच उभे राहू '' असेही ते म्हणाले.( मूळ ट्वीटर संदर्भ) बातमी अनुवाद ऑनलाइन. फ्रान्स शस्त्रास्त्रे पुरवत असून युद्ध सुरु राहील असेही ते म्हणाले. ही सर्व परिस्थिती पाहता एक छोटासा देश एकाकी लढतोय अशी परिस्थिती दिसत आहे. सर्व देश मात्र, तटस्थपणे याकडे पाहात आहेत. उद्या बलाढ्य राष्ट्र जेव्हा अशा एखाद्या देशावर आक्रमण करतील तेव्हाही अशीच परिस्थिती राहील असे वाटते. मात्र, सैन्य, नागरिक यांची होणारी जीवित हानी. त्याचे परिणाम याकडेही जग असेच अलिप्तपणे पाहात राहतील असे वाटायला लागले आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुप्रभात सर.
युक्रेन रशिया युद्धाचे ढग दिसत असतांना युक्रेन मधे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आणायला आपल्याकडे जो पर्यंत रशिया युक्रेनमधे घुसत नाही आणि बाँबवर्षाव करीत नाही तो पर्यंत दोन्ही देशाकडे फार लक्ष द्यायचे नाही ही भूमिका मला फार फार आवडली.
कृपया संदर्भ द्या. माझा संदर्भ: पहीली सुचना १५ फेब्रुअरीला आली होती आणि रशिया २४ तारखेला युक्रेनमध्ये घुसला. https://en.wikipedia.org/wiki/2022_Russian_invasion_of_Ukraine https://www.eoiukraine.gov.in/images/Advisory-15-02.jpg https://www.eoiukraine.gov.in/advisory.php
युक्रेन राष्ट्राध्यक्षांनी आम्ही एकाकी पडलो असून बलाढ्य देश आम्हास मदत करीत नाहीत असे भाऊक उद्गार काढले
कारण युक्रेनने नको तिथे उचापती केल्यात त्यामुळे त्यांना अयुरोपियन लोकांची सहानुभुती नाही. युरोपियन लोकांसाठी युक्रेनचे फारसे मुल्य नाही, त्यासाठी रशियाबरोबर युध्द करावे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही हा फॉरवर्ड नाही पाठिवला का ? साक्षांत प्रभू कृष्णाप्रमाणे महायानायक लॉर्ड ऑफ द मॅन स्वतः हे विमान घेऊन गेले असे काहींनी लिहायचे बाकी ठेवले होते. https://knowyourmeme.com/photos/2317130-2021-2022-russia-ukraine-confli…

In reply to by साहना

अजून तितकं सुरु नाही. पण हेही येऊ शकतं. 'इंडियन स्टूडंट ऑन बोर्ड' असा एक बोर्ड विमानतळाच्या काचेवर लावलेलं वाट्सॅप युनवरसीटीतलं फॉरवर्ड आलंय . रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना भारतीय विद्यार्थ्यांना इजा होऊ नये, अशी स्पष्ट ताकीद दिली गेली आहे, ही आहे आजची ताकद इथपर्यंत आलंय सध्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नमस्कार सर.
'इंडियन स्टूडंट ऑन बोर्ड' असा एक बोर्ड विमानतळाच्या काचेवर लावलेलं वाट्सॅप युनवरसीटीतलं फॉरवर्ड आलंय . रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना भारतीय विद्यार्थ्यांना इजा होऊ नये, अशी स्पष्ट ताकीद दिली गेली आहे, ही आहे आजची ताकद इथपर्यंत आलंय सध्या.
वाटसअ‍ॅप वर जसे लोक बरळतात तसेच काही लोक आंतरजालावर ही संदर्भाशिवाय लिहीतात. शेवटी दोन्ही प्रकाराचे लोक सारखेच. ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पणा गुण लागला. असो. दुर्देवाने जे भारतातील उच्चशिक्षित वर्गाकडुन इतरांना मार्गदर्शन हवे ते मिळत नाही.

सारखे देश प्रत्यक्ष युद्धात सहभागी होत नाहीत ह्याचे महत्वाचे कारण रशिया समोर आहे. रशिया युक्रेन ची युद्ध भूमी होवून देणार नाही. अंतर खंडीय missile चा वापर करून अमेरिका,ब्रिटन च्या भूमीवर युद्ध घेवून जाईल. तेव्हढी त्याची क्षमता आहे. इराक असेल किंवा अफगाणिस्तान त्यांची ती क्षमता नव्हती म्हणून हे देश लष्करी कारवाई मध्ये सहभागी होते. रशिया बाबत त्यांना रास्त भीती आहे.

दिवस ३ : **आज माझ्याकडे थेट युक्रेन मधून माहिती आहे.** माझ्या ओळखीची एक व्यक्ती क्यिव च्या बाहेर आर्सेलर मित्तल ची स्टील फॅक्टरी आहे तिथे काम करत होती. ती आज दिल्लीत परतली. १० दिवस मागे भारतीय सरकार आणि मित्तल ह्यांनी संयुक्तपणे सुनियोजितपणे त्यांना युक्रेन मधून बाहेर काढले होते. त्याच्या मते भारत सरकारने खूप आधीपासून भारतीय नागरिकांना विनंती केली होती कि बाहेर पडा. ज्यांना शक्य नव्हते त्यांना फुकट विमानसेवेची सुद्धा सोया केली होती. अनेक विमाने रिकामी सीट्स घेऊन परत गेली. युक्रेन, रोमानिया, पोलंड इत्यादी भागातून भारतीय दूतावासाने अत्यंत चांगले काम केले अशी माहिती मिळाली. त्याच्या मते जे विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत त्यांच्याशी सहानुभूती असली तरी त्यांच्या साठी भारत सरकारला दोष देणे चुकीचे आहे. माझ्या मैत्रिणीशी माझे बोलणे झाले. ती सध्या रोमानिया मार्गे अमेरिकेत सुखरूप पोचली तरी तिचे आई वडील खारकीव मध्ये अडकले होते. पती युक्रेनियन सैन्यात आहे. खारकीव वर रशियाने सतत प्रचंड गोळीबार केला होता आणि त्यातून सामान्य लोक सुद्धा म्हणे सुटले नाहीत. तिचे आईवडील कसे बसे आज सुटून दुसऱ्या एका गांवात लपून राहिले आहे. तिथे त्यांच्याकडे जेमतेमच अन्न आणि संपर्काची साधने आहेत. नाटो ने प्रचंड प्रमाणात युक्रेन मध्ये शस्त्रास्त्रे तसेच इतर गोष्टी पाठवल्या आहेत त्यामुळे काही ठिकाणी युक्रेनियन स्वयंसेवकांनी उपग्रह मार्फत वगैरे इंटरनेट सेवा चालू ठेवली आहे. दार काही तासांनी आपले आईवडील किमान जिवंत आहेत कि नाहीत ह्याची माहिती त्याच्या द्वारे तिला मिळत आहे. मी हे थोड्या कठोरपणे लिहिले असले तरी तिची मनस्थिती मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. खारकीव मध्ये एक सुप्रसिद्ध बाल हृदय विकार तज्ञ् आहेत ज्यांनी रशियन लोकांसाठी शेकडो फुकट शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्याच्या इस्पितळावर आज रशियाने बॉम्ब टाकून त्याला नष्ट केले. ह्या हल्ल्याचा लोकल रशियन कमांडर म्हणे एके काळी ह्याच इस्पितळांत आपल्या मुलावर उपचार घेत होता. हि माहिती मला फक्त तिच्याकडून मिळाली असल्याने इनरनेटवर सध्या तरी मिळाली नाही. **वॉशिंग्टन मधील भारतीय दूतावासातील एका कनिष्ठ ऑफिसरशी बोलणे झाले.** फक्त भारतीयच नाही तर भारतीयांबरोबर असलेले रशियन सरकारचे चांगले संबंध वापरून अनेक प्रकारची मानवतावादी सेवा युक्रेन मध्ये देण्यासाठी भारत सरकार आणि इतर पाश्चात्य देश सहकार करत आहे असे समजले. आता ह्या व्यक्तीने जास्त नाही सांगितले तरी कदाचित युक्रेन मधील आपले विविध असेट्स ना पाश्चात्य देश भारताच्या मदतीने देशाबाहेर काढू शकतात. (हि माझी अटकळ असून सदर ऑफिसर ने असे काही सांगितले नाही पण भारत नक्कीच ह्या गोष्टींत मोठी भूमिका बजावणार आहे). **अमेरिकन dhs संबंधित लोकांशी माझे बोलणे** युक्रेन मधील संकट हे पाश्चात्य देशांसाठी मानवबळाच्या दृष्टीने पर्वणी असून अनेक निर्वासित विविध देश आनंदाने घेतील अशी अटकळ अनेकांनी लावली होती पण किमान अमेरिकन दृष्टिकोनातून ती फोल ठरली आहे. विविध अमेरिकन संघटनांनी जोर लावून सुद्धा DHS ने युक्रेनियन निर्वासित किंवा अमेरिकेत साधय असेलेल्या युक्रेनियन लोकांसाठी काहीही नियोजन केले नाही. इतकेच नव्हे तर काही युक्रेनियन व्यक्ती ज्यांचे विविध प्रकारचे वीझा संपत आले आहेत त्यांना सुद्धा देशांत आणखीन थोडा काळ राहण्यासाठी काहीही पावले आपण उचलणार नाही असेच DHS ची भूमिका राहील असे मला सांगण्यात आले. अर्थांत माझे काँटॅक्ट्स अतिशय खालच्या लेव्हल चे आहेत. **नाटो ची भूमिका** माझ्या लेबनॉन बेस्ड सुरक्षा निरीक्षक मित्राच्या माहिती प्रमाणे (ह्याला विविध व्यावसायिक उपग्रह फुटेज चा ऍक्सेस आहे) नाटो ने युक्रेन प्रकरण जिव्हारी लावून घेतले आहे. सध्या फ्रांस आणि अमेरीका हि दोन राष्ट्रे सोडल्यास आणि ब्रिटिश नेव्ही सोडल्यास इतर कुठल्याही नाटो देशाचे सैनिक कुठल्याही युद्धासाठी सज्ज नाहीत. त्यांच्याकडे पाहिजे ती सामुग्री नाही आणि असली तरी युक्रेन रशिया प्रदेशांत लष्करी कारवाईसाठी ज्या प्रकारची तयारी लागते ती नाही. हे सर्व हि मंडळी आधी मान्य करत नव्हती पण आता हि गोष्ट त्यांना मान्य करावीच लागत आहे. त्यामुळे अमेरिका आणि फ्रांस ने पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणावर लष्करी सज्जता संपूर्ण युरोप मध्ये निर्माण करायचे ठरवले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत युद्ध पेटले नाही तरी नाटो सर्वत्र विमाने, जहाजे पायदळ विनाकारण तरी फिरवेल (म्हणे). त्याशिवाय अमेरिकेने म्हणे डिसेम्बर पासून युक्रेन मध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात शस्त्रात्रे पाठवली आहे. ह्यांत javelin अँटी टॅंक क्षेपणास्त्रे, ऑटोमॅटिक रायफल्स, स्कोप्स, नाईट व्हिजन यंत्रे इत्यादी आहेत. त्याशिवाय उपग्रह फोन, उपग्रह इंटरनेट यंत्रणा इत्यादी सुद्धा पाठवली आहे. माझ्या मित्राच्या मते, अमेरिकेने प्लॅन Z च्या खाली आपल्या काही विशेष फोर्सेस ना युक्रेन मध्ये मागल्या वर्षी पाठवले होते (म्हणे). त्यांनी काही युक्रेनियन कमांडोना प्रशिक्षित केले होते. युद्धाच्या परिस्थितींत ह्यांचे काम रशियांत घुसून रशियाच्या काही मोक्याचा गॅस आणि तेल पाईपलाईन्स ला उडवून लावणे हे होते. हि टीम सध्या युक्रेन मध्ये कार्यरत आहे कि रशियाने ह्यांना आधीच नेस्तनाबूत केले आहे हे सध्या कुणालाच ठाऊक नाही. उपग्रह चित्रा प्रमाणे रशियाने न भूतो ना भविष्यती अश्या प्रकारचे सैन्य युक्रेन सीमेवर गोळा केले होते. साधारण म्हणे एकूण ७५% रशियन सैन्य ह्यांत आहे. काल अतिशय वेगाने रशियाने काही ठिकाणी तात्पुरती इस्पितळे उभारली आणि मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत सीमेवर वळवली त्यावरून रशियेचे अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान होत आहे असे दिसून येते. सध्या सुमारे १५,००० नाटो वाहने युक्रेन ला विविध प्रकारच्या गोष्टींचा पुरवठा करत आहे. किमान ६,०००,००० राऊंड्स ऑफ अँम्युनिशन क्यिव मध्ये पोचवण्यात आली. सुमारे १०० javelin क्षेपणास्त्रे म्हणे सध्या क्यिव मध्ये आहेत. त्याशिवाय मागील काही दिवस अर्बन युद्धतंत्र ह्या विषयावर असंख्य पत्रके नाटो ने युक्रेन मधील सैन्याला पाठवली. त्यातील काही ठळक माहिती मला माझ्या मित्राने दिली. १. क्यिव शहरांतील पूल अगदी शेवटच्या क्षणी उडविण्यात येतील. २. सर्व रस्तावरचे दिशादर्शक फलक मुद्दाम बदलण्यात येतील. ३. रणगाड्यांची रांग येताच त्यांना कसे निकामी करायचे ह्याची माहिती देण्यांत येत आहे. तर म्हणे पहिला आणि शेवटचा रणगाडा ह्यांना सर्वप्रथम उडवायचे. त्याशिवाय विविध प्रकारचे रशियन रणगाडे कसे ओळखावे आणि प्रत्येकाची कमजोरी काय हि माहिती युक्रेन मध्ये सर्वत्र पोचविण्यात आली आहे. त्याशिवाय म्हणे रणगाड्यांच्या पट्ट्याना तोडूशकणारी विशिष्ट प्रकारची तार सुद्धा युक्रेनियन जनतेला उपलब्ध करून देण्यात आली आहे. माझ्या मित्राच्या मते युद्धांतील सर्वांत महत्वाचे हत्यार हे शेवटी शिस्त आणि प्रशिक्षण असल्याने ह्या सर्व गोष्टींचा फायदा युक्रेनच्या अप्रशिक्षित जनतेला होणे कठीण आहे. सुरक्षा वर्तुळांत अजून रशिया क्यिव घेण्यात किंवा कुठल्याही युक्रेनियन शहरावर १००% काबू करण्यात यशस्वी झाली नाही ह्यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. (म्हणे). रशियाने म्हणे एकूण ११० कॅलिबर नावाची क्षेपणास्त्रे युक्रेन वर फेकली. हि जबरदस्त महागडी आणि शक्तिशाली क्षेपणास्त्रे असून रशियाकडे फारतर २००-३०० असतील असा पाश्चात्य देशांचा कयास होता. आता कदाचित हा साठा मोठा असू शकतो असे त्यांना वाटते. भारत-रशियाने संयुक्त पणे विकसित केलेला ब्राह्मोस प्लॅटफॉर्म अजिबात वापरात आला नाही. **इतर अवांतर माहिती** - अमेरिकन सरकारने झेलेन्स्की आणि त्याच्या परिवाराला देशांतून सुरक्षित अमेरिकेत आणण्याची ऑफर दिली आहे ती त्यांनी धुडकावून लावली. https://twitter.com/nntaleb/status/1497391188806012931 https://twitter.com/nntaleb/status/1497274641693487104 - जर्मनीचे गुप्तहेर प्रमुख युक्रेन मध्ये अडकून पडले होते त्यांना जर्मन स्पेशल फोर्सेस ने गुपचूप देशांत परत आणले. हल्ला अनपेक्षित झाल्याने मी अडकलो असे त्यांनी सांगितले. ह्याला तिथेच ठेवायला हवा होता असे माझे मत आहे. - बहुतेक पाश्चात्य माजी राजनेते जे रशियन कंपन्यांच्या बोर्ड वर होते त्यांनी राजीनामा दिला आहे. अपवाद फक्त जर्मनीच्या माजी चॅन्सलर ह्यांचा. पण एकूण नावे पाहता युरोपियन नेते किती भ्रष्ट आहेत हे दिसून येते. ( शरद पवार कितीही ** असले तरी काँग्रेसी फतव्याच्या विरोधांत जाऊन त्यांनी वाजपेयी ह्यांचे समर्थन आणि अभिनंदन पोखरण नंतर केले होते. )

In reply to by साहना

प्रतिसादातील पहिल्या उता-यासंबंधी. आत्ता युक्रेन कीव दुतावासातील सूचना वाचत होतो. (दुवा ) भारतीयांना तेथून काढण्याच्याबाबतीतची प्रक्रिया उशिरा सुरु झालेली दिसते. दुव्यावरील सुचनेवरुन दिनांक वीसपासून त्यांनी ही प्रोसेस सुरु केलेली दिसते. एकवीस फेब्रूवारीला तीन फ्लाईट्स च्या सुचना दिसत आहेत पण मग नंतर एअरस्पेस बंद झाल्यामुळे भारतीय प्रवास करणा-यांना दुतावासाने घरीच थांबण्याच्या राहण्याच्या आणि सतत दुतावासाशी संपर्क साधण्याच्या सुचना दिलेल्या दिसतात. अनेक विद्यार्थी रेल्वेस्थानकात अडकले. बहुतांशी लोकांना वाटले होते की हे संकट टळेल युद्ध होणार नाही. भारतातून किव येथे गेलेले इंडियाचे विमान एअरस्पेस बंद झाल्यामुळे विमान पोहचू शकले नाही अशी एक बातमी नागरीउड्डयन मंत्रालयाने दिली होती. सारांश, सर्व प्रोसेसला उशीर झाला त्यामुळे तिथे भारतीय विद्यार्थी अडकले ही गोष्ट नाही म्हटले तरी मान्य करावे लागते. अर्थात यालाही दोन बाजून असतीलच. बाकी, तपशीलवार माहिती प्रतिसाद वाचत आहे. सर्व माहितीपूर्ण आहे. मनापासून आभार. -दिलीप बिरुटे

प्रविण स्वामी: रशियाबाबत पंतप्रधान मोदींची भाषा नेहरूंपेक्षा वेगळी नाही आणि भारताला त्याची किंमत मोजावी लागेल On Russia, PM Modi's language isn't too different from that of Nehru & India will pay costs

युक्रेनमधील उलगडणाऱ्या संकटादरम्यान आज झालेल्या बैठकीमध्ये, सुरक्षा परिषदेने त्या शेजारील राज्याविरुद्ध रशियन फेडरेशनच्या लष्करी कारवाई समाप्त करण्याच्या उद्देशाने मसुदा ठराव नाकारला. अल्बानिया आणि युनायटेड स्टेट्सने सादर केलेल्या मसुद्याला 11 सदस्यांचा पाठिंबा मिळाला परंतु रशियन फेडरेशनने त्याला व्हेटो केला. चीन, भारत आणि संयुक्त अरब अमिराती हे सर्व देश तटस्थ राहिले. Meeting today amid the unfolding crisis in Ukraine, the Security Council rejected a draft resolution intended to end the Russian Federation’s military offensive against that neighbouring State. The draft, submitted by Albania and the United States, garnered support from 11 members but was vetoed by the Russian Federation. China, India and the United Arab Emirates all abstained. https://www.un.org/press/en/2022/sc14808.doc.htm
संयुक्त अरब अमिराती कसे काय तटस्थ राहीले ते कळत नाही??

In reply to by Trump

संयुक्त अरब अमिरातीचा सर्वात जास्त विश्वास मोदींवर आहे. कोणि मानो अथवा न मानो. मोदींनी सांगितले तर पाकिस्तानला सुध्दा झिडकारचील. असो.

भारताची उपस्थिती असेल तर पाकिस्तान हजर नसेल असं वक्तव्य इम्रानखानने केलं होतं. तेव्हा पाकिस्तानशिवाय परिषद भरेल असं उत्तर पाकिस्तानला देण़्यात आलं होतं.

In reply to by शाम भागवत

भाऊ तुमची तुलना गैरलागु आहे. - जगातील मोठ्या (हिंदकेसरी, महाराष्ट्रकेसरी इ.) पैलवानांची कुस्ती चालु आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर एका गल्लीतल्या उपद्रवी भणंगाची तुलना करताय.

In reply to by Trump

तो भणंग रशियाच्या बाजूने गेलाय. सौदी अमेरिकेबरोबर असायचा. भारत तटस्थ राहिलाय म्हटल्यावर, त्यानेही कोणतीही बाजू घ्यायची नाकारली. जाऊ दे. मी काय म्हणतोय ते बरोबर की चूक हे कळायला बरीच वर्षे लागणार आहेत. कारण तेव्हा मोदी प्रेम अथवा द्वेष पूर्णपणे बाजूला ठेऊन विचार केला जाऊ शकेल असे वाटते. तो पर्यंत जिवंत असेन तर थांबेन म्हणतो. ;)

In reply to by शाम भागवत

पण मोदी रशियाची तळी उचलून UAE ला पटवायला जातीलच कशाला ? भारताला रशियाला दुखावणे शक्य नाही म्हणून भारताने मत दिले नाही, त्यात रशियाचे समर्थन मला तर दिसले नाही. आणि भारताचा मत देण्यामध्ये स्वतःस धक्का न लागू देण्याचा पवित्र आहे, तसा UAE चा काय इंट्रेस्ट आहे हे पाहायला हवे. मोदींनी सांगितले म्हणून UAE ने मत दिले नाही किंवा मोदींचे अनुकरण UAE ने केले हे फार अतिसुलभीकरण आणि वस्तुस्थितीशी न जुळणारे वाटले. UAE चे सुद्धा काही हितसंबंध असतील, ते जाणून घ्यायला ट्रम्प यांच्याप्रमाणे मला सुद्धा आवडतील. मताचा आदर आहेच.

In reply to by कॉमी

तसंही, रशिया व्हेटोच करणार असल्याने एकूण ठरावाला अर्थ कमीच होता. असे असताना श्री मोदी यांनी uae ला समजावले किंवा uae ने मोदींचे अनुकरण केले असे वाटत नाही.

रशिया ला UAE ला दुखवायचे नाही. अफगाणिस्तान ,इराक,मध्ये अमेरिके नीच दहशत वादी निर्माण केले . अमेरिका हा विश्वास ठेवण्यास योग्य देश नाही आणि उघड विरोध करून शत्रुत्व घेण्यात शहाणपण नाही. म्हणून अलिप्त राहणे हा पर्याय स्वीकारला जातो.

आत्ता पर्यंत साधारण एक लाख युक्रेनियन नागरिकांनी पोलंडची बॉर्डर क्रॉस केली आहे.युक्रेन मध्ये इतर देशातुन दारुगोळा हत्यारे इत्यादी याचा पुरवठा वाढला आहे. रशियन Topol-M या आयसीबीएमची मॉस्को मध्ये मुव्हमेंट पाहण्यात आलेली आहे. SWIFT बँकिंग सिस्टीम मधुन रशियाला डच्चु देण्यासाठी आता विविध देश आग्रह धरु लागले आहेत. आता रशिया आणि रशिया विरोधी यांच्यात फॉरेन फंड ब्लॉक करण्यावरुन शर्यत सुरु होईल असे दिसते.रशियाचा विरोधात आपण गेलो तर रशियन हॅकर्स त्यांचे पावरग्रीड कोलॅप्स करतील अशी अमेरिकेत असल्याचे समजते. [ टोटल ग्रीड फेल्युअर म्हणजे केवळ हाहाक्कार ] रशियन तेल ज्या ऑईल टॅ़कर्स मधुन रशिया बाहेर पाठवले जाते त्या ऑइल टँकर कंपन्या सॅक्शन लागण्याच्या भीतीने निदान सध्य काळात तरी वेट अ‍ॅड वॉच मोडवर जातील आणि याचा परिणाम स्वरुप कच्च्या तेलाचे भाव अधिक वेगाने वाढु शकतात [ स्ट्रॅटिजिक ऑइल रिझर्व्ह मधुन मोठे देश काही काळ ऑइल रिलीज करुन या भाव वाढीचा मुकाबला करतील, पण लहान देशांची एकंदर बुच्चण लागु शकते.] रशियन मिलेटरीची वाहने/ टँक्स यांच्यावर Z हे इंग्रजी अक्षर [ रशियन भाषातील नव्हे ] काढल्याचे समजते. आपल्या आणि शत्रु च्या ताफ्यात चटकन फरक करण्यासाठी याचा उपयोग होतो, तसेच कुठल्या विभागातली वाहने आहेत हे मिडियात येत असलेल्या फुटेजवरुन देखील हे पटकन ओळखण्यासाठी वापरले जाऊ शकते. युरोपियन देशात आपपासात भांडणे सुरु होण्यासाठी / लागण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आता कोणाची डोकी कोणत्या दिशेला वळत आहेत, ती कशी चालवली जात आहेत,कोणाचा कुठे कुठे स्वार्थ आणि कोणाचे कुठे कुठे हितसंबंध गुंतले आहेत ते अधिक उघड होईल. पुतीनसाठी हे युद्ध लवकर संपणे गरजेचे आहे, हे युद्ध जितके लाबेल तितका अधिक रक्तपात होत जाईल आणि युक्रेनच्या बाजुने अधिकची सहानभुतीची लाट निर्माण करुन त्याचा रशिया विरोधात वापर केला जाईल जे अर्थातच पुतीनला नको असणार. या युद्धा बद्धल रशियन दृष्टीकोन :- युक्रेन हा रशियाला मोठा धोका आहे. [ क्लोज टु मॉस्को आणि सेंट.पीटर्सबर्ग ]त्यामुळे तो नाटो मध्ये सहभागी होऊ नये आणि तसे होऊन आमच्यावर शस्त्रास्त्र रोखली जाऊन नयेत. युक्रेनला रशियाने या आधी आर्थिक मदत केलेली आहे आणि युक्रेन कडुन अजुन ५ बिलियनची थकबाकी येणे आहे.१९९० मध्ये त्यांनी युक्रेनला वेपन्स आणि मशिनरी देऊ केली होती आणि तुम्ही कधीच नाटो जॉइन करु नका अशी अट / मागणी ठेवली होती. युक्रेन ने मात्र अमेरिकेशी सलगी केली आणि आम्हाला धोका उत्पन्न होईल असे वर्तन सुरु केले.युक्रेन मध्ये अनेक लोक / रशियन / रशियन भाषिक आहेत ज्यांना रशियात परत भाग व्हावे असे वाटत आहे. एकदा पुतीन ने ओबामाला [ २०१० ] विचारले होते की मेक्सिको अथवा कॅनडात अमेरिका विरोधात वेपन्स डिप्लॉय केले गेलेली चालतील का ? ओबामा अर्थातच नाही म्हणाला म्हणुन स्वतःच्या देशाच्या दोन महत्वपुर्ण शहरांचे रक्षण हे पुतीनचे परम कर्तव्य ठरते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे | वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे || कवी वाल्मीकीसारिखा श्रेष्ठ ऐसा |नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ||

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे | वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे || कवी वाल्मीकीसारिखा श्रेष्ठ ऐसा |नमस्कार माझा सदगुरु रामदासा ||

ज्या गतीचे रशियन फौजा युक्रेनमधुन जात, किइवला पोचल्या त्यामुळे त्यांना कोणताही प्रतिकार होताना दिसत नाही. आंतरजालावर हातघाईच्या लढाईचे कोणतेच व्हिडिओ उपलब्ध नाहीत. त्यामुळे रशियन फौजाचे नुकसान म्हणजे नाटोवाल्यांचे बहुतेक मनोयुध्द्द असा प्रकार असावा.

In reply to by Trump

युक्रेनियन लोक फार तर आणखीन ४८ तास तग धरू शकतील दारुगोळ्यापेक्षा पाणी आणि अन्न ह्यांची कमतरता त्यांना जाणवेल. अजून एकही शहरावर रशियाचा १००% ताबा नाही प्रत्येक ठिकाणी त्यांना अटकाव होत आहे. क्यिव वर सर्वांत आधी ताबा मिळवण्याचा त्यांचा मनसुबा अजून तरी फोल ठरला आहे. दोन Ilyushin Il-76 [१] विमाने पडली गेली हे रशिया साठी धक्कादायक आहे आणि सर्वानाच हि बातमी कदाचित युक्रेनियन प्रोपागंडा असावी असे वाटले होते पण सध्या वेवेगळ्यऊ माध्यमांनी आणि देशांनी ह्या बातमीला दुजोरा दिला आहे. आपल्या अमेरिकन ग्लोबमास्तर प्रमाणे हि महा प्रचंड विमाने असून त्यांत साधारण १००-२०० सैनिक असू शकतात. मी आधी वर्तवलेल्या भाकिता प्रमाणे : १. रशियन सैन्य हे बेशिस्त आणि ढिसाळ दिसून येत आहे. त्यांची DEAD आणि SEAD क्षमता फारच कमी होती आणि अजून युक्रेनियन वायुदल क्यिव मध्ये कार्यरत आहे. अनेक रशियन सैनिक हे जबरदस्तीने भरती केलेले सैनिक आहेत आणि नक्की आपण कुठल्या मिशन वर जात आहोत ह्याची माहिती त्यांना आधी नव्हती असे पकडलेल्या सैनिकावरून दिसून येत आहे. काही रशियन सैनिक आणि रणगाडे वाट चुकून आणि डिझेल संपून अडकून राहिले आहेत असे दिसून येत आहे. एका रशियन सैनिकाच्या रेडिओ मेसेजेस वर "नक्की कुणाला मारायचे आहे ? सर्वच लोक आपले लोक वाटत आहेत" असा संदेश लोकांनी ऐकला. २. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की ह्यांची प्रतिमा उजळून निघाली आहे. शेवट काहीही झाला तरी पुसी तृदेव किंवा बारीक सारीक गोष्टीवर आपल्या बंकर मध्ये लपून बसणाऱ्या ट्रंम्प-बायडन पेक्षा झेलेन्स्की हे खरे नेते वाटतात. कॉमेडियन नेता झाला आणि नेते विदुषक झाले अश्या प्रकारचे मिम वायरल झाले होते त्यांत तथ्य आहे. ३. पुतीन ह्यांना कदाचित २४ तासांत विजयाची अपेक्षा असावी. झेलेन्स्की पळून जातील आणि नेतृत्वहीन युक्रेनियन आर्मी शस्त्रे टाकून देतील आणि नाटो भेटून निर्बंध टाकण्याच्या आधी युक्रेन मध्ये आपली कठपुतळी उपस्थित करून आपण माघार घेऊ कदाचित असा पुतीन ह्यांचा होरा असावा. हिटलर च्या शेवटच्या काही आठवड्याप्रमाणे कदाचित रशियन मिलिटरी नेतृत्वाने घाबरून पुतीन ह्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली नसावी. पुतीन ह्यांनी ज्या प्रकारे जाहीर रित्या आपल्याच अधिकाऱ्यांना सार्वजनिक रित्या सुनावले किंवा ज्या पद्धतीने पुतीन ह्यांना घाबरून सर्व लोक उभे होते त्यावरून पुतीन हे कदाचित एकटे पडले असावेत असे वाटते. ४. भारत सारख्या देशांत कितीही मोठी निदर्शने झाली तरी त्यावरून ती बहुसंख्य जनता आहे असे आम्ही म्हणून शकत नाही पण रशिया सारखे देश उलट आहेत. इथे छोटी निदर्शने सुद्धा मोठ्या असंतोषाचे निदर्शक आहेत. ज्या पद्धतीने संपूर्ण रशियांत उस्फुर्त पणे पुतीन ह्यांच्या विरोधांत निदर्शने होत आहेत आणि पुतीन ह्यांचा अधिकाऱ्यांची मुलेच ज्या पद्धतीने माध्यमावर युद्धाची टीका करत आहेत त्यावरून पुतीन ह्यांचे दिवस भरले आहेत असे मला वाटते. ५. पुतीन ह्यांनी आपल्या जनरल मंडळींवर दबाव टाकला असेल आणि त्यांनी घिसाडघाईने निर्णय घेतले असावेत आणि त्याच्या नादांत आपलेच तरुण सैनिक विनाकारण मारले जातील ह्याची पर्वा केली नाही. म्हणूनच Ilyushin Il-76 सारखी विमाने ह्यांनी विना SEAD शत्रू प्रदेशांत पाठवली आणि गमावली. ह्या गोष्टींनी रशियन सैन्याचे मनोबल कमालीचे खालावणार आहे. उद्या क्यिव पडले तरी रशियन सैन्य हे जास्त काळ इथे राहू शकणार नाही आणि पुतीन ह्यांचे कठपुतळी सरकार सुद्धा युक्रेन चा ताबा ठेवू शकेल असे वाटत नाही. मुख्य म्हणजे रशियन अकार्यक्षमता, सैन्याची बेशिस्त आणि खालावलेले मनोबल, पुतीन ह्यांच्यावर सामान्य रशियन्स ना असेलेला राग हे सर्व आता सार्वजनिक झाले आहे. ह्याचे दूरगामी परिणाम आता जगावर होतील. [१] https://theaviationist.com/2022/02/26/two-il-76s-shot-down-in-ukraine/

In reply to by साहना

धन्यवाद प्रतिसादांबद्दल. खालील प्रतिसाद आंतरजालिय माहीती, आणि मित्रमंडळीशी केलेल्या चर्चेचे फलित आहे. ती माझी मते किंवा विश्लेषण म्हणुन घ्यावीत. १.
रशियन सैन्य हे बेशिस्त आणि ढिसाळ दिसून येत आहे. त्यांची DEAD आणि SEAD क्षमता फारच कमी होती आणि अजून युक्रेनियन वायुदल क्यिव मध्ये कार्यरत आहे.
रशियाने सुरवातीला सौम्य शस्त्रांचा मारा केला असे दिसते. जसा जसा विजय मिळवयला वेळ लागेल तशी त्याची संहारकता वाढत जाईल. अजुन तरी विमानातुन बॉम्बफेक सुरु केल्याचे दिसत नाही. कदाचित लवकरात लवकर आणि कमीत कमी नुकसानीमध्ये विजय मिळवुन ध्येय साध्य करणे अशी योजना दिसते. विमानातुन बॉम्बफेक केली तर जिवीत आणि वित्तहानी भरपुर होईल, जशी जशी हानी वाढेल तसा युक्रेनच्या जनतेचा विरोध वाढेल. विजय मिळाल्यानंतर पुनर्बांधणीसाठी ज्या प्रमाणात नुकसान तिककाच पैसा गुंतवावा लागेल.
अनेक रशियन सैनिक हे जबरदस्तीने भरती केलेले सैनिक आहेत आणि नक्की आपण कुठल्या मिशन वर जात आहोत ह्याची माहिती त्यांना आधी नव्हती असे पकडलेल्या सैनिकावरून दिसून येत आहे. काही रशियन सैनिक आणि रणगाडे वाट चुकून आणि डिझेल संपून अडकून राहिले आहेत असे दिसून येत आहे. एका रशियन सैनिकाच्या रेडिओ मेसेजेस वर "नक्की कुणाला मारायचे आहे ? सर्वच लोक आपले लोक वाटत आहेत" असा संदेश लोकांनी ऐकला.
गेल्या २ महीन्यामध्ये इतका परस्परविरोधी आरडाओरडा झाला आहे की त्यांचा गोधळ उडाला नसेल तर मोठी गोष्ट. डिझेल संपणे वैगरे छोटी बाब. एकाद-दुसर्‍या गोष्टीने पुर्णपणे रसद अपुरी आहे किंवा नियोजन अपुर्ण आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. रशियन, युक्रेनियन लोक बरेचसे एकसारखे दिसतात आणि त्यांच्यातील भेद करणे मुश्कील आहे. त्यामुळे गनिमी कावा (false flag) ची शक्यता समजुन पुन्हा कोणावर हल्ला करायचा आहे विचारणे आणि खात्री करणे चुकीचे नाही. चुकुन आपल्याच लोकांना (friendly fire) मारण्याचे किस्से भरपुर आहेत. https://en.wikipedia.org/wiki/List_of_friendly_fire_incidents
२. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की ह्यांची प्रतिमा उजळून निघाली आहे. शेवट काहीही झाला तरी पुसी तृदेव किंवा बारीक सारीक गोष्टीवर आपल्या बंकर मध्ये लपून बसणाऱ्या ट्रंम्प-बायडन पेक्षा झेलेन्स्की हे खरे नेते वाटतात. कॉमेडियन नेता झाला आणि नेते विदुषक झाले अश्या प्रकारचे मिम वायरल झाले होते त्यांत तथ्य आहे.
मला तरी १५ मिनीटाची प्रसिध्दी वाटते. त्यांचे भविष्य युध्द कश्या वळणावर जाते, किती नुकसान होते, श्री पुतीन जिंकल्यानंतर काय मागण्या करतात, युक्रेनला किती जाच करतात त्यावर अवलंबुन आहे. कोणत्याही नेत्याचे पहीले काम स्वता:च्या देशाला आणि जनतेला सुरक्षित ठेवणे हे आहे. दुर्देवाने श्री झेलेन्स्की ते करु शकले नाहीत. श्री बायडन किंवा श्री ट्रंप यांच्याबरोबरची तुर्तास नकोच, एक वर्षानंतर बघुया. https://en.wikipedia.org/wiki/15_minutes_of_fame
३. पुतीन ह्यांना कदाचित २४ तासांत विजयाची अपेक्षा असावी. झेलेन्स्की पळून जातील आणि नेतृत्वहीन युक्रेनियन आर्मी शस्त्रे टाकून देतील आणि नाटो भेटून निर्बंध टाकण्याच्या आधी युक्रेन मध्ये आपली कठपुतळी उपस्थित करून आपण माघार घेऊ कदाचित असा पुतीन ह्यांचा होरा असावा.
२४ तासांत विजयाची अपेक्षा नसावी. कारण ज्या पध्दतीने युरोपियन आणि तत्सम युक्रेनपाठीमागे उभे होते किंवा उभे राहण्याच्या बाता मारत होते त्याप्रमाणे तसा समज श्री पुतीन करुन घेणार नाहीत. लोकशाहीमध्ये निर्णयाला वेळ लागतो, अशी समज त्यांना नक्कीच असावी. आणि युक्रेनच्या मदतीला येणार ते कोणत्या कायदेशीर पार्श्वभुमीवर तो प्रश्न आहे. आधी युएन सुरक्षा समिती, नंतर सर्वसाधारण सभा अशे टप्पे ओलांडायला लागतात. जर रशियावर कायदे / संकेत मोडल्याचा आरोप करायचा तर कमीत कमी तेच संकेत पाळायला नकोत का, किमान तसे नाटक तरी नको का करायला!
हिटलर च्या शेवटच्या काही आठवड्याप्रमाणे कदाचित रशियन मिलिटरी नेतृत्वाने घाबरून पुतीन ह्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली नसावी. पुतीन ह्यांनी ज्या प्रकारे जाहीर रित्या आपल्याच अधिकाऱ्यांना सार्वजनिक रित्या सुनावले किंवा ज्या पद्धतीने पुतीन ह्यांना घाबरून सर्व लोक उभे होते त्यावरून पुतीन हे कदाचित एकटे पडले असावेत असे वाटते.
तसे वाटत नाही. श्री हिटलरच्या शेवटच्या दिवसांची तुलना गैरलागु आहे. स्टॅलिनग्राड आणि नार्मेडीनंतर जवळपास जर्मनी हरणार हे सगळ्यांना माहिती होते. युक्रेनचे युध्द रशिया जिंकणार हे तुम्हीच स्वतःच बर्‍याच ठिकाणी लिहीले आहे. हे नक्कीच रशियन सैन्यधिकार्‍यांना समजत असेल.
४. भारत सारख्या देशांत कितीही मोठी निदर्शने झाली तरी त्यावरून ती बहुसंख्य जनता आहे असे आम्ही म्हणून शकत नाही पण रशिया सारखे देश उलट आहेत. इथे छोटी निदर्शने सुद्धा मोठ्या असंतोषाचे निदर्शक आहेत. ज्या पद्धतीने संपूर्ण रशियांत उस्फुर्त पणे पुतीन ह्यांच्या विरोधांत निदर्शने होत आहेत आणि पुतीन ह्यांचा अधिकाऱ्यांची मुलेच ज्या पद्धतीने माध्यमावर युद्धाची टीका करत आहेत त्यावरून पुतीन ह्यांचे दिवस भरले आहेत असे मला वाटते.
म्हणजे रशियामध्ये पण लोकशाही आहे, जरी ती तथाकथित मुक्त जगाला मान्य नसली तरी. :) असो. असल्या टिका चार दिवस चालतात. जी लोक युध्दांच्या बाजुने ती शक्यतो निदर्शने करण्याच्या भानगडीत पडणार नाही.
५. पुतीन ह्यांनी आपल्या जनरल मंडळींवर दबाव टाकला असेल आणि त्यांनी घिसाडघाईने निर्णय घेतले असावेत आणि त्याच्या नादांत आपलेच तरुण सैनिक विनाकारण मारले जातील ह्याची पर्वा केली नाही. म्हणूनच Ilyushin Il-76 सारखी विमाने ह्यांनी विना SEAD शत्रू प्रदेशांत पाठवली आणि गमावली.
ही शक्यता बरोबर वाटते आहे. विमाने पडणे म्हणजे बहुतेक अतिआत्मविश्वास, शंत्रुला कमी लेखणे किंवा घिसडघाई दिसते.
ह्या गोष्टींनी रशियन सैन्याचे मनोबल कमालीचे खालावणार आहे. उद्या क्यिव पडले तरी रशियन सैन्य हे जास्त काळ इथे राहू शकणार नाही आणि पुतीन ह्यांचे कठपुतळी सरकार सुद्धा युक्रेन चा ताबा ठेवू शकेल असे वाटत नाही. मुख्य म्हणजे रशियन अकार्यक्षमता, सैन्याची बेशिस्त आणि खालावलेले मनोबल, पुतीन ह्यांच्यावर सामान्य रशियन्स ना असेलेला राग हे सर्व आता सार्वजनिक झाले आहे. ह्याचे दूरगामी परिणाम आता जगावर होतील.
मनोबल ते आणि अधिकारी किती तयार आहेत त्यावर आहे. रशियन सैनिक युक्रेनियन लोकांचा द्वेष करत नाही. २-३ विडिओमध्ये युक्रेनियन जनता येऊन तोंडवर सुनावताना आढळलेत तरी रशियन सैनिक संयम ठेऊन आहेत, सदर संवाद आदरपुर्ण आहे. पुतीन यांच्यावर सर्वसामान्य जनतेचा विश्वास नाही किंवा राग आहे, हे मत चुकीचे आहे. रशियन जनतेने सोवियत युनियन कोळल्यानतंर झालेले हाल, युरोपियन देशांनी विनाकारण केलेली ससेहोलपट बघितली आहे. कोणतीही जनता नेता जिंकत असताना किंवा जिंकण्याची शक्यता असताना नेत्याबरोबरच असते.

ह्याचा अर्थ रशियन सेना बेशिस्त आहे,त्यांना लढायच व अनुभव असा त्याचा अर्थ नाही अजून एक पण ताब्यात आले नाही. ह्याचा अर्थ युक्रेन टक्कर देत आहे असा पण त्याचा अर्थ नाही. कमीत कमी विनाश होणारी शस्त्र रशिया वापरत आहे जेणे करून कमी मनुष्य हानी व्हावी. युक्रेन काय एका तासात शरण येईल. प्रचंड विनाश करणारी शस्त्र रशिया नी वापरायला प्राधान्य दिले तर . काश्मीर मध्ये कारवाई करताना भारताला पण सैनिक गमवावे लागतात दोन तीन अतिरेकी मारण्यासाठी. त्याचा अर्थ भारतीय सैन्य लढण्यास सक्षम नाही असा त्याचा अर्थ नसतो कमीत कमी बळ,आणि हल्या करताना संयम सैनिकांना ठेवा लागतो.कारण भूमी आपलीच असते.

रशियन सैन्य खार्किवमध्ये घुसले. ०२/२७/२०२२ --------------- अभ्यासु लोकांनी सदर युक्रेनियन वाहिनी पहावी. भरपुर साहित्य आहे. https://www.youtube.com/user/obozrevatelcom/videos?view=0

In reply to by Trump

युक्रेनमधील रशियन युद्ध - कीव: युक्रेनियन आणि रशियन सैन्यामध्ये जोरदार संघर्ष • खार्किव: शेल ----------------- उत्तम विडिओस https://www.youtube.com/c/WarLeaker/videos

भारत युक्रेन आणि रशिया ह्यांच्या संदर्भांत काही चुकीच्या अफवा व्हात्साप्प वर फिरत आहेत त्यांचे खंडन : मिथ्या : १९९८ मध्ये युक्रेन UNSC चा सदस्य होता आणि त्याने भारताच्या विरोधांत वोट दिला (पोखरण टेस्ट्स नंतर). सत्य: ११९८ मध्ये युक्रेन UNSC चा सदस्य नव्हता. रशिया ने त्यावेळी भारताच्या विरोधांत मत दिले होते आणि भारताला ४ गोष्टी ऐकवल्या सुद्धा होत्या. युक्रेन ने ह्याच्या उलट भारत पाकिस्तान ने न भांडता स्टेटस क़उओ ठेवावा असे वेगळे स्टेटमेंट दिले होते. मिथ्या: युक्रेन पाकिस्तानला हत्यारे पुरवतो . सत्य : युक्रेन ने काही प्रमाणात पाकिस्तानला शस्त्रास्त्रे विकली असली तरी भारत हा युक्रेन चा मोठा ग्राहक असून पाकिस्तान पेक्षा कैक पटीने जास्त शस्त्रास्त्रे भारत युक्रेन कडून घेतो.

In reply to by साहना

कृपया संदर्भ द्यावेत.
११९८ मध्ये युक्रेन UNSC चा सदस्य नव्हता. रशिया ने त्यावेळी भारताच्या विरोधांत मत दिले होते आणि भारताला ४ गोष्टी ऐकवल्या सुद्धा होत्या. युक्रेन ने ह्याच्या उलट भारत पाकिस्तान ने न भांडता स्टेटस क़उओ ठेवावा असे वेगळे स्टेटमेंट दिले होते.
कृपया संदर्भ द्यावेत. मी आंतरजालावर शोधतो आहे. जुन्या काळातील असल्याने मिळायला अडचणी येत आहेत. येथे मला माहीती मिळाली. रशियाचे मत गोल-गोल आणि कुंपणावरचे वाटत आहे. जरी तो प्रथम दर्शनी विरोधात वाटत असला तरी कोणतेही निर्बंध लादायला समर्थन केलेले नाही. माझा संदर्भः अधिकृत प्रतिसाद
11 आणि 13 मे रोजी झालेल्या भारताच्या अणुचाचण्यांमुळे रशियन धोरणकर्त्यांना कोंडीत पकडले गेले. त्याच्या अधिकृत प्रतिसादात मॉस्कोने निःसंदिग्धपणे चाचण्यांवर टीका केली. राष्ट्राध्यक्ष येल्तसिन यांनी "भारताने आम्हाला निराश केले आहे." रशियन परराष्ट्र मंत्रालयाने 12 मे रोजी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात भारताच्या कारवाईबद्दल "धोका आणि चिंता" आणि "रशियामध्ये अत्यंत खेद" व्यक्त केला आहे. निवेदनात भारताने आपले आण्विक धोरण मागे घेण्याचे आणि NPT आणि CTBT वर स्वाक्षरी करण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या धोरणामुळे दक्षिण आशिया आणि त्यापुढील भागात साखळी प्रतिक्रिया येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली. हे खरं तर, या विषयावरील सर्व रशियन घोषणांचे लीटमोटिफ बनले. परराष्ट्र मंत्री येवगेनी प्रिमकोव्ह यांनी टिप्पणी केली की अणुस्फोट करण्याचा भारताचा निर्णय "अदूरदर्शी" आणि रशियाच्या दृष्टीने "अस्वीकार्य" होता. त्यांना वाटले की भारत-पाकिस्तान संघर्षाचा गंभीर धोका आहे आणि ते पुढे म्हणाले, "आम्ही विशेषत: पाकिस्तानने भारताच्या पावलावर पाऊल ठेवू इच्छित नाही." अनन्य आणि नवीन प्रवेशकर्त्यांना परवानगी देऊ नका. NPT नुसार ज्या राज्यांकडे अण्वस्त्रे आहेत किंवा 1 जानेवारी 1967 पूर्वी अण्वस्त्रांचा स्फोट झाला आहे अशा राज्यांनाच अण्वस्त्रधारी राष्ट्रे म्हणून मान्यता देण्यास भारत आणि पाकिस्तानची तयारी नाही. पण, त्याच वेळी, मॉस्कोने अगदी सुरुवातीपासूनच स्पष्ट केले - अमेरिकेच्या धोरणाच्या विरुद्ध - भारतावर निर्बंध लादण्यास आपला विरोध आहे. प्रतिबंध केवळ प्रतिउत्पादक सिद्ध होऊ शकतात. भारताच्या आण्विक धोरणात बदल घडवून आणण्यासाठी मॉस्को मुत्सद्देगिरीवर अवलंबून असेल. नागरी आण्विक क्षेत्रात रशियाचे भारतासोबतचे सहकार्य कायम राहील, अशी घोषणा करण्यात आली. या वर्षाच्या अखेरीस राष्ट्राध्यक्ष येल्तसिन यांचा भारत दौरा नियोजित आहे. अण्वस्त्र चाचण्या बहुविध भारत-रशिया सहकार्याच्या मार्गात येणार नाहीत हे लवकरच स्पष्ट झाले. 14 मे रोजी - भारताने दुसऱ्यांदा अण्वस्त्र चाचणी घेतल्याच्या एका दिवसानंतर - दोन्ही देशांमधील तांत्रिक आणि वैज्ञानिक सहकार्याची देखरेख करणारी संयुक्त भारत-रशियन परिषदेची परिषद मॉस्को येथे सद्भावना आणि मैत्रीच्या वातावरणात सुरू झाली. कौन्सिलचे रशियन सह-अध्यक्ष, अकादमीशियन मार्चुक यांनी उच्च-स्तरीय संपर्क आणि सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले. 2 मे 15 रोजी, रशियन नौदलाचे कमांडर-इन-चीफ व्लादिमीर कुरोयेडोव्ह यांनी सांगितले की, अ‍ॅडमिरल गोर्शकोव्ह या युद्धनौकेवरून भारताला खूप महत्त्व आले. येत्या शरद ऋतूमध्ये रशियन युद्धनौका भारतीय नौदलासोबतच्या संयुक्त सरावात भाग घेतील याची पुष्टीही कुरोयेदोव्ह यांनी केली. ते पुढे म्हणाले, "आम्ही भारताला विशाल हिंद महासागरातील एक उत्तम मैत्रीपूर्ण भागीदार मानतो." रशियाने भारताला आणखी अण्वस्त्र पाणबुड्या देऊ केल्या होत्या.३ मे १९८८ मध्ये रशियाचे अणुऊर्जा मंत्री येवगेनी अदामोव्ह हे भारताच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती देण्यात आली. तामिळनाडूतील कुडनकुलम येथील अणुऊर्जा प्रकल्प.4 अशा प्रकारे, मॉस्कोने स्पष्ट संकेत दिले की अणुप्रश्नावर मतभेद असले तरीही भारतासोबत नेहमीप्रमाणेच व्यापार होईल. भारताचा अण्वस्त्र-सामरिक कार्यक्रम पूर्णपणे स्वदेशी असून रशियन लष्करी अणुतंत्रज्ञान भारताला हस्तांतरित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही मॉस्कोने स्पष्ट केले. Official Response India's nuclear tests on May 11 and 13, therefore, put Russian policy-makers on the horns of a dilemma. In its official response Moscow unequivocally criticised the tests. President Yeltsin lamented that "India has let us down." The official statement issued by the Russian Foreign Ministry on May 12 expressed "alarm and concern" and "very deep regret in Russia" over the Indian action. The statement urged India to reverse its nuclear policy and sign the NPT and CTBT. An apprehension was expressed that India's policy may lead to a chain reaction in South Asia and beyond. This, in fact, became the leit motif of all Russian pronouncements on the subject. Foreign Minister Yevgeny Primakov remarked that India's decision to carry out nuclear explosion was "short-sighted" and "unacceptable" as far as Russia was concerned. He felt that there was a serious risk of India-Pakistan conflict and added, "We especially would not want Pakistan to follow in India's footsteps."1 Moscow is one with other P-5 countries in their desire to keep the nuclear club small and exclusive and not allow new entrants. It is not prepared to recognise India as well as Pakistan as nuclear weapon states as according to the NPT only those states which had nuclear-weapons or had exploded a nuclear device prior to January 1, 1967, can be regarded as nuclear weapon states. But, at the same time, Moscow made it clear from the very outset--in contrast to the US policy--that it is opposed to imposing sanctions against India. Sanctions may only prove to be counter-productive. Moscow would rely on diplomacy to try to bring about a change in India's nuclear policy. It was announced that Russia's cooperation with India in the civilian nuclear sector would continue. President Yeltsin's scheduled visit to India later this year also stands. It soon became clear that the nuclear tests would not come in the way of multifarious Indo-Russian cooperation. On May 14--just a day after India tested the nuclear device the second time--the conference of Joint Indo-Russian Council that oversees technical and scientific collaboration between the two countries opened in Moscow in an atmosphere of goodwill and friendship. The Russian Co-Chairman of the Council, Academician Marchuk, called for an intensification of high-level contacts and cooperation.2 On May 15, the Commander-in-Chief of the Russian Navy, Vladimir Kuroyedov was reported to have said that the handing over the warship Admiral Gorshkov to India was very much on the cards. Kuroyedov also confirmed that Russian warships would take part in the joint exercises with the Indian Navy in the coming autumn. He added, "We regard India as a great friendly partner in the vast Indian Ocean." It was also reported that Russia had offered more nuclear submarines to India.3 It was made known on May 19 that Russia's Atomic Energy Minister, Yevgeny Adamov, would be visiting India shortly to sign a supplement to the agreement of 1988 on the construction of an atomic power plant in Kudankulam in Tamil Nadu.4 Thus, Moscow gave a clear signal that despite differences on the nuclear issue it would be business as usual with India. Moscow also made it clear that India's nuclear-strategic programme was purely indigenous and there was no question of transfer of Russian military nuclear technology to India. http://www.idsa-india.org/an-aug8-4.html
---------------
१९९८ मध्ये युक्रेन UNSC चा सदस्य होता आणि त्याने भारताच्या विरोधांत वोट दिला (पोखरण टेस्ट्स नंतर).
युक्रेन UNSC चा १९९८ मध्ये सदस्य नव्हता. मग UNSC https://www.un.org/press/en/1998/sc6528.doc.htm मध्ये का त्यांचा उल्लेख आहे? तुम्हाला काही कल्पना?
2017 ते 2019 पर्यंत, युक्रेनने पूर्वी 1947-48, 1984-85 आणि 2000-01 या कालावधीत युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमध्ये पूर्व युरोपीय गटातील अस्थायी सदस्य म्हणून चौथ्यांदा कार्य केले. From 2017 to 2019, Ukraine served its fourth term as a non-permanent member in the United Nations Security Council in the Eastern European Group having previously served its terms in 1947–48, 1984–85 and 2000–01. https://en.wikipedia.org/wiki/Ukraine_and_the_United_Nations
व्होलोडिमायर येल्'चेन्को (युक्रेन) म्हणाले की, त्यांच्या देशाला दक्षिण आशियाई प्रदेशात तणाव वाढवणारी आणि दोन्ही राज्यांमध्ये मोठा संघर्ष निर्माण करणारी कोणतीही कृती अस्वीकार्य असल्याचे आढळले. त्या संबंधात, युक्रेनने विवादित मुद्द्यांवर वाटाघाटी करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाच्या घोषित तयारीचे स्वागत केले आणि त्या प्रक्रियेस पाठिंबा देण्यास ते तयार होते. इतर कोणतीही कृती किंवा यथास्थिती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न अस्वीकार्य मानला जावा, असे ते म्हणाले. अशी परिस्थिती उद्भवल्यास, युक्रेन नवीनतम घडामोडी लक्षात घेऊन त्या आश्वासनांच्या नवीन वाचनासाठी, संबंधित सुरक्षा प्रदान करणाऱ्या आण्विक शक्तींशी सल्लामसलत करेल. भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या आण्विक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून या प्रदेशातील परिस्थिती आणखी चिघळू देऊ नये. VOLODYMYR YEL'CHENKO (Ukraine) said his country found inadmissable any actions that could aggravate tensions in the South Asian region and possibly cause a major conflict between the two States. In that connection, Ukraine welcomed the declared readiness of India's and Pakistan's leadership for negotiating the disputable issues and it was ready to support that process. Any other course of action or attempts to preserve the status quo should be deemed unacceptable, he said. Should that scenario take place, Ukraine would seek consultations with the nuclear Powers, which provided the relevant security, for a new reading of those assurances in view of the latest developments. India and Pakistan should put aside their nuclear ambitions and not allow the further aggravation of the situation in the region. https://www.un.org/press/en/1998/sc6528.doc.htm https://readingsexy.com/ukraine-had-once-opposed-indias-nuclear-tests-n…

In reply to by Trump

युक्रेन १९९८ मध्ये UNSC चा सदस्य नव्हता प्रूफ पहा : https://www.un.org/securitycouncil/content/countries-elected-members > युक्रेन UNSC चा १९९८ मध्ये सदस्य नव्हता. मग UNSC https://www.un.org/press/en/1998/sc6528.doc.htm मध्ये का त्यांचा उल्लेख आहे? तुम्हाला काही कल्पना? ठाऊक नाही आणि फरक पडत नाही. मूळ मुद्याशी त्याचा संबंध नाही.

बातमी खरी आहे का? प्रथमदर्शनी खरी वाटत आहे. धक्कादायक! युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण https://www.loksatta.com/desh-videsh/beating-with-indian-students-on-uk…

In reply to by Trump

यूएन मधे सपोर्ट न केल्याचा राग ते भारतीय विद्यार्थ्यांवर काढत आहेत. एव्ह्डेच काय यूएन मधिल यूक्रेन्चे राजदूतांनी अप्रत्यक्षरित्या धमकी दिली. https://www.opindia.com/2022/02/ukraine-ambassador-students-leverage-in… युक्रेन-पोलंड बोर्डर वरिल अधिकारी तेथे अनेक तास प्रवास करून, उपाशी थकून बेजार झालेल्या विद्यार्थांना "तुमचे सरकार आम्हाला सपोर्ट करत नाही, मग आम्ही का म्हाणून" असे म्हणून मारझोड करत आहेत.

युक्रेन मध्ये युद्ध चालु असताना तिथले लोक त्यांचे वर्णद्वेषी वर्तन या गंभीर स्थितीत देखील बदलु शकले नाहीत. असेच वर्तन पोलंडच्या बॉर्डरवर देखील पाहण्यात आले आहे. साऊथ आफ्रिकन वंशाच्या लोकांना वाईट वागणुक दिली जात आहे, काही ठिकाणी त्यांना ट्रेन मध्ये चढण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. रशियाच्या अनेक सरकारी वेब साईट सायबर हल्लात बंद पाडल्या गेल्या आहेत. रशियन स्टॉक मार्केट बद्धल अधिक माहिती घेत असताना [ पुतीन बहुतेक स्टॉक मार्केटचे वाटोळे होऊ शकते ही शक्यता विचारात घ्यायला विसरला की काय ? :))) ] माझ्या लक्षात आले की त्यांच्या मॉस्को एक्सचेंज चे पोर्टल सुद्धा डाऊन आहे. [https://www.moex.com/en/ ] त्यांचा बाजार ५०% खाली बसला असुन याचा फटका तिथल्या सगळ्या मोठ्या कंपन्याच्या बिझनेस आणि बिझनेस टायकुन्सला बसला आहे. या येत्या आठवड्यात रशियन सेंट्रल बँक कितपत त्यांच्या बाजाराला सांभाळेल हे पाहण्यात फार महत्वपूर्ण असणार आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाची प्रतिमा सध्या लार्जर दॅन लाईफ करण्याचा उध्योग अमेरिकन मिडिया करत आहे, कसा हा त्यांचा नेता मैदानात लढा देत उभा आहे याचे गुण वर्णन चालु आहे, पण याच नेत्यामुळे त्यांच्या देशावर आज ही वेळ येऊन ठेवली हे मात्र कोणी सांगत नाही.आपला रशिया समोर टिकाव लागु शकत नाही हे व्यवस्थित माहित असुन केवळ आणि केवळ अमेरिकेच्या फुशारकीवर मुजोरी करण्याची वृती आज हे फळ देत आहे. सोन्याची किंमत वेगाने वाढली तर बिटकॉइनची घसरली. माझ्या अनुमाना नुसार सोन्याची किंमत आता घसरु देखील शकेल आणि याला २ मुद्दे कारणीभूत ठरु शकतात. १] सोन्यात प्रोफिट बुकिंग २] परस्थिती बदलल्याने लोक कॅशसाठी सोन्याची विक्री करतील.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “At the heart of racism is the religious assertion that God made a creative mistake when He brought some people into being.” :- Friedrich Otto Hertz

In reply to by मदनबाण

भारताने आपल्या बॅटलशिप्स युक्रेन च्या किनाऱ्याला लावून सगळ्या नागरिकांना एकदमच उचलून आणायला हवं. तसाही तिथला समुद्र रशीयन्स च्या ताब्यात आहे. बरोबर साऊथ एशियन्स आणि आफ्रिकन्स ना पण आणावे. युरोपीयन्स नंतर घालू देत गोंधळ काय घालायचा ते.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

आणि नक्की कुठल्या बंदरांत बरे हि बोट लावावी ? काल आलेला एक फॉरवर्ड : मोदींची कमाल ! सरळ पुतीन आणि युक्रेन ला धमकावले. "भारतीय विद्यार्थ्यांना हात लावला तर खबरदार". भारतीय विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत हि बातमी मिळताच मोदींनी चक्रे फिरवली. सर्वप्रथम त्यांनी आपले घनिष्ट मित्र पुतीन ह्यांना फोन करून क्यिव वरील विमानहल्ले तातडीने बंद करण्यास सांगितले. पण पुतीन ह्यांनी "सध्या रशियन विमाने सुद्धा पाडली जात आहेत एअर इंडिया कसे तिथे पोचेल ?" असे आश्चर्य व्यक्त केले. पण मोदी ह्यांनी आम्हाला विमान नको फक्त २ बस मिळाल्या तरी पुरे आम्ही शेकडो विद्यार्थ्यांना बाहेर काढू असे पुतीन ह्यांना सांगितले. मग पुतीन ने सुद्धा मी बसवर बॉम्ब टाकणार नाही असे वाचन आपल्या मित्राला दिले. त्याच बाजूला मंत्री जयशंकर ह्यांनी गुगल मॅप्स वरून युक्रेन च्या बाजूला कुठले देश आहेत हे पहिले आणि कुठे बस ची व्यवस्था होईल हे पहिले आणि रोमेनिया मध्ये १० बसेस बुक केल्या. बसेस वर भला मोठा भारतीय ध्वज आणि "इंडियन स्टुडंट्स ऑनबोर्ड" असा स्टिकर लावला आणि भरधाव वेगाने बसेस क्यिव च्या दिशेने रवाना केल्या. ब्रिटिश प्रधान मंत्री बोरिस ह्यांनी मोदींना फोन करून शक्य असल्यास आपल्या काही नागरिकाना अनु शकता का अशी विचारणा केली त्यावर नक्की आणू पण बसायला मिळणार नाही असे ठणकावून सांगितले. त्यानंतर २४ तासांत १० बसेस भरून विद्यार्थी रोमानियांत आणले गेले. काही ठिकाणी आक्रमक रशियन रणगाड्यांनि बाजूला सरून बसेस ला जायला वाट दिली असे मराठी विद्यार्थी अनन्या कोरे ह्यांनी वृत्तपत्रांना सांगितले. रोमेनिया मध्ये अनेक एअर इंडिया विमाने विद्यार्थ्यांना घेऊन मग देशांत परत आली. धन्य आहे भारत मातेचा असा पुत्र. काही वर्षे आधी भारताच्या प्रधानमंत्र्यांकडे इतकी ताकद असेल असे कुणालाही वाटले नसेल. म्हणूनच युक्रेनच्या राजदूतांनी भारताला पुतीन कडे बोलण्याचे साकडे घातले आहे.

In reply to by साहना

हसून हसून वाट लागली. ब्रिटिश प्रधान मंत्री बोरिस ह्यांनी मोदींना फोन करून शक्य असल्यास आपल्या काही नागरिकाना अनु शकता का अशी विचारणा केली त्यावर नक्की आणू पण बसायला मिळणार नाही असे ठणकावून सांगितले. हे तर कहर होतं.

In reply to by साहना

व्हाट्सअप्प बद्दल काही माहिती नाही, पण ओडेसा, सेव्हस्टपोल अशी बंदरे युक्रेन मध्ये आहेत. क्रिमिया ला प्रचंड सागरकिनारा आहे. रशियन यंत्रणेबरोबर जर चांगले संबंध असतील तर समुद्रमार्गे लोकांना बाहेर काढणे हे जास्त सोपे ठरायला हवे. रोडमार्गे दुसऱ्या देशांवर आपली dependency रहाणार आणि त्यांचा पहिला प्रेफ्रँस युक्रेनियन्स ना प्रवेश देण्यावर असणार.