Skip to main content

युक्रेनवरून तणाव

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 12/02/2022 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही. नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली. नॉर्मंडी आराखडा जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. लिंक https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html

वाचने 118110
प्रतिक्रिया 434

प्रतिक्रिया

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

> ओडेसा, सेव्हस्टपोल अशी बंदरे युक्रेन मध्ये आहेत ओडिसा नक्की कुणाकडे आहे ठाऊक नाही पण सेवेस्तपोल हे रशियन ताब्यांत आहे. दोन्ही ठिकाणी भारतीय विद्यार्थी जाणार कसे ? जायचे असेलच तर अक्षरशः गोळीबार आणि विस्फोटातून जावे लागेल. आणि त्यासाठी कुठलीही युक्रेनी यंत्रणा मदत करणार नाही. आणि समजा हे भारतीय विद्यार्थी पोचेलच सेवेस्तपोल मध्ये तर मग बोटीची काय गरज ? रशियांत आपले विमान पाठवून आम्ही अनु शकू कि ! किंवा ओडेसा मध्ये सध्या अनेक व्यापारी जहाजे अडकून पडली आहेत त्यातील एखादे भाड्याने घेऊन सुद्धा इस्तंबूल ला विद्यार्थी आणले जाऊ शकतात.

In reply to by साहना

जालावर सर्वच बाजूंनी अतिशय मूर्ख लिखाण केले जाते. तसे करणे अनेक संदर्भात अतिशय सोपे आहे. तेव्हा तसले उठवळ लिखाण उचलून त्यावर तुम्ही इथे लिहीत बसला असाल, तर कठीण आहे. नुसतेच सनसनाटी, दिलखेंच लिखाण करावे अथवा न करावे, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. प्रश्न रहातो, त्या लिखाणाच्या कसाचा. जाता जाता, तुमच्या ह्या विषयावरील लिखाणांत अमेरिकन सरकारच्या प्रसिद्धी माध्यामांचे हवाले दिलेले आहेत, त्यांची विश्वासार्हता काय आहे? त्यांचे खरे मानले तर इराकमाधे डब्लू. एम. डी. होते म्हणून, तेथे अमेरिकन सैन्य गेले होते. तसेच अलिकडेच भारत व अन्यत्र होत असलेल्या अनेक घटनेंबाबत त्यांची प्रसिद्ध माहिती, तथ्यांच्या अजिबात जवळपासचीही नाही. तेव्हा काही विश्वासार्ह हवाले तुमच्या लिखाणांत दिलेत तर तेही विश्वासार्ह ठरेल.

In reply to by प्रदीप

+१ श्री साधना छान लिहीतात. गेले काही दिवस त्यांचे लेखन एकांगी होत चालले आहे. अर्थात कोणी कसे लिहावे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ज्याची क्षमता असुनही विनाकारण गालबोट लावणारे लिहित असेल तर वाईट वाटते. आपण भारतीयांनी कोणाचीही तळी न उचलता, आपले आणि आपल्या देशाचे हित पाहिले पाहीजे.
जालावर सर्वच बाजूंनी अतिशय मूर्ख लिखाण केले जाते. तसे करणे अनेक संदर्भात अतिशय सोपे आहे. तेव्हा तसले उठवळ लिखाण उचलून त्यावर तुम्ही इथे लिहीत बसला असाल, तर कठीण आहे. नुसतेच सनसनाटी, दिलखेंच लिखाण करावे अथवा न करावे, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. प्रश्न रहातो, त्या लिखाणाच्या कसाचा. जाता जाता, तुमच्या ह्या विषयावरील लिखाणांत अमेरिकन सरकारच्या प्रसिद्धी माध्यामांचे हवाले दिलेले आहेत, त्यांची विश्वासार्हता काय आहे? त्यांचे खरे मानले तर इराकमाधे डब्लू. एम. डी. होते म्हणून, तेथे अमेरिकन सैन्य गेले होते. तसेच अलिकडेच भारत व अन्यत्र होत असलेल्या अनेक घटनेंबाबत त्यांची प्रसिद्ध माहिती, तथ्यांच्या अजिबात जवळपासचीही नाही. तेव्हा काही विश्वासार्ह हवाले तुमच्या लिखाणांत दिलेत तर तेही विश्वासार्ह ठरेल.
अगदी अगदी.

In reply to by प्रदीप

>>> तेव्हा तसले उठवळ लिखाण उचलून त्यावर तुम्ही इथे लिहीत बसला असाल, तर कठीण आहे. नुसतेच सनसनाटी, दिलखेंच लिखाण करावे अथवा न करावे, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. प्रश्न रहातो, त्या लिखाणाच्या कसाचा. फॉरवर्ड हा निव्वळ विनोदी लिखाणाचा नमुना म्हणून दिला होता त्यातील माहितीवर मी काहीही टिप्पणी केली नाही. लिहिणार्याने सुद्धा उपरोधिक पद्धतीनेच हे लिहिले असावे असे वाटते. मला त्यावर काहीही मत व्यक्त करायचे नव्हते. मूळ लेखकाने भारताने आपली युद्धनौका वगैरे पाठवावी असा दिलेला सल्ला आणि तो विनोदी फॉरवर्ड एकाच गटांतले आहेत. माझा मूळ प्रश्न रास्त होता. कुठल्या बंदरांत आपली बोट लावावी ? सर्व बंदरे शेवटी ब्लॅक सी मध्ये आहेत जिथे जाण्यासाठी भारतीय बोटीला अरबी समुद्र, रेड सी, इस्तंबूल मार्गे जाऊन यावे लागेल. मूळ लेखकाने युद्धनौका म्हटले आहे म्हणून हे जास्त विचित्र होते. सर्वांत प्रखर युद्ध ह्याच भागात चालले आहे. कुठलीही युक्रेनी ट्रेन किंवा बस ह्या भागांत जाणार नाही. क्यिव खारकीव मधून निर्वासितांना जाण्याचा मार्ग पश्चिमेकडे आहे आणि रशिया सुद्धा लोकांना जायला देत आहे. >>> तुमच्या ह्या विषयावरील लिखाणांत अमेरिकन सरकारच्या प्रसिद्धी माध्यामांचे हवाले दिलेले आहेत, त्यांची विश्वासार्हता काय आहे? युद्धकाळांत कुठलीही माहिती प्रोपागंडा असू शकतो त्याशिवाय मी वार्ताहर नाही आणि कुठल्याही माहितीची मी स्वतः शहानिशा करत नाही. म्हणूनच जवळ जवळ प्रत्येक माहिती कुठून आली आहे हे मी सांगत आहे त्यामुळे वाचणाऱ्याने आपापल्या समजुती नुसार त्यावर विश्वास ठेवावा. फक्त मी वेळ खर्च करून प्रत्यक्ष युक्रेन मधील लोक, भारतीय दूतावासातील लोक ह्यांच्याकडून जी माहिती घेतली आहे त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. रशियाच्या दृष्टिकोनातून सत्य काय आहे हे मला तरी समजणे अवघड आहे कारण माझे असंख्य रशियन ओळखीचे आहेत आणि सर्वच मंडळी प्रखर पणे ह्या युद्धाच्या विरोधांत आहेत. कुणालाही काहीही विचारल्यास पुतीन च्या नावाने फक्त शिव्या घातल्या जातात. अजून एकही रशियन व्यक्ती मला अशी सापडली नाही जिने ह्या हल्ल्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे मी त्यांच्या बाजूने काहीही लिहू शकत नाही.

In reply to by साहना

युद्धकाळांत कुठलीही माहिती प्रोपागंडा असू शकतो त्याशिवाय मी वार्ताहर नाही आणि कुठल्याही माहितीची मी स्वतः शहानिशा करत नाही.
तो प्रोपगंडा तुम्ही इथे चालवत आहात हे न कळण्या एवढे मूर्ख आम्ही नक्कीच नाही 😀 बाकी तुमचे विशफूल थिंकिंग चालूदे... युद्धाचा निकाल काय लागतो हे बघण्यात मला जास्त स्वारस्य आहे!

In reply to by Trump

तणाव नाही म्हणता येणार पण व्यक्तीसापेक्ष मते म्हणता येईल 😀 साहनाजींची मते फारच एकांगी वाटतात त्यामुळे हा प्रतिसाद प्रपंच!

In reply to by टर्मीनेटर

> हे न कळण्या एवढे मूर्ख आम्ही नक्कीच नाही हे स्पष्टीकरण द्यावेसे वाटले ह्याबद्दल आपले धन्यवाद !

In reply to by साहना

मूळ लेखकाने भारताने आपली युद्धनौका वगैरे पाठवावी असा दिलेला सल्ला आणि तो विनोदी फॉरवर्ड एकाच गटांतले आहेत.
हे असं का वाटावं हे मला समजत नाही. ओडेसा ते किव्ह अंतर 474 किमी आहे. किव्ह ते पोलंड बॉर्डर अंतर 752 किमी आहे. जर युक्रेन आणि रशिया दोघांशी नीट ताळमेळ राखला तर हे अंतर पार करणे जास्त सोपे आहे. मी समजू शकतो की ओडेसा भागात कदाचित अजूनही युद्ध चालू असावे. पण बाजूलाच मोलदोव्हा आहे त्याची बंदरे चालू असणार. 200 विद्यार्थी एका फ्लाईट मध्ये अशा प्रकारे 100 फ्लाईट्स पुढचे कित्येक आठवडे घेऊन येण्यापेक्षा व्यापारी जहाजे भाड्याने घेऊन बॅटल शिप च्या संरक्षणाखाली (आणि कंट्रोल खाली) जहाजाने मोठ्या संख्येने लोकांना काही दिवसात परत आणता येईल.
माझा मूळ प्रश्न रास्त होता. कुठल्या बंदरांत आपली बोट लावावी ? सर्व बंदरे शेवटी ब्लॅक सी मध्ये आहेत जिथे जाण्यासाठी भारतीय बोटीला अरबी समुद्र, रेड सी, इस्तंबूल मार्गे जाऊन यावे लागेल. मूळ लेखकाने युद्धनौका म्हटले आहे म्हणून हे जास्त विचित्र होते. सर्वांत प्रखर युद्ध ह्याच भागात चालले आहे. कुठलीही युक्रेनी ट्रेन किंवा बस ह्या भागांत जाणार नाही. क्यिव खारकीव मधून निर्वासितांना जाण्याचा मार्ग पश्चिमेकडे आहे आणि रशिया सुद्धा लोकांना जायला देत आहे.
माझ्या मते माझा मुद्दा मी वर स्पष्ट केला आहे. निर्वासितांना जाण्याचा रस्ता पश्चिमेकडे आहे कारण युद्ध पूर्वेकडून पश्चिमेकडे येत आहे, नाटो देश पश्चिमेकडे आहेत आणि युक्रेनियन निर्वासितांना फक्त सीमा ओलांडून जायचे आहे. भारतीयांना नंतर चा प्रवास ही करायचा आहे.

In reply to by प्रदीप

साहना सारख्या चांगल्या लेखकाला बॅश करण्याचे कारण समजले नाही. लेखनातले मुद्दे पटले नाही तर त्याचा प्रतिवाद करणे समजू शकते. साहना यांनी माहितीपूर्ण प्रतिसाद येथे दिले आहेत. तेव्हढे तर बॅशिन्ग करणार्‍यांनी या विषयावर लिहिलेले सुद्धा नाही. स्वतः लिहायचे नाही आणि इतरांना लिहू द्यायचे नाही अशी भुमिका का असावी याचा अचंबा आहे!

In reply to by निनाद

सहमत.

अशी सार्थ भीती वाटत आहे युक्रेन शरण येत नाही हे रशिया च्या प्रतिष्ठेला धोका पोचवणारे आहे. असा समज रशिया चा होवू शकतो. कमी नुकसान करणारी शस्त्र आता पर्यंत युद्धात वापरली गेली आहेत. हे युद्ध असेच चालू राहिले तर . महा विनाशकारी शस्त्र आणि अस्त्रांचा वापर रशिया करेल. आणि ते जगासाठी पण धोकादायक असेल. अणू हल्ला करणाऱ्या तुकडीला सज्ज राहण्याचे आदेश पुतीन ह्यांनी दिलेले आहेत.

आता फक्त तोंडी धमक्या देणे चालू आहे. युक्रेन आणि रशिया शत्रू चे आम्हीच जास्त नुकसान केले असे मीडिया लं सांगत आहे अजून पण सौम्य हत्यार च वापरली जात आहेत . कोण कोणाला मदत करणार ,कशाची करणार ह्या वर चर्चा चालू आहे .युरोपियन देश आगीत तेल टाकत आहेत.. पण पुढे. रशिया महा विनाशक हत्यार नक्कीच युक्रेन वर टाकणार प्रचंड नुकसान आणि मनुष्य हानी होईल त्यांनी. एक तर दोन्ही देश आत्म् सन्मान राखून युद्ध thambavatil. किंवा युरोपियन राष्ट्रांच्या आहारी जावून . युद्ध भीषण रूप घेईल. अमेरिका किंवा कोणताही युरोपियन देश स्वतः युद्धात उतरला तर . चीन,उत्तर कोरिया पण युद्धात उतरेल. मग प्रतेक देशाला युद्धात उतरण्या शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही तेव्हा भारताला पण तटस्थ राहता येणार नाही. हे घडू नये पण असे घडण्याचीच शक्यता आज तरी जास्त वाटत आहे.

* रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन सर्वार्थाने एकाकी पडले आहेत. त्यांनी आपल्या सर्वांत महत्वाच्या जनरल ला राजीनामा देण्यास भाग पाडले आहे अशी अफवा आहे पण अमेरिकन माध्यमानी त्यांना अजून दुजोरा नाही दिला. पुतीन ह्यांच्या मानसिक अवस्थेवर उलट सुलट चर्चा व्यक्त होत आहेत. मॉस्को मध्ये हजारो लोकांनी निदर्शने केली आणि अनेकांना अटक केली. अनेक रशियन नागरिकांनी युक्रेन ला आर्थिक मदत पाठवली म्हणून रशियन सरकारने ह्या लोकांना देशद्रोही ठरवून त्यांना २० वर्षे कारावासाची धमकी दिली आहे. * विविध खजगी व्यक्ती आणि हॅकर्स नि रशियावर सायबर हल्ला चढविला. काही काळ रशियन टीव्ही वाहिन्या सुद्धा हॅक झाल्या होत्या. * पुतीन ह्यांनी सध्या आण्विक सज्जतेला लेव्हल २ वर नेले आहे. एकूण ४ लेव्हल्स आहेत. पण ह्या मुळे कुणाला काही फरक पडला असेल असे साधायतरी दिसून आले नाही. * जर्मनी, पोलंड, फ्रांस इत्यादींनी प्रचंड प्रमाणात युक्रेन ला शस्त्रास्त्रे पाठवली आहेत. * युक्रेन मधील रशियन आक्रमण फेल ठरले आहे असे एकमत सर्वत्र व्यक्त केले जात आहे. रशियाने शेवटी क्यिव ताब्यांत जरी घेतले तरी आता त्यातून रशियाला आणखीन नुकसानच होणार आहे असे स्पष्ट आहे. * अमेरिकन गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार रशिया रसद पुरवठ्यांत अतिशय ढिसाळ आहे. युक्रेन मध्ये सर्वत्र रशियन वाहने आणि रणगाडे मोडून पडले आहेत. काही ठिकाणी डिझेल संपून अडकून पडले आहेत. ह्या ढिसाळपणावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ब्रिटिश माध्यमाच्या अनुसार रशिया फारतर १ आठवडा आपल्या सैन्याला रसद पुरवठा करू शकेल. युक्रेन मधील आक्रमण रशियाने आणखीन ७ दिवसांत आटोपते नाही घेतले तर कदाचित पुतीन ह्यांना "बोहोत बे अब्रू होकर तेरे कुचे से हम निकाले" म्हणावे लागेल अशी चिन्हे आहेत. * भारतीय दूतावासाने रशिया तसेच आजू बाजूच्या काही राष्ट्रांतून आपल्या नागरिकांना आणि विशेषतः गरजू लोकांना (जसे विद्यार्थी) ह्यांना जात गाजावाजा न करता बाहेर काढण्याची तयारी सुरु केली आहे. ज्या प्रमाणे युक्रेन आता भारतीय नागरिकांना होस्टेज ठेवत आहे त्याच प्रमाणे रशिया सुद्धा करू शकतो अशी भीती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला वाटत आहे. * रशियन अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. रशियन श्रीमंतांच्या बोटी, घरे वगैरे युरोप ने ताब्यांत घेतली आहेत. एका रशियन टीव्ही सेलेब्रिटीने आपले इटली मधील घर जप्त झाले हे ऐकून काल लाईव्ह टीव्ही वर प्रचंड थयथयाट केला. मार्केट सोमवारी उघडे होताच रशियन रुबल पार कोलमडेल. सध्या काळ्या बाजारांत हा २०० वर पोचला आहे. काही दिवस आधी हा ७५ होता. * सर्वांत महत्वाचे गोष्ट म्हणजे सामान्य अमेरिकन नागरिक आणि EU नागरिक ह्यांनी युक्रेन ला इतका मोठा सपोर्ट केला कि जर्मनी वगैरेंना त्यांना गांभीर्याने घ्यावे लागले. जर्मनीने तातडीने अनेक मोठे निर्णय घेतले. एक महत्वाचा निर्णय म्हणजे रक्षा बजेट वाढवणे. * युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी भारतीय दूतावास खूप प्रयत्न करत आहे. युक्रेन मध्ये अराजक असले तरी दिवसाला शेकडो विद्यार्थ्यांना येन केन प्रकारे भारत बाहेर काढत आहे. * युक्रेनी सैन्याच्या माहिती प्रमाणे अजून पर्यंत ४००० रशियन सैनिक मारले गेले आहेत आणि १०० पेक्षा जास्त रणगाडे नष्ट करण्यात आले आहे. चेचेन सैन्याची एक तुकडी नष्ट करून अत्यंत क्रूर अशी प्रतिमा असलेल्या त्यांच्या जनरल ला मारण्यात आले आहे. अर्थांत ह्या सर्व गोष्टीवर किती विश्वास ठेवावा हे सांगता येत नाही.

अमेरिकन वर्तुळातून खालील तर्क फिरत आहेत : १. पुतीन कदाचित बोटॉक्स घेत असावेत किंवा glucocorticoids घेत असावेत ह्यामुळे त्यांचा चेहेरा थोडा puffy वाटत आहे. २. त्यांच्या मिटींग्स मध्ये सर्व लोक इतके दूर असतात कि त्यावरून त्यांना इम्यून डिसऑर्डर झाली असावी आणि glucocorticoids हे त्याचे कारण असावे असा अंदाज आहे. ३. काल पुतीन ह्यांनी सार्वजनिक इव्हेंट मध्ये भाग घ्यायचे नाटक केले. एका ठिकाणी काही बांधकाम चालत होते तिथे जाऊन त्यांनी कामगारांशी चर्चा केली. हे कामगार प्रत्यक्षांत कामगारांच्या वेषांत स्थनिक पोलीस होते आणि तिथे सुद्धा पुतिन ह्यांनी किमान १० मीटर डिस्टन्स ठेवले. पुतीन ह्यांचे हे शेवटचे दिवस आहेत अशी माझी भावना बळकावत चालली आहे. आता काही दिवसांनी समजेल.

खूप प्रयत्न करून सुद्धा युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी माझा संपर्क होऊ शकला नाही. पण पोलंड मध्ये पोचलेल्या विदेशी लोकांशी आणि त्यांना मदत करणाऱ्या भारतीयांशी लोकांशी संपर्क झाला. काही माहिती : * युक्रेन ने लढण्यायोग्य पुरुषांना देशांतून बाहेर जायला बंदी घातली आहे. त्यामुळे पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला पकडून पोलीस. सैनिक तसेच युक्रेनी सवयंसेवक जबरदस्तीने रक्षा दलांत भरती करत आहेत. ह्याला विरोध करणाऱ्या त्यांच्या बायका मुलांना मारहाण सुद्धा करायला मागे पुढे पाहत नाहीत. * भारतीय विद्यार्थ्यांना वारंवार आपण युक्रेनी नागरिक नाही, भारतीय आहोत हे सर्व सांगावे लागते तरी सुद्धा प्रसंगी त्यांना प्रवास करण्यापासून मज्जाव केला जातो. काही वेळी भांडण होऊन मारहाण सुद्धा होते. * एका मुस्लिम विद्यार्थ्याने बंदूक घेऊन प्रवास करण्यासाठी गाडी चोरण्याचा प्रयत्न केला आणि फक्त मुस्लिम लोकांनाच आपण घेऊन जाऊ अशी धमकी दिली त्यामुळे आणखीन वातावरण पेटले. * ट्रेन मध्ये एका बोगीवर म्हणजे एका मुस्लिम विद्यार्थ्याने चाकू घेऊन भारतीयांना बाहेर फेकले. * भारतीय लोकांच्या पासपोर्ट वरून पोलंड रोमानिया वगैरेत घुसण्यासाठी व्हिसा लागतो तो भाराइटी विद्यार्थ्याकडे नाही, त्यासाठी भारत सरकारने ह्यांच्या कडून विशेष सवलती मिळवल्या आहेत तरी सुद्धा त्या देशांचा स्टाफ प्रशिक्षित नसल्याने विद्यार्थ्यांना आंत घुसण्यास ते देत नाहीत. * पोलंड अत्यंत वर्णदंभेंदि देश असून प्रत्येक ठिकाणी त्यांचे धोरण "गोरे लोक प्रथम " इतर सर्व नंतर असे धोरण आहे. भारताचा UNSC मधील वोट आणि विद्यार्थी ह्यांना देण्यात येणारी वागणूक ह्यांचा संबंध कमी आणि जनरल वंशभेद हे कारण जास्त वाटत आहे. तरी सुद्धा अमेरिकन भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या मते १००% भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढता येईल अशी खात्री त्यांना आहे. विद्यार्थ्यांनी फक्त पश्चिमी सीमेवर पोचायला पाहिजे. युक्रेन मध्ये भारतीय वंशाचे युक्रेनी नागरिक सुद्धा आहेत. ह्यातील काहींनी आपले युक्रेनियन पासपोर्ट नष्ट करून आपण भारतीय आहोत असे नाटक करून देशांतून पाळायचा प्रयत्न केला पण त्यांच्याच नातलगांनी त्यांना युक्रेनी पोलिसांच्या ताब्यांत दिले. युद्धाचा फायदा घेऊन चोरी आणि बलात्कार ह्या गोष्टी सुद्धा होतात. आणि असे झाल्यास युक्रेनी सैनिकांना गरज पडल्यास आपल्याच नागरिकांना ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. पण बहुतांशी स्वयंसेवक दलाने उक्तृष्ट पणे काम केले आहे. क्यिव पासून पोलंड च्या सीमेवर पोचायला वाहनांना साधारण ६०० किमी अंतर आहे आणि हे कव्हर करायला सध्या म्हणे अनेक दिवस लागतील. पण ठीक ठिकाणी चोरांना नग्न करून त्यांची धिंड लोकांनी काढली होती तर काहीं ठिकाणी चक्क त्यांना रस्त्याचा बाजूला झाडांना वगैरे बांधून ठेवण्यात आले होते अशी दृशे दिसली. सर्वांत मोठे हाल फक्त बाप असलेल्या मुलांचे होतात कारण बापाला पकडून सैन्यात नेले जाते आणि मूळ बिचारे अनाथ होऊन फिरते. मग कुणी दया येऊन ह्यांना बरोबर घेतात.

In reply to by साहना

असे स्त्री मुक्ति वाले,पुरोगामी बोंबलत असतात . मग युक्रेन साठी पुरुषांनी का लढावे ,आणि स्वतःचा जीव धोक्यात का घालावा. लढण्यासाठी ,जीवाची बाजी देण्यासाठी 50% स्त्रिया हव्यातच स्त्री मुक्ती आणि पुरोगामी ह्यांनी त्या साठी प्रयत्न करावेत.

In reply to by साहना

ही व्यक्ती म्हणजे रशिया किंवा गैर युरोपियन नाहीत. पुतीन दैव योगाने नसले तरी . आशिया नी युरोपियन राष्ट्र ना धडा शिकवावा.

युक्रेन चा राष्ट्राध्यक्षामुळे त्या देशावर ही वेळ आली आहे वगैरे अक्कलेचे तारे तोडत आहेत. युक्रेनच्या अध्यक्षांच्या लढण्यामुळे देश बेचिराख होइल , प्राण हानी , वित्त हानी होइल वगैरे सूर अहेत. युक्रेनचे अध्यक्ष ही लढाइ हरले तरि युक्रेनचा राष्ट्रवाद यामुळे सदैव जिवंत राहील आणि सोविअ‍ॅट पासून त्यांना मुक्तीची प्रेरणा देइल. भले काही वर्षे लागतील , पण इतिहासातील बलिदाने वाया जात नहीत

In reply to by कपिलमुनी

त्याच्यामुळे तर ही परिस्थिती आताच ओढवली आहे. अगोदर झालेल्या करारानुसार, युक्रेन नाटोमधे समाविष्ट होऊ शकत नव्हता. आता त्याचे उल्लंघन करण्याची तयारी ह्या राष्ट्राध्यक्षाने चालवली, तेव्हा रशियाने आपली चाल खेळली आहे. तेव्हा ह्या परिस्थितीस तो स्वतः, व त्याला व युक्रेनी जनतेला चढवणारे पाश्चिमात्या देश जबाबदार आहेत, असे म्हटले, तर त्यांत चूक काय आहे?
युक्रेनचे अध्यक्ष ही लढाइ हरले तरि युक्रेनचा राष्ट्रवाद यामुळे सदैव जिवंत राहील आणि सोविअ‍ॅट पासून त्यांना मुक्तीची प्रेरणा देइल.
सोव्हिएट युनियन १९९१ साली संपले, ना? तुम्हाला बहुधा रशिया म्हणायचे असावे. पण ह्या असल्या 'आशावादा'ला काही अर्थ नाही. काही वर्षांपूर्वी मध्यपूर्वेत 'अरब स्प्रिंग'चे नाटक खेळले गेले. त्याची सुरूवात ज्या ट्यूनिशियामधून झाली, तेथे आता सर्व काही आलबेल आहे, व जनता अत्यानंदात नहाते आहे, असे आहे का? ते लोण नंतर इजिप्तमधेही गेले. तेथे काय झाले, तर सत्ता मुस्लिम ब्रदरहूडच्या हाती गेली. तेथील सैन्याने वेळीच हस्तक्षेप करून पुढील अनर्थ थांबवला. तेव्हा लिबीयामधे काय झाले? तेथील स्थिती आता कशी आहे? तेथील जनतेची मुक्ती झाली का? आणि ह्या पाश्चिमात्य देशांचा व त्यांच्या बगलबच्च्या मीडियाचा तेव्हा खुळपटपणा असा की, चीनमधेहीम अरब स्प्रिंगपासून प्रेरणा घेऊन तेथील जनता उठाव करील असा भोळसट विचार ते प्रसारीत करत होते. येथेही तेच होणार, ह्याची खूणगाठ मनात आताच बांधणे बरे.

In reply to by कपिलमुनी

+१ टायगर हिल घेण्यासाठी भारतीय सैन्याने अक्षरशः जीवाचे रान केले. शेकडो भारतीय सैनिक फक्त काही पाकिस्तानी सैनिकांशी भांडताना मारले गेले कारण भौगोलिक रचनाच तशी होती. आता जीवित हानी होईल म्हणून भारतीय सैन्याने टायगर हिल सोडून द्यायला पाहिजे होते का ? किंवा शिवाजी महाराजांनी कशाला उगाच स्वराज्य वगैरे निर्माण केले ? सर्वच मराठ्यांनी इस्लाम पत्करला असता तर अगदी आनंदाने डझन बायका घेऊन जगले असते. कशाला संभाजी महाराजांनी जीवाचे हाल करून घेतले ? एका बायकोसाठी का बरे श्रीरामांनी एवढे मोठे युद्ध केले ? सोडून द्यायची होती सीता आणि करायची दुसरी बायको, काय फरक पडतो ? हिंदू मुस्लिम भांडण लावून कशाला पाहिजे राम मंदिर ? राहू दे कि बाबरी मशीद. कशाला इंग्लंड ने हिटलर ला तोंड दिले ? शरणागती पत्करली असती तर कित्येक ब्रिटिश नागरिकांचे प्राण वाचले असते. हिंसा हे कधीही उत्तर नसते किंवा जीवितहानी वाचवण्यासाठी शरणागती वगैरे भाषणे आम्हाला इकडे बसून ठोकायला सोपे आहे पण शेवटी आपली मूल्ये आपल्यासाठी किती महत्वाची आहेत हे आपण त्यासाठी काय त्याग करू शकतो ह्यावर अवलंबून आहे. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे ज्या समाजांना असली कुठलीही मूल्ये नाहीत, ते समाज तुम्ही त्यांना कितीही शांतता दिली तरी विशेष प्रगती करू शकत नाहीत. ते नेहमीच मागासलेलेच राहतील. त्याशिवाय युक्रेनी राष्ट्राध्यक्षांना युद्ध हवे आहे हे सुद्धा चुकीचे आहे. पुतीन प्रमाणे ते हुकूमशाह नाहीत. किंवा युक्रेनी जनता किंवा सैनिक त्यांना घाबरून आहे असेही नाही. ते स्वतः आपला जीव धोक्यांत घालून आहेत आणि बहुतांशी लोक स्वखुशीने त्यांच्या मागे उभे आहेत. कुणीही पादल्यास बंकर मध्ये जाऊन लपणारे ट्रम्प/बायडन किंवा पुतीन नाहीत. युद्धाचा शेवट काहीही असो युक्रेन निःसंशय पणे काही दिवसांत स्वतंत्र तर होईलच पण NATO आणि EU दोन्हीचा भाग होईल. वरून सीमेलगतच्या रशियन प्रदेशांतील मंडळी इथे पळून जाऊन स्वतःला EU चे सभासद बनवून घेण्यात धन्यता ,मानतील.

In reply to by साहना

टायगर हिल्स काय, छ. शि. मांच्या लढ्याचा उल्लेख काय... ह्या सगळ्यांपेक्षा सध्याची युक्रेनची परिस्थिती वेगळी आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाने, नाटोत सहभागी होण्याची तयारी, ईयू व यू,, एस. ह्यांच्या संगनमताने-- किंबहुना- चिथावणीने केली, व त्यामुळे त्या देशावर आता हा प्रसंग गुदरला आहे. आपला शेजारी जर आपला 'बाप' असेल, तो आपल्यापेक्षा सर्वस्वी बलाढ्य असेल, व छोट्या देशांना त्यांची जागा दर्शवण्याची त्याची तयारी आहे, हे त्याच्या अलिकडच्या इतिहासावरून कळत असेल, तर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाने जबाबदारीने पाउले उचलली पाहिजेत. ते त्याने केलेले नाही.
हिंसा हे कधीही उत्तर नसते किंवा जीवितहानी वाचवण्यासाठी शरणागती वगैरे भाषणे आम्हाला इकडे बसून ठोकायला सोपे आहे पण शेवटी आपली मूल्ये आपल्यासाठी किती महत्वाची आहेत हे आपण त्यासाठी काय त्याग करू शकतो ह्यावर अवलंबून आहे. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे ज्या समाजांना असली कुठलीही मूल्ये नाहीत, ते समाज तुम्ही त्यांना कितीही शांतता दिली तरी विशेष प्रगती करू शकत नाहीत. ते नेहमीच मागासलेलेच राहतील.
अमेरिकेचीच, व तिथल्या डेमॉक्रॅटिक पक्षाची तुलसी गॅबार्ड युक्रेनच्या 'लोकशाही'बद्दल येथे काय सांगते आहे, ते पहा. ते चुकीचे अथवा विपर्यस्त असले तर तसे कृपया सांगावे. युक्रेनमधे तुमचे 'असंख्य' मित्र आहेत, त्यांना विचारून तुम्ही ह्यावर टिपण्णी करू शकता.
त्याशिवाय युक्रेनी राष्ट्राध्यक्षांना युद्ध हवे आहे हे सुद्धा चुकीचे आहे.
असे मी तरी कोठे म्हटले नाही. किंबहुना हे कुणीही म्हटल्याचे मलातरी ठाऊक नाही. 'युद्ध हवे असणे' व 'बेजबाबदारीने वागल्याने युद्धाला सामोरे जावे लागणे' ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे येथे सांगंणे नलगे. मी दर्शवलेल्या अरब स्प्रिंगच्या घटना अगदी अलिकडच्या आहेत. त्या व आशियाई जागेंतील किमान एका जागेत अलिकडच्या काळांत झालेल्या दंगली/ उठाव वगैरे अर्थात अमेरिका व यू. के. ह्यांच्या चिथावणीमुळे घडून आले होते. ह्या सर्वांत तेथील जनतेने भरपूर मार खाल्ला, हाती काहीच पडले नाही. किंबहुना, काही ठिकाणी तर, 'कालचा गोंधळ बरा होता' असे म्हणायची पाळी तेथील उठावखोर जनतेवर आली. युक्रेनही त्याच मार्गाने जाणार आहे. मग 'तुम हो जाव आगे, हम तुम्हारे साथ हय' असे म्हणणारे मागे पळ काढतील. युक्रेनच्या जनतेच्या नशीबांत, आता आहे त्यापेक्षा अधिक वाईट दिवस येतील.

In reply to by प्रदीप

डेमोक्रॅटिक पक्षाच्या असल्या तरी तुलसी बाई कन्झर्व्हेटिव्ह आहेत. डेम्स मधल्या सुब्बू स्वामी. नुकत्याच सीपॅक (Conservative Political Action Conference) ला गेलेल्या, भरपूर टाळ्या खाऊन आल्या. बाकी त्या म्हणतायत - १. विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक केली- हे खरे आहे, पण संदर्भहीन आहे. फुटीरतावादी लोकांना मदत केल्याच्या आरोपाखाली आधीच्या अध्यक्षांना अटक केली होती. (आता हे आरोप कितपत खरे हे देव जाणे. पण तुलसीबाईंना जसे सुचवायचे होते तितके क्लिअर कट् प्रकरण खास दिसत नाही.) २. टीव्ही चॅनेल "प्रो- रशियन" होते म्हणून बंद केले म्हणे, आता हे प्रो रशियनत्व काय प्रकारचे होते कल्पना नाही, पण लोकशाहीत असे टीव्ही च्यानेल बंद करणे तसे चुकीचेच. तरी, वरील दोन्ही गोष्टी विचारात घेऊन सुद्धा युक्रेन निःसंशय लोकशाहीच आहे. निवडणूक होऊन अध्यक्ष निवडले आहेत. अध्यक्षांचे अप्रूव्हल रेटिंग बऱ्यापैकी चांगलेच राहिले आहे असे समजते, आता तर ते गगनाला भिडले आहे. बाकी तुलसी बाईंनी सुद्धा घुमजाव करत पुतीनला मागार घेण्याची विनंती केलीये. आणि ट्रम्प तसेच तुलसी बाई राश्याला आधीपासून प्रिय.

In reply to by प्रदीप

> आपला शेजारी जर आपला 'बाप' असेल, तो आपल्यापेक्षा सर्वस्वी बलाढ्य असेल, व छोट्या देशांना त्यांची जागा दर्शवण्याची त्याची तयारी आहे, हे त्याच्या अलिकडच्या इतिहासावरून कळत असेल, तर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाने जबाबदारीने पाउले उचलली पाहिजेत. ते त्याने केलेले नाही. हाच नियम भारताला लागू पडतो. शेजारचा चीन बलाढ्य असल्याने भारतीयांनी सुद्धा आपली शेपूट खाली घालून कोपऱ्यांत बसावे काय ? किंवा शेजारचा भाला मोठा गुंड आपल्या पोरीची छेड काढत असेल तर आपण रात्री तिला आपणहून त्याच्या घरी सोडून याल काय ? इथे राष्ट्राध्यक्षांना काय हवे आहे हे सर्वस्वी निरर्थक आहे कारण युद्धास संपूर्ण जनता उस्फुर्त पणे तयार आहे. भिकार रशियाशी संबंध ठेवण्यापेक्षा EU मध्ये जायला युक्रेनी जनता आधीपासून तयार होती आणि आता तर काही दिवसांत ती EU मध्ये येईल. त्याशिवाय EU ने नागरिकत्व देऊ केल्या "बलाढ्य" बापाचे सैनिक शस्त्रें खाली टाकून आरामात शरणागती पत्करतील. थोडक्यांत काय तर हे युद्ध युक्रेनी जनतेचे आहे आणि इथे पुतीन महाशयांचे पानिपत होणार आता ह्यांना आपलेच लोक पाणउतार करतील कि ते वैफल्यग्रस्त होऊन विष खातील हे पाहणे मनोरंजक ठरेल.

In reply to by साहना

हाच नियम भारताला लागू पडतो. शेजारचा चीन बलाढ्य असल्याने भारतीयांनी सुद्धा आपली शेपूट खाली घालून कोपऱ्यांत बसावे काय ? किंवा शेजारचा भाला मोठा गुंड आपल्या पोरीची छेड काढत असेल तर आपण रात्री तिला आपणहून त्याच्या घरी सोडून याल काय ?
इथे कुरापत प्रथम कुणी काढली, हा मुद्दा आहे. सदर घटनेत ती युक्रेनने काढली आहे, असे दिसून येते.

In reply to by जव्हेरगंज

तुमच्यासाठी माझ्या आधीच्या प्रतिसादामधील वाक्ये डकवतो.
क्रिमिया हा पुर्वी रशियाचा भाग होता. सोव्हीयत काळात तो प्रशासकीय सोयीसाठी आणि रशिया व युक्रेन मैत्री दर्शवण्यासाठी युक्रेनकडे हस्तांतरीत केला होता. https://en.wikipedia.org/wiki/1954_transfer_of_Crimea बरेचदा हा भाग सोयिस्कररित्या गाळला जातो. http://www.misalpav.com/comment/1133354#comment-1133354

In reply to by Trump

Crimea was part of the Russian SFSR from 1921, and then was transferred to the Ukrainian SSR in 1954, which became independent Ukraine in 1991. The Russian Federation annexed Crimea in March 2014, re-establishing Russian rule of the peninsula, though that annexation is not internationally recognised https://en.wikipedia.org/wiki/Annexation_of_Crimea_by_the_Russian_Empire स्टॅलिन चे कारनामे https://en.wikipedia.org/wiki/Deportation_of_the_Crimean_Tatars

In reply to by साहना

हाच नियम भारताला लागू पडतो. शेजारचा चीन बलाढ्य असल्याने भारतीयांनी सुद्धा आपली शेपूट खाली घालून कोपऱ्यांत बसावे काय ? किंवा शेजारचा भाला मोठा गुंड आपल्या पोरीची छेड काढत असेल तर आपण रात्री तिला आपणहून त्याच्या घरी सोडून याल काय ?
कशीही कोठेही तुलना.. तुमच्यासाठी माझ्या आधीच्या प्रतिसादामधील वाक्ये डकवतो.
http://www.misalpav.com/comment/1133381#comment-1133381 प्रत्येक मोठ्या देशाचे स्वत:चे प्रभावश्रेत्र असते. इतर देशांनी त्यात किती खुट्पुट करावी त्याला मर्यादा असतात. जसे तसे नसेल तर क्युबन क्षेपणास्त्र संघर्ष काय होता? चीनची पाणबुडी जेव्हा श्रीलंकेमध्ये येते तेव्हा भारतात खळखळ का होते? तिसरे म्हणजे जर पूर्वीची सोव्हिएट संघराज्ये स्वतंत्र आणि सार्वभौम देश झाले असतील तर त्यांनी नाटोचा सदस्य व्हायला नको ही अट रशियाने घालायचा संबंध कुठे येतो? त्यातही जर कुठे करार करून असे आश्वासन नाटोच्या बाजूने दिले गेले असेल तर गोष्ट वेगळी. तसा कुठला करार आहे का?
-------
इथे राष्ट्राध्यक्षांना काय हवे आहे हे सर्वस्वी निरर्थक आहे कारण युद्धास संपूर्ण जनता उस्फुर्त पणे तयार आहे.
अहो, अजुन खरे युध्द्द चालु झालेच नाही. प्रत्येक विडिओमध्ये वीज, पाणीपुरवठा, बहुतेक गोष्टी सुस्थितीत दिसते आहे. जेव्हा जनता हल्ले करेल तेव्हा त्यांना दणकेपण मिळतील.
भिकार रशियाशी संबंध ठेवण्यापेक्षा EU मध्ये जायला युक्रेनी जनता आधीपासून तयार होती आणि आता तर काही दिवसांत ती EU मध्ये येईल. त्याशिवाय EU ने नागरिकत्व देऊ केल्या "बलाढ्य" बापाचे सैनिक शस्त्रें खाली टाकून आरामात शरणागती पत्करतील. थोडक्यांत काय तर हे युद्ध युक्रेनी जनतेचे आहे आणि इथे पुतीन महाशयांचे पानिपत होणार आता ह्यांना आपलेच लोक पाणउतार करतील कि ते वैफल्यग्रस्त होऊन विष खातील हे पाहणे मनोरंजक ठरेल.
आता तुम्ही तुमच्या प्रतिसादांमधील तटस्थता सोडुन, आता उघड-उघडपणे युरोपियनाची तळी उचलाय सुरु केली का? तसे असेल तर सरळपणे लिहा म्हणजे त्याप्रमाणे प्रतिसाद देता येतील.

In reply to by साहना

त्याशिवाय युक्रेनी राष्ट्राध्यक्षांना युद्ध हवे आहे हे सुद्धा चुकीचे आहे. पुतीन प्रमाणे ते हुकूमशाह नाहीत. किंवा युक्रेनी जनता किंवा सैनिक त्यांना घाबरून आहे असेही नाही. ते स्वतः आपला जीव धोक्यांत घालून आहेत आणि बहुतांशी लोक स्वखुशीने त्यांच्या मागे उभे आहेत. कुणीही पादल्यास बंकर मध्ये जाऊन लपणारे ट्रम्प/बायडन किंवा पुतीन नाहीत.
ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की समाजमाध्यमांचा वापर करत प्रसिध्दीलोलुपता दाखवत आहेत, कोणतेही राजकीय पार्श्वभुमी नाही, आपल्या देशाला आणि जनतेला विनाकारण युध्दात लोटले त्यामुळे ते युक्रेनचे केजरीवालच जास्त वाटतात.
किंवा शिवाजी महाराजांनी कशाला उगाच स्वराज्य वगैरे निर्माण केले ? सर्वच मराठ्यांनी इस्लाम पत्करला असता तर अगदी आनंदाने डझन बायका घेऊन जगले असते. कशाला संभाजी महाराजांनी जीवाचे हाल करून घेतले ? एका बायकोसाठी का बरे श्रीरामांनी एवढे मोठे युद्ध केले ? सोडून द्यायची होती सीता आणि करायची दुसरी बायको, काय फरक पडतो ? हिंदू मुस्लिम भांडण लावून कशाला पाहिजे राम मंदिर ? राहू दे कि बाबरी मशीद. कशाला इंग्लंड ने हिटलर ला तोंड दिले ? शरणागती पत्करली असती तर कित्येक ब्रिटिश नागरिकांचे प्राण वाचले असते.
काहीही तुलना करताय तुम्ही.

In reply to by Trump

श्री झेलेन्स्की यांच्याबद्दल कोरावर उत्तम मतप्रदर्शन केले आहे. अभ्यासु लोकांना उत्तम संदर्भ आहे. https://www.quora.com/What-do-Ukrainians-think-of-Volodymyr-Zelensky-as…

युक्रेन हा ussa चा हिस्सा होता. पाश्चिमात्य राष्ट्र महा हुशार आहेत दाखवायचे दात सस्याचे आहेत पण खरे दात जगातील सर्वात क्रूर जनावर चे आहेत रशिया ची बाजू न्यायाची आहे अमेरिका सहित युरोपियन राष्ट्रांचा पूर्ण पराभव झाला तर च जगात शांतता निर्माण होईल

भारता वर ब्रिटिश लोकांनी केलेले अत्याचार केले त्याचे स्मरण करावे. देशाला धर्मात विभाजन कोणी केले त्याचे स्मरण करावे. संकट काळी कोण खंबीर पने भारताच्या पाठी उभा होता ह्याचे स्मरण करावे आणि ह्या विश्व युद्धात रशिया साठी स्वतःला भारताने .झोकून द्यावे तटस्थ,किती दिवस राहणार

युक्रेन ,रशिया युद्धात हे सिद्ध होते स्थलांतरित लोकांना कोणावर च निष्ठा नसते,प्रेम नसते . . 1993 मध्ये मुंबई मध्ये दंगल झाली .मुंबई संकटात होती तेव्हा .तमाम बाकी राज्यातील लोक मुंबई सोडून पळून गेले शांतता असताना ,फायदा असताना..आम्ही भारतीय आमचा कसा मुंबई वर हक्क आहे राज्य घटना कशी आम्हाला मुंबई मध्ये रोजगार करण्यास,धंदा करण्यास परवानगी देते आम्ही भारतीय आहोत . अशा वल्गना करत होते.पण जेव्हा मुंबई संकटात आली तेव्हा हे सर्व स्वार्थी मुंबई सोडून जात होते . मराठी लोक सोडून.. युक्रेन मध्ये फायदा उचलायला गेलेले भारतीय युक्रेन संकटात असताना तो देश सोडून जाण्या साठी. विविध ड्रामा करत आहेत .आज जे भारतीय अमेरिकेची तळी उचलत आहेत स्वार्थ साठी .उद्या अमेरिका संकटात सापडली तर हेच स्थलांतरित भारतीय अमेरिका सोडून जातील .स्थलांतरित लोकांना कसलीच निष्ठा नसते हे जगात घडणाऱ्या काही घटनेतून सिद्ध होते . फक्त स्वार्थ साधने हाच ह्या लोकांचा हेतू असतो.

In reply to by sunil kachure

+१ परदेशी शिकायचं, तिकडेच सेटल व्हायचं. नी संकट आलं की आम्हाला वाचवा म्हणून भारत सरकारच्या नावाने बोंबलायचं. ही लोक काहीही कामाची नसतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

१०० % सहमत! माझा एक भाचाही आहे तिथे शिकायला. पण तो निव्वळ स्वार्थासाठी तिथे गेला आहे. मग एक देश म्हणुन विचार करता स्वार्थासाठी तिथे गेलेल्यांची जवाबदारी सरकारने का घ्यावी हा प्रश्नही पडतो.

In reply to by Trump

अशा परिस्थिती मध्ये फुकट आणावे लागते आणि त्या खर्चाचा भार आमच्यासारख्या करदात्यांवर पडतो.

In reply to by टर्मीनेटर

तक्षिलाचा हा पेपर ह्या संबंधात वाचावा. खूप छान माहिती आहे. https://takshashila.org.in/policy-brief-capacity-analysis-for-evacuatio… नैतिकता : परदेशांत अडकलेल्या भारतीयांना देशांत आणण्याची जबाबदारी भारत सरकारची आहे का ? माझ्या मते नाही. पण प्रत्यक्षांत लोकांचा दबाव, करुणाभाव ह्यामुळे वारंवार भारत सरकार ह्यांत ओढले जाईल ह्यांत शंका नाही. बरे ह्यासाठी सरकारने स्पष्ट नियम करुन काही रेषा केल्या तरी सुद्धा अश्या नियमाना लोकांच्या दबावाखाली सरकार ऐनवेळी बदलेल त्यामुळे असे नियम करून फायदा नाही. उदाहरणार्थ भारत सरकार प्रत्येक प्रदेशासाठी एक झोन नंबर देईल. झोन ३ मध्ये ज्यांना बाहेर पडायचे आहे त्यांना दूतावास मदत करेल पण झोन ४ मधील भारतीयांना करणार नाही तिथे त्यांनी आपल्या जबाबदारीवर राहावे/जावे. इत्यादी. पण एकदा भारतीय चॅनेल्स वर रडणाऱ्या मुलांची चित्रे दाखवली गेली कि मग लोकांच्या दबावाखाली सरकार झुकेल आणि एकदा भारतीय सरकार झुकेल म्हटल्यावर भविष्यांत कदाचित भारतीय नागरिकांना वेठीस धरण्याचे इतर राष्ट्रांचे, बंडखोरांचे धोरण सुद्धा आपोआप वाढेल. तंबाखू खाऊन कँसर झाल्यानं सरकारने फुकट कँसर ट्रीटमेंट द्यावी का ? दारू पिऊन अपघात करून घेतला तर अश्या व्यक्तीला सरकारी इस्पितळांत फुकट इलाज मिळावा का हे सर्व प्रश्न शेवटी ह्याच सदरांत येतात. इथे सोपी उत्तरे नाहीत. राजकारण : सिंदिया ह्यांनी विमानात जाऊन वाचवलेल्या मुलांपुढे भाषण ठोकले, एअरपोर्ट मधून बाहेर येताना प्रत्येक पोराला पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले (जसे हे तिथे युद्ध जिंकून परत येत आहेत). हे सर्व बचाव कार्य अनेक राजकारणी मंडळी आपल्या स्वार्थासाठी आणि आपली प्रतिमा उजळवण्यासाठी वापरून घेत आहेत. आता असेच चालू राहिले तर विनाकारण ज्यांना बचावाची गरज नाही त्यांना सुद्धा "वाचवून" मंडळी आपले फोटो पेपर मध्ये छापून आणायला मागे पुढे पाहणार नाही. युक्रेनमधील विद्यार्थ्यांची समस्या: खरी समस्या आता निर्माण होणार आहे. किमान २०,००० विद्यार्थी आता देशांत परत येतील. पैसेही गेले आणि डिग्रीही नाही अशी अस्वस्थ झाल्याने हि मंडळी आता सरकारने नुकसान भरपाई द्यावी किंवा भारतांत मेडिकल ऍडमिशन द्यावे अशी मागणी करणार. मग त्यासाठी कोर्टांत जातील, मग कोर्ट आपले फतवे काढील. हा सर्व गोंधळ माझ्या मते आत्ताच कुठे सुरु होत आहे. येत्या काही महिन्यात हा आणखीन वाढेल. युक्रेन भारतासाठी अवघड जागीचे दुखणे होते. कारण आक्रमणाच्या आधी भारताने विद्यार्थ्यांवर दबाव टाकून बचावकार्य सुरु केले असते तर भारताला आक्रमणाची अपेक्षा आहे अशी भारताची भूमिका आहे असे सर्वाना वाटले असते. भारतीय दूतावासाला ते नको होते. भारतीय विद्यार्थी गेल्यास इतर जातील आणि त्यामुळे ह्यांना वेठीस धरता येणार नाही म्हणून युक्रेनी विद्यापीठांनी मुद्दाम विद्यार्थ्यांना "देश सोडल्यास आम्ही डिग्री सुद्दा देणार नाही, परत येऊन कम्प्लिट करायला मिळणार नाही" असे नियम केले (असे मी वाचले). व्यावहारिक तोडगा : माझ्या मते परदेशी भारतीयांचे बचावकार्य राजकारणापासून वेगळे करून भारतीय दूतावासाच्या ताब्यांत १००% दिले पाहिजे त्यामुळे राजकारणी मंडळी इथे विनाकारण लुडबुड करणार नाही. सध्या तीन भारतीय मंत्री म्हणजे बचावकार्यासाठी युरोप मध्ये गेले आहेत. ह्याची काय गरज होती ? परराष्ट्र खात्यांत बाबू मंडळींना ह्यांत गती नाही का ? सिंदिया किंवा सिंग नक्की असे काय तारे तिथे तोडणार आहेत ? तक्षशिला च्या पेपर प्रमाणे साधारण प्रत्येक देशासाठी वेगवेगळी योजना आधीच बनवून ठेवली जाऊ शकते. ह्यांत खाजगी विमा कंपन्या, विमान कंपन्या इत्यादींना सहभागी करून घेतल्यास बचावकार्याची क्षमता वाढू शकते. ह्या सर्वाला चांगला पर्याय म्हणजे आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय विमा कंपन्यांना हाताला घेऊन प्रत्येक प्रदेशाला धोक्याची पातळी देणे. पातळी ओलांडली कि आपोआप बचाव कार्य सुरु केले जाऊ शकते. त्याशिवाय विद्यार्थी कर्जासाठी बँकांनी बचावकार्य विमा हा अनिवार्य केला पाहिजे. म्हणजे तुम्ही एखाद्या देशांत गेला आणि काही नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध ह्यामुळे आपले शिक्षण पूर्ण नाही झाले तर विमा कंपनी आपले कर्ज फेडेल. जे विद्यार्थी कर्ज काढत नाहीत त्यांना सुद्धा हा विमा उपलब्ध असला पाहिजे. ह्या विम्याची खासियत म्हणजे ज्या देशांत जास्त धोका आहे तिथे आपोआप विम्याचे प्रीमियम वाढत जातील. त्याशिवाय विमा कंपनी बचावकार्य सुद्धा आपल्या हातांत घेऊ शकते. विमा कंपनीने विद्यार्थ्यांना देशांतून बाहेर पडायला सांगितले (विमा कंपनीच्या खर्चाने) आणि विद्यार्थी पडले नाहीत तर आपोआप विमा रद्द होईल. त्यामुळे विद्यार्थी कंपनीचा सल्ला जास्त गांभीर्याने घेतील.

In reply to by साहना

संपूर्ण प्रतिसाद आवडला. युक्रेनहून सरकारने परत मुंबईत स्वखर्चाने आणल्यावर, मग पुढे, आपापल्या शहरांत पोहोचवण्याची व्यवस्थाही सरकारनेच (अर्थात त्याच्या खर्चानेच) करावी, अशी अपेक्षा काही विद्यार्थी जाहीरपणे व्यक्त करताहेत. वास्तविक, दिसला कॅमेरा, व मिळाला माईक नाकाखाली, की कुठल्यातरी व्यवस्थेविषयी तक्रार करत सुटणे हा, माझ्या निरीक्षणानुसार, अगदी खास भारतीय अवगुण आहे. इतरस्त्र, व विशेषतः पूर्व आशियांत दिसून येत नाही.

In reply to by साहना

माझ्या मते परदेशी भारतीयांचे बचावकार्य राजकारणापासून वेगळे करून भारतीय दूतावासाच्या ताब्यांत १००% दिले पाहिजे त्यामुळे राजकारणी मंडळी इथे विनाकारण लुडबुड करणार नाही. सध्या तीन भारतीय मंत्री म्हणजे बचावकार्यासाठी युरोप मध्ये गेले आहेत. ह्याची काय गरज होती ? परराष्ट्र खात्यांत बाबू मंडळींना ह्यांत गती नाही का ? सिंदिया किंवा सिंग नक्की असे काय तारे तिथे तोडणार आहेत ? माझ्या मते यात तीन गोष्टी आहेत. 1. मंत्रीगणांना वेगवेगळ्या डीपार्टमेंट्स मध्ये समतोल राखण्यासाठी वापरले जाईल. या विद्यार्थ्यांना इमर्जन्सी व्हिसा मिळवून देणे, त्या साठी वेगवेगळ्या डीपार्टमेंट्स शी बोलणे, तातडीच्या गोष्टी खाणे, पैसे, इतर जरूरीच्या गोष्टी उपलब्ध करून देणे इत्यादी. या सर्वसामान्य एम्बसी च्या अखत्यारीत येणाऱ्या गोष्टी नाहीत. एम्बसी च्या लोकांना अशा कामाचा अनुभव ही नसतो. सरकारी नोकर सर्वसाधारणपणे प्रोसिजर फॉलो करतात. तातडीने निर्णय घेण्यासाठी जनप्रतिनिधी तिथे असणे सर्वथा योग्य आहे. 2. दुसरं म्हणजे त्या देशाशी बोलण्यासाठी उच्च स्तरावरील मंत्र्याला जास्त अधिकार असतात. एम्बसी मधील सर्वोच्च अधिकारी सुद्धा सरकारी नोकरच असतो. त्यामुळे जोपर्यंत तो दिल्ली कडून वेगळे आदेश येत नाहीत तोपर्यंत एखादा निर्णय जागेवरच बदलणार नाही. बदलत्या परिस्थितीत हे योग्य आहे. 3. तिसरी गोष्ट म्हणजे एम्बसी च्या लोकांना मंत्री इथे आहे याचा धाक असतो. गोष्टी सिरियसली घेतल्या जातात. मुळात मंत्र्याला इथे पाठवले जाणे हे कदाचित त्यांना अपमानास्पद ही असावे कारण त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उत्पन्न होते, पण सध्या जे ऐकू येत होते की उदाहरणार्थ पोलंड एम्बसी ने नंतर नंतर फोन सुद्धा उचलायचे बंद केले होते, त्याला या मुळे पायबंद बसेल. मंत्रीगण तिथे युद्धजन्य परिस्थितीत (कदाचित स्वतःचा जीव धोक्यात घालून ) जात आहेत ही नेहमीची गोष्ट नव्हे, ते तिथे फिरायला जात नाहीयेत आणि भारतासाठी परिस्थिती असमान्यपणे गंभीर करून ठेवली गेलेली आहे हे यावरून स्पष्ट होते.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

येमेनला मला वाटते व्ही के सिंग आपली एक युध्द नौका घेऊन गेले होते. व त्यांनी युध्द चालू असताना अनेक भारतीयांबरोबर ४३ देशांच्या नागरिकांना सोडवले होते. मला वाटते त्यांचा गौरव अनेक देशांनी केला होता व त्यांना एक आंतरराष्ट्रीय सन्मानही प्राप्त झाला होता. भारताला प्रगती करा॑यला कितीही वाव असला तरी भारत अगदी टाकाऊ आहे असे मला तरी वाटत नाही.

हाच न्याय लावला तर सगळेच स्वार्थासाठी काम करतात म्हणावे लागेल. भारतात राहणारे काय फुकट काम करतात का? टॅक्स भरणारे काय फक्त देश प्रेम आहे म्हणून भरतात का? अडचणीच्या काळात आपल्या देशाने मदत करायची नाही तर कोणी करायची? टॅक्स भरणारे हिथे राहून पैसे कमावतात म्हणूनच टॅक्स आपल्या कमाईवर टॅक्स भारतात. आज जो न्याय देशाला लावला जातोय तोच उद्या आपल्या शहराला, गावाला लावला जाईल. प्रत्येकाने कधी ना कधी स्थलांतर केलेलेच असणार, देशाबाहेर नसेलही केले पण आपला गाव , शहर सोडले असेलच की.

In reply to by रात्रीचे चांदणे

गाव/शहर वेगळं नी देश वेगळा. पंजाबवर हल्ला झाला तर तामीळनाडूचा सैनिक ही जिव द्यायला तयार असतो. आता युक्रेन वर हल्ला झाला तर कुणी भारतीयाने का जिव द्यावा? गावाची ना देशाची तुलना अयोग्य आहे. जे ऊच्च राहणामाणासाठी युरोपात जातात त्याना तो देश संकटात सापडल्यावर बरं भारत आठवतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युक्रेनच्या सिमेवर सैनिक स्थलांतरीतांना लाथाबूक्क्यानी तुडवताहेत ते ह्याच रागातून. मी सैनिक असतो नी भारतावर हल्ला झाल्यावर ईथे पोट भरायला आलेले ईतरदेशीय लोक असे पळताना दिसले असते तर असंच तुडवलं असतं.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ते पुढच्या वर्षी पर्यंत दिल्ली वैगरे वर बॉम्बफेक होणार आहे, आणि मग महायुद्धात आपल्याला पण सैन्यात भरती व्हावं लागणारच आहे, तेव्हा आपण करू असच, तोपर्यंत जरा फिटनेस वर लक्ष द्या गरज आहे देशाला आपली.

In reply to by रात्रीचे चांदणे

आता देशांत किंवा देशाबाहेर असा कोण आहे जो निव्वळ निस्वार्थी पणे काम करतो ? बहुतेक लोक शेवटी आपले हित आणि आपल्या परिवाराच्या हितासाठी प्रवास करतात, काम करतात. ह्यांत चुकीचेही नाही आणि ह्या लोकांना स्वार्थी म्हणून वेगळे काढून हिणवण्यात सुद्धा काही अर्थ नाही. पंजाबी लोक जगांत सर्वत्र आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी संकट सुरु झाले कि ह्यांचा लंगर कसा सुरु आहे ह्याच्या बातम्या येतात. युक्रेन मधील निर्वासित ट्रेन्स मध्ये ह्यांचा लंगर सध्या सुरु आहे. तीच गोष्ट इस्कॉन वाल्यांची युक्रेन तसेच पोलंड, रोमानिया इथे कृष्णमंदिरे लोकांच्या सेवेसाठी आणि अन्नछत्रा साठी सतत चालू आहेत. कॅनडा मधील शीख लोक मोठ्या प्रमाणावर त्यांच्या सैन्यात भरती होतात, तीच गोष्ट अमेरिकेची आहे. चिनी, जपानी किंवा भारतीय लोक सुद्धा त्यांच्या नवीन देशांत मोठा प्रमाणावर सैन्यात भरती होतात. अमेरिकेत तर असंख्य तेलगू लोक निव्वळ अमेरिकन राष्ट्रीयत्व वेगाने मिळावे म्हणून अमेरिकन सैन्यांत भरती होतात इतकेच नाही तर त्यांनी अफगाणिस्तान, इराक मध्ये जीव सुद्धा धोक्यांत घातला आहे. भारतांत स्थलांतर तर नेहमीच होत आले आहे. कोंकण प्रांतात म्हणे ब्राम्हण लोक परशुराम ह्यांच्या सोबत आले. सारस्वत मंडळी तर उत्तरेहून स्थलांतर करून आली. ह्यांनी कोंकण प्रांतात भरभराट आणली नाही का ? विविध मराठा सरदार स्वराज्यनिमित्त पंजाब, हरियाणा इत्यादी स्थायिक झाले ह्यांनी संकटाच्या वेळी शेपूट घालून पळ काढला का ? तीच गोष्ट पारसी लोकांची. टाटा सारख्या श्रीमंत लोकांनी फ्रांस मध्ये शिक्षण घेतलेच पण तिथल्या सैन्यात सुद्धा भरती झाले. पळून आले नाहीत. मुबईला धोका उत्पन्न होताच बाहेरील लोक पळून जातात हे अजिबात सत्य नाही. मुबई वरील हल्ला तसेच प्रथम पूर परिस्थितीत बंगाली, बिहारी, तेलगू असोसिएशन लोकांनी प्रचंड मदत कार्य केल्याचे मी स्वतः पहिले आहे. काही लोक गेले असतीलच पण त्याच प्रमाणे अनेक मराठी लोक सुद्धा मुबई सोडून आपल्या गावी गेले असतील. ते सोडून द्या, मुंबईत तर मजूर मंडळी दररोज जीव धोक्यांत घालून मुंबईकरांना जीवन सुकर करून देतात. भर पावसांत स्वीग्गी वाला आपली डिलिव्हरी घेऊन येणारे, गटारे साफ करणारे, इमारतीवर चढून काचा साफ करणारे, पूर परिस्थितींत टॅक्सी इत्यादी चालविणारे, २६/११ दरम्यान हॉटेलांत सर्व लोकांना सुरक्षित पणे बाहेर काढणारे, कोविड मध्ये नर्स म्हणून हॉस्पिटल मध्ये काम करण्यार्या सर्व व्यक्ती मराठीच असतात का ? राज्याबाहेरील किंवा शहराबाहेर मुळे असणाऱ्या असंख्य व्यक्ती मुंबईच काय किंवा इतर शहरे चालू ठेवतात. मध्यपूर्वेत मजूर म्हणून काम करणारे भारतीय, मोठ्या शिप्स वर काम करणारे गोवेकर हि मंडळी आपला जीव धोक्यांत घालून ह्या देशांत काम करत आहेत. मध्यपूर्वेत तर असंख्य भारतीय मजूर कामाच्या नादांत मारले जातात. स्थलांतर, सतत प्रवास, व्यापारासाठी प्रवास ह्या गोष्टी भारतीयांसाठी नवीन नाहीत अत्यंत पुरातन काळा पासून ह्या गोष्टी होत आल्या आहेत. त्यांत चुकीचे काहीच नाही उलट जिथे आपल्या ज्ञानाचा किंवा कौशल्याचा सन्मान होत नाही अश्या प्रदेशांतून तात्काळ स्थलांतर करून जिथे आपला सन्मान होईल तिथे जाऊन राहावे असा सल्ला कौटिल्य आपल्या पुस्तकांत देतात. इतर प्रदेशांत जाऊन प्रसंगी जीव धोक्यांत सुद्धा घालणारे लोक शेवटी आपल्या फायद्यासाठीच जातात, पैश्यासाठीच काम करतात पण स्वार्थी लोक पळून जातात किंवा आपला जीव धोक्यांत घालत नाहीत हा आरोप खोटा आहे. स्थलांतर आणि शौर्य (किंवा भ्याडपणा) ह्यांचा काहीही संबंध नाही. वर वर आपण मोठे मानवतावादी, सर्वाना समान मानणारे आहोत असा आव आणणारच व्यक्ती प्रत्यक्षांत प्रचंड वंशभेदी, वर्णभेदी, आणि इतर प्रकारचे भेंदि असतात असेच तरी येथील चर्चेवरून वाटते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा पराकोटीचा भेद आणि द्वेष फक्त अंतरराष्ट्रीय पातळीवर नसून, राज्य, भाषामी शहर, गांव आणि कदाचित आता आपली हाऊसिंग सोसायटी पातळीवर सुद्धा हि मंडळी दाखवत आहेत ! > टॅक्स भरणारे काय फक्त देश प्रेम आहे म्हणून भरतात का? केरला सारख्या राज्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर विदेशांत काम करणाऱ्या मजुरांनी पाठविलेल्या पैश्यावर अवलंबून आहे. तीच गोष्ट गोव्याची. दोन्ही राज्यांनी आपल्या विदेशांत राहणाऱ्या लोकांसाठी खास सरकारी डिपार्टमेंट सुरु केले आहे, उपकार म्हणून नाही तर त्यांच्याकडून पैसे येतात म्हणून.

In reply to by हरवलेला

परदेशी भारतोयं बद्दल हि पोटदुखी खूप वेळा दिसते. देशाच्या बाहेर जाणारे लोक हे देशाच्या कामाला येतात हे ह्या जळू लोकांना काळात नाही. आज सर्व जगभर विखुलेले भारतीय शिक्षण, व्यापार, करून देशासाठी एक प्रतिनिधी होतात. त्याचे फायदे कळायला थोडी दूरदृष्टी असावी लागते. दुर्दैव कि घर ना ऑफिस एवढेच विश्व असणाऱ्या लोकांना हे कळत नाही

युद्ध ही दोन देशातील सरकार मधील च असतात.सामान्य लोक विनाकारण त्याची शिकार बनतात .सरकार काय पॉलिसी राबवते किंवा काय निर्णय घेत आहे.. ह्या वर नियंत्रण फक्त जागरूक,, हुशार जनता असेल तर च शक्य असते. पण सरासरी जनता इतकी जागरूक नसते किंवा कोणत्या तरी विचार श्रेणी ची गुलाम असते.. मग असे युद्ध सारखे प्रसंग येतात. युक्रेन आणि रशिया मध्ये युद्ध होण्या इतकी स्थिती का आली.. माझ्या मते . युक्रेन रशिया चा पारंपरिक कट्टर विरोधक असलेल्या अमेरिकेला दारापर्यंत घेवून आला. हेच कारण असावे भाऊ की मध्ये पण घराच्या शत्रू ल स्वतःची जागा विकून शत्रू ला शेजारी राहण्यास संधी देण्या मुळे ग्रामीण भागात भांडण होतात तसाच काही तरी रशिया आणि युक्रेन चा प्रॉब्लेम आहे

In reply to by sunil kachure

याच विचारसरणीची लोक इंग्रज यायच्या आधी मुघलांच्या आणि नंतर इंग्रजांच्या चाकरीत धन्य होऊन गेले ...

जेवणं झाली असतील मिपाकरांची .....मग होऊन जाऊदे परत एकदा सुरुवात ....पोटावर हाथ फिरवत फिरवत

युद्ध हे सैनिक पातळीवर च लढले जावं.हा स्टँडर्ड विचार झाला आणि तो योग्यच आहे. सामान्य लोकांस निशाणा बनवणे माणुसकी विरुद्ध आहे. रशिया नी युक्रेन मधील शहरांवर हल्ला चढवला आहे. बॉम्ब हल्ले केले आहेत. अशी सर्व मीडिया दाखवत आहे. पण रशिया चे असे म्हणणे आहे हा आरोप चुकीचा आहे रशियन फौज सामान्य लोकांस टार्गेट करत नाहीत..फक्त सैनिकी ठिकाणावर च हल्ले केले जात आहेत. मीडिया चुकीचं दाखवत आहे. नक्की कोणाचे सत्य आहे. रशिया योग्य बोलत असेल तर मीडिया नी गंभीर होणे गरजेचे आहे. जबाबदारी नी reporting करणे गरजेचे आहे. आज पर्यंत युद्ध चालू आहे ते युक्रेन च्या भूमीवर चालू आहे. ह्याचा अर्थ सरळ नुकसान फक्त युक्रेन च होत आहे. युक्रेन अध्यक्षांनी स्वतःचा गर्व बाजूला ठेवून चर्चेला प्राधान्य द्यावे.. स्वतःच्या हट्ट पायी स्वदेश च बरबाद होण्यासारखी वागू नये. युक्रेन चे सत्ता उलथून लावण्यासाठी मर्यादित लष्करी कारवाई करून युक्रेन सरकार मधील नेत्यांना रशिया कैद करू शकतो तो मार्ग रशिया नी अवलंबला पाहिजे. मनुष्य हानी चे समर्धन होवू शकत नाही.

सध्या जागतिक मीडिया Ukraine च्या बाजूने आहे. पूर्ण अमेरिकेत छोट्या गोष्टी मोठ्या करून सांगितल्या जात आहेत. e.g. सहा वर्षांच्या मृत्यू वगैरे. युद्ध हे वाईटच पण वस्तुस्तिथी कशी दाखविली जाते त्यावर बरच काही आहे. आतापर्यंत फारतर १००० जण मारले गेले आहेत. मला वाटते Putin handling it very carefully . इराक युद्धमध्ये १ आठवड्यात ८०,००० लोकांना मारले आमच्या लोकशाहीप्रेमी अमेरिकेने. खालची BBC बातमी वाचा. Ukraine ने भारतीय लोकांनां फार वाईट वागणूक दिली. https://www.bbc.com/marathi/international-60555760

इंडिया टुडे च्या बातमीनुसार फेसबुक, ट्विटर ने ukrain विरिद्धच्या बातम्या फेक म्हणून काढून टाकल्या आहेत. सध्यातरी बातम्यांवर जे अमेरिका आणि युरोप ला जे पाहिजे तेच बघायला मिळत आहे. फेसबुकवर ukrain सैन्य कसे बहादूरीने लढत आहे याचे शेकडो विडिओ पोस्ट होत आहेत, ukrain चे सैन्यच नाहीतर साधी जनता ही रशियन सैनिकांच्या समोर येऊन शिव्या देत आहेत. रशियन सैन्य मात्र मुकाट्याने ऐकून घेत आहेत. Quora वरतीही रशियन बाजू घेणाऱ्या पोस्ट अचानक गायब झालेल्या आहेत.

In reply to by रात्रीचे चांदणे

हे युद्ध सोशल मिडियावरचे आहे! मिस-इन्फॉर्मेशन, डिस-इन्फॉर्मेशन पासून सर्व काही वापरले जाणार!

In reply to by रात्रीचे चांदणे

* ४० मैल लांबीची महाप्रचंड रशियन कॉन्व्हॉय (काफिला) उत्तरेकडून क्यिव च्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. ह्यांत नक्की काय आहे ठाऊक नाही पण सैन्य, light armoured vehicles, रसद इत्यादी असेल असा कयास आहे. https://pbs.twimg.com/media/FMshs0NXIAU_W3-?format=jpg&name=medium * पोलंड आणि बल्गेरिया ह्यांनी एकूण सुमारे ४० मिग आणि सुखोई विमाने युक्रेनला दिली आहेत. युक्रेनी पायलट नि हि काही तास आधी ताब्यांत घेतली. * तुर्की चे TB२ ड्रोन्स युक्रेन ने आधी प्रभावी पणे वापरले होते पण रशियन्स नि ते उडवून लावले होते अशी माहिती होती पण काळ आणखीन ड्रोन फुटेज उपलब्ध झाली. हे नवीन आहेत कि आधीचेच ठाऊक नाही. * टर्कीच्या ह्या ड्रोन्स ना आता भयंकर मागणी येईल. भारताने सुद्धा हे द्रोण घ्यायचे ठरवले होते पण शेवटी इस्रायली ड्रोन्स घेतले. अमेरिकन प्रिडेटर ड्रोन्स ची ऑर्डर भारताने हल्लीच रद्द केली आहे. * भारताने युक्रेनला मानवतावादी मदत पाठविण्याचे आश्वासन दिले आहे. * भारत रशियाने एकत्र निर्माण केलेले ब्राम्होस क्षेपणास्त्र इथे वापरले जाईल का ह्यावर सर्वांची नजर होती. रशियाने प्रभावी पणे ते वापरले असते तर भारताला ह्याची जास्त निर्यात करता आली असती. पण ते वापरले गेले नाही. * ट्रम्प तसेच ओबामा ह्या दोन्ही राष्ट्राध्यक्षांच्या हाताखाली काम केलेली, पुतीन ह्या विषयावर गाढा अभ्यास असलेली श्रीमती हिल ह्यांनी पॉलिटिको ला ह्या विषयावर विस्तृत मुलाखत दिली. माझ्या मते फार छान आहे. हिल आणि ट्रम्प ह्यांचे शेवटी भांडण झाले होते. https://www.politico.com/news/magazine/2022/02/28/world-war-iii-already… थोडक्यांत : "पुतिन ह्यांनी उचललेली पावले हि अनपेक्षित नाही. उलट ट्रम्प पुतीन भेटीत पुतीन ह्यांनी अगदी स्पष्ट पणे ट्रम्प ह्यांना ह्या विषयावर धमकावले होते (हिल ह्या त्यावेळी तिथे उपस्थित होत्या) पण ट्रम्प तसेच इतर पाश्चात्य मंडळींनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही. आण्विक अस्त्रे पुतीन वापरणार का ? तर १००% होय. इतकेच नव्हे तर पुतीन ह्यांनी ह्या आधी आण्विक शस्त्रे तसेच जैव शस्त्रे लंडन मध्ये वापरून काही लोकांना ठार मारले होते. एक जैव अस्त्र तर अत्तराच्या बाटलीतून पाठवले होते आणि हजारो लोकांना मारण्याची क्षमता त्यांत होती पण शेवटी जास्तीत जास्त ३ लोक मेले." * पुतीन ह्यांना काही रोग झाला असेल किंवा त्यांची मानसिक स्तिथी ठीक नसेल ह्याला हिल ह्यांनी दुजोरा नाही दिला. हा माणूस आधीपासून असाच होता आम्हीच त्याला गांभीर्याने घेत नव्हतो असे सांगितले. * युक्रेन मधील डिंप्रो हि महत्वाची नदी आहे. दिना ह्या देवीवरून ह्या नदीचे नाव आहे किंवा हि नदीच दिना हि देवी आहे. रिग्वेदांत ह्या देवीचा उल्लेख आहे. इतर नदीची नवे सुद्धा दनु ह्या शब्दावरूनच आहेत. दनु ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ "पाणी" असा होतो. दानुद म्हणजे वाहणे. * युक्रेन मधील युद्धावरून वर्णभेद हा विषय वर आला आहे. भारतीय लोक आणि काळ्या लोकांवर युक्रेनियन सैन्याने अत्याचार केला आहे अश्या बातम्या येत आहेत. पण रोमा हे भटके लोक भारतातून युक्रेन आणि पूर्व युरोपिय प्रदेशांत हजारो वर्षांपासून आहेत, जुना भारतीय हिंदू धर्म सुद्धा ह्यांनी (काही प्रमाणात) जोपासला आहे. ह्या लोकांवर ह्या प्रदेशांत अनेक वर्षांपासून अत्याचार होत आहे. ह्यावर सुद्धा ह्या निमित्ताने टिप्पणी करावी लागली. अमेरिकेत सुद्धा काही रोमा लोक आहेत आणि आजही भटके प्रकारचे आहेत. ट्रेलर वगैरे घेऊन त्यांत राहतात. पेवर्स म्हणजे फुटपाथ निर्माण करणे हा ह्यांचा प्रमुख व्यवसाय, आणि हे काम विविध ठिकाणी असल्याने हि मंडळी भटकत राहू शकते. युरोप मध्ये ह्यांच्यावर हि मंडळी चेटूक करते आणि लहान मुले चोरते असे आरोप ह्यांच्यावर केले जातात. सध्या युक्रेन मधील रोमा लोक जंगलांत भटकून जंगली फुले, फळे विकून पोट भरतात.