Skip to main content

खाजवा डोकं : अक्षरांच्या पलीकडे

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 15/02/2022 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दखेळ हे भाषिक मनोरंजनाचे एक महत्त्वाचे व रंजक अंग. गेल्या काही वर्षात इथे विविध प्रकारचे शब्दखेळ सादर झालेत. मागचा महिना खऱ्या अर्थाने गाजला तो वर्डल या शब्दखेळाने. त्याच्या जोडीला त्याची इतर प्रारूपे (Ab, Dor, शब्दक) देखील सादर झाली. आपल्यातील अनेक जण त्याचे व्यसनी झालेत. अर्थात तो खेळ आता अंगवळणी पडल्याने त्यातले नाविन्य संपले आहे. एक नित्यकर्म म्हणून दिवसाकाठी आपण एखादा शब्द आवडीने सोडवत राहू. पण आता असे वाटले की, निव्वळ अक्षरपालट व शब्दशोध याच्या पलीकडे जाऊन एक नवा खेळ, जो बुद्धीला वेगळी चालना देईल, असा शोधावा. या खेळाचे स्वरूप असे आहे : प्रश्नकर्ता एखादा प्रसंग किंवा घटना थोडक्यात येथे लिहिल. मग त्याच्यावर आधारित एक दोन प्रश्न विचारेल. सहभागींनी नीट विचार करून त्याचे उत्तर लिहावे. विचारला गेलेला प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा किंवा एकाच शब्दात उत्तर असलेला (हो/नाही) नसावा.अपेक्षित उत्तर आल्यावर प्रश्नकर्ता तसे जाहीर करेल. त्यानंतरच दुसर्‍या कोणीही दुसऱ्या दिवशी नवा खेळ किंवा कोडे द्यावे. खेळाच्या स्वरूपासंबंधी काही सूचना करतो. सर्वांनी विचार करून मत द्यावे. १. दिवसाला एकच प्रश्न /खेळ ही मर्यादा पाळूच पाळूया. म्हणजे लवकर कंटाळा येत नाही. २. रोजचा दिवस भारतीय वेळेनुसार 00.01 वाजता सुरू होईल. त्यानंतर जो प्रथम प्रश्न देईल तो त्या दिवसाचा (चोवीस तासांचा) खेळ लागू होईल. ३.एखाद्या खेळाचे उत्तर लवकर दिले गेले तरी नंतर येणाऱ्या लोकांना तो दिवसभर त्यावर चर्चा, सूचना, सुधारणा करता येतील. ४. 20 तासात कोणीच उत्तर दिले नाही तर प्रश्नकर्त्याने उत्तर सांगून त्याच दिवशी खेळ संपल्याचे जाहीर करावे. ५. लागोपाठच्या दोन दिवसांमध्ये प्रश्नांचे विषय पूर्ण वेगळे असावेत. (गणित, भाषा, भूगोल, सामान्यज्ञान, रहस्य, इत्यादी). …… सूचनांचे स्वागत. उद्यापासून प्रत्यक्ष खेळ सुरू करता येईल

वाचने 33397
प्रतिक्रिया 134

प्रतिक्रिया

In reply to by हेमंतकुमार

शालेय पुस्तकात होती ही कथा. खिशात बसवायची अट न्हवती पण ती वस्तू आणण्यासाठी थोडेसे पैसे प्रत्येक मुलाला दिलेले असतात. सगळ्यात धाकटा मुलगा ती रुम स्वच्छ झाडतो, साफसाफाई करतो आणि मिळालेल्या पैशातून एक देवाची तसबीर आणि उदबत्त्या आणतो. तेथे देवाची प्रार्थना करत राहतो. रुममध्ये असलेला उदबत्तीचा दरवळ आणि प्रसन्नतेने रुम भरली जाते.

In reply to by सुरिया

छान. कल्पना योग्य. अपेक्षित उत्तर थोडेसे पण याच धर्तीवरचे आहे. अन्य कोणी सांगू शकता.

In reply to by नि३सोलपुरकर

उदबत्ती / अगरबत्ती एकच झाले ना . छानपैकी खिशात मावणारी अन्य कुठली वस्तू असेल?

**एल ई डी बल्ब आणला असेल. उजेडाने भरुन जाइल.>>> किंवा काडेपेटी. तो मुलगा काडी पेटवून दाखवतो आणि खोली उजेडाने भरून जाते. ... धन्यवाद.

एक यंत्रणा ओळखायची आहे. तिचे वर्णन असे : यंत्रणेचे दोन मोठे भाग आहेत. प्रत्येक भागाचे पाच उपविभाग आहेत. प्रत्येक उपविभागात काही महत्त्वाच्या गोष्टी क्रमाने रचलेल्या आहेत. त्या गोष्टींची संख्या खालील प्रमाणे आहे : • वरचा भाग : 1, 2, 8, 5, 14. • खालचा भाग : 1, 3, 7, 5, 14. ही यंत्रणा ओळखण्यासाठी तुम्हाला कुठेही गावभर शोधत बसायची गरज नाही. पहा जरा जवळच डोकावून ! कदाचित सापडूनही जाईल लगेच 😀

उदा. मेंदू किंवा ऋदय वगैरे. तथापि हा अभ्यासाचा विषय नसल्याने नेमकं सांगता येणार नाही. तसाही हा माझा आपला अंदाज आहे.

In reply to by श्वेता२४

छान प्रयत्न ! निदान कुठल्या यंत्रणेत डोकवायचे आहे ते तुम्हाला समजले !

In reply to by हेमंतकुमार

मी कि बोर्डावरची बटणे मोजुन त्याचे कॉबिनेशन असे होते का ते बघत बसलो होतो. पैजारबुवा,

In reply to by नीळा

वरचा भाग म्हणजे संपूर्ण हात असेल तर खालचा भाग काय असेल ? :)

In reply to by नीळा

हात आणी पायाची हाड बरोबर. ....... या खेळातील वरचा भाग = एक संपूर्ण हात (म्हणजे खांदा ते बोटांची टोके) खालचा भाग = एक संपूर्ण पाय( म्हणजे खुब्या पासून ते पायाच्या बोटाच्या टोकांपर्यंत) या प्रत्येकातील टप्प्याटप्प्याने लिहिलेली हाडांची संख्या आहे ती

तीन मित्र चहा प्यायला जातात ३० रुपये खर्च होतो, मालक त्या दिवशी खुश असतो आणि वेटर ला ५ रुपये देतो आणि म्हणतो कि जा त्याना हे परत दे आजची खास सवलत म्हणून वेटर विचार करतो कि आता हे ५ रुपये ३ जणात समसमान कसे वाटायचे ? तो त्यातील २ रुपये स्वतःकडे ठेवतो आणि तिघांना १ रुपया प्रत्येकी देतो आता हिशेब बघा हा कसा होतो ते - प्रत्येकाने सुरवातीला १० रुपये खर्च केले पण त्यातील एक रुपया परत मिलायन्स प्रत्येकाचे ९ रूपयेच खर्च झाले म्हणजे एकूण २७ - वेटर कडे २ रुपये - एकूण बेरीज २९ मग १ रुपया गेला कुठे ? ( आपणास उत्तर सहजी माहिती असल्यास लागेचच सांगू नका ज्यांना माहिती नाही त्यांना खाजवूद्या कि जरा खाजवूद्या कि .. डोकं )

In reply to by चौकस२१२

चालू खेळ अजून पूर्ण झालेला नाही संपूर्ण झाल्यावरच नवीन खेळ घ्यावा ही विनंती.

- एकूण बेरीज २९ मग १ रुपया गेला कुठे ?
खर्च रु २७ + वेटर जवळचे रु २ + परत केलेले रु. ३ असे एकुण रु ३२ होतात. पैजारबुवा,

मित्रांच्या बाजूने खर्चाचा विचार केल्यास त्यांना प्रत्येकी एकेक रुपया परत मिळाल्याने त्यांचा खर्च रु. २७ च झाला. मालकाने दिलेल्या पैशातील २ रुपये वेटरने त्याच्याकडे ठेवले हे मित्रांना माहीत नसल्याने मित्र ताळा करताना २७+२= २९ असा कसे करणार? ताळा करण्यासाठी २७+३ = ३० असेच करणार. मालकाला वेटरने २ रुपये स्वतःकडे ठेऊन घेतले हे माहीत नसल्याने तो ३०-५= २५ असाच हिशोब करणार.

मित्रांनी केलेला खर्च = मालकाला मिळालेले रुपये + वेटर जवळचे रुपये (९+९+९) = (३० - ५) + २ २७ = २५ + २

उत्तर हे आहे कि " " सगळे पैसे जसेच्या तसे आहेत , ना कमी झाले ना वाढले , कोडे लिहिणार्याने लिहताना एक रक्कम जमेच्या बाजूने घेतली आणि एक रक्कम खर्चाच्या बाजूने घेतली आणि चुकीचा आणि फसवा ताळेबंद केला " भौतिक दृष्ट्या मोजा : रुपये ३०च राहिले ना २९ ना ३२ ! मालकांकडे २५ + मितरांकडे ३ + वेटर कडे २ = ३० यांना उत्तर "गवसले" आहे असे म्हण्याला हरकत नाही त्यांनी ताळेबंद बरोबर मांडला फक्त शब्द वेगळे वापरले मी उत्तरचा खुलासा करताना हे कोडे इतरांना घाला , बघ काय उत्तरे मिळतात ते .. लोक भांडताना पाहिलेली आहेत

एक वीशीष्ठ वीषय शीकवणारे गुरुजी असतात. त्यांचा एक शीष्य असतो. सर्व शीक्षण संपल्यावर गुरु शीष्याला म्हणतात आता मी तुझी परीक्षा घेणार आहे. गुरुजी शीष्याला एक प्रश्न वीचारतात. प्रश्न त्यांच्या वीषयाशीच संबधीत असतो. शीष्य ऊत्तर देतो. गुरूजी म्हणतात तुझा अभ्यास पुर्ण झाला आहे. ऊत्तर बरोबर आहे एकदम. पण तु परीक्षेत नापास झालास..... कोणता वीषय होता आणि काय प्रश्न होता?

In reply to by नीळा

विषय होता व्याकरण, आणि प्रश्न होता "हृस्व आणि दीर्घ ह्यामधील फरक काय?" ;)

कोणता वीषय होता आणि काय प्रश्न होता?
वीषय : मातृभाषेतून शालेय शिक्षण प्रश्न : मातृभाषेतून शिकणे मानसिक जडणघडणीसाठी उपयुक्त असते का ? जो याचे उत्तर हो देईल तो सध्याच्या व्यवहारात नापास ठरवला जाईल !

In reply to by हेमंतकुमार

नाही..... तात्वीक नव्हता प्रश्न.... त्या विषयाचा अभ्यास केलेल्या कोणीही तेच ऊत्तर काढले असते

गुरुजी शिष्याला विचारतात "कटप्पाने बाहुबली को क्यो मारा?" शिष्य सांगतो "त्या करता बाहुबली द कनक्लुजन पहा" या उत्तरा करता गुरुजी त्याला नापास करतात कारण तो पर्यंत सर्वांनी बाहुबलीचा दुसरा भाग पाहिलेला असतो. पैजारबुवा,

अजून तासाभराने उत्तर लिहायला हरकत नाही बहुतेक आता कोणी प्रयत्न करत नसावे त्यानंतर नवे देण्यास कोणी इच्छुक असल्यास तसे सांगावे

ते गुरूजी ज्योतिष शास्त्र शिकवत असतात. प्रश्न असा असतो की माझ्या म्रुत्यु ची वेळ आणि तरीख काय आहे? शिष्य योग्य आकडेमोड अरून अचूक ऊत्तर देतो. गुरु म्हणतात अशी कोणालाही म्रुत्युची वेळ आपल्या शास्त्रात सांगायची नसते. तु ऊत्तर बरोबर दिलेस पण परिक्षेत नापास झालास........

चला, एक इमला बांधूयात ! • ४ मातीचे गोळे एकत्र थापून ठेवले. • मग घेतल्या ५ फरश्या व जोडून टाकल्या एकमेकांना आणि ठेवले त्यांना मातीच्या गोळ्यांवर • आता याच्यावर चढले ५ दगड, वा ! • आता यांच्यावर ठेवल्या नगद १२ विटा आणि.... • सर्वात शेवटी यावर ठेवल्या लगोऱ्यामधील ७ चकत्या झाला की नाही हा भक्कम पाया ? ही इमारत नक्की मजबूत असेल की नाही ! कुठल्या इमारतीबद्दल केलेलं वर्णन आहे हे ? जरा स्पष्ट करता का… …. तुमचा विचार होईपर्यंत मी गोष्ट पुढे चालू ठेवतो.... पहिली इमारत उभी राहिली. मग त्याच्या शेजारी दुसरी पण बांधायला घेतली. पण या खेपेस तळातले मातीचे गोळे मात्र तीनच ठेवले. मात्र बाकी काही फरक नाही केला. आता ही पण चांगली झाली दणकट ! मग त्याच्या शेजारी उभी राहिली तिसरी इमारत. या खेपेस तळाचे मातीचे गोळे चक्कघेतले. बाकी मात्र पहिल्या दोघांप्रमाणेच बर का.. अगदी शेम टू शेम ! आता ही बी मजबूत झाली हो .. का बरं झाला असा फरक या तिघींमध्ये ? जरा विस्कटून सांगा की राव !! …………………………………………………………………………………………………

In reply to by हेमंतकुमार

कुमार१, हे कोडं प्रतीकात्मक इमारती बद्दल आहे कि भौतिक ( फिजिकल) उभारणी बद्दल आहे ,, एकदा विचार करतोय कि ३डी मॉडेल बनवावे पण अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत उदाहरण : प्रत्येक गोळ्याचा आकार सारखा आहे का ,, वैगरे !

In reply to by हेमंतकुमार

जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता येईल.

दोन तास राहीले आहेत या आधी मी जो हात व पाय यांचा खेळ दिला होता त्याच प्रकारचा आहे

प्रतीकात्मक इमारत म्हणजे मानवी पाठीचा कणा. त्याचे विविध भाग किंवा टप्पे असतात. त्या प्रत्येकातील मणक्यांची संख्या दिलेली आहे. खालपासून वरपर्यंत गेल्यास ती अशी असते : • तळ : ४ • बूड : ५ • कंबर : ५ • पाठ किंवा धड : १२ • मान: ७ तीन वेगळ्या इमारतींबद्दल : तळाशी जे 4 अपरिपक्व मणके असतात त्यांची संख्या व्यक्तिगणिक बदलू शकते. काही जणांमध्ये तीन तर काही जणांमध्ये पाचही असू शकतात. पण तरीही सर्वांचा कणा मजबूतच असतो. धन्यवाद !

In reply to by मुक्त विहारि

गणितानुसार उत्तर 2 पण प्रतिकात्मक असल्यास परिस्थितीनुसार वेगवेगळे उत्तर....

In reply to by हेमंतकुमार

बरोबर आहे नवरा आणि बायको असेल तर, शून्य ते काही मुले पण, दोन भिन्न संस्कृती एकत्र आल्या तर नंतर फक्त एकच संस्कृती शिल्लक राहते, मग ते मेक्सिको असो किंवा अफगणिस्तान

नवा कूटप्रश्न खाली काही अंक प्रत्येकी एका गटामध्ये लिहिलेले आहेत. प्रत्येक गटात ठराविकच अंक का निवडले असावेत हे ओळखायचे आहे. गट अ : ०, ०, ४, ४ गट ब : ०, ४, ० गट क : १, ०, ५ गट ड : ०, ०, ३ टीप : गणिती सूत्रांचा संबंध नाही. चारही गटांचे सूत्र समान आहे. अंक-क्रम गरजेनुसार बदलू शकता.

In reply to by हेमंतकुमार

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन रात्रीए उशिरा सुटणार्‍या लोकल गाड्यांचे वेळापत्रक आहे का हे? ० म्हणजे रात्री १२ वाजता सुटणारी लोकल गट कदाचित ठाणे लोकल, कल्याण लोकल, कर्जत आणि विरार असे असावे, पैजारबुवा,

In reply to by हेमंतकुमार

चारही गटात प्रत्येकी चार अंक दिलेले नसल्याने हा तर्क बाद ठरवू.

अंकांचा क्रम लावून दिलाय : गट अ : ४ ,०, ४, ० गट ब : ४, ०, ० गट क : १, ५, ० गट ड : ३, ० ,०

दिलेले अंक हे एखाद्या टेनिस सामन्यातील गुणांकन दर्शवतात : ४ ० - ४० ४० - ० १५- ० ३० - ०