Skip to main content

ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२ (भाग ३)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी बुधवार, 19/01/2022 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्यात प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री फिलीप नेरी रॉडरीग्ज यांनी मंत्रीपदाचा आणि आमदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर विफ्रेड डिसा या आमदारांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला आहे. हेच दोन आमदार जुलै २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. ते आता स्वगृही चालले आहेत. परवाच बघितले की २०१७ मध्ये निवडणुका झाल्यानंतर गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या ४० आमदारांपैकी २४ आमदारांनी पक्षांतर केले आहे.आता हे आणखी दोन आमदार दुसर्‍यांदा पक्षांतर करत आहेत. विधानसभेत निवडून आलेल्या ६०% आमदारांनी पक्षांतर केले असे दुसरे उदाहरण बघायला मिळणे अशक्यच वाटते. आता तरी निवडणुकीत पक्षांतर करायची शक्यता नसलेल्यांनाच लोकांनी निवडून द्यावे ही अपेक्षा.

वाचने 48939
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

9 राज्यांमध्ये हिंदूंना 'अल्पसंख्याक' दर्जा देण्याचं प्रकरण, सुप्रीम कोर्ट केंद्रावर नाराज; म्हणाले.. https://lokmat.news18.com/amp/national/grant-of-minority-status-for-hin… -------- राज्यांचा संदर्भ देत त्यात म्हटले आहे की, लडाख, मिझोराम, लक्षद्वीप, काश्मीर, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पंजाब आणि मणिपूरमध्ये हिंदू अल्पसंख्याक आहेत. मिझोराम, मेघालय आणि नागालँडमध्ये ख्रिश्चन बहुसंख्य आहेत तर अरुणाचल प्रदेश, गोवा, केरळ, मणिपूर, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन लोकसंख्या आहे. तरीही त्यांना अल्पसंख्याक समुदाय म्हणून वागणूक दिली जाते. -------- समान नागरी कायदा हवाच, असे माझे वैयक्तिक मत आहे..

आपल्या शेतकरी आंदोलनाशी बरेच साधर्म्य आहे. ओट्टावामध्ये ट्रकचालक रस्ते ब्लॉक करत आहेत. त्यांच्या वॉर मेमोरियलजवळ नासधूस केली आहे. आंदोलनामध्ये निओ नाझींचा शिरकाव झाल्याच्या बातम्या आहेत. आपल्या शेतकरी आंदोलनाबद्दल काळजी दाखवणारे कॅनडाचे पंतप्रधान आता काय करतात ते बघूया BBC Link

In reply to by टिनटिन

एक गोष्ट कळत नाही. कॅनडासारखा टिनपाट देश नक्की कोणत्या आधारावर मागच्या वर्षी शेतकरी आंदोलनात हुषार्‍या करत होता? कॅनडा म्हणजे कायम अमेरिकेचे शेपूट म्हणून राहण्यात धन्यता मानणारा लाळघोटा प्रकार आहे. ना लष्करी महासत्ता, ना आर्थिक महासत्ता, ना तंत्रज्ञानातील प्रगती. तरी अमेरिकेचे शेपूट म्हणून आणि त्यामुळे मिळालेले नाटोचे सदस्यत्व हे सोडले तर कॅनडाकडे नक्की काय आहे? जस्टीन ट्रुडो २०१८ मध्ये भारतात आला होता तेव्हा मोदींनी त्याची फार दखल न घेता त्याची बोळवण केली होती. असल्या देशाच्या असल्या पंतप्रधानांचा असलीच वर्तणूक दिली पाहिजे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

इथले काही आयडी ठराविक लोकांना आणि देशाला लाळघोटे म्हणतात ते समजून घ्यायला आवडेल. स्वतः मोदी आणि भाजपाची चाटूगिरी करायची आणि इतरांना लाळघोटे म्हणायचे म्हणजे कमाल झाली. अजून विकासाचे कोंबडे आरवले पण नाही तरी मोदींनी नुसते धोरण जाहीर केले तरी भक्तांना गुलाबी स्वप्न पडायला लागतात.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कॅनडासारखा टिनपाट देश नक्की कोणत्या आधारावर मागच्या वर्षी शेतकरी आंदोलनात हुषार्‍या करत होता? हे आहे ते तेथील भरकटलेलया २-३-४ शीख पिढीचे कारस्थान ... आणि हि मंडळी फक्त या आंदोलनात नाही तर दरवेळी १५ ऑग किंवा २६ जानेवारी ला भारतविरोधी आरडाओरडा करता असतात . मी कितीदा तरी मन्ड्ले आहे कि इतर देशात जेवहा हे तथाकथित देशव्यापी आंदोलन चालू होते त्यात शिखच का होते जास्त ! भारत डेथ बाय थौसंड कट्स याचा हा भाग

Air India TaTa Group: टाटांनी शब्द पाळला! एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पहिली भेट मिळाली; पीएफ, पेन्शनमध्ये मोठे बदल https://www.lokmat.com/photos/business/air-india-tata-group-epfo-onboar… ------- आता परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे चेले, काय मत व्यक्त करणार?

माझे फॉलोअर्स कमी झाले, वाढतच नाहीत, राहुल गांधींचं ट्विटरच्या CEO ना पत्र... https://www.lokmat.com/national/as-my-followers-dwindle-rahul-gandhis-l… --------- काय बोलावं, ते सुचेना.... ------

In reply to by मुक्त विहारि

संसदेतले खासदार कमी झालेत, अमेठीमधले मतदार कमी झालेत, पक्षाचे लोकांमधुन आलेले नेते कमी झालेत, लोकोपयोगी आंदोलने झालीच नाहीत, पण त्यांना काळजी आभासी जगतातल्या फॉलोअर्सच्या संख्येची. आपलीआपली प्राथमिकता!!

जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड, ८ कर्मचाऱ्यांना बेड्या, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त https://maharashtratimes.com/maharashtra/yavatmal/yavatmal-awdhutwadi-p… ह्या राज्यात मदिरालये चालू आहेत, वाईन विक्रीला पण, मोठ्या जागेतील दुकानांत विकायला परवानगी दिली आणि आता चक्क सरकारी कार्यालयात जुगार!!!!!!

In reply to by चंद्रसूर्यकुमार

काय राव असे का :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ह्या सरकारच्या राजवटीत, खूप लोकांना, काय बोलावं, ते सुचत नाही ... राजवटीच्या निर्णयांची, री ओढावी तर, परमपूज्य राहुल गांधी आणि पर्यायाने गांधी घराण्याचे, चेले असल्याचा, दाखला मिळतो. आणि निर्णयांना विरोध केला तर, उत्तरपुजा होण्याची शक्यता वाढते... त्यामुळे, बरीचशी जनता म्हणजे, मुकी बिचारी गरीब मंडळी...

In reply to by मुक्त विहारि

कोणत्या ही पक्षाचे सरकार असू ध्या ते चुकीचे काय निर्णय घेत आहेत का? त्यावर लक्ष ठेवा. Bjp चे सरकार उत्तम आणि काँग्रेस चे सरकार वाईट. हा फालतू विचार करू नका.. सर्वच पक्षांची सरकार ही मित्र,नातेवाईक, पाठीराखे ह्यांना खुश करण्यासाठी देशाला चुना लावतात. लोकांना गुलाम म्हणून वागणूक देण्याची सर्वांची वृती सारखीच असते. जनता सावध असली पाहिजे

In reply to by sunil kachure

सेम टू यू.... बाय द वे, सध्या काय वाचत आहात? नविन रामायण येणार आहे का? संजीवनी विद्या द्रोणाचार्य यांनी आणली, असे काही तरी ऐकले होते...

डियर मुवी ! तुम्ही आता तिघाडी सरकारचा कार्यकाळ पुर्ण होईपर्यंत थंड घ्या! अजून बरेच दिवस जायचे आहेत. नाहीतर ऐनवेळी खरोखरीच काय बोलावे ते सुचणार नाही :)

In reply to by धर्मराजमुटके

हो ना सध्या तरी, दर शनिवारी तेच चालू आहे... दर आठवड्यात काही तरी घडामोडी होतातच.... त्याला आपण तरी काय करणार?