दुर्मिळ दुर्मिळ पत्रे जमवण्याचा आमचा छंद आपण जाणताच. अशाच घडामोडीत एक डायरी आमच्या हाताला लागली. काही पाने आहेत काहि नाहीत अशा अवस्थेतली ती डायरी मिपाकराची आहे कळाल्यावर आम्ही अत्यानंदीत झालो. त्या डायरीतील काहि नोंदी आपल्यासाठी.
१ जानेवारी :-
च्यायला वर्षाच्या सुरुवातीलाच नाट लागला. आमचा नववर्षाच्या शुभेच्छा हा धागा त्या प्रा. डॉ. बिरुटेंनी उडवला. का तर म्हणे एकाच विषयाचे २/३ धागे कशाला ? शुभेच्छा द्याव्या घ्याव्यात तेव्हड्या कमीच हे ह्यांना कधी कळणार ? आणी #$#@$#@$ आम्ही कायम लोकाच्या धाग्यावरच इतरांना शुभेच्छा देत बसायचे होय ?
१२ जानेवारी :- गणपतीच्या स्वेटरवरुन रणकंदन माजले. मला तर आता बाप्पा हे बघुन गांगुली सारखा स्वेटर काढुन तो हवेत उडवुन सगळ्यांना लाथा घालतो काय असे वाटत होते.
२६ जानेवारी :-
संघ परीवारच्या धाग्यावर कलंत्री आणी गोडसे वाल्यांची तुफान हाणामारी झाली. मी गांधीला शिव्या घातल्या ! नंतर कलंत्रींना व्यनी करुन गांधीं विषयीचे लोकांचे हिणकस विचार वाचुन दुख: झाल्याचे कळवले.
६ फेब्रुवारी
माझी कविता चोरलेली आहे हे त्या परानी दाखवुन दिले. माझी कविता उडली. परा स्वत:ला अती शहाणा समजतो. इथले चित्रपटातले संवाद माझे म्हणुन मुक्तपिठ मध्ये चिकटवतो हे सांगितले मिपावर तर ह्या माणसाला तोंड दाखवायला जागा राहिल का ?
१४ फेब्रुवारी
अदितीला मैत्री करते का विचारले तर वसकन मांजरी सारखी अंगावर आली. दुपारी टार्या येउन धमकीवजा खरड टाकुन गेला आहे. अरे हाSSSSड घाबरत नाही म्हणाव.
१९ फेब्रुवारी :-
जय भवानी जय शिवाजी..!
१० मार्च :-
होळीच्या दिवशी रंग खेळतात का रंगपंचमीला ह्यावरुन पुन्हा दंगल उसळली. मराठी चित्रपटातील संवादच दळभद्री हा धागा एकमेकांची तोंडे रंगवण्याच्या नादात भरकटला.
१३ मार्च :-
जय भवानी जय शिवाजी...!
२७ मार्च :-
गुढीपाडवा सण मोठा, नाही आनंदा तोटा.
डुप्लीकेट आय डी ची खव आणी व्यनी चालु झाली. आता भिडा म्हणाव.
२९ मार्च :-
अदितीच्या लेखाची डुप्लीकेट आयडीनी चांगली टिंगल केली.
३० मार्च :- खर्या आयडीनी लिहायची लाज वाटते का ? अशी अवलियाची खरड आली आहे. काहि दिवस डुप्लिकेट आयडी बंद ठेवावा लागणार.
१ एप्रील :-
एप्रीलफुल करणारी पाकृ अवलियानी टाकली होती. तिथे 'हा शुद्ध मुर्खपणा आहे अशी' प्रतिक्रीया देउन आलो.
५ एप्रील :-
उचक्रमा वरुन पराचा लेख उडाला. आज मस्त अख्खी क्वार्टर मारली.
७ एप्रील :-
मोगॅंबो खुश हुवा ! टार्याचा लेख कधीही उडवला जाईल अशी तात्यानी तंबी दिली. टार्याचा चेहरा पाहायला मज्जा आली असती. ऑफिस मधल्या मित्रांसाठी चहा आणी भजी मागवली.
२८ एप्रील :-
अवलियाची कथा चोरीची असल्याचा आरोप झाला. सगळ्यांबरोबर मी पण दोन्ही आयडींनी हात धुवुन घेतला. अजी ऐसा मोका फिर कहा मिलेगा.
३ मे :-
जुन्या पुस्तकात सापडलेली दारुवरची कविता मिपावर टाकली. तात्यानी भरभरुन दाद दिली त्यामुळे अजुनही प्रतिसाद वाढले. धनंजयनी 'हि कविता आधी कुठेतरी वाचल्याचे स्मरते' असे लिहिले आहे.
५ मे :-
धनंजयच्या फाऊंडवर बळचकर प्रतिसाद दिला आहे. धनंजयशी ओळख वाढवली पाहिजे. 'त्या' पुस्तकात अजुनही ५/६ कविता आहेत.
१४ मे :-
मी लिहिलेल्या लेखाचे परानी विडंबन केले. पराच्या बैलाला घो आणी तिकडे प्रतिसाद देणार्यांच्या बैलाला पण घो !
१६ मे :- पराच्या लेखावर डुप्लिकेट आयडीनी खरमरीत प्रतिक्रीया दिली आहे. त्याच आयडीनी तात्याला व्यनी करुन हे हिन आणी हिणकस विडंबनाचे प्रकार थांबवा अशी विनंती केली आहे.
२२ मे :-
कार्यकर्तेंच्या धाग्यावार श्रावण मोडकांशी वाद झाला.
२५ मे :-
मोडकांची खरड आली आहे. छोटा डॉनच्या प्रतिसादापेक्षा सुद्धा मोठी आहे. वाचुन मेंदुचे सेल उलटे सुलटे फिरले. अरे जड जड म्हणजे किती जड ? शाट काहि कळाले नाही. झक मारली आणी ह्या माणसाशी वाद घातला.
२८ मे :-
तुमचे ज्ञान बघुन थक्क झालो अशी मोडकांना खरड टाकली आहे. धनंजयला हाय हॅलो ची खरड टाकली आहे.
२९ मे :-
पुस्तकातली अजुन एक कविता मिपावर डकवली आहे. प्राजु आणी जागुचे 'वा छान उत्तम' असे प्रतिसाद आले आहेत.
२ जुन :-
प्राजुच्या कवितेला भरभरुन प्रतिसाद दिला आहे.
१७ जुन :-
कोकण ट्रीप मस्त झाली. मिपावर फोटो आणी कविता डकवली आहे.
२२ जुन :-
ह्याला म्हणतात नशीब ! स्वत: काढलेले फोटो मिपावर डकवले होते तर २ दिवस मिपाच डाउन.
२८ जुन :-
कार्यकर्तेंनी पुस्तकाच्या नावासकट माझ्या चोरलेल्या कविता पकडुन दिल्या. तात्यानी माझ्याच धाग्यावर मला तंबी देउन धागा उडवुन लावला.
१ जुलै :-
इतर चोरलेल्या धाग्यांचे काय असा मुद्दा उपस्थीत करुन डुप्लिकेट आयडीनी मिपावर वाद घातला.
३ जुलै :-
डुप्लिकेट आयडी उडाला. खर्या आयडीनी ह्यापुढे फक्त वाचनमात्र.
वाचने
5817
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
हहपुवा
डायरी मनातली
(विषय दिलेला नाही)
हा हा हा...
In reply to (विषय दिलेला नाही) by ३_१४ विक्षिप्त अदिती
घो !!!
हा हा
एकदम
१ नं
उच्च!
+१
In reply to उच्च! by ब्रिटिश टिंग्या
मस्तच......
मस्तच......
अशाच
जबराट !
हा परा
लै भारी!
परा भौ ...
आयला
फारच छान !
जय भवानी
अरेच्या
In reply to जय भवानी by विसोबा खेचर
परा कमाल केलीत..
मस्त रे.
संदर्भ
:)
In reply to संदर्भ by शलाका
पर्या...
ह ह पु वा
प्रतिसाद
परा.... आरे
पराचा कावळा करावा तर परानेच!
हाहाहा
मधल्या
बरेच
लै भारि रे प-या.