✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खंडेरायानं करणी केली

प — पाषाणभेद, गुरुवार, 12/30/2021 - 11:40
यळकोट यळकोट जय मल्हार बाणाईच्या प्रेमाला भुलूनी देव अवतरले चंदनपुरी राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥धृ॥ व्हती मेंढरं खंडीभर चराया नेली डोंगरावर हिरवा पाला रानोमाळं भवती गार गार वारं आलं भरूनी आभाळं काळ्या ढगांच झालं भार पळात आलं धरणीवर चकमक दावली विजेनं कल्लोळ उठला त्या ठाणं चमत्कार दावला देवानं वर रोखूनी धरलं त्यानं बाणाईच्या मेंढरासाठी खंडेरायानं करणी केली राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥१॥ एका दिशीची कहाणी तहान लागली मेंढरास्नी नेली देवानं गिरणेवरी प्यायला लागली पाणी नदीला आला पूर भरपूर जिकडे तिकडे हाहाकार केला छातीचा बंधार पाणी अडवती मल्हार बाणाईच्या मेंढरासाठी खंडेरायानं करणी केली राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥२॥ वाड्यावरी बाणाई सज्यामधी वाट पाही कधी येणारं मेंढपाळ गेला मेंढरं घेवून सकाळ भरीत कांदा भाकर लसूण दिली होती देवाला बांधून कधी पोटाला खाईल नाही माहीत कोणती वेळ बाणाईची जेवायाची काळजी मनात जाणी मार्तंड मल्हारी हाती घेवून कांदा भाकर देव उधळी बेल भंडार नैव्येद्य पडला वाड्यावर बाणाईनं जाणलं सारं मेंढपाळ आहे मल्हार पाषाण त्याचा नोकर संगती राही सेवेला सदा तप्तर बाणाईच्या मेंढरासाठी खंडेरायानं करणी केली राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥३॥ बाणाईच्या प्रेमाला भुलूनी देव अवतरले चंदनपुरी राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥धृ॥ सदानंदाचा यळकोट! खंडेराव महाराजांचा विजय असो!! - पाषाणभेद ३०/१२/२०२१

प्रतिक्रिया द्या
2107 वाचन

💬 प्रतिसाद (2)

छान

कर्नलतपस्वी
गुरुवार, 12/30/2021 - 20:30 नवीन
येळकोट येळकोट जय मल्हार
  • Log in or register to post comments

बाणाई विषयी आधी वाचले किंवा

सौन्दर्य
Fri, 01/07/2022 - 00:27 नवीन
बाणाई विषयी आधी वाचले किंवा ऐकले नव्हते. देव भक्तांसाठी काहीही करू शकतो ह्याची प्रचिती आली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा