Skip to main content

ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 01/01/2022 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांचे २०२२ मध्ये नववर्षाभिनंदन! या वर्षात उत्तरप्रदेशासहित इतर राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार बनवेल असा निष्कर्ष काढणारी एक कल चाचणी प्रसिद्ध झाली आहे. अर्थात, अशा कल चाचण्यांची विश्वासार्हता हा चर्चेचा विषय असतो.

वाचने 55462
प्रतिक्रिया 213

प्रतिक्रिया

ओपइंडिया हे उजव्या गटाचे पोर्टल आहे. (जसे वायर किंवा स्क्रोल डाव्या गटाची पोर्टल आहेत त्याप्रमाणे). त्यामुळे त्यांच्या जनमत चाचणीला तितका अर्थ नाही. २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये वेगवेगळे ओपिनिअन पोल्स पुढीलप्रमाणे आले होते ते https://en.wikipedia.org/wiki/2017_Uttar_Pradesh_Legislative_Assembly_e… वर बघायला मिळतील. बहुतेक वेळा ओपिनिअन पोल फसले तरी एक्झिट पोल त्यामानाने अधिक विश्वासार्ह असतात. पण २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात एक्झिट पोल्सचीही कशी ऐशीकीतैशी झाली होती हे पुढील चित्रात बघायला मिळेल. up त्यातल्या त्यात इंडिया टुडे-अ‍ॅक्सिसचा एक्झिट पोल विश्वासार्ह मानता येईल. बाकी सगळे एक्झिट पोल अगदीच गंडले होते.

यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी करू नये”, संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा! https://www.loksatta.com/maharashtra/sanjay-raut-shivsena-mocks-pm-nare… गाडी, पंतप्रधानांसाठी आहे... उद्या जर परमपूज्य राहुल गांधी, पंतप्रधान झाले तर, त्यांना पण विमाना बरोबर, गाडी पण मिळेल ...

“शिव्या देती, बघून घेतो म्हणती, हे भविष्य आमच्या हाती, मी राष्ट्रवादी”, व्हिडीओ ट्वीट करत भाजपा नेत्याचा गंभीर आरोप https://www.loksatta.com/mumbai/bjp-leader-keshav-upadhye-allegations-o… कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, हे माझे वैयक्तिक मत आहे....

https://maharashtratimes.com/international/international-news/india-chi… परमपूज्य जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीची फळे निस्तरायला अजून किती तरी वर्षे लागतील... भाजप, ही माझी शेवटची आशा आहे...

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/corona-omicron-in-… आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही कुणीतरी सांगण्याची शक्यता आहे....

https://maharashtratimes.com/career/career-news/schools-in-mumbai-remai… बियर बार मध्ये करोना घुसत नाही, असे वाटते... कदाचित, बियर बार मधले भाव "करोनाला" परवडत नसावेत.. ज्ञानालये बंद, मदिरालये चालू... आनंद आहे...

https://www.loksatta.com/desh-videsh/pm-narendra-modi-was-arrogant-on-f… सधारणपणे राज्यापाल हे राष्ट्रपतींचा प्रतीनिधी म्हणुन काम करत असतात. ते पद हे राजकीय बाबतीत तटस्थ असावे असा साधारण संकेत आहे. मेघालय चे राज्यपाल सत्यपाल मलिक हे सतत मोदी विरोधी वक्तव्य करीत असतात. साधारण त्यांचा सुर हा भाजप विरोधी असतो. हे कितपत उचित आहे. राज्यापाल अशी राजकीय भुमीका घेउ शकतात का?

In reply to by सुक्या

सत्यपाल मलिक अशी वक्तव्ये करून भाजपला अडचणीत आणत आहेत हे बघून मला असुरी का काय म्हणतात तो आनंद होत आहे. उगीच बाहेरच्या पक्षातील घाण घरी घेऊन असल्या लोकांना महत्वाची पदे द्यायची अनावर हौस भाजपच्या लोकांना असते. बाहेरची घाण घरात घेतली की मग कधीतरी वास यायला लागणारच तसे आता होत आहे. सत्यपाल मलिक हे गृहस्थ मुळचे समाजवादी. १९७४ मध्ये चौधरी चरणसिंगांच्या भारतीय क्रांतीदल पक्षाकडून सगळ्यात पहिल्यांदा ते उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. मग काँग्रेस, जनता दल, समाजवादी पक्ष असा प्रवास त्यांनी केला आहे. १९८९ मध्ये जनता दलाचे उमेदवार म्हणून ते लोकसभेवर पण निवडून गेले होते. मुळचे समाजवादी नेते आपापसातच किती वेळा भांडले आहेत, कितीवेळा एकत्र आले आहेत आणि कितीवेळा फुटले आहेत याची गणती ठेवणे कोणत्याही मर्त्य मानवाला शक्य असेल असे वाटत नाही. अशा माणसाला पक्षात घेतल्यावर तो सौजन्याने वागेल ही अपेक्षा करणेच चुकीचे आहे. आपल्या मुळच्या स्वभावाला अनुसरून कधीतरी आपल्याच पक्षाविरोधात तो उलटणारच. त्यांना राजकारणात आणणार्‍या चौधरी चरणसिंगांनी तरी वेगळे काय केले होते? दुसरे म्हणजे याच सत्यपाल मलिकांना मोदी सरकारने काश्मीरचे राज्यपाल या महत्वाच्या पदावर नेमले होते. काश्मीरच्या राज्यपालांची यापूर्वीची यादी बघितली तर त्यात बी.के.नेहरू किंवा जगमोहन यांच्यासारखे कुशल प्रशासक किंवा के.व्ही.कृष्णराव, एस.के.सिन्हा असे निवृत्त सेनाधिकारी किंवा गिरीशचंद्र सक्सेना यांच्यासारखे निवृत्त रॉचे संचालक अशी मोठी नावे दिसतील. त्या तुलनेत सत्यपाल मलिक हे नाव अगदीच किरकोळ दिसते. ना प्रशासन हाताळायचा ट्रॅक रेकॉर्ड ना लष्करातील अनुभव ना दहशतवादविरोधी मोहिम चालवायचा अनुभव तरीही एकदम काश्मीरचे राज्यपाल या महत्वाच्या पदावर का नेमले हे समजले नाही. की कठपुतली म्हणून कोणाला तरी ठेऊन केंद्र सरकारच कारभार बघणार अशी व्यवस्था होती काय माहित. अशी बाहेरील घाण पक्षात घेतली आणि त्या लोकांनी पक्षाला अडचणीत आणणारी विधाने केली की मला फार म्हणजे फार आनंद होतो. असेच व्हायला हवे. निदान त्यातून तरी बाहेरून पक्षात घ्यायचे तर सरबानंद सोनोवालांसारखे चांगले लोक घ्यावेत, मधुकरराव पिचड किंवा पदमसिंग पाटील किंवा हे सत्यपाल मलिक यासारखी घाण नको हे पक्षाला समजेल ही अपेक्षा. मोदींच्या कार्यपध्दतीला अनुसरून ते या सत्यपाल मलिकांची दखलही घेणार नाहीत आणि त्यांचा दुसरा यशवंत किंवा शत्रुघ्न सिन्हा करणार हे उघड आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चं सु कु, तुमचा राजकिय व्यासंग पाहुन अचंबित व्हायला होते. पुढे मागे प्रशांत किशोरांसाठी पर्याय म्हणुन तुमचे नाव दिसले तर आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

धन्यवाद चंद्रसूर्यकुमार. सध्या तरी भाजपा / मोदी / शहा वगेरे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. परंतु अशा लोकांमुळे पदाची तमा राहत नाही. तसेही एखाद्याला राज्यपाल करणे हे त्याला राजकीय कारकर्दी पासुन दुर करणे असेच आहे. बाकी तुमचा प्रतीसाद नेहेमीप्रमाणे माहीतीपुर्ण आहे हे वेगळे सांगणे नको.

In reply to by सुक्या

हो बरोबर. राज्यपाल या पदावर असताना अशी केंद्र सरकारवर टीका करणे अयोग्य आहे. जानेवारी १९९३ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल सी.सुब्रमण्यम यांनी गोव्यात इंडिअन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात भाषण केले होते. बाबरी पाडल्यानंतरच्या परिस्थितीत ही परिषद झाली होती. भाषणानंतर चहापानाचा कार्यक्रम होता त्यावेळी अनौपचारीक गप्पांमध्ये सी.सुब्रमण्यम म्हणाले-- "अयोध्येत काहीच झाले नाही असे आपण का समजत आहोत? आपल्या देशापुढे संकट आले आहे याकडे आपण का दुर्लक्ष करत आहोत? तसेच पंतप्रधान सगळे निर्णय घ्यायची जबाबदारी आपल्या अंगावर का घेत आहेत? त्यांनी आपल्या सहकार्‍यांना निर्णय घ्यायची मोकळीक दिली पाहिजे." त्या गप्पांच्या वेळी पत्रकारही उपस्थित होते. लगोलग बातमी झळकली- राज्यपाल सी.सुब्रमण्यम यांनी पंतप्रधान नरसिंह रावांवर टीका केली. वास्तविकपणे पंतप्रधानांवर टीका करायचा राज्यपालांचा उद्देश नव्हता पण व्हायचे ते नुकसान झाले. त्यावेळी सी.सुब्रमण्यम यांनी अचानक राज्यपालपदाचा राजीनामा दिला त्यामागे हे कारण होते. म्हणजे पंतप्रधानांवर थेट टीका न करताही, तसा उद्देश नसतानाही तशी बातमी आली हे राज्यपालपदाच्या गरीमेला योग्य नाही म्हणून राजीनामा त्यांनी दिला होता. आणि इथे हे राज्यपाल असल्या कसल्याही गोष्टींचा विचार न करता थेट टीका करत सुटलेत. राजकारणामुळे मोदी मलिकांची दखलही घेणार नाहीत ही गोष्ट वेगळी. तरीही राज्यपालांनी असे करणे अयोग्य आहे.

पाकिस्तानने २५ चीनी बहु-भूमिका J-10C लढाऊ विमानांचा एक पूर्ण स्क्वॉड्रन खरेदी केला आहे. विशेष म्हणजे भारताने घेतलेल्या राफेल विमानांचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानने ही चिनी लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. J-10, चेंगडू एअरक्राफ्ट इंडस्ट्रीने चीनमध्ये विकसित केलेले सिंगल-इंजिन, हलके मल्टीरोल फायटर आहे.

In reply to by निनाद

राफेल सोडाच तेजस बरोबर सामना करण्या पुरते J १० ठीक आहेत. https://eurasiantimes.com/china-aggressively-upgrading-its-j-10-fighter… मुळात त्याचे चिनी इंजिन आणि चिनी क्षेपणास्त्रे कितपत भरवशाची आहेत याबद्दल चिनी लोकांनाच खात्री नाही. पाकिस्तानची आर्थिक शक्ती आणि एकंदर स्थिती पाहता ज १० हि खोगीरभरतीच ठरेल यात शंका नाही

In reply to by सुबोध खरे

ह्यात मुलतः काही फरक नाही .... आर्थिक दृष्टीने, पाकिस्तान हळूहळू, चीनचा अंकित होत आहे, असेच वाटते आणि असे कर्जबाजारी देश, इतर शेजारी देशांना घातक ठरण्याची शक्यता जास्तच ...

भारतीय इतिहासात प्रथमच, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या व्हीव्हीआयपी सुरक्षेच्या पथकात ३२ महिला लढवय्यांचा समावेश असलेली महिला कमांडोची पहिली तुकडी तैनात करेल . नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत महिलांना व्हीआयपींसोबत तैनात केले जाईल. महिला कमांडोंनी अलीकडेच व्हीआयपी सुरक्षा कर्तव्ये, नि:शस्त्र लढणे, आणि विशेष शस्त्रे गोळीबार करण्याचे त्यांचे १० आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. समाजातील महिलांचा दर्जा मजबूत करण्यासाठी आणखी एक पाऊल म्हणून पाहिले जाऊ शकते.

१५ वर्षांपूर्वी उमेश रायने हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यांनी स्वतःचे नाव अब्दुल्ला असे ठेवले. तो आता आपल्या मूळ हिंदू धर्मात परत आला आहे. गावातील काली मंदिरात ग्रामस्थांनी घर वापसी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिया वक्फ बोर्ड माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनीही गाझियाबाद येथे देवी मंदिरात अलीकडेच हिंदू स्विकारला आहे. रिझवी यांचे नाव जितेंद्र नारायण स्वामी ठेवण्यात आले. यावेळी बोलतांना ते म्हणाले होते की भारतीय मुस्लिम एकेकाळी हिंदू होते. शतकानुशतके इस्लामिक आक्रमण आणि मुघल राजवटीत त्यापैकी बहुतेकांचे जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले होते.

गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी करणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेतली आणि गोव्यात विधानसभेच्या ४० पैकी ७ जागा शिवसेनेला लढायला द्यायची मागणी केली. तर गोव्यात शिवसेना भाजपला 'बीच' दाखविणार असा दावाही त्यांनी केला आहे. https://maharashtratimes.com/india-news/will-replicate-mahas-mva-allian… एक गोष्ट कळत नाही. शिवसेनेची गोव्यात ताकद ७ जागा देण्याइतकी आहे का? आताच २०१७ ची मतांची आकडेवारी बघितली त्यात कळले की शिवसेनेने २०१७ मध्ये ३ जागा लढवल्या होत्या आणि पक्षाला तब्बल ७९२ मते मिळाली होती. https://www.indiavotes.com/ac/party/detail/51/253 तर काँग्रेसला जवळपास २ लाख ६० हजार मते मिळाली होती. म्हणजे शिवसेनेपेक्षा काँग्रेसची ताकद कित्येक पटींनी आहे. नाव घेण्याजोगा एकही नेता शिवसेनेकडे गोव्यात नाही. आतापर्यंत एकही विधानसभेची जागा कधी शिवसेनेने गोव्यात जिंकलेली नाही. तसे असेल तर मग ४० पैकी ७ जागांची अपेक्षा आणि मागणी कोणत्या आधारावर करतात हे कळत नाही. महाराष्ट्रातील कोकण हा शिवसेनेचा तथाकथित बालेकिल्ला आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागूनच गोव्यातील पेडणे आणि मांदे हे विधानसभा मतदारसंघ आहेत. तिथे शिवसेनेची कामगिरी कशी होती? तिथून कधी उमेदवार तरी शिवसेनेने उभे केले होते की नाही काय माहित. दुसरे म्हणजे काँग्रेसकडून गोव्यात ४० पैकी ७ म्हणजे जवळपास २०% जागा शिवसेनेला हव्या असतील तर मग मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला ४०-४५ जागा त्याच न्यायाने हे देणार का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेनेची गोव्यात ताकद ७ जागा देण्याइतकी आहे का?
शिवसेनेची ताकत महाराष्ट्रात तरी कुठे आहे? जे निवडून आले आहेत ते मोदींच्या नावावर मते मागून तर आले आहेत. आता येत्या निवडणुकीत पाहूच की. वाटच पहातोय आम्ही.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

शिवसेनेच्या जागा घटतील पण, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, यांच्या मुळे सत्तेत राहतील अर्थात, आता शिवसेना जगेल ती सोनिया गांधी यांच्या हाताखाली पुढच्या मंत्रीमंडळात, शिवसेनेचा मुख्यमंत्री नसेल

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

+१ २०१४ ला मोदींच्या ऊमेदवारांवीरोधात सेनेचे ६३ आमदार मोदींमुळेच निवडून आले… बोला हर हर….. गुजरातेत पकडलेला “माल” रावसाहेबांपर्यंत यशस्वीपणे पोहोचला ह्याची ही पोहोचपावती. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

यांना, घराणेशाहीचा उदोउदो करणार्या जनतेची कमतरता नाही ... आमच्या आधीच्या पिढीने हीच चुक केली होती . त्याचे परिणाम म्हणजे, चीनला बळकटी आणि काश्मिरी पंडितांच्या हातात आणि दलाई लामा यांच्या हातात, वळकटी असो, सुशिक्षित माणसांना हे समजेलच असे नाही ...

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

शिवसेनेची ताकत महाराष्ट्रात तरी कुठे आहे?
सहमत. शिवसेना म्हणजे स्वतःला बैल समजणारी बेडकी आहे.

In reply to by चौकस२१२

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे काय झाले? तो संपला हे खरे आहे का? आणि का ?
नाही. मगोप तृणमूल बरोबर युती करून विधानसभा निवडणुक लढविणार आहे.

चीनला भारताचे सडेतोड प्रत्युत्तर; गलवानमध्ये भारतीय लष्कराने फडकावला तिरंगा https://www.loksatta.com/desh-videsh/indian-army-unfurls-tricolour-in-g… ह्यासाठीच भाजपला पर्याय नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. परमपूज्य राहूल गांधी आणि त्यांचे चेले, आता पुरावे मागत फिरतील... उरीच्या वेळी देखील पुरावे मागत फिरत होते आणि पाकिस्ताननेच, उरीची घटना नंतर मान्य केली..

“पंतप्रधान मोदी असे हुकुमशहा आहेत, ज्याला फक्त…”, असदुद्दीन ओवैसींचा निशाणा! https://m.youtube.com/watch?v=dMbXeF0CYi0 मग ह्या वरील व्हिडियोला काय म्हणायचे?

“केंद्राने काय दिलं नाही हे राज्याच्या मंत्र्यांनी लेखी द्यावं, मी राज्याची हक्काची मुलगी…”, भारती पवार यांचा हल्लाबोल https://www.loksatta.com/maharashtra/minister-dr-bharati-pawar-allegati… योग्य मागणी

ST कर्मचारी तणावात,मुख्यमंत्र्यांकडे मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी https://www.esakal.com/marathwada/aurangabad/st-workers-demand-euthanas… ही लोक हितवादी राजवट, आता काय निर्णय घेते? हे बघणे रोचक ठरेल ...

राज्यातला हा महानॉटी मंत्री उघडपणे समाजात विष कालवता दिसत आहे, ब्राह्मण समाजावर हा मंत्री सातत्याने द्वेषपूर्ण आसुड ओढुन राज्यात ब्राह्मण समाजा विषयी विद्वेष पेटवत असतो. आज या राज्य आणि समाज द्रोही मंत्र्याने ओबीसी समाजा विषयी नीच विधान केले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.

In reply to by मुक्त विहारि

कॉंग्रेसचा आमदार आहे आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपा नेते आहेत. ====================================== मंत्री साहेब कमालीचे मग्रुरीत वावरतात असे दिसते. ओबीसी समाजाची माफी मागायची सोडुन उलट आपल्यालाच खरा इतिहास [ त्यांना तर खरच काही माहित नाही आणि येतही नाही. ] माहित असल्याचा फुकाचा दावा ते करतात. मंत्री साहेंबाचा खोटारडेपणा उघड केला गेला :- मंत्री साहेब हे फक्त फुशारकी मारण्यात मग्न असतात आणि त्यांना काहीच येत नसल्याने ही त्यांची फुकाची फुशारकी वेळोवेळी सगळ्यां समोर उघडी-नागडी पडते, कसं तर ते असं :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.

रश्मी ठाकरे पडद्यामागून राजकारणाची सूत्र सांभाळतात : अब्दुल सत्तार https://www.tv9marathi.com/videos/rashmi-thackeray-can-handle-chief-min… अरेच्चा, आम्हाला तर वाटत होते की, माननीय शरद पवार आणि सोनिया गांधी, हेच राज्य चालवतात...

अत्यंत दु:ख दायक बातमी... अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले. त्यांचे मला भावलेले भाषण...

https://www.loksatta.com/maharashtra/devendra-fadnavis-criticizes-the-g… ------ विद्यापीठांना पैसे आणि पायाभूत सुविधा देण्याचे काम सरकारचे आहे. त्यांच्या रोजच्या कारभारामध्ये पडण्याचा अधिकार सरकारला नाही. विद्यापीठांच्या सीनेटमध्ये जाऊन बसण्याचा वेळ आता मंत्र्यांकडे आहे. कुलगुरूंना बाबू बनवण्याचे काम या कायद्याने केले आहे. त्याच्यापलीकडे कुलगुरुंकडे आता कोणतेही अधिकार नसणार आहेत. कुलगुरुंचे सगळे अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे घेतले आहेत. -------- मदिरा स्वस्त आणि ज्ञानगंगा महाग, असेच होण्याची शक्यता आहे.... ------- कोणे एके काळी, राजाचा विद्यापीठात हस्तक्षेप वाढायला लागला आणि काळाची पावले वेळीच ओळखून, चाणक्यने विद्यापीठ सोडले...(बहुतेक तरी, तक्षशिला विद्यालय असावे ... पुढे चंद्रगुप्त मौर्य राजा झाल्यावर, विद्यापीठांना स्वायत्तता मिळाली... मौर्य काळात, राजा फक्त आर्थिक मदत करत होता...) ---- तालीबानने जशी विद्यापीठे ताब्यात घेतली, तशीच गत, ह्या राजवटीत होत आहे का? अशी शंका मनांत येत आहे ...

In reply to by मुक्त विहारि

मुंबई-पुण्‍यातील विद्यापीठांचे जेएनयू करायचे आहे काय?’ आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला सवाल https://www.tv9marathi.com/politics/ashish-shelar-criticizes-mahavikas-… शेलार यांनी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब समाजातील विद्यार्थी, पत्रकार, बुध्दीवान, विचारवंत, पालक यांच्यापर्यंत घेऊन गेले पाहिजे याचीही मुद्देसुद मांडणी केली. या कायद्याचे भविष्यात विद्यापीठांवर होणारे परिणाम किती दाहक असतील या विषयावर बोलताना शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्‍ला चढवला.. ------- विद्यापीठात, "राज्यशास्त्र" हा विषय जरूर हवा पण, "राजकारण" नको

उस्मानाबादेत शिवसेनेची पहिली शाखा उघडणारे शिवसैनिक दत्तात्रय वऱ्हाडेंनी केली आत्महत्या. आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्याची माहिती ------ https://marathi.abplive.com/videos/news/the-shiv-sainik-who-opened-the-… ------- मद्य स्वस्त आणि कार्यकर्ते, कर्मचारी वर्ग आत्महत्या करायला लागले..... ह्या राजवटीत अजून काय काय बघायला लागेल? ते काही सांगता येत नाही ....

ही बातमी
दिसते त्यापेक्षा फारच गंभीर प्रकरण असावे. राजकारण एका बाजूला पण सुरक्षेतील ढिसाळपणा जरा जास्तच झाला.

In reply to by मुक्त विहारि

तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी किमान जिवंत तरी…”, पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया https://www.loksatta.com/desh-videsh/pm-narendra-modi-told-officials-at… गृह मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. प्रक्रियेनुसार, त्यांची सुरक्षा तसेच आकस्मिक योजना तयार ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था पंजाब सरकारला करावी लागणार होती. त्यामुळे पंजाब सरकारला रस्त्याने पंतप्रधानांचा दौरा सुरक्षित करण्यासाठी आणि वाहतूक रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करायला हवी होती. मात्र, तसेच घडले नाही. ------- जी कॉंग्रेस, देशाच्या पंतप्रधानाला संरक्षण देऊ शकत नाही, ती सामान्य माणसाला काय संरक्षण देणार? सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण, निवृत्त नौसैनिकाला मारहाण, ह्या गोष्टी तर, ह्याच महाराष्ट्र राज्यात घडल्या साधू हत्याकांड पण, ह्याच महाराष्ट्र राज्यात झाले आणि ते पण पोलीसांच्या समोर ... एकीकडे, "साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा," असे म्हणायचे आणि, मग, साधू हत्याकांडा वरून राजकारण करायचे ... ------ पंतप्रधान यांच्या संरक्षणा बाबतीत झालेली त्रुटी न स्वीकारता, ह्यात पण, कॉंग्रेस राजकारण करत आहेच ... सुरक्षेमधील चूक नाही तर रिकाम्या खुर्च्यांमुळे सभा न घेताच परतले मोदी; Video शेअर करत नेत्याची टीका.... (https://www.loksatta.com/desh-videsh/narendra-modi-punjab-security-laps…) ------- एक परस्पर विरोधी वाक्य पण आहेच .... "दुसरीकडे मोदींच्या सभेच्या ठिकाणी पाऊस पडू लागल्याने अनेकांनी खुर्चा, बॅनर्स आणि इतर प्रचार साहित्य डोक्यावर धरुन पावसापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सभेला हजारो लोक उपस्थित राहतील अशापद्धतीने आयोजन करण्यात आलं होतं. हजारो खुर्चा या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या. या खुर्चांचा वापर अनेकांनी पाऊस पडाला लागल्यानंतर आसरा घेण्यासाठी केला..." (हे एक) ---- श्रीनिवास यांनी, “कथित सुरक्षेमधील चूक” या कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये सभेच्या ठिकाणी पाऊस पडत असल्याचं दिसत आहे. मात्र त्याचबरोबर सभेसाठी मंचासमोर मांडण्यात आलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसताय. सभेच्या ठिकाणी रिकाम्या खुर्च्यांच्या रांगांमध्ये उभं राहून हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याचं दिसतेय. हा व्हिडीओ आधी मैदानाच्या मागील बाजूस आणि नंतर मंचाकडे पॅन होऊन सभेसाठी मैदानामध्ये गर्दी नसल्याचं दर्शवत आहे. या व्हिडीओमधून श्रीनिवास यांना सुरक्षेत चूक झाली म्हणून नाही तर रिकाम्या खुर्चांमुळे पंतप्रधानांनी सभा रद्द केली, असं सूचित करण्याचा प्रयत्न केलाय. (हे दुसरे) ------ असो, कॉंग्रेसच्या ह्या खेळ्या आता, साध्या अशिक्षित लोकांना पण ओळखता येतात ..

In reply to by मुक्त विहारि

जी कॉंग्रेस, देशाच्या पंतप्रधानाला संरक्षण देऊ शकत नाही, ती सामान्य माणसाला काय संरक्षण देणार? आजच्या काळात कॉग्रेसी आणि देशद्रोही जणु काही समान अर्थी शब्द झालेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maai Bappa Vithala

Test

छत्तीसगड काँग्रेस सरकारने पाकिस्तानी दावत-ए इस्लामी नावाच्या संघटनेला रायपूरमध्ये १० हेक्टर जमीन देत आहे. यासाठी संघटनेने २८ डिसेंबरला अर्ज दिला होता. तो त्याच दिवशी मंजूर झाला होता!

पाकिस्तानातील सिंध प्रांतातील अनाज मंडी येथे अज्ञात हल्लेखोरांनी सुनील कुमार या ४४ वर्षीय हिंदू व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. पाकिस्तानमध्ये अलिकडच्या वर्षांत हिंदू अल्पसंख्याक आणि त्यांच्या मंदिरांवरील हिंसाचार वाढला आहे. हिंदूंच्या घरांची तोडफोड ते बलात्कार आणि स्त्रियांचे अपहरण, विशेषत: अल्पसंख्याक हिंदू, शीख समुदायातील लोकांच्या मंदिराची विटंबना करण्यापर्यंतच्या विविध घटना पाकिस्तान या इस्लामिक देशातून नियमितपणे नोंदवल्या जात आहेत. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील सियालकोट शहरात ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली श्रीलंकन ​​फॅक्टरी मॅनेजरची निर्घृण हत्या केली गेली आहे. या विरुद्ध कोणतेही हिंदू संघटीत आवाज उठवत नाहीत ही एक शोकांतिका आहे. प्रत्येक देशातल्या पाकिस्तानी दुतावासाला याचा जाब विचारला गेला पाहिजे. यु एन च्या मानवाधिकार संघटनेकडे याची तक्रार गेली पाहिजे. United Nations High Commissioner for Human Rights (OHCHR) General Inquiries: Telephone: +41 22 917 9220 E-mail: InfoDesk@ohchr.org Field Operations and Technical Cooperation Division (FOTCD) Contact in Geneva, Switzerland. Asia Pacific Section Tel. +41 22 928 9650

रायगडावरील ‘मदार मोर्चा’वर चादर घालून प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न; संभाजीराजे संतापले, पत्र लिहून केली ‘ही’ मागणी https://www.loksatta.com/maharashtra/bjp-mp-sambhajiraje-chhatrapati-de… --------- ....आता हिंदूत्ववादी शिवसेना, काय निर्णय घेते? हे बघणे रोचक ठरेल...

In reply to by मुक्त विहारि

रायगड हा केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येतो. ऊठ सूट सेनेचा धोशा लावण्यापेक्षा अभ्यास वाढवा

In reply to by कपिलमुनी

मराठी आणि हिंदूत्व, यांच्याच मुद्यावर शिवसेना निवडून येत होती... आणि तसेही जरा काही खूट्ट झाले की केंद्रावर ढकलायची, ह्या सरकारला खोड आहेच ... असो,

In reply to by कपिलमुनी

त्याचं काय आहे की शिवसेना पूर्वी [बाळासाहेबांच्या काळात] विषय कोणाच्या अखत्यारीत येतो हे कधीच बघायची नाही. सरळ अ‍ॅक्शन असायची आणि तेच लोकांना आवडायचे. उदा: भारत-पाकिस्तानची मॅच होऊ देणार नाही म्हणत खेळपट्टी खणून ठेवणे. त्याअनुषंगानं आता शिवसेना काय करते ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल, असे मुविंना म्हणायचे असावे. काय हो मुवि? बरोबर ना??

In reply to by राघव

मलंग गडावर, नेलेला मोर्चा किंवा, महाआरत्या... ही आठवलेली उदाहरणे ... ह्या बाबतीत देखील, शिवसेनेने, कायदेशीर मार्गाने, कठोर भुमिका घ्यायला हवी होती.. बाय द वे, खेळपट्टी खणणे, हा भाग मला आवडला न्हवता ... जे काही करायचे आहे, ते कायदेशीर मार्गाने, करू शकतो. जसे आत्ता, शिवेंद्रराजे यांनी केले. खेद इतकाच की, हे काम शिवसेनेने करायला हवे होते ...

In reply to by कपिलमुनी

छुप्या हिंदुत्ववादी कोणता पक्ष हो? "आप" कि काय? नाही म्हणजे ते युगपुरुष आजकाल बऱ्याच मंदिरांत दर्शन घ्यायला जाताना दिसतात I visit Ram temple because I am a Hindu’: Arvind Kejriwal on allegations of peddling ‘soft Hindutva’ हे महाशय तर सरड्याला सुद्धा लाज आणतात रंग बदलण्याच्या स्पर्धेत.

ही बातमी
न्यायालयाचं कदाचित बरोबर आहे पण न्यायालय स्वतः अनेक दिवसाच्या सुट्टीवर असतात त्याबाबत कोणी बोलताना दिसत नाही. अनेक न्यायप्रविष्ट मुद्दे वर्षानुवर्षे न्यायालयात पडून असतात. कोणत्याही सरकारला / संस्थांना ही प्रक्रिया वेगवान करावीशी वाटत नाही काय ? सामान्य नागरीकांनी एकत्र येऊन यासाठी काही करता येऊ शकते काय ?

In reply to by धर्मराजमुटके

अशा अर्थाचे, एक वाक्य वाचनांत आले होते ... "सामान्य नागरीकांनी एकत्र येऊन यासाठी काही करता येऊ शकते काय ?" ----- काहीही करता येणार नाही ...

थोड्याच दिवसात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा https://www.loksatta.com/krida/india-womens-squad-for-icc-womens-world-… ------- गेली 2-3 वर्षे, मिताली राज, जागा अडवून बसली आहे. सुदैवाने, 20-20 मधून, मिताली राजला, बाहेर काढले, हे उत्तम ...

In reply to by मुक्त विहारि

कर्णधार आहे ना मिताली राज ह्याच संघाची? का माझी वाचण्यात काही चूक होत आहे?

In reply to by बेकार तरुण

शेफाली वर्मा, जेनिमा राॅड्रिग्ज, स्मृती मंदाना, अशा अनेक चांगल्या तरूण मुली, उत्तम क्रिकेट खेळत आहेत मिताली राज ना धालफलक हलता ठेवते ना नेहमीच धावांचे योगदान देते. पुजा वस्त्रकार, मानसी जोशी, झुलन गोस्वामी (अद्याप तरी 50-50 साठी, ही हवीच, योग्य वेळी अनुभव पणाला लावते) राजेश्र्वरी गायकवाड, दिप्ती शर्मा, पुनम यादव... गोलंदाजी परिपूर्ण आहे... पण, मिताली राज मुळे, एक बॅटर कमी पडतो आणि आपण हरतो... हरमन प्रीत कौर पण, WBBL मध्ये चांगली खेळली पण, मिताली राज आता फक्त पुर्व पुण्याई मुळे, जागा अडवून बसली आहे... अर्थात, हा विश्र्वचषक जिंकण्याचे चान्सेस, ऑस्ट्रेलियाला जास्त आहेत. आणि दुसरा क्रमांक, इंग्लंडचा

पोलिसांची पगार खाती Axis Bank मध्ये वळवली, फडणवीस-SBI ला कोर्टाची नव्याने नोटीस ----- https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/hc-notice-to-devendra-fad… ------- ह्या बाबतीत, फडणवीस आणि अमृता फडणवीस, यांनी आधी पण स्पष्टीकरण दिले आहे... https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/hc-notice-to-devendra-fad… ------- न्यायालयात, योग्य काय? ते समजेलच ....

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील एस.टी डेपोमधील कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. आत्महत्या करणे गुन्हा आहे आणि बराच काळ चालू असलेल्या एस.टी कर्मचार्‍यांच्या संपावर काहीही तोडगा निघत नाही तेव्हा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या अशी मागणी त्या कर्मचार्‍यांनी केली आहे. हे वाचून वाईट वाटले. एस.टी हे सरकारी महामंडळ असूनही त्या कर्मचार्‍यांना जो काही तुटपुंजा पगार आहे तो पण वेळेत मिळत नव्हता हे धक्कादायक आहे. कोरोनाकाळात मुंबईत बेस्टच्या कर्मचार्‍यांची कमतरता भासू लागल्यावर परभणी, यवतमाळ आणि अजून कुठून कुठून एस.टी कर्मचारी मुंबईत आणून त्यांच्याकडून बेस्टच्या बस चालवून घेतल्या. परभणीत बस चालविणे आणि मुंबईत बस चालविणे यात अगदी जमीनअस्मानाचा फरक असेल हे समजू शकतो. तेव्हा त्यांना मुंबईत येऊन बस चालविल्याबद्दल विशेष भत्ता तरी महाविकास आघाडी सरकारने दिला होता की नाही काय माहिती? विशेष भत्ता दूरच राहिला मुळातला पगारही मिळायला महिनेमहिने उशीर होत होता. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या संसाराची दैना उडाली. अनेकांनी आत्महत्या केली. गेले दोनेक महिने चालू असलेल्या संपावर काही तोडगा निघत नाही. काय चालू काय आहे? एस.टी म्हणजे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. ग्रामीण भागातील लोक कसे प्रवास करत असतील? सगळा प्रकार खरोखरच संतापजनक आहे.

एअर इंडियाच्या खाजगीकरणाविरोधात सुब्रमण्यम स्वामींनी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. https://www.livelaw.in/top-stories/air-india-disinvestment-delhi-high-c… सुब्रमण्यम स्वामी हे एखाद्या भरकटलेल्या क्षेपणास्त्राप्रमाणे आहेत. कधी कोणावर आदळतील हे सांगता येत नाही. जयललितांना तुरूंगात धाडण्यात त्यांची भूमिका मोठी होती पण काही महिन्यातच त्यांनी त्याच जयललितांबरोबर युती केली होती. अटलबिहारी वाजपेयींना कायम पाण्यात पाहिले पण त्याच वाजपेयींचे सरकार स्थापन होताना त्यांना पाठिंबा दिला आणि परत तीन महिन्यात तो पाठिंबा काढूनही घेतला. त्यानंतरही जवळपास १४-१५ वर्षे भाजपला विरोध केला पण २०१३ मध्ये आपला पक्ष भाजपमध्येच विलीन केला. आता परत मोदींवर उलटले आहेत. असल्या माणसाला पक्षात का घेतले हे तेव्हाही समजले नव्हते आणि अजूनही समजलेले नाही.