✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुरूष एक वाल्या कोळी.

क — कर्नलतपस्वी, Mon, 12/13/2021 - 20:40
पुरूष एक वाल्या कोळी आयुष्यभर विणतो जाळी पापाचा घडा मात्र शेवटी त्याच्याच भाळी जाळ्यात शिकार फसेल म्हणून वाट बघत बसतो कर्तव्य पुर्तीचा भ्रम उगाच जपत आसतो पुरूष एक वाल्या कोळी..... तहान नाही भूक नही. बसला होता नाक्यावर डोक आलं जाग्यावर जेव्हाआप्तानीं मारलं फाट्यावर नारायण नारायण जाप करी नारदाची आली स्वारी ऐकुन विनंती वाल्याची म्हणती,त्रेता मधे एकच होता पुरूष एक वाल्या कोळी...... कलीयुगी सारेच वाल्या एवढे राम कोठून आणू नाही केवट नाही राम ज्याचे ओझे त्यालाच घाम कलियुग आहे बाबा, खुळ्या भ्रमात नको राहू दुसऱ्याच ओझं नको वाहू पुरूष एक वाल्या कोळी...... नारायण नारायण म्हणत गेले वाल्याचे डोके ठिकाणावर आले पण आता काय उपयोग जेव्हां सारे पोपट गेले उडुन

प्रतिक्रिया द्या
2230 वाचन

💬 प्रतिसाद (2)

अगदी पटले

सौन्दर्य
Mon, 12/13/2021 - 23:42 नवीन
कितीही केलं, काहीही केलं तरी त्याचे श्रेय मिळत नाहीच. वर ते तुमचे कर्तव्यच होते हे ऐकवले जाते. कविता एकदम समर्पक - 'ज्याचे ओझे त्यालाच घाम' हे एकदम चपखल.
  • Log in or register to post comments

जबरदस्त

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 12/14/2021 - 09:10 नवीन
युनिव्हर्सल फिलिंग :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा