Skip to main content

मिपाकर 'चौकटराजा' यांना भावपूर्ण श्रद्धांजली

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 20/11/2021 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक २० नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ५:२० वाजता, आकुर्डी पुणे येथे आपले प्रिय मिपाकर चौकटराजा (अरूण बर्वे) यांची प्राणज्योत मालवल्याचे समजले. मृत्यूचे कारण कोविड असल्याचे समजले. गेली काही वर्षे मी कायप्पावर त्यांचेशी नियमितपणे संपर्कात होतो. ते पियानोवर ओपी नय्यरची गाणी वाजवून रेकॉर्डिंग पाठवायचे, अलिकडे स्मूलवरही बरीच गाणी गात असत. मिपावर त्यांनी उत्तम दर्जाचे लिखाण केलेले असले तरी अलिकडे काही काळापासून ते मिपावर येताना दिसलेले नाहीत. गेले दोन-तीन आठवडे त्यांचेशी संपर्क होत नव्हता म्हणून काळजी वाटत होती, फेसबुक आणि स्मूलवरही ते येत नव्हते. मला कायप्पाखेरीज त्यांचेशी संपर्क करणे शक्य नसल्याने शशिकांत ओक आणि वल्ली यांना विचारले, त्यापैकी शशिकांत ओक यांचे त्यांच्या मुलीशी आज बोलणे होऊन बातमी समजली. चौकटराजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना मन भरून आलेले आहे. पुढील जीवनात त्यांची कमतरता सदैव जाणवत राहील. ओम शांति. . चौकटराजा यांचे सर्व लेखन
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 22802
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

चौरांना भावपुर्ण श्रद्धांजली. देव त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सोसण्याचे बळ देवो.

वाईट बातमी. खरंतर २० तारखेलाच धागा वाचलेला. पण काय प्रतिसाद द्यावा हे देखील सुचत नव्हतं. अजूनही सुचत नाहीये.. :-( _/\_