Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्राजु on Wed, 04/22/2009 - 18:30
  • Log in or register to post comments
  • 18438 views

प्रतिक्रिया

Submitted by अवलिया on Wed, 04/22/2009 - 18:39

Permalink

मस्त लेख !

मस्त लेख ! आवडला ! निरोप घेणे खुप अवघड असते पण कधीकधी परिस्थितीपुढे मान तुकवावीच लागते... जीवनाचे गाडे चालु ठेवावेच लागते इच्छा असो वा नसो. :) खरे तर शिर्षक पाहुन उगाचच मनावर दडपण आले होते... त्यामुळे घाबरतच धागा उघडला ... वय झाले.. उगाच नाही नाही त्या शंका मनात येतात... असो. --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Wed, 04/22/2009 - 18:45

Permalink

ह्म्म..

निरोप घेणे अवघड असतेच पण परिस्थितीमुळे किती तरी वेळा आवश्यकही.. लेख आवडला. स्वाती अवलियांचीच शंका माझ्याही मनाला स्पर्शून गेली. खरंतर आपल्या माणसांना तो 'शेवटचा निरोप देणं' सगळ्यात अवघड गोष्ट..
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 04/22/2009 - 19:00

Permalink

मस्त

मस्त लिहिले आहेस :) खरच कधि कधि निरोप घेणे खुप अवघड जाते. तुझा लेख वाचला आणी एकदम संदिप खरेंच्या 'हे भलते अवघड असते' ह्या कवितेची आठवण झाली. हे भलते अवघड असते ...... गाडी सुटली रुमाल हलले क्षणात डोळे टचकन् ओले, गाडी सुटली पडले चेहरे क्षण साधाया हसरे झाले, गाडी सुटली हातामधुनी हात कापरा तरी सुटेना, अंतरातली हळवी माया तुटू दे म्हटले तरी तुटेना, का रे इतका लळा लवुनी नंतर् अ मग ही गाडी सुटते , डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते, गाडी गेली फ़लाटावरी आठवणींचा कचरा झाला, गाडी गेली डोळ्यांमधल्या निर्धाराचा पारा फुटला.... हे भलते अवघड असते, कुणी प्रचंड आवडणारे ते दूर दूर जाताना, डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना, डोळ्यांतील अडवून पाणी, हुंदका रोखूनी कंठी, तुम्ही केविलवाणे हसता, अन् तुम्हास नियती हसते, हे भलते अवघड असते .......... तरी असतो पकडायाचा हातात रुमाल गुलाबी, वाऱ्यावर फडकवताना,पायाची चालती गाडी, ती खिडकीतून बघणारी,अन् स्वतःमधे रमलेली, गजरा माळावा इतुके, ती सहज अलविदा म्हणते, हे भलते अवघड असते .......... तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू, इतक्यात म्हणे ती माझ्या, कधी गावा येशील का तू, ती सहजच म्हणुनी जाते, मग सहजच हळवी होते, गजऱ्यातील् होन कळ्या अन्, हलकेच ओंजळीत देते, हे भलते अवघड असते .......... कळते की गेली वेळ, ना आता सुटणे गाठ, अपुल्याच मनातील स्वप्ने, घेउन मिटावी मुठ, हि मुठ उघडण्यापुर्वी चल निघूया पाऊल म्हणते, पण पाऊल निघण्यापूर्वी, गाडीच अचानक निघते, हे भलते अवघड असते .......... परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी, ओठांवर शील दिवानी बेफिकीर पण थरथरती, पण क्षणक्षण वाढत असते अंतर हे तुमच्या मधले, मित्रांशी हसताना ही, हे दुःख चरचरत असते, हे भलते अवघड असते .......... भवतेक सगळ्यांना हि माहिती असेलच पण तरी काहि जणांना माहीत नसण्याच्या शक्यतेने इथे देत आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Wed, 04/22/2009 - 19:06

Permalink

ओघावता लेख.

निरोप घेणं खरंच खुप अवघड असतं... घरातून शिक्षणासाठी बाहेर पडतेवेळी घरच्यांचा घेतलेला निरोप.. कॉलेजातून बाहेर पडतेवेळी चार वर्षांत जमवलेल्या जिवाभावच्या मित्र-मैत्रीणींचा घेतलेला निरोप.. परदेशी येताना घेतलेला निरोप... आणि परदेशातच जोडल्या गेलेल्यां मित्र-मैत्रीणींचा ठिकाणं बदलताना घेतलेला निरोप.... सगळं सगळं अवघड असतं, पण ह्याच सगळ्यांशी परत जेव्हा भेटतो तेव्हा त्यांना आणि स्वतःला झालेला आनंदही तेवढाच हवाहवासा आणि नात्याची विण घट्ट करणारा असतो... लेख आवडला. (असे तर नाही की शितलताईने लिहिला आणि प्राजुताईने लेख पोस्ट केला :? ) -अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Wed, 04/22/2009 - 19:09

Permalink

छान लिहिलंस प्राजु.

लेख खूप सुन्दर लिहिलास तू आणि पराचा प्रतिसादही अगदी साजेसा. संदीप खरेंची कविता खास आहे. खूप हळवे आणि नाजूक असतात निरोपाचे क्षण नेहमीच! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Wed, 04/22/2009 - 19:14

Permalink

मस्त लिहिले आहेस....

केनी रॉजर्सच्या एका जुन्या, माझ्या आवडत्या गाण्याची इथे आठवण झाली.
Why do people cry When they hear the word goodbye In a love song? Tears are sure to fall When you know they gave it all In a love song. ......
ते गाणे इथे ऐकता येईल -
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 04/22/2009 - 22:15

In reply to मस्त लिहिले आहेस.... by मनिष

Permalink

अरे क्या

अरे क्या बात है मनिष! सही!! :) धन्यवाद. प्राजू, खूप छान लिहिलं आहेस गं :)
  • Log in or register to post comments

Submitted by अबोल on Wed, 04/22/2009 - 19:16

Permalink

हलवून

हलवून सोडणारा लेख लिहिलात
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता श्रीपाद on Wed, 04/22/2009 - 19:16

Permalink

प्राजु...यु आर ग्रेट..

प्राजु...यु आर ग्रेट.. किती सह्ही लिहितेस गं तु....अप्रतिम लेख... मला माझ्या कर्‍हाडच्या घरचा "निरोप समारंभ" आठवला.३ च खोल्या ..पण मी परत परत फेर्‍या मारत होते.... असंख्य आठवणी मनात दाटुन आल्या होत्या..माझं आख्खं बालपणं जिथे गेलं ती वास्तु सोडायची म्हणजे काय.... आईनं गॅलरीत लावलेल्या गुलाबाच्या रोपांना आता कोण पाणी घालेल?.. मी आणि माझ्या बहिणीने अभ्यास करतान भिंतीवर लिहिलेली आमची नावं दिसली आणि रडु कोसळलं.... कधी नव्हे ते मी बाबांना पण रडताना पाहिलं होतं तेव्हा.... त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या कमाईची ती वास्तु होती ना... पण शेवटी "बदल" हाच फक्त "शाश्वत" असतो.... असो.. माझ्या या सगळ्या आठवणी जाग्या केल्याबद्दल तुला खुप खुप धन्यवाद.... -स्मिता
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Wed, 04/22/2009 - 19:17

Permalink

खुप छा न लेख....

खरंच !!! निरोप घेणं.. का इतकं अवघड असतं??? काही आठवणी झाल्या.......... सुहास आज "मै॑ या तो वो"
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 04/22/2009 - 19:19

Permalink

सह्ही.

प्राजु, मस्त लिहिले आहेस. मी भारतात जाताना मात्र तु भेटु नकोस नाही तर मा़झे काही खरे नाही.. आणी तु़झे ही..;)
  • Log in or register to post comments

Submitted by समिधा on Wed, 04/22/2009 - 21:53

Permalink

मस्त ग

खुपच छान आहे तुझा लेख. खुप प्रसंग डोळ्यासमोर आले. इकडे येताना घेतलेला घराचा आणि घरच्यांचा निरोप आठवला...... अजुन इथुन मांडलेला संसार आवरुन परत कधी गेले नाही पण जाताना कसे वाटेल ते जाणवले. =D> समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 04/22/2009 - 21:55

Permalink

सुंदर

सुंदर लिहिलंयस गं प्राजु. वाचताना सगळ्या प्रसंगात मी स्वतःच तिथे आहे की काय असे वाटले. माझ्या बहिणीच्या लग्नात मी रडणार नाही अशी शप्पथ घेतली होती. पण त्या क्षणी मात्र डोळ्यातून कधी पाणी आलं ते कळलंच नाही, आणि मी पण ते लपवायचा प्रयत्न केला नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 04/22/2009 - 22:16

In reply to सुंदर by बिपिन कार्यकर्ते

Permalink

सेम हिअर बिपिनदा!

माझ्या बहिणीच्या लग्नात (ती धाकटी त्यामुळे अजूनच लाड) असेच झाले. ते अश्रू मायेचे असतात, न बोलता बरंच काही सांगून जाणारे, एका भावाचं बहिणीवरचं प्रेम व्यक्त करणारे, त्यामुळे ते थोपवले जात नसतात! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by चकली on Wed, 04/22/2009 - 22:13

Permalink

लेख छान आहे

लेख छान आहे. आवडला..आणि पटला. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Wed, 04/22/2009 - 22:33

Permalink

उत्कृष्ट!

प्राजु, अतिशय सुंदर लिहिले आहेस. अभिनंदन. अभिज्ञ
  • Log in or register to post comments

Submitted by दिपाली पाटिल on Wed, 04/22/2009 - 23:29

Permalink

खरं च

खुप च छान लिहीलं आहे.. अजुन जुन्या अपार्टमेंटचा ही निरोप घेताना अस्सं च वाटतं. दिपाली :)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 04/22/2009 - 23:40

Permalink

मागे वळून

मागे वळून पहाताना.. हात हलवत "टाटा.. वी विल मिस्स यू" असं म्हणाणारे चेहरे धूसर होत जातात... आणि इतके दिवस प्रत्येकवेळी परतवून लावलेले अश्रू आता मात्र न जुमानता गालावरून खाली सांडतात. कारण.. हे मित्र- हे जीवलग्-ही नाती पुन्हा कधी, कोणत्या वळणावर भेटतील.. किंवा भेटतील की नाही?? याची काही शाश्वती नसते. आणि हे निरोप घेणं कायमचं मनावर कोरलं जातं. सुरेख..! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मानस on Wed, 04/22/2009 - 23:51

Permalink

अप्रतिम

तुझ्या कवितांचा मी पहिल्यापासुनच चाहता होतो, आज हा लेख वाचुन फारच आनंद झाला. काही काही वेळेस आपल्याला उगीचच काही आठवणी येतात .... आणि त्या जुन्या आठवणींमधे आपण रममाण होतो. तुझा हा लेख वाचल्यावर असच काहीसं झालं. गेल्या १४-१५ वर्षाच्या या देशाबाहेरच्या कालखंडात या अशा अनुभवातून अनेक वेळा गेलो आहे. बहुतेक सगळेच जात असतील. लेख वाचून झाल्यावर डोळ्यात टचकन पाणी आलं. यातच तुझ्या लेखाचं यश दडलं आहे. हे मित्र- हे जीवलग्-ही नाती पुन्हा कधी, कोणत्या वळणावर भेटतील.. किंवा भेटतील की नाही?? याची काही शाश्वती नसते. आणि हे निरोप घेणं कायमचं मनावर कोरलं जातं -- सुंदर तुझा हात नियतीने सतत लिहीता ठेवावा, हीच नम्र इच्छा ....
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 04/23/2009 - 00:14

Permalink

मस्त

लेख एकदम मस्त आहे. "निरोप" हा असा विषय आहे जो कधी ना कधी इच्छा असो अथवा नसो, आपल्याला अनुभवायला लागतो. दोन व्यक्तींमधे असलेली आत्मियतेची भावना ही अशा निरोपाच्या वेळेस एकाअर्थी सुखदायक पण वेदना म्हणूनच अनुभवावी लागते. त्या संदर्भात गीत रामायणातील "निरोप कसला माझा घेता..." हे सीतेच्या तोंडचे गाणे आठवले. अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव असेलच...अमेरिकेस पहील्यांदा आलो त्यासुमारास असे खूप झाले होते ते एकदम आठवले.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 04/23/2009 - 00:29

Permalink

मनाला भिडणारा

हा लेख खूप आवडला प्राजु... आधी एकदा वाचला होताच पण आता पुन्हा एकदा वाचला. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on गुरुवार, 04/23/2009 - 00:33

Permalink

अजून एक निरोप

एक महत्त्वाचा निरोप विसरलीस. माहित असलेला मृत्यूला सामोर जातानाचा निरोप. जी व्यक्ती जात असते तिला दु:ख होत असेल का ते माहित नाही. कदाचित पूर्ण तयारी झाली असेल त्या आजारी व्यक्तीची. पण नातेवाईकांची?सर्व उपायच थकून जातात तेव्हा. ते कसा देतात निरोप इच्छा नसूनही? मीनल.
  • Log in or register to post comments

Submitted by सखी on गुरुवार, 04/23/2009 - 02:08

Permalink

सुरेख

प्राजु सुरेख झालाय लेख हा. लहान-मोठे, तात्पुरते-कायमचे घेतलेले निरोप आठवुन गेले आणि नकळत डोळे ओलावले...
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 04/23/2009 - 03:50

Permalink

सुरेख!

सुरेख लेख! प्राजु इज बॅक!!!! आणि प्राजु, निरोपाला आणखी एक परिमाण आहे. आपल्या पितरांच्या अस्थी नदीत अर्पण करतांना घेतलेला निरोप!! यानंतर त्यांचं काहीही ऐहिक अस्तित्व रहात नसतं, रहातात त्या फक्त अमूर्त आठवणी!! तुम्ही मुलं लहान आहांत कदाचित अश्या प्रसंगातून गेला नसाल (देव करो आणि तुम्हांला पुढील अनेक वर्षे या प्रसंगातून जायला न लागो) पण तो निरोपही फार फार अवघड असतो.... असो. लेख खूप आवडला... -काका
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 04/23/2009 - 10:26

In reply to सुरेख! by पिवळा डांबिस

Permalink

आपल्या

आपल्या पितरांच्या अस्थी नदीत अर्पण करतांना घेतलेला निरोप!! यानंतर त्यांचं काहीही ऐहिक अस्तित्व रहात नसतं, रहातात त्या फक्त अमूर्त आठवणी!! तू म्हणतोस ते खरं आहे रे डांबिसा. साला, माझा बाप वारला तेव्हा त्याच्या अस्थी समुद्रात विसर्जित करतांना घेतलेला निरोप आठवला. त्याला दाखवता कधीच आलं नाही, परंतु खूप जीव होता त्याचा माझ्यावर! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अंतु बर्वा on गुरुवार, 04/23/2009 - 04:41

Permalink

सुंदर

छान लिहीलं आहे.... भुतकाळात घेतलेल्या काही निरोपांची आठवण आली ...ख्ररंच, निरोप घेणं फारच अवघड असतं... गुलाम अलींच्या या गझलेतलं हे शेवटचं कडवं ऐकताना हेच जाणवतं... वक्ते रुक्सत अलविदा का लब्ज कहने के लिए.... वोह तेरे सुखे लबों का थरथराना याद है....
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 04/23/2009 - 18:03

In reply to सुंदर by अंतु बर्वा

Permalink

अतिशय लाडकी गझल आहे माझी.

कधीही ऐकली तरी.. हृदयाचा ठाव घेते ती. धन्यवाद दुव्यासाठी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 04/23/2009 - 05:23

Permalink

छान लेख!!

छान लेख!!
  • Log in or register to post comments

Submitted by सायली पानसे on गुरुवार, 04/23/2009 - 09:45

Permalink

सुंदर लेख

प्राजु खुपच छान आहे ग लेख... अगदि मनातल्या भावना लिहिल्या आहेस. ३-४ वेळा हा अनुभव आला आहे पण प्रत्ये़क वेळी नविन ठिकाणी जाताना जुन्या जागेचा निरोप घेताना डोळ्यातला पाणी खळत नाही. जुने दिवस आठवले लेख वाचताना.
  • Log in or register to post comments

Submitted by वल्लरी on गुरुवार, 04/23/2009 - 11:24

Permalink

सुंदर

सुंदर लेख!! ---वल्लरी
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on गुरुवार, 04/23/2009 - 13:10

Permalink

मस्त लेख.

मस्त लेख. खुप आवडला -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
  • Log in or register to post comments

Submitted by jenie on गुरुवार, 04/23/2009 - 13:59

Permalink

अतिशय सुंदर

खरंच !!! निरोप घेणं.. का इतकं अवघड असतं??? काही आठवणी झाल्या डोळे भरुन आले .. माझे पण आनुभव सांगेन एकदा .... खरंच !!! निरोप घेणं खुप अवघड असतं
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 04/23/2009 - 14:46

Permalink

प्राजू सुरेख लेखन! जियो!

तुझ्यातली लेखिका प्रभावी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं! :) निरोप हा अवघड असतोच. व्यक्तीचाच काय पण मूक वास्तूचा निरोपही अतिशय कठिण असतो. आमच्या रहात्या वाड्याची डागडुजी होईनाशी झाली तेव्हा त्याचं अपार्टमेंट करायचं ठरलं. सगळं घर रिकामं करुन शेजारीच दुसर्‍या अपार्टमेंटमधे रहायला गेलो. वाडा जणू मूकपणे म्हणत होता "नका रे सोडून जाऊ, पण तुमची तरी काय चूक म्हणा मी असा जराजर्जर झालोय आता मी जाणंच योग्य आहे!" पहिली कुदळ वाड्यावर नाही हृदयावर पडली होती! अर्धवट पाडलेल्या वाड्यात जाऊन रडत बसलेल्या मला वडिलांनी समजूत घालून परत आणलं. त्या रस्त्याने जाण्याचं मी टाळायचो. पूर्ण वाडा पाडून नवीन वास्तू उभी राहिली त्याचवेळी मी तिथे गेलो. जुन्या वाड्याबरोबर जपलेल्या आठवणी मात्र आजही मनात घर करुन आहेत. तिथे घालवलेला जवळजवळ प्रत्येक क्षणनक्षण लक्षात आहे. तो निरोप फार फार अवघड होता. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 04/23/2009 - 18:09

Permalink

आपल्या

आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. मीनल, डांबिसकाका, आपलं म्हणणं बरोबर आहे. पण बर्‍याच वेळेला.. माझ्या लेखनातून तेच येतं ज्यातून मी स्वतः गेले आहे किंवा माझ्या अगदी जवळचे.. ज्यांना त्या अनुभवातून जाताना मी पाहिलं आहे. त्यामुळे लेखांत त्या त्रुटी असू शकतील. आपल्या प्रतिक्रियांबद्दल खूप आभारी आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on गुरुवार, 04/23/2009 - 19:54

Permalink

प्राजु,

सुरेख लेख लिहीला आहेस....निरोपाचे असंख्य प्रसंग आयुष्यात येत असतात..... :) सजीव तसेच निर्जिव वस्तुंचा सुद्धा निरोप घेताना जड जाते..... आम्ही परदेशात जाणार असल्यामुळे आमची ५ वर्षे सोबत असलेली सँट्रो जेव्हा आम्ही विकली..तेव्हा आम्हा दोघा नवरा-बायकोंना रात्री झोप आला नव्हती.. रात्रभर आम्ही त्या गाडीने कशी सोबत केली, कुठे कुठे घेऊन प्रवास केला, याच्या आठवणीत घालवली...कारण आमच्या घरात ती पहिली वहिली कार होती....ती पुसायला कधी आम्ही माणूस लावला नाही...घरीच आवडीने ते काम करत होतो..अगदी घरासारखे तीला चकचकीत ठेवत होतो....पण विकताना खूप वाईट वाटत होते....
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची on गुरुवार, 04/23/2009 - 19:58

Permalink

प्राजूताई,

प्राजूताई, खूप छान लिहिले आहेस. :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com