मस्त लेख ! आवडला !
निरोप घेणे खुप अवघड असते पण कधीकधी परिस्थितीपुढे मान तुकवावीच लागते...
जीवनाचे गाडे चालु ठेवावेच लागते इच्छा असो वा नसो. :)
खरे तर शिर्षक पाहुन उगाचच मनावर दडपण आले होते...
त्यामुळे घाबरतच धागा उघडला ...
वय झाले.. उगाच नाही नाही त्या शंका मनात येतात... असो.
--अवलिया
निरोप घेणे अवघड असतेच पण परिस्थितीमुळे किती तरी वेळा आवश्यकही..
लेख आवडला.
स्वाती
अवलियांचीच शंका माझ्याही मनाला स्पर्शून गेली. खरंतर आपल्या माणसांना तो 'शेवटचा निरोप देणं' सगळ्यात अवघड गोष्ट..
निरोप घेणं खरंच खुप अवघड असतं...
घरातून शिक्षणासाठी बाहेर पडतेवेळी घरच्यांचा घेतलेला निरोप..
कॉलेजातून बाहेर पडतेवेळी चार वर्षांत जमवलेल्या जिवाभावच्या मित्र-मैत्रीणींचा घेतलेला निरोप..
परदेशी येताना घेतलेला निरोप... आणि परदेशातच जोडल्या गेलेल्यां मित्र-मैत्रीणींचा ठिकाणं बदलताना घेतलेला निरोप....
सगळं सगळं अवघड असतं, पण ह्याच सगळ्यांशी परत जेव्हा भेटतो तेव्हा त्यांना आणि स्वतःला झालेला आनंदही तेवढाच हवाहवासा आणि नात्याची विण घट्ट करणारा असतो...
लेख आवडला.
(असे तर नाही की शितलताईने लिहिला आणि प्राजुताईने लेख पोस्ट केला :? )
-अनामिक
लेख खूप सुन्दर लिहिलास तू आणि पराचा प्रतिसादही अगदी साजेसा. संदीप खरेंची कविता खास आहे. खूप हळवे आणि नाजूक असतात निरोपाचे क्षण नेहमीच!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
प्राजु...यु आर ग्रेट..
किती सह्ही लिहितेस गं तु....अप्रतिम लेख...
मला माझ्या कर्हाडच्या घरचा "निरोप समारंभ" आठवला.३ च खोल्या ..पण मी परत परत फेर्या मारत होते....
असंख्य आठवणी मनात दाटुन आल्या होत्या..माझं आख्खं बालपणं जिथे गेलं ती वास्तु सोडायची म्हणजे काय....
आईनं गॅलरीत लावलेल्या गुलाबाच्या रोपांना आता कोण पाणी घालेल?..
मी आणि माझ्या बहिणीने अभ्यास करतान भिंतीवर लिहिलेली आमची नावं दिसली आणि रडु कोसळलं....
कधी नव्हे ते मी बाबांना पण रडताना पाहिलं होतं तेव्हा.... त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या कमाईची ती वास्तु होती ना...
पण शेवटी "बदल" हाच फक्त "शाश्वत" असतो....
असो..
माझ्या या सगळ्या आठवणी जाग्या केल्याबद्दल तुला खुप खुप धन्यवाद....
-स्मिता
खुपच छान आहे तुझा लेख. खुप प्रसंग डोळ्यासमोर आले.
इकडे येताना घेतलेला घराचा आणि घरच्यांचा निरोप आठवला......
अजुन इथुन मांडलेला संसार आवरुन परत कधी गेले नाही पण जाताना कसे वाटेल ते जाणवले. =D>
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
सुंदर लिहिलंयस गं प्राजु. वाचताना सगळ्या प्रसंगात मी स्वतःच तिथे आहे की काय असे वाटले.
माझ्या बहिणीच्या लग्नात मी रडणार नाही अशी शप्पथ घेतली होती. पण त्या क्षणी मात्र डोळ्यातून कधी पाणी आलं ते कळलंच नाही, आणि मी पण ते लपवायचा प्रयत्न केला नाही.
बिपिन कार्यकर्ते
माझ्या बहिणीच्या लग्नात (ती धाकटी त्यामुळे अजूनच लाड) असेच झाले.
ते अश्रू मायेचे असतात, न बोलता बरंच काही सांगून जाणारे, एका भावाचं बहिणीवरचं प्रेम व्यक्त करणारे, त्यामुळे ते थोपवले जात नसतात!
चतुरंग
मागे वळून पहाताना.. हात हलवत "टाटा.. वी विल मिस्स यू" असं म्हणाणारे चेहरे धूसर होत जातात... आणि इतके दिवस प्रत्येकवेळी परतवून लावलेले अश्रू आता मात्र न जुमानता गालावरून खाली सांडतात. कारण.. हे मित्र- हे जीवलग्-ही नाती पुन्हा कधी, कोणत्या वळणावर भेटतील.. किंवा भेटतील की नाही?? याची काही शाश्वती नसते. आणि हे निरोप घेणं कायमचं मनावर कोरलं जातं.
सुरेख..!
तात्या.
तुझ्या कवितांचा मी पहिल्यापासुनच चाहता होतो, आज हा लेख वाचुन फारच आनंद झाला. काही काही वेळेस आपल्याला उगीचच काही आठवणी येतात .... आणि त्या जुन्या आठवणींमधे आपण रममाण होतो. तुझा हा लेख वाचल्यावर असच काहीसं झालं.
गेल्या १४-१५ वर्षाच्या या देशाबाहेरच्या कालखंडात या अशा अनुभवातून अनेक वेळा गेलो आहे. बहुतेक सगळेच जात असतील. लेख वाचून झाल्यावर डोळ्यात टचकन पाणी आलं. यातच तुझ्या लेखाचं यश दडलं आहे.
हे मित्र- हे जीवलग्-ही नाती पुन्हा कधी, कोणत्या वळणावर भेटतील.. किंवा भेटतील की नाही?? याची काही शाश्वती नसते. आणि हे निरोप घेणं कायमचं मनावर कोरलं जातं
-- सुंदर
तुझा हात नियतीने सतत लिहीता ठेवावा, हीच नम्र इच्छा ....
लेख एकदम मस्त आहे. "निरोप" हा असा विषय आहे जो कधी ना कधी इच्छा असो अथवा नसो, आपल्याला अनुभवायला लागतो. दोन व्यक्तींमधे असलेली आत्मियतेची भावना ही अशा निरोपाच्या वेळेस एकाअर्थी सुखदायक पण वेदना म्हणूनच अनुभवावी लागते. त्या संदर्भात गीत रामायणातील "निरोप कसला माझा घेता..." हे सीतेच्या तोंडचे गाणे आठवले.
अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव असेलच...अमेरिकेस पहील्यांदा आलो त्यासुमारास असे खूप झाले होते ते एकदम आठवले.
एक महत्त्वाचा निरोप विसरलीस.
माहित असलेला मृत्यूला सामोर जातानाचा निरोप.
जी व्यक्ती जात असते तिला दु:ख होत असेल का ते माहित नाही. कदाचित पूर्ण तयारी झाली असेल त्या आजारी व्यक्तीची.
पण नातेवाईकांची?सर्व उपायच थकून जातात तेव्हा.
ते कसा देतात निरोप इच्छा नसूनही?
मीनल.
सुरेख लेख!
प्राजु इज बॅक!!!!
आणि प्राजु, निरोपाला आणखी एक परिमाण आहे. आपल्या पितरांच्या अस्थी नदीत अर्पण करतांना घेतलेला निरोप!! यानंतर त्यांचं काहीही ऐहिक अस्तित्व रहात नसतं, रहातात त्या फक्त अमूर्त आठवणी!!
तुम्ही मुलं लहान आहांत कदाचित अश्या प्रसंगातून गेला नसाल (देव करो आणि तुम्हांला पुढील अनेक वर्षे या प्रसंगातून जायला न लागो)
पण तो निरोपही फार फार अवघड असतो....
असो. लेख खूप आवडला...
-काका
आपल्या पितरांच्या अस्थी नदीत अर्पण करतांना घेतलेला निरोप!! यानंतर त्यांचं काहीही ऐहिक अस्तित्व रहात नसतं, रहातात त्या फक्त अमूर्त आठवणी!!
तू म्हणतोस ते खरं आहे रे डांबिसा. साला, माझा बाप वारला तेव्हा त्याच्या अस्थी समुद्रात विसर्जित करतांना घेतलेला निरोप आठवला. त्याला दाखवता कधीच आलं नाही, परंतु खूप जीव होता त्याचा माझ्यावर!
तात्या.
छान लिहीलं आहे.... भुतकाळात घेतलेल्या काही निरोपांची आठवण आली ...ख्ररंच, निरोप घेणं फारच अवघड असतं...
गुलाम अलींच्या या गझलेतलं हे शेवटचं कडवं ऐकताना हेच जाणवतं...
वक्ते रुक्सत अलविदा का लब्ज कहने के लिए.... वोह तेरे सुखे लबों का थरथराना याद है....
प्राजु
खुपच छान आहे ग लेख... अगदि मनातल्या भावना लिहिल्या आहेस.
३-४ वेळा हा अनुभव आला आहे पण प्रत्ये़क वेळी नविन ठिकाणी जाताना जुन्या जागेचा निरोप घेताना डोळ्यातला पाणी खळत नाही.
जुने दिवस आठवले लेख वाचताना.
तुझ्यातली लेखिका प्रभावी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं! :)
निरोप हा अवघड असतोच. व्यक्तीचाच काय पण मूक वास्तूचा निरोपही अतिशय कठिण असतो.
आमच्या रहात्या वाड्याची डागडुजी होईनाशी झाली तेव्हा त्याचं अपार्टमेंट करायचं ठरलं. सगळं घर रिकामं करुन शेजारीच दुसर्या अपार्टमेंटमधे रहायला गेलो. वाडा जणू मूकपणे म्हणत होता "नका रे सोडून जाऊ, पण तुमची तरी काय चूक म्हणा मी असा जराजर्जर झालोय आता मी जाणंच योग्य आहे!" पहिली कुदळ वाड्यावर नाही हृदयावर पडली होती! अर्धवट पाडलेल्या वाड्यात जाऊन रडत बसलेल्या मला वडिलांनी समजूत घालून परत आणलं. त्या रस्त्याने जाण्याचं मी टाळायचो. पूर्ण वाडा पाडून नवीन वास्तू उभी राहिली त्याचवेळी मी तिथे गेलो. जुन्या वाड्याबरोबर जपलेल्या आठवणी मात्र आजही मनात घर करुन आहेत. तिथे घालवलेला जवळजवळ प्रत्येक क्षणनक्षण लक्षात आहे. तो निरोप फार फार अवघड होता.
चतुरंग
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.
मीनल, डांबिसकाका,
आपलं म्हणणं बरोबर आहे.
पण बर्याच वेळेला.. माझ्या लेखनातून तेच येतं ज्यातून मी स्वतः गेले आहे किंवा माझ्या अगदी जवळचे.. ज्यांना त्या अनुभवातून जाताना मी पाहिलं आहे.
त्यामुळे लेखांत त्या त्रुटी असू शकतील.
आपल्या प्रतिक्रियांबद्दल खूप आभारी आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सुरेख लेख लिहीला आहेस....निरोपाचे असंख्य प्रसंग आयुष्यात येत असतात..... :)
सजीव तसेच निर्जिव वस्तुंचा सुद्धा निरोप घेताना जड जाते.....
आम्ही परदेशात जाणार असल्यामुळे आमची ५ वर्षे सोबत असलेली सँट्रो जेव्हा आम्ही विकली..तेव्हा आम्हा दोघा नवरा-बायकोंना रात्री झोप आला नव्हती.. रात्रभर आम्ही त्या गाडीने कशी सोबत केली, कुठे कुठे घेऊन प्रवास केला, याच्या आठवणीत घालवली...कारण आमच्या घरात ती पहिली वहिली कार होती....ती पुसायला कधी आम्ही माणूस लावला नाही...घरीच आवडीने ते काम करत होतो..अगदी घरासारखे तीला चकचकीत ठेवत होतो....पण विकताना खूप वाईट वाटत होते....
प्रतिक्रिया
मस्त लेख !
ह्म्म..
मस्त
ओघावता लेख.
छान लिहिलंस प्राजु.
मस्त लिहिले आहेस....
अरे क्या
हलवून
प्राजु...यु आर ग्रेट..
खुप छा न लेख....
सह्ही.
मस्त ग
सुंदर
सेम हिअर बिपिनदा!
लेख छान आहे
उत्कृष्ट!
खरं च
मागे वळून
अप्रतिम
मस्त
मनाला भिडणारा
अजून एक निरोप
सुरेख
सुरेख!
आपल्या
सुंदर
अतिशय लाडकी गझल आहे माझी.
छान लेख!!
सुंदर लेख
सुंदर
मस्त लेख.
अतिशय सुंदर
प्राजू सुरेख लेखन! जियो!
आपल्या
प्राजु,
प्राजूताई,