Skip to main content

दिवाळी अंक २०२१ : पेन्सिल रेखाटने

लेखक सुलेखा काणे यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर सुलेखा काणे यांची पेन्सिल रेखाटने गौतम बुद्ध गौतम बुध्द हत्ती हत्ती

वाचने 14142
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

क्या बात है ! सुंदर ! ❤️ शेडींग परफेक्ट आहे. बुध्दाच्या मुद्रेवरील प्रकाश परिणाम प्रभावी आहे गजराजाची महकायता उठून दिसते !

बुद्ध व बुद्धाच्या शिरोभूषणावरील आकृती या दोघांच्याही चेहेर्‍यावरील भाव शांतरसाचा प्रत्यय देणारे हवे होते.

चिकाटीने केलेले काम छान आहे. नुस्ती चित्रे देण्यापेक्षा स्वतःच्या चित्रकला-व्यासंगाबद्दल, तसेच चित्र साहित्य कोणते वापरले आहे, चित्रांचा आकार काय आहे, बनवायला किती वेळ लागला वगैरे माहिती दिल्यास आणखी वाचनीय होइल. या दिवाळी अंकातील माझ्या 'साकरते आहे एक अधूरे स्वप्न' या लेखात चित्रकलेविषयी पुष्कळ माहिती आणि लेखांचे दुवे दिलेले आहेत, ते सवडीने बघावेत असे सुचवतो. तसेच फ्रेंच चित्रकार Gustave Doré (१८३२-८३) याने अश्या प्रकारचे अफाट काम केलेले आहे, ते बघावे. आणखी चित्रे डकवावीत.

पेन्सिल रेखाटने आवडले. हत्तीचे रेखाटन विशेष आवडले. आणखीन रेखाटने आणि तुमचे या बाबतचे अनुभव वाचायला आवडतील.

अजून असलेत तर टाकावे कृपया. आणि नसलेत तर काढावे अन टाकावे कृपया. धन्यवाद.

रेखाटनांची चित्रे दिसत नसल्याने दुव्यांची दुरुस्ती सुचवण्यासाठी मी साहित्य संपादकांना संदेश पाठवला आहे. वरील दोन चित्रे खालील दुव्यांवर पाहता येतील. दोन्हीही रेखाटने सुरेख आहेत.