प्रोपगंडा (Propaganda)
प्रोपगंडा (Propaganda)
२०१७ साली लोकसत्ता दैनिकातील प्रचारभान सदरात श्री. रवि आमले ह्यांची 'प्रोपगंडा' वर एक अतिशय अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण अशी लेख मालिका प्रकाशित झाली होती. वरील चार परिच्छेद त्या मालिकेतील पहिला भाग "पब्लिक है, यह सब जानती है..?" मधून घेतले आहेत.
पुढे त्या मालिकेतील लेख व अधिकच्या माहितीसह त्यांचे 'प्रोपगंडा' नावाचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. दैनिकातली लेख मालिका आणि पुस्तक अशा दोन्हींचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करतोय. अर्थात ह्या लेखाचा उद्देश परीक्षण वा समीक्षण नसून स्वैर मांडणीद्वारे पुस्तकाचा परिचय व शिफारस आणि लेख मालिकेतील सर्व भागांच्या लोकसत्ता.कॉम वरील लिंक्स वाचायला सोयीस्कर पडतील अशा प्रकारे सूचिबद्ध करणे एवढाच मर्यादित आहे.
▲ 'प्रोपगंडा' पुस्तकाचे मलपृष्ठ.
'प्रोपगंडा' ह्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर उल्लेख केलेल्या प्रश्नांची लेखकाने संदर्भ आणि रोचक उदाहरणांसहित दिलेली उत्तरे वाचताना आपल्याला गुंगून जायला होते. 'प्रोपगंडा' चे प्रकार आणि व्याप्ती समजून घेत असताना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, राजकीय आणि सामाजिक वातावरणाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो, त्यांचे नव्याने अर्थ लागतात.
| लेखक | रवि आमले |
| प्रकाशक | मनोविकास प्रकाशन |
| ISBN | 978-81-943491-5-0 |
| पुस्तकाची पाने | 380 |
| बाईंडिंग | पेपरबॅक |
| किंमत | ४००/- |
श्री. रवि आमले लिखित 'प्रोपगंडा' हे पुस्तक केवळ वाचनीय नसून संग्रहणीयही आहे.
खाली लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या ४६ लेखांची सूची देत आहे. सगळे लेख माहितीपूर्ण आहेत. आपल्यापैकी अनेकांनी हे लेख आधी वाचले असतील, परंतु ज्यांनी अद्याप वाचले नसतील त्यांना हे सर्व लेख वाचण्याची आग्रही शिफारस करत आहे.
विषेश टिप्पणी : गमतीची गोष्ट अशी आहे कि ही लेखमाला प्रसिद्ध करताना लोकसत्ताने निष्पक्षपणाचा आव आणत काँग्रेसवर थोडीफार टीका करत त्यांच्या संघ, भाजप, मोदीविरोधी अजेंड्याचा प्रचार मोठ्या चलाखीने केल्याचे चाणाक्ष वाचकांच्या नजरेतून सुटणार नाही! अर्थात हा छुपा प्रचार लक्षात येण्यासाठी 'प्रोपगंडा' हि काय चीज आहे हे आपल्याला व्यवस्थित समजावण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.
प्रतिक्रिया
@ सुरिया & मित्रहो
व्यासंगी? ख्या ख्या ख्या
व्यासंगी?ख्या ख्या ख्याPropaganda यशस्वी होवू शकतो
समूहाची मानसिकता
झुंडीचे मानसशास्त्र-विश्वास पाटील
छान माहितीपूर्ण लेख.
प्रोपगंडा
@ किल्लेदार & स्मिता
सात भाग वाचुन झाले.
फक्त आपण कसे निर्दोष आहोत
तुम्हाला काय म्हणायचंच समजलं
ते कोणाला च समजत नाही.
Rangila रतन
जबरी
अर्थ हा आहे
तुम्ही म्हणता म्हंजे तसेच असेल
अभ्यासपूर्ण
नो बिंदी नो बिझनेस
मागे तनिष्कने अगोचरपणा केला होता
बालिश.
अपेक्शित प्रतिक्रिया!
+१ #NoBindiNoBusiness
कानाडोळा करण्याचे परिणाम आता दिसायला लागलेत
तुमच्याशी सहमत आहे!