डोळ्यांनी फळे खावित का?
आमच्या डाळिंबांच्या बागेत आलेली ही फळे:
ही फळे ‘भगवा’ या वाणाची असून गेल्या दोन वर्षात, कसलेही रासायनिक खत न घातलेल्या आणि कोणतेही किटकनाशक न फवारलेल्या झाडांना आलेली आहेत. आमच्या सेंद्रीय शेती अभ्यास गटातील मित्र - मार्गदर्शकास जेव्हा चार फळे खाऊन बघण्यासाठी पाठवली, तेंव्हा त्यांना ती छान वाटली. खरे सांगायचे तर आतले दाणे चांगले डाळिंबी असले, तरी ती दिसायला अजिबात सुंदर नाहीत, आणि खूप खूप गोड नाहीत. मी जेव्हा मित्राला असे विचारले, तेंव्हा त्यांचे म्हणणे होते, की फळाची नैसर्गिक चव तशीच असते. ज्यांना गोडच गोड फळ खायचे आहे, त्यांनी सरळ साखर खावी ना!
तसेच छाटणी घेतली असली तरी शक्यतो नैसर्गिक पध्दतीने वाढवल्यामुळे, झाडावर एकदमच सगळी फळे न येता, वेगवेगळ्या अवस्थेतील फळे एकाच वेळी दिसत आहेत. त्यामुळे बाग एकदम व्यापार्याला देणे शक्य नाही कारण त्यांना एकदम टेंम्पोभरून मालाचा सौदा करायचा असतो. त्या ऐवजी ती आठवड्यातून दोनदा तोडून महिना दोन महिने विकत रहावे लागेल. ते तसे कटकटीचे आहे आणि त्यासाठी त्या पध्दतीने काम करणारा माणूस/ तोडून नेणारा विक्रेता मिळाला पाहिजे. पण सर्वात महत्वाचे म्हणजे, आजूबाजूच्या शेतकर्यांनी जेव्हा ही फळे पाहिली, तेव्हा ‘हॅSSS! ही डाळिंबं कोण घेणार?’ अशी उस्फूर्त प्रतिक्रिया आली. एक दोघांना तोडण्यासाठी विचारले, तर त्यांनीही काही उत्साह दाखवला नाही. तसेच इतरही काही लॉजिस्टिक समस्या आहेत. परिणामी या वर्षी आंम्ही बाग काढण्याचा निर्णय घेत आहोत. डाळिंबांचा प्रयोग फारसा यशस्वी झाला नसला, तरी आमचा दुसरा प्रयोग बर्यापैकी यशस्वी झाला आहे. लवकरच त्याविषयी लिहिण्याचा विचार आहे.
****
अशाच एका शहरातील भाजी बाजार, वेळ संध्याकाळची, गर्दीची. एक सुशिक्षित, मध्यमवर्गीय बाई भाजी घेत घेत एका भाजीवालीजवळ आल्या. तिच्याकडे फुलकोबी (फ्लॉवर) होता, आणि बाईंना तो घ्यायचा होता. पण भाजीवालीकडे दोन वेगवेगळे ढीग होते. एकात मोठ्ठे पांढरेशुभ्र फुलकोबीचे टवटवीत गड्डे होते ८० रु. किलो. तर दुसऱ्या ढिगात थोडे लहान गड्डे होते ६० रु. किलो. बाईंनी दोन्ही ढिगातील भाजी नीट निरखून पाहिली. लहान गड्ड्यांच्या ढिगात त्यांना काही ठिकाणी एखाद् दुसरी अळीसुध्दा फिरताना दिसली. बाईंनी निवडून पण ६० रु. किलोच्या लहान गड्डे असलेल्या ढिगातील भाजी अर्धा किलो घेतली. हे पाहून भाजीवालीला आश्र्चर्य वाटले. न रहावून तिने विचारले, "ताई, तुंम्ही तर थोडा जास्त दर परवडणार्या व चांगल्या शिकलेल्या वाटता. मग फक्त १० रुपयांसाठी तुंम्ही अळ्या असलेली भाजी का घेतली?" बाई म्हणाल्या, "या ६० रुपये किलोवाल्या फुलकोबीवर अळी आहे, याचाच अर्थ ही भाजी खाऊन ती जगली आहे. दुसऱ्या मोठ्या, टवटवीत फुलकोबी वर तर एकही जीवजंतू दिसत नाही. नक्कीच त्यावर कीटकनाशक फवारले असावे. मग ज्यावर जीवजंतू जगलेच नाहीत, ती भाजी खाऊन माणूस तरी कसा निरोगी जगेल?"
****
झळझळीत रंग असलेली, मोठ्ठी फळे डोळ्यांना आकर्षक वाटतात. खासकरून रासायनिक खते घातल्यावर पिकाला भरपूर पाणीही द्यावे लागते. फळे उत्तम पोसल्यासारखी दिसतात. फळांमध्ये पाण्याचा अंशही जास्ती राहतो. त्यामुळे अशी भाजी व फळे दिसायला टवटवीत, चमकदार दिसतात. पण ती फोपशी असतात. जोडीला किटकनाशके फवारली असतील तर त्यावर कीटक, माशा, अळ्या दिसत नाहीत. पण विचार करा, जे इतर जीवजंतूंसाठी घातक आहे, ते मानवी पचनसंस्थेसाठी देखिल घातकच असणार नाही का? आत्ता लगेच नाही, तरी दिर्घकाळ सेवनाने तरी त्याचा परिणाम भोगावाच लागणार. मी स्वत: पुण्याच्या फुले मंडईत पालेभाजीच्या ढिगावर हिरव्या शेडचे आणि गाजराच्या ढिगावर तांबड्या शेडचे दिवे लावून बसलेले विक्रेते पाहिले आहेत.
म्हणून भाजी व फळे आपण डोळ्यांनी खात असू तर लवकरात लवकर ती सवय बदलली पाहिजे. काय भुललासि वरलिया रंगा | ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा || असे संत चोखामेळा उगीच नाही म्हणून गेले.

वाचने
33254
वाचनखूण
प्रतिक्रिया
82
एकदम भारी !
In reply to एकदम भारी ! by चौथा कोनाडा
दृष्टिकोन
In reply to दृष्टिकोन by कर्नलतपस्वी
बिंगो
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ||
मस्त
एक चवीने खाणारा .. म्हणून ही
In reply to एक चवीने खाणारा .. म्हणून ही by अमर विश्वास
वा! अगदी पोहोचवलात अनुभव
In reply to वा! अगदी पोहोचवलात अनुभव by स्वधर्म
नैसर्गीक ताजेपणा हा केव्हाही
योग्य मुद्दा मांडला आहे
In reply to योग्य मुद्दा मांडला आहे by ज्ञानोबाचे पैजार
शेंगदाण्याची चटणी म्हटले की
In reply to योग्य मुद्दा मांडला आहे by ज्ञानोबाचे पैजार
बुवा,
In reply to बुवा, by चौथा कोनाडा
हेचं वाक्य दुनियादारी चित्रपटात
छान लेख
म्हणून भाजी व फळे आपण
दृष्टीआड सृष्टी
In reply to दृष्टीआड सृष्टी by धर्मराजमुटके
खरं आहे
मग ज्यावर जीवजंतू जगलेच नाहीत
In reply to मग ज्यावर जीवजंतू जगलेच नाहीत by सुबोध खरे
अधिक एकांगी
लेख आवडला
डॉक्तरांनी दिलेली माहिती
वर्गीकरण नक्कीच करू शकतो
In reply to वर्गीकरण नक्कीच करू शकतो by Rajesh188
आवळा, जांबुळ,चिक्कू, पपई
एका आयुर्वेदिक डॉक्टरांकडे
In reply to एका आयुर्वेदिक डॉक्टरांकडे by रावसाहेब चिंगभूतकर
द्राक्षकन्या
In reply to द्राक्षकन्या by सुरिया
हो बरोबर. घेऊ नये माणसाने.
एकुण काय , "पारखी नजर"
कोंकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याची
In reply to कोंकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याची by Rajesh188
आंब्याच्या बाबतीत इतका गोंधळ
In reply to कोंकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याची by Rajesh188
कृत्रिम रित्या पिकवली जाणारी
खरे साहेब
In reply to खरे साहेब by Rajesh188
आंबा चिकू फणस इ अनेक फळे
In reply to आंबा चिकू फणस इ अनेक फळे by सुबोध खरे
Dr खरे
In reply to Dr खरे by Rajesh188
Tom and Jerry
In reply to Dr खरे by Rajesh188
भारत सरकार नी बंदी घातलेली
In reply to भारत सरकार नी बंदी घातलेली by Rajesh188
नैसर्गिक शेती चा विरोध काय
In reply to Dr खरे by Rajesh188
कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे
धाग्याचे सार्थक
खिश्यात पैसे असेल तर
डाळिंब शेतीचा वयक्तिक अनुभव
अधिक अपायकारक काय? कीड की जहाल किटकनाशके?
माझं मत आणि अनुभव
झाडांची स्वतःची पण राग प्रतिकार शक्ती असते ना
In reply to झाडांची स्वतःची पण राग प्रतिकार शक्ती असते ना by Rajesh188
अनुभवाशी जोडून घेता आले
In reply to अनुभवाशी जोडून घेता आले by स्वधर्म
+१
In reply to +१ by चौथा कोनाडा
आर्थिक गणित
In reply to आर्थिक गणित by स्वधर्म
भांगलण म्हणजे काय?
In reply to भांगलण म्हणजे काय? by टीपीके
भांगलण म्हणजे
In reply to भांगलण म्हणजे by स्वधर्म
धन्यवाद
झाडे जोमदार असतील तर फळेही उत्तम येतात
In reply to झाडे जोमदार असतील तर फळेही उत्तम येतात by नेत्रेश
नेत्रेश,
In reply to झाडे जोमदार असतील तर फळेही उत्तम येतात by नेत्रेश
बरोबर आहे.
In reply to बरोबर आहे. by वामन देशमुख
कैऱ्या झाडावरून
In reply to कैऱ्या झाडावरून by Rajesh188
काहीही आमचा एक आंब्याच झाड
प्रामाणिक म्हणून हनतीचं
In reply to प्रामाणिक म्हणून हनतीचं by प्राची अश्विनी
#मेहनतीचं
In reply to #मेहनतीचं by प्राची अश्विनी
अश्विनीजी,
In reply to अश्विनीजी, by स्वधर्म
स्वधर्म
In reply to स्वधर्म by Rajesh188
धन्यवाद
हे पाहा.
सफरचंदांची एक डॉक्यु पाहिली होती.
हरित क्रांती
In reply to हरित क्रांती by Rajesh188
कोणतेही नवीन वाण उत्पन्न करून केले तर. . .
नवीन वान निर्माण करताना जुने नष्ट होतात
एक अतिशय बाळबोध प्रश्न
In reply to एक अतिशय बाळबोध प्रश्न by रावसाहेब चिंगभूतकर
रासायनिक खतांचे फायदे आहेतच, पण तोटे अधिक
In reply to रासायनिक खतांचे फायदे आहेतच, पण तोटे अधिक by स्वधर्म
वर्षानुवर्षे रासायनिक खते
In reply to वर्षानुवर्षे रासायनिक खते by सुबोध खरे
‘अर्धसत्य’?
In reply to ‘अर्धसत्य’? by स्वधर्म
अर्धसत्यचा दुसरा भाग मी
In reply to अर्धसत्यचा दुसरा भाग मी by सुबोध खरे
तरीही रासायनिक खते का वाईट?
In reply to वर्षानुवर्षे रासायनिक खते by सुबोध खरे
डॉक्टर साहेबाना
In reply to डॉक्टर साहेबाना by Rajesh188
सर्रास रासायनिक खत विनाकारण
In reply to सर्रास रासायनिक खत विनाकारण by सुबोध खरे
त्या साठी शेती खाते असते
In reply to त्या साठी शेती खाते असते by Rajesh188
आपण डोकं वापरायचाच नाही आणि
अन्नदाता नसून तो अन्न उत्पादक
आहे असे मी अनेक वेळेस सप्रमाण लिहिलेले आहे.( अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांबद्दल लिहिल्यास या न्यायाने शिंपी सुद्धा वस्त्रदाता असायला हवा आणि बिल्डर सुद्धा निवारा दाता )
पाण्या मुळे शेतजमिनीत क्षार वाढतात ती नापीक होते असे मी कुठेही लिहिलेले नाही उगाच नको ते आरोप करण्यापूर्वी किमान थोडा तरी विचार करत जा.In reply to त्या साठी शेती खाते असते by Rajesh188
माती चे परीक्षण करणे,लोकांस
कोणताही धागा असेल तरी त्यात राजकारण आणून विचकाच करायचा विडाच उचलला आहे का आपण?
थोडक्यात आणि कमी शब्दात.
In reply to थोडक्यात आणि कमी शब्दात. by Rajesh188
मला अजूनही कळलं नाही.
In reply to मला अजूनही कळलं नाही. by रावसाहेब चिंगभूतकर
हे बघा. राजेश यांचे म्हणणे
दाळिंबाची वाईन
In reply to दाळिंबाची वाईन by सुरिया
सुरियाजी,
छोटेखानी लेख आवडला
In reply to छोटेखानी लेख आवडला by टर्मीनेटर
थोडे दिवस वाट बघा
In reply to थोडे दिवस वाट बघा by Rajesh188
ठीक आहे. मार्च पर्यत वाट बघतो